मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये जीवनात यशस्वी होण्यासाठी मानसिकतेची काय भूमिका असते? यासाठी लागणारे एक पॉवरफुल रोडमॅप शेअर करीत आहे
“Mind is a flexible mirror, adjust it, to see a better world”. –Amit Ray
प्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगायला मला आवडेल, हा ब्लॉग वाचण्यापूर्वी जीवनात यशस्वी होण्याचा दुसरा सिद्धांत प्रक्रिया-आधारित ध्येय सिद्धांताद्वारे जीवनातील कोणतेही ध्येय कसे साध्य करायचे? How to achieve any goal in life through Process-Based Goal Theory? हा ब्लॉग जरूर वाचावा, जेणेकरून तुम्हाला यशाचा हा तिसरा सिद्धांत समजण्यास सोपा जाईल.
यशाचा तिसरा नियम:-
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानसिकतेची काय भूमिका असते?
असं म्हटलं जाते की तुमची बाहेरील उपलब्धी (External Achievement) तुमच्या आतील (मनातील) मूल्यांच्या संग्रहांचे (Internal Values) प्रतिबिंब असते.
तुमची मनोवृत्ती (Mindset) ही एक अशी गोष्ट आहे की, आज तुम्ही जे कोणी आहात आणि भविष्यात जे कुणी बनणार आहात हे ठरवणारी असते.
तुमची मनस्थिती (Mindset) तुमची परिस्थिती घडवत असते, हे आज मानसशास्त्रीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
Your mentality can change your reality.
Mindset- या इंग्रजी शब्दाला मनोवृत्ती, मनोदशा, मानसिकता, सोच, मनस्थिती असे अनेक पर्यायी शब्द सांगता येतात.
तुमची आजची जी मानसिकता तयार झाली आहे त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. जसे की,
कुटुंब, समाज, मित्र-मैत्रिणी, मीडिया आणि सोशल मीडिया, जीवनात घडणारे प्रसंग, आलेले अनुभव, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मिळणारे शिक्षण, इ.
हा ब्लॉग तुम्ही काळजीपूर्वक वाचला तर एक फायदा नक्की होईल की, तुमच्या मानसिकतेचा प्रकार आज कोणता आहे तो कळेल आणि आज तुमच्या जीवनाला कोणती मानसिकता चालवत आहे ती सापडेल.
एक खास बाब म्हणजे तुमच्या मानसिकतेची कार्यप्रणाली कशी आहे ती समजायला मदत होईल आणि जर तुमची इच्छा असेल तर ती मानसिकता बदलून एक जबरदस्त जीवन जगण्यासाठी नवीन मानसिकता कशी विकसित करावी त्यासाठी एक दिशा मिळेल.
प्रथम आपण माईंडसेट म्हणजे नेमके काय असते ते समजून घेऊया!
आपल्या जीवनाकडे, समाजाकडे व जगाकडे बघण्याची आपली वृत्ती म्हणजे माईंडसेट होय अशी व्याख्या आज अनेक मनोवैज्ञानिक करतात.
यामध्ये साधारणतः आपल्या धारणा आणि विश्वास यांचा समावेश होतो.
आपण आपल्या जीवनाकडे कसे बघतो त्यासाठी आपल्या मान्यता कोणत्या आहेत हे यातून प्रतिबिंबित होत असते.
प्रथम तुम्हाला मी चार प्रश्न विचारतोय त्याची उत्तरे तुमच्या मनातून काय येतात ते तुम्ही तपासून पहा.
१) तुम्हाला आजचे तुमचे जीवन कसे दिसते?
२) तुम्ही तुमच्या जीवनाला बघून समाधानी भावना व्यक्त करता का?
३) तुमचे जीवन पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे हे बघून आभाराची भावना व्यक्त करता का?
४) तुमच्या जिवनाला बघून तुम्ही तक्रार, असमाधान, असुरक्षितता व्यक्त करता?
हे सगळं तुमच्या माईंडसेटवर अवलंबून असते, याचे कारण बघा…
हे जग जसं निर्माण झालं आहे ते सर्वांना सारखच आहे, तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि इतरांसाठी हे काही वेगळे नाही, हे तुम्ही मान्य करता ना?
एखादी व्यक्ती आपल्या जीवनात अपयशी आहे ती सुद्धा याच जगात राहत आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने आपल्या जीवनात यशाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत ती सुद्धा याच जगात आहे.
मग काहीच लोकांनी आपल्या जीवनात हे वेगळ्या प्रकारचे सकारात्मक परिणाम कसे काय निर्माण केलेले दिसतात?
त्यासाठी एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे यशस्वी लोकांनी आपल्या समोर आलेल्या आव्हानांकडे व जीवनात घडणार्या घटनांकडे बघण्याची मानसिकता वेगळ्या प्रकारची निर्माण केली, हेच यातून सिद्ध होते.
असे म्हटले जाते की आपल्या जीवनात घडणाऱ्या कोणत्याही घटनेला स्वतःचा असा कोणताही अर्थ नसतोच, जो अर्थ आपण देतो तोच अर्थ त्या घटनेला किंवा प्रसंगाला प्राप्त होतो.
तुम्ही तुमची मानसिकता जशी निर्माण कराल त्याच प्रकारचे व्यक्तिमत्व बनत जाणार आणि त्याच प्रकारचा आकार तुमच्या जीवनाला प्राप्त होत जाणार, हे मात्र खरे आहे.
ज्याप्रमाणे मूर्तिकार एखाद्या मूर्तीचा आकार प्रथम आपल्या मनात तयार करतो, त्याचप्रमाणे ती मूर्ती आकार घ्यायला लागते. हेच आपल्या जीवनाला सुद्धा लागू पडते.
एक विचार करून बघा की तुम्ही आज एका आनंदी, सुखी जीवनाच्या प्राप्तीकडे तुम्ही तुमची वाटचाल करीत आहात? की एका डिप्रेशन, दुःखी, निराशावादी जीवनाकडे तुमची वाटचाल सुरू आहे? हे पूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे.
आज एक स्वतःला तुम्ही प्रश्न विचारु शकता.
तुम्हाला तुमच्या आवडीचे जीवन जगायचे आहे, की तडजोडीचे?
याचे उत्तर तुमचे निश्चितच आवडीचे हेच असणार आहे. होय की नाही?
मग तुम्हाला हवे असलेले जीवन जगण्यासाठी त्याला साजेसा माईंडसेट तयार करावा लागेल की नाही?
तो ग्रोथ माईंडसेट, ओपन माईंडसेट, लर्निंग माईंडसेट, उत्तरे शोधणारा माईंडसेट तयार करावा लागेल, कारण तो जाणून बुजून तयार होणारच नाही, तर तो तयारच करावा लागेल. कारण आपले मन एखाद्या सुपीक जमिनीसारखे असते, त्यात जे पीक हवे आहे ते जर नाही पेरले तर तिथे नको असलेली झाडी, गवत मोठ्या प्रमाणात उगवेल तेही काही न पेरता. म्हणून ज्या गोष्टीचे पीक तुम्हाला घ्यायचे आहे त्याचीच बीज पेरणी करावी लागेल.
आनंदाची गोष्ट अशी आहे की तशा प्रकारचा माईंडसेट तुम्ही तयार करू शकता.
आजच्या या ब्लॉग मध्ये त्यासाठीची तीन तत्वे तुमच्यासोबत शेअर करीत आहे.
१) नवीन माहिती गोळा करणे:- (Collection of New Information)
आज जो काही तुमचा माईंडसेट तयार झाला आहे, तो आजपर्यंत तुम्हाला मिळालेल्या किंवा तुम्ही मिळविलेल्या माहितीच्या आधारे तयार झाला आहे.
आपण जी माहिती गोळा करीत असतो ते आपल्या पाच इंद्रिये (Five Senses) यांच्या माध्यमातून ते काम होत असते, हे आपल्याला माहीत असेल.
गोळा केलेल्या माहितीतून आपल्या विचारांची क्वालिटी तयार होत असते आणि त्यातून आपला माईंडसेट तयार होत असतो.
हाच तयार झालेला माईंडसेट आपल्याला जीवनभर एका होकयंत्राचे (दिशादर्शकाचे) (Compass) काम करीत असतो.
जसे की, आपण एखादे जहाज घेऊन समुद्रात प्रवास करीत असताना आपल्या जवळ असलेल्या होकयंत्राच्या मदतीने आपण आपल्या इच्छित स्थळी पोहचू शकतो. जर त्या होकयंत्रात काही बिघाड झाला किंवा ते खराब झाले तर आपले जहाज कुठेही भरकटेल, किंवा एखाद्या निर्जन बेटावर अडकेल, समुद्र कितीही शांत असेल आणि प्रवासाला योग्य असून देखील त्याचा काहीही फायदा होणार नाही.
तसेच आपल्या माईंडसेटच्या बाबतीत हाच नियम लागू होतो, एखाद्या व्यक्तीचा नकरात्मक माईंडसेट असेल आणि आसपासची आणि बाहेरील परिस्थिती कितीही सकारात्मक असेल किंवा विकासाच्या कितीही संधी उपलब्ध असतील, तरी त्याचा काहीही फायदा होत नाही, हे अनेक उदाहरणातून तुम्हाला दिसून येईल.
याच्या उलट बाहेरील परिस्थिती किंवा वातावररण कितीही नकारात्मक असेल परंतु मनस्थिती सकारात्मक असेल, तर अशाही परिस्थितीत काही लोकं स्वतःचा विकासच करताना दिसतात.
उदाहरणच द्यायचे झाल्यास, जी लोकं लहानपणापासून किंवा विशिष्ट वयात, टिव्ही चैनलवरील, युट्युबवरील, नेटफ्लिक्स वरील धारावाहिक, वेब सिरीज, ज्या क्राइमशी संबंधीत अशा सिरियल्स बघत असतात त्यांची मनस्थिती कशी तयार झालेली असते? हे तुम्हाला माहीतच आहे.
तसेच जी लोकं सकाळपासून रात्रीपर्यंत सतत ब्रेकिंग न्यूज बघत असतात, ते कशा प्रकारची माहिती गोळा करीत असतात की, जगात किती वाईट गोष्ठी चालू आहेत, हे जग किती वाईट आहे, अशाप्रकारच्या मनस्थितीत ती लोकं संपूर्ण जगाकडे एका संशयाच्या नजरेने बघत असतात, जसे की,
मला कोणी मारणार तर नाही ना?
माझा कोणी गैरफायदा तर घेणार नाही ना?
माझ्या मुलांना कोणी किडनॅप तर करणार नाही ना?
माझ्या कुटुंबातील लोकांना कोणी फसवणार तर नाही ना?
अशा प्रकारचे विचार सतत मनात आल्यामुळे हा संपूर्ण समाजच वाईट आहे, अशी धारणा त्या लोकांची बनत असते.
ज्या प्रकारची माहिती तुम्ही गोळा कराल त्याचप्रमाणे तुमचा माईंडसेट तयार होईल, आणि हाच माईंडसेट तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि समोर आलेल्या आव्हानांना अर्थ देण्याचा प्रयत्न करेल, हे मात्र नक्की आहे.
मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्राजी म्हणतात की, “Garbage in, Garbage Out”. याचाच अर्थ जिथे कचरा भरला असेल, तिथून कचराच बाहेर पडेल.
त्याची दुसरी बाजू आपल्याला Best in, Best Out. या तत्वाचा अवलंब करून चांगली माहिती/ज्ञान गोळा करण्याची स्वतःला सवय लावणे गरजेचे आहे. हे खरे आहे की नाही?
२) सकारात्मक व मोठ्या ध्येयवादाने प्रेरित असलेल्या व्यक्तींच्या सानिध्यात राहणे- (Live with Big Goal Oriented and Positive People)
आपली चांगली मनस्थिती घडवण्यासाठी ह्या दोन गोष्ठी खूप मोठी भूमिका पार पाडीत असतात.
“You Are the average of the five people you spend the most time with”. Jim Rohn
मोटिवेशनल स्पीकर जिम रॉन म्हणतात की, “तुम्ही तुमच्या आसपास असलेल्या पाच लोकांची सरासरी (Average) असता”.
शेजारच्या कलिंगडाला बघून दुसरे कलिंगड आपला रंग बदलत असते असे म्हणतात, ते खरे आहे.
तसेच ढवळ्याच्या शेजारी पवळ्या बांधला असता रंग नाही पण हरकती मात्र नक्की सारख्या दिसायला लागतात, अशी म्हण आहे ती सत्य वाटते.
तेच माणसाच्या बाबतीत घडताना दिसते. आपले मित्र- मैत्रिणी काय करतात? त्याच प्रमाणे आपली कृती आणि हरकती असतात.
एका अभ्यासावरून हे सिद्ध झाले की, आजकाल एखाद्याचा मित्र एखादी वेब सिरीज बघत असेल, तर आपल्या मित्रालाही ती बघण्यास भाग पाडतो. आणि आपल्या सोबतच आपल्या मित्राचाही वेळ बरबाद करतो.
३) उत्तम मार्गदर्शक आणि पुस्तकाच्या सानिध्यात राहणे. (Live with Great Mentors and Great Books)
असे म्हटले जाते की, उत्तम मार्गदर्शक आणि चांगले ग्रंथ तुम्हाला कधीच नाउमेद होऊ देत नाहीत.
ह्या सकारात्मक मनस्थिती असलेल्या व्यक्ती तुम्हाला जर प्रत्यक्ष भेटल्या नाहीत, तर त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात ते सापडतात. फक्त त्या व्यक्तींचा आणि ग्रंथांचा शोध घ्यावा लागेल.
मार्गदर्शक आणि ग्रंथ ह्या दोन गोष्ठी एव्हढ्या शक्तिशाली (Powerful) असतात की, जी गोष्ट तुम्हाला शिकायला पुढची काही वर्ष लागू शकतील तीच गोष्ट त्या व्यक्ती काही दिवसात किंवा काही तासात शिकवतात, तेही आपल्या हातून होणाऱ्या चुका टाळून!
तुम्हाला मार्गदर्शन करणारी व्यक्ती कोण आहे? त्यावरून तुमची मनस्थिती आकार घेत असते व त्याप्रमाणे तुम्ही कृती करायला लागता.
उत्तम मार्गदर्शक असेल तर वाईट परिस्थितीतही चांगले बघण्याची दृष्टी देतात जसे अर्जुनाला कृष्णाने केलेले मार्गदर्शन, आणि वाईट मनस्थिती असलेले सल्लागार असतील तर चांगल्या परिस्थितीतही वाईट शोधायला भाग पडतात.
याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास रामायणामधील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामा. या दोन्ही वाईट सल्लागारांमुळे रामायण व महाभारत घडून आले असे म्हटले जाते.
म्हणून मार्गदर्शक निवडताना खूप काळजी घ्यावी लागेल. कारण असे आहे की, मंथरा आणि शकुनीसारखे पात्र आपल्या आसपास किंवा शेजारी-पाजारी असण्याची जास्त शक्यता असते, जरा जपूनच निवड करा.
इथे एवढेच सांगायचे आहे की, हे जे मानवी जीवन आपल्याला मिळाले आहे त्याचा पूर्णपणे आनंद घ्यायचा असेल, तर सकारात्मक मानसिकतेशिवाय आज दुसरा पर्याय नाही, असेच म्हणावे लागेल.
मला अजूनही माझ्या शाळेची आणि कॉलेजची सहल आठवते.
कितीतरी दिवसाच्या आधीपासूनच आम्ही तयारीला लागायचो. कसे जायचे, कुठे जायचे, सोबत काय काय न्यायचे, तिथे गेल्यावर काय काय करायचे? हे सगळं आमचं आधीच ठरवलेलं असायचं.
सर्वात महत्वाचे म्हणजे तिथे पोहचल्यावर तेथील छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा आम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करायचो, मग तिथली हवा असेल, पाणी असेल, तेथील निसर्गरम्य दृश्य असतील, विविध चटपटीत आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ असतील, त्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या डोळ्यांच्या आणि मोबाईलचा कॅमेऱ्यात आम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करायचो? हे सगळं आम्ही अगदी आनंदाने करायचो? जरी या स्थळाला परत कधीतरी भेट देता येणार आहे, हे माहीत असूनसुध्दा !!
ही सहल आमच्या सोबत असणाऱ्या प्रत्येकासाठी सारखीच होती, तेथील वातावरण सारखेच होते, जाताना आणि येतानाचा प्रवास सारखाच होता, खाद्यपदार्थही सारखेच होते, परंतु त्याच ट्रीप मधील काहीजण असेही असायचे की या सर्व प्रवासात आणि निसर्गाच्या सानिध्यात राहूनही ते सतत कुरकुर करायचे, ते सारखे म्हणायचे, हे असे असायला पाहिजे होते, ते तसे असायला पाहिजे होते, अशा एक ना अनेक उणीवा काढत, कपाळावर कायम आठ्या पाडून रडत बसणारे त्या सहलीत प्रत्येक वेळी अनेकजण दिसायचे.
माझ्यासारखा असा तुमचाही अनुभव असेलच. तेंव्हा एकच विचार मनात यायचा की, एव्हढी सगळी छान सहल असून देखील हे असे का रडतात?
आज त्याचे उत्तर सापडले, हा सगळा केवळ माईंडसेट चा खेळ आहे.
आज रोजच्या जगण्यात असे अनेक लोकं तुम्हाला सापडतील की सगळं छान असताना सुध्दा सतत कुरकुर करणारे, दोष आणि उणीवा काढण्यात आपले आयुष्य घालवणारे असतात.
मग तुम्हीच विचार करा, पृथ्वी या ग्रहावर ही आपली शेवटची सहल आहे, इथे परत कधीच आपली ट्रीप आयोजित होणार नाही. म्हणून कुरकुर करत आपल्या वाट्याला आलेले क्षण वाया घालवायचे? की आनंदाने घालवायचे? हा केवळ आणि केवळ तुमचाच निर्णय आहे. होय की नाही?
हा ब्लॉग वाचून तुम्हाला असे वाटते काय की, माणसाने आपला माईंडसेट बदलणे खरंच गरजेचे आहे? ते कॉमेंट करून नक्की कळवा.
तुम्ही ज्या लोकांवर मनापासून प्रेम करता त्यांना हे नक्की वाचायला सांगा ही माझी तुम्हाला विनंती आहे, कारण
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद!!
आणखी वाचा: आपले ध्येय नेमके कसे निश्चित करावे आणि ते कसे प्राप्त करावे?
आणखी वाचा: जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवावे? How to get what you want in life?
आणखी वाचा: जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे? How to live life as a warrior?
Wow.. किती छान कल्पना आहे ही की पृथ्वी या ग्रहावर आपली शेवटची ट्रीप आहे… सहल ही आनंदासाठी असते, आणि आनंद हा योग्य mindset नेच मिळू शकतो…. Thank you so much sir
धन्यवाद, अनिता
खरं आहे, आपला माईंडसेट विकसित केला तर सगळं काही नीट करण्याची हिंमत निर्माण होते.
Khup chhan mahiti milali sir
welcome, असंच वाचन चालू ठेवा.
Yes sir, Thought provoking blog sir, outstanding sir
Yes sir, Thought provoking blog sir, outstanding sir
खूप प्रेरणा देणारे लेखन, अभ्यासपूर्ण लेख, अश्या सकारात्मक लेखनाची आज समाजाला खरच खुप गरज आहे, great work Kumre sir.
खूप प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण लेख, समाजाला अश्याच सकारात्मक विचारांची आज नितांत गरज आहे. Kumresir असेच लिहित रहा indeed great work
खूप खूप धन्यवाद, Madam, तुमच्या प्रतीक्रीयेने मला आणखी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. नक्की लिहीन. असेच मार्गदर्शन असू द्या.
Thanks sir, you started this motivational Blog writing for us. From Today’s blog I learnt , ”when you succeed in keeping happy mindset then you will success in every moment” !
welcome, it’s very true. keep learnjng.
अप्रतिम लिखाण करता तुम्ही सर तुमचा स्वतःचा माईंडसेटच इतका positive आहे की तुमच्या सानिध्यात येणारी प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करण्यास भाग पडते, आम्ही खूप भाग्यवान आहोत की तुमच्यासाखा मार्गदर्शक आम्हाला लाभला… असेच उत्तम उत्तम ब्लॉग लिहत चला आणि आमचं मार्गदर्शन करत रहा. Thank you so much
नक्कीच लिहीत राहणार आहे, तुमच्यासारखी लोकं शिकायला व ब्लॉग वाचायला तयार असल्यावर मला दुसऱ्या कोणत्याही गोष्ठीची गरज नाही.
असाच प्रतिसाद देत राहा.
hup bhari blog ahe sir tumi lihilela
Sir ! एखाद्या XYZ person if स्वतःला एकांतात ठेवत असेल and if त्याचे चित्त एकाग्र नसेल तर त्या XYZ person la Proper Mindset decide करताना कोणते problems निर्माण होऊ शकतात ? But तो XYZ person Collective information सोबत ठेवतो नवीन books रीडिंग karto परंतु एकांतात राहतो Then त्याचा वर या Saglya ghostinche कसे परिणाम होऊ शकतात ? Postive or Negative or other ?
असं म्हणतात कोणत्याही गोष्ठीला किंवा घटनेला स्वतःचा असा कोणताही अर्थ नसतो जोपर्यंत आपण देत नाही.
like minded लोकं भेटली की आपली गट्टी जमते.
खूप छान sir. खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे या ब्लॉग मधून..
धन्यवाद
खूप छान ब्लॉग आहे, सर
Mindset कसा तयार करावा…आणि नैसर्गिक आणि दैनंदिन जीवन जगत असताना ; आपण छोट्या छोट्या गोष्टींचा कसा आनंद घ्यायला हवा….
ह्या साठी ३ तत्वे सांगितली आहेत…. नक्की सर्वांनी वाचायला हवं..थोड पटकन कळणार नाही पण पुन्हा एकदा revised करून वाचलं तर नक्की समजेल.
चांगली पुस्तके व चांगली माणसे थोडी उशीरा कळतात, त्यांना परत परत वाचावं लागतं असं म्हणतात ते खरं आहे.
Superb….!
Really, This blog will help us to change our mindset towards reality.
keep learning
Sir.. तुमच्या लेखनावर कौतुक करावं तितकं कमी. डिक्शनरी अपुरी पडेल शब्दही कमी पडतील . कारण शब्दातही व्यक्त करु शकणार नाही. इतका सुंदर आणि अप्रतिम असा ब्लॉक तुम्ही तयार केलेला आहे.सतत आम्हाला मार्गदर्शन करत राहा, म्हणजे आमच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार निर्माण होतील आणि आम्ही आमचे ड्रिम कंप्लेट करू .
Thank you
सर, तुम्ही जे Blogs लिहित आहेत ,आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत खूपच सुंदर कल्पना आहे. कुठल्याही गोष्टीत positive attitude असणे हे आम्ही तुमच्या लिखाणातून शिकत आहोत. Best in Best Out . Thank you so much Sir .
Awesome sir……
Sir , तुम्ही आम्हाला एवढं प्रेरित करता की ,बस अस वाटते की मी आता माझ्या आयष्यातील बरोबर मार्गावर आहे.आणि ही positivity life मधे खूप जास्त महत्त्वाचीआहे.and thank u so much sir की तुम्ही आमच्या आयष्यात आमचे गुरू , मार्गदर्शक,एक चांगले मित्र म्हनून आलात.
हा माझा एक छोटासा प्रयास आहे, आपण जसे असतो तेच आपल्याला मिळत असते, असं जे म्हणतात ते खरं आहे.
All the very best.
Yes sir, Thought provoking blog sir, outstanding sir
Thought provoking,outstanding blog sir,
Thank you, keep learning.
खूप भारी आहे सर…… मानवी आयुष्य जगत असताना ….life मध्ये ups and downs येत राहतात… त्यात काहीजण रडत बसून आपला वेळ waste करतात…तर काहीजण…. आणखी एक प्रयत्न करतात…आणि बहुतांश यशश्र्वी होतात…. सर जो विदयार्थी हा ब्लॉग वाचेल … नक्कीच गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल….आणि प्रत्येक गोष्टीला एका positive intent ने बघण्यास शिकेल…. सर आम्हाला अत्यंत आनंद आहे … आम्हाला तुमच्या सारखे शिक्षक विद्यालयीन जीवनात लाभले….
मला तुमची ही मतं वाचून तुमचे खूप कौतुक करावेसे वाटते की तुम्ही हे सगळं शिकण्यासाठी किती आतुर आहात. असंच learn करा. तुम्ही तुमच्या जीवनात एकदिवस नक्की मोठे होणार.
सर तुम्ही आपला mindset कसा तयार करायचा व आलेल्या परिस्थितीचा सामना करुन आहे त्यात समाधान मानून त्या गोष्टीचा आनंद कसा घ्यायचा हे कळाले. व आपल्या जीवनाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे हे या ब्लॉगच्या माध्यमातून कळले.आम्हाला या ब्लॉकचा आमच्या जीवनात नक्कीच फायदा होईल. सर तुम्ही आमच्यासाठी एक चांगले मार्गदर्शक आहात. .अशाच पद्धतीने तुम्ही अनेक ब्लॉग बनवून आम्हाला सतत मार्गदर्शन करत रहा.
तुम्ही तुमच्या जीवनात खूप मोठे व्हावे, तुम्हाला जे हवे ते मिळावे हा उद्देश ठेऊनच हा ब्लॉग लिहितोय, आणि मला खात्री आहे आणि तुम्ही ते नक्की कराल.
Very Nice Post and Quotes Sir..
Looking forward to further post..
Thank you, keep learning.
माईंडसेंट बदलणे खरचं गरजेचे आहे का? तर हो . गरजेचेच नव्हे तर नितांत गरजेचे आहे. ….! साहेब सस्नेह नमस्कार!… तुम्ही काल पाठवलेला तुमचा लेख अतिशय हृदयस्पर्शी व बोलका आहे. तुमचा प्रत्येक लेख वाचताना सातत्याने तुम्ही प्रत्यक्ष बोलत आहात, माझ्याशी संवाद साधत आहात अशीच जाणीव होत राहते. साहेब. लेखाच्या माध्यमातून या हृदयीचा या हृदयी होणार संवाद हा खरोखर भावस्पर्शी वाटतो व अंतःकरणाच्या गाभाऱ्यात थेट जाऊन पोहचतो. आणि त्या ठिकाणी मरगळलेपणाची अवस्था जी झाली आहे त्या निर्जीव अवस्थेला चेतना देऊन खाडकन जागे करतो. तुम्ही लेखात मांडलेला सकारात्मक विश्वास हा जसे पेराल तसे उगवेल या मातीच्या गुणांप्रमाणे अतिशय निर्मळ व स्वच्छ आहे. खरोखरच त्या लेखातील सुंदर विचाराप्रमाणे पहाण्याची दृष्टी ही बदलता आली पाहीजे त्या दृष्टीत जर क्षणोक्षणी सकारात्मकतेची जोड असेल तर निश्चितच समोरची सृष्टी जसे पहाल जसे विचार कराल तशीच दिसु शकणार आहे. साहेब तुम्ही लेखात व्यक्त केल्याप्रमाणे मनच सर्वांचे कारण आहे. नव्हे तर ते आपल्या आनंददायी जगण्याचे भांडवलच आहे. त्या मनाला जर आपण सकारात्मकतेसह पुढे घेऊन जाण्यात यशस्वी बनलो तरच आपण जीवनातील कोणतेही निश्चित ध्येय अथवा किंबहुना जगण्याचे इप्सित साध्य करू शकू यात तिळमात्र शंका नाही. साहेब खरोखरच तुम्ही मांडलेला लेखातील प्रत्येक शब्द नवी पहाट घडविण्यास उदयुक्त करणारा आहे. खरोखर आपल्या स्वप्नवत जगाला सकारात्मक मनाची ऊर्जा दिली तर निश्चितच ते स्वप्न सत्याच्या जगात वास्तवाचा वेध घेत पूर्णत्वास जाईल यात शंका नाही. साहेब, या प्रमाणे आपल्या लेखातील सकारात्मक ऊर्जा आम्हास सातत्याने सकारत्मक मन बनविण्यास बळ देणारी ठरावी हीच मंगल प्रार्थना. धन्यवाद…..!
सर खरंच खुपचं अभ्यास पूर्ण लेख..खूप छान कल्पना मांडली आहे ही की,पृथ्वी या ग्रहावर आपली शेवटची सहल आहे आणि सहल ही केवळ आनंद घेण्यासाठीच असते आणि आनंद हा योग्य mindset नेच मिळू शकतो….SuperbThank you so much sir
Reply
खूप धन्यवाद सर
तुमच्या अशा छान प्रतिक्रियेमुळे मला आणखी अभ्यास करण्याची आणि लिहिण्याची प्रेरणा मिळते.
तुम्हाला एक विनंती आहे की हे विचार आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहचवा.
धन्यवाद सर, तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रेरित करतात. अगदी खरं आहे जीवन हे आनंद घेण्यासाठी आणि देण्यासाठी आहे हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.
खरं तर हे जीवन खूप सुंदर आहे आणि हे पुन्हा भेटणारही नाही तर मग आपण जीवन तक्रारी करत जगायचं कि आनंदात. याच उत्तर आज आपल्या सर्वांना भेटलं असं वाटत. मी एकदा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत बघत होतो तर ते म्हणाले होते कि ” तुम्ही थोडे कमी हुशार असले तरी काही हरकत नाही पण स्वतःचा स्वतःवर विश्वास आणि सकारात्मक दृष्टी असेल तर अयशस्वी कधी होणार नाही.”
आपला स्वभाव ,आपली विचार धारा ही आपल्या संगतीतून , समाजातून घडत असते आणि व्यक्तीत जर आत्मविश्वास असेल आणि जीवनात योग्य मार्गदर्शन भेटले तर अपयशाच तोंड बघण्याची वेळ पडणार नाही.
खरं तर छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले कारण जिजाऊनीं त्यांची जिवनाकडे बघण्याची दृष्टी तशी निर्माण केली.
शिवाजी महाराजांना जिजाबाई सारखे मार्गदर्शक लाभले.
सरांनी ब्लॉग मध्ये सांगितले कि आपण जी माहिती गोळा करतो तसाच आपला दृष्टिकोन तयार होत असतो. जिजाऊनीं शिवाजी महाराजांना रामाच्या, भिमाच्या, कृष्णाच्या, अभिमन्यू च्या अश्या महापुरुष्यांच्या गोष्टी सांगितल्या म्हणून शिवाजी महाराज तसेच शूरवीर झाले.
आपण आज काय आहोत यावर लक्ष केंद्रित न करता आपण भविष्यात काय असू , आपल्याला कोणची गोष्ट साध्य करायची आहे याचा विचार आपण सकारात्मक दृष्टिकोनातून करत असू तर नक्कीच आपल्याला ती गोष्ट साध्य होणार . हा महामंत्र आज मला ह्या ब्लोगच्या माध्यमातून माहित झाला आणि मला वाटतंय कि माझ्या जीवनातले मार्गदर्शक हे कुमरे सर आणि त्यांच्या सारखे ध्येयवादी गुरु लाभावेत .
धन्यवाद सर ! खूप खूप आभारी.
Mindset positive ठेवण्यासाठी तुमचे ब्लॉग नेहमी मदत करतात.तुम्ही नेहमीच आमचा mindset positive ठेवण्यासाठी नवनवीन उपक्रम करुन घेत असतात. Online lecture मधून देखील आमच्या विकासासाठी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सत्र आयोजित करता. आमची बरोबर आणि चूकीची उत्तरे ऐकून बरोबर उत्तराचे कौतुक करता आणि चूकीची उत्तरे सुधारून पुढेही उत्तरे शोधण्यासाठी प्रोत्साहन करता.
Thank you so much Sir
जीवन ज्याचे अंत आणि आरंभ हे 2 पैलू आहेत व ते सर्व ज्ञात आहेत! आणि त्या मधील प्रवास हा यशस्वी जीवन घडविण्याचा व यशस्वी जीवन घडविण्यासाठी आपल्या मानसिकतेचा प्रवासाचा आहे . मानसिकता ही कशी घडली जाते किंवा कशा प्रकारे आपण घडवावि हे सर्वस्वी आपल्या स्वाधीन आहे योग्य संगत , योग्य विचार आणि आचार हे आपल्या स्वाधीन आहेत आणि आपण कसे उत्तमरीत्या घडवु शकतो हे अतिशय उत्तमरीत्या सांगितले आपल्या 3 बहुमूल्य नियमांनुसार जे खरच अमलात आणले तर जीवन सार्थकी लागेल! Thank you sir ♥
Thank u soo much sir,for this blog aaj chya generation madhe mindset khup imp…ahe. sir,kahi lokanna aplya ayushyat kay ahe yachi khushi naste,tr kay nahi ahe yach dukh tee balgtat,ya blog madhe aplya vicharch sarv khel asto he mla samjhl.
अतिशय आनंददायक ब्लोग आहे सर जीवनात यश आणि अपयश या दोन मार्गावर अतिशय सुंदर प्रकारे मार्गदर्शन आणि mind set याची भूमिका खरे तर सर ब्लॉग मधून खूप काही नवीन शिकायला मिळालं जीवनात कोणत्या व्यक्ती बरोबर राहायचं कसं वागायचं हे कळते जीवन आनंददायी होण्यासाठी काय करावे हे तीन तत्वाच्या सहाय्याने समजले त्यात उदाहरणात दिलेली सर आपली शाळेची सहल आमच्या सोबत केस उघडलेला आहे सर आणि शेवटचे ते वाक्य आपण पृथ्वीवर एकदा सहलीसाठी आलेलो आहे यानंतर आपण कधीच येणार नाही हे मनावर एक वेगळाच परिणाम करतो सर धन्यवाद
आपल्या जीवनात जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपला mindset positive असायला हवा.जी माणसे सतत स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल positive बोलतात किंवा विचार करतात;त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व प्रभावित करणारे असते.अशी माणसे नेहमी स्वत:ला आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आनंद देतात.सकारात्मक विचारसरणीमुळे त्यांच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असतो.
माणसांवर संगतीचा खूप मोठा परिणाम होत असतो.तुम्ही ज्या संगतीमधे राहता त्याप्रमाणे तुमचे विचार असतात.चागंल्या विचारांच्या माणसांची संगत जाणिवपूर्वक मिळवावी लागते.उलट वाईट व नकारात्मक विचारांची माणसे आपोआप तुमच्या जवळ येतात.यासाठी जाणिवपूर्वक सकारात्मक विचार करणारया लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करायचा असतो.
जगातील अनेक महान व्यक्तिमत्व ही त्यांच्या सकारात्मक विचारांमुळे जीवनात यशस्वी झालेले आहेत. अशा लोकांच्या अनुभवातून लिहलेल्या पुस्तकांच्या वाचनाने नक्कीच प्रेरणा मिळते.शिवाय त्यातून आपल्या विचारांना नवीन दिशा मिळतात.दुसरयाच्या अनूभवातून शिकल्याचा माणसाला नेहमीच फायदा होतो.
Sir,तुम्ही सांगितलेले 3 बहुमुल्य नियम जर आम्ही आमच्या जीवनात लागू केले आम्ही नक्कीच यशस्वी होऊ.
Thank you,sir!
सर, या ब्लॉग मधून नेमकं mindset म्हणजे काय ? आणि आपला माईंड सेट कसा बदलायचा ? हे समजलं. आपले जीवन जर love to life असे जगायचे असेल तर आपला माईंड सेट आपल्याला बदलावा लागेल. आणि माईंड सेट बदलण्यासाठी तुम्ही आम्हाला जे तीन तत्वे सांगितले आहेत ते आम्हाला positive mindset तयार करण्यास मदत करतील. एकदाका आपला mindset change झाला
की आपला जगाकडे आणि स्वतः कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. आणि आपण कुठल्याही गोष्टीत आनंद मानायला लागतो . आमचे mindset बदलण्यासाठी आम्हाला तुमच्यासारखे ग्रेट मार्गदर्शक लाभले आहेत. सर, तुमचे blogs वाचून आमचे mindset खरचं बदलत आहे.
Thank you Sir
हो सर, mindset बदलणे खूपच गरजेचं आहे कारण mindset ha आपल्या आजूबाजूच्या वातावरणावरून तयार होत असतो. आणि आजुबाजूच वातावरण चांगलं असेलच असं नाही जरी चांगलं नसेल तरीही त्यामधे बदल करता येऊ शकतं हे आपल्या लेखनातून प्रखरतेने कळालेल आहे . त्याचबरोबर सध्या आपला mindset कसा आहे हे पण आपण विचारलेल्या
१) तुम्हाला आजचे तुमचे जीवन कसे दिसते?
२) तुम्ही तुमच्या जीवनाला बघून समाधानी भावना व्यक्त करता का?
३) तुमचे जीवन पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे हे बघून आभाराची भावना व्यक्त करता का?
४) तुमच्या जिवनाला बघून तुम्ही तक्रार, असमाधान, असुरक्षितता व्यक्त करता?
ह्या प्रश्नावरून आपल्या mindset ची स्थिती कळाली आणि आपला सध्याचा mindset बदलवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे सुध्दा आपण अगदी स्पष्टपणे सांगितला त्यामुळे आमचा माईंड सेट योग्य दिशेने नक्कीच बदलल्याशिवाय राहणार नाही. आपण पण ज्या प्रकारची नवीन नवीन माहिती दैनंदिन जीवनात मिळवतो त्याच प्रमाणे आपला माईंड सेट तयार होतो आणि तशीच कृती आपल्याकडून घडत असते. जर मिळवलेली माहिती आपल्या विकास पोषक असेल तर तशाच पद्धतीचा माईंड सेट तयार होऊन आपला विकास घडत असतो याउलट जर आपण मिळवलेली माहिती आपलं जीवन अधोगतीकडे घेऊन जाणार असेल तर माईंड सेट तशाच पद्धतीने काम करतो. चांगल्या विचारांचे संकलन हे ध्येयवादी सकारात्मक सहकारात माणसांच्या सानिध्यातून आणि उत्तम ग्रंथातून मिळते त्यामुळे अशा माणसांचा व ग्रंथांचा शोध घेणे आपलं काम आहे हे वरील ब्लॉगमधून कळालेला आहे.
चांगल्या दर्जाचा माईंड सेट हा चांगल्या दर्जाचे जीवन जगण्याचा लक्षण आहे त्यामुळे आपला माईंड सेट चांगला कशा पद्धतीने करता येईल यासाठी अधिकाधिक प्रयत्न करन गरजेचा आहे आणि हे करत असताना एका सकारात्मक, योग्य, माईंड सेट असणाऱ्या Mentor ची नितांत गरज असते आणि आम्हाला तुमच्यासारख्या मौल्यवान mentor च योग्य असं मार्गदर्शन लाभतंय ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. चांगला माईंड सेट बनवण्यासाठी तुमचा हा ब्लॉग जणू काही ऑक्सिजनच आहे. आपल्या हा ब्लॉग mindset बदलण्यासाठी खूपच उपायकारक आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि या विचाराच्या प्रेरणेतून मी माझा mindset बदलवणाराच
नमस्कार sir …
खूप विचार करायला लावणारा ब्लॉग आहे.. आपली मानसिकता आपल्या जीवनावर किती प्रभाव टाकते आज मला या ब्लॉग मधून शिकायला मिळाले.आपले विचार ज्या प्रकारचे असतात त्याच प्रकारच्या घटना आपल्या आयुष्यात घडतात. डबक्यात असलेलं पाणी स्वच्छ,आहे की गदुळ हे देखील आपल्या मानसिकते वर अवलबून आहे .. मानसिकता शुद्ध असली म्हणजे आजुबाजूच वातावरण देखील शुद्ध होत..छोट्या छोट्या गोष्टी आनंद घेतला की आयुष सुंदर आहे ही मानसिकता नक्कीच निर्माण होते.. आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली त्याचा त्रास आपल्याला होत करणं ती गोष्ट वाईट आहे हाच आपला mindset असतो..परतू तीच गोष्ट मनापासून आपण स्वीकार केला न सकारात्मक मानसिकता ठेवली तर नक्कीच आनंद मिळेल. .चांगली पुस्तकं आणि मार्गदर्शक मिळालं तर नकरामक गोष्टींना आळा नक्कीच बसतो..तुम्ही आमचे मार्गदर्शक नेहमीच असणार.. lifeshodh माध्यमातून लाईफ टाईम तुमच्या विचारांचा शोध नक्कीच घेऊ.. ब्लॉग वाचल्या नंतर खूप गोष्टीचा उलगडा होतो..नाईक कॉलेज ला असताना तुम्ही आमचे मार्गदर्शक झाले म्हणून आज मला lifeshodh family group सहभाग घेता आला.. तुमच्या विचारांची शिदोरी आम्हला आयुष्यात नक्कीच आनंदी आणि यशस्वी ठरवेल हाच माझ्या साठी माझा mindset आहे नेहमी असेल.
हा लेख/ ब्लॉग वाचून सध्या आपण कोणत्या पद्धतीचे जीवन जगत आहोत आणि ती जीवन कोणत्या कारणामुळे जगत आहोत या गोष्टीची उकल अगदी व्यवस्थित झालेली आहे. आपण जे काही फिजिकल ॲक्टिविटी करत असतो ते पूर्णतः आपल्या माईंड सेटवर अवलंबून असतात हे 1000% खर आहे. ज्या प्रकारचे आपण विचार करत असतो त्या विचारानुसार आपलं माईंड कृती करण्यास प्रवृत्त होतं आणि त्या पद्धतीचे काम आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो. मग ती विचार वाईट निगेटिव, असमाधानकारक आनंदापासून दूर जाणारी असतील तर आपलं जीवन सुद्धा तसंच ओसाड व्हायला लागते. या उलट जर आपण सकारात्मक, आनंददायी समाधान कारक ,विचारांचा शोध घेतला ते विचार आत्मसात केले तर आपला माईंड सेट सकारात्मकच तयार होईल आणि जीवनामध्ये आनंद सुख प्रचंड प्रमाणात येऊन जीवन अगदी प्रफुल्लित होईल.
या जगामध्ये हे सगळ्या गोष्टी मुबलक आहेत मग ते पैसा असेल किंवा ज्ञान असेल, आनंद असेल व अन्य कोणत्याही गोष्टी असतील च्या प्रचंड प्रमाणात आहेत परंतु त्या गोष्टी आपण किती घ्यायच्या हे आपल्या माईंड सेटवर अवलंबून असते.आणि ते सर्वांसाठी सारख्या प्रमाणात दिलेले आहेत. आणि ज्या लोकांचा माइंड सकारात्मक आहे ती लोक खरंच आयुष्यामध्ये या गोष्टी मुबलक घेत असतात आणि आपल्या जीवनाचे सार्थक करत असतात. या पृथ्वीतलावर आलेल्या प्रत्येक माणसाची इच्छा असते की आपलं जीवन भन्नाट असला पाहिजे त्यामध्ये प्रचंड असला पाहिजे आनंदाचा महासागर असला पाहिजे, सारखं सुख असलं पाहिजे. हे सर्व मिळवायचं कसं? हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो तो तर या प्रश्नाचं उत्तर मला या ब्लॉगमधून मिळालेला आहे. तुला माहित असेल शोधक वृत्ती चा असेल आणि ब्रँड विचाराचा असेल तर वरील सगळ्या गोष्टी आपल्याकडे आपोआप atract होत असतात. मग असा mindset तयार करायचा कसा? तो जन्मताच उपजत असतो का? अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तरे या ब्लॉग मधून अगदी सहज रित्या शिकायला मिळाले.
भन्नाट जीवन जगण्यासाठी भन्नाट माइंड सेट असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मग असा भन्नाट माइंड सेट तयार करण्यासाठी आपल्याला वेगवेगळी भन्नाट माहिती गोळा करणे अत्यंत गरजेचे आहे. आता या माहितीमध्ये सगळ्या गोष्टी पॉझिटिव असणार अत्यंत महत्त्वाची बाब आहे जर माहिती पॉझिटिव असेल , आपल्या मनाला आनंद देणारी असेल, आपल्याला यशाच्या मार्गावर धावायला लावणारी असेल तर निश्चितच आपलं जीवन यशस्वी मार्गाकडे वाटचाल करेल. यासाठी सगळ्या निगेटिव्ह गोष्टी टाळण्याची प्रचंड आवश्यकता आहे. ( Stop all negative feeding) . ह्या Negative feeding मार्गाने आपल्याला भेटत असतात ते मार्ग toatly बंद केली पाहिजेत . मग यामध्ये breaking news बघणं , negative माणसासोबत राहणे हे तात्काळ थांबवलं पाहिजे .
उत्तम mindset तयार करण्यासाठी ध्येयवादी माणसाची संगत हि सुद्धा तेवढीच मौलिक आहे .कारण माणूस संगतीतून जास्त शिकत असतो आणि जर संगतच चांगली , सकारात्मक विचाराची ाााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााा असेल तर आपला mindset हा योग्यच तयार होईल.
त्याचबरोबर चांगली ग्रंथ आणि योग्य Mentor ची भूमिका देखील आपल्या Mindset च्या जडणघडणीमध्ये अत्यंत उपयुक्त असते . चांगल्या पुस्तकातून चांगल्या विचारधारेचा शिरकाव आपल्या माईंड मध्ये होतो आणि माईंड मध्ये चांगले विचार आल्यानंतर त्या विचारांचे रुपांतर कृतीत होऊन त्यातून चांगलं कार्य आपल्या हातून घडते आणि आपलं जीवन आनंदाच्या मार्गाने धावू लागते. चांगले Mentor एखादी चूक घडण्याच्या ाआधीच ती सुधारतात त्यामुळे Mindset चुकांना accept च करत नाही .
या सर्व गोष्टीमुळे जिवनात खरंच सकारात्मक Mindset चा role किती मौल्यवान असतो हे कळलं आणि यातून नक्किच जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळणार ाआहे हे मात्र 100% खर आहे असे अत्यंत महत्वाचे विचार ाआमच्या पर्यन्त पोहचवल्या बद्दल सर, तुमचे मनापासून धन्यवाद.
I learned so many tremendous things from this blog are given below :
The gap between the life you want & the life you’re living is called MINDSET, FOCUS, CONSISTENCY.
“If you can do it today, do it today”
is a life – Changing Mindset.
The happiness of your life depends upon the QUALITY of your THOUGHTS.
So your MIND is your greatest Asset, therefore Be very careful what you put into your mind.
Because what consumes your mind,
CONTROLS your Life.
And Don’t blame the distractions (Media, Drama, Gossips, negativity, TV, News etc)
Just improve your Focus
Because your Mind is like a FACTORY.
The ingredients you’re putting into it will be used to make the final product – That’s your Life.
Everyone has ups and downs in their life.
फक्त त्याचा Criteria different असतो every person साठी so STOP saying why is this happening to me?
Just tell and say to your mind that
“what is this teaching me?”
And Train your Mind to see the POSITIVE
In every Situation.
Just Believe in your heart and soul that you’re CAPABLE of big things in your Life…,
Remove your walls
Allow yourself to venture outside your comfort zone.
Imagine what you could learn if you said yes to every BEAUTIFUL THING life has to offer.!
Trust your Instincts.
Follow your joy.
Say YES to new experiences.
ज्या प्रकारे iron ला कोणीच destroy करू शकत नाही पण त्याचा स्वतः चा rust करु शकतो अगदी त्याच प्रमाणे
No one can destroy you,
But your own MINDSET can!
म्हणून च अशा लोकांपासून Disconnect व्हा (जे तुम्हाला
बोलतात कि – You don’t deserve it
You should give up!
Why don’t you try something else or do something else?
You can’t do this blah blah blah etc.)
जे तुमची Growth थांबवतात, तुम्हाला तुमच्या goals पासून distract करण्याचा प्रयन्त करतात, तुम्हाला मागे खेचतात.
No matter how many UPS and DOWNs in your path of your Dreams.
Because problems are NOT STOP signs,
they are GUIDELINES.
Elon musk यांनी म्हटल्याप्रमाणे
I think it’s POSSIBLE for ordinary people to choose to be EXTRA ORDINARY.
For that :
You First have to believe that
You are BRAVER than you think,
You are TALENTED than you KNOW,
CAPABLE of more than you IMAGINE,
Be your own Support System,
Clap for yourself
Celebrate yourself
Do it for yourself…!
Thank you so much My Mentor Kumare Sir for writing this fabulous and tremendous blogs for us!
I think you’re like a Sponge Ball who absorbs all the negativities and always emits Beautiful positive vibes !
नमस्कार सर
ह्या ब्लॉग मधून mindset संदर्भात अनेक गोष्टी कळल्या . Mindset positive असणे खूप गरजेचे आहे. कारण आपल्या आयुष्यात घडलेल्या आणि घडणाऱ्या घटना ह्याचं mindset वर अवलंबून असतात. आणि हा mindset कसा बदलायचा हे ह्या ब्लॉग मधून समजले. पुढील गोष्टींमुळे आपण आपल्या आयुष्यात positive , creative , progressive mindset निर्माण करू शकतो.
१) नवीन माहिती गोळा करणे:- (Collection of New Information)
आपल्या mindset च्या development साठी नेहमी नवनवीन माहिती गोळा करत राहिले पाहिजे. नवीन गोष्टी शिकायला पाहिजे कारण नवीन गोष्टी शिकायला थांबले तर आपण poor mindset कडे जाऊ. जे लोक नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न करत असतात त्याचा विकास वेगाने होत असतो. त्यामुळे चांगल्या mindset साठी नेहमी नवीन गोष्टी exploer करत रहा.
२) सकारात्मक व मोठ्या ध्येयवादाने प्रेरित असलेल्या व्यक्तींच्या सानिध्यात राहणे- (Live with Big Goal Oriented and Positive People)
सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहून आपण आपला mindset improve करू शकतो. समजा एका वर्गात ५० मुले असतील तर त्या सगळ्या मुलांचा mindset सारखाच असेल असे नाही. पण जर आपण positive mindset असणार्या विद्यार्थ्यांच्या सोबत राहिलो तर आपला अभ्यासा कडे कल वाढेल पण जर आपण चुकीची संगत धरली तर आपण negative mindset develop करू. People has huge impact on our mindset so live with positive mindset people to create positive mindset.
३) उत्तम मार्गदर्शक आणि पुस्तकाच्या सानिध्यात राहणे. (Live with Great Mentors and Great Books)
Book has huge impact on your mindset. चांगल्या पुस्तकाच्या वाचनाने आपली growth होते आणि आपण ज्या प्रकारची पुस्तके वाचतो आपला mindset त्या प्रकारे तयार होतो. First you choose your book then your book will choose your future.
मार्गदर्शक आपल्यासाठी एक महत्त्वाची भूमिका निभावत असतो. तो आपल्या आयुष्याचं planning करण्यासाठी मदत करतो आणि ते planning अंमलात आणण्यासाठी मदत करतो. आपल्या चुका होण्या आधीच सावध करतात.
Thank you so much Sir for this amazing ideas to make our positive mindset
नाही जमणार, असा विचार करत बसण्यापेक्षा “करून पाहू” असा विचार करून केलेली सुरवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल, हे कुठेतरी वाचलेले एका विचारवंतांचे शब्द आठवले.
पण मग या भूतलावर यशस्वी लोकं इतके कमी का आहेत?शुन्यातुन साम्राज्य निर्माण करणार्या लोकांच्या मेंदुत असं नेमकं काय असतं की ते इतरांपेक्षा वेगळे असतात?
धीरुभाई अंबानी म्हटलं की काय आठवतं? – पैसा, प्रगती, झपाटलेपणा, संपत्ती!
तेच जेआरडी टाटा म्हटलं की – पैशासोबतच सचोटी, दानशुरपणा आणि मुल्यांची जपणुक!
स्टीव्ह जॉब्ज म्हणजे – गॅझेटच्या जगातली क्रांती!
तेंडूलकर किंवा धोनी म्हणजे शिस्त, प्रचंड आणि कठोर परिश्रम!
ह्या लोकांनी जगाला प्रभावित केलं ह्याचं कारण काय?
ह्या लोकांकडे असं काय वेगळं होतं,जे इतर लोकांकडे नव्हतं!
स्वतःवरचा ठाम विश्वास !
आयुष्यात आपल्यावर अनेकदा संकटं येतात. आपल्याला वाटतं की आपण त्यांचा सामना करण्यास समर्थ नाही. खरं तर आपल्या शरीरात दडलेल्या प्रचंड शक्तीचा, ऊर्जेचा आपण कधी योग्य प्रमाणात वापर केलेलाच नसतो !आत्मविश्वास वा त्याचा अभाव माणसाला यशाच्या शिखरावर पोहचवतो किंवा चारी मुंड्या चित करतो.म्हणून नेहमी स्वतःवर विश्वास असू द्या. आलेल्या प्रत्येक संधीकडे सकारात्मक दृष्टीनं पहा! मला हे जमणार नाही, अशी सुरवात करण्यापेक्षा मला प्रयत्न करायला आवडेल, असा दृष्टिकोन ठेवा. माझ्याकडे काय नाही हे न पाहता माझ्याकडे काय काय आहे? याचा विचार करा !
ज्याचा आत्मविश्वास सशक्त असतो, ती व्यक्ती आपल्या आयुष्यात चमत्कार घडवु शकते. असे कित्येक अविश्वसनीय चमत्कार आपण आपल्या आयुष्यात कित्येकदा अनुभवले असतीलच !
लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्युअलायझेशन, स्वसंमोहन, ऍफर्मेशन अशा अनेक पद्धती माणसाचा आत्मविश्वास सक्षम करण्यास उपयुक्त आहेत.
आपल्या आत्मविश्वासाला मजबुत करण्यासाठी,आपल्या स्वप्नांच्या पंखांना अतुट विश्वासाचं बळ देण्यासाठी, उत्तम जाणकार व अभ्यासु समुपदेशक मोठी मदत करू शकतात.
आपल्याकडे असलेल्या कोणत्या माहितीचे कृतीत रूपांतर करायचे आहे, हे तुमचे मार्गदर्शक सांगत असतात.मार्गदर्शक हे दिशादर्शक असतात. तुम्ही योग्य दिशेने जात आहात की नाही याची जाणीव करून देतात. मार्गदर्शक तुमच्या चुका होण्याआधीच त्या चुका कशा टाळायच्या हे शिकवत असतात आणि योग्य मार्गावर आणून उभे करतात. तुमच्यातील क्षमता आणि कमतरता यांचे मोजमाप कसे करायचे हे शिकवतात.जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देतात. जीवनाचा उद्देश, व्हीजन, व मिशन काय आहे हे समजून सांगतात व तसे जगायला लावतात.
Thank you,Sir!
नमस्कार सर
आज हा ब्लॉग वाचून एक जीवनाची वस्तुस्थिती काय आहे हे कळल्यास सारखं वाटतंय जीवनात काय महत्त्वाचा आहे आणि काय नाही ते या ब्लॉगमध्ये शिकायला भेटले खरंतर सर तुम्ही नेहमीच आम्हाला सांगत असतात की पुन्हा पुन्हा वाचन करून नवीन नवीन गोष्टी माहीत होतात निदर्शनास येतात आणि पुन्हा वाचून वाचन अजून काहीतरी नवीन शिकायला भेटते मला सांगायचं हेच होतं की मी हा ब्लॉग दुसऱ्यांदा वाचतोय आणि मला अजून नवीन गोष्टी शिकायला भेटले आणि अजूनही तिसऱ्यांदा वाचल्यावर अजून काहीतरी नक्कीच शिकायला भेटेल याची खात्री. असा हा लेख फार खोल विचार करून लिहिलेला आहे.
तर मला आज काय शिकायला भेटले मला यातून काय घेता आलं मी काय शिकलो हे मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो
आपले बाहेरील वातावरण हे आपल्या आतील वातावरणाला, आपल्या स्वभावाला घडवत असतं .आपले विचार कसे असणार आपली, वागणूक कशी असणार हे आपल्या संगती वर निरभ्र असतं हे ज्ञान फक्त पुस्तकी ज्ञान नसून हे ज्ञान हा अनुभव आहे आपल्या आपल्याला इंग्रजी भाषा शिकायला बोलायला अवघड जाते कारण आपल्याला तसे वातावरण नाही आपण मराठी भाषा उत्तम सर्वोत्तम बोलतो , विना चुकता बोलतो कारण आपलं लहानपणापासून मराठीमय वातावरण लाभले आहे. म्हणजे एक आपल्या दैनंदिन जीवनातील एक साधारण उदाहरणावरून समजते की बघा वातावरण आपल्यावर किती प्रभावी आहे.
या वातावरणाचा आपल्यावर एवढा परिणाम असतो की समाजात आपल्या अवतीभवती जे काही चालू असतं त्यानुसार आपली मनस्थिती बनते तशीच आपली मनस्थिती असते .
असे नाही की आजपर्यंत कोणी सांगितले नाही की संगत चांगली असावी पण आज नेमकं संगतीचे, बाहेरील वातावरणाचे काय महत्त्व असतं हे हा ब्लॉग वाचल्यानंतर कळलं आणि या ब्लॉगमधून हे शिकायला भेटलं की आपली स्वतःची मानसिकता कशा पद्धतीची आहे आपण जीवन कोणत्या मानसिकतेमधून जगत आहोत हेही समजलं.
आणि जीवन आपलं एकमेव आयुष्य आहे हे कोणत्या मानसिकतेने जगायचं कोणत्या पद्धतीने जगायला पाहिजे हेही समजलं .आणि आपण एवढं मानसिकता, मानसिकता बोलतोच मानसिकता म्हणजे काय याचाही अर्थ सोप्या पद्धतीने समजलात. मानसिकता म्हणजे आपल्या जीवनाकडे व समाजाकडे , जगाकडे बघण्याची आपली वृत्ती , आपला दृष्टिकोण म्हणजे माईंडसेट होय. आपण आपल्या जीवनाकडे कोणत्या दृष्टीने बघतो
आपल्या डोकयात बाहेरील वातावरणाचे आपल्याला काय मान्यता बनवल्या आहेत या सर्व गोष्टी म्हणजे मानसिकता होय आणि माईंडसेट् जीवनात एवढा महत्वाचा आहे की आपण जीवनात आज जिथे कुठे आहोत जे काही प्राप्त केलं आहे आपण जे काही करू शकू ती सर्व यशाची शिखरे गाठू जिथे कुठे पोहोचू हे सर्व आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते मग बघा की आपली मानसिकता किती महत्त्वाची आहे मग ही मानसिकता जर चुकीच्या पद्धतीची असेल तर किती मोठा वांध होईल. आयुष्याचा किती मोठा खेळ होईल. आयुष्य कोठे निघून जाईल याचा विचार करायला हवा.
जेवणात काही लोक खूप यशस्वी आहेत तर काही मात्र नाही याचा अर्थ माईड् सेट वर निर्भर आहे म्हणून मला तर माईंडसेट माझ्या जीवनात माझा माईंड सेट ग्रोथ माईंड सेट , लर्निंग माईंडसेट निर्माण करायचा आहे यासाठीची उपाययोजना या ब्लॉग मधून आपल्याला सरांनी सांगितलेली आहे आपल्या माईंड सेट कसा असावा आणि तो कसा निर्माण करावा हे यातून आपल्याला शिकायला भेटते
आपल्याला बाहेरील नकारात्मक गोष्टींपासून, चुकीच्या बातम्या पासून दूर राहायचे आहे जगातली जी गोष्ट आयुष्याला आयुष्याची रंग उतरवणारे बाब असेल त्यापासून दूर राहणे हेच एक हुशार व्यक्तीचे लक्षण आहे.
आपल्याला नेहमीच सकारात्मक व मोठ्या ध्येयवादाने प्रेरित असलेल्या व्यक्तीच्या सानिध्यात रहाणे. जेव्हा आपले वातावरण सकारात्मक असेल तेव्हा आपली मनस्थिती, आपला माईंड सेट योग्य असेल . चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात राहिलो तर आपली विचारसरणी त्यांच्या सारखी होते यात ती म्हण ही सांगितले आहे की ढवळ्याशेजारी पवळ्या यातून हे तर स्पष्ट सिद्ध होत होतं की आपण जीवनात किती यशस्वी होऊ शकतो. किती मोठे स्वप्न बघू हे वातावरणावर समाजावर संगती वर अवलंबून असतं
आणि मग प्रश्न पडतो की एवढी चांगली माणसं संगत आपल्याला भेटेल कुठे तर याचे उत्तर आहे म्हणतात की पुस्तके हे आपले खरे मित्र असतात आणि ते खरे आहे पुस्तके आपल्याला असे योग्य सकारात्मक वातावरण निर्माण करून देते असते तर त्यासाठी मार्गदर्शक हे खूप महत्त्वाचे आहे .पण मग जसे वेगवेगळे विचार सारणी चे लोक आहेत तसेच पुस्तके ही भरपूर आहेत तर योग्य पुस्तकांची निवड करणे महत्त्वाचे आहेत जीवनाच्या प्रवासात चालत असताना रस्ता चुकण्याची शक्यता हि खूप असते.
तर त्यासाठी मार्गदर्शक हे खूप महत्त्वाचे आहे मार्गदर्शकाचे महत्व जीवनात अनन्यसाधारण आहे आणि मार्गदर्शकही योग्य मार्गदर्शक असणे गरजेचे आहे चंद्रगुप्त मौर्य याला योग्य मार्गदर्शक आचार्य चाणक्य मिळाले म्हणून एवढे मोठे साम्राज्य निर्माण होऊ शकले तसेच सरांनी सांगितल्याप्रमाणे शकुनी सारख्या मार्गदर्शका मुळे महाभारत घडले म्हणून मार्गदर्शक आयुष्यात खूप महत्त्व ठेवतात.
आयुष्य हे खूप महत्त्वाचे आहे, खूप सुंदर आहे त्याच्यातील छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेता आला पाहिजे. घ्यायचा असेल तर जीवनातील मानसिकता, मार्गदर्शक, योग्य पुस्तके यांची संगत खूप महत्त्वाची असते आणि या ब्लॉगमधून जीवन कसे सकारात्मक, आनंद घेत जगण्यासाठीच सूत्र जणू सापडल्या सारखं झालं.
धन्यवाद सर .
नमस्कार सर,
जीवनात आपली मनोवृत्ती ( mindset) बदलणे/ पॉझिटिव्ह ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. कुठल्याही गोष्टीचा अर्थ आपल्या माईंडसेट वर डिपेंड असतो. माईंडसेट किंवा मानसिकता म्हणजे आपण आपल्या जीवनाकडे, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन होय. आणि आपली मानसिकता आपण जशी ठेवतो, त्याच प्रकारचे व्यक्तिमत्त्व बनत असते आणि तश्याच गोष्टी आपल्या life मध्ये घडत असतात.
त्यासाठी mindset नेहमी positive असावा.
यशस्वी जीवन जगण्यासाठी मानसिकतेची भूमिका खूप महत्त्वाची आहे.आणि चांगले जीवन जगण्यासाठी त्याला साजेल असा mindset तयार करावा लागेल. या ब्लॉग मध्ये तीन महत्वाची तत्वे दिलेले आहेत.
1) नवीन माहिती गोळा करणे.
आपण ज्या प्रकारची माहिती गोळा करतो त्याच प्रकारचा mindset तयार होत असतो. त्यासाठी आपल्याला महत्त्वाची असलेली माहिती गोळा करायला पाहिजे कारण Garbage in garbage out and Best in best out
2) सकारात्मक व मोठ्या ध्येयवादाने प्रेरित असलेले व्यक्तींच्या सान्निध्यात राहणे.
आपल्या आसपास असणाऱ्या लोकांचा प्रभाव आपल्यावर खूप असतो. त्यासाठी नेहमी पॉझिटिव mindset असलेल्या व्यक्तींसोबत राहायला पाहिजे.
3) उत्तम मार्गदर्शक आणि पुस्तकांच्या सान्निध्यात राहणे.
आपल्याला नेहमी प्रेरित ठेवण्याचं कार्य हे उत्तम मार्गदर्शक आणि चांगले पुस्तक करत असतात.
पुस्तकांचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव असतो. जसे आपण वाचन करतो तशीच आपली मानसिकता तयार होत असते.
उत्तम मार्गदर्शक हे वाईट परिस्थितीतही पॉझिटिव्ह राहायला शिकवतात, चांगले बघण्याची दृष्टी देतात.
आपल्या आसपास असे बरेच लोक आहेत जे सगळं काही असताना सुद्धा सतत कुरकुर करणारे, दुःखी असणारे, दोष उणीवा काढण्यात आपले आयुष्य घालणारे. अशा लोकांचा mindset negative असतो. पृथ्वीवर आपली शेवटची सहल आहे म्हणुन आपण पुरेपूर आनंद घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपली मानसिकता बदलण्याची खूप गरज आहे.
Thank you Sir…
सर आज या ब्लॉग मधून हे शिकायला मिळाल की जीवनात खरया अर्थांने यशस्वी होण्यासाठी आपल्या मानसिकतेची भुमिका खुप महत्वाची आणि बरोबर आहे करण आपण जर नेहमीच नकारात्मक विचार केला तर हे जीवन आपल्याला नकोस वाटेल आपल्याला आपल मनासारख व आपल्याला आवडणारे जीवन जगताच येणार नाही म्हणून जीवनात जर यशस्वी होयच असेल, आपल्याला आवडणारे जीवन जगायचे असेल तर चांगला माईंड सेट ठेवणे म्हणजेच सकारात्मक माईंड सेट ठेवणे गरजेचे आहे. कारण याच सकारात्मक माईंड सेट मुळे आपण जीवनात यशस्वी होऊ शकू, आपली ध्येय पूर्ण करु शकू त्यासाठी सर तुम्ही सांगितलेली तीन तत्त्वे आपण आत्मसात करणे गरजेचे आहे ती खलीलप्रमाणे:-
1) नविन माहीती गोळा करणे:- ही गोळा केलेली माहीती सकारत्मकच असली पाहिजे कारण या सकारात्मकतेच्या माहीतीवर आपला माईंड सेट तयार होणार असतो आणि या सकारात्मक माईंड सेट मुळे आपण घडू शकतो आपले विचार सकारात्मक होतात बाहेरचे वातवरण किती नकारात्मक असले तरी आपण याही परिस्थितीत आपल्याला हवे तसे जीवन जगू शकतो ते केवळ आणि केवळ सकारात्मक माईंड सेट मुळेच आणि हाच सकारात्मक माईंड सेट आपल्या जीवनला चांगला आकार देण्याचा प्रयत्न करेल म्हणून जशी माहीती तुम्ही गोळा कराल तसेच तुमचे विचार तयार होतील म्हणून सकारत्मक गोष्टींची आपण माहीती मिळवली पाहिजे आणि तशीच ती इतरांन पर्यंत ही पोहचवण्यचा प्रयन्त करा कारण कोणाला माहीती आहे तुमच्या त्या सकारत्मकतेच्या विचारमुळे एखाद्या निराशदाई व्यक्तीला जीवन पुन्हा नव्याने जगण्याची प्रेरणा मिळेल म्हणून चांगले विचार घ्या आणि तेच देण्याचा प्रयत्न करा.
2) सकारात्मक व मोठ्या ध्येवादाने प्रेरित असलेल्या व्यक्तीच्या सनिध्यात राहणे:- हे पण अगदी बरोबर आहे सर सकारात्मक व मोठ्या ध्येवादाने प्रेरित असलेल्या व्यक्तीच्या सनिध्यात रहाल तर तुमचे विचार त्याच प्रकारचे तयार होतील तुमची ध्येय पूर्ण करण्यासाठी या व्यक्तींचा हातभार खुप मोठा असेल हिच व्यक्ती तुम्हांला तुमच्या ध्येया पर्यंत तुमच्या यशस्वी जीवनकडे पोहचवू शकेल म्हणून या व्यक्ती आपल्या आयुष्यात खुप महत्वाच्या असनार आहेत.
3)उत्तम मार्गदर्शक आणि पुस्तकांच्या सनिध्यात राहणे:- कारण यांमुळे आपके विचार सुद्धा सकारत्मक होतात उत्तम मार्गदर्शक असेल तर ती व्यक्ती आपल्याला यशस्वी जीवनाकडे आपल्याला आवडणारया जीवनाकडे घेउन जाण्याचे काम ही व्यक्ती करते आणि ज्या प्रकारची आपण पुस्तके वाचतो तसेच आपले माईंड विचार करतो म्हणून सकारात्मकतेची भावना निर्माण करणारी पुस्तके वाचावीत.
सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जीवन life ही एक सहल आहे या पृथ्विसारख्या ठिकाणी आपण परत येऊ की नाही हे कोणालच माहीती नाही म्हणूनच जीवनाच्या या सहलिच्या प्रवासात आपण प्रत्येक गोष्टींचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे म्हणून माणसाने आपला माईंड सेट बदलने खुप गरजेचे आहे आणि तो माईंड सेट हा सकारत्मकच असला पाहिजे जेणेकरुन तुम्ही एक आनंदी, सुखी जीवन जगू शकाल.
Thank you so much sir
खरच खुप छान ब्लॉग होता आणि तुम्ही सांगितलेली ती तीन तत्वे मी नक्की आत्मसात करेल आणि सकारत्मक माईंड सेट तयार करेल.
आज पर्यंत बक्कळ वेळा Mindset हा शब्द ऐकलेला होता परंतु या शब्दाचा खोलवर अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न आत्तापर्यंत केलेला नव्हता आणि तशी जाणीवही निर्माण झाली नव्हती कोणी करून सुद्धा दिली होती परंतु हा भन्नाट लेख वाचून खरंच आपल्या जीवनामध्ये मानसिक तिची किंमत किती असते याची पुरेपूर जाणीव झालेली आहे.
आतापर्यंतचा माईंड सेट unusefull विचारांनी गंजलेला होता किंवा कोणीतरी त्या गंजाच्या प्रवाहात टाकून तो गंजवलेला होता आणि त्या गोष्टीची जाण तुमच्या या प्रभावशील लेखनातून आज झालेली आहे. प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्या जीवनात आपण खूप यशस्वी झाला पाहिजे ,आपल्याकडे प्रचंड पैसा असला पाहिजे, आपण जगातील पावरफूल व्यक्ती म्हणून ओळख झाली पाहिजे . हे सगळे उठा ठेवे पूर्ण करण्यासाठी आपली मानसिकता सुद्धा तेवढीच ताकद दार असणे आवश्यक आहे.
ही मानसिकता येते कुठून? पित तयार होण्याची प्रक्रिया काय आहे ? अशा प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मला Amit Ray सरांची “Mind is a flexible mirror, adjust it, to see a better world”. ही लाईन खूपच प्रभावशील वाटते . आपली मानसिकता ऊर्जादायी बनवण्यासाठी , आपण कोणत्या वातावरणात राहतो , आपण कोणत्या विचारात खेळत असतो हे खूप महत्त्वाचा आहे कारण आपण ज्या पद्धतीचे विचार करत असतो ते विचार आपल्या आसपासच्या वातावरणातून निर्माण होत असतात आपल्या आसपास असलेल्या गोष्टीवरून निर्माण होत असतात. आपण कोणत्या गोष्टीवर Attention देतो त्यातून तसेच विचार आपल्या माईंड मध्ये उगवतात आणि तसा आपला माईंड सेट तयार होत असतो आणि जसा माईंड सेट तसे आपले जीवन असते त्यामुळे Attention ही अत्यंत गरजेची बाब आहे. Attention Goes, Energy Flow , Think Grow .
शोधक वृत्तीची मानसिकता तयार करण्यासाठी, सकारात्मक बाबीच बीज मानसिकतेमध्ये पेरण्यासाठी तुम्ही सांगितलेली तीन रहस्य अगणित आहेत. आपल्या सुपीक माईंड सेटवर चांगली बाग फुलवण्यासाठी, सुगंधी फुलाच्या लागवडीसाठी दिलेल्या तीन तत्वे खूप फायदेमंद ठरतात. आपल्या या सुपीक माईंड सेटवर आत्तापर्यंत जी पेरणी झालेली आहे ती आपल्या आयुष्याच्या कितपत उपयोगाची आहे हे सध्या जगत असलेल्या जीवनावरून कळतच आहे ही पेरणी मोडून दुबार पेरणी करण्यासाठी आपण सांगितलेली बीज खूपच उपयुक्त आहेत.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये देवाणघेवाण करण्याचा वेग प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे परंतु या माहितीमध्ये जेवढी कामाची माहिती आहे त्यापेक्षा दुप्पट निगेटिव्ह माहितीचा बाजार भरलेला आहे त्या बाजारातून आपण कशी माहिती गोळा करतो त्यावर आपलं विचार करण्याची क्षमता तयार होत असते आणि त्यातून कृती होत असते आणि कृती निकालास पात्र असते. यशस्वी होण्याचा फण्डा च हे असतो की, वेगवेगळी सकारात्मक उपयोगी ज्यातून आपल्या ध्येयप्राप्तीचा कृतीला push करण्याची ताकद मिळते अशी माहिती गोळा करणं अत्यंत उपयोगी आहे. आज्या इंटरनेटमुळे अशा माहितीचा खजिना प्रचंड प्रमाणात प्रत्येकाजवळ कमी कष्टात उपलब्ध झालेला आहे परंतु त्या माहितीच्या या घराच दार उघडण्याची तयारी आपली असणे गरजेचे आहे. सकारात्मक माहितीच्या तुलनेत याची इंटरनेटच्या माध्यमावर Viral गोष्टी फार वेगाने आपलं वर्चस्व पसरवत आहेत. आशा Viral गोष्टीतून निगेटिव्हिटी ची घुसखोरी आपल्या माइंड मध्ये होते आणि माईंड सेट त्याच विचाराचा बनून अशा पद्धतीच्या हरकती आपल्या हातातून होत असतात. मग हे तात्काळ थांबवन यशस्वी जीवनासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि अश्या ह्या Negative feeding पासून दूर राहण्यासाठी टीव्ही चॅनल्स युट्युब न्युज पेपर टाळने फायद्याचा ठरेल.
जगामध्ये अगदी मोजकीच लोक यशस्वी होण्यामागे हेच कारण आहे की ते पॉझिटिव्ह माहितीचे संकलन करत असतात आणि त्यातून ॲक्शन ची निर्मिती होत असते when we take action then produce result and when produce positive result then get success. त्यामुळे जशा माहितीची पेरणी माईंड मध्ये कराल तशाच पद्धतीची कापणी हाती येईल. जर पेरणी यशस्वी जीवनास पूरक असेल तर कापणी सुद्धा यशाची होईल आणि जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही.
आपला Future ठरवण्या मागे आपल्या संगती चा खूप मोठा वाटा असतो. मी लहान असताना घरी आईवडील सांगायचे की , ” त्या खालच्या गल्लीतल्या विक्या ( विकास) संग राहू नको त्या पोराचे गुण चांगलें नाहीत ” पण त्यावेळी या बाबीचा खोलवर अर्थ समजला नाही खरंच आयुष्याच्या जडणघडणीमध्ये संगत खूपच महत्त्वाचे असते. ज्या लोकांमध्ये आपण वावरत असतो त्यांच्यासोबत आपल्या विचारांची देवाण-घेवाण होते आणि त्यातून त्या पद्धतीचा माईंड सेट तयार होत असतो म्हणून जर आपल्या सोबत राहणारे लोक पॉझिटिव्ह , मोठ्या धेयाची असतील तर आपला माईंड सेट सुद्धा तसाच grow होईल आणि Sucess आपल्याला खूप जवळ वाटेल.
ज्या गोष्टींमुळे आयुष्याचा गाडा अगदी ट्रॅक नुसार बरोबर Sucess चां मार्ग धरून चालत असतो ती गोष्ट किंवा व्यक्ती प्रत्येकाच्या यशस्वी जीवनाच एक रहस्य असते. जीवनाच्या या प्रवासामध्ये मार्गदर्शकांचा वाटा अत्यंत मोलाचा आणि गरजेचा सुद्धा असतो. या बाबीसाठी इतिहास सुद्धा साक्षी आहे. जगामध्ये आत्तापर्यंत जेवढे ही मोठे मोठे व्यक्ती होऊन गेले त्यांच्या जीवनामध्ये एक योग्य ,ऊर्जा दायक , प्रोग्रेसिव Mentor लाभलेले होते. आपल्याकडे प्रचंड प्रमाण यशस्वी होण्यासाठी शक्ती असते, प्रत्येकाकडे वेगवेगळे कौशल्य असते परंतु त्या कौशल्याचा वापर कोणत्या मार्गाने करावे आणि कसे करावे यासाठी जीवनात मार्गदर्शक आवश्यक आहे. मार्गदर्शक आपला हात धरून सक्सेस पर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतात . योग्य आणि यशस्वी जीवनाचा पूरक मानसिकता तयार करण्यासाठी त्या मानसिकतेला खतपाणी घालण्यासाठी मार्गदर्शकाकडे वेगवेगळे जुगाड असत कारण त्यांनी आपल्या आधीच हा रस्ता चाललेला असतो. त्यामुळे जीवनात मार्गदर्शकाचा वाटा अगदी मौलिक आहे .
भन्नाट मार्गदर्शक, लाईफ changing books , positive people जर आपल्याला जोडता आले तर आपली मानसिकता यशासाठी भन्नाट प्रकारची असेल आणि त्यातून सक्सेसफुल माइंड सेट तयार होतो आणि जसा माईंड सेट तसे आपले जीवन असते म्हणजेच जर माइंड सेंड यशस्वी जीवनाचा असेल आनंद मिळवण्याचा असेल प्रत्येक गोष्टी मध्ये काहीतरी शोधण्याचा असेल प्रत्येक गोष्टीतून सकारात्मक बाब घेण्याचा असेल तर नक्कीच आपण Sucess कडे नाही तर Sucess आपल्याकडे धावत येईल. आणि अशीच योग्य मानसिकता तुम्ही आमच्यामध्ये तयार करत आहात हे या ब्लॉग मधून कळलं त्यामुळे Heartly thanks Sir
अतिशय आनंददायक ब्लोग आहे सर जीवनात यश आणि अपयश या दोन मार्गावर अतिशय सुंदर प्रकारे मार्गदर्शन आणि mind set याची भूमिका खरे तर सर ब्लॉग मधून खूप काही नवीन शिकायला मिळालं जीवनात कोणत्या व्यक्ती बरोबर राहायचं कसं वागायचं हे कळते जीवन आनंददायी होण्यासाठी काय करावे हे तीन तत्वाच्या सहाय्याने समजले त्यात उदाहरणात दिलेली सर आपली शाळेची सहल आमच्या सोबत केस उघडलेला आहे सर आणि शेवटचे ते वाक्य आपण पृथ्वीवर एकदा सहलीसाठी आलेलो आहे यानंतर आपण कधीच येणार नाही हे मनावर एक वेगळाच परिणाम करतो सरपद्धतीचे जीवन जगत आहोत आणि ती जीवन कोणत्या कारणामुळे जगत आहोत या गोष्टीची उकल अगदी व्यवस्थित झालेली आहे. आपण जे काही फिजिकल ॲक्टिविटी करत असतो ते पूर्णतः आपल्या माईंड सेटवर अवलंबून असतात हे 1000% खर आहे. ज्या प्रकारचे आपण विचार करत असतो त्या विचारानुसार आपलं माईंड कृती करण्यास प्रवृत्त होतं आणि त्या पद्धतीचे काम आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो. मग ती विचार वाईट निगेटिव, असमाधानकारक आनंदापासून दूर जाणारी असतील तर आपलं जीवन सुद्धा तसंच ओसाड व्हायला लागते. या उलट जर आपण सकारात्मक, आनंददायी समाधान कारक ,विचारांचा शोध घेतला ते विचार आत्मसात केले तर आपला माईंड सेट सकारात्मकच तयार होईल आणि जीवनामध्ये आनंद सुख प्रचंड प्रमाणात येऊन जीवन अगदी प्रफुल्लित होईल.
या जगामध्ये हे सगळ्या गोष्टी मुबलक आहेत मग ते पैसा असेल किंवा ज्ञान असेल, आनंद असेल व अन्य कोणत्याही गोष्टी असतील च्या प्रचंड प्रमाणात आहेत परंतु त्या गोष्टी आपण किती घ्यायच्या हे आपल्या माईंड सेटवर अवलंबून असते.आणि ते सर्वांसाठी सारख्या प्रमाणात दिलेले आहेत. आणि ज्या लोकांचा माइंड सकारात्मक आहे ती लोक खरंच आयुष्यामध्ये या गोष्टी मुबलक घेत असतात आणि आपल्या जीवनाचे सार्थक करत असतात. या पृथ्वीतलावर आलेल्या प्रत्येक माणसाची इच्छा असते की आपलं जीवन भन्नाट असला पाहिजे त्यामध्ये प्रचंड असला पाहिजे आनंदाचा महासागर असला पाहिजे, सारखं सुख असलं पाहिजे. हे सर्व मिळवायचं कसं? हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो तो तर या प्रश्नाचं उत्तर मला या ब्लॉगमधून मिळालेला आहे. तुला माहित असेल शोधक वृत्ती चा असेल आणि ब्रँड विचाराचा असेल तर वरील सगळ्या गोष्टी आपल्याकडे आपोआप atract होत असतात.
नमस्कार सर……
Mind blowing !
आपली माणसिकता आपल्या जिवनामधे कशा प्रकारचे कार्य करते हे हा Blog वाचल्यानंतर समजले.
ज्या प्रकारचा विचार आपण करतो त्याच प्रमाणे आपली प्रगती होत असते.जीवनामधे यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो आहे मी नेहमी ऐकत होतो पण तो दृष्टिकोन किंवा मानसिकता कशी निर्माण करायची ते हा Blog वाचल्यानंतर समजले.ते पुढीलप्रमाणे..
१) नवीन माहिती गोळा करणे.
नियमित नवीन माहिती गोळा केल्याने आपल्या ज्ञानामधये भर पडते आणि आपण जी माहिती गोळा केली त्या प्रमाणेच विचार करतो.
२) सकारात्मक दृष्टिकोन व मोठ्या ध्येयवादाने प्रेरित असलेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहने.
३) उत्तम मार्गदर्शक आणि पुस्तकाच्या सानिध्यात राहणे
उत्तम मार्गदर्शक नेहमी आपल्याला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतो आणि आपल्यामधील सुप्त गुणांना वाव देण्याचे काम करतो, त्याच प्रमाणे ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचल्याने आपण त्यांच्या विचारांच्या जवळ जातो त्यामुळे आपण नेहमी उत्तम मार्गदर्शक आणि पुस्तकाच्या सानिध्यात राहिले पाहिजे.
Thank you so much sir for your precious thought.
नमस्कार सर…!,
खूप अप्रतिम ब्लॉग लिहिलाय सर.प्रत्येकाच्या आयुष्यात मानसिकतेचे खूप महत्त्व आहे.आणि ही मानसिकता जशी असेल तसं माणसाच आयुष्य घडत असत.ही मानसिकता कशी असावी किंवा कशी तयार करावी जेणे करून जीवनात यशस्वी होता येईल.ह्या साठीच्या तुम्ही सांगितलेल्या स्टेप्स नक्कीच फायदेशीर ठरतील..!
अश्या प्रेरणादायी ब्लॉगसाठी खूप खूप धन्यवाद सर…!
आपल्या जीवनात जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपला mindset positive असायला हवा.जी माणसे सतत स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल positive बोलतात किंवा विचार करतात;त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व प्रभावित करणारे असते.अशी माणसे नेहमी स्वत:ला आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आनंद देतात.सकारात्मक विचारसरणीमुळे त्यांच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असतो.
माणसांवर संगतीचा खूप मोठा परिणाम होत असतो.तुम्ही ज्या संगतीमधे राहता त्याप्रमाणे तुमचे विचार असतात.चागंल्या विचारांच्या माणसांची संगत जाणिवपूर्वक मिळवावी लागते.उलट वाईट व नकारात्मक विचारांची माणसे आपोआप तुमच्या जवळ येतात.यासाठी जाणिवपूर्वक सकारात्मक विचार करणारया लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करायचा असतो.
जगातील अनेक महान व्यक्तिमत्व ही त्यांच्या सकारात्मक विचारांमुळे जीवनात यशस्वी झालेले आहेत. अशा लोकांच्या अनुभवातून लिहलेल्या पुस्तकांच्या वाचनाने नक्कीच प्रेरणा मिळते.शिवाय त्यातून आपल्या विचारांना नवीन दिशा मिळतात.दुसरयाच्या अनूभवातून शिकल्याचा माणसाला नेहमीच फायदा होतो.
Sir,तुम्ही सांगितलेले 3 बहुमुल्य नियम जर आम्ही आमच्या जीवनात लागू केले आम्ही नक्कीच यशस्वी होऊ.
Thank you,sir!
”when you succeed in keeping happy mindset then you will success in every moment” !
एका मंदिरात एक घंटा वाजवणारा होता . अचानक त्या मंदिराचे ट्रस्टी बदलतात. या मंदिरात देश – विदेशातल्या भक्त येत असल्याने ट्रस्टीनी तिथे काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी येणं आवश्यक असल्याच सांगून घंटा वाजवनाऱ्यालाही ते बंधनकारक केलं . मात्र त्याला ते जमलं नाही त्याने ती नोकरी सोडली आणि पोटापाण्यासाठी काही करावं , म्हणून त्यानं मंदिराच्या बाहेर चहाची एक टपरी टाकली .बघता -बघता ती चांगली चालू लागली. मग त्याने तिथेच छोट हॉटेल काढलं. पुढे त्याचंच मोठं हॉटेल झालं. त्याचा या व्यवसायात चांगलाच जम बसला. मग त्याने आणखी चार – पाच हॉटेल्स काढली. पुढे 5 स्टार हॉटेल उभारलं . त्याच्या त्या भव्य 5 स्टार हॉटेलमध्ये विदेशी लोक उतरू लागले . त्या हॉटेलच्या व्यवस्थेवर
खूश होऊन काही विदेशी पर्यटकांनी त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तो त्यांना भेटला. त्यांच्याशी बोलला पण मराठीत! कुणीतरी त्याला विचारलं , तुम्ही एवढ्या मोठ्या 5 स्टार हॉटेल चे मालक. पण आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही. आपण इंग्रजी शिकला नाहीत का? तेव्हा तो हसत म्हणाला, इंग्रजी शिकलो असतो ,तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो . या छोट्याशा गोष्टीमधून काय शिकलो तर , यशस्वी माणसं ही बुद्धीमान असतात ते लगेच action घेतात आणि ते धाडसाने निर्णय घेऊन पुढे चालू लागतात आणि म्हणून ते आयुष्यात यशस्वी होतात.
दुसर म्हणजे काही लोक यशस्वी होत नाही याचं कारण म्हणजे त्यांची वागणूक . ते स्वतःलाच बोलत राहतात की हे मला जमणार नाही , त्यांची कारण हीच की आज time नाही उद्या करू आजच काम उद्या ढकळणार व्यक्ती कसा यशस्वी होऊ शकतो , त्याचे नकारात्मक विचारच त्यांना गिळतात , या अश्या भरपूर गोष्टी काहीना यशस्वी होण्यास थांबवतात .
यशस्वी होण्याच्या मार्गावर सगळ्यात महत्वाचे असतात ते म्हणजे मार्गदर्शक.मार्गदर्शक हे दिशादर्शक असतात. तुम्ही योग्य दिशेने जात आहात की नाही याची जाणीव करून देतात. मार्गदर्शक तुमच्या चुका होण्याआधीच त्या चुका कशा टाळायच्या हे शिकवत असतात आणि योग्य मार्गावर आणून उभे करतात. तुमच्यातील क्षमता आणि कमतरता यांचे मोजमाप कसे करायचे हे शिकवतात.जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देतात. जीवनाचा उद्देश, व्हीजन, व मिशन काय आहे हे समजून सांगतात व तसे जगायला लावतात.
खरच खुप छान ब्लॉग होता आणि तुम्ही सांगितलेली ती तीन तत्वे मी नक्की आत्मसात करेल आणि सकारात्मक माईंड सेट तयार करेल.
Thank you,Sir!
Mindset
आपण सध्या जे काय आहोत, ते आपण मागच्या दोन तीन वर्षा पूर्वी तयार केलेल्या माईंड नुसार आपले सध्याचे जीवन असेल. एखादी ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी मानसिकतेची भूमिका अत्यंत महत्त्वाचे असते. जसा विचार आपण करत असतो अगदी तशीच हरकत आपल्यापासून होत असते. त्यामुळे ज्या प्रकारची आपली मानसिकता असेल तसंच आपलं माईंड कृती करत असतं आणि तसे रिझल्ट आपल्या आयुष्यात यायला लागतात. कुठल्या क्षेत्रामध्ये संपादित करण्यासाठी त्या क्षेत्रातील साजेसा Mindset असणे अत्यंत गरजेचे आहे. आपलं माईंड Flexible आहे आपण जसे दिशा आपल्या mind ला द्याल अशा प्रकारची मानसिकता आपल्यामधील तयार होत असते आणि त्यात अशी कृती आपल्याकडून घडत असते आणि रिझल्ट सुद्धा तशाच पद्धतीने येत असतात. त्यामुळे जीवनामध्ये खरच काही मिळवायचे असेल उत्तुंग भरारी घ्यायची असेल असामान्य म्हणून जगायचं असेल तर आपला माईंड set growth Mindset, open Mindset. Learn करणारा Mindset तयार करणे अत्यंत गरजेची बाब आहे.
मग असा Mindset कसा तयार करायचा? Mindset च महत्व सांगणारे खूप सारे पुस्तक उपलब्ध आहेत, अनेक व्हिडिओच्या माध्यमातून अनेक मोठ्या व्यक्ती माईंड सेट चे महत्त्व सांगतात परंतु यशाला पूरक माइंड सेट कसा तयार करायचा आणि तयार करण्यासाठी कोणत्या बाबी आपल्याला आवश्यक आहेत या प्रश्नांची उलगडा अगदी मोजक्याच व्यक्ती करतात आणि त्यातली अति महत्त्वाची व्यक्ती तुम्ही आहात की जे यशस्वी जीवनासाठी मानसिकता काय असते? मानसिक तिची भूमिका आपल्या जीवनात कसा रोल प्ले करत असते हे सांगून त्याच बरोबर यश संपादन करण्यासाठी कसा . Mindset आपल्याला आवश्यक आहे आणि तो माणसे तयार करण्यासाठी कोणत्या सूत्रांचा वापर करावा लागतो हे अगदी सखोलपणे आणि सहजरीत्या आमच्या माइंड मध्ये पेरून तसा आमचा माईंड सेट तुम्ही तयार करत आहात आमच्यासाठी अत्यंत फायद्याची गोष्ट आहे.
आपल्या जीवनाचा उद्देश प्राप्त करण्यासाठी आपण बघितलेल्या स्वप्नपूर्तीसाठी असा पूरक माइंड set तयार करण्यासाठी नवीन माहिती गोळा करणे खरंच अत्यंत उपयुक्त आहे. जशी माहिती आपण गोळा कराल तसे विचार आपल्या माईंड मध्ये घर करत असतात आणि त्यातून जसे विचार तशी कृती असते त्यामुळे आयुष्यात काहीतरी गाठण्यासाठी आणि उंच भरारी घेण्यासाठी आपल्याला आपल्या क्षेत्रातील सकारात्मक माहिती गोळा करण्याची नितांत गरज आहे. आज सगळीकडे माहितीचा बाजार प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. सोशल मीडिया इंटरनेट यांच्या माध्यमातून आपल्याला भरघोस माहिती मिळत आहे परंतु या माहितीचा जर विचार केला तर आपल्याला energy देणारी माहिती, आपला योग्य माईंड सेट तयार करणारी माहिती अगदी काही प्रमाणात आहे आणि नको असलेल्या माहितीचा ढीग आपल्याकडे भरपूर आहे म्हणून जी आपल्याला आवश्यक आहे अशा माहितीचा शोध घेण्याची गरज आहे त्याचबरोबर आपल्या आयुष्यात पुस्तकांचा वाटा खूप मोठा असतो आपण जशी पुस्तक वाचतो तशी विचार आपल्या मध्ये येत असतात आणि आपला माईंड फ्लेक्झिबल असल्यामुळे त्या विविचारांना aceept करतो आणि तशी रिजल्ट आपल्या आयुष्यात दिसतात. त्यामुळे निगेटिव माहिती , ज्यातून आपली एनर्जी आपल्याला नको असलेल्या गोष्टीकडे flow होते ती तात्काळ थांबवण्याची गरज आहे आणि हे थांबवण्यासाठी आपल्याला viral गोष्टी थांबवाव्यां लागतील.
त्याचबरोबर आपण ज्या गोष्टींमधून सर्वात फास्ट शिकत असतो ती गोष्ट म्हणजे आपली संगत. आपण ज्या व्यक्ती सोबत असतो ज्या माणसांसोबत आपली मैत्री असते ज्यांच्या सोबत आपल्या विचारांची देवाण-घेवाण होत असते अशा माणसाची भूमिका आपला माईंड सेट तयार करण्यात भरपूर प्रमाणात असते. जर आपण आपल्या विचारांना मान्यता देणाऱ्या आपल्या विचारांना पाठिंबा देऊन त्यावर योग्य दिशेने मार्गदर्शन करणाऱ्या आणि positive लोकांसोबत मैत्री केली तर त्यातून तसा माईंड सेट आपला तयार होईल आणि यश मिळवण्यासाठी ही गोष्ट गरजेची आहे.
आपल्या जीवनातल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये जर विकसित व्हायचा असेल तर कसा माईंड सेट विकसित करणे तर गरजेच आहे परंतु तू mindset विकासित करण्यासाठी आपल्या सुपीक mindset सेटवर चांगल्या विचारांची पेरणी करण्यासाठी आणि तसा परफेक्ट mindset बनवण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी एखादी प्रोग्रेसिव व्यक्ती असणे खूप गरजेचे आहे. मार्गदर्शक आपल्याला त्या गोष्टीबद्दल फक्त सांगत नसतात तर ते आपल्याकडून प्रत्यक्षात करून घेतात. त्या आपल्याला Action mode वर आणतात आणि त्यासाठी direction योग्य देत असतात. जर आपल्या या कृतीला योग्य दिशा मिळाली आणि त्यामध्ये वेग प्राप्त झाली तर यश मिळवणे हे आपल्यासाठी अतिश easy होईल म्हणून मार्गदर्शक जीवनात महत्त्वाचे असतात.
यशस्वी जीवनाच्या पेरणीसाठी भुसभुशीत mindset कसा तयार करावा याची सर्व सूत्रे अगदी सहज रित्या सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद, आम्हाला आमच्या जीवनातील संपादित करण्यासाठी योग्य माणसे तयार करण्यासाठी हा ब्लॉग खूप महत्त्वाचा रोल प्ले करेल.
जो जिता वही सिकंदर..
इथं प्रत्येकाला जिंकावे वाटते. त्यासाठी तो अविरत प्रयत्न करीत असतो. कारण जिंकणा-याला नाव, यश, पैसा,सन्मान इ. गोष्टी प्राप्त होतात.जगात पहिल्याला महत्व आहे. इथे दुसरा, तिसरा येणारा सामान्य होतात.असामान्य पहिलाच असतो. त्यात या स्पर्धायुग वाढल्यामुळे जिंकणाराच ग्रेट समजला गेला. म्हणून तर जो जिता तो सिकंदर असे म्हणतात.
आता महत्वाचे हे आहे तुम्ही कुणाविरुदध जिंकणार आहात.तुम्ही कुणाला हरवणार आहात. तुमची लढाई कोणासोबत आहे. त्यावरुन तुमच्या जिंकण्याला अर्थ आहे. तुमचे पराजित शत्रू तुमच्या विजयाची पताका उंचावतात.उदा. समजा तुम्हांला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचे आहे. ही लढाई तुम्हाला या आयुष्यात जिंकायची आहे.सुदैवाने आणि तुमच्या अथक परिश्रमातुन तुम्ही ही लढाई जिंकली.परंतु दुसऱ्या बाजुला तुम्ही तर केवळ भारतातील इतर सर्व श्रीमंत व्यक्तींना मागे टाकीत पराजित केले आहे.परंतु जगातील सर्वात श्रीमंतासमोर तुम्ही आतासुदधा हरलेलेच आहात. आता परत या वर्षामध्ये तुम्ही भारतातले श्रीमंत व्यक्ती असाल..पुढील पाच वर्षांने तुम्ही दुसरे किंवा तिसरे असाल म्हणजे सामान्य असाल..कारण आपल्याकडे जो जिता वही सिकंदर हा फार्मुला चालतो..म्हणून
तुमची लढाई कुणाविरुदध आहे हेच तुमच्या जिंकण्याला अर्थ देते…
कारण जगजेत्ता सिकंदर सुदधा शेवटी मृत्यू समोर पराजित झाला होता..त्याला मृत्यूला जिंकता आले नाही म्हणून त्याने आपली अंतयात्रेत आपले दोन्ही हात रिकामे ठेवले होते..कारण यहांपर खाली हाथ आना खाली हाथ जाना है. हे त्याला जगजेत्ता झाल्यानंतरच समजले होते.
जग खवळलेल्या सागरासारखे आहे. इथं आपण आपली जीवननौका घेऊन किनाऱ्याकडे निघालो आहोत.यात क्षणाक्षणाला नवीन लाट उसळत असते.कितीतरी उंच उंच लाटा तुमच्या जीवननौकेला पाठीमागे लाथाडत असतात. आपण यामध्ये कधी मागे होतो. कधी त्यावर स्वार होऊन पुढे होतो. म्हणजे कधी जिंकतो कधी हारतो . हेच यातुनच आपण शिकतो. ..हेच आपले आयुष्याचे सार आहे… तुम्ही विचारता की, या सागरात जीवननौका घेऊन त्या लाटांवर स्वार व्हायला शिकायचे महत्त्वाचे आहे की, बाकीचे आपल्यासारखेच असेच अनेकजण जवळचे, दूरचे (आप्त,नातेवाईक , मित्र, शत्रू इ ) जीवननौका हाकत निघालेल्यांना मागे टाकून आपण जिंकत जिंकत पुढे जायचे…?
जिंकणे आणि शिकणे यामध्ये स्वतःचे रोजचे जगणे विसरु नये. आपल्या सुंदर, निर्मळ जगण्याला कसे जिंकावे हे जर जिंकता जिंकता आपणांस शिकता आले, तर तुमच्या आयुष्याचे पान सुवर्णपान बनेल.असे मला वाटते…
स्वतःला कसे जिंकावे हेच रोज आपण थोडे थोडे शिकावे.हे माझ्यासाठी महत्वाचे आहे.
Excellent blog, Sir
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानसिकतेची काय भूमिका असते हे खूप छान पद्धतीने समजून सांगितले.
यशस्वी जीवनाचा तिसरा नियम –
जीवनामध्ये mindset निर्माण करन हे आपल्या हातात असत.आपला mindset जसा निर्माण कराल तशी आपली personality बनत जाणार आणि त्याच प्रकारचा आकार आपल्या जीवनाला प्राप्त होणार.
आपल्याला जस जीवन जगायचं आहे तसा mindset तयार करावा लागेल त्यासाठीची 3 तत्त्व पुढीलप्रमाणे-
1.नवीन माहिती गोळा करणे – गोळा केलेल्या माहितीतून आपल्या विचारांची क्वालिटी तयार होत असते आणि त्यातून आपला माईंडसेट तयार होत असतो.
आपल्याला Best in, Best Out. या तत्वाचा अवलंब करून चांगली माहिती/ज्ञान गोळा करण्याची स्वतःला सवय लावणे गरजेचे आहे.
2.सकारात्मक व मोठ्या ध्येयवादाने प्रेरित असलेल्या व्यक्तींच्या सानिध्यात राहणे.
3. उत्तम मार्गदर्शक आणि पुस्तकाच्या सानिध्यात राहणे.
हे जे मानवी जीवन आपल्याला मिळाले आहे त्याचा पूर्णपणे आनंद घ्यायचा असेल, तर सकारात्मक मानसिकतेशिवाय निर्माण केली पाहिजे
या ब्लॉग कळलं की आपला mindset कसा प्रकारचा आहे आणि तो change करण्यासाठी आपण काय केले पाहिजे.हा ब्लॉग लिहण्यासाठी Thank you so much , Sir
यशस्वी होण्याची कल्पना ही अतिशय व्यक्तीसापेक्ष असते. यशस्वी व्ह्यायचे म्हणजे नक्की काय किंवा कशात हे आधी ज्याचे त्याने ठरवावे. आपण जीवनातील विविध क्षेत्रांत यशस्वी होऊ शकतो मग ते तुमची नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध,एखादी परीक्षा अथवा एखादा स्वप्नवत जॉब मिळवणे यापैकी काहीही असू शकते. कुणासाठी यशस्वी होणे म्हणजे अध्यात्मात उच्च शिखर गाठणे असु शकते तर कुणासाठी ते आरोग्यदायी जीवनशैली जगु शकणे असु शकते.
“ The great danger for most of us lies not in setting our aim too high and falling short; but in setting our aim too low, and achieving our mark.”
बहुतांश लोक आपली स्वप्न बाजूला ठेऊन काहीतरी सोपे आणि व्यवहार्य असे काम करण्यात धन्यता मानतात. यातून आपल्याला ही शिकवण मिळते की, आपली महत्वाकांक्षा विसरून अल्पसंतुष्ट वृत्तीचा स्वीकार कराल तर यशस्वी होणे हे केवळ स्वप्नच बनून राहील. मोठा विचार करा, त्यावर कार्य करा. अनेक संकटे येतील परंतु त्या विचाराशी प्रामाणिक रहा. यश हे तुमचेच असेल.
अशी गोष्ट शोधा जी करण्यात तुम्हाला आनंद मिळतो आणि तिच्यावर सातत्यपूर्ण कार्य करा!
स्टीव जॉब्स एकदा म्हणाले होते ,
“ I have looked in the mirror every morning and asked myself: ‘ if today is the last day of my life, would I want to do what I am about to do today?’ And whenever the answer has been ‘No’ for too many days in a row, I know I need to change something. ”
काही जणांना वाटू शकते की अभ्यासात दिवस आणि रात्रीचे तास खर्चून अथक परिश्रमातून ते यशस्वी होतील. ते हे सर्व करून सरतेशेवटी यशस्वी होतीलही परंतु हे सर्व मिळवताना त्यांनी आराम, आरोग्य, परिवार स्वास्थ्य रुपात एक मोठी किंमत मोजलेली असते.
आरोग्य, समाज आणि कुटुंब याकडे लक्ष देताना जर आपल्या करिअर कडे दुर्लक्ष होऊन बसले तर यशस्वी होणे ही एक इच्छाच बनून राहील.
याचा अर्थ सर्व घटकांना एकसमान महत्व देऊन जीवनात समतोल साधुन खऱ्या अर्थाने यशस्वी होणे हे गरजेचे आहे.
Failure is simply the opportunity to begin again, this time more intelligently.”
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्याबद्दल एक कथा सदैव ऐकायला मिळते. त्यानुसार असे सांगितले जाते की त्यांनी बल्बचा शोध लावला खरा परंतु यामागे हजारो अयशस्वी प्रयत्न होते. याचाच आधार घेऊन एकदा एका मुलाखतीत त्यांना प्रश्न करण्यात आला. मुलाखतकाराने एडिसन यांना विचारले की,
“How do you feel after all of your failed attempts?”
त्यावर त्यांचा प्रतिसाद हा अतिशय मार्मिक होता, ते म्हणाले,
“I didn’t fail, I learned hundreds of ways not to invent the lightbulb.”
एडिसन यांनी आलेल्या प्रत्येक अपयशास एक धडा म्हणून पाहिले. प्रत्येक अपयशातून त्यांनी काय करू नये आणि काय करणे अनिवार्य आहे याचा पाठ शिकला.
आपल्याकडे म्हणतात ना, “अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.” खर तर लहानपापासून हे वाक्य आपण ऐकत आलो आहोत. आपण केलेला प्रत्येक अयशस्वी प्रयत्न, आलेला प्रत्येक नकार यातून वेळीच धडा घ्या. अपयशाचा अभ्यास करा, कदाचित त्या अपयशातच आपल्या उज्वल भविष्याचे काही संकेत दडलेले असतील. अपयश येताच हात पाय गाळून मैदान सोडणे हे खूप सोपे असते परंतु अपयशाची तमा न बाळगता जो चुकांमधून शिकेल आणि आपले प्रयत्न सुरू ठेवील त्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.
Thank you sir for this amazing blog !
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानसिकतेची काय भूमिका असते? What is the role of mindset in being successful in life?
हा ब्लॉग वाचून मन totaly परावर्तीत झालेलं आहे कारण यामध्ये जे विचार मांडलेले आहेत खरंच ते आपल्या संपूर्ण आयुष्याचा रस्ता बदलणारा हा ब्लॉग आहे. आणि यातून जे मिळालं ते सर्व प्रचंड ऊर्जा दायक आहे यावरून आतापर्यंत ज्या जीवनाचा आज पक्का आढावा मिळाला. आज कळलं की आपलं आजपर्यंत च जीवन असं होत का ? आपण एवढ्या खालच्या दर्ज्याच जीवन जगत होतो आणि त्याचबरोबर सध्याच्या जिवनात हिरवळ आणण्यासाठी काय करावं लागेल? अशा सर्व शंकाची उत्तरे या ब्लॉग मधून अतिशय रसाळ भाषेत तुम्ही उलघडून दाखवले त्यामुळे हा ब्लॉग तर mind blowing आहेच पण त्याचबरोबर हे लीहण्यामागील तुमची जी तळमळ आहे ती आज वरील प्रत्येक शब्दातून कळाली.
आपण आज / सद्य परिस्थितीत जे काही जीवन जगात आहोत , सध्याची जी आपल्या जीवनाची वाटचाल आहे मग ती प्रगतीच्या दिशेने असो व अदोगतीच्या असो ते फक्त एका गोष्टीमुळे घडते आणि ती गोष्ट म्हणजे आपला Mindset . आत्तापर्यंत Mindset हा शब्द बऱ्याचदा अनेक motivatinal speech मधून , वेगवेगळ्या पुस्तकातून वाचलेला, ऐकलेला आहे परंतु त्यातून या शब्दाचा अर्थ आणि महत्व या दोन्ही बाबी तेवढ्या प्रमाणत समजल्या नव्हत्या परंतु सुदैवानं आज हा ब्लॉग वाचण्यासाठी हाती लागला आणि मला तर वाटते या ब्लॉग मुळे आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकत यातील प्रत्येक शब्दात दटावलेली आहे. मानसिकता आपल्या जीवनाचा Head असतो आज या लाईफ changing विचारातून learn करायला मिळालं हा माझ्यासाठी फक्त विचार नाही तर अख्खा जीवनाचा खजिना आहे .
आपण कोणतीही कृति करत असताना त्या कृतिबद्दल आपल्या माईंड मध्ये आधी ते विचार घर करत असतात आणि त्यानंतर जर माईंड चा order असेल तर त्या विचारांचं रूपांतर कृतीत होत असत आणि तीच कृती आपल्या आयुष्यात वेगवेगळे results आणत असते म्हणून कुठलाही काम करत असताना त्याबद्दल दोन वेळा विचार आपल्या mind मध्ये येत असतो. म्हणून आयुष्यात काहीतरी भन्नाट करायचं असेल, यशाच्या उत्तुंग शिखरे गाठवयाचे असतील , या सामान्य जगामध्ये असामान्य Indentity निर्माण करायची असेल तर तशी आपली असामान्य मानसिकता तयार करणे गरजेची बाब आहे. कारण जर आपली मानसिकता यश मिळविण्याची असेल तर mind ते कसे मिळते याचा शोध घेते आणि त्यातून तशी कृति आपल्याकडून घडून येते आणि Action produce Result. म्हणून जर आयुष्यात सकारात्मक Result हवे असतील तर तर आपला mindset आपली मानसिकता सकारात्मक तयार केल्याशिवाय पर्याय नाही आणि असा Mindset तयार करण्यासाठी या ब्लॉग च महत्व अगणित आहे.
आपल्या जीवनाचा उद्देश प्राप्त करण्यासाठीं आणि आयुष्यात मोठी झेप घेण्यासाठी पूरक अशी मानसिकता कशी तयार करायची ? हा प्रशन मनामध्ये उसळी घेत होतच आणि त्या प्रश्नाला प्रभावशिल तेने उत्तर देण्यासाठी दिलेली तीन तत्वे तर ऑक्सिजन सारखे आहेत. जर आपण ये तीन सूत्रांचा वापर करून जर आपली मानसिकता त्या पद्धतीची बनवली तर आपल जे आत्ता जीवन आहे काही दिवसांनी आपलं आहे असे आपल्यालाच वाटणार नाही एवढी शक्तिशाली ही तीन तत्वे आहेत.
आपली मानसिकता ही आपण जी माहिती collect करतो तशी बनत जाते आपलं जे माईंड असत ते त्याला जे मिळालं त्यानुसार हरकती घेत असते त्यामुळे जर आपण माईंड ला चांगला खुराक दिला तर ते नक्कीच चागलीच action घेईल आणि रिझल्ट त्यातून चांगलेच मिळतील.
आज आपल्या अवतीभोवती अमाप माहितीचा खजिना उपलब्ध आहे परंतु त्यातली 70% माहिती ही आपल्या मानसिकतेला अदोगतिची दिशा दाखवणारी आहे त्यामुळे आपल्या अवतीभोवती जो माहितीचा बाजार भरलेला आहे त्यातून आपल्याला कोणती माहिती उपयुक्त आहे हे निवडणे खरी आव्हानात्मक गोष्ट आपल्यापुढे आहे. जर आपण आपण ठरवलेल्या क्षेत्रातली माहिती collect करायला सुरुवात केली तर त्या माहितीनुसार आपली मानसिकता आकार घेईल आणि तशी action आपल्या हातून होऊन आपल्या जे साध्य करायचे आहे ते अगदी सहजतेने साध्य होईल.
काहीतरी मोठं साध्य करण्यासाठी कणखर मानसिकतेचे गरज असते . एखाद असे झाड असते की ते उंचीच्या ठिकाणी असूनसुध्दा कितीही मोठं वादळ आल तरीसुध्दा अतीशय सन्मानानं ताठ उभा राहत त्याला त्या वादळाचा काहीच फरक पडत नाही कारण त्याची मूळ जमिनीमध्ये खोलवर रुजलेली असतात ती मूळ त्या प्रचंड वेगाचा वादळाला त्यांच्या ताकतीने हाकलून देतात आणि याउलट एखाद झाड सपाट जमिनीवर त्याच्या आजूबाजूला प्रचंड झाड असताना सुध्दा थोड्याशा अवकाळी पाऊस किंवा वादळामध्ये उन्मळून पडत त्याच्या अवतीभोवती एवढं धोकादायक वातावरण नसताना सुद्धा ते छोटीशां समस्येमुळे नष्ट होत कारण त्याची मुळेच मजबूत नसतात.
आपल्या जीवनाचं सुद्धा असच असतं जर आपली मानसिकता जर मजबुत असेल तर आपल्या अवतीभोवती कितीही वादळं आली तरी ती आपल्यासाठी शुल्लक वाटायला लागतात म्हणून आयुष्यात पुढे जाण्यासाठी मजबुत मानसिकता आवश्यक असते .
आपण जी माहिती गोळा करतो त्यामध्ये positivity असणे खूप महत्वाचे असते हल्ली चा जर विचार केला तर 95% तरुण पिढी social media ( Facebook whatsapp, instagram, news channel वेगवेगळे YouTube वरचे web series ) च्या आहारी गेलेली आहे ज्यातून नेहमी negetive गोष्टी संचार करत असतात त्यातून रिझल्ट सुध्दा तसाच येत आहे आज या एवढ्या प्रगत जगामध्ये अनेक तरुण निराश , हातात बेरोजगारी घेऊन फिरत आहेत या गोष्टीचे कारणच ते आहे की त्यांनी Negetivity च्या जगात वावरत असल्यामुळे त्यांची मानसिकता सुध्दा निराशावादी, बनून शेवटी तेच त्यांच्या पदरात पडत आहे. या बाबती मध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला सोशल मीडिया चां वापर तात्काळ थाबवण गरजेचं आहे.
असे म्हंटले जाते की माणूस सगळयात fast learne त्याच्या सोबतीतून करत असते . जर आपला mindset शोधक वृत्तीचा, धेय्य वादी तयार करायचा असेल तर आपल्याला तसेच माणसाच्या सोबत राहणे उत्तम ठरेल. जर आपण सकारात्मक , आणि येश्याच्या दिशेने धावणाऱ्या व्यक्तीच्या संगतीत असाल तर त्यातून आपल्या विचाराची देवाणघेवाण होते आणि आपली मानसिकता सुध्दा तशीच शोधक वृत्ती ची तयार होईल म्हणून आपल्या आयुष्यात एक चांगली cummunity किंवा संगत असणे खूप गरजेचं आहे.
चांगल्या संगतीमुळे काय होते? याचा अनुभव मी घेतलेला आहे 8th class मध्ये असताना सगळ्यांच्या नजरेत मी एक वेगळी केस होतो , माझं नाव घेतलं की पुढचा व्यक्ती म्हणायचा , “अरेरे ते खुप वाया गेलेलं पोरगं आहे” परंतू मी पुढच्या इयत्तेत चांगल्या मित्रांच्या संगतीत रमलो आणि जीवनाचा रस्ताच बदलला त्यामुळे सहवास अत्यंत महत्वाचा असतो , जीवनाचं सोन करण्यासाठी चांगली सांगत आवश्यक आहे.
कोणताही काम करत असताना ते काम फक्त करूनच चालणार नाही तर त्यासाठी योग्य दिशा असावी लागते . जर आपल्याला उत्तरेकडे जायचं असेल आणि आपण दक्षिणेकडे प्रचंड वेगाने पळत आहोत तर त्याचा फायदा होईल का? अगदी तसेच आपल्या आयुष्यात सुद्धा काहीतरी मोठं मिळवण्यासाठी काहीतरी भन्नाट करण्यासाठी आपण ठरवलेला जीवणाचा उद्देश साध्य करण्यासाठी योग्य दिशा असावी लागते आणि ती योग्य दिशा देण्यासाठी आयुष्यात एक योग्य मार्गदर्शक असणे सुद्धा गरजेची गोष्ट आहे . मार्गदर्शक आपल्या आयुष्याचा रोडमॅप तयार करत असतात त्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्याठिकाणी आपण अगदी विश्वासाने पोहोचू शकतो. रोड मॅप मार्गदर्शक तयार केल्यामुळे त्या मार्गामध्ये जर आपल्याला कुठे अडचण आली तर त्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांच्याकडे alredy उपाय तयार असतोच कारण त्यांनी त्या मार्गावरून अनेकदा चाललेला असत. म्हणून कमी वेळात कमी ऊर्जेचा वापर करून जर आपला यशस्वी व्हायचा असेल तर एक उत्तम मार्गदर्शक म्हणून आपल्याला निवड करावीच लागेल.
काल मी एक वाक्य वाचलं ते वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेलं होतं , काही माणसं बाबासाहेबांच्या पुतळ्याला फुलाने सजवतात आणि त्यांच्या पुतळ्याच्या समोर अनेकांची गर्दी जमते त्यावेळी त्या ठिकाणी एक वाक्य असतं ते वाक्य असं होतं की, ” तुम्ही माझी किती पुतळे बांधले , त्या पुतळ्याला कितीही फुलाने सजवले तरीही मी तुम्हाला त्याठिकाणी सापडणार नाही मी फक्त एकाच ठिकाणी आहे आणि ते स्थळ म्हणजे पुस्तक” . एवढं ऊर्जा दायक वाक्य आहे हे की त्यातून अफाट ताकत मिळते . आपल्याला जिवंत नसलेल्या महान व्यक्तीचं दर्शन फक्त ग्रंथातून होते आणि आपली मानसिकता सुध्धा जर त्या महान व्यतीच्या विचाराची डिझाईन कराची असेल तर त्याच्या विचारांचं अनुकरण करावं लागतं आणि ती विचार फक्त आणि फक्त पुस्तकात सापडतील. म्हणून पुस्तकाच्या गावात रमून राहणं अत्यंत महत्त्वाचे आहे
आतापर्यंत गांजलेले मानसिकता या प्रभवशील ब्लॉग मधून Delete होऊन एक नवा Mindset तयार होण्याच्या दृष्टीने हे तुमचं रसाळ लिखाण अत्यंत उपयुक्त आहे . असा हा माईंड shifted विचार पहाचाविल्या बद्दल मनापासून धन्यवाद