जीवनातील कोणतीही समस्या कशी सोडवावी? / How To Solve Any Problem In Life?

Spread the love

जीवनातील कोणतीही समस्या कशी सोडवावी? याचे पुरेसे ज्ञान मिळत नसल्यामुळे त्या समस्या सुटत नाहीत, प्रस्तुत ब्लॉग यासाठी तुम्हाला मदत करेल.

आज प्रत्येकाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भरपूर प्रमाणात उत्तम परिणाम (Result) हवे असतात.

जसे की, सुदृढ आरोग्य (Health), मुबलक संपत्ती (Wealth), उत्तम नातेसंबंध (Relationship), उत्तम करिअर (Career), पर्मनंट नोकरी (Job), उत्तम व्यवसाय (Business), उच्च दर्जाचे सुख-समाधान (Happiness) इ. ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाला मिळायला सुद्धा पाहिजेत, परंतु तसे होताना दिसत नाही.

जागतिक बँकेच्या सर्वे नुसार, जगातील जवळपास ९५% लोकांना जेमतेम जीवन जगावे लागते. आणि…

जगातील केवळ 5% लोक जीवनाच्या सर्व क्षेत्रात उत्तम परिणाम प्राप्त करून, मजेत जीवन जगताना दिसतात.

ही एव्हढी मोठी तफावत असण्याचे काय कारण असावे? याचा मी काही वर्षांपासून शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी या विषयावरील काही खास पुस्तकांचे वाचन केले, तसेच माझे मार्गदर्शक (Mentor) यांची शिबीरे (Workshops) अटेंड केलीत आणि त्यातून मला माझ्या जीवनात त्या मान्यत्यांचा खूप मोठा फायदा झाला.

ती सर्व TOP SECRETS माझ्या जीवनात प्रथम मी लागू करून बघितली, आणि त्यांचा परिणाम मला माझ्या जीवनात अतिशय सकारात्मक झाला आणि अजूनही होतोय.

ती गुपिते जर तुम्ही तुमच्या जीवनात लागू केलीत, तर तुमच्याही जीवनात तुम्ही आमुलाग्र बदल धडवून आणू शकाल, तो बदल तुमच्या जीवनात नक्की व्हावा जो तुम्हाला हवा आहे, या उद्देशाने, मी ती ८ रहस्ये (Secrets) आजच्या या ब्लॉग मधून तुमच्यासोबत शेअर करीत आहे.

तुम्हाला एक विनंती आहे, हा ब्लॉग तुम्ही अगदी शेवटपर्यंत वाचावा.

कारण…हा ब्लॉक म्हणजे केवळ एक लेख नसून, जीवन बदलून टाकणारे ट्रेनिंग सेशन आहे असा विचार करून वाचावा ही माझी तुम्हाला विनंती आहे.

हा ब्लॉग जर तुम्ही अर्धवट वाचून मधेच सोडून दिला, तर तुमच्या जीवनात उत्तम परिणाम निर्माण करणाऱ्या अतिशय महत्वाच्या रहस्यांना तुम्ही मुकणार, हे मात्र नक्की होईल.

आज तुम्ही तुमचे जीवन जगत असताना चांगले परिणाम प्राप्त व्हावेत म्हणून तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार खूप मेहनत (Efforts) करीत आहात. होय की नाही?

मेहनत करताना परिणामापर्यंत पोहचण्यापूर्वीच अचानक समोर काही समस्या किंवा प्रॉब्लेम्स निर्माण होतात, अशावेळी त्या समस्या सोडविण्यामध्येच निम्यापेक्षा अधिक शक्ती, पैसा आणि ऊर्जा नष्ट होते, खरे आहे की नाही?

ती समस्या मात्र काही सुटत नाही, असे झाल्यामुळे जिथून सुरवात केली होती, तिथेच परत यावे लागते, याचा परिणाम असा होतो की, त्या समस्या घेऊन जगण्याची एव्हढी सवय होते की, ज्या जीवनाचे तुम्ही चित्र मनात चितारले होते, ते मनातच राहून जाते.

त्यामुळे असंख्य लोकांचे स्वप्नातील जीवन (Dream Life) जगणेच राहून जाते.

जीवनातील समस्या सोडविणारी ती ८ रहस्ये सांगण्यापूर्वी दोन तथ्य सांगतो.

पहिले तथ्य.

१) जो शेतकरी आपल्या शेतात भरघोस पीक घेण्यासाठी जमिनीची चांगली मशागत करतो.

उत्तम सेंद्रिय खत जमिनीत मिसळतो आणि जमिनीचा पोत किंवा सामू वाढवतो.

त्यामुळे भविष्यात पिकावर पडणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव टळतो आणि तो भरघोस उत्पन्न घेतो.

दुसरे तथ्य.

२) मेडिकल सायन्सने मानवी आरोग्यासाठी खूप मोठे कार्य केले आहे. जसे वयाच्या ५ वर्षापर्यंतच्या बालकांना विविध प्रकारच्या रोगप्रतिबंधक लशी (Prophylactic vaccines) देऊन भविष्यात कोणतेही आजार उद्भवू नयेत किंवा उद्भवल्यास त्यांचा सामना करण्यास ते बालकाचे शरीर सक्षम बनावे, यासाठी आधीच त्याच्या शरीरात अँटीडोट्स (Antidotes) दिले जातात. उदा. ट्रिपलचे इंजेक्शन, पोलिओचा डोज किंवा कोविड च्या काळातील कोविड वॅक्सीन्स इ.

वरील दोन्ही तथ्यात असे दिसते की, काही होण्यापूर्वी आधीच उपचारात्मक प्रतिबंध घातला जातो.

तसेच काहीसे मानवी जीवनाचे आहे, जीवनात उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड द्यायचे असेल, तर मनाला आधीच Reprogrammed करणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी आज मानवी मनाचे आधुनिक विज्ञान NLP- NeuroLinguistic Programming उपलब्ध आहे, त्याच्या सहाय्याने मानवी मनाचे नव्याने रिप्रोग्रामिंग करावे लागेल.

जसे की,

मानवी मनात सकारात्मक मान्यता (Strong Positive Beliefs) नव्याने रुजवाव्या लागतील किंवा प्लांट कराव्या लागतील. त्यामुळे, जीवनात उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांना सहज तोंड देता येईल व जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात आपल्याला पाहिजे ते परिणाम (Results) प्राप्त करता येतील.

एकदा का समस्यांचा सामना करण्याची तत्वे मनाला कळली की, आपले मन आपली ऊर्जा पूर्णपणे उत्तर शोधण्यावर केंद्रित करायला सुरुवात करते.

काय मग, त्या स्ट्रॉंग पॉसिटीव्ह बिलीफ्स किंवा मान्यता तुमच्या मनात रुजवायला तुम्ही तयार आहात?

याचे उत्तर होय असेल तर, आज मी तुम्हाला ८ प्रकारच्या मान्यता (Beliefs) तुमच्या मनात रुजवण्यासाठी मदत करू शकेल.

एक-एक करून त्या सर्व मान्यता (Belief) जर तुम्ही तुमच्या मनात रुजवल्या, तर तुमचे मन कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी पूर्णपणे सक्षम होईल.

त्यानंतर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात निर्माण झालेल्या समस्या सहज सोडवण्यासाठीच्या सर्व क्षमता आणि पर्याय तुमच्याकडे सहज उपलब्ध असतील, त्यामुळे तुमचा सर्वांगीण विकास साधण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.

हे सर्व बिलीफ आज तुम्ही तुमच्या मनात प्लांट केलेत किंवा रुजवलेत तर, खालील पाच प्रकारचे फायदे होतील.

१) तुम्ही नेहमी साधनसंपन्न स्थिती (Resourceful State) मध्ये राहणार आहात.

२) तुमचे मन प्रॉब्लेम सोडवण्यासाठी लागणारे विविध मार्ग आणि पर्याय तुम्हाला दाखवेल.

३) तुमच्या समोर आलेल्या कोणत्याही प्रसंगामध्ये तुम्हाला कधीच मानसिक ताण (Mental Stress) जाणवणार नाही.

४) तुम्ही नेहमी आंनदी राहून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनातील समस्या सहज सोडवू शकाल.

५) तुम्ही तुमच्या व्यक्तिगत विकासासाठी पुढाकार घ्यायला लागाल.

मानवी जीवनाच्या समस्या साधारणतः खालील गोष्टींशी संबंधित असतात.

१) आरोग्य (Health)

२) संपत्ती (Wealth)

३) नातेसंबंध (Relationship)

४) करिअर (Career)

५) व्यवसाय (Business)

६) आर्थिक (Money)

७) व्यक्तिगत विकास (Personal Growth)

८) कला व नावीन्य ( Art and Creativity)

९) फोकस (Focus)

१०) मनाचे विचलन (Distractions of Mind)

११) मोबाईल आणि सोशल मीडियाचे व्यसन

(Addiction of Mobile and Social Media)

इत्यादी…

वरीलपैकी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कोणती ना कोणती समस्या अधून मधून तुमच्या समोर येईल, तेंव्हा ह्या सर्व मान्यता (Beliefs) तुम्ही जर गांभीर्याने तुमच्या अंतर्मनात रुजवल्या, तर तुम्हाला त्या मान्यता, तुमच्या समस्या सोडवण्याचे मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतील.

तर, तुम्हाला ह्या सर्व मान्यता (Beliefs) तुमच्या अंतर्मनात रुजवून घ्यायला आवडेल काय?

याचे उत्तर होय असेल तर, चला मग सुरुवात करूया ☺️

१) माझ्या जीवनातील समस्या सोडविण्याची १००% जबाबदारी माझी आहे. (I have a 100% responsibility to solve problems in my life.)

हे पहिले बिलीफ आहे. खूप पॉवरफुल आहे. हे जेंव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनात हे बिलीफ जसे रुजवाल त्याक्षणी, तुमच्या समोरील प्रॉब्लेम दुसऱ्यांनी सोडवावा हे तुमचे मत लगेच बदलायला लागेल.

तुमच्या प्रॉब्लेम ची सर्व जबाबदारी तुम्ही स्वतःकडे घ्यायला सुरुवात कराल.

कारण आजपर्यंत तुमच्या समोर जी समस्या निर्माण व्हायची ती इतरांनी निर्माण केली आहे, असा समज घेऊन जर तुम्ही त्या प्रॉब्लेम कडे बघत असाल तर, ही मान्यता रुजवल्यावर तुमची प्रत्येक समस्या सोडविण्यासाठीचे मार्ग तुम्हाला दिसायला लागतील.

ही ताकद या बिलीफमध्ये आहे. आता ती समस्या सोडविण्याची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे. त्याची उत्तरेही तुम्हालाच दिसायला लागतील.

२)  “प्रत्येक समस्येला उपाय आहे आणि तो उपाय या विश्वात आधीच अस्तित्वात आहे.” (There is a solution to every problem and that solution already exists in this universe.)

जेंव्हा एखादी समस्या तुमच्या समोर दिसायला लागेल तेंव्हा, हे बिलीफ जर तुम्ही आधीच रुजवून ठेवलं असेल तर, तुमचा त्या समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोणच बदलेल

यापूर्वी अशाप्रकारच्या समस्या लोकांनी सोडवलेल्या आहेत काय? याचा संदर्भ तुमचे मन शोधण्याचा प्रयत्न करायला लागाल.

असे संदर्भ जेंव्हा तुमच्या मनाला सापडतील, तेंव्हा मनात एकप्रकारची स्पष्टता (Clarity) यायला लागेल आणि एक नवीन बिलीफ तयार होईल, ते म्हणजे, ते लोक करू शकत असतील तर आपणही करू शकतो, असा नवीन आत्मविश्वास मनात जागा होईल. दुसऱ्याच क्षणी मार्ग दिसायला लागतील.

असं म्हणतात की, “No Lock is created without its key”. किल्लीशिवाय कोणतेही कुलूप तयार होत नाही🔑 

३)  “मी तक्रारकर्ता नाही, समस्या सोडवणारा आहे”. (I’m a Problem Solver, Not a Complainer.)

या तिसऱ्या बिलीफ च्या रोपणामुळे तुमचे माईंड शिफ्ट होईल.

हे माईंड शिफ्टिंग एकदम तक्रारकर्त्या व्यक्ती वरून समस्या सोडविणारी व्यक्ती अशी तुमची प्रतिमा (Identity) तयार करायला सुरुवात करेल.

माझा तुम्हाला एक प्रश्न आहे.

आज तुमच्या आसपास कोणत्या प्रकारचे लोक तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतात? तक्रार करणारे की, तक्रार निवारण करणारे?

तर तुमचे उत्तर असेल तक्रार करणारे, होय ना?

तुम्हाला कोणत्या समूहाचा भाग व्हायला आवडेल? पहिल्या की दुसऱ्या?

दुसऱ्या ना?

मग हे बिलीफ तुम्ही तुमच्या रुजवले तर ते तुम्हाला आजपासून तक्रार करू देणार नाही. तुमच्या समोर आलेली समस्या सोडविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात कराल. एव्हढी ताकद या बिलीफ मध्ये आहे.

४)  “मी समस्येपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे”. (I’m More  Stronger Than The Problem)

असं म्हणतात की, तुमचे लक्ष जेंव्हा समस्येवर असते, तेंव्हा समस्या मोठी होत जाते, आणि तुमचे लक्ष जेंव्हा उपयांवर असते, तेंव्हा समस्या छोटी व्हायला लागते.

असा दृष्टिकोन तयार होण्यासाठी हे चार नंबर चे बिलीफ मदत तुम्हाला मदत करेल.

जेंव्हा तुमचे अंतर्मन समस्येपेक्षा तुम्ही अधिक सामर्थ्यवान आहात, असे मानायला लागते, तेंव्हा समस्या छोटी वाटायला लागते आणि ती समस्या सोडविण्यासाठी तुम्ही तयार होत असता.

५) “जगात परिपूर्ण असे काहीही नाही. आयुष्यात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नाही, ही समस्या देखील नाही.” (There is nothing perfect in the world and Life, not even this problem also.)

ही मान्यता मनात रुजवता क्षणी तुमचे ब्रेन स्टॉर्मिंग व्हायला सुरुवात होईल, हे बिलीफ एव्हढे शक्तिशाली आहे की, जीवनातील कोणतीही समस्या असो, ती कायम नसते, तर ती सुटू शकते असा मनात विश्वास या बिलीफमुळे निर्माण होण्यास मदत होईल.

हेन्री फोर्ड म्हणायचे की,

“जर तुमचा विश्वास आहे की, तुम्ही हे करू शकता किंवा तुम्ही हे करू शकत नाही, दोन्ही मार्गांनी तुम्ही बरोबर आहात”.

“If you believe you can or if you believe you can’t, in both ways you are right”. – Henry Ford.

६)  “ही समस्या माझ्या जीवनात, मला कमजोर बनवण्यासाठी नाही, तर मला आणखी मजबूत करण्यासाठी आली आहे.” (This problem has come into my life, for my growth.)

जीवन म्हटले की अडचणी, अडथळे, प्रॉब्लेम्स असणारच आहेत.

असं म्हटलं जातं की, जगात फक्त एकच असं स्थळ आहे, जिथे एक सुद्धा समस्या नाही, ते म्हणजे स्मशानभूमी! बाकी ठिकाणी जिथे-जिथे जीवन आहे तिथे-तिथे समस्यांना तोंड द्यावंच लागणार आहे.

ही मान्यता एव्हढी स्ट्रॉंग आहे की, ती रुजवल्याबरोबर जीवनात निर्माण होणाऱ्या प्रॉब्लेम कडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोणच बदलायला लागतो.

कारण यात असं होतं की, कोणतीही समस्या ही कमजोर करण्यासाठी येत नाही, तर ती मजबूत करण्यासाठी येते. ही स्ट्रॉंग फिलिंग तयार होते व समोरची समस्या सोडवण्यासाठीचे मार्ग दिसायला लागतात.

७)  “मी समस्येचा सामना करत आहे, समस्येत अडकलेलो नाही.” (I’m facing a problem, not into the problem.)

साधारणतः आपल्या आसपासचे लोक असं म्हणत असतात की, मी आजकाल प्रॉब्लेममध्ये अडकलोय.

ही आपल्या मनाला दिलेली कमांड आपल्याला बाहेर काढण्याऐवजी जास्त अडकवण्याची शक्यता असते. या उलट आजपासून फक्त कमांड जर बदलली तर काय मॅजिक होईल त्याचा अनुभव घेऊन बघा. ती म्हणजे “मी समस्येचा सामना करत आहे, समस्येत अडकलेलो नाही.”

 असं म्हणतात की, एखादा गुंता सोडवायचा असेल तर, त्या गुंत्याच्या बाहेर होऊन तो गुंता लवकर सुटत असतो. यालाच अध्यात्मात साक्षीभाव असे म्हणतात.

८) “तुमच्या समस्येचे आव्हानात रुपांतर करा”. (Turn your problem into a challenge.)

हे बिलीफ खूपच पॉवरफुल आहे, कारण हे रुजवल्या बरोबर आपले माईंड पूर्णपणे सोलुशन ओरिएंटेड म्हणजे उत्तर शोधणारे बनते.

जसे…

तुम्ही एक विचार करून बघा की, एखाद्याने तुम्हाला दोन पर्याय दिले असतील,

एक – तुमच्यापुढे एक प्रॉब्लेम आहे तो सोडवून दाखवा.

दुसरे – तुमच्यापुढे एक आव्हान आहे ते स्वीकारून दाखवा.

यातील कोणता पर्याय तुम्हाला जास्त ताकद देणारा आहे?

तुमचे उत्तर नक्कीच दुसरे असेल, होय ना?

कारण आपल्या मनाला नेहमी आव्हान स्विकारायला आवडत असते, प्रॉब्लेम नाही.

प्रॉब्लेम या शब्दाचा उच्चार जरी केला तरी आपल्या मनाची ऊर्जा कमी झाल्याचा भास व्हायला होतो.

याउलट आव्हान म्हटले की, ऊर्जा आणखी संचारते.

काय मग, आजपासून कोणत्याही प्रॉब्लेम ला problem म्हणायचे नाही तर Challenge म्हणायचे.☺️☺️

सारांश:-

अशा ह्या ८ प्रकारच्या बिलीफ तुम्ही तुमच्या मनात (Subconscious Mind) मध्ये रुजवलीत तर, तुमच्या समोर कोणतेही आव्हान असेल तर ते तुम्हाला कमजोर करणार नाही तर, नेहमी ऊर्जाच देणारे असेल, हे मी नम्रपणे माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो.

असे म्हणतात की, जेव्हा तुम्ही उच्च उद्देशाने कार्य करायला सुरुवात करता, तेव्हा संपूर्ण युनिव्हर्स तुम्हाला अधिक शक्ती देते. When you work with a higher purpose, the Universe gives you more power. मला आशा आहे की, जीवनातील कोणतीही समस्या कशी सोडवावी? याचे पुरेसे ज्ञान तुम्हाला या ब्लॉग मधून मिळाले असेल

. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद!!🙏🙏

हा ब्लॉग तुमच्या आवडत्या लोकांना / विद्यार्थ्यांना / मित्रांना नक्की शेअर करा, काय सांगता येईल त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात तुमचा हा छोटासा प्रयास महत्वाचा ठरेल .

आणखी वाचा: आपले ध्येय नेमके कसे निश्चित करावे आणि ते कसे प्राप्त करावे?

आणखी वाचा: जगात ५ ℅ लोकंच फक्त यशस्वी होतात याचे रहस्य काय आहे? What’s the secret that only five percent of people in the world succeed?

आणखी वाचा: यशस्वी जीवनसाठी विक्री कौशल्याचे काय महत्व आहे? What is the Importance of Selling Skill for Successful Life?

आणखी वाचा: माणूस आपल्या उपजत कौशल्य आणि कल्पनांवर काम का करत नाही? Why are people not working on our talent and ideas?

आणखी वाचा: आपला शोध आपणच घेतला तर जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. No one can stop you from succeeding in life if you do your own research.

आणखी वाचा: जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवावे? How to get what you want in life?

आणखी वाचा: जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे? How to live life as a warrior?


Spread the love

3 thoughts on “जीवनातील कोणतीही समस्या कशी सोडवावी? / How To Solve Any Problem In Life?”

  1. नमस्कार सर,
    वरील ब्लॉग वाचुन mind blow झालं. नेहमीप्रमाणे अप्रतिम विचार मांडले आहेत…जीवन म्हणलं की समस्या येणारच. परंतु या समस्या आपल्यापेक्षा मोठ्या नाहीत. आणि ज्या काही समस्या समोर येतील त्या सोडवण्याची १००%जबाबदारी माझी आहे. समस्येपेक्षा मी अधिक सामर्थ्यवान आहे. हे आपण नेहमी लक्षात घेतले पाहिजे. सर, तुम्ही जे 8 Beliefs सांगितले आहेत ते आम्हाला खूप फायद्याचे ठरतील, आणि ते आमच्या जीवनात रुजवण्याचा नक्की प्रयत्न करू😊
    Thank you sir ☺

    Reply
  2. जीवनातील कोणतीही समस्या कशी सोडवावी? / How To Solve Any Problem In Life?

    खूप दिवसापासून हा ताजा तवाणा लेख वाचायला मिळाला आणि मन अगदी गच्च भरल या हा ब्लॉग एवढा चविष्ट आहे की , एकदा जर सुरुवात केली तर कधी संपला हे कळलं सुध्दा नाही आणि असा नमकीन लेख एकदा वाचून विचारांची भूक भागत नाही म्हणून दोन वेळा वाचलं आणि त्यातून जे मिळालं ते माईंड ब्लोईंग आहे .

    या युनिव्हर्स मध्ये प्रत्येक सजीव पुढे काही ना काही तरी प्रॉब्लेम्स आहेतच . आणि असं म्हंटले जाते की समस्या विना जीवन जगण्यास मजा नाही मला वाटते हे बरोबरच आहे कारण जर आपल्या आयुष्यात समस्या नसतील तर आयुष्य हे एका मोकळ्या रानात पडलेल्या निर्जीव दगडासारखे असेल असते .

    आज आपण जे काही धडपड करत आहोत ती फक्त दोन कारणामुळे
    1) आपल्या समोर असलेले संकट,समस्या दूर करण्यासाठी .
    2) आपल्या समोर कुठलेही समस्या येऊ नये यासाठी .
    मग आता हे समस्या , संकट कोणत्या क्षेत्रात येतात ? तर आपलं जीवन खालील क्षेत्रात खेळत असते.

    १) आरोग्य (Health)

    २) संपत्ती (Wealth)

    ३) नातेसंबंध (Relationship)

    ४) करिअर (Career)

    ५) व्यवसाय (Business)

    ६) आर्थिक (Money)

    ७) व्यक्तिगत विकास (Personal Growth)

    ८) कला व नावीन्य ( Art and Creativity)

    आपल्या जीवनाचा उद्देश जर बघितला , आपण हे आयुष्य का जगतो ? या गोष्टीचे उत्तर वरील दिलेल्या बाबी मध्ये मिळेल .

    समस्या सुद्धा याच क्षेत्रामध्ये निर्माण होतील कारण आपण आपल्या जीवनात याच गोष्टीवर कार्यरत असतो आणि जिथे आपण काम करतो तिथेच अडथळा निर्माण होत असतो . समजा आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि जेंव्हा आपण त्या रस्त्यावरून प्रत्यक्ष प्रवास करू त्यावेळीच त्या रस्त्यावर असलेले खड्डे , गतिरोधक, सिग्नल या समस्या दिसतील. अगदी तस्संच आपण आपल्या लाईफ मध्ये ज्या गोष्टीवर काम करत असतो तिथेच समस्या निर्माण होतात.

    आपल्या प्रत्येकालाच आपल्या लाईफमध्ये सगळं भरभरून हवं असते मग ते पैसा , आरोग्य , नातेसंबंध , career , अध्यात्म , fun and creativity, हे सर्व आपल्याला अगदी मुबलक प्रमाणात हवं असते आणि ते मिळवण्यासाठी आपण ढोर मेहनत करत असतो परंतु तरीसुद्धा आपल्याला पाहिजे तेवढं मिळत नाही . या गोष्टीचे कारण शोधले असता तर त्यामध्ये येणाऱ्या समस्या हाच मुद्दा समोर येतो. त्या समस्या सोडवण्यात आपला वेळ, आपल्यात ते काम करण्यासाठी असलेली उत्साही ऊर्जा वाया जाते आणि त्यातून निरश्या आपल्या हाती लागते त्यामुळे आपण जे काम अति उत्साहान करत होतो त्या कामाबद्दल चा उत्साह खाली येऊन त्याबद्दलची नकारात्मकता आपल्यामध्ये घर करत असते त्यामुळे आपण बघितलेली मोठी मोठी स्वप्ने निकामी ठरतात .
    त्यामुळेच आपल्याला आख्ख आयुष्य तडजोडीत काढावं लागतं आणि हे सोन्यासारखे मानवी जीवन अर्थहीन होऊन जाते. ह्या तयार झालेल्या समस्या सोडवण्यात आपल आयुष्य निघून जात काही काही तर ह्या समस्यांना बघूनच या मौलिक आयुष्याला तिथेच थांबवता यालाच आपल्या भाषेत आत्महत्या म्हणतात.

    मग ह्या समस्या सोडवाव्या कश्या ? हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न सर्वांसमोर असतो. तसाच माझ्यासमोर पण होता . समस्या तर आपण सोडवतच असतो पण त्यामुळे आपल्याला खूप नुकसान सहन करावं लागते मीही माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये बऱ्याच समाजात सोडवलेले आहेत पण त्यामध्ये मला काहीतरी गमवावे लागले आहे.
    परंतु
    आपला हा ब्लॉग वाचला आणि त्यातून खूप महत्वाचा खजिना हाती लागला. यामध्ये तुम्ही सांगितलेले आठ तत्त्वे ही ही फक्त तत्वे नसून ती सुंदर आयुष्याची चाविच आहे .

    जगातील top व्यक्तींचा अभ्यास केला तर यातून एक बाब प्रखरतेने समोर येते की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात एखादी समस्या निर्माण होण्याआधीच त्यावर उपाय शोधून ठेवलेले आहेत त्यामुळे ते त्यांच्या समोर आलेली समस्या चुटकीशीर पणे सोडवतात . त्यामुळे त्यांची एनर्जी किंवा त्यांचा बहुमूल्य वेळ वाया जात नाही म्हणून ते प्रत्येक क्षेत्रामध्ये यश संपादित करत असतात . म्हणून कधी पण्या आधी कट्टा म्हणतात तसाच आपल्या आयुष्यात काहीतरी घडण्याधीच त्यावर उपाय शोधलेले बरे आणि तेच उपाय शोधण्यासाठी तुम्ही दिलेले जीवन बदलवणारे 8 तत्वे खूप म्हणजे खूपच महत्त्वाचे आहेत.

    1) माझ्या जीवनातील समस्या सोडविण्याची १००% जबाबदारी माझी आहे.

    एखाद्या कामाची जबाबदारी आपल्यावर असल्यानंतर ते काम पार पाडण्याची आपली intensity खूप असते . ते पूर्ण झाल्याशिवाय आपण शांत बसत नाही कारण ते काम आपल्या जबाबदारीवर आहे . त्यासाठी आपण उत्तरे देणार आहात याची कल्पना आपल्याला असल्यामुळे आपण ती कृती पार पाडतोच .
    म्हणून जर आपल्या आयुष्यात येणारी समस्या सोडवण्याची जबाबदारी 100% आपली आहे ही बाब जर आपल्या माईंड मध्ये आपण सेट केली तर ती समस्या सोडविण्यासाठी आपलं माईंड विविध मार्गांचा शोध घेईल कारण ती जबाबदारी आपली आहे त्यासाठी उत्तरे आपल्याला द्यावी लागणार आहेत याची कल्पना त्याला होते म्हणून तो त्या समस्येचं निवारण झाल्याशिवाय श्यांत राहत नाही . त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी आपलं माईंड खंबीरपणे उभा असतं म्हणून हे Belief खूप ताकदवान आहे.

    2) “प्रत्येक समस्येला उपाय आहे आणि तो उपाय या विश्वात आधीच अस्तित्वात आहे.”

    समजा आपल्याला एका ठिकाणी भेट द्यायची आहे आणि त्याबद्दलची माहिती आपण फक्त पुस्तकात वाचलेली आहे. आज पर्यंत तिथे कोणीच गेलेले नाही आणि तिथे जाण्याचा आपण विचार करत आहात तर त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागणार की नाही? Absolutely या प्रश्नाचे उत्तर नाही असंच असेल कारण आपण आपल्या माईंड तिथे आत्तापर्यंत कोणीच गेलेले नाही अशी भीतीदायक सूचना दिलेली आहे त्यामुळे माईंड त्या ठिकाणी जाण्यासाठी दबकत आहे .
    या उलट जर आपण ज्या ठिकाणी पूर्वी लोक गेलेले आहेत अशा ठिकाणी भेट द्यायचे ठरवले तर त्या ठिकाणी जाण्यासाठी आपला माईंड लगेच मान्यता देईल.

    या जगामध्ये ज्यावेळी एखादी गोष्ट निर्माण होते त्याच वेळी त्या गोष्टीवरील तयार झालेल्या समस्याच निवारण करण्यासाठी उपाय सुद्धा तयार होत असतात.

    अगदी याच प्रकारे आपल्या पुढे निर्माण होणारी समस्या हे आपल्यासाठी काही नवीन नाही. ती आधीच या विश्वात तयार झालेली आहे आणि अनेक जण त्या समस्येचं सामना केलेले आहे आणि त्यामध्ये त्यांनी यश प्राप्त केलेले आहेत म्हणजेच ती समस्या सोडवण्यासाठी आधीच formula तयार झालेला आहे अशी मान्यता आपण आपल्या mind ला दिलेली असेल तर आपल्या पुढची समस्या आपल्या पाणी पिल्यासारखी असेल .
    म्हणून हे belifs खूप पावरफूल आहे.

    3) “मी तक्रारकर्ता नाही, समस्या सोडवणारा आहे”.
    एखाद्या गोष्टीबद्दल जर आपण तक्रार करत असलो तर आपलं mind त्या बद्दलची नकारात्मक भावना स्वीकारून गोष्ट कशी आपल्यापासून दूर जाई किंवा त्या गोष्टीला कसं संपवता येईल या बाबीवर विचार करते . आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये उच्च पातळीवर जायचं असेल तर त्यामध्ये येणाऱ्या संकटांच्या छातीवर लाथ मारून पुढे जावं लागेल त्यामुळे आपल्या समस्या बद्दल तक्रार करण्याऐवजी ही समस्या सोडवण्यासाठी मी निर्माण झालेला आहे .हे सुंदर मानवी जीवन मला आलेले समस्या दूर करून यश मिळवण्यासाठी मिळालेला आहे त्यामुळे मी माझ्यासमोर निर्माण झालेल्या समस्या वर तक्रार करणारा नसून उद्या सोडणार आहे अशी मान्यता जर आपण आपल्या मांडला दिली तर माइंड ती समस्या कशी सोडवली जाईल? याबद्दलचे मार्ग शोधायला लागते आणि तयार झालेली समस्या आपल्यापासून दूर जाते.

    4) “मी समस्येपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे”.

    मला ही मान्यता आपल्या जीवनामध्ये लवकर आणि योग्य परिवर्तन करणारी वाटते कारण आपण ज्या गोष्टींना आपल्यापेक्षा कमी लेखतो त्यापेक्षा वरचढ आपली कामगिरी असते म्हणून जर आपण आपल्या समोर निर्माण झालेल्या संकटांना किंवा समस्येला आपल्या पेक्ष्या कमी किंमत दिली तर नक्कीच ती निर्माण झालेली समस्या आपल्या जवळ जास्त वेळ राहणार नाही.

    यामुळे आपलं माईंड त्या समस्येला जास्त वेळ राहूच देणार नाही ती कशी संपेल याचा शोध घेऊन तिला संपविण्याचा प्रयास करेल. म्हणून या belifs मुळे आलेली समस्या वेगाने परत जाईल हे मात्र नक्की.

    5) “जगात परिपूर्ण असे काहीही नाही. आयुष्यात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नाही, ही समस्या देखील नाही.

    या जगामध्ये जे काही निर्माण झालेले आहे ते कोणतेही परिपक्व नाही प्रत्येकामध्ये काहींना काही तरी त्रुटी आहेच म्हणून आपल्या समोर जी समस्या निर्माण झालेली आहे त्या मध्ये पण काहीतरी त्रुटी आहे.

    या मुळे आपल्याला त्या समस्येत असलेला कमीपना आपल्या माईंड ला जाणवते त्यामुळे आणि त्याची एक सवय आहे की दुसऱ्या मध्ये जर काही कमीपणा असेल तर ते अधिक ऊर्जेने काम करते . म्हणून या मुळे अपल्याध्ये एकप्रकारची उर्ज्याच तयार होते आणि ती ऊर्जा समस्येला नष्ट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते.

    6) “मी समस्येचा सामना करत आहे, समस्येत अडकलेलो नाही.”

    आता यामुळे सुध्दा समस्या सोडविण्यासाठी नाव मार्ग मिळतो कारण आपण जर आपल्या माईंड ला एकाद्या सास्येत अडकलो असं सांगितलं तर ते load आल्यासारखं करते त्यामुळे नवीन मार्ग मिळण्याऐवजी आपण अधिक त्यामध्ये बुडत जातो
    परंतु
    त्याच ठिकाणी जर आपण आपल्या mind ला मी त्या समस्येत नाही तर बाहेरून त्याचा सामना करतोय यामुळे आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा येते आणि ती ते समस्या सोडवण्यासाठी खूप महत्वाची ठरते .
    आपण सहज बोलत असताना असं सांगतो की मी ह्या ह्या problen मध्ये अडकलो त्यामुळे आपल्यातला confidance कमी होऊन आपण त्यावर उपाय शोधण्यापेक्षा अधिक समस्येच्या जाळ्यात पडतो. त्यामुळे आपल्या बोलिमध्ये अश्या प्रकारचा बदल केला तर अधिक फायद्याचं ठरेल .

    7) “ही समस्या माझ्या जीवनात, मला कमजोर बनवण्यासाठी नाही, तर मला आणखी मजबूत करण्यासाठी आली आहे.”

    आपल्या आयुष्यात जे समस्या येतात ते समस्या आपल्याला कमजोर बनवतच नाहीत त्यामुळे कुठेतरी आपल्या मध्ये असलेल्या कमी पणाची जाणिव होते त्यामुळे आपण आल्या मध्ये करत असतो .
    आणि जर आपण आपल्या mind ला असं सांगितलं तर त्या समस्येतून आपण परिपक्व होत आहोत अश्या भावनेने ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि ते करण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट करण्याची गरज लागणार नाही .

    8) “तुमच्या समस्येचे आव्हानात रुपांतर करा”
    ही जी मान्यता आहे ती खरंच आपल्या आयुष्याचं direction बदलणारी आहे कारण आपल्यापुढे तयार झालेली समस्या कडे जर आपण ते आव्हान आहे असे बघितले तर त्यातून खरंच एक मोठा उत्साह आपल्यामध्ये निर्माण होईल कारण आपल्या माईंड ला समसेपेक्ष्या आव्हानं स्वीकारायला आवडतात म्हणून आपल्या समोर निर्माण झालेली समस्या जर आपण आव्हान समजून जर त्यावर काम केलं तर ती समस्या नसून आपल्यासाठी संधी आहे असा आपल्याला वाटायला लागेल.

    आपण जर आपल्या माईंड ला हे समस्या नसून आव्हान आहे असं सांगितलं तर माईंड मोठ्या मोठ्या तयारीने येणाऱ्या समस्येला तोंड देण्यास सज्ज असेल . त्यावर असणारे वेगवेगळे उपाय माईंड शोधायला लागेल त्यामुळे त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आपल्याला अगदी सहज मार्ग उपलब्ध होईल. म्हणून हे belifs महत्वाचे आहे .

    आपलं जीवन सुखकर करण्यासाठी हे 👆 आठ beliefsअत्यंत महत्वाचे आहेत .हा फॉर्मुला वापरून जर आपण समस्या सोडवली तर आपल्या पुढे निर्माण झालेली समस्या ही समस्या वाटणार नसून ती एक मोठी संधी आहे असं वाटेल.

    आपल्या मनासारखं जीवन जगायचे असेल तर त्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना निर्माण झालेल्या समस्येला लाथ मारून पुढं जाता आले पाहिजे आणि त्या समस्येवर लाथ मारण्यासाठी तुम्ही दिलेली ही अष्ट मंत्र अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत.

    हा फक्त वैचारिक लेखन असून हे प्रत्येकाचं जीवन आहे . एवढा महत्वाचा खजिना उपलब्ध करून माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी मदत केल्याबद्दल मनापासून धनयवाद

    Reply
  3. उत्तम ब्लॉग.. how to solve any problem in life ह्या प्रश्नाची परिणामकारक उत्तरं ब्लॉग वाचून मिळाली. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी ही ‘८ रहस्ये’ अतिशय मार्गदर्शक आहे. सर,आपणं नेहमीच महत्त्वपूर्ण विषयाला अनुसरून लिहिता. नव्हे तर, समस्यांचे निराकरण करणारे effective मार्गही सुचवता.. मनापासून आभार 🙏.

    Reply

Leave a Comment

Translate »
error: Content is protected !!