यशस्वी होण्यासाठी स्वतःचा शोध कसा घ्यावा? स्टेप बाय स्टेप गाईड

Spread the love

यशस्वी होण्यासाठी स्वतःचा शोध कसा घ्यावा? याची स्टेप बाय स्टेप गाईड जीवनात लवकरात लवकर मिळाले तर काय होईल बघा, आपल्या सर्वांच्या जीवन जगण्याचा उद्देश एकच आहे. सर्वांचे ध्येय सुद्धा एकच आहे, या जगाने एक चांगली व्यक्ती म्हणून आपल्याला स्मरणात ठेवावे असेच वाटते. आपण सर्वजण सुखी, समृद्ध व समाधानी जीवन मिळावे अशीच इच्छा बाळगतो.

इथे प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हायचे असते. सोबतच कुटुंबाचेही कल्याण व्हावे असे वाटत असते. मग ती व्यक्ती गावात राहत असेल की शहरात, ती व्यक्ती अडाणी, अशिक्षित असो किंवा जगातील मोठ्या पदव्या मिळविलेल्या असो, सर्वांची एकच इच्छा असते मी सुखी असावं, समृद्ध व यशस्वी व्हावं व लोकांनी मी गेल्यावर मला एका चांगल्या व्यक्तीचा रूपाने आठवावं. प्रत्येकाने ही अपेक्षा करणे अपेक्षितही आहे, अगदी खरेही आहे. 

परंतु आणखी एक सत्य आहे, आम्ही ह्या सर्व अपेक्षा तर करतो, मोठी मोठी स्वप्न पूर्ण व्हावीत अशी इच्छा बाळगतो, परंतु ती स्वप्ने आणि अपेक्षा सत्यात उतरविण्यासाठी आपण जेवढा प्रयत्न करायला पाहिजे, जेवढी मेहनत करायला पाहिजे, जेवढी ताकत लावायला पाहिजे, तेवढी ताकत लावण्यासाठी, तेवढी किंमत मोजायला आम्ही तयार नाही. हे सुद्धा तेवढेच मोठे सत्य आहे.

म्हणजेच आम्हाला यशस्वी तर व्हायचे असते परंतु यशस्वी होण्यासाठी तयारी करण्यास जी किंमत मोजावी लागते ती किंमत मोजायला आम्ही तयार नाही याचा अर्थ हाच म्हणावा लागेल. यशस्वी होण्यासाठी जी ताकत लागते ती ताकत लावणारे एक किंवा दोन टक्केच लोक तयार असतात.

जीवनात यशस्वी व्हायचे असेल, काहीतरी खास करायचे असेल, तर तो रस्ता सहज नाही, फक्त एक रस्ता सहज आहे तो म्हणजे सामान्य म्हणून जन्माला या, सामान्य म्हणून जगा आणि सामान्य म्हणूनच जगाचा निरोप घ्या.

जर मनाच्या कोपऱ्यात यश, समृद्धी, सुखी व समाधानी जीवनाची इच्छा दडलेली असेल तर जीवनाला काहीतरी खास द्यावे लागेल. 

आपण स्वतःलाच काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरे नक्की मिळतील.

आपल्याकडे स्वतःला देण्यासाठी दिवसातील पाच मिनिटे तरी आहेत?

काय आपण जीवन बदलण्यास तयार आहोत?

काय आपण स्वतःवर प्रेम करतो?

काय आपण स्वतःचा अपमान सहन करतो?

स्वतःची बेईज्‍जती सहन करतो?

लोकांनी दिलेली शिवी आपण सहन करतो?

वरील प्रश्नांची उत्तरे काय मिळालीत?

खोटे बोलतो आपण स्वतःसोबत, आपण स्वतःवर कधी प्रेम करतच नाही, ग्रुप फोटोमध्ये आपण प्रथम कोणाचा फोटो शोधतो? स्वतःचाच ना? जसा त्यामध्ये स्वतःचा फोटो चांगला आला तसा पूर्ण फोटो चांगला, जर स्वतःचा फोटो खराब आला असेल तर काय ‘बकवास’ फोटो यार! यावरून हे लक्षात येते की आपण स्वतःवर  प्रेम करतो ही हकीकत आहे. परंतु सत्य हे आहे की ज्याच्यावर आपण जास्त प्रेम करतो त्याला आपण जास्त वेळ द्यायला पाहिजे, तो देतो काय?

आपल्याजवळ सर्व जगाला देण्यासाठी वेळ आहे, इतरांशी वायफळ गप्पा टप्पा मारण्यासाठी वेळ आहे, आपल्याजवळ दुसऱ्यांच्या बाबतीत चर्चा करायला वेळ आहे, आपल्याजवळ राजकारणाबद्दल उलट-सुलट चर्चा करण्यासाठी वेळ आहे, आपल्या जवळ क्रिकेट बद्दल बोलायला वेळ आहे, आपल्याजवळ कोणाचे कोणासोबत काय चालले याची चर्चा करायला वेळ आहे, आपल्याजवळ भ्रष्टाचार, अपघात, याबद्दल बोलायला वेळ आहे, आपण अनेक व्यक्तींशी बोलतो, दररोज बोलतो, इथपर्यंत की, WhatsApp, Facebook अशा निर्जीव गोष्टीला सुद्धा प्रचंड वेळ देतो, Facebook वर तर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री जमवण्याच्या व वाढविण्याच्या नादात आपण असतो, आज बरेच लोक टीव्हीवर तीच तीच ब्रेकिंग न्यूज वारंवार बघण्यासाठी वेळ काढतात, आज टीव्हीवरील कट-कारस्थान, अपघात, घातपाती सिरियल्स पाहण्यासाठी आपण आवर्जून वेळ काढतो. YouTube वरील वेबसिरीज पाहण्यासाठी आपण रात्र-रात्र जागतो.

 

परंतु, आपल्याजवळ एकांतात बसून स्वतःशी संवाद साधायला वेळ अजिबात नाही, हेच सत्य आहे.

सर्वात कमी वेळ आहे तो आपल्या स्वतःसाठी! स्वतःसोबत एकांतात बसण्याची सवय आम्ही कधी निर्माणच केली नाही. 

खरं सांगायचं झालं तर एकांत काय असतो, ती एकांताची व्याख्या आम्हाला माहीतच नाही.

आपला एकांत हा टीव्हीच्या समोर किंवा मोबाईल मध्ये असतो. 

निसर्गाचा नियम आहे की ज्या गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ नाही ती गोष्ट विकसित, यशस्वी का म्हणून होईल?

जर आपल्या जवळ पाच मिनिटे स्वतःला देण्यासाठी असतील आणि या पाच मिनिटात स्वतःशी संवाद साधून स्वतःला विचारले की, मला काय मिळवायचे आहे? जीवनात कुठे पोहोचायचे आहे? कोणती स्वप्ने पूर्ण करायची आहेत? कोणते यश संपादन करायचे आहे? 

अशा मूलभूत प्रश्नांमुळे आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ कळायला वेळ लागणार नाही. ‘आपण’ एक फालतू गोष्ट नाही, आपल्याला ज्याने निर्माण करून पृथ्वीवर पाठविले आहे त्याने आपल्याला खास उद्देशासाठी पाठविले आहे. आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश अजूनपर्यंत समजलाच नाही, कारण आजपर्यंत आपण स्वतःकडे कधी लक्ष केंद्रितच केले नाही, आपलं संपूर्ण लक्ष नेहमी बाहेरच केंद्रित होतं. स्वतःच्या आत लक्ष केंद्रित करण्याची पद्धती ज्याला कळते, त्याचा जीवनाकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोणच बदलून जातो.

तर आज एक उपकार स्वतःवर करण्याची वेळ आली आहे, जर आपण स्वतःवर प्रेम करत असाल तर प्रत्येक दिवशी काही मिनिटे एकांतात बसून, चिंतन करून कोणताही विचार करा परंतु स्वतःच्या बाबतीत. स्वतःला VIP बनविण्याच्या बाबतीत, आणि स्वतः VIP बनून करा.

जेव्हा जीवनात आपण स्वतःसाठी काही मिनिटे काढायला लागू, त्या क्षणापासून जीवनात बदल व्हायला सुरुवात होईल. 

तर मग ठरलं ना? आजचा पहिला निर्णय स्वतःसाठी वेळ काढण्याचा! पाच मिनिटे, शुद्ध पाच मिनिटे! स्वतःसाठी फक्त स्वतःसाठी!

आपला स्वतःचा घेतलेला शोधच आपल्या कल्याणासाठी, आपल्या उत्कर्षासाठी फायद्याचा ठरेल, आणि त्यानंतर मग चिंता करण्याची काही गरज नाही. कारण ज्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित होत असते ती गोष्ट उत्तम बनत असते.

तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏

वाचा:- जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे?How to live life as a warrior?

वाचा:- जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवावे? How to get what you want in life?

This is for your Personal Growth, Please Visit My Website https://www.lifeshodh.com

Spread the love

19 thoughts on “यशस्वी होण्यासाठी स्वतःचा शोध कसा घ्यावा? स्टेप बाय स्टेप गाईड”

  1. सर, वरील ब्लॉग मधून हे समजतं की आपण सर्व गोष्टींसाठी वेळ काढतो परंतु आपण पाच मिनिट सुद्धा आपल्या स्वतःसाठी काढत नाही. आपण स्वतःशी संवाद साधत नाही किंवा स्वतःला जाणून घ्यायचा प्रयत्न ही करत नाही. त्यामुळे आपल्याला जीवनात नेमके काय हवे आहे हे माहिती होत नाही. आणि आपण जीवनात यशस्वी होत नाही. आपण स्वतः वर लक्ष केंद्रित केलं तर,स्वतःला जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर किंवा आपली जबाबदारी100% आपणच घेतली तर आपण जीवनात नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.आपल्याला एक चांगली व्यक्ती होता येईल. आणि आपण इतरांना किंवा आपल्या कुटुंबियांना आनंदी , सुखी ठेवता येईल.
    यशस्वी होण्यासाठी जी ताकत लागते ती ताकत लावणारे एक किंवा दोन टक्केच लोक तयार असतात. त्या दोन टक्क्यांमध्ये येण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. ☺
    Thank you Sir ✨.

    Reply
  2. आपला शोध आपणच घेतला तर जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. हा ब्लॉग वाचताना सर मनात एक प्रश्न निर्माण होतो खरंच आपण स्वतःवर प्रेम करतो का करतो मात्र फक्त लोकांना दाखवण्यासाठी सर्वांसारखा मलाही वाटतं यशस्वी व्हावं लोकांनी वर्षानुवर्षे आपली आठवण ठेवावी एक समाजसेवक म्हणून एक समाजातील चांगला नागरिक म्हणून पण हे फक्त विचारातच आहे यासाठी आपण कधी प्रयत्न केला नाही आणि प्रयत्न केले तरी ते योग्य मार्गाने केली नाही आपण नेहमी या झगमगागी च्या दुनियेत स्वतःला विसरून बसतो खर आहे सर आपण विणकामाच्या गोष्टीसाठी संपूर्ण दिवस देतो पण स्वतःसाठी दोन मिनिटेही देत नाही ब्लॉग वाचकांनी मी ब्लॉग मध्ये लिहिले प्रश्न स्वतःला विचारले आपल्याकडे स्वतःला देण्यासाठी दिवसातील पाच मिनिटे तरी आहेत?

    काय आपण जीवन बदलण्यास तयार आहोत?

    काय आपण स्वतःवर प्रेम करतो?

    काय आपण स्वतःचा अपमान सहन करतो?

    स्वतःची बेईज्‍जती सहन करतो?

    लोकांनी दिलेली शिवी आपण सहन करतो? आणि या प्रश्नाचे उत्तर मला बहुतेक मिळाले आहे आपण आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी काही प्रयत्नच करत नाही परंतु सर मी आजपासून ख-या अर्थाने प्रयत्न करणार ब्लॉग असल्याप्रमाणे त्या गोष्टी आपल्या जीवनात वापरणार धन्यवाद सर

    Reply
  3. खरंतर हा फक्त blog नसून, सर आपण आजची वस्तुस्थिती मांडलेली आहे . पृथ्वीवर येणारा प्रत्येक सजीवाला वाटतं की , आपण चांगलं जीवन जगल पाहिजे , आजूबाजूला होणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या विचारानुसार घडल्या पाहिजेत पण आपण त्या गोष्टीसाठी वेळ देतो का? हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. खरंच यशस्वी जीवन आपल्याला जगायचं आहे आणि हे जगण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करणे गरजेचं आहे हे तत्व ज्यावेळेस आपल्याला समजल त्या वेळी आपली पावलं यशाच्या मार्गाकडे पडल्या वाचून राहणार नाहीत.ही बाब सदरील लेखनातून मनात घर केलेली आहे. एखादी गोष्ट बार बार केल्यानंतर त्या गोष्टीचं वेसण आपल्याला लागतं ती एक आपली सवय होऊन जाते ( bit by bit=habit) . तीच सवय आपण स्वतःला वेळ देण्याची लावली पाहिजे कारण ज्या वेळेस अशी सवय लागेल त्यावेळी Success आणि अपल्यामधला distance खूप कमी झालेला दिसेल. म्हणुन स्वतःशी घट्ट मैत्री करण्याची गरज आहे परंतु आमच्याकडे त्याच गोष्टीचं अभाव आहे आम्ही स्वतः पेक्षा इतर गोष्टींनाच जास्त महत्व देत होतो.
    आत्तापासून इतर गोष्टींना वेळ न देता स्वतः साठी वेळ देण्याकडे माझा भार जास्त असेल कारण स्वतः का वेळ देण्याचा formula मला तुमच्या या अप्रतिम लेखातून सापडलेला आहे . खरंच सर या ब्लॉग च महत्व मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांच्या समपातळी वर आहे आणि हा ब्लॉग माझ्या जीवन घडणीला एक योग्य दिश्या देण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे , मनापासून धन्यवाद आणि तुमचं असच प्रभावी मार्गदर्शन मिळत राहावे हीच विनंती

    Reply
  4. Aaj khup mothi gosht me ya blog madhun learn kelee ki,jr jivnat success vhych asel tr svatavr aplyala laksh dylaa pahije,svatavr kam karyla pahije,but apan he nahi karat dusre ky kartat kase jagtat ya goshtivar jast laksh aste apla,tumhi bolee n sir ki,jee aim aplee astat te reality madhe anych prayatn apan karto kaa tr,really sir pahije tevdhi himmat amhi karat nahi,aim tr khup mothi astat.ya blog madhun svatala kiti time dych aani kaa dych hee mlaa samjhl thank u soo much sir for this blog..🙏🙏

    Reply
  5. स्वतःवर प्रेम करणे ही आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे.
    ‘सेल्फ लव्ह’हा आपल्या यशस्वी वाटचालीचा एक मंत्र आहे.आपल्या कामात सतत यश मिळवण्यासाठी स्व-प्रेम एक बूस्टर डोस आहे.
    स्वत:वर प्रेम केले तर आपण आपल्यातले सगळ्यात चांगले रूप जगसमोर आणू शकतो.स्वतःची आपण काळजी नाही घेतली तर आपले आयुष्य एकाच ठिकाणी घुटमळत राहते.स्वत:ची काळजी घेतली तरचं आपण यशाची एकेक पायरी आत्मविश्वासाने चढू शकू.
    मात्र स्वत:ला दुसर्या कोणासारखे बनवायच्या मागे लागू नका.तुम्ही जसे आहात तसेच उत्तम आहात.स्वत:ला accept करा.तरचं तुम्ही आनंदी राहू शकता.तुम्ही जसे दिसता,तुमचा रंग,तुमचा ढंग सगळे वेगळे असले तरी वाईट नाही याची स्वत:ला खात्री दया.स्वत:मधील चुका सुधारा पण स्वत:ला कमी समजू नका.सगळे युनिक असतात.आणि प्रत्येकाचे हे वेगळेपणच त्या व्यक्तीला ओळख देते.
    अर्थातच तुम्ही स्वत:शी कसे वागता यावर तुमचे यश अवलंबून असते.ही टर्मिनॉलॉजी समजून घ्या.जर तुम्ही सतत स्वत:ला दोष देत राहिला तर तुमच्या समोरील काम कधीच पूर्ण होणार नाही.
    यशापासून तुम्ही लांबच राहाल.
    म्हणूनच ह्या जन्मावर आणि ह्या जगण्यावर शतदा प्रेम करताना, ह्या देहावर म्हणजेच स्वत:वर सुद्धा प्रेम करायला शिका.
    I love me😊
    Thank you,Sir😊

    Reply
  6. अप्रतिम ब्लॉग सर,
    आपल्या जीवनामध्ये आपणच महत्वाचे आहोत बाकी काहीही महत्वाचे नाही हे विसरता कामा नये.पण आपण स्वत:लाच विसरत चालो आहोत आणि इतर गोष्टींनाप्राधान्य , important देत आहोत. म्हणून आपण जीवनात यशस्वी होत नाही. आपल्याला जीवनात यशस्वी होयचे असेल,top ला जायचे असेल तर प्रथम आपण आपला शोध घेतला पाहिजे.
    स्वत: ल वेळ दिला पाहिजे, स्वतःवर प्रेम करता आला पाहिजे, स्वतःचा विचार करावा लागेल,स्वतःवर काम करावं लागेल त्याशिवाय आपण स्वतःचा शोध घेऊ शकणार नाही,आणि जेव्हा आपण स्वतःच शोध घेतो, स्वतःला वेळ देतो तेव्हा जीवनात यशस्वी होण्यापासून आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही.
    Sir, तुम्ही या ब्लॉग मधून रिअल फॅक्ट आमच्यासमोर खूप चांगल्या पद्धतीने मांडले आहेत.आम्ही आज पासून स्वतःचा शोध घेण्यास सुरुवात करू आणि याचा उपयोग आमच्या life मध्ये यशस्वी होण्यासाठी होणार आहे.
    ब्लॉग लिहण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

    Reply
  7. खूप सोप्या पद्धतीने सध्याची परिस्थिती , विचार या ब्लॉग माध्यमातून माडले गेलेत, खरं तर ब्लॉग वाचून अनेक प्रकारचे प्रश्न मनात आले,आपण स्वतः सोबत कधी एकातंतात वेळ घालवला का? याचं उत्तर नाहीच आले, आपण स्वतः वर प्रेम करू शकतो , स्वतः साठी वेळ देऊ शकतो, स्वतःला समजू शकतो, स्वतःचा छंद जोपासू शकतो,परंतु या गोष्टी कडे दुर्लक्ष होत ,आपण स्वतः वर प्रेम केलं तरच दुसऱ्या वर प्रेम करू शकतो,स्वतःला आहोत तसेच accept करणं आनंदी जीवनाच पाहिलं कारण असेल, आपण फालतू गोष्ट म्हणून तर मुळीच जन्माला आलो नाहीत, आपले आयुष्य कसं असावं हे फक्त आपण ठरवू शकतो, स्वतःचा शोध घेण्याची वेळ अताच आहे , जिथे आहात तिथून स्वतःला घडवायची संधी मिळते, जीवन खूप सुंदर आहे ते आणखी सुंदर करण्या साठी स्वतःला जपले पाहिजे.

    Reply
  8. Thank u sir for this blog,sir tumche sarv blog khup chan astat ,sarv blog madhun amhi kahi n kahi shikat asto but,ha blog mla khup special vatl sir ,tumhi ya blog madhe tasech v4 mandlet jashi me v4 karte,te photo chya babtit,and really sir ya blog madhe ahe ti ek ek goshtishi amhi sarv relate karto as ..mla vatate,karan moth sarvanna vhych ahe success sarvanna havi but,tyasathi kimmat mojyla koni tayar nasto,specially atachi generation ,amhi sarv speech aikto story vachtato je lok success zale tyanchi ,but tya real goshtila story ch samjtato amhi,ani success milvne khup easy vatat aste amhala but te tevdh easy naste,aplyala jivnat kahi karych asel tr tevdh hard work karav lagel thodishi himmat karavi lagel,as mhantat ki suisaid karyla khup himmat lagte ,ani jr apan tyatil thodishi mhanje 1% himmat keli n tari apan success hoto but apan himmat ch kart nhi,aani svatavr prem karun sudha svatala time det nahi, pahije tevdh importance apan svatala det nahi,jr apan svatala call kel tr apala no..busy dakhvto tsch apla asto ,ani svatala khup kami samjhto,pn marepariyant aplyala hech samjhat nahi ki apan ya jagat alo kashasathi,aani jivan jagych ks he shodhnyat ardha age nighun jato apla,ani jr aplyala samjhl ki apan ya jagat kaa aloy,tyach divshi aplyala success midali as…samjych,thank u soo much sir for this blog ya blog mude mla svatach importance samjhl,ani god konalahi vinakaran earth varti boj vhyla pathvat nasto sarvach kahi n kahi kam asto he mla samjhl,aaj pasun me svatala kevhahi kami samjhnar nahi ani maz watsapp chya profile la me maz ch pic thevnar..🙏🙏🙏

    Reply
  9. नमस्कार सर,
    या blog मध्ये खूप छान विचार मांडले आहेत की आपला शोध आपणच घेतला तर जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही.
    निसर्गाचा एक नियम आहे की ज्या गोष्टीवर आपण focus करतो , ज्या गोष्टीला वेळ देतो त्या गोष्टीचा विकास होत जातो.
    तसेच आपण जीवनात focus कशावर करायला पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि आपल्या जीवनात स्वतः (life)centre मध्ये असायला हवे, आणि आपले बाकीचे areas बॅकग्राऊंडला पाहिजे. पण आपण बाकीच्या गोष्टींवर जास्त फोकस करतो, आपण स्वतःला जाणून घ्यायचा कधी प्रयत्नच करत नाही. त्यामुळे आपला विकास होत नाही आपण आहे तिथेच राहतो. आपण बाकीच्या गोष्टींसाठी वेळ काढतो जसे की टीव्ही , YouTube, serials पाहण्यासाठी. स्वतः ची development बाजूलाच राहते. स्वतःवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे कारण आपण सर्वात जास्त स्वतःसोबत वेळ घालवत असतो. आपण स्वतः जेव्हा प्रेम करायला लागतो , स्वतःला जाणून घ्यायला लागतो तेव्हापासून जीवनात बदल व्हायला लागतो. जीवनात बदल व्हायला लागले की सगळे areas develop व्हायला लागतात, मग आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
    Thank you Sir😊

    Reply
  10. नमस्कार सर
    आजच्या ब्लॉग मधून खूप महत्त्वाची गोष्ट कळली. आपण इतरांन वर खूप प्रेम करतो पण स्वतः वर प्रेम करायला विसरतो. आयुष्यात जर यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःशी संवाद महत्त्वाचा आहे.
    प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबासाठी काही तरी मोठं करायचं असतं. आयुष्यात यशस्वी व्हायचे असते‌ , समाज्यात नाव कमवायचे असते , लोकांच्या कामी येण्यासाठी सक्षम व्हायचे असते‌. पण हे सगळे करण्यासाठी आवश्यक असतो तो स्वतः सोबत चा संवाद. आपल्याला स्वतः वर प्रेम करता यायला पाहिजे. स्वतःला accept करा आणि स्वतःवर प्रेम करा. जीवनात जर इतर गोष्टींना प्राधान्य द्यायला तर तुम्ही तुमचा विचार करू शकणार नाही. जर जीवनात जीवनाला महत्त्व दिलं तर इतर सगळ्या गोष्टी मध्ये ही तुम्ही develop व्हाल.
    स्वतःला वेळ द्या. स्वतःशी संवाद करा , स्वतः वर प्रेम करा . ह्या गोष्टी मी ह्या ब्लॉग मधून शिकले.

    Thank you so much Sir for amazing blog 😊

    Reply
  11. सर आज या ब्लॉग मधून हे कळाल की आपल्याकडे सगळ्यासाठी वेळ आहे पण आपण स्व:तासठी कधीच वेळ काढत नाही आणि ही प्रत्येकाच्या जीवनातील खरी परिस्थिती आहे.
    आज या ब्लॉग मधून हे शिकायला मिळाल की जीवनात जर यशस्वी होयच असेल तर स्व:तासठी वेळ काढण खुप महत्वाच आहे, स्व:ताल जाणून घेण खुप महत्वाच आहे, स्व:ताल काय पाहिजे काय नाही हे विचारण खुप महत्वाच आहे
    दिवसातून 5 मिनिटे तरी स्व:ताला वेळ दिला पाहिजे, स्व:तावर लक्ष केंद्रीत केल पाहिजे जेणे करुन आपण आपला शोध घेऊ शकतो.
    सर मला यशस्वी होयच आहे आणि यशस्वी होण्यासाठी जी किंमत मोजावी लागेल जी ताकत लावावी लागेल त्यासाठी मी तयार आहे
    एक किंवा दोनच टक्केच लोक तयार असतात ही यशस्वी जीवनासाठी किंमत मोजायला ही ताकत लावायला सर त्या एक किंवा दोन टक्क्यात मला यायच आहे .
    सर तुम्ही जस ब्लॉग मध्ये संगितल आहे की आपला स्व:ताचा घेतलेला शोधच आपल्या कल्याणासाठी, आपल्या उत्कर्षासाठी फायद्याचे ठरेल आणि त्यानंतर मग चिंता करण्याची काही गरज नाही उरणार कारण ज्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रीत होत असेल ती गोष्ट उत्तम बनत असते.
    आणि सर हे 100% बरोबर आहे
    यशस्वी जीवन जगायच असेल तर मी माझ्यासाठी वेळ काढणार आणि स्व:तावर लक्ष केंद्रीत करणार.
    Thank you sir 🙏💯

    Reply
  12. नमस्कार सर.
    आज मी कोणतीही प्रतिक्रिया करायची म्हणून लिहीत नाहीयेत. तर आजचा ब्लॉग हा खऱ्या अर्थाने मनाला भावला, आजचा लेख हा विचार करायला लावणार आहे आणि आज तुम्ही ह्या ब्लॉग मध्ये जे काही आमच्यासमोर मांडले आहे ते फक्त एक, एका व्यक्तीचे विचार नाहीये तर तीच खरी वस्तुस्थिती आहे.
    इतका खोल अभ्यास करून हा ब्लॉग तुम्ही लिहिला आहे हे अक्षरशः उमटून येते. हा लेख फक्त विचार नसून हा एक आणि अनेक यशस्वी लोकांच्या जीवनातील अनुभव आहे . इथे तुम्ही एकदम योग्य गोष्ट मांडली आहे की आपल्याला साध्य तर बरंच काही करायचं असतं, बरेच काही स्वप्न असतात, बरच काही हव असतं , जीवनात कुठेतरी पोहोचायचं असतं, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला खूप यशस्वी व्हायचं असतं.
    पण ते सर्व साध्य करण्यासाठी करावं लागणारं काम मात्र आपण करू इच्छित नसतो , त्यासाठी लागणारे परिश्रम आपण करू इच्छित नसतो, आपण त्यासाठी लागणारी तेवढी किंमत मोजायला तयार नसतो. जीवनात जर असामान्य जगण्याचं स्वप्न आपण बघतोय तर असामान्य कार्य आपल्याला कराव लागणार आहे.
    दुसरी गोष्ट म्हणजे आपण कायम निरर्थक गोष्टींमध्ये स्वस्थ असतो आणि आयुष्यभर व्यस्तच राहून जातो . खरं तर आपल्यात काय क्षमता आहेत , आपल्यात काय ताकद आहे, आपल्यात काय गुण आहेत, आपल्यात काय कौशल्य आहे, हे ओळखण्यासाठी आपण कधी वेळच काढत नाही . कारण जगातील निरर्थक गोष्टी ज्या आपली वाट पाहत असतात.
    आपल्यात काय कौशल्य आहे हे ओळखण्यासाठी ओळखणार कसे?, तर यासाठी आपल्याला मनन करावे लागेल, आपल्याला आपल्यासाठी वेळ नाही, आपल्यासाठी आपल्याला दिवसातील पाच मिनिटे देखील नाही आपण जीवनात सर्वात जास्त प्रेम आपण स्वतःवर करत असतो मग ही खरच आश्चर्याची गोष्ट वाटते की मग आपल्या साठीच वेळ का नाही.
    पण जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढून स्वतः आपले चिंतन करू आपल्यात काय क्षमता आहे याची जाणीव जेव्हा करून घेऊ तेव्हा जीवन कुठे जीवनात आपण काहीतरी साध्य करू शकू.
    खरं म्हणजे या जगातल्या फालतू गोष्टी मुळेच आपण त्यातच रेंगाळत असतो त्यातून बाहेर काढण्यासाठी कोणी मार्गदर्शकही नसतो मग काय जिवन तर चाललय हळूहळू बाकी काही मागचा पुढचा विचार नाही. जगातल्या गोष्टींमध्ये व्यस्त राहून जातो त्यामुळे स्वतःशी संवाद करायलाच वेळ नाही . कधी एकांतात बसून मनन ही होत नाही.
    आणि ज्या गोष्टीवर आपले लक्षच नाही त्यावर आपली काही चर्चाच नाही. तर त्या गोष्टीवर आपण काम केव्हा करणार, आणि मग त्यात आपण यशस्वी तरी कसे होणार .
    मग मी आज ठरवलं आहे की मी रोज काही वेळ एकांतात बसून स्वतःसाठी वेळ काढून मनन करणार आहे, स्वतः शी संवाद करणार आहे.
    कुमरे सर तुमच्या लेखनातून, मार्गदर्शनातून एक नवीन दिशा मिळत असते. जीवनाच्या कोणत्या न कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टीवर प्रकाश पडतो. असेच मार्गदर्शन करीत रहा .
    धन्यवाद!!!🙏

    Reply
  13. आपला शोध आपणच घेतला तर जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही

    या पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस जन्माला येत असताना त्याच्या जीवनाचा एक उद्देश घेऊन येत असतो. उद्देश साध्य करण्यासाठी आपण आभाळाएवढी ध्येयनिश्चिती करत असतो तारांकित स्वप्नांची पहाट रंगवीत असतो . आपल्या प्रत्येकाचा अंतिम उद्देश एकच आहे की आपण यशस्वी झाला पाहिजे आपलं जीवन सुखासमाधानाने, हास्यमय, आपल्या आजूबाजूला आनंदीआनंद नांदला पाहिजे , आपल्याला जगाने एक चांगली व्यक्ती म्हणून ओळखली पाहिजे आणि नेहमी आपल्याला मान सन्मान लोकप्रियता प्राप्त झाली पाहिजे, आपल्याकडे अमाप पैसा असला पाहिजे आपली लेकर बाळ , आपलं कुटुंब या जगामध्ये अगदी आनंदानं आणलं पाहिजे अशी अपेक्षा सगळ्यांचीच असते.

    आणि हेच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी , आपण बघितले स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी, आपण ठरवलेले ध्येयाचे शिखर गाठण्यासाठी आपण प्रत्येक जण धडपडत आहोत यात तिळमात्र शंका नाही परंतु आपण जे काही कार्य करतो, जी कठोर मेहनत करतो त्या मेहनतीतून आपण केलेल्या कार्यातून आपल्याला पाहिजे तेवढे संपादित होत नाही, आणि ज्या वेळी आपण काहीतरी करतोय आणि त्या कामाचा आपल्याला मोबदला मिळत नसेल तर माणसाच्या हाती निराशा लागते आणि तीच निराशा आपल्या हातात पडते आणि मिळालेला निराशा पासून जीवनाची निराशा होते. आजच्या काळामध्ये 97 % लोक असे आहेत किते आपल्या जीवनाचा उद्देश करून करण्यासाठी आपण ठरवू या ध्येयाची पूर्ती करण्यासाठी ढोर मेहनत करत असतात परंतु त्यांना पाहिजे तेवढे यश मिळत नाही आणि तीन टक्के लोक मात्र अशी असतात त्यांनी ज्या गोष्टीला किंवा ज्या वस्तूला हात लावला त्या वस्तूचं सोनं बनवतात. काय जादू असलेल्या लोकांकडे? कोणती शक्ती असली यांच्याकडे? या गोष्टीचा विचार करत असतानाच जी उत्तर मिळाली ती आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून अगदी प्रभावशील पणाने समजून घेता आली .

    मग आपला आडतय कुठं? आपण रात्रंदिवस अभ्यास करून सुद्धा आपल्याला परीक्षा मध्ये पाहिजे तेव्हा रिझल्ट मिळत नाही. या गोष्टीचे कारण विचारात घेता एक कारण अगदी स्पष्टपणे समोर येतं ते म्हणजे आपण आपली जगणे श्री करत असताना आपल्या मनाचा कारभारच केलेला नसतो. आपल्या देशाचे निश्चिती मध्ये आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा वाटा खूप असतो मग त्यामध्ये आई-वडील असतील किंवा समाजामधील इतर कोणतेही लोक असतील त्या लोकांच्या मते आपण आपली ध्येयनिश्चिती करत असतो त्या ठिकाणी आणि आपण आपल्याला विसरतो आपल्यातील गुणांना कौशल्यांना कोंडून ठेवतो त्यामुळे आपल्या मधील असलेल्या कौशल्यांचा गुणांचा जीव जाण्याच्या मार्गावर येतो. आपल्याकडे चांगले गुण आणि आपल्यातले वाईट गुण हे आपल्या शिवाय इतरांना चांगल्या प्रकारे माहिती असूच शकत नाहीत. त्यामुळे आपण दोघे निश्चिती करत असताना लोकांचा सल्ला घेतो ते लोक आपल्या कौशल्यांचा विचार न करता फक्त मार्केट ट्रेनचा विचार करून त्या क्षेत्रातील ध्येय आपल्यावर थोपवत असतात आणि ते ध्येय पूर्ण करण्याच्या नादामध्ये आपण रिकामीच मेहनत करत असतो आणि आपली एनर्जी त्या ठिकाणी वाया घालवत असतो . सहाजिकच आहे की दोन विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्या एकत्र कधीच होऊ शकत नाही तसंच आपल्या कौशल्याच्या आणि आपल्या गुणांची दिशा आणि आपल्यावर ठरवलेल्या ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण करत असलेल्या कार्याची दिशा ही totaly opposite असते त्यामुळेच आपल्या हाती निराशा लागते आणि जीवन समस्याच्या समुद्रामध्ये बुडत असते .

    मग हे सर्व रोखण्यासाठी या प्रवाहापासून लांब जाण्यासाठी आणि मनातल्या ध्येयप्राप्तीचा प्रवाहात उडी घेण्यासाठी काय करायला पाहिजे असा प्रश्न आपल्या सर्वांमध्ये निर्माण झालेला असतो ? या प्रश्नाची सुटका करण्यासाठी हा ब्लॉग अत्यंत फायद्याचा आहे. या प्रश्नासाठी या ब्लॉग मधून जे उत्तर दिले आहे ते अफाट शक्तिशाली आहे . हे सर्व टाळण्यासाठी आपण लोकां ऐवजी आपला विचार केला पाहिजे. ज्यावेळी आपण ध्येय निश्चितीच्या मदतीसाठी लोकांकडे हात पसरतो ते हात पसरवण ज्यावेळी आपण थांबून आपल्या स्वतःमध्ये ठीके निश्चिती करण्यासाठी डोकावून बघण्याची शक्ती निर्माण कराल त्यावेळी जीवनाचा खरा उद्देश कळतो आणि जीवन सुवर्ण मार्गाने जायला सुरुवात होते. त्यासाठी आपल्या लोकांसाठी वेळ न देता स्वतःसाठी वेळ देणे गरजेचे आहे. आपल्यामध्ये काय आहे? आपल्या मधील कोणत्या कौशल्यामुळे किंवा कोणत्या गुणांमुळे आपण लोकांपेक्षा वेगळे व्यक्तिमत्व आपलं तयार करू शकतो आणि सामान्य जीवनातून असामान्य जीवनाकडे आपल्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो या गोष्टीकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

    आपल्यामधील असं कोणतं कौशल्य आहे की ज्यामुळे आपल्याला या कौशल्यांचा वापर करत असताना प्रचंड आनंद प्राप्त होतो, वेळ कसा जातो याचं गणित ही लागत नाही, आपल्या मधील असलेल्या कौशल्यांचा लोकांना फायदा होतो का ? त्याचबरोबर आपल्याला त्यातून पैसे मिळतील का? या गोष्टीचा ज्यावेळी आपण स्वतःला वेळ देऊन विचार कराल त्यावेळी खरा आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला सापडतो आणि ती उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप कठोर मेहनत घेण्याची गरजही नसते . हा सिद्धांत वापरून जर आपण ध्येयनिश्चिती केली तर त्यातून यश तर मिळणारच यात काही शंकाच नाही आणि त्याच बरोबर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही.

    स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर त्यासाठी नेहमी आपण आपल्याला सगळ्या किंमती व्यक्तिमत्व समजायचा आहे आणि मौलिक व्यक्तिमत्व समजून कार्य केलं तर ते कार्य सुद्धा तसंच मौलिक होत असते आणि त्या या मौलिक कार्यातून result सुद्धा मौलिक येत असते आणि त्यातून आपलं जीवन सुद्धा मौलिक होत असते. त्यामुळे स्वतःला किंमत देणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यावेळी आपण स्वतःला किंमत देऊन स्वतःला ओळखाल त्यावेळी यशाकडे आपल्याला जाण्याची गरज नाही कारण यश आपल्याकडे धावून येईल. सध्याच्या या इंटरनेटच्या जगामध्ये सोशल मीडियाचा आणि Viral गोष्टींचा महापूर आलेला आहे हे या महापुरातून जो व्यक्ती िनार्‍याला येईल आणि आपलं जीवन त्या प्रवाहातून वेगळं करेल तो व्यक्ती नक्कीच यश प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि अशा व्यक्तीला त्यांचे जीवन असामान्य करण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे सोशल मीडिया च्या बाजारातून बाहेर पडून आपण स्वतःचा बाजार निर्माण केला पाहिजे आणि त्यातून अगणित कामगिरी केली पाहिजे, असा हा अत्यंत महत्त्वाचा आणि मौलिक विचार या ब्लॉग मधून वाचायला मिळाला , आपला वाचत असताना खरंच जीवनाचे चित्र डोळ्यासमोर येत होतं एवढा प्रभावशील ब्लॉग आमच्यासाठी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

    Reply
  14. वरील blog मधून आजकालच्या सर्व (लहान , तरुण, वयस्कर) पिढीची वस्तुस्थिती सरांनी मांडली आहे
    आजकाल च्या या घाईगडबड आणि धावपळीच्या जीवनात स्वतः साठी वेळ काढायला कोणालाच वेळ नाहीय मग ते young youth generation असो कि ज्येष्ठ लोक असोत
    प्रत्येक जण फक्त आणि फक्त पळतोय
    (कोणी यशाच्या मागे, कोणी कामाच्या मागे तर कोणी पैशाच्या मागे)
    मला मान्य आहे कि सुख सुविधांनी समृध्द जीवन जगायचे असेल तर काम, यश, पैसा या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत
    परंतु ह्या सगळ्याला तर तेव्हा चं अर्थ आहे ना जेव्हा तुम्ही स्वतः आतून आनंदी, fulfill आणि satisfied असाल!
    आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे आपण स्वतः आहोत आणि आपल्या ला हा जन्म, हे जीवन (same life) परत मिळणार नाही आणि हे सर्व माहिती असताना सुद्धा आपण काय करतो?
    फक्त आणि फक्त materialistic things, money ,societal standards, work या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहतो.
    माणसाचा जन्मचं हा एक मोठ्या अपेक्षांच्या ओझ्याने होतो,
    एका गरजेच गाठोड घेऊन माणूस जन्माला येतो आणि मरेपर्यंत त्या गाठोड्यातून एक एक गरज तो काढत असतो आणि मग ते पूर्ण करण्यासाठी तो धडपड करत असतो, शेवटी त्याच्या सर्व गरजा पूर्ण होतातचं,सर्व ईच्छा पूर्ण होतातच असे नाही
    म्हणून शेवटी जेव्हा विचार करतो तेव्हा, काय राहील?
    तर अंतर्मन उत्तर देईल /आतून एक आवाज येईल अरे स्वतः साठी जगायचं तर राहूनच गेलं
    20 व्या वर्षी – आता शिक्षण चालू आहे
    25 व्या वर्षी नोकरीच्या शोधात आहे
    30 व्या वर्षी लग्न करायचं आहे
    40व्या वर्षी थोडं सेटल होऊ द्या
    ५० व्या वर्षी मुलगी/ मुलगा दहावीला आहे
    55 व्या वर्षी मुला-मुलींचे लग्न करायचं आहे
    60 व्या वर्षी तीर्थयात्रेला ,काशी यात्रेला जायचं आहे
    65 व्या वर्षी ईच्छा तर खूप आहे पण गुडघ्याचा त्रास वाढला आहे
    70 व्या वर्षी जर तुम्ही मेलात तर १७ दिवसांच्या आत मध्ये property वरून नाव कमी ,
    हे सर्व इथेच ठेऊन जायचं आहे
    मग मला सांगा तुम्ही आयुष्य कधी जगलात?
    तेव्हा असं कळेल की
    अरेच्चा आयुष्य जगायचं तर राहुनच गेलं !
    त्यामुळे स्वतःसाठी जगायला शिका
    स्वतःसाठी वेळ काढा
    स्वतः आनंदी राहायला शिका
    स्वताचा आत्मशोध घ्या..!
    नंतर जीवन संपत आल्यावर आपल्याला असे वाटायला नको कि यार! जगायचं राहून गेलं ,
    हे करायच राहून गेलं,
    ते करायचं राहून गेलं

    त्यामुळे web series, movies, breaking news, wp, facebook, instagram या वरती दिवस रात्र बघण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा,
    trending गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा
    स्वतःच मागे लागा,
    Societal standards follow करण्यापेक्षा, त्याच्यात अडकण्यापेक्षा स्वतःचे मन आतून काय सांगतयं ते ऐका, एकांतात आपल्या inner voice शी communicate करा
    (Be mindful of your self talk. It’s a conversation with the universe )
    स्वतःला follow करा
    स्वतः काल पेक्षा आज आणखी चांगला माणूस होण्यासाठी प्रयन्त करा।
    स्वतःच्या नजरेत प्रामाणिक राहा,
    स्वतः आनंदी राहायला शिका,
    स्वतःसाठी वेळ काढा,
    स्वतःसाठी जगायला शिका,
    स्वतःवर प्रेम करा
    येणारे क्षण निघून जातील पण येणारा प्रत्येक क्षण आनंदाने, उत्साहाने जगायला, जपायला शिका, कारण विचार करा कि या
    Universe मध्ये Infinite planets आहेत त्यापैकी earth या एका planet वर 8 अब्ज लोक राहतात आणि त्यातून आपण जन्माला आलोय आपल्या ला एक मानवी जीवन भेटलय आणि आपली पृथ्वी या ग्रहावर नंतर दुसर्यांदा ही trip (Trip named as = life) आयोजित केली जाणार नाहीय
    मग एवढे मौल्यवान जीवन जे आपल्याला दुसर्‍यांदा मिळणे शक्य नाही ते तुम्ही असचं घालवणार का?
    अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत, फक्त आणि फक्त पळत धावपळ करत ! मी तर असे नक्कीच नाही जगणार,
    त्यामुळे स्वतःसाठी जगा !
    (ये जिंदगी ना मिलेगी दोबारा so अच्छेसे खुलके जिओ अपने वास्ते)
    खूप लोक सतत त्यांच्या जीवनातील तक्रारी सांगत असतात आणि रडत असतात परंतु मला असे वाटते की आयुष्य एका रांगोळी सारखे आहे
    (त्यातील ठिपके म्हणजे आपले आयुष्यातील येणारे प्रत्येक वर्ष १ ठिपका = १ वर्ष)
    आता ती रांगोळी किती ठिपक्यांची काढायची हे आपण ठरवू शकत नाही ते नियतीच्या हातात असते
    परंतु त्या रांगोळी मध्ये स्वतःच्या आनंदाने /स्वतःसाठी जगून किती रंग भरायचे व तिला सर्वांसाठी विस्मरणीय रांगोळी कसे बनवायचे हे आपल्या हातात असते.
    तुमच्या आयुष्यात संकटे ups and downs आले म्हणून काय झाले स्वतः नेहमी सकारात्मक रहा .
    Because
    “Don’t get upset with Situations or people,
    both are POWERLESS without your Reaction.”

    Do what makes you happy in your Life
    Remove your walls
    Clap for yourself
    Celebrate yourself
    Do it for yourself
    Follow your Joy
    Fully believe in yourself
    Believe in your heart and soul that you are worthy of all good things /capable of big things
    in your Life.

    स्वतः साठी वेळ काढा आणि स्वतः ला च प्रश्न विचारा की
    Why you are doing? and what you are doing?
    तुम्ही तुमच्या जीवनात आता जे काही काम / any job, business or whatever you are doing ते का आणि कशासाठी करत आहात ?
    त्यामुळे तुम्हाला fulfillment, satisfaction मिळतय का?
    तुम्ही खुश आनंदी आहात का?
    जर याचे उत्तर नाही असेल तर थोडा वेळ विचार करा, satisfied आणि स्वतःसाठी छान जीवन जगावस वाटत असेल तर अजून ही वेळ गेलेली नाही कारण कोणत्याही गोष्टीचा अंत ही एका नवीन गोष्टी ची सुरूवात असते
    चालू आहे त्या क्षणापासून रोज स्वतः साठी थोडा वेळ काढा ,स्वतःशी संवाद साधा, आपला inner voice आपल्या ला काय सांगू पाहतोय ते ऐका खरतर आपला inner voice हा नेहमीच आपल्या ला काहीतरी सांगू पाहत असतो परंतु आपल्या लाच ते कधी ऐकायचे नसते आणि तो तुम्हाला ऐकू तरी कसा येणार जर तुम्ही रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली, गरजा पूर्ण करण्याच्या ह्याच्यात असाल, सतत फक्त आणि फक्त जगात काय चालू trend आहे त्याच्याच मागे पळत असालं तर कसा काय ऐकू येईल तुम्हाला तुमचा Inner voice ?
    काय बरोबर बोलतेय ना मी, पटतय का तुम्हाला पण हे, एकदा हा विचार स्वतःसाठी स्वतः बाबतीत वेळात वेळ काढून नक्की करा मग तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्याचे purpose of Life शोधण्यास मदत होईल आणि हे करत असतानाच कधी तुम्ही स्वतः च्या आनंदासाठी, एक चांगले व्यक्तीमत्व होण्याच्या मार्गावर येऊन चालत असाल हे तुम्हालाही कळणार नाही
    पण हा एक गोष्ट नक्की होईल ती म्हणजे तुम्हाला या जीवनाचा हळू हळू सार समजायला लागेल, तुम्हाला आतून Energetic, Positive feel व्हायला लागेल, fulfillment आणि Satisfaction काय असतं हे समजेल !

    Outstanding , Fabulous , Mind-blowing blog Sir
    today’s generation and all the people are completely forgotten to live their Life ,
    They’re just running with the flow of this world without thinking about themselves .
    “Life is most Precious thing in our Life.”
    आयुष्य हे स्वतःसाठी कसं जगलं पाहिजे,
    आपल्या आयुष्यात आपण स्वतः खूप Important आहोत
    हे या blog मधून समजते .
    Keep writing this type of blogs and inspire us especially young youth Sir !
    💯☺👍

    Reply
  15. No one can stop you from succeeding in life if you do your own research.

    आजच्या प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये आपल्या कार्याची गती सुद्धा अतिशय वेगवान झालेली आहे. प्रत्येकानेच आपण ठरवलेल्या क्षेत्रात हे संपादित काढण्यासाठी जीवाच्या आकांताने धावत आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या ठरवलेल्या क्षेत्रात कार कीर्ती प्राप्त करण्यासाठी , ढोर मेहनत आपण घेत आहोत परंतु त्यामधून आपल्याला पाहिजे तेवढे रिझल्ट येत असताना दिसत नाहीत . या गोष्टीचा विचार केला असता त्यातून एक सूत्र गावसते ते म्हणजे आपण आपल्या स्वतःला ओळखायला चुकलो आहोत.

    हल्ली आपण स्वतःची ओळख विसरून गेलेलो आहोत आणि बाकीच्या गोष्टीच्या मागे ढोर मेहनत घेत आहोत त्यामुळे स्वतः जवळ सर्व काही असून सुद्धा आपण इतरांच्या मागे पळत असल्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढा मिळतच नाही. आपल्या मध्ये भरपूर पोटेन्शियल असतं, कारण निसर्गानेच आपल्याला या करोडो च्या गर्दीमध्ये आपल्याला का पाठवला असेल? या गोष्टीचा थोडक्यात विचार केला तर यातून एक लक्षात येते की या जगातला एक माणूस वेगळा आहे प्रत्येकाकडे काही तरी वेगळे करण्याची क्षमता आहेत ते काकडे चे वेगवेगळे पोटेन्शिअल आहे आणि त्या पोटेन्शियल च्या उपयोग करून तो आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा यासाठी आपल्याला बनवणाऱ्यानेच तरीबी खूप वेगळा उद्देश देऊनच बनवलेला आहे.

    ते जर उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एक काम करणे अत्यंत गरजेचे आहे, आपण जीवन कशासाठी जगात असतो? आपण जे काय आता सध्याला कठोर मेहनत घेत आहोत ती कशासाठी? तर आपल्या जीवनामध्ये आनंद समाधान पैसा पावर या गोष्टी आपल्याकडे असला पाहिजे त्या कारणाने आपण सत्याला कठोर मेहनत घेऊन यश संपादित करण्याचा प्रयत्न करत आहोत . याच प्रयत्नाच्या गोंधळात आपण स्वतःला कधी वेळ दिलेला नाही आणि त्यामुळेच आपल्याला जे हव आहे ते मिळवण्यास खूप त्रास होतोय. हा त्रास थांबवण्यासाठी हे कीड आपल्या मधून काढून टाकण्यासाठी आपल्याला स्वतःला ओळखणे गरजेचे आहे.

    आपल्याला आपली ध्येयनिश्चिती करत असताना स्वतःला ओळख करून घेण्याची नितांत गरज असते , कारण आपल्या जीवनाची वाटचाल ठरवण्यासाठी, आपलं जीवन कोणत्या टप्प्यावर पोहोचणार आहे , आणि त्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर करावा लागेल या गोष्टीचा फॉर्मुला म्हणजे आपली ध्येयनिश्चिती असते आणि तेच ध्येयनिश्चिती आपण लोकांच्या विचारावर करत असतो आपल्यामध्ये असलेल्या भन्नाट पोटेन्शियल, आपल्यामध्ये तुडुंब भरले अगणित टॅलेंट, आपल्या मधील असलेले अप्रतिम कौशल्य हे आपण जाणताच नाही त्यामुळेच आपल्याला जीवन तडजोडीचा जगावं लागतं . आपल्या जीवनाचे ध्येय ठरवत असताना आपण लोकांकडे सल्ला घेण्यासाठी जातो किंवा लोकांकडून आपली जबरदस्तीने ध्येयनिश्चिती होत असते आणि जे लोक आपल्या धेयची निश्चिती करत असतात त्या आपल्या मध्ये काय आहेत ते बघत नाहीत किंबहुना त्यांना समजतच नाही कारण आपल्या मध्ये काय विशेष आहे हे फक्त आपल्याला समजते आणि तेच समजून घ्यावे लागते आपल्या आयुष्यात हाच घोळ होतो की आपण आपल्याला ओळखत नाही आणि ज्यावेळी आपण आपल्याला ओळखतो त्यावेळी वेळ निघून गेलेला असतो आणि अर्धा आयुष्य संपलेला असतं त्यामुळे त्यावेळी ती गोष्ट फायद्याची ठरत नाही आणि जीवन भोगावं लागतं. त्यामुळे लोकांना फक्त त्या विशिष्ट कालखंडामध्ये कोणत्या बाबीला महत्त्व आहे हे दिसत आणि त्या नुसार ते आपली ध्येयनिश्चिती करत असतात. आपल्याला सुद्धा ते त्यावेळी योग्य वाटतं कारण त्यास सिच्युएशनमध्ये ती गोष्ट टॉप ला असते आणि त्यामुळे त्या गोष्टीच्या लाभाच्या मोहात आपण हरवून जातो आणि अख्खं जीवनच हरवून बसतो.

    स्वतःला वेळ दिल्याने काय होते? तरी यातून आपल्याला आपली ओळख होते, ज्यावेळी आपण स्वतःसाठी काही वेळ काढावे त्यावेळी आपण आपल्या अंतर्मनाचा आणि अंतर्मनात गेल्यानंतर आपल्यामधील असलेले कौशल्य आपल्या मधील टॅलेंट आपल्यामधील वेगळेपणा आपल्याला कळतो त्याच बरोबर आपल्या मध्ये असलेली कमजोरी आपण कुठल्या क्षेत्रात मागे पडू शकतो या गोष्टीची सुद्धा जाणीव होते आणि ते क्षेत्र मजबूत करण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न होत असतात आणि यश मिळवण्यासाठी याच गोष्टीची गरज असते की , आपल्यामध्ये असलेल्या भन्नाट टॅलेंट भन्नाट कल्पना आपण बाहेर आणला पाहिजे आणि त्या कल्पनेचा इतर लोकांना फायदा झाला पाहीजे आणि तो जर फायदा करायचा असेल तर स्वतःसाठी काही वेळ देणे गरजेचे आहे.

    आजच्या या चटकदार लेखणीची चव काही औरच होती , या ब्लॉग मधल्या लिखणातला भाव खूपच नमकिन होता कितीही घेतलं तरी अजून थोड पाहिजे असं वाटतं होत खरंच अप्रतिम ब्लॉग आणि स्वतःला ओळखण्याची जाणीव करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ☺️

    Reply
  16. आपल्यापैकी प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण आपलं जीवन या सुंदर जगामध्ये उच्चस्थानी बघितलं पाहिजे, जीवन जगत असताना आपल्याला प्रचंड प्रमाणात सन्मान , मान मिळाला पाहिजे , लोक आपल्याकडे बघत असताना त्यांच्यामध्ये एक आदर्शाची भावना निर्माण झाली पाहिजे , आपला आयुष्य आनंदाने बहरलेले असावे त्यामध्ये सुख-समृद्धी अगदी उत्साहाने नांदली पाहिजे , आरोग्य सारखी अतिशय मौल्यवान संपत्ती आपल्याकडे अमाप असली पाहिजे अशी या जगातल्या प्रत्येक माणसाची इच्छा असते मग त्यामध्ये शिक्षणाचा, वयाचा, संपत्तीचा असा कुठलाही संबंध येत नाही.

    आणि हे सर्व मिळवण्यासाठी आपण आयुष्यामध्ये वेगवेगळी ध्येय निश्चित करत असतो, मोठे मोठे पंचतारांकित स्वप्न बघत असतो आणि ती बघितली पाहिजे कारण जीवणामध्ये काहीतरी भन्नाट करायचं असेल , आपलं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळा बनवायचा असेल तर त्यासाठी स्वप्न बघणे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे आणि यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कितीही मोठे स्वप्न पाहण्यासाठी आपल्याला कुठलीच किंमत मोजावी लागत नाही . डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे एक विधान आहे की , प्रत्येकाने स्वप्न बघितलेच पाहिजे कारण स्वप्नामुळे विचार निर्माण होतात आणि विचाराचे रूपांतर कृतीमध्ये होऊन त्या बघितलेल्या स्वप्नाची पूर्ती होते आणि आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे ते ठिकाण आपल्याला मिळते त्यामुळे आपल्या जीवनाचा उद्देश आपण त्याठिकाणी साध्य करू शकतो आणि जीवन अगदी हिरवळ होत जाते म्हणूनच माणसाने स्वप्न बघितली पाहिजे.

    आजपर्यंत जगामध्ये जे काही महान व्यक्ती होऊन गेले किंवा आत्ताची जे top चे व्यक्तीआहेत त्यांचा इतिहास किंवा त्यांच्या जीवनाबद्दल चा जर अभ्यास आपण केला त्यातली एक गोष्ट हाती लागते सर्व व्यक्तींनी ज्यांना आज जग आदर्शवादी दृष्टिकोनातून बघते सर्व व्यक्ती त्यांच्या जीवनाचा प्रवास सामान्य जीवनातून असामान्य कडे घेऊन गेलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी अतोनात मेहनत केली आहे. सुरुवातीला त्यांनी सुद्धा हात जीवनाचा प्रवास साध्य करण्यासाठी मोठी स्वप्न बघितली होती , मनामध्ये पक्का कणखर निश्चय केलेला होता म्हणून त्या स्वप्नाच्या आधाराने आणि मेहनतीच्या बळाने आज एक उंच झेप त्यांनी घेतलेली आपल्याला दिसत आहे. अशीच आपल्यालासुद्धा झेप घेण्यासाठी, असामान्य बनण्यासाठी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल मोठी स्वप्न बघावी लागतील मोठी आहे आपल्या आयुष्यात निश्चित करावे लागतील .

    आपण सगळेजण खूप मोठी स्वप्ने तर रंगवत असतो परंतु इथे एक गोष्ट अशी होते की आपण स्वप्नाच्या मोहा मध्ये रमून जातो आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जे काही आपल्याला काम करावे लागेल , ज्या कृती आपल्याला पार पाडाव्या लागतील त्या कृती आपल्याकडून होत नाहीत त्यामुळे आज जगामध्ये सगळेच लोकं खूप मोठे मोठे स्वप्न बघून मोठ्या मोठ्या इच्छा-आकांक्षा पदरी बाळगून सुद्धा त्यापैकी अगदी बोटावर मोजण्याइतक्या लोकांची स्वप्न पूर्ण होतात आणि ते त्यांना जे हव आहे ते मिळवतात.

    आपण जे स्वप्न बघितलेले आहेत त्यातून मिळणाऱ्या लाभाची अपेक्षा जास्त करतो त्यामुळे आपले लक्ष त्यातील मिळणाऱ्या सुख सुविधा त्याच्या मिळणारा जो लाभ आहे त्याकडे केंद्रित होऊन आपली सगळी energy तिकडे flow होते कारण जिकडे आपले लक्ष जाईल तिकडे energy flow होऊन त्याठिकाणी विचारांची निर्मिती व्हावी आणि विचार ऍक्शन घ्यायला भाग पाडतात.
    Attention goes , energy flows ,think grow

    मग आपण बघितलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ? कोणत्या सूत्राचा वापर करून आपली पंचतारांकित स्वप्ने पूर्ण करून जीवनात हिरवळ आणू शकाल? या अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा ब्लॉग खूपच सोयीस्कर आहे आणि यातून नक्कीच आपण बघितलेले स्वप्ना कडे जाऊन डायरेक्ट ॲक्शन चा मार्ग स्वीकाराल अशी खात्री वाटते.

    आपण एखादे धेय्य निवडून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो ही , ती पूर्ण करण्यासाठी आपण अगदी जिद्दीने प्रचंड मेहनत करत असतो तरीसुद्धा आपल्याला त्यातून रिझल्ट आल्यासारखे वाटत नाही या सर्व गोष्टी मागे एक कारण भक्कम आहे ते म्हणजे ज्या वेळी आपण स्वप्न बघत असतो किंवा आपल्या ध्येयाची वाटचाल ठरवण्यासाठी ते निश्चित करत असतो त्यावेळी आपण आपल्या स्वतःला ओळखलं पाहिजे , आता प्रश्न असा पडतो की स्वतःला कस ओळखायच? त्यासाठी कोणती statergy लागू करायची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यासाठी आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे .

    आज या अतिशय प्रगत तंत्रज्ञानाचा जगामध्ये सगळ्यांचे जीवनात अतिशय धावपळीच झालेल आहे या धावपळीच्या गरक्यामध्ये आपण आपल्यासाठी वेळ देण्याच विसरून गेलेलो आहोत . त्यामुळे आपल्या मध्ये काय आहे आपल्या मध्ये कोणती कौशल्य आहे आपण काय करू शकतो आपण कुठे पर्यंत मजल मारू शकतो ही मजल मारण्यासाठी आपल्या मधील कोणत्या कौशल्याचा वापर आपल्याला करायचा आहे या गोष्टी आपण बाहेर न काढल्यामुळे ते आपल्यात कुजून जात आहे म्हणून आपल्याकडे संपूर्ण अजून सुद्धा आपण अपयशाच्या दारा मध्ये प्रवेश करतो .

    ज्या गोष्टीकडे आपण फोकस कराल किंवा या गोष्टीकडे आपले लक्ष केंद्रित होईल त्या गोष्टीविषयी. आपल्या अधिकाधिक कळायला लागत तिथे विचार निर्माण होतात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यातून आपल्याला रिझल्ट मिळत असतात म्हणून जर आपल्याला सकारात्मक रिजल्ट पाहिजे असतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्यावर Focus करायला हवं . सगळयात जास्त किंमत स्वतःला दिली पाहिजे त्यामुळे आपली Self Image.strong बनेल आणि ज्यावेळी आपली सेल्फी image स्ट्रॉंग असेल त्यावेळीं बाहेरील सगळ्या action आपल्याकडून srong आणि प्रचंड ऊर्जेने घडतील आणि ज्या ठिकाणी काम जास्त ऊर्जेने होते तेथे result खुप फास्ट येतात.

    म्हणून जर जीवनाला एका उच्च स्थानी घेऊन जायचं असेल आणि उंच उंच भरारी घेऊन आभाळाला गवसणी घालायची असेल तर स्वतःसाठी काही वेळ काढून स्वतःलाच जाणून घेऊन स्वतः मधील असलेल्या कौशल्याची जाण करून घेऊन कार्य करणार खूप गरजेची गोष्ट आहे.
    स्वतःला थोडाफार वेळ देऊन मनातून हे प्रश्न विचारले 👇

    I) मला काय मिळवायचे आहे?
    II) जीवनात कुठे पोहोचायचे आहे?
    III)कोणती स्वप्ने पूर्ण करायची आहेत?
    IV) कोणते यश संपादन करायचे आहे?
    या प्रश्नामध्ये एवढी ताकद आहे की हेजर प्रश्न आपण स्वतःला विचारले आणि या प्रश्नाचे उत्तर येते मनातून मिळाली आपल्याला तर आपण आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे त्या ठिकाणी नक्की पोहोचू आणि तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला कुठलाच अडथळा निर्माण होणार नाही एवढा आत्मविश्वास या प्रश्नांमधून मिळतो त्यासाठी फक्त एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपण स्वतःसाठी काही मिनिटे काढून स्वतःला वेळ देऊन स्वतःला जाणून घेऊन कार्य करणे .

    असा हा माईंड shifted blog दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

    Reply
  17. खुप दिवसांनी इतके सुंदर विचार आणि त्या मागील संदेश समजण्यात यश आले

    Reply
  18. बऱ्याच दिवसानंतर या बहुमूल्य विचाराकडे चक्कर मारली खरतर या गोष्टीचे दुःख होते की , आपण अश्या life changing blog कडे अशी एखादी चक्कर मारत आहोत . ज्यामधून आपल्या जीवनाचा मार्ग मिळतो त्या गोष्टीला आपण कधीतरी भेट देत आहोत परंतु अशा ह्या मनाला टोचणाऱ्या गोष्टीचे उत्तर मला हा ब्लॉग पूर्ण वाचल्यानंतर मिळालं.

    ज्या वेळी आपला या पृथ्वीतलावर जन्म होतो आणि आपण जसे जसे मोठे होत जातो तसे आपल्या आपलं जीवन कळायला लागते किंवा तर इतरांकडून कळविल्या जाते , म्हणजेच आपल्याला पुढं करायचे आहे किंवा आपल्या जीवनाची स्थिती पुढे कडी असली पाहिजे ? आपल्या आपल्या जीवनात काय मिळवायचे आहे ? असे प्रश्न आपल्यामध्ये रुजतात किंवा रुजविले जातात आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आणि ते मिळवण्यात आपलं सबंध आयुष्य निघून जात.

    मग प्रश्नाची उत्तरे काय असू शकतात? तर आपणा सर्वांनाच माहिती आहे की,आपल्या पैकी प्रत्येकाचं स्वप्न असते ,ती व्यक्ती श्रीमंत असो व गरीब असो किंवा साक्षर असो या निरक्षर असो मी तर म्हणेन जगातल्या प्रत्येक प्राण्याचे स्वप्न असते की, मी या जगामध्ये एक असामान्य व्यक्ती म्हणून वावरल पाहिजे, आपल्याकडे भरपूर पैसा, संपत्ती असली पाहिजे , समाजात आपल्या नावाचा उधोउधो झाला पाहिजे , आपलं जीवन सुखा समधनाने, आनंदाने , हास्याने समृध्द असेल पाहिजे , माझ्याकडे चांगली गाडी , बंगला असला पाहिजे , मी काही लोकांना मदत केली पाहिजे अशी सर्वांची स्वप्ने असतात आणि ती स्वप्नेच आपल्या जीवनाचा उद्देश ठरतात.

    मग ही एवढी पंचतारांकित स्वप्ने आपण बघत असतो परंतु ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी किंवा आपण ठरवलेलं मिळवण्यासाठी जी मेहनत करावी लागते , ते आपल्याकडे आणण्यासाठी ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या आपण देतो का ? तेवढी मेहनत आपण करतो का ? जेवढं पोटेन्शियल त्या गोष्टीसाठी लागते तेवढे पोटेन्शियल आपण त्या गोष्टीसाठी देतो का? या प्रश्नांचा विचार केला तर यातून ‘नाही ‘ असे उत्तर हाती लागेल.

    आपल्याला जे गोष्ट मिळवायची आहे त्या गोष्टी साठी लागणारी पात्रता जर आपण पूर्ण करत नसाल तर ती गोष्ट आपल्याला कशी मिळेल? आपण स्वप्ने भन्नाट बघतो त्यात काहीच गैर नाही परंतु ज्यावेळी आपण आपल्या आयुष्याचे चित्र उत्तम रित्या रेखाटण्यासाठी मोठे मोठे ध्येय निश्चित करत असतो त्यावेळी प्राप्त करण्यासाठी किती मेहनत करावी लागते आणि ती मेहनत करण्याची माझी तयारी आहे का? या गोष्टीचा विचार करण्याची जास्त गरज आहे . कारण आपण फक्त “दे रे हरी पलंगावरी” या भावनेचा आदर करत असतो त्यामुळे आपल्याला तडजोडीचे जीवन जगणे भाग पडते. हरी सर्वांनाच देतो आणि तो देण्यासाठीच बसलेला आहे परंतु आपल्या त्याच्यापर्यंत जाऊन ते घेऊन यावं लागेल आणि आपली तेवढी सुध्दा तयारी राहत नाही म्हणून आपल्याला एवढी मोठी स्वप्ने बघून सुद्धा रिकाम्या हाताने परत यावं लागते.

    आपण ज्यावेळी आपल्या जीवनाची वाटचाल ठरवत असतो किंवा आपले जीवन समृद्ध करण्यासाठी जे मार्ग आपण निवडत असतो ते मार्ग निवडत असताना आपण फक्त त्यातून मिळणाऱ्या लाभांचा विचार करत असतो. त्यासाठी लागणारी मेहनत आणि ती मेहनत करण्याची आपली तयारी आणि कामांमध्ये आपल्याला आवड आहे का? या गोष्टी आपण दुय्यम ठरवत असतो म्हणून आपल्याला जे पाहीजे ते मिळत नाही.

    समजा ,एखाद्या व्यक्तीला करिअर निवडायचं आहे आणि त्याला गोष्टी मध्ये आवड आहे , ज्या गोष्टीतून त्याला आनंद प्राप्त होतो त्या गोष्टीकडे न वळता तो स्पर्धा परीक्षेमध्ये खूप वाव आहे त्यातून खूप सन्मान मिळतो, खूप पैसा आदर मिळतो या मोहाने तो त्या क्षेत्राकडे वळतो आणि त्याचा तो area core नसल्यामुळे त्याला तिथून रिकाम्या हाताने परत यावे लागते म्हणून त्यासाठी स्वतःला आपण ओळखले पाहिजे आपल्या मध्ये कोणते कौशल्य आहेत आणि कोणत्या गुनावरून आपण आपली जगला एक वेगळी ओळख दाखवू शकतो. हे ओळखन सर्वात महत्त्वाची बाब आहे.

    आणि स्वतःला ओळखण्यासाठी स्वतःमधील कौशल्य जाणून घेण्यासाठी आपल्यामध्ये इतरांपेक्षा वेगळं काय आहे हे वर आणण्यासाठी आपल्याला फक्त एक गोष्ट करावी लागेल ती म्हणजे आपण स्वतः आपल्या स्वतःसाठी एकांतात शांततेने वेळ दिला पाहिजे. कारण ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या गोष्टीसाठी आपण काहीतरी दिले पाहिजे. आणि आपल्यालाच आपली ओळख करून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला सुद्धा काहीतरी द्यावे लागते म्हणून त्या ठिकाणी आपण आपल्यासाठी वेळ दिलं पाहिजे. त्यातून आपण आपल्या मध्ये डोकावून बघून आपल्यातल्या सुप्त गुण आहेत की ज्यामुळे आपण आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो अशा सुप्त गुणांची ओळख होईल आणि ती वर काढण्याची शक्ती सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होईल म्हणून एकांतात बसून स्वतःसाठी वेळ देणं ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

    हल्ली आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहोत. आपल्याला आपल्यासाठी वेळ द्यायला मिळतच नाही कारण आपण बिनकामाच्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहोत. आपल्या जीवनासाठी चे हानिकारक आहे जे आपल्याला नको आहे त्याकडे आपले लक्ष आपण केंद्रित करत आहोत त्यामुळे आपल्यातली सगळी energy त्याच नको असलेल्या गोष्टीवर खर्च करून आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टीवर खर्च करण्यासाठी energy ची कमतरता भासत आहे. आपण नको असलेल्या गोष्टींमध्ये व्हाट्सअप, फेसबुक , ब्रेकिंग न्यूज, वेगवेगळ्या वेबसिरीज बघण्यासाठी सगळा वेळ खर्च करत आहोत आणि त्यातून आपल्याकडे नकारात्मक विचारांचा साठा निर्माण होत आहे त्यामुळे आपल्याला जे पाहिजे आहे न मिळता दारिद्र्य हाताला लागत आहे.

    या सर्व गोष्टींचा ऱ्हास करायचा असेल तर त्यावर एक गोष्ट खूप परिणामकारक आहे ती म्हणजे आपण आपल्या साठी वेळ दिला पाहिजे आणि आपल्याला आपण ओळखले पाहिजे. ज्यावेळी आपण स्वतःला वेळ देत असतो तेव्हा पासून नक्कीच आपल्याला स्वतःची ओळख होईल आणि जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी तर ठरवलंय की आतापासून स्वतःसाठी वेळ देणार .
    जीवन समृद्ध करण्याचे सूत्र आपल्या मौलिक ब्लॉग मधून गवसले याचा अत्यानंद होतोय अशी ही जीवनोपयोगी विचारांची देणगी देऊन life gift 🎁 केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

    Reply

Leave a Comment

Translate »
error: Content is protected !!