प्रक्रिया-आधारित ध्येय कसे साध्य करावे?

Spread the love

प्रक्रिया-आधारित ध्येय कसे साध्य करावे?  याची तुम्हाला माहित करून घ्यायची असेल तर आजचा ब्लॉग तुम्हाला विशेष मदत करणार आहे. 

तुम्हाला एक गोष्ट सुचवायला मला आवडेल की, हा ब्लॉग वाचण्यापूर्वी यापूर्वीचा आपले ध्येय नेमके कसे निश्चित करावे आणि ते कसे प्राप्त करावे? हा ब्लॉग अवश्य वाचावा.

जेणेकरून ध्येयनिश्चिती आणि प्राप्तीचा हा दुसरा सिद्धांत समजून घेताना तुम्हाला सोपे जाईल.

जीवनामध्ये आपले ध्येय निश्चित केल्यानंतर ते प्राप्त होणे तेवढेच महत्त्वाचे असते.

आपल्या आसपास अनेक लोक ध्येयनिश्चिती करतात परंतु ते निश्चित केलेले ध्येय प्राप्त होताना दिसत नाही.

याला खरे कारण कोणते असेल? तर ध्येयप्राप्तीच्या या दुसऱ्या सिद्धांताबद्दल जाणीव नसणे किंवा त्याचे पालन न करणे होय. हे अनेक अभ्यासातून आज सिद्ध झाले आहे.

चला तर मग दुसऱ्या क्रमांकाच्या सिद्धांताला सुरुवात करुया.

२) प्रक्रिया-आधारित ध्येय कसे साध्य करावे?

“How you climb a mountain is more important than reaching the top”.

-Yvon Chouinard.

आजपर्यंत जेवढ्या काही गिर्यारोहकांनी जगातील वेगवेगळ्या पर्वतांची उंची गाठली ते असं म्हणतात की, जोपर्यंत तुम्हाला पर्वतावर चढण्याच्या प्रक्रियेचे नियम माहित होत नाहीत तोपर्यंत तुम्ही कोणत्याही शिखराची उंची गाठूच शकत नाही.

यावरून आपल्याला हेच लक्षात येते की आपल्या जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातील ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी ध्येयनिश्चिती नंतर ध्येयप्राप्तीच्या प्रक्रियेचा नियम किंवा सिद्धांत माहित असणे अत्यंत गरजेचे आहे.

जगातील किंवा आपल्या आसपास असलेले उच्च ध्येय साध्य करणारे (Top Achievers) हे त्यांच्या भाषणातून किंवा व्याख्याणातून आपल्याला नेहमी प्रेरित करीत असतात परंतु त्यांनी आज ही जी उंची गाठली आहे त्याची प्रक्रिया मात्र ते आपल्याला सांगत नाही.

याचं एक उदाहरणच द्यायचे झाल्यास एखादी व्यक्ती तुम्हाला एखादा तयार केलेला पदार्थ दाखवत आहे, परंतु तो कसा बनवलाय त्याची प्रक्रिया किंवा रेसिपी सांगत नसेल तर तुम्हाला तो पदार्थ बघून छान वाटेल परंतु बनवायचा असेल तर बनवू शकाल का? 

त्यामुळे आयुष्यभर आपण फक्त प्रेरित होत असतो, नुसते स्वप्नांचे मनोरे उभे करतो, म्हणजेच केवळ स्वप्नाळू बनून राहणे एवढेच आपल्या वाट्याला येते.

आज असंख्य लोकांकडे स्वप्न तर आहेत परंतु ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ज्या योग्य प्रक्रियेची गरज असते ती प्रक्रियाच माहीत नसल्यामुळे निश्चित केलेली महत्वाची उद्दिष्टे तशीच मनातल्या मनात किंवा कागदावर राहून जातात.

आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला तीच ध्येय प्राप्तीची प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

जर तुम्ही हा प्रक्रियेवर आधारित ध्येय प्राप्तीचा हा दुसरा सिद्धांत तंतोतंत लागू केला तर तुम्ही तुमच्या जीवनातील कोणतेही उद्दिष्ट सत्यात आणू शकाल हे मी आज तुम्हाला खात्रीने सांगतो.

चला मग तयार आहात?

हे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया.

१) तुम्ही जर प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित केले असेल तर त्यासाठी हा सिद्धांत तुम्ही खालील प्रमाणे कसा लागू करू शकाल.

आज लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात. लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा सुद्धा देतात परंतु त्यातील अगदी बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी होताना दिसतात.

गेल्या काही वर्षापासून अधिकारी झालेल्या लोकांना जवळून बघण्याचा व त्यांच्याशी बोलण्याचा मला योग आला त्यातून जे  मला सूत्र गवसले तेच मी तुम्हाला सांगत आहे.

ते अधिकारी होण्याचे रहस्य उलगडून सांगताना म्हणतात की,

 यामध्ये अंतिम उद्दिष्ट अधिकारी होणे हे आहे. ती भविष्यातील घटना आहे, यात काही महिने किंवा काही वर्ष सुद्धा लागू शकणार आहेत.

इथे मी अधिकारी होणार, अधिकारी होणार असे केवळ स्वप्न बघत राहून चालणार नाही तर त्या अधिकारी पदासाठी असलेल्या परीक्षा व अभ्यासक्रमाची व त्यासाठी लागणाऱ्या उत्तम अभ्यास पुस्तकांची (स्टडी मटेरियल) ची तसेच उत्तम मार्गदर्शकाचे मार्गदर्शन यांची जुळवाजुळव करावी लागते.

हे सगळे झाले की आता खऱ्या कामाला सुरुवात करायची असते.

अधिकारी होणे हे अंतिम उद्दिष्ट डोळ्यासमोर आहेच परंतु त्यासाठी आजच्या दिवसाच्या 24 तासात तुम्ही किती आणि कसा केंद्रित होऊन अभ्यास करणार यावरून तुमचे अधिकारी होण्याचे अंतिम उद्दिष्ट साध्य होणार की नाही हे सिद्ध होईल.

यावरून हे लक्षात येते जीवनात कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमून चालणार नाही तर वर्तमानातील आज वर लक्ष केंद्रित करावे लागेल,  कारण आज मधूनच उद्याची निर्मिती होणार आहे. आज काही न करता उद्याचा दिवस जीवनात चांगला येऊ दे असे म्हणत बसले तर, तो उद्या हा आजच्या सारखाच असेल.

प्रक्रियेवर आधारित उद्दिष्ट या सिद्धांताचे काटेकोरपणे पालन केले तर खालील प्रमाणे फायदे होतात.

१) वर्तमानात जीवन जगण्याची सवय लागते.

२) आपल्या अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे कार्य करावे लागते ते दररोज केल्यामुळे त्याचे ओझे वाटत नाही.

३) यामुळे मोठे ध्येय छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतरित झाल्यामुळे अशक्य वाटत नाही.

४) दररोजची कृती असल्यामुळे त्या कृतीवर आपले स्वतःचे नियंत्रण राहते.

५) आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने जात आहोत की नाही हे वारंवार तपासून पाहता येते.

अशाप्रकारे आपल्या जीवनातील क्षेत्राचे कोणतेही एक ध्येय या प्रक्रिया तत्वाच्या माध्यमातून पूर्ण करता आले तर यानंतर जीवनातील कितीही मोठे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्यामध्ये क्षमता निर्माण होऊ लागते.

ध्येय निश्चिती आणि ध्येय प्राप्तीचा तिसरा सिद्धांत पुढील ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. तर चला मग पुढील ब्लॉग मध्ये भेटुया !!

आजच्या या ब्लॉग मध्ये तुम्हाला कोणत्या तीन गोष्ठी खास वाटल्या त्या नक्की कळवा, जेणेकरून मला आणखी लिहिण्यास प्रेरणा मिळेल.

तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏

आणखी वाचा: आपले ध्येय नेमके कसे निश्चित करावे आणि ते कसे प्राप्त करावे?

आणखी वाचा: जगात ५ ℅ लोकंच फक्त यशस्वी होतात याचे रहस्य काय आहे? What’s the secret that only five percent of people in the world succeed?

आणखी वाचा: यशस्वी जीवनसाठी विक्री कौशल्याचे काय महत्व आहे? What is the Importance of Selling Skill for Successful Life?

आणखी वाचा: माणूस आपल्या उपजत कौशल्य आणि कल्पनांवर काम का करत नाही? Why are people not working on our talent and ideas?

आणखी वाचा: आपला शोध आपणच घेतला तर जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. No one can stop you from succeeding in life if you do your own research.

आणखी वाचा: जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवावे? How to get what you want in life?

आणखी वाचा: जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे? How to live life as a warrior?

This is for your Personal Growth, Please Visit My Website https://www.lifeshodh.com

Spread the love

30 thoughts on “प्रक्रिया-आधारित ध्येय कसे साध्य करावे?”

  1. हा ब्लॉग संदेश देतो की भविष्य उज्ज्वल होण्यासाठी वर्तमानात कठीण परिश्रम करावा लागतो. भूतकाळ आणि भविष्याचा विचार करणे फक्त वेळेचा अपव्यय करणे आहे. नेहमी प्रेरित राहण्यासाठी प्रेरक व्हिडिओ उपयुक्त नसतात यासाठी तुम्हाला स्वतःला तुमच्या ध्येयाकडे जाणारया वाटेवर सातत्याने चालावे लागेल. अश्या प्रकारे प्रेरित राहण्यासाठी तुम्ही नेहमीच आम्हाला सांगतं असतात व त्यासाठी मदत ही करता.

    Thank you so much Sir 😊

    Reply
  2. प्रक्रिया-आधारित ध्येय सिद्धांताद्वारे जीवनातील कोणतेही ध्येय कसे साध्य करायचे? How to achieve any goal in life through Process-Based Goal Theory?

    @.
    नमस्कार सर,
    आज हा लेख मी खूप काळजी पुर्वक वाचला आणि शेवट पर्यंत वाचतच गेलो आणि संपला तेव्हा असे वाटले कि लई लवकर संपला , हा लेख संपायलाच नको होता असे वाटत होते.
    आज मि लेख वाचला तेव्हा मी विचार केला कि काय मीही माझ्या जीवनात असच करतोय?
    माझ्या जीवनात हि ह्या चुका होताय?
    आपण नेहमीच भविष्याबद्दल विचार करीत राहतो. स्वप्न रंगवून बसतो. स्वप्नात रंगून जातो पण फक्त स्वप्न बघून ते पूर्ण होणार नाही तर ते पूर्ण करण्यासाठी त्यावर कार्य करायला सुरुवात करावा लागेल ही गोष्ट आज मला समजली.
    आपल्याला उद्याची चिंता न् करता आज वर लक्ष दिले पाहिजे. भविष्य सुधारवायचे असेल तर वर्तमान सुधरावा लागेल. आणि भूतकाळ आणि भविष्यकाळाच ओझं घेऊन वर्तमान रंगनार नाही…आणि वर्तमानातला तो प्रत्येक क्षण आपण आपल्या ध्येयाच्या दृष्टीनेच वापरला पाहिजे.
    हि एक खूप महत्वाची गोष्ट आज मला शिकायला भेटली. “आपला आज हा नवीन आहे, उद्या हा कठीण असेल, पण उद्या नंतर खूप चांगल आहे.”
    असं अलीबाबा चा संस्थापक जॅक मा म्हणतो.
    धन्यवाद !!!

    Reply
  3. नमस्कार सर
    हा आजचा ब्लॉग मी काळजीपूर्वक वाचला
    एक म्हणजे आपण भविष्याचा विचार करत असताना आपल्या वर्तमान काळ खराब करून घेत आहोत
    आणि तसेच. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींवर विचार करत इथेही आपण आपला वर्तमान काळ खराब करून घेत आहोत
    ही माझ्या आयुष्यातील चुकी माझ्या लक्षात आली

    येणारा भविष्यकाळाचा किंवा गेलेल्या भूतकाळाचा विचार न करता वर्तमान काळात आपल्या ध्येयासाठी आपण काय काय करू शकतो या ब्लॉगमधून माझ्या लक्षात आले
    या ब्लॉगमध्ये माझ्या आयुष्यातली चुकी आणि मी माझ्या वर्तमान काळामध्ये माझ्यासाठी काय काय करू शकतो या दोन गोष्टी मला शिकायला मिळाल्या

    Reply
  4. नमस्कार सर प्रक्रिया-आधारित ध्येय सिद्धांताद्वारे जीवनातील कोणतेही ध्येय कसे साध्य करायचे? हा ब्लॉक वाचकांनी मनात अनेक प्रश्न येतात उदाहरण १) आपल्याला भविष्यात जे करायचे आहे ते साध्य करायला हा ब्लॉग आपल्याला कशा प्रकारे मदत करणार 3) खरंच असं असते का पहिले जेव्हा मी स्पर्धापरीक्षांची स्वप्न पाहिले होते तेव्हा मला वाटत होते ही स्पर्धा परीक्षांमध्ये अगदी सोपी गोष्ट पण आता पुण्यातून कळाले स्पर्धा परीक्षा म्हणजे काय स्पर्धा परीक्षेचे सत्य कळले आपल्या शाळा पुस्तक काढले तर मनात एक वेगळीच भीती वाटते आपण खरंच ही स्पर्धा उत्तीर्ण होऊन अधिकारी होउ की नाही आणि नाही झालो तर आपल्या आयुष्याची काय होणार पण सर ब्लॉग वाचतानी आणि ब्लॉग वाचून झाल्यानंतर एक वेगळाच अनुभव आला ब्लॉक वाचल्यानंतर जीवनातील सत्य कळले आपण भूतकाळ व भविष्यकाळ या दोन्ही काळाचा विचार न करून वर्तमानाचा विचार केला पाहिजे आपले रोज जे वेळापत्रक आहे त्यावर कठोरपणे अमल करणे आणि जे विद्यार्थी अधिकारी होऊ शकतात तर आपण काय नाही हा प्रश्न मनात उभा होतो आणि सर आपण ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे धैर्याचे सिद्धांतावर आपण कठोरपणे अंमलबजावणी केली तर कोणतीच गोष्ट जगात अशक्य नाही असे कळाले मला ब्लॉग वाचताना नेहमी ब्लॉग मध्ये एक नवी गोष्ट एक नवा विचार सापडतो धन्यवाद सर

    Reply
  5. आपण आसपास पाहत असतो की प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात यशस्वी व्हायचा आहे त्यासाठी ते ध्येयनिश्चित करतात. ते निश्चित केलेले ध्येय आपण प्राप्त कसे केले पाहिजे ? हा प्रश्न आपल्या समोर येतो. आणि याच प्रश्नाचे उत्तर आजच्या ब्लॉक मध्ये मिळाले आहे, ते म्हणजे ध्येयप्राप्तीचा दुसरा सिद्धांत – प्रक्रियेवर आधारित उद्दिष्ट /ध्येय.
    आपल्याला ध्येय गाठायचे असेल तर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहीत असायला हवी ती म्हणजे ध्येय निश्चित केल्यानंतर आपल्याला त्या ध्येयाची प्रक्रिया किंवा सिद्धांत होय. आणि हा सिद्धांत या ब्लॉगमध्ये सरांनी व्यवस्थितरीत्या मांडलेला आहे. या सिद्धांताबरोबर काही उदिष्टे सांगितलेले आहेत.
    वर्तमानात जगले पाहिजे. आज वर लक्ष केंद्रित करायला पाहिजे भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमून न जाता, आज वर लक्ष केंद्रित केलं तर आजचा दिवस उद्याच भविष्य ठरवत असतो.
    आणि या ध्येयाच्या दिशेने जाताना आपण feedback घेतला पाहिजे.
    या गोष्टींच repetition झालं पाहिजे. सरांचे एक नेहमीच वाक्य मला आठवते की Repetition is the mother of learning /skill…
    आजचा ब्लॉग हा आमच्या ध्येयप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. 😊

    Reply
  6. नमस्कार सर प्रक्रिया-आधारित ध्येय सिद्धांताद्वारे जीवनातील कोणतेही ध्येय कसे साध्य करायचे? हा ब्लॉक वाचकांनी मनात अनेक प्रश्न येतात उदाहरण १) आपल्याला भविष्यात जे करायचे आहे ते साध्य करायला हा ब्लॉग आपल्याला कशा प्रकारे मदत करणार 3) खरंच असं असते का पहिले जेव्हा मी स्पर्धापरीक्षांची स्वप्न पाहिले होते तेव्हा मला वाटत होते ही स्पर्धा परीक्षांमध्ये अगदी सोपी गोष्ट पण आता पुण्यातून कळाले स्पर्धा परीक्षा म्हणजे काय स्पर्धा परीक्षेचे सत्य कळले आपल्या शाळा पुस्तक काढले तर मनात एक वेगळीच भीती वाटते आपण खरंच ही स्पर्धा उत्तीर्ण होऊन अधिकारी होउ की नाही आणि नाही झालो तर आपल्या आयुष्याची काय होणार पण सर ब्लॉग वाचतानी आणि ब्लॉग वाचून झाल्यानंतर एक वेगळाच अनुभव आला ब्लॉक वाचल्यानंतर जीवनातील सत्य कळले आपण भूतकाळ व भविष्यकाळ या दोन्ही काळाचा विचार न करून वर्तमानाचा विचार केला पाहिजे आपले रोज जे वेळापत्रक आहे त्यावर कठोरपणे अमल करणे आणि जे विद्यार्थी अधिकारी होऊ शकतात तर आपण काय नाही हा प्रश्न मनात उभा होतो आणि सर आपण ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे धैर्याचे सिद्धांतावर आपण कठोरपणे अंमलबजावणी केली तर कोणतीच गोष्ट जगात अशक्य नाही असे कळाले मला ब्लॉग वाचताना नेहमी ब्लॉग मध्ये एक नवी गोष्ट एक नवा विचार सापडतो येणारा भविष्यकाळाचा किंवा गेलेल्या भूतकाळाचा विचार न करता वर्तमान काळात आपल्या ध्येयासाठी आपण काय काय करू शकतो या ब्लॉगमधून माझ्या लक्षात आले
    या ब्लॉगमध्ये माझ्या आयुष्यातली चुकी आणि मी माझ्या वर्तमान काळामध्ये माझ्यासाठी काय काय करू शकतो या दोन गोष्टी मला शिकायला मिळाल्या

    Reply
  7. या ब्लॉग मध्ये जे काही देलेल आहे त्याच गोष्टीच्या शोधात होतो आणि शेवटी मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं त्याबद्दल पहिल्यांदा सर तुम्हाला मनापासून धन्यवाद . स्वप्न तर प्रत्येक माणूस बघत असतो आणि ते बघायलाच पाहिजे कारण धेय्याची निर्मितीच स्वप्नातून होत असते. मग एक वेळा Destination ठरवलं की मग ते गाठवण्याचा मार्ग मोकळा होतो . परंतु Destination प्रत्येकानं आपापल्या कुवतप्रमाणे ठरवत असतो आणि त्याप्रमाणे तो कामाला लागतो मग ते काम फक्त बोटावर मोजण्या एवढे लोकच पूर्ण करतात बाकीचे सगळे विविध कारणामुळे बाहेर पडतात . ध्येय निश्चितीसाठी अनेक जण सल्ले देतात तू डॉक्टर हो,इंजिनियर हो, तहसीलदार हो, कलेक्टर हो परंतु यापैकी एकही व्यक्ती तू हे – हे कर आणि कलेक्टर हो असं म्हणणारा सापडणार नाही . सपडलेतरी त्यामधे स्पष्ट ता असत नाही पण हा ब्लॉग वाचून आता त्या व्यक्तीची गरजच भासणार नाही .
    सदरील ब्लॉग मधुन धेय्य निश्चिती चा दुसरा सिद्धांत कळला जो की 80% लोकांना माहीत नसतो आणि यामुळेच काहितरी करण्यासाठी जगडणारी माणसं रिकाम्या हातानी बाहेर पडताना दिसतात. उंच शिखरावर जा , प्रचंड यश संपादन कर असे म्हणणारे भरपूर असतात परंतु ह्या मार्गाने जा काही अडचण येणार नाही आणि जरी आलीच तर हे कौशल्य वरून ती solve कर महणानारे खूप कमी लोक आढळतात आणि त्यातलेच तुम्ही आहात सर . फक्त आपण स्वप्नालाच घेउन मिरवन या गोष्टीला काही अर्थ नसतो ती गोष्ट अर्थपूर्ण बनवण्यासाठी हा सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे.
    जर आपण या सिद्धांतानुसर धेय्य प्राप्तीचा मार्ग स्वीकारला तर आपण जे काही काम केलेलं आहात त्या कामाचा थकवा बिलकुल ही जाणवणार नाही .यामुळे माणूस वर्तमानात जगत असतो त्यामुळेच अपल्यालावर कुठल्याही प्रकारचा ताण सुध्दा येत नाही जर जीवनात ताण नसेल तर ते जीवन समाधानी म्हणाता येईल आणि आपण जी काही खटपट करतो ती फक्त समाधानी जीवनासाठी करत असतो . हे समाधान या सिद्धांता मधून भेटू शकतो . असा हा अतिशय महत्वाचा ब्लॉग आहे आणि यातील प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखे आहे . खरंच सर मनापासून धन्यवाद आणि लवकरच नवी मेजवानी येईल ही अपेक्षा .

    Reply
  8. नमस्कार सर,
    या ब्लॉगमध्ये ध्येयप्राप्तीचा दुसरा सिद्धांत सरांनी मांडलेला आहे. आपल्याला एखादा पर्वत चढायचा आहे त्यासाठी आपल्याला तो पर्वत चढण्याची प्रक्रिया आणि त्याचे नियम माहीत असायला पाहिजे. त्याशिवाय आपण त्या पर्वतावर चढू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनात काही ध्येय निश्चित करत असतो ते ध्येय कसे मिळवायचे त्याच्या प्रक्रियेचे नियम आपल्याला माहीत नसेल तर आपण ते ध्येय साध्य करु शकत नाहीत. आपल्याला एक महत्त्वाचा सिद्धांत या ब्लॉग मध्ये सापडलेला आहे तो म्हणजे-
    प्रक्रियेवर आधारित उद्दिष्ट / ध्येय (Process-Based Goals)ध्येयनिश्चिती नंतर ध्येयप्राप्तीच्या प्रक्रियेचा नियम किंवा सिद्धांत माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. सरांनी खूप छान उदाहरण दिले आहे, आपल्याला आयएएस ऑफिसर व्हायचं आहे त्यासाठी आपल्याला syllabus, स्टडी मटेरियल कुठलं पाहिजे ते पाहावं लागेल. उत्तम मार्गदर्शन घ्यावे लागेल. मग आपण ते ध्येय साध्य करू शकतो. आणि या सिद्धांताचे नियम आपण दररोज फॉलो केले तर आपण यशस्वी नक्की होऊ.

    Thank you sir😊…

    Reply
  9. नमस्कार सर ,
    आज मला खऱ्या अर्थाने प्रक्रिया आधारित ध्येय या सिद्धांताचा अर्थ समजला आपल्या जीवनात फक्त ध्येय असून चालत नाही या जगात प्रत्येकाचे काही ना काही मोठी मोठी स्वप्न असते ध्येय असतात आणि असतात पण ते ध्येय पुर्ण करण्यासाठी लागणारा रोड मॅप हा नसतो.

    खरं तर आपल्याला एखादी भाजी बनवायची असेल तर त्यासाठी रेसिपी आवश्यक असते ती रेसिपी जर आपल्याला माहित नसेल तर ती भाजी बनवणे अवघड होऊन जाईल किंबहुना ती बनवता येणार नाही त्याच पद्धतीने आपल्याला ध्येयाचे आणि जीवनाची देखील असेच आहे आपल्याला जर माहिती नसेल की तिथपर्यंत कसे पोहोचणार पोहोचायचे तर आपण भरकटून जाऊ आणि आपल्याला तिथे पोहोचायचे होते तिथे आपण पोहोचणारच नाही…आणि आज मी सांगू शकतो की बऱ्याच लोकांना या सिद्धांतात बद्दल माहिती रहात नाही आणि शेवटी पण रेसिपी चुकली की भाजी बिघडून जाते त्या भाजीला चव येत नाही आपण फक्त स्वप्न रंगवून खूष राहून याचा अर्थ आपण भ्रमात आहोत.

    आपल्या ध्येयाच्या क्षेत्रातील आपण यशस्वी लोकांचे मनोगत ऐकतो ते आपल्याला प्रेरीत करतात उत्साहित करतात परंतु तो आनंद ते ध्येय प्राप्त करण्यासाठी काय करावे लागते ही पूर्णपणे आपल्याला सांगत नाही ते सांगतात पण कुठेतरी काहीतरी कमी जास्त करून सांगतात जर भाजीत मीठ वाढवा झालं तर काय होणार त्याच पद्धतीने आपल्या जीवनाचे देखील असेच होते.
    इथे सरांनी एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला उदाहरण देऊन समजून सांगितले आहे की जर प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे तर फक्त स्वप्न रंगवून जमणार नाही तर त्या प्रवासात आपल्याला ज्या ज्या गोष्टींची वस्तूंची गरज असणार आहे त्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
    त्यानंतर सुरुवात करावी लागणार आहे सुरुवात खूप महत्त्वाचे आहे आणि आपले ध्येय काय एका दिवसात साध्य होणार नाही परंतु आपल्याला एका एका दिवसाचे नियोजन करावे लागणार आहे त्यामुळे आपल्या स्वप्नांच्या दुनियेत रमून चालणार नाही तर भान ठेवून वास्तवात जगणे गरजेचे आहेत आणि आपल्याला या रस्त्यावर चालून फायदाही होणार आहे आपला व्यक्तिगत विकास होतो.
    खर तर या ब्लॉग मधून आज खूप काही शिकायला भेटलं. “ध्येयप्राप्तीचा सिद्धांत” माहित झाला याबद्दल खूप खूप आभारी आणि आम्हाला कायम असेच अशीच नवीन नवीन शिकवण देत रहा अशी विनंती.
    धन्यवाद.

    Reply
    • धन्यवाद मांगलेश ☺️
      तुझी खूप छान प्रतिक्रिया वाटली. असंच learning चालू ठेव.

      Reply
  10. नमस्कार सर
    आयुष्यात ध्येय असणं फार गरजेचं आहे कारण ज्यांच्या आयुष्यात काही ध्येय निश्चित नाही ती व्यक्ती निरुपयोगी जीवन जगते आहे. पण फक्त ध्येय निश्चित असून चालणार नाही तर आपल्याला ते ध्येय गाठण्यासाठी लागणार तो master plan . ज्या व्यक्तींने फक्त ध्येय निश्चित केले आणि ना काही योजना आखली किंवा ना आखण्याचा प्रयत्न केला.

    Right action + Right direction = Right Result
    जर तुम्हाला ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी काहीतरी शिकायला किंवा करायला तयार राहा. आपण जर कोणता पदार्थ बनवण्याचे ठरवले तर गरजेची असते ती recipe आणि ती recipe proper follow केली तर तो पदार्थ चविष्ट बनेल. ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी लागणार आहे तो plan तयार करायचा आणि तो follow करायचा. तुम्ही नक्कीच successful व्हाल.
    प्रक्रियेवर आधारित उद्दिष्ट / ध्येय (Process-Based Goals) हा सिद्धांत आयुष्यात नक्कीच apply करेल.
    Thank you so much Sir for amazing blog. 😊

    Reply
    • धन्यवाद देविदास, याला म्हणतात deep learning, हे learning तुला next level ला घेऊन जाण्यास नक्की मदत करेल.

      Reply
  11. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक उद्देश असतो जगातला प्रत्येक माणूस आपल्या जीवनाचा काहीतरी उद्देश समोर ठेवून जीवन जगत असतो. आपला जीवन जगण्याचा असलेला उद्देश साध्य करण्यासाठी आपण वेगवेगळी स्वप्न बघत असतो, तो उद्देश मिळवण्यासाठी आपण आपले ध्येय निश्चित करत असतो आणि निश्चित केलेल्या आदेशानुसार आणि आपण बघितलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांची अगदी तळमळीने धडपड चालू असते. हा जीवनाचा उद्देश गाठण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली ध्येयनिश्चिती ही आपल्या उद्देशाला पूरक अशी असली पाहिजे. ज्या गोष्टी मध्ये आपला रस आहे, जी गोष्ट केल्यामुळे आपल्याला प्रचंड आनंद मिळतो, जी गोष्ट करत असताना आपली तहान भूक हरपून जाते , अशा गोष्टींमध्ये आपली ध्येयनिश्चिती आपण केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद मिळतो अन्यथा जीवनाचा हा सुंदर प्रवास आपल्यासाठी रडगाणे बनतो.

    जगातला प्रत्येक माणूस आपापल्या क्षेत्रांमध्ये ध्येयनिश्चिती करत असत परंतु त्यापैकी अगदी मोजकेच लोक निश्चित केलेले ध्येय प्राप्त करत असतात , मोजक्याच लोकांच्या स्वप्नपूर्तीची शेंडी निघत असते , काहीच लोक त्यांच्या आयुष्याला सोन बनवत असतात . अशी कोणती शक्ती आहे त्यांच्याकडे की, त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश पर्यंत पोहोचता येते . या अशा समस्यांचे निराकरण या ब्लॉगमधून अगदी समाधान कारक झालेलं आहे . जी लोकं आयुष्यामध्ये त्यांचा जगण्याचा उद्देश प्राप्त करत असतात त्या लोकांच्या जीवनामध्ये अगदी हिरवळच हिरवळ पसरलेली दिसते . मग अशी हिरवळ आपल्या आयुष्यात सुद्धा आणण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठीचे चेक पॉईंट्स आपल्या या वैचारिक ब्लॉगमधून शिकायला मिळतात ही आमच्यासाठी खरंच आभाळाएवढी गोष्ट आहे .

    कोणतेही काम पूर्ण करत असताना त्या कामाचे cheak points आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे. चेक पॉईंट जर माहिती झाले तर त्या कामामध्ये यश मिळविण्यास काहीच विलंब लागणार नाही. जसे की आपल्याला अतिशय कठीण गणित सोडवायचा आहे आणि गणित सोडवण्यासाठी त्यामध्ये steps खुप महत्वाचे असतात . त्या steps नुसार जर आपण गणित सोडवलं तर ते गणित कमी वेळात अचूक रित्या आपल्या हातून सोडून होइल आणि त्याच गणिताला जर आपण generally सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर ते गणित योग्य आहे की नाही यावर आपला विश्वास नसतो. अगदी या गणिताप्रमाणे आपल्या आयुष्याच सुद्धा गणित असतं त्यामध्ये जर योग्य सूत्राचा वापर करून जर आपल्या आयुष्याची आपण वाटचाल करत असाल तर आयुष्य हे अचूक असेल आणि आपल्याकडे यशाचा असेल. ज्या लोकांचा आयुष्य उज्वल झालेला आहे त्या लोकांनी त्यांचे ध्येय प्रक्रियेच्या आधारावर पूर्ण केलेला आहे त्यासाठी त्यांनी वेगवेगळी सूत्रे वापरलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी ज्यावेळी ध्येयनिश्चिती केली त्यावेळेपासून ते कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता जिथे आहेत तिथून सुरुवात केली आणि हळूहळू त्यांच्या यशप्राप्ती ची गाडी शिखरावर पोहोचलेली आहे.

    ज्या लोकांच्या आयुष्या मधून हास्य डिलीट झालेला आहे अशा लोकांच्या बाबतीत काय झाले असेल या गोष्टीचा विचार करत असताना असे लक्षात येते की, त्यांच्याकडे ध्येयप्राप्तीसाठी ची वेळ होती ती त्यांनी प्रत्यक्षात कृतीतून अगदी कमी घालवलेली आहे आणि भविष्याचा विचार करून वर्तमान हरवलेला आहे . त्यांचा वर्तमानच उपाशी असल्यामुळे भविष्याच्या पोटाचा प्रश्न खूप गंभीर होता त्यामुळे आपण सुद्धा ध्येय निश्चित केल्यानंतर ध्येय प्राप्ती नंतरच्या जिवनात रमतो आणि आपल्या हातात असलेला वेळ वाया घालवतो त्यामुळे वर्तमान निकामी ठरल्यामुळे भविष्याचे वांदे व्हायला सुरुवात होतात.

    आपल्या ध्येयाची पूर्ती करण्यासाठी, आपल्या आकाशाएवढी उत्तुंग स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्याचा वेळ आपल्या हातात आहे, आणि कोणती गोष्ट जी आपल्या हातात आहे त्या गोष्टीवर आपण पूर्णपणे राज्य करू शकतो त्यामुळे त्याची वेळ आहे त्यावेळेला जर सोन करण्याचा आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपलं भविष्य हिरा सारखं होईल.

    आपल्याकडे जो हा उद्या करू, पुन्हा करू, काही वेळाने करू असा घाणेरडा नियम आहे तो नियम मुळासकट उपटून टाकल्याशिवाय आपल्या कृतीचा वेग प्राप्त होणार नाही आणि वेगाशिवय यश सुध्दा लांब असेल Succes want to speed त्यामुळे आपल्या कार्यामध्ये वेग प्राप्त करून तो वेग योग्य दिशेने मार्गी लावू जर कार्य केलं तर नक्कीच यश मिळवण्या पासून आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही आणि जीवनाचा उद्देश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.

    या ब्लॉग मधून स्वप्नपूर्तीसाठी किंवा हा जीवनाचा उद्देश मिळवण्यासाठी आपण जे काही देणे निश्चिती करत असतो त्याआधीही निश्चिती ला पूर्ण करण्यासाठीचे सूत्र देणारा हा अतिशय उपयुक्त blog आहे. हे सूत्र वापरून जर आपण आयुष्याचं गणित सोडवले तर नक्कीच आयुष्य नेहमी हास्यमय असेल. असा हात जीवन बदलणारा ब्लॉग आम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

    Reply
  12. सर आज या ब्लॉग मधून हे शिकायला मिळाल की नुसत ध्येय ठरवून उपयोग नसतो तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी, ते मिळवण्यासाठी आपण तयारी केली पाहिजे अभ्यास, मेहनत केली पाहिजे आणि हे सगळ केवळ वर्तमान काळातच केले पाहिजे आज आपण कष्ट केले, मेहनत घेतली,योग्य प्रकारे अभ्यास केला तर आपण त्या ध्येया पर्यंत पोहचू शकतो ते ध्येय आपण प्राप्त करु शकतो
    आज वर आपण लक्ष केंद्रीत केले तर उद्याचा दिवस हा चांगला असेल त्यामुळे भूतकाळात आणि भविष्यकाळात न रमता आपण वर्तमानकाळात जगल पाहिजे
    आपल्या ध्येया पर्यंत आपल्याला कसे पोहचत येईल याचा आपण अभ्यास केला पाहिजे आपल्या ध्येया पर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला काय-काय कामे करावी लागतील, कोणत्या गोष्टींची आवश्यक्यता लागेल याची जूळवाजूळव आपण केली पाहिजे आणि या गोष्टींची जूळवाजूळव केल्यावर आपण त्याचा रोज अभ्यास केलापाहिजे रोज किमान 2 ते 3 तास सराव केला पाहिजे त्यामुळे आपल्याला आपल्या ध्येया पर्यंत पोहचायला कठिण वाटणार नाही आणि कठिण जाणारही नाही
    योग्य ती मेहनत अभ्यास आणि सराव याच गोष्टी आपल्याला आपल्या ध्येया पर्यंत पोहचवतील.
    धन्यवाद सर🙏🏻🙏🏻
    हा सिद्धांत आमच्या पर्यंत पोहचवलात म्हणून💯😊

    Reply
  13. आजच्या पिढीतील तरुणाचे काही ना काही तरी ध्येय असतात .ते त्यांनी स्वतः निश्चीत केलेले असतात तरी सुध्दा त्यापैकी मोजकेच तरुण आपल्या ध्येया पर्यंत पोहचतात .बाकीचे का नाही त्याचे कारण आपण पाहू .
    आजच्या प्रत्येक युवकाचे काही ना काही ध्येय असतात परंतु खुप कमी ते ध्येय निश्चीत किवा काबीज करतात , कारण आजच्या तरुणाला ध्येय निश्चीत करता येते पण त्या ध्येया पर्यंत पोहचण्याचा मार्ग अनेकदा त्याला माहिती नसते किंवा त्या ध्येय पर्यंत पोहचण्यासाठी जी मेहनत लागते ती कुठे तरी कमी पडते . आपण रोज काय करतो किंवा आपण वर्तमानात ध्येय निश्चित करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतोय की नाही हे पाहणे गरजेचे असते . उदाहरणार्थ , कोणाचे ध्येय असेल की प्रशासनात जायचं (अधिकारी बनायचं ) बघा आज हजारो विध्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात पण त्या पैकी मोजकेच विध्यार्थी यश संपादित करतात कारण ते त्या ध्येया पर्यंत पोहचण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात .तुम्ही आजच्या दिवसाचा ( २४ तासाचा ) कसा वापर करता त्या वरून तुमचं यश निश्चित होत असते किंवा ठरत असते . आयुष्यात कोणतेही ध्येय निश्चित करायचे असेल तर भविष्यकाळात कीवा भूतकाळात रमून न जाता वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करावे लागेल कारण आज वरूनच उदयाची निर्मिती होत असते आणि या मुळे वर्तमानात जगण्याची सवय लागते , आपण आपल्या ध्येया च्या दिशेने जात आहोत की नाही हे वारंवार तपासून पाहता येते. अशा प्रकारे तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करू शकता .
    धन्यवाद 🙏

    Reply
  14. नमस्कार सर, हा ब्लॉग आपले स्वतःचे ध्येय भविष्य कसे घडवावे यावर भाष्य करणारा किंवा संदेश देणार आहे, आपण नेहमीच म्हणतो की मला हे करायचे मला ते करायचं, पण वर्तमान काळात प्रयत्न करायचे असतात, हे आपल्याला कळत नाही, पुढील भविष्य घडवण्यासाठी जो काय वेळ आहे ते योग्य मार्गी न लावता, आपण आपल्या वेळेचा अपव्यय करत असतो, म्हणजे मोटिवेशन न राहाता, प्रयत्न करणे अधिक फायद्याचे ठरेल, ते तुम्ही आम्हाला सर सतत समजून सांगत आसता, Thak u so much sir🙏🙏🙏

    Reply
  15. आपल्या जीवनातील ध्येय निश्चित केल्यानंतर ते कसे प्राप्त करायचे याचा पहिला सिद्धांत आपण या आदी च्या ब्लॉग मध्ये अभ्यासला आहे .या ब्लॉग मध्ये आपण ध्येय प्राप्तीच्या दुसरा सिद्धांत बघितला आहे तो पुढीप्रमाणे-
    2.Process based goals
    जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातील ध्येय गाठायचे असेल तर ध्येय निश्चिती नंतर ते कसे प्राप्त करायचे या प्रक्रियेचा नियम माहीत असणे खूप गरजे आहे हे या ब्लॉग मधून कळाले. कारण आजपर्यंत हा नियम आमच्याशी कोणी share च केला नव्हता.
    जीवनात कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमून चालणार नाही तर वर्तमानातील आज वर लक्ष केंद्रित करावे लागेल, कारण आज मधूनच उद्याची निर्मिती होणार आहे. आज काही न करता उद्याचा दिवस जीवनात चांगला येऊ दे असे म्हणत बसले तर, तो उद्या हा आजच्या सारखाच असेल.
    या सिद्धांताचे काटेकोरपणे पालन केले तर खालील प्रमाणे फायदे होतात.
    १) वर्तमानात जीवन जगण्याची सवय लागते.
    २) अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे कार्य करावे लागते ते दररोज केल्यामुळे त्याचे ओझे वाटत नाही.
    ३) यामुळे मोठे ध्येय छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतरित झाल्यामुळे अशक्य वाटत नाही.
    ४) दररोजची कृती असल्यामुळे त्या कृतीवर आपले स्वतःचे नियंत्रण राहते.
    ५) आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने जात आहोत की नाही हे वारंवार तपासून पाहता येते.
    अशाप्रकारे आपल्या जीवनातील क्षेत्राचे कोणतेही एक ध्येय या प्रक्रिया तत्वाच्या माध्यमातून पूर्ण करता आले तर यानंतर जीवनातील कितीही मोठे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्यामध्ये क्षमता निर्माण होऊ लागते.
    खूप छान पद्धतीने हा सिद्धांत समजून सांगितला .Thank you so much sir 🙏🙏

    Reply
  16. या जीवनात तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की आपले ध्येय आहे, आपण कुठे जात आहात, जीवनातून काय हवे आहे? ध्येय मुळात बदल दिशा बदलते, त्यामुळे ते स्पष्ट असावे, आपल्यास योग्य पाहिजे. हे निवडणे कठिण आहे, आणि उद्दीष्ट साध्य करणेही कठिण आहे. कारण त्यासाठी प्रेरणा, विश्वास, भरपूर शक्ती आवश्यक आहे. ध्येय व्हायला हवे, ते सर्व शक्य पद्धतींनी शोधले पाहिजे. जेव्हा आपण लक्ष्य कसे साध्य करायचे हे नियोजन करता तेव्हा आपल्याला असे वाटते की हे खूप सोपे आहे, परंतु कृती दरम्यान आम्ही अनेक अडचणींना सामोरे जातो जे प्रत्येकजण मात करू शकत नाही. एकीकडे, सेट गोल कसे मिळवायचे ते कठीण आहे, जर तुम्हाला हे कसे करायचे हे माहित नसेल तर मानसिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या स्वत: ला सेट करण्यासाठी काय करावे लागेल आणि सर्वसाधारणपणे निर्जीव लोकांना फारच अवघड आहे. पण, दुसरीकडे, आपण ज्या गोष्टी करीत आहात त्याबद्दल आपल्याला माहित असल्यास, आपण जे प्रयत्न कराल त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, इच्छित असल्यास आपण काय साध्य कराल, तर ते करणे सोपे होईल. आपल्याला काही महत्वाचे नियम लक्षात ठेवावे लागतील आणि मुख्य गोष्ट म्हणजे हे खूप हवे आहे.

    प्रथम कशासाठी, सर्वसाधारणपणे, आपल्याला कोणत्या गोळ्या आणि ते काय आहेत याची गरज आहे. ध्येय काही अमूर्त किंवा मूर्त स्वरूपाचे असू शकते, परंतु याक्षणी अनाकलनीय. हे आपल्याला हवे आहे आणि आपल्याला त्याची आवश्यकता आहे हे दर्शविते, म्हणून हे आपल्याला काही कृती करण्यासाठी पाठविते यातून असे दिसते की उद्दिष्ट वस्तुचे जाणीवपूर्वक किंवा बेशुद्ध महत्वाकांक्षी उद्दिष्ट असते, परिणामी प्रक्रिया निर्देशित केली जाते. डोंगराच्या शिखरावर पोहोचण्याचा तुमचा ध्येय असेल, तर तुम्ही त्यावर बराच काळ थांबवाल आणि त्यावर चढाई करणे कठीण होईल. परिणाम म्हणजे तुम्ही सर्वात वर असतील, तुम्हाला त्याच्यामुळे भावना असतील – काही क्रियाकलापांच्या परिणामी हे लक्ष्य होते. या व्याख्येवरून आम्हाला काय हवे आहे? एक अगदी सोपे आणि, त्याच वेळी, अतिशय महत्वाचे नियम: सेट ध्येय साध्य करण्यासाठी आपण निष्क्रिय नसावे.

    जर तुम्हाला आशा आहे की जर तुम्ही ध्येयावर विश्वास ठेवत असाल तर ती तुमच्या कडे येईल, मग तुम्ही खूप चुकीचे आहात. राजकुमारी राजकुमारला तिच्या बुरुजावरून सोडू नये किंवा राज्याच्या वाट्याला जाणार्या विनंतीबद्दल सर्व राज्यांना पत्रे पाठवता येणार नाही, त्यामुळे लोक त्यास तेथेच आहेत हे कळेल. आपल्या विश्वासाची आणि विश्वासाची शक्ती असलेल्या ब्रह्मांझी, कोणताही फरक असला तरी तो डोंगरावर आपल्यापर्यंत पोहचणार नाही. विश्वास आपल्याला ध्येय साध्य करण्यास मदत करते, अडचणींना सामोरे जाण्यास मदत करते.
    त्याचबरोबर स्वत: च्या आत्मविश्वास आणि आपल्या स्वत: च्या ताकदींवर आणि इच्छांवर विश्वास ठेवू नये. हा दुसरा नियम असेल. विश्वासाची कमतरता किंवा ताकदीने जास्तीत जास्त अडचणी आणि ओव्हरटेक सुरुवातीपासूनच हे आपले ध्येय आहे, आणि आपण ते साध्य करू शकता, आपण स्वप्न सेट स्पर्श सक्षम आहेत की, आणि आपण अंतिम शेवटपर्यंत तो त्यासाठी लढू होईल. आपल्याला प्रेरणा आवश्यक आहे, आपल्याला इच्छांची आवश्यकता आहे जर आपल्याकडे पुरेसे शक्ती नसेल – स्वत: आधीपासून मिळालेल्या ध्येयाजवळ आपण स्वत: ची कल्पना करा, तर मग आपण त्याचा परिणाम कसा उपभोगता? आपल्या संघर्षात अशा कल्पनांना आपल्याला शक्ती मिळू शकते. उदाहरणार्थ, जर आपण घरापासून दूर आहात आणि आता आपल्याकडे थ्रेशोल्डपर्यंत पोहोचण्याची ताकद नाही, तर आपण शंका घेऊ शकता की आपण जगू शकता, हे लक्षात ठेवा की आपल्यासाठी कोण प्रतीक्षा करत आहे, आपण परत कधी येतील, आपल्या प्रिय चेहरे आणि मग, सर्वोत्तम कल्पना – गेल्यावर जा

    अनेकदा त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, उद्दीष्ट निश्चित करतात आणि ते थोडेसे होऊ शकते. लवकरच आपल्याला असे वाटू शकते की आपण काहीतरी गमावत आहात. किंवा आपल्याला पाहिजे ते खरोखरच होते अशी शंका आहे. आणि आपल्या यशाबद्दल अशा कल्पनेने कदाचित प्रत्यक्षात सल्ला देऊ शकणार नाही आणि सर्व काही आपण अपेक्षित असलेल्या गोष्टींपेक्षा वेगळे असू शकतात. म्हणून परिणामांबद्दल काळजीपूर्वक विचार करा, आपल्याला त्याची खरोखर गरज आहे किंवा नाही याबद्दल. स्वप्नात आणि चेतनेचा ध्येय डोकावत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्हाला वाईट वाटले असेल तर आज बदला घेऊ नका, कदाचित ते त्यांच्या युगात असतानापेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. किंवा तुम्ही युवक आणि बालपणीचा एक स्वप्न एक आजूबाजूला एक सुंदर माणूस असू शकतो ज्यामध्ये आपण प्रेमाने लांब आहोत. परंतु जर तो आधीच गुंतला असेल तर विचार करा की एखाद्या व्यक्तीच्या जीवनासाठी एखाद्याच्या जीवनाची विल्हेवाट लावण्यासारख आहे का? हे लक्ष्य तुम्हाला आनंद देईल का? हे वाजवी आहे का? म्हणून, तिसरे नियम असा आहे की, लक्ष्य शहाणपणासह निवडले पाहिजेत.
    चौथा नियम हे लक्ष्य साध्य करण्याचा मार्ग आहे. तो काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे, हे यश गुरुकिल्ली असू शकते. स्पष्टपणे लक्ष्य निश्चित करताना, हे प्राप्त करणे शक्य आहे की नाही याबद्दल विचार करणे सुरू करा, तसे असल्यास, कशा प्रकारे या प्रकरणात आपली कौशल्ये कशी वापरली जाऊ शकतात, आपल्याला कशाची आवश्यकता आहे, आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आहे, जर नाही तर ती कशी मिळवायची. सर्व तपशीलांवर विचार करा, संपूर्ण योजनेचा चांगल्या प्रकारे विचार करा. हे अधिक चांगले आहे, चांगले आहे, परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की काही क्षणांचे अंदाज लावले जाऊ शकत नाही, तसेच चांगले आणि वैकल्पिक पर्याय विचारात घ्या. या विषयावर एक चांगली कल्पना आहे – विजय तयार करण्याची आवश्यकता आहे आणि उद्दीष्टाच्या बाबतीत, हे सत्य आहे. हे कसे साध्य करता येईल आणि आपल्यासाठी सर्वात योग्य काय आहे याचा विचार करा. सर्व अमानुष पद्धती दूर करा, तसेच त्यास ज्यामुळे कुणी दुःख सहन करावे. स्वत: ला धोका पत्करावू नका, किंवा आपल्या जीवनास किंवा आपल्या प्रियजनांना धोक्यात घालू नका. याचा कोणताही ध्येय योग्य नाही.

    कशासाठीही घाबरू नका – कोणतीही समस्या उद्भवू शकत नाही. जर आपण प्रवासाच्या सुरुवातीलाच स्वतःवर विश्वास ठेवला, तर यात शंका घेण्याचे काही कारण नाही. असे वाटते की आपण लक्ष्यापर्यंत दूर जात आहात आणि वेळ संपत आहे. आपल्या सर्व वेळ मुख्य गोष्ट – ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक गोष्ट करा. साध्य करण्यासाठी नवीन मार्ग शोधा
    आणखी एक मनोरंजक युक्ती – उद्दिष्टासाठी स्वत: ला प्रोत्साहित करण्याचे विसरू नका. आपण तिच्या जवळ जाता, तर आपल्याला एक नवीन मार्ग सापडला, यशस्वीरित्या एक मोठे अडथळा overcame – स्वत: ला एक भेट करा, काहीतरी आधी परवानगी नाही किंवा निरुपयोगी होते. प्रेरणा आपल्याला प्रेरणा आणि व्याजदर ठेवण्यास मदत करेल कारण नेहमीच हे उद्दीष्ट पूर्ण व्हायचे आहे, जरी आपल्याला ते नको असले तरीही. म्हणून, स्वत: ला संपुष्टात आणू नका, ध्येयासाठी फायद्यासाठी काम करा – परंतु नियंत्रणात लक्षात ठेवा की कोणतेही ध्येय आपल्या आरोग्याची किंमत नाही.
    Thank you,Sir!

    Reply
  17. सर प्रक्रिया-आधारित ध्येय सिद्धांताद्वारे जीवनातील कोणतेही ध्येय कसे साध्य करायचे? हा ब्लॉक वाचकांनी मनात अनेक प्रश्न येतात उदाहरण १) आपल्याला भविष्यात जे करायचे आहे ते साध्य करायला हा ब्लॉग आपल्याला कशा प्रकारे मदत करणार 3) खरंच असं असते का पहिले जेव्हा मी स्पर्धापरीक्षांची स्वप्न पाहिले होते तेव्हा मला वाटत होते ही स्पर्धा परीक्षांमध्ये अगदी सोपी गोष्ट पण आता पुण्यातून कळाले स्पर्धा परीक्षा म्हणजे काय स्पर्धा परीक्षेचे सत्य कळले आपल्या शाळा पुस्तक काढले तर मनात एक वेगळीच भीती वाटते आपण खरंच ही स्पर्धा उत्तीर्ण होऊन अधिकारी होउ की नाही आणि नाही झालो तर आपल्या आयुष्याची काय होणार पण सर ब्लॉग वाचतानी आणि ब्लॉग वाचून झाल्यानंतर एक वेगळाच अनुभव आला ब्लॉक वाचल्यानंतर जीवनातील सत्य कळले आपण भूतकाळ व भविष्यकाळ या दोन्ही काळाचा विचार न करून वर्तमानाचा विचार केला पाहिजे आपले रोज जे वेळापत्रक आहे त्यावर कठोरपणे अमल करणे आणि जे विद्यार्थी अधिकारी होऊ शकतात तर आपण काय नाही हा प्रश्न मनात उभा होतो आणि सर आपण ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे धैर्याचे सिद्धांतावर आपण कठोरपणे अंमलबजावणी केली तर कोणतीच गोष्ट जगात अशक्य नाही असे कळाले मला ब्लॉग वाचताना नेहमी ब्लॉग मध्ये एक नवी गोष्ट एक नवा विचार सापडतो येणारा भविष्यकाळाचा किंवा गेलेल्या भूतकाळाचा विचार न करता वर्तमान काळात आपल्या ध्येयासाठी आपण काय काय करू शकतो या ब्लॉगमधून माझ्या लक्षात आले
    या ब्लॉगमध्ये माझ्या आयुष्यातली चुकी आणि मी माझ्या वर्तमान काळामध्ये माझ्यासाठी काय काय करू शकतो या दोन गोष्टी मला शिकायला मिळाल्याजीवनात तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की आपले ध्येय आहे, आपण कुठे जात आहात, जीवनातून काय हवे आहे? ध्येय मुळात बदल दिशा बदलते, त्यामुळे ते स्पष्ट असावे, आपल्यास योग्य पाहिजे. हे निवडणे कठिण आहे, आणि उद्दीष्ट साध्य करणेही कठिण आहे. कारण त्यासाठी प्रेरणा, विश्वास, भरपूर शक्ती आवश्यक आहे. ध्येय व्हायला हवे, ते सर्व शक्य पद्धतींनी शोधले पाहिजे. जेव्हा आपण लक्ष्य कसे साध्य करायचे हे नियोजन करता तेव्हा आपल्याला असे वाटते की हे खूप सोपे आहे, परंतु कृती दरम्यान आम्ही अनेक अडचणींना सामोरे जातो जे प्रत्येकजण मात करू शकत नाही. एकीकडे, सेट गोल कसे मिळवायचे ते कठीण आहे, जर तुम्हाला हे कसे करायचे हे माहित नसेल तर मानसिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या स्वत: ला सेट करण्यासाठी काय करावे लागेल आणि सर्वसाधारणपणे निर्जीव लोकांना फारच अवघड आहे. पण, दुसरीकडे, आपण ज्या गोष्टी करीत आहात त्याबद्दल आपल्याला माहित असल्यास, आपण जे प्रयत्न कराल त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, इच्छित असल्यास आपण काय साध्य कराल, तर ते करणे सोपे होईल. आपल्याला काही महत्वाचे नियम लक्षात ठेवावे लागतील आणि मुख्य गोष्ट म्हणजे हे खूप हवे आहे.

    Reply
  18. कोणतीही ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठीं त्यासाठी एक proper way असतो त्यासाठी काही स्पेशल cheak points असतात . जीवनातला सगळयात मोठा भाग म्हणजे धेयप्रप्ती आपण ठरवलेली तरांकित ध्येय पूर्ण करून जीवनाला आनंदाच्या उंबरठ्यावर पोहोचवायच असेल तर त्या आपण ठरवलेल्या ध्येयाचे चेक points आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
    कोणत्याही Destionation पर्यंत पोहोचण्यासाठी त्या डेस्टीनेशन पर्यंतचा रोड मॅप आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे , एकदा का आपल्या जीवनाच्या ध्येयाचा आपण बघितलेल्या सुंदर स्वप्नांचा रोड मॅप आपल्याला भेटला तर ते ध्येय, आपण बघितलेली स्वप्ने पूर्ण करण्यास विलंब लागणार नाही . आणि तोच roadmap सदरील ब्लॉग मधून शिकायला मिळाला.

    हा roadmap माहिती करुन घेण्यासाठी , सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या अंतर्मनात डोकावून पाहून, स्वतःला ओळखून आपल्यामधील असलेल्या भन्नाट talent, , अप्रतिम कौशल्याच्या वापर करुन आपण एकाच ध्येयाची निवड करणे गरजेचे आहे. आपल्या मध्ये याच गोष्टीची कमतरता आढळून येते की, आपण position नुसार ध्येय बदलत असतो आणि जे ध्येय जी स्वप्न परिस्थितीनुसार बदलतात ती स्वप्ने आपण बघितलेली नसतात किंवा आपण ठरवलेली नसतात तर ते ध्येय इतरांकडून ठरवलेले असतात . यामुळे काय होते ? तर आपण वेळोवेळी धेय्य बदलल्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात पारंगत होत नाही आणि त्यामुळे आपल्याला खूप काही करायचं असून सुद्धा आपल्याकडून होत नाही .

    त्यासाठी एकच ध्येयाची निवड करून त्यामध्ये अगणित कामगिरी करून प्रचंड प्रमाणात यश मिळवता येते. महात्मा गांधी ठिकाणी म्हणतात की , “मर्यादित क्षेत्र निवडून त्यामधे अमर्याद काम करा “. एक स्पष्ट धेय्य ठरवल्यानंतर ते प्राप्त करण्यासाठीं आपल्याला steps 🪜 ची गरज असते . आपल्याला जर एखाद्या उंच ठिकाणी जयायचं असेल तर त्यासाठी पायऱ्या ची गरज भासते पायऱ्या शिवाय आपण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही तसंच आयुष्यात सुद्धा उंच भरारी घेण्यासाठी उंच उंच जाऊन आपलं नाव आपली कीर्ती गाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात पोहोचवण्यासाठी आपल्याला system तयार करावी लागेल.

    एखाद काम जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्यापुढे बाकी इतर गोष्टी न राहता फक्त ते काम असले पाहिजे आपलं पूर्ण लक्ष त्या कामावर पाहिजे . ते काम आपण आपल्या मध्ये असलेलं १००% potential use करून केलं पाहिजे तरच त्यामधून येश्याची गार हवा आपल्याला अनुभवायला मिळते . परंतु हल्ली आपला focous आपल्याला काय साध्य करायचा आहे यावरून असून भविष्यामध्ये किंवा साध्य केलं तर त्या मधून काय मिळते यावरच जास्त प्रमाणात आहे. उदा. जर मला अधिकारी व्हायचं असेल तर अधिकारी होण्यासाठी मला चांगल्या इन्टेन्सिटी ने अभ्यास करणे गरजेचे आहे , पूर्ण लक्ष केंद्रित करून पुस्तकाचं पान न पान चाळून काढणे आवश्यक आहे परंतु आम्ही अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते याकडे लक्ष कमी केंद्रित करून अधिकारी झाल्यानंतर आपल्याला कोणते कोणते लाभ मिळतात ( पैसा, गाडी, बंगला ) याच गरक्या मध्ये फिरत आहोत. ज्या गोष्टीतून आपल्या ला काहीतरी पाहिजे त्यासाठी वेळ , मेहनत आपल्याला द्यावी लागते परंतु आपण आपली ऊर्जा त्यातून मिळणाऱ्या लाभाच्या विचारातच घालवत असल्यामुळे आपण बघितलेल्या मोठ्या मोठ्या स्वप्ना पासून वंचित होत आहोत.

    हे थांबवण्यासाठी सर्वात महत्वाचा चेक ponts म्हणजे एक goal ठरवून ते प्रप्तकरण्यासाठी वर्तमानात काम करणे त्यामधे भविष्याच्या लाभाची अपेक्षा कमी असावी. यामुळे होणारा दुसरा फायदा म्हणजे आपण totaly present असू त्यामुळे आपल्याला भविष्याच्या काळजीची चाहुलच लागणार नाही आणि या मुळे जीवनात आनंदाचं आनंद असेल यात काही शंका नाही .

    म्हणून जीवनाचा शेवटी उद्देशच तो असतो की, आपल्या जीवनात आनंदी आनंद आला पाहिजे, समधनाचा महापूर आपला पाहिजे , आपल्या अवतीभोवती समृध्दी नांदली पाहिजे त्यासाठी हे आपण ठेवलेले धेय्य पूर्ण झाली पाहिजेत आणि ते पूर्ण होण्यासाठी काही सिद्धांत असतात जे की मला या सुंदर लिखाणातून गवसले तर त्यासाठी Heartly thanks

    Reply
  19. आज या प्रचंड गर्दीच्या सुंदर अशा जगाबद्दल विचार करत असताना एक गोष्ट लक्षात येते की , यामधील जवळपास 97 टक्के लोकं तडजोडीचे जीवन जगतात , त्यांचे सगळे आयुष्य रडगण्यात घालवत असतात. आणि अगदी काहीच लोक त्यांचे जीवन आनंदाने, समाधानाने जगत असतात मग बकीच्याकडे एवढे चांगले कल्पना असूनसुद्धा ते त्यांचं जीवन उजळू शकत नाहीत या सर्व गोष्टीची कारणे शोधली असता आणि त्यातून यशाचा मार्ग काढण्यासाठी हा ब्लॉग खूपच सोयीस्कर आणि उपायकारक आहे .

    कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी एक system तयार करणे ही बाब खूप महत्वाची आहे . आपण अशी कल्पना केली की जर समजा आपल्या आसपास च्या प्रदेशात रस्तेच तयार केलेले नाहीत तर आपण आपल्याला एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर किती वेळ लागेल? याचा विचार केला तर ज्या ठिकाणी आपल्याला पोहचायचे आहे ते ठिकाणचं आपल्याला भेटणार नाही आणि जरी भेटल तर त्यावेळी आपल आख्ख आयुष्य तिथपर्यंत पोहचण्यात जाईल म्हणून जर specific road ने आपण त्या destionation कडे रवाना झालो तर नक्कीच कमी वेळेत आणि कमी ऊर्जा खर्च करून त्या ठिकाणी अगदी सहजतेने पोहचू शकतो . म्हणून प्रक्रिया खूप महत्वाची आहे .

    आता त्या प्रक्रियेमध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे आपल्याला ज्या क्षेत्रात आपल्या जीवनाचा उद्देश साध्य करायचा आहे ते प्राप्त करण्यासाठी तो उद्देश आपल्या मिळणे आवश्यक आहे कारण जर destination माहिती असेल तरच आपलं त्या ठिकाणीं आपल्या आयुष्याचं विमान उतरवू शकतो .

    आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे एकदा का destination पक्क झालं की लगेच कामाला सुरूवात करावी लागेल . क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आपण फक्त एक धेय्य निश्चिती करून त्याबद्दल नुसता विचार करत बसाल तर वाचाळता सारखं होईल आणि त्यावर कृती जर केली नाही तर सगळं व्यर्थ होईल. म्हणून जर आपल्याला USA ला जयायच असेल आणि airport वर जर निरीक्षण केलं तर एक लक्ष्यात येते की, ज्यावेळी त्या विमानाला सांगितलं जाते की तुम्हाला ह्या ह्या ठिकाणी जायायच हे तेंव्हा ते लगेच त्या दिशेने take off घेतात आणि त्या ठिकाणी ते पोचेपर्यंत उतरत नाहीत म्हणून आपल्याला सुध्धा take off घेणे गरजेचे आहे .

    ज्या लोकांच्या आयुष्या मधून हास्य डिलीट झालेला आहे अशा लोकांच्या बाबतीत काय झाले असेल या गोष्टीचा विचार करत असताना असे लक्षात येते की, त्यांच्याकडे ध्येयप्राप्तीसाठी ची वेळ होती ती त्यांनी प्रत्यक्षात कृतीतून अगदी कमी घालवलेली आहे आणि भविष्याचा विचार करून वर्तमान हरवलेला आहे . त्यांचा वर्तमानच उपाशी असल्यामुळे भविष्याच्या पोटाचा प्रश्न खूप गंभीर होता त्यामुळे आपण सुद्धा ध्येय निश्चित केल्यानंतर ध्येय प्राप्ती नंतरच्या जिवनात रमतो आणि आपल्या हातात असलेला वेळ वाया घालवतो त्यामुळे वर्तमान निकामी ठरल्यामुळे भविष्याचे वांदे व्हायला सुरुवात होतात.

    आपल्या ध्येयाची पूर्ती करण्यासाठी, आपल्या आकाशाएवढी उत्तुंग स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्याचा वेळ आपल्या हातात आहे, आणि कोणती गोष्ट जी आपल्या हातात आहे त्या गोष्टीवर आपण पूर्णपणे राज्य करू शकतो त्यामुळे त्याची वेळ आहे त्यावेळेला जर सोन करण्याचा आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपलं भविष्य हिरा सारखं होईल.

    आपल्याकडे जो हा उद्या करू, पुन्हा करू, काही वेळाने करू असा घाणेरडा नियम आहे तो नियम मुळासकट उपटून टाकल्याशिवाय आपल्या कृतीचा वेग प्राप्त होणार नाही आणि वेगाशिवय यश सुध्दा लांब असेल Succes want to speed त्यामुळे आपल्या कार्यामध्ये वेग प्राप्त करून तो वेग योग्य दिशेने मार्गी लावू जर कार्य केलं तर नक्कीच यश मिळवण्या पासून आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही आणि जीवनाचा उद्देश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
    हा energetic blog दिल्याबद्दल Heartly thanks

    Reply

Leave a Comment

Translate »
error: Content is protected !!