जगात ५ ℅ लोकंच फक्त यशस्वी का होतात?

Spread the love

जगात ५ ℅ लोकंच फक्त यशस्वी का होतात? याचे  रहस्य काय आहे? याचे उत्तर शोधण्याचा या ब्लॉग मध्ये प्रयत्न केला आहे.

गेल्या काही दिवसापासून जगात विविध क्षेत्रात महान बनलेल्या यशस्वी लोकांच्या जीवनाचा अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला आहे.

ही सामान्य जन्म घेतलेली लोकं महान कशी काय बनतात याची गुपिते शोधण्याचा प्रयत्न केला असता, मला ती गुपिते सापडली.

ती गुपिते आज तुम्ही आणि मी आपल्या जीवनात जर लागू केली तर जीवनात आपल्याला जेव्हढे यशस्वी व्हायचे आहे त्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही, आपण स्वतः सुद्धा!

काय मित्रांनो ते सिक्रेट समजून घ्यायला तयार आहात मग?  चला तर सुरुवात करूया…

रहस्य पहिले: एकाच ध्येयाची / कामाची निवड (One Goal)

जागतिक तत्ववेत्ता अर्ल नाइटिंगेल आपल्या ‘Strangest Secret’ या आपल्या जगप्रसिद्ध ग्रंथात असे म्हणतात की, जगातील केवळ ५ % लोकंच जीवनात यशस्वी होतात याचे मुख्य कारण म्हणजे, ते आपल्या जीवनात एकाच ध्येयाच्या विचाराने प्रेरित होऊन बाकी ९५ % लोकांचे अनुकरण करणे टाळतात आणि हेच त्यांच्या यशाचे पहिले रहस्य आहे.

९५% लोकं स्वतःला म्हणतात आपण सामान्य माणसं जीवनात जे काही प्राप्त होते ते आप-आपल्या नशिबाने मिळते यावर त्यांचा विश्वास असतो म्हणून ते सरासरी (Average) जीवन जगत असतात.

जगात ज्या लोकांनी सुपर सक्सेस मिळविले आहे त्यांच्या यशाचे पहिले सीक्रेट किंवा नियम म्हणजे संपूर्ण जीवनासाठी निवडलेले एकच ध्येय किंवा एकच काम  हे होय. यालाच एक-विचारावाद (Monotheism) असेही म्हणतात. एक ध्येय निवडल्याने काय घडले बघा, जगातील कोणतेही क्षेत्र घ्या त्या प्रत्येक क्षेत्रात काही मोजकीच यशस्वी लोकं आपल्या डोळ्यासमोर येतात.

जसे क्रिकेट म्हटलं की सचिन, धोनी, सेहवाग.

हिंदी सिनेमा म्हटले तर अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अमीर खान.

देशातील लीडर म्हटले तर गांधी, नेहरू, कलाम, मोदी.

उद्योगपती म्हटले की टाटा, बिर्ला, अंबानी.

संगीत म्हटले तर लता, आशा, रफी, सोनू निगम, अर्जित सिंग.

असे कोणतेही क्षेत्र बघा अगदी मोजकीच तारांकित नावे आपण सांगत असतो किंवा ऐकत असतो.

आता तुम्हीच सांगा वरील सर्व क्षेत्रात केवळ एवढीच लोकं आहेत काय? नाही ना? मग असे कोणते कारण आहे की फक्त यांचीच नावे आपण घेतो.

हीच उदाहरणे जगातील विविध क्षेत्र आणि त्या क्षेत्रातील लोकं बघा, टक्केवारी ५ एवढीच दिसेल. याचे मुख्य कारण समजून घ्यायचे म्हटले तर वरील सर्व महान लोकांमधे एक गोष्ट कॉमन दिसेल, ती म्हणजे वरील प्रत्येक महान व्यक्तीने आपल्या जीवनासाठी एक निश्चित काम आणि ध्येय निवडलेले दिसेल.

जर सचिनने तेंडुलकरने सहा सहा महिन्याने आपला खेळ बदलला असता, कधी बॅडमिंटन तर कधी हॉकी, तर कधी कबड्डी, असं केलं असतं तर आज त्यांना क्रिकेटचा देव कोणीच म्हटले नसते.

अमिताभ बच्चन यांनी असेच क्षेत्र बदलले असते, अभिनय सोडून कधी गायक व्हायचे तर कधी वादक व्हायचे असे केले असते तर त्यांना आज बिग बी किंवा महानायक कोणीच म्हटले नसते.

लता दीदीने गाणं सोडून काही वर्षांनी असे म्हटले असते कि गाण्यात आता खूप स्पर्धा आहे त्यामुळे एखादे वाद्य वाजवावे असं जर त्यांनी केलं असतं तर आज त्यांना भारताच्या गानकोकिळा कोणी म्हटले असते काय?

अशी अनेक उदाहरणे सांगता येतील की ज्यांनी जीवनात सुपर सक्सेस मिळविले त्यांनी जीवनात एकाच ध्येयाची निवड केलेली दिसेल.

परंतु आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या जीवनात कोणतेच ध्येय नसते कारण आपल्याला त्याची गरजही वाटत नाही, त्यामुळे आपल्याला जीवनात नेमके काय करायचे आहे हेच शेवटपर्यंत कळत नाही, शेवटी हे आपल्या नशिबातच असं लिहिलं असेल असं समजून आपण कसंतरी जीवन ढकलत असतो.

याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर आपल्या आसपास असलेल्या लोकांना खालील प्रश्न विचारून बघा, कि, त्यांना काय काय येते? तर ते तुम्हाला सांगतील त्यांना सगळं येते.

त्यांना दुसरा प्रश्न विचारून बघा कि, तुम्ही कशात निपुण (Expert) आहात? तर ते म्हणतील असं एक्सपर्ट वगैरे काही नाही पण आम्हाला सगळंच येतं.

जसे,

क्रिकेट, बॅडमिंटन बघीतले की खेळाडू व्हावेसे वाटते.

गाणी ऐकली की गायक व्हावेसे वाटते.

सिनेमा बघितला की हिरो-हिरोईन व्हावेसे वाटते.

अधिकारी बघीतले किंवा त्यांचे मोटिवेशनल भाषण ऐकले की अधिकारी व्हावेसे वाटते.

लीडर बघीतले की नेतेगीरी करावीशी वाटते.

वरील सर्व लोकांकडून प्रेरित होणे काही वाईट नाही, परंतु थोडे हे करायचे, थोडे ते करायचे या पारशिवणीच्या खेळामध्ये शेवटी आपण काहीच करत वा बनत नाही त्यामुळे आपल्या बाबतीत खालीलपैकी चार गोष्टी घडतात.

१) आपल्याला नैपुण्य (Experty) कशातच मिळत नाही.

२) आपले कुटुंब आणि समाज आपल्याला बेजबाबदार ठरवतो की, कोणतेही एक काम आपण धड करत नाही.

३) अशा सोडधर वृत्तीमुळे कोणत्याही एका कामात आपले लक्ष लागत नाही, त्यामुळे आपल्यावर सतत बेकारीची वेळ येते त्यामुळे नेहमी आर्थिक चणचण आणि यासोबतच कुटुंबातील लोकांवर सतत चिडचिड आणि भांडण अशा ताणतणावाच्या गर्तेत आपण सापडतो.

४) आपण सर्वात आळशी (Lazy) व्यक्ती आहोत अशी संबोधने कुटुंब व समाज आपल्याला लावत असतो.

तसे पाहिले तर हे आपण जाणूनबुजून करीत नसतो, तर ते काहीही न ठरवल्यामुळे होत असते.

जगप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर Tony Robbins म्हणतात की, “कोणतीही व्यक्ती आळशी नसते, त्यांचे ध्येय आळशी असते. कारण त्यांचे ध्येय त्याला प्रेरितच करीत नाही”. 

“People are not lazy. They simply have impotent (कमजोर/दुर्बल) goals – that is, goals that do not inspire them”. Tony Robbins

काय मित्रांनो, वरील गोष्टी समजून घेतल्यावर त्या तुम्हाला किती लागू होतात? हे सगळं खरं आहे की नाही, तुम्हीच सांगा? हे तुमच्या बाबतीत जरी खरे नसले तरी तुमच्या आसपास असणाऱ्या लोकांच्या जीवनात हे तुम्हाला नक्की दिसेल.

आपल्या मनात, हे करू की, ते करू? असे विचारांचे युद्ध चालते त्यामुळे आपण काहीच करत नाही, काही करावेसेही वाटत नाही. असे झाल्यामुळे तीन गोष्टी घडतात.

१) निराशावाद (Pessimism):

आपल्या जीवनाकडे, समाजाकडे आणि सिस्टीमकडे बघण्याचा आपला दृष्टिकोण निराशावादी बनतो.

२) तिरस्कार / घृणा (Hatred):

आपल्या आसपास असलेल्या ५% यशस्वी झालेल्या लोकांबद्दल आपल्या मनात तिरस्काराची भावना उत्पन्न होते त्यामुळे त्यांच्याकडून शिकण्याची आपली वृत्तीच संपून जाते.

३) दोषारोपण (Blaming):

जी लोकं जीवनात यशस्वी होत नाहीत ती स्वतःला सोडून इतर लोकांना व परिस्थितीला आपल्या अपयशाचे कारण मानायला लागतात.

काय मग कसे जीवन जगायचे आहे? ९५% लोकांमधून ५% लोकांमध्ये येण्याची तयारी आहे? याचे उत्तर होय असेल तर, जीवनात एक काम / एक ध्येय निश्चित करावे लागेल.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ध्येय कसे ठरवतात?

ध्येय निश्चित करण्याची प्रक्रिया कोणती आहे?

वरील प्रश्नांची उत्तरे पुढील ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेल. तर चला पुढील ब्लॉग मध्ये भेटुया!!

आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कोणत्या तीन गोष्ठी खास वाटल्या त्या नक्की कळवा, जेणेकरून मला आणखी लिहिण्यास प्रेरणा मिळेल.

तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏

आणखी वाचा: यशस्वी जीवनसाठी विक्री कौशल्याचे काय महत्व आहे? What is the Importance of Selling Skill for Successful Life?

आणखी वाचा: माणूस आपल्या उपजत कौशल्य आणि कल्पनांवर काम का करत नाही? Why are people not working on our talent and ideas?

आणखी वाचा: आपला शोध आपणच घेतला तर जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. No one can stop you from succeeding in life if you do your own research.

आणखी वाचा: जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवावे? How to get what you want in life?

आणखी वाचा: जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे? How to live life as a warrior?

This is for your Personal Growth, Please visit My Website https://www.lifeshodh.com


Spread the love

16 thoughts on “जगात ५ ℅ लोकंच फक्त यशस्वी का होतात?”

  1. The three points which I get from this blog as follows:
    1. आयुष्यात कधीही निराश होऊ नका.कारण हरलेला माणूस पुन्हा प्रयत्न करून यशस्वी होऊ शकतो पण निराश व्यक्ती प्रयत्नही करून पाहत नाही.
    २. आपल्या सोबतचे जे व्यक्ती यशस्वी झाले त्यांच्या तिरस्कार करण्यापेक्षा त्यांच्या कडून यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे.
    ३.स्वताःला किंवा दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा ध्येय प्राप्ती साठी प्रयत्न करा.
    Thank you sir, for sharing this amazing blog with us😊

    Reply
  2. नमस्कार सर आजचा ब्लॉग जगात ५ ℅ लोकंच फक्त यशस्वी होतात याचे रहस्य काय आहे? यामध्ये वाचतनी असे वाटते की यामध्ये आपल्या जीवनाचे सत्य लिहिले आहे जीवनामध्ये फक्त पाच टक्के लोकच का बरं सक्सेस होतात तर त्यांचे धैर्य एक असते दुसरे मार्गाकडे पाहतच नाही उदाहरण आपण सांगितल्याप्रमाणे अभिताभ बच्चन , सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादी जर इतर लोकांप्रमाणे यांनी आपले धैर्य सोडून दुसऱ्या मार्गाकडे वाटचाल केली असती तर आपल्या देशाला एवढा महान खेळाडू एवढे महान अभिनेते आणि एवढे लोकप्रिय जगात भारताचे नाव केलेले गायिका लतादीदी यांनी आपल्या क्षेत्रात जे केलं ते नंबर वन केलं आपण पण यांच्या जीवनावरून प्रेरित होऊन एकच ध्येय ठरवून त्यासाठी मेहनत घेऊन कष्ट करू तर तो घरी आपण प्राप्त करू शकतो आणि त्या क्षेत्रात आपण पण नंबर वन करू शकतो सर आपण ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे 1) निराशावाद २)तिरस्कार ३)दोषारोपण या गोष्टी आपल्या ला ध्येयप्राप्तीसाठी थांबवतात आपल्या मनात तिरस्काराची भावना असती आणि आपण या भावनेने इतरांपासून काही शिकण्याचा प्रयत्न करत नाही (जगप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर Tony Robbins म्हणतात की, “कोणतीही व्यक्ती आळशी नसते, त्यांचे ध्येय आळशी असते. कारण त्यांचे ध्येय त्याला प्रेरितच करीत नाही”. ) आणि हे वाक्य पण मनावर एक वेगळाच प्रभाव पाडते ब्लॉग वाचत यांनी मलाही माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले परिस्थिती कशी ही असो काहीही असो आपल्याला जीवनात काहीतरी करायचे आहे म्हणजे करायचे आहे नुकतेच काही तरी नाही तर ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रात अगदी टोकापर्यंत आणि नंबर बंद करायचे आहे मला आता हळू ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मिळत आहे आणि माझी अपेक्षा आहे सर मला समोरही माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळणारच आणि एक गोष्ट आणखी सांगायची वाटते ती म्हणजे सर आपण सांगितलं होतं तुम्हाला कुठे शोधायचे असेल तर तर तुम्ही लिहिलेल्या ब्लॉग मधे मला ब्लॉक वाचतनी असं वाटत होतं मी तुमच्याशी संवाद करत आहे सर मला आशा आहे की मला असेच आनंद पुढच्या ब्लॉक मध्ये येईल आणि माझ्या प्रश्नाचे उत्तरही मिळते धन्यवाद सर

    Reply
  3. नमस्कार सर,
    या ब्लॉग मध्ये तुम्ही हे share केले की जगात 5% लोक फक्त यशस्वी का होतात किंवा त्या पाठिमागे रहस्य काय?
    हा blog वाचताना हे समजते की नेमके आपण कमी कुठे पडतो आणि जे 5% जे लोक आहेत ते एक्स्ट्रा काय करता? एक असामान्य व्यक्ती महान कसा बनतो तर त्यांचे गुपिते असतात. तुम्ही दिलेली उदाहरणे सचिन तेंडुलकर , अर्जित सिंग, अंबानी , अमिताभ बच्चन ,मोदीजी ही सगळी नामवंत मंडळी आहे. यांच्यात आपल्याला एक कॉमन दिसेल कि हे लोक एका पर्टिक्युलर क्षेत्रातच काम करत आहेत. यावरुन आपल्याला एक super secret समजते ते म्हणजे –
    एकाच ध्येयाची / कामाची निवड (One Goal). आपले एकच ध्येय फिक्स असेल तर आपण ते ध्येय प्राप्तीची प्रक्रिया समजून घेतो आणि त्यावर कृती करतो. एकदा का आपण त्या ध्येयावर कृती करायला लागलो की ते आपल्याला निश्चितच प्राप्त होते. आपण जीवनात एकाच ध्येयाची निवड केली पाहिजे. and exactly tha same हे पाच टक्क्यांमध्ये येणारे लोक करतात.आणि 95% जे लोक असतात ते इतरांचे अनुकरण करत असतात आणि त्यांच्याचकडून एक ध्येय निश्चित होत नाही. अस्थिर category मध्ये येतात. शेवटपर्यंत त्यांना कळत नाही की आपल्याला नेमकं काय करायचं आहे? कुटुंब समाज अशा लोकांना बेजबाबदार ,आळशी, अयशस्वी असं समजायला लागतो. आणि मग अशीच लोकं नशिबाला दोष देत बसतात. निराशावाद, तिरस्कार, दोषारोपण अशा गोष्टी आपल्या मनात घर करून बसतात आणि आपल्याला यशस्वी होण्यापासून रोखतात. या Blog मध्ये सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे एक जगप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर Tony Robbins म्हणतात की, “कोणतीही व्यक्ती आळशी नसते, त्यांचे ध्येय आळशी असते. कारण त्यांचे ध्येय त्याला प्रेरितच करीत नाही”. त्यासाठी आपल्याला असे एक ध्येय निश्चित करावे लागले की ते आपल्याला पावलोपावली प्रेरित करेल.आणि मग आपल्याला सुद्धा या पाच टाक्कयांमध्ये येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
    सर, तुम्ही आम्हाला नेहमीच प्रेरित करत असतात,यशस्वी होण्याची रहस्ये आमच्याशी शेअर करतात या blogs or sessions च्या माध्यमातून त्यासाठी खूप धन्यवाद.😊

    Reply
    • याला म्हणतात, super learning, या ब्लॉग मधील रहस्य आत्मसात केली तर कोणतीही सामान्य व्यक्ती असामान्य बनू शकतो, कारण निसर्गाचे नियम कोणाचाही भेदभाव करत नाही. If you follow, they will follow you back. हे अगदी बरोबर आहे.

      Reply
  4. खरंतर हा प्रश्न खूप दिवसापासून मनात भेडसावत होता की काही मोजकीच माणसे का यशस्वी होतात? तर या प्रश्नाची सुटका तुमच्या या वैचारिक ब्लॉग मधून झाला. यश मिळवण्यासाठी त्या कामासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि त्यामध्ये continuity व एकाग्रता सुध्दा असणे गरजेचे आहे मग आता ही एकाग्रता येते कुठून? तर ही येते आपण ठरवलेल्या धेयातून. जर मला A च्य ठिकाणी जयायच आहे तर मी त्या ठिकाणी जाण्यासाठीचा मार्गाचा शोध घ्यायला लागेल आणि त्याच मार्गावरून प्रवास करू. मी A या ठिकाण पोहचेन कारण मला स्पष्ट माहिती आहे की मला याच ठिकाणी जायायच आहे .जर मी एखाद्या ठिकाणी निघालोय आणि ते ठिकाणचं माहिती नसेल तर तिकीट घेताना कंडक्टर ला कुठल नाव सांगता येईल? निश्चितच आपल्याला आपलं ध्येय स्पष्ट असेल तर sucusess पासून कोणीही अडवू शकणार नाहीत. आपण धेय्य निवडत असताना आपल्याकडे कन्फर्म एकच ध्येय नसतं तर त्यामधे आपण वेगवेगळे B plan arrenge करून ठेवतो त्यामुळे आपलं लक्ष हे त्या दोन्ही बाबीकडे केंद्रित करण्याचा आपण प्रयत्न करत असतो पण विज्ञान सांगते की माणूस एका वेळी एकच गोष्ट करू शकतो . आपलं ध्येय multy स्वरूपात असल्यामुळे आपणास सामान्य जीवन सगण्या शिवाय पर्याय उरत नाही त्यामुळे आपण 95% च्या गटात येऊन पडतो. आता हे ५% वाले multy पेक्षा ulty लाजास्त महत्व देतात म्हणुन ते आपल्या एकाच धेयावर पूर्ण Focus करतात आणि उतुंग असं यश संपादन करतात. त्यामुळे या ब्लॉग च्या माध्यमातून आम्हाला असामान्य जीवन जगण्याचा एक फॉर्म्युला मिळालेला आहे आणि फॉर्म्युला नुसार सोडवलेल गणित हे अचूक असतं आम्ही सुध्दा तुमचा हा अत्यंत म्हंत्वाचा फॉर्म्युला आमच्या आयुष्याची काठीनातली कठीण गणित सोडवू आणि त्या 5 % च्य गटामध्ये सामील होण्याचा आमचा नेहमी प्रयत्न राहिलं.आणि यशस्वी होण्यासाठी ऑक्सिजन सारखे विचार आम्हाला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

    Reply
  5. I think today’s young generation need this type of blogs Sir!
    Because
    सगळेजण फक्त आणि फक्त पळत आहेत आणि नंतर त्यांना असं वाटतं कि एवढ करूनही मी यशस्वी का नाही?
    याचे उत्तर साध्या सोप्या भाषेत या blog मध्ये अप्रतिम पणे मांडले आहे!
    आजकाल ची तरूण पिढी मध्ये consistency खूप कमी बघायला मिळेल कारण ते distract खूप लवकर होतात!
    ज्या गोष्टी ते present moment ला बघतात त्यासारखे च त्यांना बनावे वाटते आणि दुसरे काही बघितले की लगेच ते divert होतात आणि पहिले जी गोष्ट ठरवली होती ती सोडून दुसर्‍या गोष्टींचा मागे धावतात अशामुळे त्यांच्या हाती Instead of Success निराशा येऊन पडते.
    (ते मराठी मध्ये काही म्हणी आहे त अगदी त्या प्रमाणे च –
    हातच सोडून पळत्याच्या मागे लागणे
    आणि नंतर मग तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे अशी त्यांची अवस्था होऊन बसते)
    त्यामुळे मला असे वाटते की,
    तुम्हाला distract करणार्‍या किती ही गोष्टी असल्या तरी तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर Focused रहा आणि त्या दिशेने तुमच्या प्रयत्नात Consistency ठेवा मग by default यश हे तुम्हाला च मिळेल.
    -Just Start.
    Don’t think about it!.
    Don’t wait to be in the perfect Mood for it.
    Limit Distractions.
    Set proper goal.
    Don’t try to do everything at once.!

    काही वेळा आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपली consistency break करण्याचा प्रयन्त करतात
    परंतु जर आपल्याला त्या ५% लोकांसारखे जगायचे असेल तर आपल्याला विचार सुद्धा extraordinary चं करायला पाहिजेत Inshort for ex. आपल्याला जेवणात आईने खूप गोष्टी ताटात वाढून दिलेल्या असतात पण आपला focus फक्त आणि फक्त एकाच आवडत्या dish कडे असतो आणि आपण तेच खातो अगदी त्याच प्रमाणे आपल्या आयुष्यात सुद्धा कितीही भरकटायला झालं, निराश वाटू लागले, मन विचलित होऊ लागले तरीही आपण आपला focus हलू द्यायचा की नाही हे पूर्णपणे आपल्या वर depend आहे!
    हे मी एका कविते तून तुम्हाला समजवून सांगते.
    आयुष्य जगणं ही एक कला आहे,
    कसं जगायचं (like average 95%people or like 5% super successful people) हे ज्याचं त्याने ठरवायच !
    दुःख सगळ्यांनाच असतात !मग दुःखात दुःखाला सामोरे जायचं?
    की दुःखात पीचत जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं!
    उद्याच्या चिंता सगळ्यांनाच असतात!
    पण उद्याची शाश्वती मात्र कोणालाच नसते.
    मग उद्यासाठी मरायचं ?की आजच्या दिवसांमध्येच संपूर्ण
    आयुष्य जगायचं?
    हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं
    समाजात जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर
    स्पर्धा ही अटळ आहे.
    समाज…,
    समाज हा दुसऱ्यांना निंदा करण्यासाठीच असतो
    मग कोणासाठी जगायचं ?
    समाजासाठी जगायचं की स्वतःसाठी?
    हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं!
    आयुष्यात सुखाचे चार क्षण येतात
    टीच भर सुखात सुख मानायचं ?
    की ते सुख वाटून वाढवायचं?
    हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं!
    कोणाच्या तरी आदर्शांवरती जगायचं ?
    की स्वतःच्या आदर्श सोडून जायचं ?
    हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं!
    प्रत्येक सामान्य माणसामध्ये काहीतरी असामान्य असतात
    मग सामान्य म्हणून जगायचं ?
    की असामान्य म्हणून?
    हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं !!!
    💯☺👑
    अतिशय सुंदर blog होता सर
    असेच छान blog लिहीत रहा आणि
    आम्हाला प्रेरणा देत रहा Sir!

    Reply
  6. नमस्कार सर आजचा ब्लॉग जगात ५ ℅ लोकंच फक्त यशस्वी होतात याचे रहस्य काय आहे? यामध्ये वाचतनी असे वाटते की यामध्ये आपल्या जीवनाचे सत्य लिहिले आहे जीवनामध्ये फक्त पाच टक्के लोकच का बरं सक्सेस होतात तर त्यांचे धैर्य एक असते दुसरे मार्गाकडे पाहतच नाही उदाहरण आपण सांगितल्याप्रमाणे अभिताभ बच्चन , सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर इत्यादी जर इतर लोकांप्रमाणे यांनी आपले धैर्य सोडून दुसऱ्या मार्गाकडे वाटचाल केली असती तर आपल्या देशाला एवढा महान खेळाडू एवढे महान अभिनेते आणि एवढे लोकप्रिय जगात भारताचे नाव केलेले गायिका लतादीदी यांनी आपल्या क्षेत्रात जे केलं ते नंबर वन केलं आपण पण यांच्या जीवनावरून प्रेरित होऊन एकच ध्येय ठरवून त्यासाठी मेहनत घेऊन कष्ट करू तर तो घरी आपण प्राप्त करू शकतो आणि त्या क्षेत्रात आपण पण नंबर वन करू शकतो सर आपण ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे 1) निराशावाद २)तिरस्कार ३)दोषारोपण या गोष्टी आपल्या ला ध्येयप्राप्तीसाठी थांबवतात आपल्या मनात तिरस्काराची भावना असती आणि आपण या भावनेने इतरांपासून काही शिकण्याचा प्रयत्न करत नाही (जगप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर Tony Robbins म्हणतात की, “कोणतीही व्यक्ती आळशी नसते, त्यांचे ध्येय आळशी असते. कारण त्यांचे ध्येय त्याला प्रेरितच करीत नाही”. ) आणि हे वाक्य पण मनावर एक वेगळाच प्रभाव पाडते ब्लॉग वाचत यांनी मलाही माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले परिस्थिती कशी ही असो काहीही असो आपल्याला जीवनात काहीतरी करायचे आहे म्हणजे करायचे आहे नुकतेच काही तरी नाही तर ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रात अगदी टोकापर्यंत आणि नंबर बंद करायचे आहे मला आता हळू ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मिळत आहे आणि माझी अपेक्षा आहे सर मला समोरही माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळणारच आणि एक गोष्ट आणखी सांगायची वाटते ती म्हणजे सर आपण सांगितलं होतं तुम्हाला कुठे शोधायचे असेल तर तर तुम्ही लिहिलेल्या ब्लॉग मधे मला ब्लॉक वाचतनी असं वाटत होतं मी तुमच्याशी संवाद करत आहे सर मला आशा आहे की मला असेच आनंद पुढच्या ब्लॉक मध्ये येईल आणि माझ्या प्रश्नाचे उत्तरही मिळते धन्यवाद सर

    Reply
  7. खरंतर हा प्रश्न खूप दिवसापासून मनात उसळी घेत होता की जगामध्ये एवढी सरी लोकसंख्या असून सध्यस्थितीत जवळपास 750 कोटी लोक जगामध्ये आहेत मग यातून अगदी काहीच लोकं आपलं नाव , कीर्ती Sucessfull व्यक्ती म्हणून मिळवता. मग या गोष्टीचं कारण काय? असा प्रश्न पडणं साहजिकच आहे . ही कारणं ऐकत असताना आत्तापर्यंत विविध पुस्तकाद्वारे विविध कार्यक्रमाद्वारे या गोष्टीची उकल झालेली आहे परंतु त्यामधून पाहिजे तेवढं समाधानी उत्तर मिळालेलं नव्हत मात्र आज हा अतिशय महत्त्वाचा ब्लॉग वाचण्याचा योग आला आणि त्या कारणांचा अगदी सविस्तर पणे उलगडा समजून आला.
    आपल्या जीवनाची वाटचाल ठरवणारा मुख्य स्त्रोत म्हणजे आपण ठरवलेलं ध्येय. आपण पण ज्या प्रकारचे हे ठरवतो त्या प्रकारे आपलं माईंड ऍक्टिव्हिटी चालू करते आणि त्यातून रिझल्ट यायला लागतात आणि आपल्या या प्रमाणे आपलं जीवन बदलत असते. एखाद्या क्षेत्रामध्ये अगणित कामगिरी करण्यासाठी आपले ध्येय सुद्धा अतिशय मजबूत असणं खूप गरजेचे आहे. सर आपण सांगितलेल्या यशस्वी जीवनासाठी लागणार रहस्य हे अत्यंत महत्त्वाचं रहस्य आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या दया ची निवड करत असताना एकाच ध्येयाची निवड करणे हे यशस्वी जीवनासाठी जणू काही ऑक्सिजन प्रमाणे आहे.
    जर आपण एक ध्येय निश्चित करून त्यावर फोकस केलं तर आपलं माईंड सुद्धा त्याच ध्येयावर पूर्णपणे काम करायला सुरुवात करतात आणि ज्यावेळी माईंड एखाद्या गोष्टीचा विचार करत असते जर त्याच गोष्टीचा विचार पुन्हा पुन्हा करण्यासाठी आपण माईंड ला प्रवृत्त केलं तर जी गोष्ट रिपीट होते त्या गोष्टीवर आपलं माईंड खूप लवकर ॲक्शन घेते ( repetition is the mother of learning). आणि ॲक्शन हे रिजल्ट निर्माण करत( action produce result) असतात परिणामी आपलं जीवन इतरांपेक्षा वेगळं होतं आणि सक्सेसफुल च्या यादीमध्ये आपलं सुद्धा नाव येऊ शकतं.
    आज पर्यंत जगामध्ये जाही व्यक्तीने अगणित यश मिळवलेला आहे त्यांच्या यशाचे रहस्य बघितलं तर त्यांनी एकाच ध्येयाची निवड करून त्यावरच totally concentration केलेला आहे त्यामुळे एक निवडून त्यामध्येच अमर्याद काम करणे हे यशस्वी जीवनासाठी खूपच महत्त्वाचा आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून खरंच आम्हाला यशाची चावी सापडलेली आहे त्यामुळे आता यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अगदी आमच्यासाठी मोकळा झालेला आहे आणि हे सर्व लाईफ फॅमिली मुळे आणि सर तुमच्या मुळे घडत आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

    Reply
  8. Excellent blog Sir…….
    या ब्लॉग मध्ये 5% लोक कसे यशस्वी होतात याची खूप योग्य कारणे दिली आहेत.आयुष्यामध्ये goal निश्चित करन आणि तिथं पर्यंत पोहचन फार महत्वाचं आहे पण हे काम फक्त 5 % लोकं यशस्वी पणे पूर्ण करतात. कारण 95% लोकांना आपल ध्येय च माहीत नसत,त्यांना आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे कधी ठरवलेलच नसत म्हणून ते कोणत्याच क्षेत्रामध्ये परिपूर्ण नसतात .कोणतीच गोष्ट ते साध्ये करू शकत नाही,याचा सगळं दोष ते नशिबाला देत असतात.कारण जे नशिबात आहे ते होईल असा विचार करतात ते त्यामुळं ते जीवनात यशस्वी होत नाहीत.95% लोकं ही आळशी बनत जातात आणि ते सामान्य जीवन जगत राहतात .सामान्य जीवन आपल्याला जगायचं नसेल ,5% लोकांनसारख जीवनात यशस्वी होय च असेल तर आदी आपल ध्येय ठरवावं लागेल,त्यावर काम करावं लागेल, चांगल्या व्यक्तीची संगत धरावी लागेल म्हणजे आपल्या जीवनात निराशा येणार नाही, आपण नशिबाला दोष देणार नाहीत आणि पण सगळ्यांपेक्षा वेगळे असू
    हे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितले.
    Thank you sir 🙏🙏

    Reply
  9. नमस्कार सर,
    आपण पाहतो जगातील फक्त पाच टक्के लोक सक्सेसफुल जीवन जगत असतात. आणि इतर 95 टक्के लोक हे तडजोडीस जीवन जगत असतात. एवढी तफावत असण्याचे कारण काय असेल ? तर या ब्लॉगमध्ये आपल्याला समजते की नेमके 5% लोक हे सक्सेसफुल होण्यासाठी काय करतात आणि त्यांचे secret काय असते.
    ते secret म्हणजे ते लोक आपल्या जीवनात एकच ध्येय निश्चित करतात. म्हणूनच ते पाच टप्प्यांमध्ये येतात. आपण असं ध्येय निश्चित करत नाही,आपण कधी हे करायचं कधी ते करायचं असच करत बसतो. आणि मग आपल्याच्याने काहीच होत नाही. त्यासाठी आपण एक ध्येय निश्चित करायला पाहिजे त्यावर विचार करायला पाहिजे. आपल्या mind ला सांगून ठेवले पाहिजे की मला हेच करायचा आहे मग आपलं माईंड त्याच गोष्टी शोधायला लागते. कारण आपलं mind नेहमी आपल्या फेवरमध्ये काम करत असते.मनात हे करू की ते करू अशी स्थिती निर्माण झाली की मग निराशावाद, तिरस्कार , दोषारोपण अशा गोष्टी घडायला लागतात. पाच टक्के लोकांमध्ये यायचं असेल तर आपल्याला एक ध्येय /एक कामच निश्चित करावे लागेल. आणि त्यावरच कार्य करत राहावं लागेल. मला पण यशस्वी नक्की होवू शकतो.
    Thank you sir for this amazing blog😊…

    Reply
  10. प्रथम, आपल्याला यशाची व्याख्या करावी लागेल : “यश म्हणजे एका योग्य आदर्शाची प्रगतीशील जाणीव.”
    एक यश म्हणजे शाळेतील शिक्षक जो शिकवत आहे कारण त्याला किंवा तिला तेच करायचे आहे. एक यशस्वी उद्योजक आहे जो स्वतःची कंपनी सुरू करतो कारण ते त्याचे स्वप्न होते आणि तेच त्याला करायचे होते. एक यशस्वी विक्रेता आहे जो त्याच्या किंवा तिच्या कंपनीमध्ये सर्वोत्तम विक्रेता बनू इच्छितो आणि त्या ध्येयाचा पाठपुरावा करतो.
    यशस्वी असा कोणी आहे जो एक योग्य पूर्वनिर्धारित आदर्श साकारत आहे, कारण त्याने किंवा तिने हेच करायचे ठरवले आहे … मुद्दाम. पण २० पैकी फक्त एकच असे करतो! बाकीचे “अपयश” आहेत.
    ध्येय असलेले लोक यशस्वी होतात कारण त्यांना माहित असते की ते कुठे जात आहेत. ते इतके सोपे आहे. दुसरीकडे, अपयशी लोकांचा असा विश्वास आहे की त्यांचे जीवन परिस्थितीनुसार घडते … त्यांच्यासोबत घडणाऱ्या गोष्टींद्वारे …
    ते शेवट लक्षात घेऊन सुरुवात करतात.
    संपूर्ण प्रवास मॅप केलेला आणि नियोजित असलेल्या जहाजाचा विचार करा. जहाज कोठे जात आहे आणि त्याला किती वेळ लागेल हे कॅप्टन आणि क्रूला माहित असते आणि त्याचे निश्चित ध्येय असते. आणि 10,000 पैकी 9,999 वेळा, ते तेथे पोहोचेल.
    आता आपण दुसरे जहाज घेऊ आणि पहिल्याप्रमाणे आणि फक्त त्यावर क्रू किंवा कर्णधार ठेवू नका. चला याला कोणतेही लक्ष्य बिंदू देऊ नका, कोणतेही ध्येय देऊ नका. आम्ही फक्त इंजिन सुरू करतो आणि ते जाऊ देतो. मला वाटते की तुम्ही सहमत असाल की जर ते बंदरातून अजिबात बाहेर पडले तर ते एकतर बुडेल किंवा काही निर्जन समुद्रकिनार्यावर आणि निर्जन समुद्रकिनार्यावर संपेल. ते कुठेही जाऊ शकत नाही कारण त्याला कोणतेही ध्येय नाही आणि मार्गदर्शन नाही.
    ध्येय निश्चित करताना, आपण कुठे जात आहात हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. तुमची ध्येये लिहिताना, तुम्हाला तुमच्या अंतिम गंतव्याचा मार्ग समजला आहे याची खात्री करा. शेवटी, स्पष्ट रोडमॅपशिवाय ध्येय हे फक्त एक स्वप्न आहे. तुमचे ध्येय कागदावर दिसले की, तेथे जाण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे ते लिहा. ही तुमची उपलक्ष्ये आणि संसाधने आहेत जी तुम्हाला वाटेत समर्थन देण्यासाठी आवश्यक असतील.
    ते त्यांच्या आजूबाजूला सपोर्ट सिस्टम तयार करतात.
    उच्च कामगिरी करणारे आणि उत्पादक लोक हे एकटे करत नाहीत. गुरू, प्रशिक्षक किंवा सल्लागार (किंवा सल्लागार संघ) यांच्या मदतीने ते अधिक साध्य करू शकतात आणि ते जलद करू शकतात हे त्यांना समजते. जर तुम्हाला टेनिसमध्ये चांगले व्हायचे असेल, तर तुम्ही कदाचित एखाद्या प्रशिक्षकाची नियुक्ती कराल जो तुम्हाला तुमची सर्व्हिस किंवा बॅकहँड व्हॉली सुधारण्यात मदत करेल. मोठे ध्येय निश्चित करणे आणि पूर्ण करणे वेगळे नाही. सहयोगी शोधा आणि तज्ञांचे नेटवर्क तयार करा जे तुमच्या यशाची काळजी घेतात आणि तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेत राहतात. त्यांच्याशी नियमितपणे भेटा, त्यांची बुद्धी जाणून घ्या, सल्ला विचारा आणि लक्षपूर्वक ऐका.
    त्यांनी विशिष्ट आणि आव्हानात्मक ध्येये सेट केली.
    एडविन लॉक आणि गॅरी लॅथम यांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले की जेव्हा लोकांनी ही दोन तत्त्वे (विशिष्ट आणि आव्हानात्मक उद्दिष्टे) पाळली, तेव्हा ९० टक्के वेळा उच्च कामगिरी होते. उदाहरणार्थ, तुमचे ध्येय वर्षाच्या अखेरीस ३० किलो वजन कमी करण्याचे असल्यास, ते आव्हानात्मक असू शकते, परंतु ते खूप अस्पष्ट आहे आणि पुरेसे विशिष्ट नाही. त्याऐवजी हे करून पहा: “जुलै महिन्यात, मी साखर, ब्रेड आणि सोडा कमी करून पाच किलो वजन कमी करेन. मी दररोज 20 मिनिटे वेगाने चालेन.” जेव्हा तुमच्याकडे तुमच्या ध्येयाविषयी इतकी स्पष्टता असते, तेव्हा तुमची ध्येय गाठण्याची शक्यता वाढते.
    Thank you,Sir!

    Reply
  11. या सुंदर जगामध्ये आज बघायचं झालं तर माणसांची गर्दी वाढलेली आहे . एवढी गर्दी वाढली आहे की मागणी आणि पुरवठा यांच्यामधील तुटवडा किती निर्माण होत आहे आपणा सर्वांनाच माहिती आहे आणि आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या स्पर्धेमध्ये हे बघत असत तरीसुद्धा या प्रचंड गर्दीच्या बाजारात देवाने आपल्याला पाठवलेला आहे. एवढ्या करोडच्या गर्दीमध्ये आपली निर्सगाच्या का गरज होती ? निसर्गाने आपल्याला एव्हढी प्रचंड लोक असताना आपल्याला का बरे या सुंदर जगामध्ये पाठवलेलं असावं ? या गोष्टीचा विचार करत असताना एक लक्षात येते की आपल्या मध्ये सुद्धा काहीतरी वेगळं करण्याची ताकत आहे काहीतरी भन्नाट करून दाखवण्याची वृत्ती आहे त्यामुळे देवाने या करोडच्या स्पर्धेमध्ये आपल्याला एक कणखर स्पर्धक म्हणून या पृथ्वीतलावर जन्माला घातलेला आहे.

    सद्यस्थितीला जगामधील लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्या सध्याला साडेसात ते आठ करोड आहे आणि लोकसंख्या झपाट्याने वाढ होत आहे आपणा सर्वांनाच माहिती आहे. या अफाट लोकसंख्या तून फक्त काहीच लोक यशस्वी होऊन दाखवतात. ते त्यांना जे हवं आहे ते मिळवतात आणि जीवनाचं सार्थक करून घेतात . हे अगदी मोजकेच लोक हे यशस्वी होण्यामागे कोणत कारण असेल? हीच लोकं का त्यांचा जीवनाच सोनं बनवू शकतात? आणि तेही सामान्यातून असामान्य यांचा प्रवास करतात आणि आपल्या जीवनाचा उद्देश प्राप्त करत असतात आणि त्यातून ज्या कारणासाठी आपण जीवन जगतो ते साध्य करत असतात.

    मी लहानपणी माझ्या आई-वडिलांना एक प्रश्न विचारायचो की , “तुम्ही मला अभिमानाने सांगता की, गावातला हा अमुक माणूस या क्षेत्रात यश मिळवला त्याने त्याच्या जीवनाचं सार्थक करून घेतलं मग तुम्ही तुमच्या जीवनाचे सार्थक का करून नाही घेतलं? तुमच्या बरोबरचा माणूस उंच शिखरावर पोहोचला आहे आणि तुम्ही आहे त्या ठिकाणीच आहात असं का? असा प्रश्न मी माझ्या आई-वडिलांना विचारायचं त्यावेळेस तुम्ही जे या ब्लॉक मध्ये सांगितला तसेच उत्तर त्यांची यायची ते म्हणायचे आम्हाला पैसेच मिळत नव्हत, आम्हाला घर सांभाळण्याची जबाबदारी होती, आम्हाला मार्गदर्शन करणारे कोणी नव्हतं, अशा अनेक तक्रारी ची यादी त्यांनी माझ्या समोर ठेवायचे . आणि मला सुद्धा त्यावेळी ते योग्य वाटायचं कारण त्यांच्या सारखे सामान्य विचारांचा होतो परंतु आज हा तुमचा ब्लॉग वाचला आणि सामान्य विचारातून असामान्य हो होण्याची चाहूल निर्माण झालेली आहे.

    खरंच जर या पाच टक्के लोकांच्या यादीमध्ये आपले नाव आणायचा असेल तर त्यासाठी लागणारे सीक्रेट खूप महत्त्वाचे आहेत आणि जर हीच सीक्रेट आपण आपल्या आयुष्यात लागू केली तर नक्कीच आपण असामान्य व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ शकतो यात काही शंका नाही.

    ध्येयाची स्पष्टता ही यशस्वी होण्यासाठी ची चावी असते. Clear goal is the key of sucusess. आपल्याला जर एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर त्या ठिकाणची स्पष्टता आपल्याला माहिती नसेल आपल्या Destination मध्ये confusion असेल आणि त्याठिकाणी पोहोचण्यासाठी आपण गाडीत बसलेलो आहोत तर तिकीट कोणत्या ठिकाणचं काढायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो आणि आपला प्रवास तिथेच थांबतो त्यामुळे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या डेस्टिनेशन वर पोहोचण्यासाठी आपलं डेस्टिनेशन स्पष्ट असणे गरजेचे आहे.

    जीवनाचा goal set असेल तर आणि ते गोल साध्य करण्यासाठी आपण कामाची सुरुवात केली असेल तर रस्त्यात येणारे सगळे आव्हाने मागे पाहण्याची त्यांना तोंड देण्याची शक्ती आपल्यामध्ये आपोआप निर्माण होत असते आणि त्यातून आपण आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे त्या ठिकाणी नक्की पोहोचू शकतो त्यासाठी फक्त एकाच ध्येयाची निश्चिती आणि निश्चित केलेल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपण केलेली सुरुवात ही खूप महत्त्वाची असते आणि त्यातूनच आपल्या यशाचा Base तयार होतो .

    जर आपण एकच ध्येय निवडून तेच आपला जीवनाचा उद्देश ठरवला तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि आपण या 5% लोकांमध्ये टॉप ला येऊ शकतो त्यासाठी फक्त या ब्लॉग मध्ये दिलेली सीक्रेट आपल्या आयुष्यात लागू करणे गरजेचा आहे ज्यावेळेस ही रहस्य आपल्या जीवनात लागू होतील त्यावेळेस जीवनात आनंदाचा, समाधानाचा, सुखा समृद्धीचा महापूर आल्याशिवाय राहणार नाही.
    जीवनात यशस्वी होण्यासाठी Full Charge करणारा ब्लॉग आमच्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. 🙏

    Reply
  12. नमस्कार सर,
    No man is perfact ही जी म्हण आहे याचा अर्थ आज इथे उलगडले सारखं वाटतंय म्हणून परिपूर्ण कधीच आणि कोणीच होऊ शकत नाही आणि सर्व कामांमध्ये पारंगत नाही राहु शकत नाही आज हा ब्लॉग वाचून जीवनाची मोठी चूक करायची वाचली हा ब्लॉग खरं तर माझ्या जीवनाची चूक होण्यापासून वाचविणाऱ्या ठरला हा ब्लॉग वाचल्यानंतर हे तर नक्कीच स्पष्ट झालं की दहा ठिकाणी 22 फूट खणून पाणी लागणार नाही म्हणजे ध्येय प्राप्ती होणार नाही तर एकाच ठिकाणी वीस फूट खाल्ल्यावर पाणी लागेल म्हणजे ध्येय प्राप्त होईल.
    आजचा ब्लॉग खरा म्हणजे ही जगाची परिस्थिती आहे हीच वस्तुस्थिती आहे आपले जीवनात एक निश्चित ध्येय असले पाहिजे आणि त्यावरच पूर्ण 100% फोकस असला पाहिजे.
    आणि मग तेव्हाच आपण आपल्या क्षेत्रात एक उत्तम व्यक्ती म्हणून नावारूपास येऊ शकतो ते तुम्ही stangesh secret या जगप्रसिद्ध ग्रंथातून ही गोष्ट आमच्या समोर मांडली आहे म्हणजे हे सिद्ध झालेला आहे आणि केलेला रहस्य आहे तिथे तुम्ही उदाहरण दिलेला आहे राजकारणी, क्रिकेटर, उद्योजक या उदाहरणातून हे शंभर टक्के योग्य आहे हे सिद्ध होतं हीच गोष्ट माझ्या डोक्यात छापलेली आणि मी तुमचे बरेच ब्लॉग वाचले प्रत्येक ब्लॉग मध्ये असेच उदाहरण असता तथ्ये असलेली सिक्रेट माहीत होता, सिद्धांत शिकायला भेटतात.
    संपूर्ण जीवनासाठी जेव्हा आपला उद्देश एकच असणार ध्येय एकच असणार तेव्हा ह्या परिस्थितीत आपले सर्व लक्ष त्याच एका गोष्टीवर ध्येयावर केंद्रित असेल आपला मन बुद्धी सर्व त्याच्याच विचारात असेल नवीन नवीन कल्पना ह्या त्याबद्दलच राहणार आपली कृती सारख्या सारखीच असणार आपले सर्व प्रयत्न त्याच ध्येयाची उंच उंच उंच शिखर गाठण्यासाठी असणार मग या परिस्थितीत आपण एक उत्तम एक यशस्वी व्यक्ती होऊन जातो त्या क्षेत्रात आपले तन मन सर्व ताकद एकाच गोष्टीसाठी लागतेय.
    कोणताही सजीव प्राणी मानव हा एकाच क्षेत्रात जास्त उत्कृष्ट असू शकतो मी आज पर्यंत सर्व क्षेत्रात एक माणूस पारंगत आहे असे कुठे वाचले नाही आणि ऐकलीही नाही One for all हे शक्यही नाही वाघ शिकार करू शकतो पण उडण्यात तो फुलपाखराची ही बरोबरी करू शकत नाही आणि जर तो उडवण्याच्या नादात लागला तर तो शिकार नीट करू शकणार नाही शिकार सुद्धा त्याला नीट करता येणार नाही कारण शिकारी कडे त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं
    म्हणून आपले काय गुण आहे आपल्यात काय कौशल्य आहे आपल्याला कोणतेही क्षेत्र आवडते आपण कोणत्या क्षेत्रात क्षेत्रात उत्तम करू शकतो या सर्व प्रश्नांची उत्तर शोधून एकमेव ध्येय संपूर्ण जीवनासाठी एकच ध्येय निश्चित करून आपण त्या बाकी जगापेक्षा काहीतरी उत्तम , काहीतरी वेगळं, काहीतरी नवलच करून दाखवू शकतो. जर अमिताभ बच्चन ने जर क्रिकेटमध्ये उत्तम होण्याचा नाद धरला तर काय सांगावा तो सिनेमा क्षेत्रात मागे पडून जाईल आणि त्यातच उत्तम लक्ष दिलं तर त्याची जागा कायम राहील आणि अजूनही उंची गाठत राहील.
    हे जगप्रसिद्ध गुपित हा एक सिद्धांतच आहे असे आपण म्हणू शकतो आणि याला समजणारे कमी आहे हा बऱ्याच जणांना माहितही नाही देव कृपेने मलाही माहित नव्हता पण सरांमुळे माहित झाला जगातल्या जास्तीत जास्त लोकांचे याकडे लक्ष नाही म्हणून अशा क्षेत्रात उत्तम सर्वोत्तम व्यक्तींची संख्या कमी आहे आणि या सर्व मध्ये आपण नशिबाला दोष देत बसतो दोष देत असतो आपण सामान्य माणसांची सामान्य विचारधारा असते आपल्या जीवनात ही एक निश्चित एक उत्कृष्ट ध्येय असावा असा आपल्याला वाटत नाही.
    आपल्याला क्रिकेटही खेळता येते, नाटक ही करता येत, शाळेतही मतलबापुरते हुशार असतो, थोडेफार नाचता गाता ही येत. मग आपण तर सर्व क्षेत्रात पारंगत आहे पण तरीपण मग आपण त्या पाच टक्के लोकांच्या यादीत नाही आपण एक सामान्य जीवन जगत आहोत तर हे कारण आहे
    कि एक निश्चीत ध्येयाची जीवनात कमतरता आहे आपल्याकडे ध्येयनिश्चिती असेल तरीही त्याकडे पूर्णपणे 100% फोकस म्हणजे लक्ष केंद्रित नाहीये आणि म्हणूनच आपण सर्व त्या जगातल्या 95 टक्के लोकांच्या यादीत कायम आहोत आता आपणच ठरवलं पाहिजे की आपण अनेक क्षेत्रांमध्ये साधारण बनून राहायचं की एका विशिष्ट आवडीच्या निवडीच्या ध्येयाच्या क्षेत्रात उत्तम सर्वोत्तम असाधारण व्यक्ती म्हणून जगायचं.
    खरे तर कोणतेही काम हे बोलायला सोपं असतं बोलायला सोपं वाटतं मजा वाटते पण त्याला कृतीत उतरवून वास्तवात उततरवन कठीण असतं अशक्य असतं प्रत्येक गोष्टीला वेळ लागते तर टिकून राहन कठीणायी च काम असत.
    समाजात जगामध्ये जो ट्रेड चालत असतो खरं तर आपले सामान्य विचार हे त्यात वाहत असतात एखाद्याला त्याच्या क्षेत्रात जास्त प्रसिद्धी भेटत असली की आपल्याला त्या क्षेत्रात उतराव वाटतं आपण त्यात आपल्यात काय सामर्थ्य आहे याकडे लक्ष देत नाही आपण खोल विचार करत नाही आणि ज्या गोष्टीकडे लोक पळत असतात त्याच लोकांसोबत आपणही त्याच घोळक्यात पडायला सुरुवात करतो आणि दुर्दैवाने त्याच घोळक्यात आयुष्यभर राहून जातो ही अशी गोष्ट प्रत्येकासोबत होते.
    ही गोष्ट माझ्या सोबतही होते तीच तुमच्या सोबतही होत असेल की गाणं ऐकलं की गायक व्हावसं वाटतं, क्रिकेट बघितलं की क्रिकेटर व्हावसं, वाटतं चित्रपट बघितला की ॲक्टर व्हावसं वाटतं. हे आज सर्वांसोबत होतं पण मात्र आपण तटस्थ रहायचं निर्णयावर ठाम राहण्याचा प्रयत्न करत राहायचा. हाच यावरचा उपाय आहे आणि आपण जर या गोष्टीत अडकून राहिलो तर आपण कशातच एक्सपर्ट होत नाही कोणत्याच गोष्टीवर आपल्याला प्रभुत्व मिळवता येत नाही म्हणून त्या 95% चा पण एक भाग म्हणून बनुन राहिलो आहे.
    इथे सर अशी चूक केल्यामुळे काय काय घडते हे अगदी अचूक अभ्यास करून सांगितले आहे की आपले कुटुंब आणि समाज आपल्याला बेजबाबदार ठरवतो कारण आपण कोणतेही एक काम धड करत नाही अशा सोडदर वृत्तीमुळे कोणत्याही एका कामात आपले लक्ष लागत नाही त्यामुळे आपल्यावर सतत बेकारीची वेळ येते त्यामुळे नेहमी आर्थिक चणचण आणि यासोबतच कुटुंबातील लोकांवर सतत चिडचिड आणि भांडण अशातला करतेत आपण सापडतो आपण सर्वात आळशी व्यक्ती आहोत अशी संबोधने कुटुंब व समाज आपल्याला लावत असतो
    तर असल्या या सर्व गोष्टी आपल्या सोबत घडत असतात पण इथे जसं तुम्ही सांगितलं आहे की व्यक्ती आळशी नसतो तर व्यक्तीचे ध्येय आळशी असते खरं म्हणजे बर्‍याच जणांची तर स्वप्नच नसतात आळशी असण्यामागचे कारण हे आहे की ते त्याने सर्व स्वतः ठरवलेले नसावी दुसरी गोष्ट म्हणजे ठरवलेले जरी असले तरी मग ते असेच दुसऱ्याकडे बघून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्यात प्रसिद्धी भेटली तो त्या आकृत्या खूप उत्तम करतोय म्हणून दुसऱ्या तिसऱ्या च्या व्यक्तीकडे बघून आपणही तेच तसच ध्येय असावं असं मानलं असाव .
    खरं तर माणसाचा ज्या गोष्टीत आवड नाही त्या गोष्टीत मानुस जास्त काळ टिकू शकत नाही खरं तर ह्या परिस्थितीत याच हे धेयच नाहीये. आणि अशी ध्येय आळशीच असणार ते कधीच साध्य होणार नाही कारण ते ध्येय साध्य करण्याची जिद्द असते ती जिद्द कुठेतरी हरवून गेलेली असते काही पूर्ण करण्याची प्रेरणा नाही तर अशा रस्त्यावर माणूस चालूही कसा शकणार
    काही गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाहीत तर त्याबद्दल आपल्याला चिडचिड व्हायला लागते हा मानवी स्वभाव आहे निराशा दाटते असले मूर्ख ध्येये निवडल्यामुळे स्वतःचे परीक्षण नाही केल्यामुळे एवढे भयानक भयानक परिणाम आपल्याला सोसावे लागतात. आणि तो निसर्गाचा नियम आहे की जशी आपली कृती असते तसे आपले रिझल्ट असतात आणि हवे तसे घडले नाही की मग मी तिरस्कार उत्पन्न होतो आणि मग आपण परिस्थितीला दोष देत बसतो आपण नशिबाला जबाबदार मांडत बसतो आपण लोकावर आपल्या अपयशाचा टाकत असतो आपण आपल्या आईवडिलांनी साथ दिली नाही असं असेल तर नसलेले कारण घेऊन रडत बसतो
    आणि शेवटी पर्यायी काही नाही रडण्याशिवाय नैराश्ये शिवाय या सर्व गोष्टींमध्ये परिस्थितीमध्ये आपण पडलोच नाही पाहिजे असा काहीतरी सकारात्मक विचार करून उपाययोजना करून एकच एकमेव ध्येय निश्चिती करून याचे नियोजन करून त्यासाठी जीवन जगूयात ना आपण एक उत्तम यशस्वी व्यक्ती म्हणून जगासमोर येऊ आपणही खुश होऊन आनंदी होऊन सकारात्मक विचारांना ही भरलेले राहू निराशाही दाटणार नाही आपण ही खुश आपले आई-वडील खुश.
    एक तिरस्काराची भावना ही निर्माण होणार नाही आणि त्या पाच टक्के लोकांच्या यादीमध्ये येऊ शकतो.
    तर आजचा ब्लॉग वाचून एक संपूर्ण जीवनासाठी एकमेव ध्येयाचे काय महत्त्व आहे हे शिकण्यास मिळाले असेच आम्हाला मार्गदर्शन करीत रहा सर हीच नम्र विनंती.
    धन्यवाद.

    Reply
  13. जगात ५ ℅ लोकंच फक्त यशस्वी होतात याचे रहस्य काय आहे? What’s the secret that only five percent of people in the world succeed?

    आज स्थितीला जगातील लोकसंख्येचा विचार केला तर जवळपास 7 ते 7.5 करोड लोक वास्तव्यात आहेत आणि एवढ्या प्रचंड गर्दीचा विचार केला तर यामध्ये अगदी बोटावर मोजण्याइतकेच लोक यशस्वी झालेले दिसतात बाकीचे सगळी majority तडजोडीचे जीवन जगत असतात या गोष्टीची कारण मिमासा केली असता तर त्यासाठी हा ब्लॉग अत्यंत उपयुक्त आहे .

    आज आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांचे परीक्षण केले असता त्यातून एक गोष्ट गवसते ती म्हणजे अनेकांनी पंचतारांकित स्वप्ने बघितलेली असतात परंतू त्यातून त्यांना पाहिजे तेवढं त्यामध्ये ते राज्य त्या क्षेत्रात करू शकत नाहीत अशा या सर्व गोष्टी करणे अश्या गोष्टी का घडतात या सर्व गोष्टी या ब्लॉग मधून अगदी व्यवस्थीत आणि सहजतेने कळाले.

    जगातील टॉप व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला असता त्यातून एक सूत्र मिळते आणि त्या सूत्रांची माहिती या प्रभवशील लेखनातून झाली . जीवनामध्ये अगणित यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला जीवनाचा उद्देश मिळावा लागतो आणि एकदा का जीवनाचा उद्देश मिळाला त्यानंतर आपल्या जीवनाची गाडी खऱ्या अर्थाने तिथून चालू होते आणि जर जीवनाचा उद्देश मिळाला तर त्यातून आपोआप धेय्य निश्चिती होते तीच धेय्य निश्चिती आपल्या जीवनाचा pattern च बदलून टाकते. जीवनामध्ये आनंदी आनंद यावा , नेहमी समाधानच राज्य असावं आणि आपल्या अवतीभोवती समृद्धी नांदावी अशी आपल्या पैकी सगळ्यांचीच अतोनात ईच्छा असते ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या एक ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याच्या मार्गाने चालणे अपेक्षित आहे.

    त्यासाठी आपल्या आयुष्यात एकच धेय्य अपेक्षित आहे. जर आपण प्रत्येक ट्रेंड नुसार जर आपल्या धेय्य ची बदली करत असाल तर कुठल्याही कामामध्ये सात्यत ही महत्वाची गोष्ट असते आणि सांत त्यातूनच यशाचा जन्म होतो म्हणून जर आयुष्यात काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर एका आणि स्पष्ट धेय्य ची निवड अत्यंत उपयुक्त आहे.

    खरंच जर या पाच टक्के लोकांच्या यादीमध्ये आपले नाव आणायचा असेल तर त्यासाठी लागणारे सीक्रेट खूप महत्त्वाचे आहेत आणि जर हीच सीक्रेट आपण आपल्या आयुष्यात लागू केली तर नक्कीच आपण असामान्य व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ शकतो यात काही शंका नाही.

    ध्येयाची स्पष्टता ही यशस्वी होण्यासाठी ची चावी असते. Clear goal is the key of sucusess. आपल्याला जर एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर त्या ठिकाणची स्पष्टता आपल्याला माहिती नसेल आपल्या Destination मध्ये confusion असेल आणि त्याठिकाणी पोहोचण्यासाठी आपण गाडीत बसलेलो आहोत तर तिकीट कोणत्या ठिकाणचं काढायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो आणि आपला प्रवास तिथेच थांबतो त्यामुळे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या डेस्टिनेशन वर पोहोचण्यासाठी आपलं डेस्टिनेशन स्पष्ट असणे गरजेचे आहे.

    जीवनाचा goal set असेल तर आणि ते गोल साध्य करण्यासाठी आपण कामाची सुरुवात केली असेल तर रस्त्यात येणारे सगळे आव्हाने मागे पाहण्याची त्यांना तोंड देण्याची शक्ती आपल्यामध्ये आपोआप निर्माण होत असते आणि त्यातून आपण आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे त्या ठिकाणी नक्की पोहोचू शकतो त्यासाठी फक्त एकाच ध्येयाची निश्चिती आणि निश्चित केलेल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपण केलेली सुरुवात ही खूप महत्त्वाची असते आणि त्यातूनच आपल्या यशाचा Base तयार होतो . म्हणून START and Conitinuty याच गोष्टी आपल्याला top बनवायला मदत करतात
    असा हा life changing blog आमच्या जीवनाची यशस्वी वाढ करण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

    Reply
  14. यशस्वी होण्ाकरिता अगोदर डोक्यात एक गोष्ट पक्की बसउन घ्या, की यशस्वी होण्यासाठी कुठलाच शॉर्टकट नाहीये या जगात.

    पटकन आणि आयतं मिळालेलं यश निघून पण तितक्याच पटकन जाते, यश कमवावं लागतं.

    आणि हे आहे यशाचं रहस्य किंवा सूत्र

    DOING NOTHING AT ALL
    VS.
    SMALL CONSISTENT EFFORT

    प्रयत्नांच सातत्य. जेव्हा बाकीचे प्रयत्न सोडतील तेव्हाही तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, तेव्हाच मिळते जग गाजवणार यश.
    प्रयत्नांमध्ये सातत्य’ हेच यशाचे रहस्य आहे. स्वतःल फक्त एकच सांगायचं की “शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेली नाही.” सकारात्मक विचार ठेवणे, यामुळे पण आपण लवकर यशस्वी होऊ शकतो.
    यश या शब्दाचा अर्थ हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो. काहींना खूप श्रीमंत होणे म्हणजे यश वाटतं, वैज्ञानिकांना नवीन चांगलं शोध लावता आला तर यश वाटतं, हरवलेल्या लहान बाळाला त्याचे आईवडील पुन्हा परत मिळालं कि यश वाटत असे प्रत्येकाला यशाचा अर्थ भिन्न आहे.

    मला असं वाटतं यशाचं रहस्य हे “प्रयत्न या मध्ये असतं. प्रयत्न म्हणजे एकच गोष्ट किंवा काम आपल्याला हवं त्याप्रकारे करता येई पर्यंत केलेल्या सर्व कृती. ”

    एखाद्याला दुसऱ्याच्या कृती पासून भिन्न करते ते प्रयत्न. प्रत्येक जण आपल्या प्रमाणे काम करत असतो पण यश त्यांनाच मिळते ज्यांनी शेवट पर्यंत खंबीर उभे राहून प्रत्येक प्रसंगावर मात करून, स्वतः वर विश्वास ठेवून पुढे चालत राहतात आणि काम करत राहतात, योग्य रित्या मेहनत करतात तेच यशस्वी होतात

    प्रत्येक गोष्ट ही हुशारी वर होतं नसते. हुशारीला जेंव्हा मेहनतीची सोबत मिळते तेंव्हा यश मिळत.

    याचाच उदाहरण म्हणजे जगामधील फुटबॉल खेळत बघा

    मेस्सी कडे हुशारी आहे पण रोनाल्डो कडे त्याच्याहून जास्त मेहनत आहे म्हणून रोनाल्डो आज मेस्सी च्या पुढे आहे.

    आणि हा याचा अर्थ असा अजिबात नाही कि मेस्सी ला यश नाही मिळालं. त्याला ही यश मिळालंय त्यासाठी त्यांनीही मेहनत केली म्हणून तो आज रोनाल्डो च्या फक्त थोडासा मागे आहे.

    मेस्सी याला तर त्याचा उंची कमी आहे म्हणून त्याला त्याच्या शाळेच्या /कॉलेज च्या संघात सुद्धा घे नव्हते पण आज बघा तो कुठे ahe तो…….

    योग्य रित्या मेहनत केली तरच यश मिळेल…

    Reply
  15. जगात ५ ℅ लोकंच फक्त यशस्वी होतात याचे रहस्य काय आहे? What’s the secret that only five percent of people in the world succeed?

    आजच्या स्थितीला जगाची लोकसंख्या विचारात घेतली असता तर, जवळपास 8 कोटी लोक जगामध्ये विस्तारलेले आहे आणि आठ कोटी लोकांपैकी ज्यांचे जीवन सुखाने, समाधानाने आणि आनंदाने, समृद्धीने भरलेल आहे अशा लोकांचा विचार केला असता त्यातून अशी माहिती मिळते की, अगदी थोडे लोक त्यांच्या जीवनाचे सार्थक केलेले आहेत किंवा करत आहेत .

    मग आपल्या सर्वांचा जन्म एकाच प्रक्रियेतून आणि ज्या ठिकाणी सर्वांना समान नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे अशा ठिकाणी झालेला असून सुद्धा साधन संपत्तीचा उपयोग किंवा साधन संपत्ती आपल्या जीवनात पुरेपूर लागू फक्त बोटावर मोजण्याइतकी लोकं करत आहेत कारण लक्षात घेता किंवा हे असं का घडते असे प्रश्नचिन्ह मनामध्ये जावेत निर्माण होतील ? त्यावेळी त्यावर हा ब्लॉग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

    मग या पाच टक्के लोकांकडे अशी कोणती शक्ती आहे की ज्याच्यामुळे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतात . आपल्या आसपास सुद्धा आपल्याला अशी काही लोक बघायला मिळतात की, ते प्रत्येक क्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व गाजवत असतात. मग ते आरोग्यामध्ये परफेक्ट असतात त्यांच्याकडे पैसा सुद्धा प्रचंड प्रमाणात असतो. त्यांचे इतरांसोबत चे नातेसंबंध सुद्धा एवढे पक्की आणि चांगले असतात की तो माणूस प्रत्येकाला आपलासा वाटायला लागतो. मग अशा माणसाकडे कोणती जादू असते की ते ज्या वास्तूला हात लावतील त्या वस्तू सोनं बनवत असतात. प्रिया सगळ्या प्रश्नाचे उत्तर मला या ब्लॉग मधून अतिशय सुलभरीत्या कळालेले आहेत.

    पाच टक्के लोक यशस्वी होण्यामागील तुम्ही जे रहस्य सांगितले आहे खरंच ते रहस्य अनेकांच्या जीवनाला एक कलाटणी देणारे आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला काहीतरी उद्देश असतो आणि तो उद्देश इतरांपेक्षा वेगळा असतो आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी आपण ध्येयनिश्चिती करत असतो परंतू हे यशस्वी करत असताना आपल्या जीवनाचा नेमका उद्देश काय आहे हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं असतं आणि ज्यावेळी हा उद्देश आपल्याला मिळतो त्यावेळी निश्चिती करण्याची गरज भासत नाही तर ते आपल्या जीवनामध्ये आपोआप निश्चित होत असते.

    आपण यशस्वी न होण्यामागील हेच मुख्य कारण असू शकते की, आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश मिळालेला नसतो आणि आपण ते मिळवण्याचा प्रयत्न ही करत नाही कारण आपण ज्या वातावरणात वावरत असतो , ज्या लोकांमध्ये आपल्या जीवनाची मौल्यवान क्षण घालवत असतो त्या पैकी असे कोणीच केलेले नसते सगळे जन्माला आलो म्हणून जीवन जगायचे असा pattern त्यांच्या जिवनात ते लागू करत असतात. म्हणून आपण सुद्धा असा वेगळा पॅटर्न तयार करण्याचा प्रयत्न करत नाही . तर आपलं जीवन असामान्य बनविण्यासाठी आपल्या का आपल्या आसपासचे वातावरण change करणे सगळयात महत्वाची गोष्ट आहे.

    आणि आपल्याला यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी त्या शिखराचा मार्ग clear असावा लागतो . तो जर मार्ग स्पष्ट असेल तर आपल्या जीवनाची गाडी सहजतेने जाईल. म्हणून आपल्या जिवनात आपण कोणत्याही एका आणि त्यामध्ये स्पष्टता असलेली धेय्य निवडणे अत्यंत महत्वाची बाब आहे. ह्या तुम्ही दिलेल्या रहस्याची जर आपण आपल्या आयुष्यात अमलबजावणी केली तर तर नक्किच जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही .

    तुमच्या या प्रचंड ताकतीच्या लिखाणामुळे यशस्वी होण्यासाठी पक्का मंत्र मिळालेला आहे आणि या मंत्राचा माझ्या आयुष्यात वापरून मी आयुष्याचं नक्की सोन केल्याशिवाय राहणार नाही हा ब्लॉग माझ्यासाठी सगळयात मौल्यवान गोष्ट असेल हा प्रचंड बळ देणारा ब्लॉग दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

    Reply

Leave a Comment

Translate »
error: Content is protected !!