आजचा ब्लॉक हा आजचा युवक यशस्वी का होत नाही? या संबधीचा आहे, सोबतच सर्व युवकांना मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या सर्व पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक त्यांच्यासाठी आहे. आज युवक युवतींना जीवनात खूप काही करायचे असते आणि ते करण्यासाठीच्या भन्नाट व्यवसायिक कल्पनाही डोक्यात असतात. तरीसुद्धा त्यांच्या हातून काहीच घडत नाही, त्यांची सर्व शक्ती विघटित होते आणि नको त्या गोष्टींमध्ये ती खर्च होते. त्या ऊर्जेला एका ठिकाणी केंद्रित कसे करावे आणि पाहिजे तो रिझल्ट जीवनात कसा प्राप्त करावा याची उत्तरे देणारा हा ब्लॉग आहे. आज जगाची लोकसंख्या ७.५ अब्ज आहे. ही सर्व लोकं २५० राष्ट्रांमध्ये राहतात, यापैकी जगातील फक्त २.५ करोड लोकं फक्त यशस्वी आहेत आणि बाकीची नाहीत.
अशी कोणती कारणे आहेत की फक्त अडीच करोड लोक यशस्वी झालेत आणि बाकीचे आहे तिथेच आहेत? आपण आपल्या भारताचा विचार केल्यास, भारताची सर्वात मोठी शक्ती म्हणजे युवाशक्ती होय.
ही युवाशक्ती आपल्याकडे सर्वात जास्त आणि मोठ्या संख्येने उपलब्ध आहे. युवावर्गाकडे जी एनर्जी असते ती कमालीची असते, ती एनर्जी त्यांनी योग्य ठिकाणी लावली तर एक जबरदस्त क्रांती होऊ शकते, की ज्यातून जीवनाची मोठी मोठी आव्हाने चुटकीसरशी सुटू शकतात.
भारतीय युवक युवतींकडे वयाच्या २० ते २५ वर्षांपर्यंत मनात मोठी मोठी स्वप्न असतात. त्यांना जर विचारलं, तुम्हाला काय बनायचं? तर ते म्हणतात जीवनात खूप मोठं काहीतरी करायचं, यशस्वी व्हायचंय. परंतु जसं जसं वय वाढत जाते, तशी तशी त्यांची स्वप्न कमजोर होताना दिसतात.
माझा तुम्हाला एक प्रश्न आहे? यश, सफलता, कामयाबी, आणि सक्सेस म्हणजे काय असते? मला माहीत आहे तुम्हालाही यशाच्या दहा-बारा व्याख्या नक्की माहीत असतील, परंतु मी विश्वासाने सांगू शकतो त्या सार्या व्याख्या आज तुम्हाला चुकीच्या वाटतील.
माझा तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे की, जीवनात खरा यशस्वी कोण असतो? आजपर्यंत तुम्ही यशाच्या वेगवेगळ्या व्याख्या ऐकल्या असतील, परंतु, यशाची व्याख्या जगप्रसिद्ध विचारवंत अर्ल नाइटिंगेल यांनी अगदी एका वाक्यात सांगितली आहे. ते म्हणतात की, “जे काम तुम्हाला करायची इच्छा आहे, ते काम तुम्ही करीत असाल, तर तुम्ही जीवनात खरे यशस्वी आहात”. या व्याख्येनुसार तुम्ही विचार करा, तुम्हाला किती टक्के लोक त्यांच्या जीवनात खरे यशस्वी दिसतात?
जसे तुम्हाला क्रिकेटर बनायचे होते आणि आज तुम्ही क्रिकेटर आहात तर तुम्ही यशस्वी आहात.
तुम्हाला उद्योजक बनायचे होते आणि आज तुम्ही उद्योजक आहात तर तुम्ही यशस्वी आहात.
तुम्हाला लेखक बनायचे होते आणि आज तुम्ही लेखक आहात तर तुम्ही यशस्वी आहात.
तुम्हाला शिक्षक व्हायचे होते आणि तुम्ही आज शिक्षक आहात तर तुम्ही यशस्वी आहात.
तुम्हाला गायक, वादक, नाटककार, चित्रकार, शिल्पकार, अभिनेता, अभिनेत्री किंवा संगीतकार व्हायचे होते आणि आज तुम्ही ते आहात तर तुम्ही यशस्वी आहात.
तुम्हाला डॉक्टर, इंजीनीअर, किंवा आर्किटेक्चर व्हायचे होते आणि आज तुम्ही ते आहात तर तुम्ही यशस्वी आहात.
तुम्हाला अधिकारी व्हायचे होते आणि आज तुम्ही ते आहात तर तुम्ही यशस्वी आहात.
तुम्हाला पुढारी, राजकारणी व्हायचे होते आणि आज तुम्ही ते आहात तर तुम्ही यशस्वी आहात.
असे कोणतेही क्षेत्र घ्या तुम्हाला जे व्हायचे होते आणि आज जर तुम्ही ते झाले असाल तर तुम्ही आज यशस्वी आहात असे समजले जाईल.
एका अभ्यासावरून हे सिध्द झाले आहे की, ज्या लोकांना जे व्हायचे होते ते होता न आल्यामुळे दुसरेच कोणतेतरी काम किंवा व्यवसाय करावा लागतो, त्यामुळे त्यांची परिस्थिती अशी होते की, यातील काही लोकांना पद, पैसा आणि प्रतिष्ठा कधी कधी भरपूर मिळत असते परंतु त्यांचे कामामध्ये लक्ष न लागल्यामुळे ते स्वतःही नीट काम करीत नाहीत व जे करतात त्यांनाही करू देत नाहीत, त्यामुळे ते आपल्या कामाशी संबंधीत कोणतीही जबाबदारी घेण्यास तयारी दाखवत नाहीत. त्यामुळे ते सतत असमाधानी जीवन जगताना दिसतात.
तुम्हाला अशा वृत्तीची लोकं तुमच्या आसपास सहजच बघायला मिळतील. अशाप्रकारे आज तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांकडे पाहिले तर असे दिसेल की, जवळपास ९० ते ९५ टक्के लोक त्यांना जे करायचे होते ते बाजूला ठेऊन नको असलेले काम पर्याय नाही म्हणून करताना दिसतील.
हे किती बरोबर आहे ते नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा. जीवनात खरे यशस्वी होणारे लोक नेमके काय करतात?
याचे उत्तर शोधण्यासाठी आज मी तीन केस स्टडीजच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडत आहे. भारतात आज नवे १७ युवक अब्जाधीश आहेत, ज्यांचे वय ४० पेक्षा कमी आहे, आणि तेही पाच वर्षाच्या आत ते युवक करोडपतीचे अब्जाधीश झाले आहेत. हा चमत्कार नाही. त्यांनी नेमकं काय करून हे सगळं प्राप्त केलं असेल? तर या यशस्वी लोकांमधे खास खुबी आहेत.
काहींचे बिजनेस मॉडेल जबरदस्त आहेत, कोणी टाईम मेनेजमेंटचा एक्सपर्ट आहे, कोणी मार्केटचा एक्सपर्ट आहे, कोणी विक्री करण्यासंबंधीचा गुरु आहे, या सर्वांमध्ये एकापेक्षा एक वेगळी खुबी आहे.
परंतु तुम्ही एक गोष्ट ऐकूण अवाक व्हाल की, त्यांच्यात एक गोष्ट कॉमन आहे, फक्त एक गोष्ट, हो खरंच एक गोष्ट. आणि ती गोष्ट म्हणजे सुरुवात करणे… START करणे होय.
यापैकी काहींना घरातील गॅरेज रिकामा दिसला तर त्यांनी त्यालाच आपले वर्कशॉप बनवले आहे.
कोणाला आपल्या घरातील एखादी खोली रिकामी सापडली तिथेच एक खुर्ची टाकून काम सुरू केले.
कोणाला पार्किंगचा कोपरा मिळाला, कोणाला कॉफीशॉप किंवा रेस्टॉरंटचा टेबल मिळाला, कोणाला आपल्या मित्राच्या ऑफिस मधील एखादा रिकामा कप्पा मिळाला त्यांनी तिथेच एक बोर्ड लावला व तिथेच कामाला सुरुवात केली.
ज्यांना काहीच मिळाले नाही त्यांनी ते जिथे आहेत, ज्या परिस्थितीत आहेत तिथेच कामाला सुरुवात करून आपल्या यशाच्या प्रवासाला निघालेत.
यातील पहिले नाव म्हणजे…
१) रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal):- हा ओडिशा राज्यातील भारतीय तरुण आज केवळ २८ वर्षांचा आहे. त्याने ७ वर्षात केवळ १२ हजार रुपये लावून जगातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची OYO Rooms नावाची हॉटेल चैन उभी केली. आज तो १३००० हॉटेल चा मालक आहे, यांमध्ये १२ लाख खोल्या आहेत. त्याची आज व्यक्तिगत कमाई ७२५३ करोड रुपये एव्हढी आहे.
२) निखिल कामत (Nikhil Kamat):- याने अवघ्या १० वर्षात बिलियन डॉलर्सची कंपनी उभी केली. त्याच्या Zerodha कंपनीचे आज ६० लाख क्लाएंट्स आहेत. त्याच्याजवळ आज Indian Stock Exchange मधील १५% मार्केट आहे.
२००३ मध्ये तो एका कॉल सेंटरच्या कंपनीत ८००० रुपयांची नोकरी करीत होता. त्याची आज व्यक्तिगत संपत्ती १३००० करोड रुपये एव्हढी आहे.
३) अनुभव दुबे (Anubhav Dubey) :- मध्य प्रदेशातील रेवा शहरात राहणारा हा तरुण केवळ वयाच्या २२ व्या वर्षी करोडपती झाला. याने २०१६ मध्ये चाय सुट्टा बार (Chai Sutta Bar) नावाचे चहाचे आऊटलेट सुरू केले. भारता सोबतच ओमान आणि दुबई येथे त्याचा चहा निर्यात होतो. ५ वर्षात तो १०० करोड रुपयाचा मालक आहे.
वरील यशस्वी लोकांचा अभ्यास आणि निरीक्षण केल्यावर खालील सूत्र सापडलीत.
१) एक गोष्ट समान दिसली की, ज्या कोणत्या प्रोजेक्टची कल्पना त्यांच्या मनात आली तेंव्हा त्यांनी लगेच त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आहे.
२) आपण काय करू शकतो त्याची सुरुवात केली, लोकांच्या फुकट सूचनांचे पालन करणे सोडून दिले.
३) ते जिथे कुठे होते तिथून लगेच सुरुवात केली.
४) लोकं काय म्हणतील याची पर्वा केली नाही, आपल्या मार्गावर चालत राहिलेत.
५) आपले भविष्य आज जे काही करू त्यावरून घडते, उद्या नाही. या तत्वावर विश्वास ठेऊन काम केले.
यावरून तुमच्या लक्षात येईल की फक्त विचार करून चालणार नाही तर त्या विचारांवर / कल्पनेवर तात्काळ कृतीची गरज असते. थोडा जरी उशीर केला तर आपले मन त्या कल्पनेचे (Idea) विश्लेषण (Analysis) करायला सुरुवात करते, हे मन अनेक संदर्भ शोधायला लागते जसे की, ती गोष्ट आत्ता करणे शक्य नाही, हे वातावरण सध्या अनुकूल नाही, त्यासाठी लागणाऱ्या भौतिक गोष्टींची आज कमतरता आहे, आजपर्यंत बऱ्याच लोकांनी ते करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यापैकी कोणीच यशस्वी झाले नाहीत अशी अनेक तथ्थे बाहेर येतात आणि त्या कल्पनेवरची कृती उद्यावर ढकलली जाते आणि तो उद्या कधी उगवतच नाही. याचा अनुभव तुम्हाला आला आहे काय? आला असेल तर खाली नक्की लिहा.
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद!!
हा ब्लॉग तुमच्या आवडत्या लोकांना / विद्यार्थ्यांना / मित्रांना नक्की शेअर करा, काय सांगता येईल त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात तुमचा हा छोटासा प्रयास महत्वाचा ठरेल .
आणखी वाचा: आपले ध्येय नेमके कसे निश्चित करावे आणि ते कसे प्राप्त करावे?
आणखी वाचा: जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवावे? How to get what you want in life?
आणखी वाचा: जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे? How to live life as a warrior?
Very nice and motivational writing
Congratulations sir
Thank you so much, Ma’am, for your kind and motivational comments.🙏☺
Very inspiring article,you are doing nice and important work for present generation.
Thank you so much, Mam, for your kind and inspiring words.
खरच सर आपण मांडलेली भूमिका अतिशय मार्मिक आहे।आज तरुणांना जर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्यांनी आपल्या कामाला योग्य महत्व देने गरजेचे आहे
धन्यवाद, सर🙏☺
तुम्हाला एक विनंती आहे की,
हा विचार आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहचवा जेणेकरून त्यांच्या जीवनात बदल घडविण्यात आपला थोडासा प्रयास मोठा परिणाम करू शकेल.
Thank you, Mam, you are my inspiration, your kind words are blessings for me.
Congratulations dear sir,
your writing is always very inspiration and encourage .
Very very excellent sir
Thank you, sir, your comment is very important for my motives.
सर, तुमचा ब्लॉग वाचल्यावर नेहमीच नवी उमेद व आपल्या स्वप्नांना गाठण्यासाठी प्रेरणा मिळते 💫
तुम्ही तुमच्या स्वप्नांचे नेहमीच मालक आहात म्हणून त्यांना जपा आज तुमच्या हातात वेळ आहे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी.
सर तुमचा हा प्रयत्न आमच्या सारख्या विध्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी खुप आणी खूपच उपयुक्त ठरणार आहे……..i love your all blogs sir G…..🙏🙏
धन्यवाद, असेच शिकत रहा. तुम्ही मोठे व्हावे हाच एकमेव उद्देश ठेऊन हे लीहतोय.
Very good and motivating blog. Very encouraging message for youngsters to start something as soon as it clicks. Best wishes sir very enjoyable reading.
However if you permit let me add that we have to come out of this block in our minds that whatever things we do if we like those things then only if it is done then we are happy and successful. however I feel that it is not always possible that we we would get to do the job that we like . But liking what we do is much more important And doing such jobs which we do not like, more efficiently and successfully is the real success that is what I feel.
Thanks sir, I do not have any Intention to harm your or anybody’s sentiments or feelings or thoughts it is just what I thought I have put it I hope you all like it.
Thank you so much, sir, for your valuable comment on this blog post. it’s a very learnable thought for me, that you have mentioned here. I have learned an excellent view from your thoughts.
Respected Sir,
Your every activity is with enormous amount of energy and detailed research work.
Your present article is quite interesting and motivational.
Thanks for sharing.
Regards
Vijay Kasture
Thank you so much, sir, you’re valuable words always inspired me to do more.
सर हा ब्लॉग वाचून मनाला एक धक्काच बसतो जगाचे खरे सत्य काय आहे हे समजते फक्त स्वप्न पाहून चालणार नाही तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे समजले खरं सांगू तर सर मला यशाची खरी व्याख्या ती आज ब्लॉग वाचून कळली सर आपण लिहिलेले हे ब्लॉग मनावर वेगळीच छाप सोडून जातो सर तुमच्या प्रभावशाली लेखनाचे जेवढे कौतुक केले तेवढे कमीच आहे परंतु शेवटी सर माझ्याकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद
अशीच मनात शिकण्याची भूक जागी ठेवा. जीवन खूप छान आहे त्याला आणखी सुंदर आपण बनवू शकतो हा विश्वास मनात ठेवा.
It’s really a motive for youngsters like us….Thank you so much sir🙏🏻💐
Always stay motivated and do your best in life, this is the main motive of writings.
फक्त कल्पना करून चालत नाही तर ती अंमलांत आणली पाहिजे त्याच्यासाठी स्वतःच्या मनाची जिद्द आत्मविश्वास आणि वरिष्ठांचे ,अनुभवी लोकांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते केवळ कल्पना आणि आत्मविश्वास असुन चालत नाही तर त्याच्यासाठी मेहनतीची जोड आवश्यक असते ज्याचा अभाव आज तरुणांमध्ये आपल्याला दिसतो अल्पकाळात श्रीमंत होण्याची केवळ मनीषा ठेवतात परंतु ज्या वेळेस प्रत्यक्ष कृतीची वेळ येते त्यावेळेस मात्र त्यात बदल होताना दिसतो म्हणून आत्मविश्वास आणि काम करण्याची ईच्छा असणे गरजेचे आहे.
आत्मविश्वास, मार्गदर्शन आणि मेहनतीचा परिणाम यश हे तुमचं म्हणणं खरं आहे,सर.
Very well written sir.. Readers will surely get encouraged to pursue what they have truly dreamt about! It definitely will be a welcome addition though that inspite of all efforts if somehow a person is unable to make his/her dream come true, then it is always recommended to pursue the next best option with equal zest and interest rather than losing hope, and take up the responsibility of reshaping the dream into what he/she is currently doing!
Thank you, Mam, for your valuable comment, it’s inspired me to study more and write more. Your observation is right.
Very nice Sir!!! Definitely it will work
Thank you.
Congratulations, keep it up and all the best.
Thank you.
सर आपल्या लेखनातून मला एक गोष्ट नेहमीच आवडते ती म्हणजे तुमच्या लिखाणातल्या भाषेची सुलभता आणि सदरील ब्लॉग मधील दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे “सुरुवात ” STARTING आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या वेगळ्या कल्पणेला खतपाणी घालून त्यांना वाढवणे it is Mantra of success
superb, तुम्हाला असेच सहज आकलन व्हावे म्हणून जेव्हढी सहज, सोपी भाषा वापरता येईल तसे लिहण्याचा प्रयत्न करतोय. असेच शिकत रहा आणि हा विचार प्रेत्येक मोठं होण्याचे स्वप्नं पाहणाऱ्या व्यक्तिपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करा व या आपल्या मिशन मध्ये सहभागी व्हा.☺
Very wonderful writing sir. You are really doing a noble job of inspiring the youth. Such blog helps to kickstart the motivation for their success journey. Keep it up! Best wishes
Thank you, Madam, for your great support.☺
यशाची खरी व्याख्या तर आज कळली. Thank you so much sir तुमच्या मुळे आम्हाला आमची जीवनाची दिशा ठरविता आली.
धन्यवाद, असेच जागरूक होण्यासाठी शिकत रहा. अशीच जीवनाची दिशा इतरांनाही ठरवता यावी यांसाठी हे विचार शेअर करा.
Nice blog Respected Sir..
It is important to “START”.
Tumhi je examples dile te inspiring ahet.
Thank you.
Very Inspiring and motivational for young generation. Congratulations Sir .
Thank you, Mam, for your inspiring words to me. Please spread this thought to the students.
Very inspiring article.very nice sir.
Thank you so much, Mam, for your motivation.☺🙏
Thank you so much sir, for providing such interesting articles to us.
Most welcome sir Ji. Please spread this thought among your students and loved ones for their life improvement.
You have perfectly articulated your thoughts.
Thank you so much, sir, for your inspirational words.
Sir, Please spread this thought among our students.
Yes, agreed …
You are the most successful person in the world only when you does what you wants to do…
Thanks for such a motivational thought…
Thank you so much, sir, for your great comment.
I humbly request to you, please spread this thought to your students who want to do great in their life.
युवकांना प्रेरणादायी लिखाण, आपण फार अमूल्य मार्गदर्शन करीत आहेत, हे कार्य सातत्य आपले निर्धारित मिशन पूर्ण करेल, आपणास शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद सर जी 🙏
तुमचे हे प्रेरणादायी शब्द आणि तुमच्या सकारात्मक सदिच्छा हे मिशन पूर्ण करण्यासाठी वरदान ठरणाऱ्या आहेत.
Khupach Chan writing sir.khup Chan watla sir tumcha ha motivational Blog keep it up sirji
Thank you☺
Its Truly inspiring for students like us and it stucks the mind that you should START First and then you will be able to achieve your goal. Dear Sir, Thank you so much for inspiring me and youth generation.
Thank you☺
Aaple he margadarshk Khup vachnarya pratek Vectisathi khup preranadayi tharel khup chan vatala sir blog ani mi aaple margadarshan anubhavl dekhil aahe 🙏🙏👌👌💯
असेच शिकण्याची आवड जागी ठेऊन, नवीन नवीन गोष्ठी आत्मसात करा आणि जीवनातील आव्हानांना स्वीकारावे आणि त्यावर तुम्ही मात करावी यांसाठी हा माझा छोटासा प्रयास आहे.
Ho nkki sir 🙏
Really you have conveyed an inspirational message for the beginner’s.
Thank you so much, sir, for your kind words.
सर, मला खूप काही प्रेरणा मिळाली या ब्लॉग ने .आपल्याला ज्या कामात आपलं लक्ष लागत तेच काम आपण केलं पाहिजे आणि त्याचा साठी लागते ती म्हणजे “सुरुवात” फक्त कल्पना करून चालत नाही तर ती अंमलांत आणली पाहिजे त्याच्यासाठी स्वतःच्या मनाची जिद्द आत्मविश्वास आणि वरिष्ठांचे ,अनुभवी लोकांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते केवळ कल्पना आणि आत्मविश्वास असुन चालत नाही तर त्याच्यासाठी मेहनतीची जोड आवश्यक असते.जेणे करून आपल्याला ते कमी करायला भाग पडेल आणि आपल्या जीवनात खूप असे लोक येतील जे demotivate करतील तर काही motivate आपल्यला जे योग्य वाटेल तेच करायला हवं. ज्याचा अभाव आज तरुणांमध्ये आपल्याला दिसतो अल्पकाळात श्रीमंत होण्याची केवळ मनीषा ठेवतात परंतु ज्या वेळेस प्रत्यक्ष कृतीची वेळ येते त्यावेळेस मात्र त्यात बदल होताना दिसतो म्हणून आत्मविश्वास आणि काम करण्याची ईच्छा असणे गरजेचे आहे.
आणि सर तुम्हाला खूप miss करतोय मी कारण तुम्ही जेव्हा आपल्या नाईक कॉलेज ला होते तर तुमचा कडून खरंच खूप काही शिकायला मिळायचे. तुम्हाला भेटून एक वेगळीच प्रेरणा आणि जिद्द निर्माण होयची जे की आता नाही येत कारण सांगणारे खूप आहेत पण योग्य मार्गदर्शन करणारे नाही .तुम्ही आमचा जवळ जास्त काळ राहिले नाही पण जेवढे दिवस होते त्या दिवसात खूप काही शिकलो . खरंच i really miss u sir तुमचा सारखे गुरुवर्य नाही भेटणार मला life मध्ये …..👍😊
Ha kharch kup changala motivational Blog aahe..
Thank you sir hya motivation baddal..
Ha kharch kup changala motivational vishay aahe..
Thank you sir hya motivation baddal..
असेच शिकत रहा व पुढे जीवनात मोठे व्हा.
मला आज असं वाटत आहे कि हा लेख मी आज वाचला नसता तर कदाचित मलाही यश हे वेळ चुकून भेटले असते. पण हा लेख वाचून मी ह्या यशस्वी लोकांशी माझी तुलना करायला लागलो.
मला ह्या ब्लॉग नी विचार करायला भाग पाडलं कि काय माझं ह्या लोकांसारखे च वर्तन आहे? काय माझाही दृष्टिकोन असाच आहे ?
खरं म्हणजे मी स्वतःच माझ्या वडिलांशी हट्ट करत होतो कि मला माझे स्वप्न पूर्ण करायला पुण्याला जायचं आहे. माझा हा समज होता कि मी पुण्याला गेल्या शिवाय यशस्वी होऊ शकत नाही . हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. वडील मला समजावयचे कि एव्हढे वर्ष थांब ह्या वर्षी आपली आर्थिक परिस्तिथी ठीक नाहीये. पण मी हट्टी. माझा समज हा गैरसमज होता ते मला हा लेख वाचल्या नंतर कळलं .
मला हे कळलं आहे की स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुबंई, पुणे किव्हा दिल्ली सारख्या ठिकाणी जाउनच पूर्ण होतात असं नाही . आपण ज्या परिस्थितित आहे , जिथे कुठे आहे , तिथूनच आपण सुरुवात करू शकतो आणि यशस्वी ही होऊ शकतो. पण सुरुवात खूप महत्वाची आहे. आणि मला वाटत जगातले 95% लोक सुरुवात करण्या ऐवजी आपल्याला ज्या अडचणी आहे तेच घेऊन रडत बसता . आणि अपयशाच ओझं हे दुसऱ्याच्या बोकांडी टाकण्याचा प्रयत्न करतात.
आपण आपल्या स्वप्नांवर् प्रामाणिक पणे सातत्यपूर्ण काम करीत राहील पाहिजे जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर.
खरं तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचं स्वप्न होत कि पायलट बनव .पण ते काही अडचणी मुळे नाही होऊ शकले पण ते काय खचून गेले का? तर नाही . ते प्रामाणिक पणे सातत्याने धैर्य ठेवत काम करत राहिले आणि result हा आपल्या सर्वांना माहीतच आहे.
खरं सांगायचं झालं तर जीवनात ज्याला यशस्वी होण्या ची आग असते ना, ती जिद्द, तो दृढ सकल्प्, काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न माणसाला निश्चिन्त बसू देत नाही , झोपू देत नाही. ते लोक ज्या परीस्थितीत आहे तिथूनच पेटून उठतात. ताबडतोब सुरुवात करतात आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकू लागतात. आणि एका थिनगी च वनव्यात रूपांतर जरून टाकतात.
जेव्हा चाणक्याने आपली शेंडीची गाठ सोडून शप्पत घेतली होती कि मी धनानंदाचा सर्वनाश केल्या शिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही. तेव्हा लगेच आचार्य चाणक्य आपल्या ध्येयाच्या शोधात तडातडा तिथून निघून गेले आणि आपल्या सर्वाना माहीतच आहे कि धनानंदाचा सर्वनाश करून चंद्रगुप्ताच राज्य उभ केलं. खरं तर ह्या गोष्टी एका वाक्यात सांगायला खूप सहज वाटतंय पण खरंच कल्पना करून बघा कि एव्हढी सोपी गोष्ट होती एक साम्राज्य उभ करन.
स्वामी विवेकानंद म्हणतात कि
” उठा जागे व्हा!
आणि
ध्येय सिद्धी झाल्या वाचून थांबू नका”
खरं म्हणजे आपले स्वप्न काहीही असू शकत. काही लोक फुकट आपल्याला सल्ला देतात कि, नाही असं कर, तस कर. पण माझं एकच मनानं आहे की
“ऐकावे जनाचे करावे मनाचे”
आपल्या आवडी नुसार आपण कामं करावे आणि त्यावर काम करायला सुरुवात करून द्यावी.
कोणतेही स्वप्न मोठं किव्हा छोटं नसत . स्वप्न ते स्वप्न असत. ते ध्येय असत. आणि म्हनुन लोकांचे फुकटचे सल्ले ऐकत बसायच नाही. म्हणतात कि ‘लोक गाढवावर हि चालू देत नाहीत आणि पायी हि चालू देत नाहीत’ म्हणून आपल्यासाठी जे योग्य असेल ते आपण करायचं .
आपण आज जसे कर्म करू तसेच फळ आपल्याला उद्या भेटणार आहे. म्हणून आजच जर आपण मेहनत घेऊ तर त्या मेहनतीचे फळ हे आपल्याला नक्कीच भेटणार आहे.
धन्यवाद सर खुप काही शिकायला भेटलं मला ह्या लेखामधुन.
यशस्वी होण्यासाठी तुम्ही जी व्याख्या सांगितली ती नक्कीच खरी आहे. याचा अनुभव मी माझ्या वडिलांना घेताना पाहिले आहे.त्यांनी कुटुंबाच्या आग्रहा खातर अनेक कामे केली ज्यातून त्यांना पैसे मिळाले पण समाधान नाही.पण ज्या वेळी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला तेव्हा त्यांना समाधान आणि आनंद मिळाला.ह्या ब्लॉग वाचून मी माझ्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी म्हणजेच मला जे करण्याची इच्छा आहे ते करण्यासाठी प्रयत्न करेल.
Thank you so much Sir 😊
मन्नत आणि प्रकर्षाच्या भन्नाट व्यवसाईक कल्पना असुनाही आजचा युवक यशस्वी का गरम नाही? करण आजचा जो युवक आहे तो प्रयातंच करत नाही जे स्वप्न त्यानी पाहिलय जे पूर्ण कर्ण्यचं प्रयांत ते करच नाही आज चा युवा हा युवाशक्ती म्हनुन ओलखला जातो पण खर बघायला जेल त्र अस नाहिये.करण युवाक हा मनुच्चारय हा कवित्त्खळ्खळुपन हे मनुच्खल्पनाही काय करायचं ते महित नाही आणि महित असुन्ही त्या द्रुष्टीनें प्रेंत करत नाही आज चा युवक हा आलाशी झाला आहे.आज च काम उड्या करू म्हणून म्हनारा युवाक आज आहे.पण म्हणून म्हनून आता चालनार नाही करण चारयुक्त म्हणून म्हणाला स्वाताहा मधे थोडा बादल कराव लग्नर आहे मला महिती प्रियतेक युवाकच स्वप्न सरख नस्त पण प्रतेक युवा हा प्रियंत करू शकतो जर आजच्या सर्व युवकानी प्रयंत केला.आडचनी यत्त अडचनी येनार पण आस्त त्याच्या त्याच्या न त्याच्या त्याच्या त्याच्या न जाणता त्यमुले कोंठेही काम कर्ताना अडचणू ही है येनार्च पण आता आडचनीवर मात करुण आपन जे स्वप्न बघितले ते पूर्ण कराचे आहेत मनासला प्रेटेक गोष्ट sopya padhatine yala pahije.pan Mala Ek Samjat Nahi Jar Pratek Gosht Ashi ch सहज भेटली अस्ति.तर त्या गोष्टीची जी मजा आहे.ती गोष्ट सहज भेटली अस्ति तर त्या गोष्टीची जानिव हि आजच्या माणसातल्या माणसातल्या माणसातल्या जन्माला नाईलाजाने अन हे आज च युवा करू शकतो हे मला महिती आहे.
Thank u sir for this blog,ya blog mule aaj maz mindset change zal,maze kaka jr..clg la lecturer ahet ani te svatach side buisness kartat,ani me tyanna nehami bolte ki kay Ho kaka mounthly income tumchi tharli ahee,tari sudha He kam karychi kahi avshykta ahe ka tumhala,tevha te kahi bole nahi ,but aaj tyanch ans..mla tumcha blog vachun mialal
Sir, आपण जो यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला तो अतिशय उत्तम पद्धतीने सांगितला. आपण ज्या फील्ड मध्ये उत्तम प्रकारे योगदान देऊ शकतो किंवा त्या आवडीचा फील्ड मध्ये आनंद उपभोगू शकतो तेच आपण केले पाहिजे हे आपण छान सांगितले .सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर जी यांचे उदाहरण सर्वाना माहिती असलेले! आपल्या जे आनंद आणि समाधान प्राप्त करून देते तेच आपण केले पाहिजे मग ते संगीत, नाटय़ ,नृत्य, किंवा एखादा आविष्कार अडचणी तर येणार परंतु मार्ग शोधून निर्णय कसा घ्यावा
हे आपण छान पद्धतीने आम्हाला सांगितल्या बदल धन्यवाद सर!
सर,हा ब्लॉग वाचुन खऱ्या अर्थाने समजलं की यश, सफलता म्हणजे काय?जीवनात खरे यशस्वी कोण असतात? नाहीतर एखाद्या क्षेत्रात एखादा व्यक्ती मोठ्या पदावर आहे आणि पैसे चांगले कमवतो म्हणजे तो यशस्वी आहे अस आपण समजतो. अर्ल नाइटिंगेल म्हणतात की, “जे काम तुम्हाला करायची इच्छा आहे, ते काम तुम्ही करीत असाल, तर तुम्ही जीवनात खरे यशस्वी आहात”. पण असे लोक आपल्याला क्वचितच आढळतात. इच्छा नसताना करणाऱ्या कामात आपले लक्ष लागत नाही, आणि ते कार्य आपण Robot सारखे करत राहतो. आणि असेच लोक आपल्याला जास्त प्रमाणात मिळतात. आणि सर, शेवटी तुम्ही जो विचार मांडला आहे की फक्त विचार करून काही उपयोग नाही त्यावर तात्काळ कृती झालीच पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. या सगळ्याच ब्लॉग्ज मधील तुमचे विचार वाचून आमच्या जीवनात परिवर्तन होत आहे.
Thank you so much sir😊.
Thank you sir,आम्हाला यशाची खरी व्याख्या सांगितल्याबद्दल.आपण जे काम उत्तमप्रकारे व आनंदाने करू शकतो तेच काम आपण केले पाहिजे हे छान सांगितले.मनात अनेक कल्पना असून देखील आजचे युवक/युवती यशस्वी नाहित कारण त्यांच्या मनातील गोंधळ!ते त्यांच्या करियर,शिक्षण याचसोबत आवडी बद्दल ही गोंधळलेले असतात.यशस्वी होण्यासाठी जे आपल्याकडे आहे त्यामधून सुरुवात केली पाहिजे;महत्त्वाचे आहे सुरुवात करणे.कोणतेही काम सातत्याने करणे आवश्यक आहे.एखाद्या अपयशाने खचून न जाता त्यातून शिकले पाहिजे की आपली काय चुक झाली.
Sir,तुम्ही जी तीन उदाहरणं दिली त्यामधून खूप मोठी प्रेरणा मिळाली.
आपण आपल्या स्वप्नांचे मालक असतो व ती पूर्ण करणं फक्त आपल्याच हातात असतं.
आपल्या पुढे मोठे स्वप्न असल्याशिवाय आपण कोणतीही हालचाल करीत नाही. स्वप्न पळायला लावतात, परंतु ती आपली स्वतःची असली पाहिजेत.
deep learning करून मोठं होणं आपल्या हातात असतं.
नमस्कार सर,
या ब्लॉग मध्ये तुम्ही यशस्वी होणे म्हणजे काय? आणि एवढे talented लोक असताना सुद्धा ते जीवनात यशस्वी का होत नाहीत हे अगदी सरळ आणि सोप्या शब्दांत मांडलेलं आहे. आम्ही आजपर्यंत successful होणे म्हणजे जीवनात ठरवलेले goals achieve करणे असा अर्थ लावत होतो . जे ठरविलेले goals पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो ते मुळात आपले goals आहेत का नाहीत ? हा विचार आपण कधी करत नाही. आणि हा विचार करायला लावणारा हा ब्लॉग आहे. आपण यशस्वी त्याच क्षेत्रात होऊ शकतो ज्या क्षेत्रात आपल्याला काम करायची इच्छा ,आवड आहे. अशाच लोकांची संख्या एकदम कमी आहे म्हणजे पाच ते दहा टक्केच. आपली आवड बाजूला ठेवून ऑप्शन नाही म्हणून काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.जे काम करतो ते त्याला आवडत नाही आणि म्हणूनच तो व्यक्ती जीवनात यशस्वी होत नाही. आणि आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या डोक्यात एखादा विचार आला की आपण हे करायचे त्या क्षणी आपण त्यावर action घ्यायला पाहिजे. याचे तीन उदाहरण दिलेले आहेत 1)रितेश अग्रवाल 2) निखिल कामत आणि 3)अनुभव दुबे . यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट म्हणजे त्यांच्या मनात हा विचार येताच त्यावर कृती केली. आपल्याही प्रत्येकाच्या मनात भन्नाट कल्पना असतात पण आपण त्यावर कृतीच करत नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसतो. हे सर्व बाजूला सोडून आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे मग आपण नक्कीच यश संपादन करू शकतो.
धन्यवाद सर…😊
हा लेख जीवन बदलणारा लेख आहे. खरं यश काय असते, ते ह्या ब्लॉग मधून समजले. आणि हेही समजले कि फक्त विचार करून ,मोठे मोठे स्वप्न बघून, जीवनात परिवर्तन नाही येणार तर त्यासाठी तो विचार कृतीत आणावा लागेल.
त्यासाठी मेहनत घ्यावा लागेल पण सर्वात पहिली जि पायरी आहे ती म्हणजे सुरुवात. मी कुठे तरी वाचलं होत कि ज्यांना यशस्वी व्हायचंय ते मार्ग शोधतात आणि ज्यांना नाही व्हायचं ते कारण शोधतात.
तर हा ब्लॉग वाचल्या नंतर मला वाटत कि यश-अपयश हे आपल्या हातात आहे. हे आपल्याला ठरवायचं असतं कि आपल जे स्वप्न आहे त्याच्यावर काम करायला सुरुवात करायची कि फक्त स्वप्न रंगवत बसायचं. पण मित्रांनो स्वप्न रंगवायला तर खूप मज्जा वाटते, मनोमनी खूप आनंद वाटतो पण यांनी खरंच आपण जिथे इच्छा आहे तिथे पोहोचणार आहे का?
तर आज जी महत्वपुर्ण गोष्ट शिकायला भेटली ती म्हणजे सुरुवात. सुरुवात खूप महत्वाची आहे. मला एक शेर सांगुशी वाटतोय कि. ” भटकते भटकते हि सही एक दिन मंजिल तक पोहोच ही जाएंगे, गुमराह तो वो लोग हे जो घर से निकले हि नाही”.
तर आपल्याला आहे तिथून पुढे जाण्याची तयारी करायला पाहिजे. एका ठिकाणी बसून जमणार नाही.
या लेखतुन् फक्त एक गोष्ट शिकायला भेटली असं नाही तर खूप काही शिकायला भेटलं. यातून नवीन नवीन कल्पनांशीहि भेट झाली . यात जे उदाहरणं दिली आहे त्याच्या कल्पनाही माहित झाल्या आणि त्यांनी काय केलं कि ते तेव्हढे यश प्राप्त केलं तेही माहीत झालं.
आपण जेव्हा केव्हा नवीन काही तरी करण्याचा प्रयत्न करतो किव्हा ठरवतो तेव्हा लोकही आपल्या आजू बाजूला अशे असतात कि ते आपल्याला फुकट सल्ले द्यायला येतातच. हे समाजाचे वैशिष्ट्यच आहे. पण आपल्याला त्यातून काय ऐकायचेय कोणाच ऐकायचं हे आपल्याला समजल पाहिजे, आपल्याला ठरवता आलं पाहिजे. कारण समाजात अशे अशे नमुने सापडतात कि ज्याला एक लाख कमवण्याची अक्कल नाही त्याने कधी कमवले नाही, तो आपल्याला सांगतो कि एक लाख कशे कमवावे.
“चाणक्य नितीत तर स्पष्ट सांगितलं आहे कि मूर्ख व्यक्ती पासून दूर राहावे.”
लोक हे काही खराबी काढतात काही प्रोत्साहन देतात. पण आपण ताठस्थ असलं पाहिजे.
आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे आपल्याला माहित असलं पाहिजे.
एक मह्त्वची गोष्ट म्हणजे आज आपण जे कर्म करू त्यावरच आपल फळ निर्भर असत म्हणून आपण आजच पूर्ण ताकतीने कामाला लागायला पाहिजे.
उद्याची वाट पाहत बसलो तर उद्या काही उगवत नाही आणि यश काय हातात येत नाही. मग
मग निराशा दाटवते.पण आपण जर निवांत आपल परीक्षण केलं तर चुक कुठे न कुठे आपलीच असते. म्हणून वेळो वेळी आपण मनन करीत राहीलं पाहिजे.
आज खूप काही रहस्य सापडले. मला वाटते खूप काही मला लिहायच राहून गेलं पण जेव्हड आज शिकायला भेटलं ते मौल्यवान भेटलं.
धन्यवाद.
नमस्कार सर…
आयुष्य म्हणजे काय असतं हे तर तुमच्या पेक्षा आज पर्यंत कोणी एवढ् सोपं करून सांगितले नाही. तुम्ही लिहिलेला ब्लॉग खरचं विचार करण्या सारखा आहे.. खूप वेळा विचार करून योग्य निर्णय घेण्यात आला नाही की ,आहे तो निर्णय योग्य आहे . याच्यात देखील दुमत आहे. परंतु तुमचा ब्लॉग वाचल्यानंतर स्वतला प्रश्न पडला आयुष्यात नेमकी कोणती गोष्ट आहे जी खरोखर आनंद देणारी आहे.
आपली मनाची तयारी असली म्हणजे कुठुनही सुरुवात करता येते हे तुम्ही आम्हाला नाईक कॉलेज ला असताना नेहमी म्हणायचे.आज तेच शब्द पुन्हा चकाकी घेऊन आलेत . दुसर्याच्या मर्जीने आपण स्वतःचे निर्णय घेतो.स्वतःच असलेलं स्वप्न स्वाह करतो. कदाचित त्याचं चुकी मुळे आपल्या त असलेल्या क्षमता ओळखण्यात कमी पडलो असे वाटायला लागते. म्हणूनच काय करावं अन काय सोडून द्यावं विचारांचं चक्र सुरू होत..पण कधी कधी विचार करून मन मोकळं होत नाही.. त्यापेक्षा स्वतः साठी काय करायचं आहे काय करू शकतो हा आत्मविश्वास वाढला की त्या क्षणा पासून जगायचं कसं आनंदाने सांगू शकणार.. जी गोष्ट आपल्या साठी आहे ती करणं देखील आपल्या हातात आहे..हीच शिकवण देणारा विचार या ब्लॉग च्या माध्यमातून मिळाला.. खूप सुंदर उदारण देऊन विचार करायला लावणारा लेख आहे. खूप गोष्टी वाचल्यानंतर लक्ष्यात आल्या..आगदी सहज शक्य नाही..ते शक्य ही सहज होऊ शकते.. एवढं छान विचार माडण्यात आलेत.. असेच ब्लॉग ची आतुरता असेल. जी आजच्या काळाची गरज आहे..
Thank you sir.
खूप छान ब्लॉग लिहला आहे सर,
यशाची व्याख्या खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितली. मनामध्ये फ्कत विचार करून उपयोग नाही,तर तो कशापद्धतिने कृतीत आला पाहिजे,आहे त्या परिसथितीत आपण सुरवात कशी केली पाहिजे हे उदा.मधून खूप सोप्या पद्धतीने सांगितले.आम्हाला याचा नक्कीच खूप उपयोग होणार आहे.आणि जे आम्हाला पाहिजे ते मिळवण्यासाठी हे मार्गदर्शन खूप गरजेचे आहे.तुमच्या प्रत्येक ब्लॉग मधून काहीतरी नवीन शिकण्यास मिळत आहे.आम्हाला प्रेरित करत आहे.
खूप खूप धन्यवाद सर…
हा फक्त ब्लॉग नसून प्रत्येक माणसाचं प्रत्यक्ष जीवन आहे. आणि तरुणाच्या, युवकाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा हा ब्लॉग आहे . प्रत्येकाच्या मनात भन्नाट, प्रचंड यश देणारे Idea , संकलपणा असतात परंतु ते साध्य होत नाहीत . फक्त मोजकीच लोकं हे साध्य करून दाखवतात या गोष्टीचं कारण काय असेल? आपल्या भन्नाट आयडिया , संकल्पना खूप थोड्याच दिवसात कुजायला लागतात काय कारण असेल? अशा प्रश्नाची उत्तर सदर ब्लॉग मधून अतिशय प्रभावीपणे सरांनी मांडलेले आहेत. कल्पनेची आपल्याकडे मोठी लिस्ट असते आणि ती खूप महत्वाची पण असते मात्र ह्या कल्पना आपण कृतीत आणण्यासाठी ज्या वेळी आपण विचार करतो त्यावेळी आपल्यासमोर बिनकामी अडचणीची लिस्ट तयार होते आणि तीच लिस्ट आपल्या या life changing idea ला नाशवंत बनवते आणि ते destroy होतात . मग ते करणे कोणती असतील तर एखादी idea आपल्या डोक्यात आल्यानंतर त्या वर आपण प्रचंड विचारांचा भडिमार करतो आणि एखाद्या गोष्टीवर ज्यावेळी माणूस जास्त विचार करतो त्या गोष्टी बद्दल Negativity माणसामध्ये यायला लागते आणि त्या गोष्टीचा रहास व्हायला सरूवात होते . आपल्याकडे एखादी कल्पना आली असताना – ती माझ्याने होते की नाही की ?, माझ्याकडे पैसेच नाहीत, माझ्या आसपास कोणी असा करत नाही , आत्तापर्यंत आमच्याकडे असं कोणी केलाच नाही . असे अनेक अर्थहीन कारणे आपल्याकडे असतात आणि तेच जीवनाचा सत्यानाश करतात. मग यासाठी काय करायला पाहिजे? तर जे काही मनात कल्पना असेल तर ती लगेच कृतीत आना . एकदा का Starting झाली की मग बाकीचे गोष्टीचा आपोआप मिळत जातात त्यासाठी कुठल्याही कामाबद्दल विचार करत असताना त्यावर फक्त विचार करून चालणार नाही तर त्यावर ऍक्शन घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. Beacause Action Produce result .
अशी अत्यंत महत्वाची शिकवणं या ब्लॉग मधून मिळाली खरंच हा ब्लॉग life change करणारा ब्लॉग आहे मनातील भन्नाट कल्पनेपासून आपण कसे दूर जातो आणि दूर न जाण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दलची रहस्य आपण या ब्लॉग मधून किती सहज आणि सोप्या भाषेमध्ये आमच्यापर्यंत पोहोचविलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
Success च्या अनेक व्याख्या ऐकल्या पण आज खरी व्याख्या कळली . आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करणारे लोक खूप कमी असतात. कारण आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. मनात अनेक कल्पना असतात पण ‘ लोक काय म्हणतील ‘ असा विचार येतो आणि लोकांना आवडेल आणि पटेल असे काम करतो. हे सगळे करताना आपल्याला काय हवंय आणि काय आवडते हेच विसरतो. मनाविरुद्ध निवडलेल्या क्षेत्रात काम करताना धूसमूसत राहतात.
युवकांनकडे अनेक कल्पना असतात आणि त्या सत्यात उतरवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असते . पण पूर्वीपासून चालत आलेली कारकुनी म्हणजे सुरक्षित भविष्य आणि व्यवसाय म्हणजे मोठ्या / श्रीमंत लोकांसाठीच असतात हे मनात भरलं जातं. व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्यापेक्षा व्यवसाय करणे आपल्या सारख्याच काम नाही आणि केला तर कधीच यशस्वी होऊ शकत नाही असे बोलून आपल्या मनावर बिंबवले जाते.पण ह्या सगळ्याला न जुमानता स्वतः वर विश्वास ठेऊन आवडीच्या क्षेत्रात successful career करून दाखवले पाहिजे.
अनेक लोक आहेत ज्यांनी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या कामावर लक्ष दिले जिद्द आणि चिकाटी च्या बळावर त्यांनी आदर्श निर्माण केला. आपण नेहमी आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि मनातील कल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे .
हा ब्लॉग वाचल्यावर कळलं की आपण कोणत्याही गोष्टीला जो पर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत ती यशस्वी होत नाही . ह्या ब्लॉग मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनेक युवकांनी शुन्यातून सुरुवात केली आणि आज कोट्यवधी रुपयांची कंपनी उभारली. त्यांच्याजवळ मोठे financer नव्हते की त्याचे Business background नव्हते. कल्पनेच्या जोरावर त्यांनी त्यांच्या buisness ला सुरुवात केली आणि यशस्वी झाले.
Thank you so much Sir for amazing blog
आपल्या मनात आपल्या ध्येयाची खूप चांगली आकृती तयार असते किंवा आपण ती अतीशय चांगल्या प्रकारे तयार करत असतो मग ते आपल्या वेगवेगळया संकल्पना , कौशल्य यावर आधारित हा सगळा आराखडा आपण तयार करत असतो आणि त्या आराखड्यानुसार जर आपलं जीवन घडत असेलतर तोच आपला स्वर्ग असेल हे आपल्याला माहिती असते परंतु अस असून सुध्दा आपण ठरवल्या नुसार घडतच नाही . हे फक्त अगदी मोजक्याच लोकांच्या बाबतीत झालेलं दिसत. या गोष्टीची कारणे कोणती असतील? असं काय करतात ती मोजकीच लोकं की ज्याच्यामुळे ते त्यांना वाटेल ते मिळवू शकतात . हात लावलेल्या वास्तूला आपल्या मालकीचं करतात . असा प्रश्नांचा संच खूप दिवसापासून मनात तयार होतं आणि त्यांची सुटका ह्या अप्रतिम ब्लॉग च्या माध्यमातून झाली .
सर अर्ल नाइटिंगेल यांची ही – , “जे काम तुम्हाला करायची इच्छा आहे, ते काम तुम्ही करीत असाल, तर तुम्ही जीवनात खरे यशस्वी आहात”. छोटीसी व्याख्या खरंच यश म्हणजे नेमकं काय यावर अगदी गुणकारी आहे . आपल्या ध्येयाच्या आराखड्यामध्ये आपल्याला जे काही करायचं आहे ते जर आपण सद्य स्थितीला करत असाल तर आपण यशस्वी आहात खरंच हे अगदी योग्य आहे . आणि या व्याख्येनुसार जाणारे लोक खूप कमी असतात आणि मार्केट ट्रेंड नुसार चालणाऱ्या ची संख्या अफाट आहे . ह्या अफाट लोकांच्या आयुष्यात सतत चिडचिड असते , रडगाणे असतात कारण ते त्यांच्या मनाच्या विरुध्द आलेले असतात . आता हे त्यांच्या मनाविरुद्ध का येतात ? तर त्यांना इकडे ओढून आणलं जातं . कशामुळे ? तर ते लोकं आपल्या मानत असलेल्या भन्नाट कल्पनेवर Action घेत नाहीत .
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठीं त्यावरती Action घेणे अत्यंत महत्वाचे आहे कारण Action produce Result . नुसता एखाद्या गोष्टीचा विचार करून ती गोष्ट साध्य कधीच होत नसते तर त्यावरती कृति करणे खूप महत्वाचे आहे . मग आपण यशस्वी न हो मागचं हेच कारण असतं की एखादी कल्पना आपल्या मनात आली की त्यावर आपला फक्त विचारांचा जोर असतो हे जोरदार विचार काही काळाने लगेच थंड होतात आणि आपल्या भन्नाट कल्पनेच्या ऱ्हास होतो. मनात असलेल्या कल्पनेवर Action घेण्यासाठी कोणत्याही बाबीची STARTING महत्वाची असते एकदा का Start झालं की मग यशवी मार्गाने ती गाडी चालत असते आणि एक दिवस असा येईल की आपला भूतकाळ हा आपला वाटणार नाही येवढं यश आपल्याकडे येईल .
या ब्लॉग मधुन खरंच लाईफ change झाल्याशिवाय राहणार नाही कारण तशी ताकद आपण लीहलेल्या शब्दामध्ये आहे . असेच powerful विचार आम्हाला पुन्हा वाचायला मिळो हीच विनंती आणि खूप खूप धन्यवाद
आज मला पहिल्यांदा यशस्वी या शब्दाची व्याख्या समजली, म्हणजे जर एखाद्याकडे एक करोड रुपये आहे, आणि तो खूप मोठा बिझनेस मॅन आहे, परंतु त्यांची इच्छा त्याला क्रिकेटर व्हायची होती, तर तो कधीच जीवनातील यशस्वी व्यक्तिमत्व नाही. म्हणजे भरपूर पैसा असूनही आपण यशस्वी असतो, आज मला या ब्लॉगमधून समजले. तसेच, जे करायचं आहे, कल्पना करू नका, आज आणि उद्या करत बसू नका , जिथं आहात , तिथून सुरुवात करा, कारण आजचा दिवस उद्याचं भविष्य घडवत असतो. आपल्या मनात जे आहे तेच काम करा, लोक काय म्हणतील याची पर्वा करू नका, कारण जी इच्छा आहे ती पूर्ण केली, तरच तुम्ही यशस्वी आणि समाधानी आहात , हे मला या ब्लॉग मधून समजले. Thank you sir.. 🙏🙏
Sir. भरपूर पैसा असूनही आपण यशस्वी असतो, या असतो ऐवजी नसतो आहे, चुकून झालं tipeing mistek .
या पृथ्वीतलावर एवढी प्रचंड प्रमाणात माणसाची गर्दी असून सुद्धा आपला निसर्गाने माणूस म्हणून जन्म घातला यामागे काहीतरी वेगळं असणार आहे. जगातल्या प्रत्येक माणसाकडे इतरांपेक्षा वेगळी शैली आहे वेगळी कौशल्य आहेत. देवाने प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यामध्ये चढ-उतार दिलेले आहेत कारण जीवन हे चढ उतारा शिवाय मजबूत बनत नसते. आणि हेच चढ-उताराच जीवन यशस्वीरित्या जगण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो, वेगवेगळी कार्य करत असतो. प्रत्येकाची इच्छा असते की आपले भावी जीवन अगदी आनंदाने सुखासमाधानाने गेलं पाहिजे, आपल्याकडे प्रचंड पैसा असला पाहिजे, सत्ता असली पाहिजे, पावर असला पाहिजे महेश सर्व मिळवण्यासाठी आपला सध्या आपण जे करतो ते सगळा खटाटोप चालत असतो.
प्रत्येकाची वेगळी स्वप्न असतात काहींना मोठे उद्योजक व्हायचे असतात, तर काहींना ना चांगले अधिकारी व्हायचे असतात, काहींची रुची लेखनाला गायनात नृत्यामध्ये असते त्यामध्ये त्यांना अमर्यादित काम करायचे असतात आणि जगामध्ये टॉप करायच असते. प्रत्येक क्षण मोठमोठे स्वप्न घेऊन येत असत परंतु घोळ असा होतो की , त्यापैकी अगदी काही जण बोटावर मोजण्याइतकेच आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतात आणि त्यांचे जीवन त्यांच्या मनाप्रमाणे आनंदित जगत असतात.
मग हे असं का होतं? हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असत आणि त्यामधून फक्त काही मोजके विद्यार्थी त्या परीक्षेत पात्र होत असतात यापैकी सर्वांचेच मोठी अपेक्षा असतात स्वप्न असतात. या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण आपलं भावी चित्र रेखाटलेला असतं आणि त्यामध्ये फक्त रंग भरत असताना तो रंग भरण्याची आपली पद्धत चुकते आणि अखा चित्र बदलतं . असं का होत असेल या गोष्टी मागची काय कारणे असतील अशा प्रश्न फार पूर्वीपासून मनामध्ये उसळी घेत होते परंतु त्यांना पुरेपूर अस उत्तर आतापर्यंत भेटले नव्हते ते उत्तर या ब्लॉग मधून मिळालेला आहे.
मी लहान असताना एक वेळेस शाळेमध्ये आम्हाला जाधव मॅडम होत्या आणि त्या इंग्रजी शिकवत होत्या एके दिवशी त्यांनी आम्हा प्रत्येकालाच उभा करून तुम्हाला मोठेपणी काय बनायचे आहे? असा प्रश्न विचारला ? त्यावेळी प्रत्येक जण त्यांची वेगवेगळी भन्नाट अशी स्वप्न सांगितली. काहींना पंतप्रधान व्हायचं होते तर काहींना पायलट व्हायचे होते तर काहीजण प्रशासकीय सेवेमध्ये जाणार होते , काही विद्यार्थी जागतिक लेव्हल चे टॉपचे बिझनेस मॅन होणार होते. अशी भन्नाट कल्पना त्यांच्या मनात त्यावेळी होती. कदाचित त्यांनीही दिलेली उत्तरे त्यांच्या मनाची नसतीलही परंतु त्यांनी ज्या पद्धतीने उत्तरांची मांडणी केली होती त्यावरून त्यांची तळमळ कळत होती परंतु या सर्वांना पैकी अर्धी विद्यार्थी तर पुढच्या काही काळात आपल्या आई-वडिलांना मदत करण्याच्या हेतूने शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब गेले आणि ते आता त्यांच्या स्वप्नांचा गाभा त्याच वेळी वाळवलेला आहे.
आज जगामध्ये एवढी माणसांची प्रचंड गर्दी असताना त्यापैकी फक्त दोन-तीन टक्के लोक यशस्वी होतात त्यांच्या मनासारखं त्यांना मिळत असतं किंबहुना ती मिळवत असतात आणि आपले जीवन आपल्या प्रमाणे करत असतात. या गोष्टीची कारणमीमांसा करत असताना त्या व्यक्तीने ज्यांनी हात लावलेली गोष्ट आपल्या मालकीची करण्याची ताकद निर्माण केलीली आहे त्यांनी सुरुवातीला त्यांच्या ज्या काही ताठर आणि मर्यादित समजुती होत्या कठोर वाईट समजुतीचा साखळदंड तोडला आणि ज्या कोणत्या परिस्थितीत ते आहेत त्या ठिकाणी मनात आलेल्या कल्पनेनुसार STARTING केलं त्यामुळे ते आभाळाला गवसणी घालू शकले आणि प्रचंड प्रमाणात यश कमावलं. आपल्याकडे याच गोष्टीचा अभाव असतो आपल्या मनातही भरपूर कल्पना असतात भन्नाट व्यावसायिक कल्पना असतात, शैक्षणिक कल्पना असतात, मला जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार असे मोठे मोठे पद मिळवायचे आहेत अस आपण म्हणतो आणि ती मिळवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हेसुद्धा आपल्याला माहिती असतं परंतु माहिती असणारे cheak points नुसार आपण STARTING च करत नाही . यासाठी आपण भरपूर कारणांची लिस्ट तयार करत असतो मग ते भौतिक कारणे असतील, आर्थिक कारणे असतील, आपली परिस्थिती असेल अशा सर्व कारणांचा ढीग आपल्याकडे साचलेला असतो. त्यामुळे आपण ती कामे सुरुवात करत असताना आता नाही उद्या करू असं म्हणत असतो आणि असा उद्या आपल्या आयुष्यात कधीच येत नाही त्यामुळेच आपल्याला रडक आयुष्य जगावं लागतं.
आपण कोणत्या कामाची स्टार्टिंग करत असताना लोक काय म्हणतील, मला हे जमेल का पुढे चालू न माझ्या घरचे मला सपोर्ट करतील का? अशा गोष्टीचा अहंकार मनात दडवून आपले स्वप्न सुद्धा अशाच पद्धतीने दडवून टाकतो आणि ती स्वप्ने दडपून ठेवल्यामुळे एके दिवशी dead डेड होतात आणि आयुष्य गुदमरल्यासारखं जगावं लागतं त्यासाठी कोणत्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून सुरुवात करणे अत्यंत गरजेचे आहे. एखादा मोठा अधिकारी होण्यासाठी फक्त अभ्यास करणे आणि चॅलेंज पार करणे हेच आपले लक्ष असने आवश्यक आहे . अभ्यासासाठी मला स्पेशल रूम पाहिजे, लायब्ररी पाहिजे , माझ्या आसपास तसं वातावरण पाहिजे असे गोष्टी आपल्या मनात सद्यस्थितीला प्रचंड खळबळ होत असतात परंतु जर मनातून ते पद ग्रहण करण्याची तळमळ असेल तर आपल्याला स्पेशल रोगम किंवा लायब्ररीची गरज भासणार नाही तर जी जागा मिळेल त्याजागी बसून आपण अभ्यास करून ते चालेंज पार पाडू शकतो .
जीवनात खरच यशस्वी होण्यासाठी आणि मोजक्या यश मिळवण्याच्या लोकांच्या यादीत आपले नाव सुद्धा आणण्यासाठी हा ब्लॉग अतिशय उपयुक्त आहे यामधून सगळ्याच गोष्टी विचार करण्यासारखे आहे असा हा लाइफ चेंजिंग ब्लॉग आम्हाला वाचायला आणि समजुन घेऊन जीवनात यश मिळवायला उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
Thank you sir,आम्हाला यशाची खरी व्याख्या सांगितल्याबद्दल.आपण जे काम उत्तमप्रकारे व आनंदाने करू शकतो तेच काम आपण केले पाहिजे हे छान सांगितले.मनात अनेक कल्पना असून देखील आजचे युवक/युवती यशस्वी नाहित कारण त्यांच्या मनातील गोंधळ!ते त्यांच्या करियर,शिक्षण याचसोबत आवडी बद्दल ही गोंधळलेले असतात.यशस्वी होण्यासाठी जे आपल्याकडे आहे त्यामधून सुरुवात केली पाहिजे;महत्त्वाचे आहे सुरुवात करणे.कोणतेही काम सातत्याने करणे आवश्यक आहे.एखाद्या अपयशाने खचून न जाता त्यातून शिकले पाहिजे की आपली काय चुक झाली.
Sir,तुम्ही जी तीन उदाहरणं दिली त्यामधून खूप मोठी प्रेरणा मिळाली.
आपण आपल्या स्वप्नांचे मालक असतो व ती पूर्ण करणं फक्त आपल्याच हातात असतं.
You are the most successful person in the world only when you does what you wants to do…
सदरील लेखनातून आपल्यासाठी खूपच चविष्ट शिदोरी मिळालेली आहे . आपल्या प्रत्येकाच्या मनात अगणित कल्पना असतात , आणि त्या कल्पनेला प्रत्यक्षात साध्य करण्यासाठी तेवढ्या प्रमाणात पोटेन्शियल सुद्धा आपल्यामध्ये असते परंतु त्या पोटेन्शिअल चा आपल्याकडून वापरच होत नाही या गोष्टीचं कारण काय असेल या या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेत असताना मला हा ब्लोग खूपच सोयीस्कर वाटतो. प्रत्येकाने स्वप्न बघितले पाहिजे कारण स्वप्नामुळे वेगवेगळे विचार निर्माण होतात विचाराचे रूपांतर कृतीमध्ये होऊन त्यामधून रिझल्ट येतात असं वक्तव्य या देशाचे महान व्यक्तिमत्व एपीजे अब्दुल कलाम यांनी केलेलं होतं आणि खरंच इत्या वाक्यातील एकेका शब्दाचा विचार करण्याची गरज आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण स्वप्नाच्या दुनियेत उंच उंच भरारी घेत असतो आणि प्रत्येकाचा विचार आभाळाला गवसणी घालून काहीतरी टॉप च करण्याचा असतो परंतु ते आपल्याकडून साध्य होत नाही असं जवळपास 97 टक्के लोकांचा होत असतं.
ज्या वेळी आपल्याकडे करिअर निवडा निवडण्याची वेळ येते. हे करियर निवडत असताना आपण मनामध्ये प्रचंड ज्ञानाचा , पैशाचा , संपत्तीचा , आनंदाचा, समाधानाचा ,समृद्धीचा खजिना मिळवण्याचा हेतू नाही आपण आपलं करियर निवडत असतो आपल्या याची निश्चिती करत असतो आणि त्याच बरोबर आपण ठरवलेले ध्येय कसे मिळवावे त्यासाठी काय करायला पाहिजे हा सुद्धा मार्ग आपल्याला कळलेला असतो परंतु एवढं कडून सुद्धा आपल्याकडून कुठलीही गोष्ट साध्य होत नाही आणि शेवटी आपल्या हातात बेरोजगारी सापडते आणि आपलं जीवन निराशेच्या जगामध्ये प्रवेश करत असतं आणि शेवट पण निराशा आपल्या वाट्याला येत असते ही निराशा पळून लावण्यासाठी या निराशेचा अंत करण्यासाठी हा ब्लॉग अत्यंत उपयुक्त आहे. या ब्लॉग मध्ये दिलेली नाइटिंगेल ची यशाची व्याख्या प्रचंड प्रभावशील आणि अगदी सोपी सहज आहे.. ज्या क्षेत्रात आपला कार्य करायचं होतं, जे काही आपल्याला मिळवायचं होतं त्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करत आहात आणि ती वस्तू आपण मिळवलेल्या आहात म्हणजेच आपण ठरवलेल्या कामामध्ये आपण यशस्वी झाला आहात आणि हेच यश आहे अति सहज सोपी व्याख्या आतापर्यंत ऐकलेल्या व्यक्तीपेक्षा खूपच प्रभाव पाडणारी आहे.
आज प्रचंड गर्दी मध्ये अगदी मोजकीच लोक त्यांनी त्यांच्या जीवनाचा उद्देश प्राप्त केलेले असतात या गोष्टीचं कारण काय आहे? अशा सर्व बाबींचा विचार केला असता तर या सर्व यशस्वी माणसांनी आपला प्रवास सामान्य जगण्यातून असामान्य कडे घेऊन घेऊन गेला यामागच्या रहस्याची पडताळणी करत असताना त्यांच्या सर्वांमधून एक गोष्ट हाती लागते ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि आपले जीवन बदलवणारी ती एक गोष्ट आहे त्यामध्ये अमाप ताकद आहे जर आपण त्या गोष्टीचे इम्पलेमेंटेशन आपल्या आयुष्यात केलं तर नक्कीच आपला आयुष्य सुद्धा ताज्यातवान्या फुलांसारखे फुलून येईल.
जेवणामध्ये खूप काम मिळवण्यासाठी , आपल्या मनात असलेल्या भन्नाट कल्पना अप्रतिम विचार साथी करण्यासाठी आणि त्याचा रिझल्ट जगाला दाखवून देण्यासाठी आणि रिझल्ट चा फायदा स्वताला आपला आयुष्य फुलवण्यासाठी करायचा असेल तर त्यामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे आपण ज्या कोणत्याही क्षेत्रात आपली ध्येयनिश्चिती केलेली आहे किंवा आपल्या मनात काहीतरी करण्यासाठी एक चांगला प्लॅन तयार झालेला आहे तो प्लॅन साध्य करण्यासाठी आपण केलेली ध्येयनिश्चिती पूर्ण करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला START करावा लागेल. कोणत्याही कार्यामध्ये स्टार्ट केल्याशिवाय पुढचं पानही हालत नाही त्यामुळे उंच उंच भरारी घेण्यासाठी आधी त्या क्षेत्रामध्ये लहान अशी सुरुवात करायला पाहिजे तरच आपल्या आयुष्यात रिझल्ट येतील कारण Action produce Result. जर आपण आपल्या भन्नाट कल्पना फक्त डोक्यातच वाढवल्या त्यांना खतपाणी घालून त्यातून मिळणाऱ्या लाभाच्या मोहा तच आपण हरवून गेलो तर ते अर्थही नसेल त्यासाठी ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपण जिथे कुठे आहात च्या कोणत्या परिस्थितीत आहात आपल्या आजूबाजूला जे काही वातावरण असेल त्या वातावरणातून आपल्या कार्यामध्ये सुरुवात करणे अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे. सुरुवाती शिवाय आपली स्वप्नही कोरड्या विहिरी सारखी असतात. जर मला एखादा प्रभावशील लेख लिहायचा आहे किंवा अगदी मस्त कविता लिहायची आहे तर त्या कवितेबद्दल त्या लेखाबद्दल मी फक्त विचार करून तेच विचार पुन्हा पुन्हा करून त्यावर कुठलीच ॲक्शन न घेता हा कारभार चालू ठेवला तर आयुष्यात माझ्याकडून कधीच लेख लिहून होणार नाही तर ती विचारच मी करत राहीन. त्यासाठी एक काम करावं लागेल की जे पण ते मनात विचार आलेले आहे ते विचार लगेच पटकन हातात पेन घेऊन कागद घेऊन एक शब्द लिहा लागेल त्यानंतर दुसरा शब्द त्यानंतर एक वेळ असं करत आपला पूर्ण लेख तयार होतो आणि यातूनच आपण ठरवलं होतं ते साध्य झालेला असतं.
आपल्या आयुष्यात सुद्धा असंच आहे आपण माझ्या आयुष्यात मला खूप काही करायचं आहे मी माझा आयुष्य अशा पद्धतीने जगेन अमुक पर्यंत अमुक करेन हे फक्त गुणगुणत असतो त्यावर ती कृती मात्र आपली शून्य असते त्यामुळेच आपल्या आयुष्यात रिजल्ट येत नाहीत आणि यातूनच आयुष्याचा इंटरवल होतो आणि नंतर वाटते की आता खूप वेळ झाला माझ्याकडून काहीच होणार नाही आणि जीवन एका अंधाराकडे वाटचाल करत असते. नंतर असं वाटतंय की खूप काही करायचं होतं पन करू शकलो नाही हा पश्चाताप सारखा मनाला भेडसावत असतो आणि जीवनातून हास्य हरवून जात. एका ठिकाणी रवींद्रनाथ टागोर असा सांगतात की त्यांना एक गाणं ऐकायचं होतं परंतु ते म्हणतात आयुष्य सगळं सतारीचे तार लावण्यातच गेलं जे गाणं गायचं होतं ते गाणं राहून गेलं. असच आपल्या आयुष्याच्या बाबतीत सुद्धा असतं त्यामुळे जेवढी वेळ आपल्या हातात आहे त्यावेळेस आपण आपलं पोटेन्शिअल यूज करून रिझल्ट दाखवले पाहिजे.
आपल्याकडे आपण आपल्या या सॉफ्ट माईंड ला एक घाणेरडी सवय लावलेली असते की कोणतेही काम करत असताना तक्रारीची लेबल आपल्याकडे प्रचंड प्रमाणात असतात. मला हेच मिळाला नाही ह्याच कारणामुळे मी इथपर्यंत जाऊ शकलो नाही माझी आर्थिक परिस्थिती नव्हती मला सपोर्ट कोणी करत नव्हतं मला मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते या अशा समाजामध्ये आपण आपला आयुष्य घालवत असतो आणि शेवटी आपल्याला जे साध्य करायचं असतं ते राहूनच जातं. या यशस्वी लोकांनी आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या कार्याला स्टार्ट केलं आणि त्यामध्ये हळू हळू हळू विकास होत गेला आणि त्यातून त्यांच्या कार्याचा फळ त्यांना मिळालं आणि जीवनाच सार्थक झालं.
आज आपल्यापैकी बरेच जण काहीतरी करण्यासाठी धडपड करत असतात. बऱ्याच जणांना आयएएस, आयपीएस, तहसीलदार, PSI , असे उच्च दर्जाचे अधिकारी व्हायचे असते परंतु यातील काहीच लोक ते त्यांचं ध्येय गाठवू होऊ शकतात. यामध्ये सुद्धा एकच सामान्यत आढळून येते की या लोकांनी कुठल्याच प्रकारची तक्रार न करता आपल्या कार्याला सुरुवात केली आणि त्यामध्ये वेळोवेळी बदल घडवून त्यामध्ये विकास करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ते त्यांना जिथे जायचं होतं ते तिथे पोहोचले. बाकीचे लोक काय केले असतील? तर हे सर्व बाकीचे लोकं याबद्दल या पोस्ट बद्दल फक्त नामस्मरण करत होते ती मिळवण्यासाठी त्यांची कृती शून्य होती त्यामुळे त्यांच्या आयुष्यात रिझल्ट सुद्धा शून्यच मिळाले.
या लाइफ चेंजिंग ब्लॉक मधून माईंड ब्लॉक झालेला आहे . झोपलेले विचार जागे झालेले आहेत आणि आता ठरवलेलं कार्य पूर्ण केल्याशिवाय ते थांबणार नाहीत अशी खात्री वाटते असा हा माईंड ब्लोईंग ब्लॉग दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
मनात अनेक प्रकारच्या भन्नाट व्यावसायिक कल्पना असूनही आजचा युवक यशस्वी का होत नाही? Why don’t today’s youth succeed despite having many different business ideas in mind?
वस्तुस्थितीचा उलगडा करणारा हा ब्लॉग अत्यंत प्रभवशील आहे . ज्या लेखणीतून जीवनाचा मार्ग योग्य दिशेने तयार होतो अश्या ह्या प्रचंड शक्तीशाली विचारांची देणगी तुम्ही आमच्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी दिलात त्याबद्दल पहिल्यांदा आपले मनापासून आभार. आणि हा प्रश्न पडलेलाच होता कारण आजूबाजूच्या लोकांचे भन्नाट प्लॅन ऐकून समजून घेऊन त्यामधून एक कळलेलेच होत की , हे लोक एवढे विचाराने ब्रँड आहेत परंतु ते आजही त्याच स्थितीला आहेत ज्या पाहिलं होते. यावरूनच या प्रश्नाची निर्मिती झालेली होती की मग यांनी त्यांचे हे जबरदस्त आयडिया सत्यात का उतरत नाहीत अशी कोणती गोष्ट आहे की ती त्या महान कार्याला अडथळा निर्माण करते .
आज या जगामध्ये प्रत्येकाकडे काहीतरी वेगळेपण आहे , आपल्याला त्या निर्मात्याने एवढं fullfill बनवलेलं आहे की , प्रत्येकजण इतरांपेक्षा वेगळं कृतुत्व करून आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो . असे असूनसुद्धा मग अगदी मोजकेच लोक यशस्वी म्हणून नावारूपाला येतात . उदाहरण सांगायच झाल्यास आज देशातली जगातली, वेगवेगळ्या क्षेत्रात अगदी मोजकीच लोक समोर येतात जसे की , business मध्ये विचार केला तर टाटा , अंबानी , कला क्षेत्रात विचार केला तर लता दीदी , अमिताभ बच्चन असे नाव पुढे येतात . मग पोटेन्शियल सारखं असताना आपण का कमी पडतोय ? हा प्रश्न मनाला टोचनारा आहे आणि ज्यावेळी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मनातून मिळेल त्या दिवसापासून खरतर जीवन प्रफुल्लित असेल.
आज गावांमधल्या लोकांचा जर विचार केलं तर त्यांच्याकडे सुद्धा खूप भन्नाट अशा वेगळ्या कल्पना असतात, आता मी खेडेगावातला असल्यामुळे मला या गोष्टीशी जवळून संपर्क साधता आला. माझ्या माझे काका एक उत्तम गायक आहेत . ते ज्यावेळी गायन करत असतात त्यावेळी असं वाटतं की सारखाच हा गोड आवाज ऐकत रहाव एवढा मधुर रसाळ आवाज असलेले अमाचे काका आजही तिथेच आहेत जे पूर्वी ज्या ठिकाणाहून उत्तम गायक होण्याचे स्वप्न बघत होते . मग त्यांना असे विचारले असता की, तुम्ही का करू शकला नाही? तर तुमच्याकडे एवढे उत्तम कौशल्य असून सुद्धा तुम्ही तुमच्या क्षेत्रांमध्ये अगदी थोड्या प्रमाणात सुद्धा यश मिळू शकले नाही ? यावर उत्तर देताना मग ते वेगवेगळे तक्रारीचे लेबल्स सांगत असतात त्यामध्ये माझी परिस्थिती नव्हती, माझ्याकडे तेवढी आर्थिक क्षमता नव्हती, सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर होती . अशा या बिन आर्थी तक्रारीचे लेबल पुढे करून ते त्यांना विचारला तो प्रश्न त्या ठिकाणी दबाव टाकतात . मनातून त्यांना भरपूर खंत वाटत असावी , खूप पश्चाताप त्यांना होत असावा परंतु ते त्याने ओठावर आणत नाहीत .
यावरून खरेखुरे कारण लक्षात घेत आले असता आपलं सुद्धा असच होत असते की आपल्याकडे खूप काही असून सुद्धा आपण त्याकडे लक्ष देत नाही असं म्हणण्याऐवजी आपण त्या गोष्टीचा फक्त विचार करत असतो आणि आणि हा विचार करण्यातच आपल्या आयुष्याचा intervel होतो अर्धा आयुष्य कधी संपला हे लक्षातच येत नाही आणि जेंव्हा लक्ष्यात येते तेंव्हा वेळ निघून गेलेली असते यामुळेच बाकीचे उरलेले आयुष्य सगळा अंधारमय जीवनामध्ये जगावं लागतं. आयुष्यभर तडजोड करण्यात जीवन घालावं लागतं , आनंद समाधान हास्य जणू काय आपले शत्रू होत असतात कारण या गोष्टी आपल्या आयुष्यात पाहिजे असतील तर त्यासाठी आपण आपल्या जीवनाचा उद्देश पूर्ण करायला हवे . आणि आपली परिस्थिती या उलट असते ती अशी की तो उद्देश पूर्ण करण्याकरिता आधी जीवनाचा उद्देश सापडायला हवा परंतु आपल्याला जीवनाचा उद्देश सापडत नाही त्यामुळे तो पूर्ण करण्याचा प्रश्नच उरत नाही.
मग कसे वर आणायचे ? आपल्या मधले भन्नाट कल्पना , जबरदस्त टॅलेंट तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनात जे काही कल्पना येतील किंवा जे काही विचार येतील मग ते विचार व्यवसाय करण्याचे असोत किंवा कुठलातरी शोध लावण्याचे असो किंवा अधिकारी बनायचे असोत हे विचार जसे आपल्या डोक्यामध्ये येतात तसे आपण त्यावर कृती करायला सुरुवात केली पाहिजे. कोणत्याही कामाची सुरुवात हीच यशाची पहिली पायरी असते . आणि ज्या वेळी माणूस पहिली पायरी चढत असतो त्यावेळी पुढच्या पायऱ्या आपल्याकडून by default चढल्या जातात. आपण जिथे कुठे आहात , आपल्याजवळ जे काय आहे त्या आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्यामधील आलेल्या विचारानुसार आपण सुरुवात केली पाहिजे तरच आपण त्या क्षेत्रामध्ये यशस्वी मार्गाकडे पदार्पण करत असतो.
समजा जर तुमच्या डोक्यामध्ये अशी एक भन्नाट कल्पना आली की, तुम्ही जगासाठी एक नवा शोध लावणार आहात त्यामध्ये तुम्हाला अशी सायकल तयार करायची आहे की , ती बाईक सारखी race वर चाल ली पाहिजे तर यावर तुम्ही लगेच सुरुवात केली पाहिजे त्यावर सायकलीची एकूण प्रोसेस बघितली पाहिजे त्यानंतर बाईक मध्ये ती प्रोसेस कशी आहे याचा अभ्यास कमी केला पाहिजे तरच तुम्ही कुठेतरी ती सायकल बनवण्यासाठी तुमचे पाऊल पुढे टाकत आहात . जर तुम्हाला एखादा लेख लिहायचा असेल किंवा सुंदर अशी प्रेम कविता लिहायची असेल त्या गोष्टीचा फक्त विचार करून चालणार नाही तर त्यासाठी कागद आणि पेन हातात घेऊन त्यावर शब्दामागे शब्दाची रचना केली पाहिजे तरच आपल्याकडून एखादा लेख तयार होईल किंवा आपल्याला हवी असलेली कविता तयार होईल.
कोणत्याही कामात जर आपल्याला आऊटपुट पाहिजे असेल त्यालाच succes असे म्हणतात ते जर हवं असेल तर त्यासाठी कृती हे खूप महत्वाची आहे . आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि आपण फक्त दररोज विचारच करत आहात की मला तिथे जायचं आहे परंतु तिथे जाण्यासाठी तुम्ही पाऊल टाकलेलेच नाहीत त्या त्या ठिकाणी तुम्ही पोहोचाल कसे? त्यासाठी तुम्हाला आधी पाऊल टाकले महत्त्वाचे आहे तुम्ही पाऊल टाकल्यानंतर आपोआप पुढचे पाऊल पडत असतात आणि आपल्याला ज्या ठिकाणी जायचं होतं ते ठिकाण आपल्याला मिळून जाईल. म्हणून त्यासाठी STARTING is very very very very important.
आपल्याकडे याच गोष्टीची कमतरता असते की आपण आपल्या मनात आलेल्या कल्पनेनुसार सुरुवात करत नाही. उद्या करू किंवा नंतर करू असं म्हणून ती पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात आपण असतो. आणि तो उद्या आपल्यासाठी कधीच उगवत नाही आणि तेवढ्यात आयुष्याच्या अर्धे वर्ष संपतात मग आपण पश्चातापाचा आहारी जातो आणि त्यातून एकच शब्द बाहेर येतो तो म्हणजे आयुष्यामध्ये खूप काही करायचं होतं परंतु काहीच करू शकलो नाही ही जर वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर आपण आपल्या मनात असलेल्या कल्पना आणि त्या कल्पनांना जोड देणाऱ्या आपल्या कौशल्याचा वापर करून आधी सुरुवात करणे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.
जर आपल्याला अधिकारी व्हायचे असेल तर आपण पत्रिका अधिकाऱ्याची स्वप्न आपल्या डोक्यात रंगवून काय फायदा होणार नाही तर त्यासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या जागी मध्ये आहे आहे त्या साधनाचा वापर करून आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्यामध्ये हळूहळू प्रगती करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तरच त्यातून कुठेतरी आपल्यातला आधिकारी जागा होतो आणि आपण बघितलेल्या स्वप्नाची पूर्ती होते आणि जीवन आनंदाच्या महासागरात सफर करते . आणि याउलट जर आपण मला हेच पुस्तक पाहिजे किंवा मला अभ्यास करण्यासाठी specific room पाहिजे, माझ्या अवतीभवती स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे मुले पाहिजे कारण त्यातून तसं वातावरण निर्माण होईल आणि त्या वातावरणामध्ये मीसुद्धा अभ्यास करेल अशा बिनार्थक बाबी जर आपण मनात घेऊन बसलो तर त्या मार्गाचा आस्वाद कधीच घेऊ शकत नाही .
या ब्लॉग मुळे अस वाटत आहे की आता मनामध्ये जो काही वेगवेगळ्या कल्पनांचा संच तयार झालेला आहे त्यानुसार लगेच कामाला सुरूवात करून त्यातली प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची करून घ्यावी . अशी feeling या माईंड shifted blog वाचनानंतर निर्माण होत आहे आणि असा हा प्रभाशिल विचार आमच्यापर्यंत पोहचवून अमच्यामधील कल्पनेची जाणीव आम्हाला करून देऊन त्यामध्ये यश कसे मिळवायचं यासाठी चा मंत्र दिल्याबद्दल Heartly thanks