आज उत्तम जीवन जगण्यासाठी उत्तम पैसे कमावता येणे गरजेचे आहे. उत्तम पैसे कामविण्यासाठी जे कौशल्य मदत करू शकते ते म्हणेजे विक्री कौशल्य होय.
प्रस्तुत ब्लॉग मध्ये विक्री कौशल्य हे महत्त्वाचे कौशल्य का? याची चर्चा केली आहे.
काही वर्षापूर्वी विकणे, विक्री किंवा सेलिंग हे शब्द जेव्हा मी वाचायचो किंवा ऐकायचो तेव्हा असे वाटायचे की हे केवळ मार्केटिंग मध्ये काम करणाऱ्या आणि वस्तु विकणाऱ्या सेल्समन साठीच आहे.
परंतु, पुढे मी या विषयाचा अभ्यास करायचा म्हणून या विषयावरील काही पुस्तकांचे वाचन सुरू केले तसेच काही ऑफलाइन आणि ऑनलाईन वर्कशॉप्स अटेंड केले तेंव्हा विकणे, विक्री किंवा Selling ह्या संकल्पना खऱ्या अर्थाने कळायला लागल्या आणि त्याचा उपयोग मला माझ्या जीवनात होऊ लागला.
आजच्या ब्लॉगमध्ये विक्री कौशल्य श्रेष्ठ कौशल्य असे का? आपल्या समोर हेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आज तुम्ही कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करीत असाल किंवा काहीतरी करण्याची धडपड करीत असाल, तर त्या व्यवसाय आणि नोकरी मध्ये तुमची जी काही भरभराट झाली असेल परंतु ज्या प्रमाणात भरभराट व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ती होताना दिसत नसेल ना? तर त्याची उत्तरे या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की सापडतील.
मग यांसाठी कोणते असे रिझल्ट ओरिएन्टेड कौशल्य आहे? जेणेकरून ते सर्व साध्य होईल?
चला तर मग ह्या ब्लॉगमध्ये विक्री कौशल्य (Selling Skill) समजून घेऊया, ज्यामुळे तुम्ही तुमच्या नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक व सामाजिक जीवनात उत्तम प्रगती करू शकाल, हाच या ब्लॉग लिहण्यामागचा एकमेव उद्देश आहे.
यशस्वी जीवनसाठी विक्री कौशल्याचे काय महत्व आहे? ते सविस्तर समजून घ्यायला तुम्ही तयार आहात? चला तर मग सुरूवात करूया.
१) विकण्याची कला (Selling Skill):-
आज आपल्यापैकी प्रत्येक जण विक्रेता आहे हे आपण मानले किंवा नाही मानले तरी ते सत्य आहे.
आपल्याला बरेचदा प्रश्न पडतो की विक्रेता म्हणजे कोण असतो? एखादी वस्तु विकणाराच फक्त विक्रेता असतो काय?
विक्रेत्याची व्याख्या करताना रॉबर्ट लुईस स्टिव्हन्सन म्हणतात की, “ती प्रत्येक व्यक्ती विक्रेता असते की जे आपली वस्तू, सेवा किंवा विचार विकत असते.”
“Anyone Who Sells a Product, Service or an Idea is a salesperson”. -Robert Louis Stevenson.
याच कलेला आज High Paying Skill असेही म्हणतात.
जेंव्हा आपण कोणत्याही कंपनीचे Balance Sheet (जमाखर्च) तपासत असतो तेंव्हा एका बाजूला कंपनीचा सर्व खर्च (Expenses) असतो आणि दुसऱ्या बाजूला विक्री (Sales) असतो.
कंपनी पुढे चालणार, बंद पडणार की विकसित होणार हे त्या कंपनीच्या सेल्स किंवा विक्री यावर अवलंबून असते. म्हणजेच, कंपनीचा फायदा किंवा तोटा हे त्या कंपनीत झालेल्या वस्तू, सेवा किंवा विचार यांच्या विक्रीतून झालेला असतो.
आज प्रत्येकजण काही ना काही विकत आहे, कोणी वस्तू, कोणी सेवा तर कोणी विचार विकत आहे.
उदा. एक उमेदवार नोकरी मिळविण्यासाठी मुलाखत देतांना मुलाखत घेणाऱ्यांपुढे काय करतो?…तो स्वतःचे विचारच विकत असतो.
एक मुलगा एका मुलीपुढे लग्नासाठी प्रस्ताव ठेवतो तेंव्हा तो काय करतोय? तर आपले विचारच विकत असतो ना !
एक वकील न्यायाधीशांपुढे आपल्या क्लाइंट ची केस मांडत असतो, म्हणजेच काय करतो? आपले विचारच विकत असतो ना!
एक नेता आपल्या मतदारांना आपले विचारच विकत असतो.
एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांपुढे आपले विचार मांडत असतात, म्हणजे काय करतात? तर ते आपले विचारच विकत असतात.
हे समजून घेताना थोडे आठवून बघा तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयातील किती शिक्षक आज आठवतात? अगदी मोजकेच ना? असे का? तर ज्यांचे विचार तुम्हाला छान वाटले होते तेवढेच शिक्षक स्मरणात राहिलेत.
म्हणजेच विकणे हे किती महत्वाचे कौशल्य आहे. यावरून आपल्या लक्षात येते. हो की नाही?
जे विकायला कमी पडतात किंवा विकणे या कलेला कमी / तुच्छ लेखतात त्यांचे व्यवसाय (धंदे) बंद पडताना दिसतात.
वर्ल्ड बिझनेस सर्वेनुसार, जगातील 90℅ व्यवसाय सुरुवातीच्या पाच वर्षात बंद पडतात हे याच कलेच्या कमतरतेमुळे होत असते.
आज कोणतीही कंपनी किंवा दुकानदार कोणामुळे मोठे किंवा यशस्वी होतात? तर ग्राहकांमुळे, आणि तेही विकण्याची कला त्यांच्याजवळ असेल तरच ते यशस्वी होताना दिसतील नाही तर बरेच दुकानदार, व्यावसायिक हे कस्टमरची वाट बघत असतात, परंतु त्यांच्याकडे कोणीच फिरकतांना दिसत नाही.
असे म्हटले जाते की कोणतीही वस्तू, सेवा आणि विचार विकत घेण्यापूर्वी ग्राहक बरेचदा विकणारी व्यक्ती आपले प्रॉडक्ट विकताना आपल्यासोबत कशाप्रकारे संवाद साधते हे बघत असतो. याचे उदाहरणे द्यायचे झाल्यास…
पेशंट नेहमी चांगल्या डॉक्टर च्या शोधात असतो.
लोकं आपले कोर्टाचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगल्या वकिलाचा शोध घेत असतात.
देशातील मतदार चांगल्या नेत्याच्या प्रतीक्षेत असतात.
पालक आणि विद्यार्थी चांगल्या शाळा व शिक्षकांचा शोध घेत असतात.
लोकांना चांगले मित्र किंवा चांगल्या मैत्रिणी हव्या असतात.
मानसिक ताण किंवा डिप्रेशन यातून बाहेर काढणाऱ्या चांगल्या कौन्सिलरच्या शोधात लोकं फिरत असतात.
जीवनामध्ये मार्गदर्शन करणारा चांगला मार्गदर्शक लोकांना हवा असतो.
वरील सर्व उदाहरणामध्ये चांगला (Best) या शब्दावर जोर दिला आहे.
खरेदी करण्याच्या बाबतीत आपण आपलेच उदाहरण जर घेतले तर हे कौशल्य जास्त लक्षात येईल, जसे की, जेव्हा आपल्याला एखादी वस्तू, सेवा किंवा विचार खरेदी करायचा असतो तेव्हा ते आपण कोणाकडूनही विकत घेत नाही, जरी बाजारात खूप पर्याय उपलब्ध असतील तरी ते आपण विशिष्ट कंपनी किंवा खास व्यक्तीकडूनच घेत असतो.
यावरून असे लक्षात येते विकणे ही एक कला तसेच ते एक शास्त्र (Arts & Science) सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे हे कौशल्य शिकता येण्यासारखे आहे.
आज आपल्यापैकी प्रत्येकाने वेगवेगळ्या कला, पदव्या, विविध पदे मिळवलेली आहेत परंतु ते लोकांपुढे मांडण्याचे कौशल्य जर आपल्याकडे नसेल तर एव्हढे मिळवूनही काहीच अर्थ उरणार नाही,
त्यामुळे आपल्याला एक कॉमन व्यक्ती म्हणून जगावं लागतं, आणि हे कौशल्य ज्यांनी ज्यांनी आत्मसात केले आहे आणि विकण्यात नैपुण्य मिळविले आहे त्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आलेली दिसेल. हे बरोबर आहे की नाही?
विकण्याचे कौशल्य आत्मसात केल्यामुळे आपल्या जीवनात खालील प्रकारचे फायदे होतात.
१) या कौशल्यामुळे आपल्याकडे असलेल्या वस्तू, सेवा आणि विचार आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो.
२) विकणे म्हणजे लोकांना फसवणे नसून त्यांना मदत करणे होय. (Selling Means Helping)
३) जीवनात आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) मिळवायचे असेल तर ते फक्त विकणे (Selling) हेच कौशल्य देऊ शकते.
४) हे कौशल्य आपण आत्मसात केल्यामुळे इतरांनाही ते आपण शिकवू शकतो, व त्यांच्याही जीवनात मूल्य समाविष्ट (Value Addition) करू शकतो.
या एका कौशल्यामुळे अनेक लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात आजपर्यंत खूप मोठे परिवर्तन घडून आले आहे.
असे म्हटले जाते की, हे एक कौशल्य ज्या लोकांकडे असेल तीच लोकं भविष्यात यशस्वी होतील.
मागील हजार वर्षात जेवढ्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध नव्हत्या तेवढ्या संधी या दहा वर्षात निर्माण झाल्या आहेत. त्या सर्व संधींचा लाभ घेण्यासाठी विकण्याचे कौशल्य (Selling Skill) आत्मसात करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
मला आजपर्यंत या विषयाचे प्रभुत्व असलेल्या लोकांकडून जे सूत्र गवसले आहे ते असे आहे की, …
विकणे म्हणजे केवळ आपले प्रॉडक्ट दुसऱ्यावर थोपवणे नव्हे तर, विक्रेता व ग्राहक यांच्यातील उत्साहाचे देवाण-घेवाण होय.
(Selling is nothing but a transformation of enthusiasm between the seller to the buyers)
आज जगात या कौशल्यावर अनेक एक्सपर्ट लोकांनी बरेच अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे, तसेच विविध अभ्यासक्रमही तयार केले आहेत.
ह्या कौशल्याचे ज्ञान तुम्हाला चांगले अवगत करून यशस्वी होण्यासाठी या विषयावरील कोर्सेस आणि पुस्तके मदत करतील.
आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कोणत्या दोन गोष्ठी खास वाटल्या त्या नक्की कळवा, जेणेकरून मला आणखी लिहिण्यास प्रेरणा मिळेल.
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
आणखी वाचा: जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवावे? How to get what you want in life?
यशस्वी जीवनसाठी विक्री कौशल्याचे काय महत्व आहे? What is the Importance of Selling Skill for Successful Life?
# “ज्याला बोलता येत त्याचे कुळीद पण विकतात आणि ज्याला बोलता येत नाही त्याचे गहू पण विकती नाही.” अशी आमच्या कडे म्हण आहे.
आज ह्या ब्लॉग चा मी शीर्षक बघितला तस मलाही सरांसारखं वाटत होतं कि विक्री कौशल्य म्हणजे फक्त प्रॉडक्ट विकायचे कौशल्य. पण जेव्हा मी लेख वाचला कि जर आपल्याला समाजात आपली छाप उमठावयची असेल तर हे कौशल्य आपल्यात असलं पाहिजे.
आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे , आपले विचार एखादया समोर मांडता आले पाहिजे आणि हे कौशल्य जर आपल्यात नसेल तर आपण कशे उत्तम जीवन जगू शकतो?
मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीतच आहे कि महात्मा गांधीजी मोठमोठे आंदोलन उभे करायचे . कधी विचार केला कि सर्व लोक त्यांचे कसे ऐकत असतील? , इथे सक्के भाऊ भाऊ एक दुसऱ्या चे ऐकती नाही. कारण मित्रांनो त्यांच्यात (महात्मा गांधीत) ती क्षमता होती. त्यांच्यात ती कला होती, ते कौशल्य त्यांच्यात होते म्हणून ते मोठमोठे आंदोलन उभ करायचे. आपले विचार दुसऱ्या पर्यंत पोहोचवायचे हे कौशल्य एक उत्तम जीवन जगण्याचा मार्ग आहे. पण आपण जी गोष्ट दुसऱ्या पर्यंत पोहोचू इच्छितो ती गोष्ट हि चांगली असली पाहिजे , योग्य असली पाहिजे . कारण लोकांना चांगली गोष्ट, विचार, वस्तू हवी असते. आणि ती ग्राहकांनुसार तेव्हढी चांगली असली पाहिजे . आणि आपल्याकडे हे कौशल्य असेल तर आपण कोणत्या न् कोणत्या क्षेत्रात जीवनात यशस्वी नक्कीच होऊ.
धन्यवाद सर या अमूल्य माहितीमुळे बऱ्याच लोकांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकेल.
” बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही.” म्हणजेच आपल्याला कोणत्याही व्यक्ती समोर आपले विचार मांडायचे/ विचार विकायचे असतील तर आपल्याला उत्तम रीत्या बोलता यायला हवे. आजपर्यंत Selling skills म्हणजेच फक्त business related असतं असं वाटायचं.पण हा ब्लॉग वाचल्यावर मात्र हे लक्षात आले की ह्याचा उपयोग याआधीही आपण केलाय आणि यापुढेही आपल्याला करायचाय.
Thank you sir, for sharing this amazing thought with us
विक्री, वस्तू सेवा विक्री selling skills हे शब्द बरेच दिवस झाले सर कानावर पडतच नाही अकरावीत असताना मी वाणिज्य ही शाखा निवडली होती तेव्हा वाणिज्य मध्ये एक वेगळाच विषय असतो कला वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन असे म्हणतात आणि त्या विषयात व इतर विषयात विक्री आणि फक्त विक्री या कलेला विकसित करण्याचे मार्ग सांगितलेले आहे आणि कसे विकसित करावे हे सांगितलेले आहे
अकरावी आणि बारावी या दोन वर्षांमध्ये कानावर जास्तीत जास्त पडले शब्द म्हणजे विक्री आणि फक्त विक्री आणि बारावी नंतर मला आवडणारी कला शाखा निवडली आणि पुण्यातील नामवंत कॉलेज आबासाहेब गरवारे कॉलेज इथे आलो बारावी झाल्यावर मला असे वाटले विक्री या शब्दाचं किंवा या कलेचं आपल्याला या क्षेत्रात मध्ये कलाक्षेत्रात काहीच काम नाही आणि कलाक्षेत्र निवडल्याबद्दल आपल्याला जीवनात कधी या कलेचा वापर होणार नाही मी आतापर्यंत मला वाटत होतं की व्यवसाय किंवा उद्योग या क्षेत्रातील लोकांनाच विक्री या कलेची आवश्यकता असते परंतु आज ब्लॉग वाचल्यानंतर विक्री या शब्दाचा खरा अर्थ समजले सर आणि आपण सांगितल्याप्रमाणे ही व्याख्या (रॉबर्ट लुईस स्टिव्हन्सन म्हणतात की, “ती प्रत्येक व्यक्ती विक्रेता असते की जे आपली वस्तू, सेवा किंवा विचार विकत असते.”) विचार विकणे हा थॉट मला कधी माहीतच नव्हता जीवनात आणि आज पहिली वेळेस हे वाक्य ऐकले आणि सर आजपासून या विक्री कलेचा कसा विकास करायचा हेही कळले आणखी एक गोष्ट म्हणजे सर आपण सांगितल्याप्रमाणे याची उदाहरणे शाळेतील शिक्षक इत्यादी आमच्या जीवनातील हेच झालेले उदाहरण आहे सर आज ब्लॉग मधून पडले ब्लॉक मधला मार्गदर्शना मधून आणि धैर्य प्राप्तीसाठी आणखी एक पाऊल समोर धन्यवाद सर
विक्री, वस्तू सेवा विक्री selling skills हे शब्द बरेच दिवस झाले सर कानावर पडतच नाही अकरावीत असताना मी वाणिज्य ही शाखा निवडली होती तेव्हा वाणिज्य मध्ये एक वेगळाच विषय असतो कला वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन असे म्हणतात आणि त्या विषयात व इतर विषयात विक्री आणि फक्त विक्री या कलेला विकसित करण्याचे मार्ग सांगितलेले आहे आणि कसे विकसित करावे हे सांगितलेले आहे
अकरावी आणि बारावी या दोन वर्षांमध्ये कानावर जास्तीत जास्त पडले शब्द म्हणजे विक्री आणि फक्त विक्री आणि बारावी नंतर मला आवडणारी कला शाखा निवडली आणि पुण्यातील नामवंत कॉलेज आबासाहेब गरवारे कॉलेज इथे आलो बारावी झाल्यावर मला असे वाटले विक्री या शब्दाचं किंवा या कलेचं आपल्याला या क्षेत्रात मध्ये कलाक्षेत्रात काहीच काम नाही आणि कलाक्षेत्र निवडल्याबद्दल आपल्याला जीवनात कधी या कलेचा वापर होणार नाही मी आतापर्यंत मला वाटत होतं की व्यवसाय किंवा उद्योग या क्षेत्रातील लोकांनाच विक्री या कलेची आवश्यकता असते परंतु आज ब्लॉग वाचल्यानंतर विक्री या शब्दाचा खरा अर्थ समजले सर आणि आपण सांगितल्याप्रमाणे ही व्याख्या (रॉबर्ट लुईस स्टिव्हन्सन म्हणतात की, “ती प्रत्येक व्यक्ती विक्रेता असते की जे आपली वस्तू, सेवा किंवा विचार विकत असते.”) विचार विकणे हा थॉट मला कधी माहीतच नव्हता जीवनात आणि आज पहिली वेळेस हे वाक्य ऐकले आणि सर आजपासून या विक्री कलेचा कसा विकास करायचा हेही कळले आणखी एक गोष्ट म्हणजे सर आपण सांगितल्याप्रमाणे याची उदाहरणे शाळेतील शिक्षक इत्यादी आमच्या जीवनातील हेच झालेले उदाहरण आहे सर आज ब्लॉग मधून पडले ब्लॉक मधला मार्गदर्शना मधून आणि धैर्य प्राप्तीसाठी आणखी एक पाऊल समोर धन्यवाद सर
नमस्कार सर,
यशस्वी जीवनासाठी विक्री कौशल्याचे महत्त्व काय? हे वरील ब्लॉगमधून समजते.विक्री कौशल्य हे आपल्यासाठी नव्हे तर फक्त सेल्समन किंवा एखादा product विकणाऱ्या साठीच आहे असं वाटायचं. परंतु या ब्लॉगमध्ये सरांनी मांडला आहे की विक्री करणे म्हणजे फक्त एखादा प्रॉडक्ट विकणे किंवा सेवा provide करणे एवढेच नव्हे तर आपण आपले स्वतःचे विचार सुद्धा विकत असतो. ही संकल्पना मला फार वेगळी वाटली. विक्रेता म्हणजे कोण हे
सांगताना रॉबर्ट लुईस स्टिव्हन्सन म्हणतात की, “ती प्रत्येक व्यक्ती विक्रेता असते की जे आपली वस्तू, सेवा किंवा विचार विकत असते.”
यालाच High paying skill म्हणतात. हे skill ज्यांच्याकडे आहे त्यांचेच व्यवसाय चालतात नाहीतर आपण ते बंद पडलेले पाहतो. आपण काही खरेदी करायच असेल तर अनेक options असतात पण आपण एका विशिष्ट व्यक्तीकडूनच खरेदी करतो. कारण त्याच्या कडे selling skill असते.आपण नेहमी Best च्या शोधात असतो. आपण एखादी वस्तू खरेदी करताना observe करतो कि product विकणारा व्यक्ती (seller)आपल्याशी किती चांगल्या रीतीने बोलतो. संवाद कसा साधावा हे एक महत्त्वाचं skill सेलर कडे असलं पाहिजे. विकण्याचे कौशल्य आपण आत्मसात केले तर आपल्याला खूप फायदे होतात ते फायदे तुम्ही या blog मध्ये सांगितलेले आहेत.
विकणे म्हणजे केवळ आपले प्रॉडक्ट दुसऱ्यावर थोपवणे नव्हे तर, विक्रेता व ग्राहक यांच्यातील उत्साहाचे देवाण-घेवाण होय. हे महत्त्वाचे सूत्र तुम्ही आमच्याशी शेअर केले आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याकडे selling skill असलं पाहिजे.
सर, प्रत्येक ब्लॉग मधून आम्हाला काही ना काही नवे आत्मसात करायला मिळते.
Thank you Sir.
या पृथ्वीतलावरच्या प्रत्येक माणसाजवळ काहीतरी वेगळे कौशल्य असतेच , कौशल्य वीणा जीवन असू शकत नाही आणि तेच कौशल्य आपल्या जीवनाला सामन्यातून असामान्य करत असतात. यामध्येच विक्री कौशल्य हे आपल्या यशस्वी जीवनाचा प्राण असतो . ज्या व्यक्तीकडे काहितरी विकण्याची कला आहे त्या व्यक्तीच जीवन अगदी शून्य जरी झालं तरी सुध्दा तो उपाशी मरत नाही, पुन्हा आपल्या जीवनाची झेप गरूडासारखे उंच उंच घेण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण होतें. मला तर वाटते या विक्री कौशल्य वीणा जीवनाला अर्थच उरणार नाही आणि येशाची मोठी झडप घेण्यासाठी हे कौशल्य अत्यंत महत्वाची आहेत .
मला तर आत्तापर्यंत विक्री म्हणजे फक्त एखादी वस्तू बाजारात जाऊन विकणे व त्याबदल्यात विशिष्ट रक्कम घेणे येवढ्या पुरतीच विक्री ची व्याख्या/ अर्थ माहित होता परंतू माणसाच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विक्री केल्या शिवाय पर्याय नाही हे मात्र या ब्लॉग मधून अभ्यासायला मिळालं . मग त्यामधे एखादी वस्तू असेल, किंवा सेवा असेल किंवा अपली कल्पना असेल ( Product, Service and Idea ) या बाबींचा मुख्यतः समावेश होतो.
आपल्या लाईफ मध्ये आपल्याला प्रचंड सन्मान असला पाहिजे, आपलं जिवन आनंदाने , समधनाने तुडूंब भरलेले असले पाहिजे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आणि या इच्छेला वास्तवात आणण्यासाठी पैस्याच स्थान अत्यंत महत्वाचं, मोलाचं आणि उच्च आहे . मग हा पैसा मिळवण्यासाठी विक्री कौशल्य हे औषध खुप गुणकारी आहे. आपण एखादी वस्तू स्वतः तयार करून समाज उपयोगासाठी त्या वस्तूची विक्री करून त्यामधून पैसा, publicity मिळवू शकतो. त्याचबरोबर आपली वस्तू समाजासाठी उपयोगी पडत आहे , आपण समाजाची एक गरज भागवत अहोत म्हणजेच indirectly आपण समाजसेवा या माध्यमातून करतं आहोत. त्याचबरोबर आपल्या सेवेमधून जीवन घडत असेल तर त्यापेक्षा मोठं सुख अजून कुठून मिळणार आहे, आपण मांडलेल्या एखाद्या कल्पनेमुळे समाजाचा , देश्याचा खुप मोठा फायदा होणार असेल तर यापेक्षा मोठी देशसेवा , देशभक्ती कुठे मिळणार आहे .
हे सर्व आपण विक्री कौशल्यामुळे साध्य करू शकतो . आता हे कौशल्य सर्वांकडेच उच्च प्रतीचे असेल असे नाही परंतू ज्यांच्याकडे हे कौशल्य चांग्याप्रकारे आहे ज्यांनी या कौशल्याला महत्वाचं स्थान दिलेलं आहे त्याचं जीवन हे इतरांपेक्षा नेहमीचं वेगळं असेल असे या ब्लॉग वरून समजत. हे कौशल्य Develope करण्यासाठी इतरांच्या समोर present होन , इतरांना आपल्या product, Service and Idea पटवून देऊन त्यांची मन आपल्याकडे आकर्षित करण ही सगळयात महत्वाची बाब आहे, ज्यांना हे जमतं ते यामध्ये प्रावीण्य मिळवू शकतात ज्या माणसाच्या बोलण्यात ताकद असते ते माणूस हे कौशल्य लवकर आत्मसात करु शकतं.
हे अतिमहत्वाचं कौशल्य सगळ्यांनीच Develop केलं पाहिजे आणि यातून आपला आणि समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे . अशी महत्वाची शिकवणं या blog मधून मिळाली खरंच सर हा लेख वाचून mind मध्ये विक्री कौशल्याच्या विचारांची यात्रा भरलेली आहे आणि ते नक्किच माझ्यासाठी खूपच profitable आहे . Heartly thanks
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी selling skills किती important असते हे या blog मधून समजते!
अगोदर selling म्हटलं कि हे फक्त व्यवसाय च्या संर्दभात आहे असेच वाटायचे, परंतु आज हा blog वाचून समजले की हे आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक ठिकाणी लागू होते,
Successful business करायचा असेल तर communication skills खूप matter करतात,
तुमचा selling product कोणता आहे त्या पेक्षा
तुम्ही तो product कोणत्या/कशा रितीने sell करता हे खूप important आहे!
Inshort तुम्ही तुमचे विचार समोरच्याला पटकन समजतील व त्यांच्या शी connect होतील relate होतील अशा पद्धतीने मांडणे यावर सर्व अवलंबून आहे,
मी 12th Science stream मधे असताना English च्या textbook मधे एक lesson होता जो पूर्ण पणे एका doctor वरती अवलंबून होता, त्याचे मर्म त्या एका doctor भोवतीच फिरत होते
(त्या पूर्ण शहरा मध्ये तो एकच doctor खूप प्रसिद्ध होता आणि त्याचे कारण म्हणजे तो सर्वांशी प्रेमाने बोलायचा, त्यांची विचारपूस करायचा खास करून वृध्द लोक आणि नंतर मग काय health issue झाला आहे ते विचारायचा आणि त्या मुळेच वृध्द लोकांमध्ये तर तो खूप च famous होता,
इथून पुढची त्याची गोष्ट वेगळी आहे
त्यानंतर त्याच्या आयुष्यात खूप मोठा twist येतो ज्यामुळे त्याला 6 Months bedrest करायला सांगितले जाते व नंतर तो लेखक बनतो.
यावरून आपल्या ला हे समजते की तुमच्या कडे फक्त ज्ञान, degree certitificates ,gold medals असून चालत नाही तर ते कसे /कोठे apply करायचे, communication skills सुध्दा असणे आवश्यक आहे..)
मला हे आज आठवले कारण ह्या blog मधील selling skills त्याच्याशी relate करतात.
Thank you so much Sir for writing this fabulous blogs!
Because जे लोक अजूनही selling products, selling skills ह्या गोष्टी फक्त business related आहेत असे समजतात त्यांचा हा गैरसमज हा blog वाचून नक्कीच दूर होईल असे मला वाटते.
Selling skills ही गोष्ट फक्त marketing field मधेच लागते, असे मला वाटायचे. आज आपल्यापैकी प्रत्येक जण विक्रेता आहे, हे आपण मानले किंवा नाही मानले तरी ते सत्य आहे. हे मला आज कळले. कारण प्रत्येक व्यक्ति वस्तू, सेवा किंवा विचार विकत असते. एक शिक्षक, वकील, नेता… हे आपले विचारच विकत असतात. यावरुन ही गोष्ट कळते की, जसे कोणतेही product बनवताना, विकताना किंवा घेताना त्याची क्वालिटी व quantity चा आपण विचार करतो. त्याच प्रमाणे आपल्या विचारांची क्वालिटी पण खूप महत्वाची आहे. जसे row material मध्ये quality असेल म्हणजेच आपले विचार, तरच main product पण उत्तम क्वॉलिटी che असेल, म्हणजेच ती सेवा.
या ब्लॉग मधे सगळ्यात महत्वाची गोष्ट कळली ती म्हणजे, विकणे म्हणजे केवळ आपले product दुसऱ्यावर थोपवणे नव्हे तर, विक्रेता व ग्राहक यांच्यातील उत्साहाची देवाण – घेवाण होय.
म्हणूनच सगळ्यांना सरांशी बोलून उत्साही किंवा हलके वाटते,कारण तो त्यांच्यातला उत्साह त्यांनी आपल्याला विकलेला असतो आणि तो आपण घेतलेला असतो.
मला आज पर्यंत selling हा शब्द फक्त एखाद्या प्रोडक्स साठी, किंवा ग्राहक आपल्या विक्रेत्यांसाठी वापरतो, असं वाटत होतं, पण मला आज कळलं कीsellingहा शब्द आपणही रोज वापरत असतो, आपले मत पटवून देण्यासाठी आपण समोरच्याला आपले विचार विकतच असतो ना, तसेच शिक्षक विद्यार्थ्यांना आपले विचार विकत असतात, म्हणजे या शब्दाचा वापर आपण आपले कौशल्य विकसित करण्यासाठी करत असतो, selling
Ya शब्दाचा स्किल ज्याच्याकडे चांगले असते तो व्यक्ती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला असतो, परंतु ज्याला हे स्किल वापरता येत नाही, तो एक साधा मनुष्य म्हणून जीवन जगत असतो, म्हणजे हा शब्द आपलं व्यक्तिमत्व विकास घडवत असतो, तसेच ज्याला पटकन सेलिंग करायला जमतं, त्याचे वस्तू, विचार, देवाण-घेवाण ,संपर्क लगेच जुळतात, आणि तो व्यक्ती, खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी मदत होते, म्हणूनच, sellingहा शब्द नवा प्रोडक्स किंवा, एखाद्या ग्राहक किंवा दुकानदाराशी संबंधित आहे, तर तो आपल्या व्यक्तिगत जीवनाशी कसा संबंध येत आहे, तसेच तो कशा प्रकारे वापरला पाहिजे, आणि वापरता यावे म्हणून, काय करावे, हे मला सरांचा ब्लॉक मधून समजले, thanks u so mucha sir
सेल्स स्किल्स मधून मला एक महत्त्वाची संकल्पना शिकायला मिळाली ती म्हणजे विक्री म्हणजे तुमच्या क्लायंटवर फेरफार करणे आणि त्यांच्यावर दबाव आणणे नव्हे, तर ते तुमच्या ग्राहकांशी संबंध निर्माण करून विश्वासाद्वारे नातेसंबंध निर्माण करणे आहे. हे कौशल्य तुमच्या वैयक्तिक जीवनात देखील अनुवादित केले जाऊ शकते. हे कौशल्य तुमच्या आयुष्यातील कोणत्याही क्षेत्रात भाषांतरित केले जाऊ शकते, मग ते तुमच्या प्रोफेसरशी चांगल्या मार्कासाठी वाटाघाटी करणे असो किंवा तुमचे उत्पादन स्पर्धकांपेक्षा चांगले का आहे हे तुमच्या ग्राहकाला स्पष्ट करणे असो.
मी हे देखील शिकले आहे की विक्री करण्यासाठी सक्रिय ऐकणे महत्वाचे आहे. विक्रीप्रमाणेच, सक्रिय ऐकणे हे देखील तुमच्या वैयक्तिक जीवनात असणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. विक्रीमध्ये, सक्रिय ऐकण्याचा एक भाग म्हणजे तुमच्या क्लायंटच्या गरजा ओळखणे. गरजांचे विश्लेषण करून, तुमच्या संभाव्य क्लायंटला तुम्ही आणि तुमची कंपनी प्रदान करू शकतील अशा कोणत्या गरजा आहेत हे तुम्ही तपशीलवार जाणून घेऊ शकता. तुम्ही हे तुमच्या वैयक्तिक जीवनात देखील लागू करू शकता, कारण सक्रिय ऐकणे गैरसमज टाळून मजबूत नातेसंबंध निर्माण करू शकते, उत्पादकता सुधारू शकते, मतभेदांवर मात करू शकते आणि एकूणच तुमचे प्रभावी संवाद कौशल्य तयार करू शकते.
तुम्ही फक्त ही कल्पना विकत नाही, तर तुम्ही शिकलेल्या इतर कौशल्यांचा देखील वापर करत आहात: आत्मविश्वास, वक्तशीरपणा आणि चिकाटी प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीला तुम्हाला विकत घेण्याची किंवा खरेदी करण्याची संधी असते.
“Selling is what makes the world work and what drives the economy.” — Zig Ziglar.
Thank you,Sir!
सर आजच्या या ब्लॉग मधून हे शिकायला मिळाल की यशस्वी जीवनासाठी विक्री कौशल्याचे काय महत्व आहे.
सर तुम्हाला जस वाटायच तसच मला ही वाटायच की विक्री हा शब्द केवळ मार्केटिंग मधेच किंवा त्यासाठीच वापरला जातो. पण आज मी तुमचा हा ब्लॉग वाचला तर हे कळाल की पृथ्वीवर असलेला प्रत्येक माणूस हा विक्रेता आहे कोणी आपले वस्तू विकत असत तर कोणी आपली सेवा तर कोणी आपले विचार विकत असत विक्री कौशल्य हे यशस्वी जीवनासाठी किती महत्वाचे आहे आणि याच मुळे आपण जीवनात कसे यशस्वी होऊ शकतो हे आज या ब्लॉग मधून कळाल
विक्री ही फक्त वस्तूची होत नसते तर विचारांची पण होऊ शकते हे सर आज मला तुमच्यामुळे कळाल
आपण आपले विचार समोरच्याला पटवण्यासाठी ,आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे हे ,सांगण्यासाठी त्यांच्या पर्यंत ते पोहचवण्यासाठी हे विक्री कौशल्य आपण प्रत्येकाने आत्मसात करण खुप गरजेचे आहे.
आज या ब्लॉग मधून हे शिकायला मिळाल आपले विचार, सेवा, आपली मत समोरच्याला पटवून दयाचे असेल तर हे विक्री कौशल्य फार महत्वाचा घटक आहे. आणि याच कौशल्यामूळे आपण आपल्या यशस्वी जीवनाकडे वाटचाल करु शकतो.
Thank you so sir
या ब्लॉग मध्ये यशस्वी जीवनासाठी selling skills किती important आहेत हे खूप छान पद्धतीने समजून सांगितले.आदी selling skills चा उपयोग फक्त मार्केटिंग मध्ये होत अस वाटायचं ,याचा आपल्याशी काही संबंध नाही असे वाटायचं पण जेव्हा हा ब्लॉग वाचला तेव्हा selling skills यशस्वी जीवनामध्ये important कळलं.प्रत्येकाकडे selling skills असणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी विक्री कौशल्य येणं हे खूप गरजेचं आहे हे या ब्लॉग मधून प्रथम कळलं.
विकण्याचे कौशल्य आत्मसात केल्यामुळे पुढील फायदे होतात –
1.या कौशल्यामुळे आपल्याकडील असलेल्या वस्तू ,सेवा &विचार आपण लोकांपर्यंत फोचवू शकतो.
2.या कौशल्यामुळे लोकांना मदत करू शकतो.
3.जीवनात आर्थिक स्वातंत्र मिळवायचे असेल तर ते फक्त selling skills देऊ शकते.
3.हे कौशल्य आत्मसात केल्यामुळे ते दुसऱ्यांना पण शकू शकतो.
या कौशल्य मुळे सामजिक जीवनात कसे परिवृतन घडून येते & भविष्यात यशस्वी होण्यासाठी हे कौशल्य कसे उपयोगी येते हे एकदम सोप्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोचवले.आम्ही हे skill शिकून घेऊ आणि त्याच्या जीवनात उपयोग करू.ही माहिती या ब्लॉग स्वरूपात आमच्यापर्यंत पोहचवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
नमस्कार सर
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही common skills असतात . पण सर्वांना मध्ये एक skill असायला हवे ते म्हणजे selling skills / विक्री कौशल्य . हे विक्री कौशल्य सर्वांन मध्ये असायला हवे हे पहिल्यांदा कळले. जर एखाद्याला विक्री कौशल्य प्राप्त/ अवगत असेल तर तो कधी अयशस्वी किंवा बेरोजगार राहणार नाही. आणि हे कौशल्य ज्यांनी आत्मसात केले ते त्यांच्या आयुष्यात जे परिणाम झाले ते पुढीलप्रमाणे :
१) या कौशल्यामुळे आपल्याकडे असलेल्या वस्तू, सेवा आणि विचार आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि त्याचं जीवन सुधारू शकतो
२) विकणे म्हणजे लोकांना फसवणे नसून त्यांना मदत करणे होय आणि ज्यांनी हे follow केले तो यशस्वी seller झाला.
३) जीवनात आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) मिळवायचे असेल तर ते फक्त विकणे (Selling) हेच कौशल्य देऊ शकते.
४) हे कौशल्य आपण आत्मसात केल्यामुळे इतरांनाही ते आपण शिकवू शकतो, व त्यांच्याही जीवनात मूल्य समाविष्ट (Value Addition) करू शकतो. जसं ज्ञान दिल्याने वाढते तसेच हे ज्ञान share केल्याने अजून विकसित होते.
प्रत्येकाला selling skill आत्मसात करून आपलं आयुष्य सुधारले पाहिजे.
Thank you so much Sir for amazing blog . This blog gives new vision.
Sir ,ya blog madhe vikri kaushyalyabadal jase tumhala vatat hot tsch,aaj atapariyant mlahi vatat hot ki,vikri kaishyalya mhanje product vagaire vikych ast te,but he blog vachlyanntr samjhl ki,tyach mean kahitari different pn ahee ki ,aplyala jr ekhadi gosht konasamor mandychi asel tr vyakt hon garjech ahe,aplyala fakt knowleadge asun kahi fayda hot nasto to jagala samjaun sangta alaa pahije ,aple v4 tyanna patvun deta ale pahije,aaj chya jagat hech vikri kaushyalaya mhanjech vicharanchi devan ghevan honar nahi tr,apali pragati honar nahi,js ekhadha shikshakala khup knowledge ahe but tyachyat shikvnyach kaushylya ch nasel aple v4 mandtach nastil yet tr..tya knowledge ch kay fayda honar samjhala,thank u sir for this blog ya blog mode vikri kaushyalya ch importance samjhl..
What is the Importance of Selling Skill for Successful Life?
हा ब्लॉग वाचण्यापूर्वी मला विक्री या शब्दा बद्दल ची जी माहिती होती ती फक्त एखादी वस्तू एखाद्या बाजारातून विकत घेणे किंवा ती वस्तू त्या बाजारामध्ये कोणालातरी विकणे या मधला जो मेळ होता हा मेळ विक्री असावा असा माझा आत्तापर्यंत चा मानस होता . परंतु आता हा ब्लॉग वाचला आणि या ब्लॉग मधून खऱ्या अर्थाने विक्री या शब्दाची व्याख्या करणारी आणि विक्री कौशल्य आपल्या यशस्वी जीवनासाठी किती महत्वाचा आहे आणि या कौशल्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने यश प्राप्त होते त्याच बरोबर हे कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्याला कोणत्या या भागाकडे लक्ष देणे गरजेचे आहे या सर्व बाबींची जाणीव तुमच्या प्रखर लिखाणातून झालेली आहे.
आपण प्रत्येकाने जे आत्ता सध्याचे जीवन जगत आहोत , आत्ता जे काही आपण कठोर मेहनत करत आहोत, डोळ्यात तेल घालून पुस्तकाच्या पुस्तक चाळत आहोत, प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये आपल्या या प्रचंड मेहनत दोन रक्ताचं पाणी करत आहेत हे फक्त एक्का करण्यासाठी, या अशा ढोर मेहनतीतून आपल्याला जीवनाचा उद्देश साध्य करायचा असतो, आपण ठरवलेले ध्येयाची पूर्ती करायची असते, आपण बघितलेले तारांकित स्वप्न पूर्ण करायचे असतात आणि त्याच बरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातून आपल्याला दमोजी मामा ( पैसा) ला आपल्याकडे बोलवायचं असतं. आपला हा खटाटोप जो चाललेला आहे ते फक्त खिशात खळखळाट आणण्यासाठी आहे आणि जर खिशात असेल तर जीवनात सुद्धा नेहमी खळखळाट असेल.
पैसा आपल्याकडे आणण्यासाठी विक्री कौशल्याचा महत्त्व नितांत आहे. पैसा आपल्याकडे तीन मार्गाने येतो.
1) PRODUCT ( वस्तू)
2) SERVICE ( सेवा)
3) IDEA ( कल्पना)
या मार्गाने पैशाची वाटचाल आपल्याकडे होत असते परंतु या तीन मार्गांमध्ये, या तीन गोष्टी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता आल्या पाहिजेत नुसतं लोकांपर्यंत पोहोचून चालणार नाही तर त्या गोष्टी लोकांनी Accept केलं पाहिजे तरच त्यातून आपल्याकडे अर्थ ( पैसा ) प्राप्त होतो आणि ज्याच्याकडे आहे अर्थ त्याच्यात जीवनाला अर्थ आहे त्यामुळे आपल्याकडे पैसा असून खूप महत्त्वाची बाब आहे. आणि तो पैसा मिळवण्यासाठी कोणत्या कौशल्याची गरज आहे हे कोणत्या सूत्रानुसार पैसा आपल्याकडे येतो या गोष्टीच्या माहितीसाठी आपले ब्लॉग अत्यंत उपयुक्त आहेत. या ब्लॉग मधून पैसे मिळवण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कौशल्य अगदी सखोल रित्या आपण या ब्लॉग मध्ये सहजतेने मांडलात त्यामुळे नक्कीच आमच्यामध्ये हे कौशल्य डेव्हलप होण्यास विलंब लागणार नाही.
विक्री कौशल्य प्रत्येकाकडेच थोड्याफार प्रमाणात असतेच परंतु ज्या व्यक्तीने कौशल्य विकसित केले त्यांनी जगाच्या श्रीमंत व्यक्तीच्या यादीत आपलं नाव आणलेला आहे. मग यामध्ये अंबानी असोत किंवा प्रसिद्ध उद्योजक टाटा असोत , जग प्रसिद्ध व्यक्तिमत्व बिल गेट्स असो, या मार्क झुकेरबर्ग किंवा स्टीव जॉब्स असोत यांनी या विक्री कौशल्याला पूरक असे वातावरण तयार करून त्यांना योग्य खत पाणी घालून अतिशय चांगल्या प्रमाणात विकसित केलेला आहे त्यामुळे ते आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांची प्रॉडक्ट त्यांच्या कल्पना त्यांच्या सेवा पोहोचू शकल्या. या व्यक्तींना हे कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांच्याकडे एक स्किल होती ती स्किल प्रत्येकाकडेच असते फक्त त्या skill ला आपण Market मध्ये आणणे गरजेचं आहे . या व्यक्तीकडे बोलण्याची स्किल होती आणि विक्री कौशल्य विकसित करण्यासाठी ही स्किल अत्यंत गरजेचे आहे. ज्या व्यक्तींना आपला विचार लोकांना पटवून देता येतो तो व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात यश संपादित करत असतो. आपल्या वस्तू सेवा आणि आपल्या भन्नाट कल्पना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी communication या रस्त्याचा वापर करावा लागतो ज्या व्यक्तीने हा रस्ता अगदी plane बनवला आहे या व्यक्तीचा खिसा नेहमी गरम असणार आहे यात शंका नाही .
या कौशल्याच्या विकासामुळे फक्त ज्याच्याकडे हे कौशल्य उपलब्ध आहे त्याचा फायदा होतो असे नाही तर त्यातून समाजाची गरज भागली जाते. ज्या व्यक्तीने उत्तम वस्तू निर्माण केल्या आहेत त्या वस्तूची समाजाला गरज असते आणि ती समाजाची गरज त्या व्यक्तीच्या हातून भागली जाते हा फायदा समाजासाठी आहे, एखाद्याच्या कल्पनेतून समाजाचा वेळ अतिरिक्त पैसा आणि मेहनत saving होत असेल कर्त्या व्यक्तीच्या हातातून एक समाज कार्य त्या ठिकाणी होत आहे. एकदा अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक सेवेतून समाजातील लोकांचा सर्वांगीण विकास होत असेल तर त्या अधिकाऱ्याने बजावले सेवेचा त्या लोकांना त्या ठिकाणी फायदा होतो. अशीच समाजाची गरज सुद्धा या विक्री कौशल्याच्या माध्यमातून भागवली जाऊ शकते आणि जर आपण एखाद्या व्यक्तीची किंवा समाजाची गरज पूर्ण करत असाल तर नक्कीच देशसेवा आपल्या हातून घडत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
आपण खूप मोठ्या मोठ्या महाविद्यालयात, नामांकित संस्थेमध्ये शिक्षण घेत असतो आणि शिक्षण घेणे म्हणजे आता नोकरी करून किंवा व्यवसाय करून आपल्याच फायद्याचा विचार करणे असा शिक्षणाचा उद्देश नसून त्या शिक्षणामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांचा विकास आपल्याला करता आला पाहिजे त्यासाठी आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे आणि तो आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याकडे विक्री कौशल्य अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ही कौशल्य विकसित करण्यासाठी या ब्लॉग मध्ये तुम्ही जे महत्त्व सांगितलात यातून खरंच आपल्याकडे एक कौशल्य असणे आणि ते विकसित करणं खूप गरजेचा आहे याची जाणीव झालेली आहे आणि ती विकसित करण्यासाठी माईंड सुद्धा आता त्या गोष्टीचा विचार करत आहे. असे मौलिक विचारांची देणगी या ब्लॉगच्या माध्यमातून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
नमस्कार सर,
यशस्वी जीवनासाठी विक्री कौशल्याचे महत्त्व किती आहे हे या ब्लॉगमध्ये समजते.
जीवनात यशस्वी होण्यासाठी विक्री कौशल्य खूप महत्त्वाचे आहे. फक्त वस्तू विक्रेत्यांकडे ही कला असावी असे आपल्याला वाटते, परंतु विक्री कौशल्याचा फायदा अगदी सर्वांसाठीच होतो. रॉबर्ट लुईस स्टिव्हन्सन म्हणतात की, ती प्रत्येक व्यक्ती विक्रेता असते की जे आपली वस्तू, सेवा किंवा विचार विकत असते. प्रत्येक क्षेत्रात आपण काही ना काही विकत असतो. कोणी वस्तू, कोणी सेवा तर कोणी आपले विचार विकत असतं. आणि या वस्तू विकत असताना विक्रेता हा आपल्या ग्राहकाशी नेहमी चांगल्या रीतीने बोलतो. आणि ग्राहकही चांगलंच शोधत असतात. आपणही खरेदी करताना एका विशिष्ट दुकानातून किंवा खास व्यक्तींकडून घेत असतो. विक्री कौशल्य आपण शिकले तर फार उत्तमच आहे. कारण त्याचे फायदे आपल्या जीवनात खूप आहेत. जसे की आपण आपल्या सेवा वस्तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवु शकतो, आणि आपण काहीतरी विकत असतो म्हणजे आपण कोणाची तरी फसवणूक न करता मदत करत असतो. आपल्याला financial freedom ही मिळते. आणि आपल्या जीवनात परिवर्तन घडते. विकण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे ते लोक आयुष्यात यशस्वी नक्की होतात. त्यासाठी आपण विक्री कौशल्य आत्मसात केले पाहिजे.
Thank you Sir…
यशस्वी जीवनसाठी विक्री कौशल्याचे काय महत्व आहे?
आपल्या जीवनात जर नेहमी हास्याचा खळलाट ठेवायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्याला आपण जीवन जगात आहोत त्या जीवनाचा उद्देश सापडला पाहिजे . सद्य स्थितीला आपण जे कोणताही काम करत आहोत ते काम का ? आणि कशासाठी करत अहोत या प्रश्नाची उत्तरे मिळणे आवश्यक आहे ज्या वेळी आपल्याला आपण करत असलेल्या कार्यामध्ये गी उत्तरे सकारात्मक मिळतील त्या वेळी जीवन जीवन आनंदाच्या महासागरात अगदी उत्साहाने तरंगत असेल. मग आपल्याकडे जीवनाचा उद्देश मिळवण्यासाठी काही कौशल्य असणे सुद्धा महत्वाचे आहे की ज्यांच्यामुळे आपण आपला उद्देश किंवा आपली धेय्य पूर्ती कमी वेळेत करण्यास समर्थ असू त्या कौशल्य पैकी सगळ्यात महत्वाचं कौशल्य म्हणजे विक्री कौशल्य . ज्याचा वापर करून आपण आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती मिळवू शकतो यात काही शंकाच उरणार नाही .
जीवनातला सगळ्यात मोठा आणि अतिमहत्वाच्या factor म्हणजे पैसा (money ) आपल्या जिवनात सगळे काही उठाठे वे चालू आहेत ते फक्त या गोष्टीसाठी. रात्रभर डोळ्यात तेल घालून पुस्तकाची पांन जीर्ण होईपर्यंत आपण जी काही ढोर मेहनत घेत आहोत ते कश्यासाठी या प्रश्नाचा विचार केला असता तर त्याच शेवटी उत्तर येईल पैश्यासाठी.
मग हा एवढा शक्तीशाली, महाकाय घटक येईल कुठून तर तो घटक आपल्याकडे चालून येत नसतो तर त्या घटकाला ओढून ताणून आपल्याकडे वाळवण गरजेचे आहे आणि पैसा आपल्याकडे वळवण्यासाठी विक्री कौशल्य अवगत असण्याची नितांत गरज आहे.
आता हे कौशल्य फक्त बाजारातच एखादी वस्तू खरेदी किंवा विक्री करण्यासाठी वापरली जाते एवढ्यापुरताच मर्यादा या कौशल्याचा नाही तर आपण निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात या बहादुरचा महत्वाचा वाटा असतोच . विक्री करतो म्हणजे आपण फक्त वस्तू चीच विक्री करत नाही तर
त्यामधे आपल्यात असलेले भन्नाट कल्पना ज्यामधून आपण देश्याची समाजाची एखादी गरज भागवू शकतो . आणि त्याच बरोबर आपल्या हातात असलेल्या अप्रतिम शक्तीच्या बळावर तयार केलेली वस्तू असेल आणि आपण दिलेली जबदरीची सेवा असेल यातून आपल्या मधील talent मार्केट मध्ये येऊन आपल्या क्षेत्रात आपण नैपुण्य मिलाऊ शकतो .
हे क्षेत्र अवगत करण्याची अफाट गरज आहे आणि ती गरज भागवण्यासाठी त्याचबरोबर आपल्यातील विक्री कौशल्य विकसीत करण्यासाठी आपल्याकडे आपली communication ची बाजू पक्की असणे गरजेचे आहे कारण आपली सेवा आपल्या वस्तू आणि आपल्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एका साधनांची गरज असते ते साधन म्हणजे बोलणं. या साधनाच्या बळावर आपण भल्या भल्यांच्या मनावर राज्य करू शकतो .
खरंच या आपल्या कौशल्यामुळे आपण इतरांची मदत करू शकतो एका अनादी जीवनासाठी यापेक्षा अजून काय पाहिजे! हे सगळं या विक्री कौशल्यामुळे घडू शकते आणि त्यावर प्रकाश टाकून आमच्यातला त्याबद्दलचा प्रकाश तेज केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद
यशस्वी जीवनसाठी विक्री कौशल्याचे काय महत्व आहे? What is the Importance of Selling Skill for Successful Life?
आपल्या जीवनामध्ये एक उच्चतम पातळी गाठवण्यासाठी आपल्या मध्ये आसलेल्या कौशल्याचा role खुप महत्वाचा असतो आणि आपणसुद्धा आपल्या मध्ये आसलेल्या कौशल्याच्या जोरावरच आपली धेय्य निश्चिती केल्यास ते पूर्ण करण्यासाठी सुलभता प्राप्त होइल. आणि याच कौसल्या मध्ये सगळयात महत्वाचं कौशल्य म्हणजे विक्री कौशल्य *( Selling Skill)* . कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी या कौशल्यांची कामगीरी खूप महत्त्वाची असते त्यामुळे हे कौशल्य अपल्यामध्ये असणे गरजेचे आहे आणि जरी आपल्याकडे या कौशल्याच्या बाबतीत थोडीशी कमतरता जाणवत असेल तर ते वाढवण्या साठी त्यावरती काम करण्याची नितांत गरज आहे.
शब्दशा जर विक्री या शब्दाचा अर्थ लक्ष्यात घेतला तर आपल्याकडील असलेल्या वस्तू ( product) , सेवा ( service) आणि कल्पना, विचार ( idea) इतरांपर्यंत पोहचवणे म्हणजे विक्री होय. आपण कार्य रत असलेल्या क्षेत्रा मध्ये प्रगती झाली पाहिजे , आपण आपल्या field मध्ये top ला गेलो पाहिजे आपल नाव आपल्या कामगिरीतून वर आल पाहिजे अशी आपली सर्वांची इच्छा असते आणि त्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी आपल्याकडे हे कौशल्य असणे आवश्यक आहे. म्हणून आपल्याला हे कौशल्य विकसीत करण्यासाठी यावर मेहनत घेण्याची गरज आहे .
आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी होणे म्हणजे नेमके काय असते? तर आपण आपले विचार इतरांपर्यंत पोहचवून त्याचा best feedback जर आपल्याला भेटतं असेल तर तेच आपल्या यशस्वी होण्याचे पाहिले पाऊल असते. विक्री कौशल्याची मर्यादा फक्त बाजारामध्ये जाऊन एखादी वस्तू वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून ती ग्राहकापर्यंत पोहचवणे एवढ्या पुरताच नसून आपण लोकांपर्यत पोहचणे हा आहे मग आपण लोकांपर्यत आपल्यामध्ये आसलेल्या भन्नाट विचारातून , आपण तयार केलेल्या जबरदस्त वस्तुतून आणि आपण दिलेल्या luxurious सेवेतून आपण लोकांपर्यंत पोहचतो आता यामधे एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे हे कौशल्य आपल्यामध्ये Develope करण्यासाठी आपण कार्यरत आसलेल्या क्षेत्राची Demand काय आहे हे लक्ष्यात घेऊन जर आपण त्या डिमांड नुसार लागणारी सेवा , वस्तू, आणि कल्पनेच्या पुरवठा केला तर नक्कीच आपण त्या क्षेत्रात यश मिळवल्या शिवाय राहत नाही .
समजा आपण सपर्धा परीक्षेची तयारी करत आहात आणि या परीक्षेची demand अशी आहे की , यामध्ये तुमच्या चांगल्या telent ची गरज आहे म्हणजेच तुम्ही त्या क्षेत्रात असलेल्या ज्या काही अटी आहेत जे काही डिमांड आहेत – तुम्हाला राज्यशास्त्र, इतिहास , भुगोल, पर्यावरण, चालू घडामोडी , अर्थश्यास्त्र. , मानवी हक्क , या विषयाचा अभ्यास असणे हे त्या क्षेत्राची demand आहे आणि ती demand आपल्याला 3 तासामध्ये त्यातून प्राप्त झालेल्या ज्ञानाची विक्री करुन पूर्ण करायची अशी आट आहे जर आपण हे दोनही उत्तम रित्या पूर्ण केलं तर त्यामधे आपलं यश पक्क आहे म्हणून विक्री कौशल्यात Demand ला महत्व असते.
हे स्पर्धा परीक्षा मध्ये यश मिळवून अधिकारी झाल्यानंतर लोकांची Demand अशी असते की , एक चांगला सेवक म्हणून आपण काम करावं आणि आपल्या सेवेची विक्री त्यांच्या कल्याणासाठी करावी आणि जर आपल्याला ह्या विक्रीच manegment जमलं तर आपण एक चंगला अधिकारी म्हणून नावारूपास येतो , म्हणून डिमांड महत्वाची असते.
त्याच बरोबर या कौशल्याच्या विकासासबंधी विचार करत असताना दुसरी एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे दर्जा . आपण देत असलेल्या सेवेचा , आपण तयार केलेल्या वस्तूचा आणि आपल्या विचाराची Quality कशी आहे त्यावरून आपली विक्री होत असते त्यामुळे आपल्यामध्ये या तीन गोष्टी ( product Service and Idea) इतरांपेक्षा brand पाहिजेत तर त्याला लोक accept करतील आणि लोक जर आपल्याला accept करत असतील तर आपण त्या ठिकाणी यशस्वी झालो आहोत असे समजण्यास काही वावग ठरणार नाही.
समजा आपण एक उच्च पातळीचे अधिकारी आहात आणि आपण देत आसलेल्या सेवेचा ( service) चा दर्जा जर खालावलेला असेल , आपल्या सेवेमुळे लोक अडचणीत येत असतील त्यांना धोका निर्माण होत असेल तर ती सेवा त्यांच्यासाठी वाईटच आहे आणि अश्याने एक दिवस ते आपली वर तक्रार करतील आणि त्यामधे आपली नौकरी जाण्याचे chances सुध्दा असतात आता याउलट जर तोच अधिकारी चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करत असेल , लोकांच्या प्रतेक अडचणी सोडवण्याचा धडाडीने प्रयत्न करणारा असेल तर नक्कीच तो सगळ्यांच्या नजरेत Hero असणार आहे म्हणून या कौशल्याच्या विकास साधण्यासाठी आपल्याला आपल्या मध्ये Quality तयार करणे सुध्दा खूप गरजेचे आहे.
विक्री कौशल्यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्या मध्ये संवाद साधण्याची कला असणे खूप महत्वाचं आहे . असे म्हंटल्या जाते की , बोलणाऱ्याचे हायब्रीड ज्वारी ही टाळक्याच्या भावात विकले जाते . कारण यामध्ये आपल्याला जर लोकांपर्यत पोहचायच असेल तर या साधनांचा वापर करावा लागेल. आणि हे जर साधन आपल्याकडे ऊर्जा दायक असेल तर पुढचा प्रवास सुलभ होइल. संवाद कौशल्यामधे खालील बाबी महत्त्वाच्या असतात.
1) Body language = 55%
2) tone of voice= 38%
3) words = 7%
या वरील बाबीचा विचार केला असता तर आपली देहबोली खूप महत्वाची असते म्हणून विक्री कौशल्य develope करण्यासाठी या संवाद कौशल्याचा role अत्यंत महत्वाचा असतो म्हणून हे आपल्या मध्ये अवगत करण्याची गरज आहे.
विक्री कौशल्यामुळे खरतर आपले विचार आपल्या वस्तू आणि आपली सेवा इतरांची गरज भागवू शकते. उदा. जर आपल्याकडे teching skill चांगली असेल तर आपण समाजातील विद्यार्थ्याची गरज पूर्ण करण्यासाठी service च्या माध्यमातून आपण देऊ शकतो आणि समाजाची जर एखादी गरज आपल्यामुळे भागत असेल तर याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या देशाची एक गरज पूर्ण करत अहोत म्हणजेच देश सेवा आपल्या हातून घडत आहे. म्हणून हे कौशल्य महत्वाचं आहे .
या कौशल्याच्या माध्यमातून आपण इतरांची मदत सुध्दा करू शकतो आणि त्याठिकाणी आपल्यामधील माणुसकीचा विजय या कौशल्यामुळे साध्य होऊ शकतो त्यासाठी selling skill ला महत्व देण्याची गरज आहे.
या ब्लॉग मधून विक्री कौशल्य आपल्या जिवनात यश संपादीत करण्यासाठीं किती महत्वाचं आहे आणि ते कसं विकसीत करायचं या बाबतीतली सर्व सूत्र मिळाली हे अगदी मौल्यवान सूत्रांची आम्हला करून देऊन आमचं जगणं समृद्ध केल्याबद्दल मनापासुन धन्यवाद .