आपले उपजत कौशल्य जगातील किती लोकांना माहित आहे? याचे उत्तर खूपच कमी असेच आहे, त्यामुळे माणूस आपल्या उपजत कौशल्य आणि कल्पनांवर काम करत नाही त्यामुळे जीवनात असमाधानी आयुष्य जगताना दिसतात.
जगातील जबरदस्त टॅलेंट आणि भन्नाट आयडिया (Talent & Ideas) कुठे सापडतील, असे एक संशोधन केले गेले, तर त्यातून एक मन चक्रावून टाकणारे तथ्य बाहेर आले आहे. तेच तथ्य आज या ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करीत आहे.
काय वाटतं तुम्हाला? कुठे सापडल्या असतील ह्या दोन अफलातून गोष्टी?
थांबा थांबा सांगतो…
तर याचे उत्तर आहे स्मशानभूमीत!!
आहे ना चक्रावून टाकणारे तथ्य?
तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे काय?
तर …
जगात अनेक अशा व्यक्ती होऊन गेल्यात की ज्यांच्याकडे जबरदस्त टॅलेंट आणि भन्नाट आयडिया त्यांच्या मनात होत्या परंतु त्या टॅलेंट आणि आयडियावर त्यांनी कोणतीही कृती (Action) न केल्यामुळे त्या दोन्ही गोष्टींनी त्यांच्यासोबतच या जगाचा निरोप घेतला. की ज्यांच्या टॅलेंट आणि आयडियाने आज जगातील कित्येक लोकांचे जीवन बदलण्यास मदत झाली असती.
आजपर्यंतच्या मानवी जीवनात ज्या काही सोयी-सुविधा निर्माण झाल्यात ते कोणाच्या तरी मनातील कल्पना आणि उपजत कौशल्य यामुळे शक्य झाले आहे. मग ती कल्पनेतून निर्माण झालेली सुई असेल किंवा आकाशात उडणारे विमान असेल, तसेच शेती, आरोग्य आणि तंत्रज्ञानातील शोध असतील किंवा एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती चटकन देणारे मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेट असेल, अशा एक ना अनेक गोष्टी निर्माण झाल्यात ते प्रथम कुणाच्यातरी मनात दडलेल्या कल्पनाच होत्यां ना!
आज आपल्यापैकी अनेक लोक असे असतील की जीवनात काहीतरी भन्नाट करण्याची इच्छा मनात बाळगून वाट बघत बसले असतील, की एक दिवस आपणही काहीतरी करून दाखवू, हो की नाही? मग आपण का थांबलोय, कशाची आणि कोणाची वाट बघतोय आपण? कोणते कारण आहे आपण सुरुवात न करण्याचे? कोणती अशी गोष्ट आहे जी आपल्याला थांबवतेय?
आपल्याकडे असलेले उपजत कौशल्य आणि कल्पनांवर आपण कोणतीही कृती न करता केवळ टाळाटाळ आणि चालढकल करीत असतो, उद्यावर करण्याच्या अटीवर सोडून देतो, तो उद्या कधी उगवतच नाही. कारण प्रत्येक ‘उद्या’ उगवल्यावर ‘आज’ असतो, त्यामुळे दिवसा मागून दिवस लोटतात, वर्षामागून वर्ष निघून जातात, आयुष्याचा इंटरवल होतो, शेवटी आपल्या नाटकाचा पडदा पडतो, शेवटी एकच विचार मनात येतो की जीवनात खुप काही करायचे होते पण आपण करू शकलो नाही हा पश्चाताप मनात सतत सलत राहतो. केवळ पश्चाताप आणि पश्चाताप.
असे होण्याची जी काही खास कारणे आहेत त्याची चर्चा प्रथम करूया.
आपल्या मनात ज्या चुकीच्या धारणा किंवा मान्यता घर करून बसलेल्या असतात त्यांना सत्य समजून आपण जगत असतो, हे सर्व नकारात्मक विचार आपल्या बालपणापासून आपल्या कुटुंबातील व समाजातील लोकांकडून आपल्या कानावर सतत आदळत असतात, पुढे आपण जसे जसे मोठे होत जातो तसे तसे ते विचार आपल्या पक्या धारणा बनत जातात, शेवटी त्यांना आपण जीवनाचं वास्तव मानून आपलं जीवन जगत असतो. असे म्हटले जाते की, ज्या विचारांना आपण मान्यता देतो, ज्या विचारांच्या प्रती ज्या धारणा पक्क्या होतात तशाच प्रकारचे जीवन आपल्या वाट्याला येते हे आपण मानले किंवा नाही मानले तरी ते अगदी सत्य आहे.
चला तर मग प्रथम आपण आपल्या मनात ते कोणत्या प्रकारचे विचार घर करून बसलेले आहेत त्यांचा शोध घेऊया, कारण ते विचार शोधून बाहेर नाही फेकून दिले तर तसेच होईल जसे, आपल्या घरात कुठेतरी उंदीर मरून पडलेले आहेत, त्याचा वास घरभर पसरलेला आहे, आपण केवळ धूप, अगरबत्ती किंवा रूम फ्रेशनर मारून तात्पुरता वास घालवत असलो तरी काही वेळाने तो घाणेरडा वास येणारच आहे, त्यासाठी काय करावे लागेल तर ते मेलेले उंदीर शोधून त्यांना बाहेर फेकून द्यावे लागेल, कारण असा ठोस उपचारच फायद्याचा ठरणारा आहे, सांगा हे खरे आहे की नाही?
आपल्या मनात अनेक कल्पना असतात आणि त्या कल्पनांवर काहीतरी करण्याची इच्छा सुद्धा असते परंतु एखादी कल्पना निवडून आपण जशी सुरुवात करणार तेवढ्यात मनात अनेक विचार आणि प्रश्न उभे राहतात, जसे…
१) लोकांना काय वाटेल? किंवा लोकं काय म्हणतील?
या एका प्रश्नाने आजपर्यंत असंख्य लोकांना नाउमेद केले आहे. एक तुम्हाला ओपन सिक्रेट सांगू? या पृथ्वीवर दोन प्रकारची लोकं जन्माला येतात त्यापैकी एक म्हणजे, मोजकेच लोक काहीतरी करून दाखवत असतात आणि बाकीची सर्व नुसते बोलत असतात, आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये राहायचे आहे तो चॉईस नेहमी आपल्याकडे असतो.
मानवी मन बघा ज्या बाजूला मेजॉरिटी दिसेल तिकडेच जाताना दिसते. इथे आपल्याला एक ठाम निर्णय घ्यायचा असतो, काहीतरी करण्याचा विचार जसा मनात येतो तशी सुरुवात करणे, जी साधने आपल्याकडे आज उपलब्ध आहेत, आज आपण जिथे कुठे आहात तिथूनच सुरुवात करणे हेच यशाचे साधेसुधे सिक्रेट आहे. एकदा चालायला सुरुवात केली की रस्त्यात करेक्शन्स करता येऊ शकतात.
लोकांचा विचार करत बसलात तर बसूनच राहणार, आणि त्यामुळे एक पाऊल सुद्धा उचलण्याची हिंमत होणार नाही. तुम्हाला माहितच आहे, काही केलं तरी लोक बोलणारच आणि नाही केलं तरी बोलणारच, यांमध्ये फरक एवढाच असेल, आपण काही केलं तर लोक म्हणतील आम्हाला माहीतच होतं तू काहीतरी करून दाखवशीलच, आणि नाही केलं तर म्हणतील आम्हाला माहीतच होतं तू जीवनात काहीच करू शकणार नाहीस.
२) हे आपले कामं नाही, हे कामं विशिष्ट/खास लोकंच करू शकतात.
या जगात प्रत्येक व्यक्ती खास आणि विशेषच आहे, कारण प्रत्येकाचा जन्म काहीतरी खास करण्यासाठीच झाला आहे हे आपण समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. सामान्य माणुस काहीतरी करूनच असामान्य बनत असतो याची असंख्य उदाहरणे आपल्या आसपासच असतात. आज जी व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशन यशस्वी दिसते तिची सुरुवात जर पाहिली तर आपल्याला आश्चर्य वाटेल, किती बिकट परिस्थितीत त्यांनी यश मिळविलेले आहे.
३) योग्य वेळ आल्यावर काहीतरी करण्यास सुरूवात करणार-
तुम्हाला काय वाटते कोणती वेळ योग्य असते काहीतरी सुरू करण्यासाठी?
तुम्ही म्हणाल की, सर्व सिग्नल्स ग्रीन झाल्यावर मी गाडी घेऊन रस्त्यावर चालवायला घराच्या बाहेर पडेल, तर असे होणे शक्य आहे काय? असा विचार केला तर आपण आयुष्यभर कधी गाडी रस्त्यावर चालवून तिथे आपण पोहचणार काय जिथे आपल्याला पोहचायचे आहे? नाही ना?
मग याला पर्याय काय? तर आधी रस्त्यावर गाडी घेऊन निघावं लागेल, हळूहळू एक एक सिग्नल पार करावा लागेल तरच आपण पोहचणार. काही लोकं म्हणतील माझ्याकडे सर्व गोष्ठी उपलब्ध झाल्यावर सुरुवात करेल, परंतु असे होणार नाही, आधी काहीतरी केले तर सर्व गोष्ठी उपलब्ध होण्याची शक्यता असते. हाच यशाचा सोपा आणि सुगम पर्याय आहे, असे मला वाटते.
आज बरेच लोकं याच छ्योठ्या छ्योठ्या अडथळ्यांच्या भीतीने सुरूवातच करत नाहीत व जीवनातील खूप मोठी विकासाची संधी गमावून बसतात. सांगा मग याला जबाबदार कोण आहे? बाहेरची परिस्थिती की स्वतः आपण?
४) तक्रारींचे लेबल्स-
मी अमक्या जाती-धर्मात जन्माला आलोय, आपल्या कुटुंबात किंवा समाजात आजपर्यंत कोणीही केलं नाही, मी वयाने लहान आहे, माझे आता वय झाले आहे, गावात-ग्रामीण भागात राहतो, अशा देशात राहतो जिथे काहीच करू शकत नाही. सरकारच चांगले नाही, बॉस खराब आहे, जोडीदार समजून घेत नाही, शेजारी चांगले नाहीत, माझे शिक्षण कमी झाले आहे, मी गरीब आहे, माझ्याकडे पैसाच नाही, माझ्याकडे वेळच नाही, मी अजून तेव्हढा समजदार झालेलो नाही, सिस्टिमच खराब आहे, माझे भाग्यच वाईट आहे,माझे स्टार खराब आहेत, अशा एक ना अनेक तक्रारिंचे लेबल्स लावून आपण फिरत असतो, वरील एव्हढ्या गोष्ठी विपरीत आहेत म्हणून मी काही करू शकत नाही, असे आपण सांगत असतो.
एक प्रश्न स्वतःलाच विचारून पाहिला तर यातील एकही तक्रार सत्य नाही असेच उत्तर तुम्हाला आतून ऐकायला येईल. हे लेबल्स फक्त सहानुभूतीसाठी आपण लावलेले असतात, आपल्या नाकर्तेपणाला वरील तक्रारी किंवा कारणे कारणीभूत नसून आपणच याला जबाबदार आहोत हेच सिद्ध होईल, हो की नाही? कारण याच परिस्थितीत राहून आपल्या आसपास असणाऱ्या काही लोकांनी अशी कोणतीही तक्रार न करता त्यांच्या जीवनात खूप काही केलेलं दिसेल, अशी अनेक उदाहरणे आपल्या जवळच सापडतील.
सारांश सांगायचा झाल्यास असं म्हणता येईल की, जीवन म्हटल्यावर अडचणी, चॅलेंजेस तर असणारच ना? शिव खेडा एका ठिकाणी म्हणतात, की “आव्हानांची किंवा समस्यांची गैरहजेरी म्हणजे जीवन नाही तर समस्यांवर मात करणे हेच जीवन आहे”. Life is not an absence of problems, it is overcoming the problem. -Shiv Khera.
हे माझे विचार तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏
आणखी वाचा:- जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवावे? How to get what you want in life?
आणखी वाचा:- जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे? How to live life as a warrior?
Absolutely right sir..!
कबीर जीने उनके दोहे में कहा है, “कल करे सो आज कर, आज करे सो अब…!”
तुम्ही जर फक्त बोलत राहिलात मी हे करेन, ते करेन तर त्याचा काही उपयोग नाही कारण
Don’t say to much about your aims or whatever you want to do!
just show your results with actions and success..! 💯
तू कुछ कर अलग, तू कुछ बन अलग ,
तभी तो नाम कमाएगा !!
सपनों का है यहाँ ऊचा आसमान ,
तू कुछ सोच अलग इस दुनिया सें,
भरनी है तुझको लंबी उडा़न,
तभी तू ऊचा बन पाएगा !!
माना राहों पर आयेंगी मुश्किलें हजार,
तू संघर्ष कर, तू आगे बढ़,
तभी तो सपना साकार कर पाएगा।।
तू कुछ कर अलग, तू कुछ बन अलग ,
तभी तो नाम कमाएगा !!
पंख होंगे तेरे भी मजबूत,
जब तू सपनों मे साहस भर पाएगा ,
तू गिर, तू हजार बार गिर, फिर से उठ खडा हो,
तभी तो सपनों मे उडा़न भर पाएगा।।
तू संघर्ष कर, तू आगे बढ़,
तभी तो सपना साकार कर पाएगा।।
तू कुछ कर अलग, तू कुछ बन अलग ,
तभी तो नाम कमाएगा !!
💯😊😇
कोणत्याही कामाला सुरु करण्यासाठी योग्य वेळ पाहण्याची गरज नसते. ज्या वेळी आपण त्या कामाला सुरुवात करतो तिचं त्या कामाची योग्य वेळ असते.मला वेगवेगळ्या विषयांवर भाषणं द्यायला खूप आवडत पण मी हे नेहमी माझ्या कुटुंबासमोर किंवा घरातल्या आरश्यासमोर उभे राहून केलं आहे.जेव्हा मी १२ वी ला असताना पहिल्यांदा पूर्ण काॅलेजसमोर जेव्हा भाषणं केले तेव्हा मला कळले की मी देखील चांगले बोलू शकते / भाषणं करू शकते. त्यामुळे आपल्याला जे येतं ते नक्की करून पहा.यश किंवा अपयश नंतर ठरते सुरुवात महत्त्वाची.
Thank you sir for this message 😊
हा ब्लॉग वाचून मी self image यावर मत मांडेंल. सेल्फ इमेज ही आपण ज्या वातावरणात वाढलो किंवा आपल्या कुटुंबियांनी जे आपल्या मनावर बिंबवलं तशीच तयार होते. पुढे जाऊन आपण त्यावरच प्रक्रिया करतो पण आपण त्यामध्ये satisfied नसतो.किंवा त्यामध्ये creative असं काही करत नाहीत. आपण त्यात पाहिजे तेवढे successful होत नाही आणि झालो तरी आपण आनंदी नसतो. त्यासाठी आपण आपल्याला जीवनात नेमके काय करायचे आहे? आपण काय करू शकतो? याचा विचार करायचा आहे. म्हणजेच आपली self image आपण तयार करायची आहे. आणि मग लोक काय म्हणतील, हे कार्य आपल्या साठीच आहे का? याचा विचार नाही करायचा. एखादी गोष्ट नवीन करायची कल्पना असेल तर लगेच कृती करायची. योग्य वेळेची वाट बघत बसण्यात काही उपयोग नाही. हेच या ब्लॉग मधून शिकण्यास मिळते. आपल्याला रिझल्ट चांगले हवे असतील तर आपण size of self image यावर काम करायला हवे.
Sir, your thoughts are mind blowing✨
Thank you for this☺ .
खूपच सुंदर सर या अगोदर कधीतरी ऐकले होते माणूस विचारांवर काम करत नाही परंतु त्याचे स्पष्टीकरण आज मिळाले सर आपण जे समशान भूमी ची थॉट सांगितले ते जबरदस्त आहे मलाही वाटतं हे कसं काय पण नंतर समजलं एक खर आहे अशा अनेक विचार माझ्याही मनात येतात आणि इतरांचेही म्हणतात आज काही लोकं सक्सेसफुल आहे तर काही लोकं निराशवादी जीवन जगत आहे असे काय असेल तर त्यामागे विचारच आहे ज्यांनी कोणाची काळजी न करता विचारांवर काम केले ते जीवनात यशस्वी झाले आणि विचारांवर काम करतांनी१) लोकांना काय वाटेल? किंवा लोकं काय म्हणतील? २) हे आपले कामं नाही, हे कामं विशिष्ट/खास लोकंच करू शकतात३) योग्य वेळ आल्यावर काहीतरी करण्यास सुरूवात करणार-इत्यादी प्रश्न पडतात ती खर आहे सर माझ्याही मनात अनेक विचार येतात आणि ते अनेक विचार तसेच राहून जातात तरी असेच प्रश्न ती विचार बाहेर पडू देत नाही आज या ब्लॉग च्या माध्यमातून विचारांना एक नवीन दिशा प्राप्त झाली आहे मीखरचं माझ्या विचारांवर आजपासून काम करायला सुरुवात करणार सर ब्लॉग मध्ये लिहिलेले उदाहरण अगदी आपल्या जीवनात आपण पाहिलेले आहे त्यामुळे चटकन समजतात आणि ब्लॉग मध्ये लिहिली आपली सोपी आणि सरळ भाषा अगदी मनाला स्पर्श करते नियमित ब्लॉग वाचकांनी सर काहीतरी नवीन करते धन्यवाद सर मला आशा आहे की पुढच्या ब्लॉग मध्ये मला असेच काहीतरी नवीन सापडणार
क्रियविणा वाचाळता व्यर्थ
खरतर मानवी जीवनाचा विचार करत असताना , जगातील प्रत्येक माणसाचे जीवन काहीना काहीतरी करण्यासाठीच असते. प्रत्येक जण आपल्या जीवनाच्या उद्देश ठरवून कार्य करत असतो. परंतु आपण आपलं स्वप्न , धेय्य , त्यातून मिळणारं सुख , इतरांसाठी आपलं ध्येय कितपत उपयोगी आहे , या गोष्टीचं काल्पनिक चित्र अगदी मनलाऊन , त्यामधे वेगवेगळे सुखाचे , ऐशोरामाचे रांगभरून रेखाटत असतो , हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि अश्या गोष्टी आपण केलाच पाहिजे . परंतु काय होते की अश्या गोष्टी प्रत्यक्षात मात्र काही बोटावर मोजण्याइतके लोकच करतात. हे असं का घडतं? या गोष्टीच्या अतिशय जवळील कारणे सरांनी अगदी रसाळ भाषेमध्ये स्पष्ट केलेले आहेत.
मग त्यामध्ये मी हे करत असताना लोक काय म्हणतील? हा ट्रेंड आपल्याकडे खूप फेमस आहे.आपण जे करतो त्यामधे जर आपल्याला आपला इकिगाई भेटतं असेल तर त्याठिकाणी लोकांचा विचार करण्याची काहीही गरज नाही . सामान्य राहून असामान्य व्हायची इच्छा असेल तर आपण आपल्या विचाराला महत्व देणं खूप गरजेचं आहे . लोकांच्या विचारानुसार केलं तर ज्या गोष्टीकडे मजोरिटी आहे त्यानुसारच ते आपल्याला सल्ला देतात आणि majority असणारी गोष्ट ही सामान्यच असते , म्हणुन आपण आपल्या कल्पनेला वाव दिला पाहिजे.
कोणत्याही गोष्टीचं चित्र मनात तयार करून चालणार नाही तर त्यासाठी ते चित्र कृतीतून घडवणं महत्वाचं असते आणि त्यासाठी starting अत्यंत महत्वाची असते करतं start केल्याशिवाय आपल्या जीवनाची गाडी धेया पर्यंत पोहचण्याचा मार्ग कसा पार करू शकेल? . हे या ब्लॉग मधून मनात बसलेलं आहे.
एखादं काम काही विशिष्ट लोकच करू शकतात हे आपल्या मनात अगदी लहान असतानाच आपल्या परिवाराकडून किंवा समाजाकडून कोरून ठेवलेलं असतं. पण हे अगदीं चुकीचं आहे ते का चुकीचं आहे आणि कसं चुकीचं आहे हे या ब्लॉग मधून समजून आल.
त्याच बरोबर आपल्या तक्रारीचे लेबल काय असतात .आपण कश्या पद्धतीने आपल्या तक्रारीचा ढीग उभा करतो . आणि ते खरंच वास्तवाला धरून बरोबर आहेत का ? याच अगदी सखोल स्पष्टीकरण सरांनी अत्यंत सोप्या भाषेत दिलेले आहेत.
खरंच हा ब्लॉग वाचून आपण आपल्या उपजत कौशल्यावर आणि काम का करत नाही या प्रश्नाच्या उत्तराचे निराकरण अतीशय समाधानकारक झालेलं आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर 😊
नमस्कार सर,
आजचा ब्लॉग हा फारच प्रेरणादायक होता पहिली गोष्ट म्हणजे मला यातून खुप प्रेरणा मिळाली एक प्रकारची शरीरात ताकद निर्माण झाली. जोश निर्माण झाला. हा ब्लॉग वाचल्यानंतर यातून मला जे काही शिकायला भेटलं ते मी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे
जगात प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतो, काहीतरी कौशल्य असतं. पण त्याचा वापर हे जास्त तर लोक करतच नाही कदाचित त्यांना व्यक्त होता येत नाही. ती व्यक्ती दुसऱ्या पेक्षा आपल्याला कमी लेखीत असतात आणि आसल्या प्रकारचे काही न्यूनगंड मनात बाळगत असतात.
त्यामुळे त्यांचं उभं आयुष्य असच निघून जातं याचा काहीही उपयोग होत नाही. नाही स्वतःसाठी त्याचा उपयोग होत, अन् नाही जगासाठी. आपल्यातील गुण ,कौशल्य हे आतच
राहून जातं आणि ते आपल्याला त्या गोष्टीत ज्ञान असूनही काही उपयोग होत नाही.
म्हणून आपल्यात ज्या कल्पना असतील त्यावर आपण काम करायला सुरुवात केली पाहिजे .
सुरुवात खूप महत्वाची आहे सरांनी एक उदाहरण दिले ते मला खूप आवडले कि सर्व सिग्नल एकसोबत कधीच लागणार नाही .
तर सुरुवात करून हळूहळू अंतर काटायला चालू करून द्यायला हवे आणि अशाप्रकारे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो म्हणून फक्त मनात विचार बाळगून उपयोग नाही तर त्यासाठी काहीतरी करावे देखील लागेल.
खरं म्हणजे आपल्यात कौशल्यही असतात. काही गुणही असतात आणि जीवनात प्रत्येकाला यशस्वीही व्हायचे असते तर मग अडथळा कुठे निर्माण होतोय तर त्याचेही उत्तर मला या लेखाच्या माध्यमातून भेटले आहे.
त्याचं उत्तर असं आहे की आपण त्या कौशल्यावर काम करत नाही आपण नेहमी टाळाटाळ करत असतो आज उद्यावर ढकलत असतो आणि आपल्या कल्पना, ध्येय हेही उद्यावरच हळू हळू जात असतं आणि त्यामुळे दिवसा मागून दिवस लोटतात वर्षामागून वर्षे जात आणि हळूहळू आपलं एकमेव आयुष्यही समाप्त होतं
आपल्या सोबत हे सर्व घडत असतं हे काय सहज असच घडतं का नाही ना याचं काहीतरी कारण असायला पाहिजे ना तर त्याचं कारण म्हणजे आपल्या भोवती असलेले नकारात्मक गोष्टी, नकारात्मक वातावरण, नकारात्मक विचार, समाजातून आपल्या डोळ्यासमोर आलेल्या नकारात्मक दृश्य.
या सर्व गोष्टींनी आपणही नकारात्मक होऊन जातो आपल्याला ही वाटायलाो लागतं की आपणही काही करू शकत नाही तो काही करण्याचा उत्साहाई इथे मृत्यू होऊन जातो आणि खेळाचा सत्यानाश होऊन जातो.
जशा प्रत्येक समस्यांचे काहीतरी उत्तर असते तशा याचाही आहे की या समस्यांना धरून आपल्याला बाहेर फेकावे लागेल जर मोबाईल मध्ये व्हायरस असला तर तो व्यवस्थित चालणार नाही म्हणून तो व्हायरस काढावा लागेल
पहिली शिकवण म्हणजे लोकांना काय वाटेल याचा विचार आपण करायचा नाही आपल्या बुद्धीला पटेल असं काम आपण करायचं आपल्याला नाव ठेवणाऱ्या लोकांच्या यादीत राहायचं नाही तर काहीतरी करून दाखवणार यांचा लोकांच्या यादीत यायचं आहे आपल्याला लाटण्यासारखं इकडे तिकडे जायचं नाहीये तर ठाम निर्णय घ्यायचा आहे आणि त्याच्यावर अटळ राहायचे आहे.
दुसरी गोष्ट आपण आज जिथे कुठे आहे तिथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्याकडे ज्या गोष्टी आहे त्याचा उत्तम वापर करून पुढे पुढे चालत राहायचे आहे या दरम्यान लोकांकडे लक्ष द्यायचे नाहीत देऊन फायदा नाही कारण लोक हे बोलणारच आपण काही केलं तरी बोलणार आणि नाही काही केलं तरी बोलणारच
आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की काहीतरी करूनच काहीतरी होऊ शकते म्हणून कायम आपण कार्यरत राहिलं पाहिजे
चौथी गोष्ट म्हणजे योग्य वेळ काय असते आपण सुरुवात तर करू तीच योग्य वेळ आहे एकाच वेळेला सर्व रस्ता मोकळा नसतोच
तो होणारही नाही त्यामुळे वेळ योग्य अयोग्य नसते आपली सुरुवात योग्य-अयोग्य असू शकते सुरुवात एकदा झाली की हळूहळू मग आपण पुढे पुढे चालत ध्येयापर्यंत पोहोचू शकतो नाहीतर कायम एकाच जाग्यावर राहू.
पाचवी शिकवण म्हणजे आपण जसे आहोत 100% सुंदर आहोत आपण तक्रार केली नाही पाहिजे की मी असाच आहे तसाच आहे माझ्या जवळ हेच नाही येत नाही माझी परिस्थितीच वेगळी आहे हे सर्व गोष्टी आपल्या मार्गातील खूप मोठ्या अडचणी आहे याची आपण सर्वांनी गाठ मारून घ्यावी आणि यापासून दूर राहावे.
आपल्या मार्गात ज्या काही अडचणी अडथळे येतील त्या सर्वावर मात करून पुढे जाणे हे खरं यश आहे
धन्यवाद सर.
Thank u sir for this blog,haa blog aaj chya generation sathi ani baki genration sathi pn khup important ahee,karan he reality ahee,je pn tumhi blog madhe sangitle tya sarv goshtishi amhi ralate karto,amchya manat tr,khup kahi karav as Vatat khup sarya goshti manat astat but te amlat anaych prayatn amhi karat nahi,satat dusryach v4 karto ki,lok kay boltil,aani apan jr kontya kamat success nahi zalo tr,aplya apyashyach khapar apan dusryachya dokyavr fodto apan apli chuk manya ch karat nahi,apan je swapn baghto kivha je karyche ahee tyasathi apan chotishi ka hoi na suruvat karat nahi,apan konti gosht start ch keli nahi tr te purn kashi honar,aaj chya ya blog mude aplyala je karych ahe je aple aim ahet te purn karnyasathi aplyala kahitari karyla start kel pahije ,te manat thevlyani purn hot nahi, ani je pn karych ahe te adhi on the paper lihych He mla ya blogdhun samjhl ..😊
नमस्कार सर
खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही महत्वाची गोष्ट सांगितली. आपल्या मनात खूप काही असते मला हे करायचे आहे मला ते करायचे आहे. पण मला जे काही करायचे ते मी नंतर करेल. कारण आता हे मी कसे करू माझा त्या क्षेत्रात अनुभव नाही. पण आपण हे विसरतो की जर काही केलेच नाही तर अनुभव कसा येईल. हे आयुष्य एकदाच जगायचे आहे तर मग लोकांचा विचार करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे न राहवून ते वायाला का घालवायचे. आपल्या मनात असलेल्या कल्पनांना आपण नको ते प्रश्न विचारून आवर घालतो.
१ लोक काय म्हणतील ?
आपण काहीही केल तरी लोक त्यावर बोलणारच आहेत. त्यामुळे काही न करता लोकांचं बोलन ऐकण्यापेक्षा तुमच्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करायला लागा आणि लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. जे आज तुमच्या निर्णयावर हसतील तेच उद्या तुमचे कौतुक लोकांन समोर करतील.
कुछ तो लोग कहेंगें , लोगों का काम है कहना
बन मस्तमौल हम चलते राहो पर , जहाँ हमें हे चलना
२. हे आपले कामं नाही, हे कामं विशिष्ट/खास लोकंच करू शकतात.
जे काम तुम्हाला आवडते ते तुम्ही करा. कारण जर तुम्हाला जमत नाही तर ते कोणालाच जमणार नाही. सामान्य माणूसच असामान्य कामगिरी करून शकतो. कोणीही जन्माला येतानाच श्रेष्ठ म्हणून येत नाही त्याचे काम त्याला श्रेष्ठ बनवते.
३.योग्य वेळ आल्यावर काहीतरी करण्यास सुरूवात करणार-
कोणतेही कार्य करण्यासाठी ठराविक वेळेची गरज नसते आपण ज्यावेळी सुरुवात करतो तीच योग्य वेळ.
४.तक्रारींचे लेबल्स-
नाकर्तेपणाला कोणतेही लेबल्स लावण्यापेक्षा काही तरी करून दाखवावे.
कारण जर काही केले तरच तुम्ही यशस्वी व्हाल.
Thank you so much Sir for amazing blog ☺️. The blog gives a new vision and inspired for more work on aim.
आपल्या मनामध्ये अनेक कल्पना असतात,life मध्ये खूप काही करायचं असत,आपल्याकडे भरपूर कौशल्य असत तरी पण आपण life मध्ये काहीच करू शकत नाही आणि सामान्य माणसाचं जीवन जगतो.
आपण फक्त मनत राहतो मला हे करायचं आहे ते करायचं पण आपण त्यासाठी लगेच सुरुवात नाही करत ते काम उद्या वर ढकलत जातो आणि life मध्ये उद्या कधीच येत नाही कारण उद्या चा आज होत असतो,आणि ते काम ती इच्छा तशीच राहते
जरी आपण एखाद्या कल्पनांवर काम करायला सुरुवात करणार तेवढ्यात मनात अनेक विचार आणि प्रश्न उभे राहता,ते पुढील प्रमाणे…..
1.लोकांना काय वाटेल?
लोकांचा जर आपण विचार केला तर life मध्ये आपण काहीच करणार नाही….
लोग हमारे बारे मे क्या सोचते हे,
अगर ये भी हम सोचेंगे
तो फिर लोग क्या सोचेंग
( Be positive…… Enjoy life)
2. हे आपले काम नाही,हे काम खास लोकचं करू शकतात
या जगात प्रत्येक व्यक्ती खास आहे, कारण प्रत्येकाचा जन्म काहीतरी खास करण्यासाठी झाला आहे.
3.योग्य वेळ आल्यावर काहीतरी करण्यास सुरुवात करणार…
योग्य वेळ कधीच येत नाही कारण प्रत्येक वेळ योग्य असते म्हणून योग्य वेळेची वाट बघू नये.
4.तक्रारीचे लेबल्स
आपण नेहमी खूप तक्रारी असतात,हे नको ते असच आहे,तेच पाहिजे ,हेच नको यामध्येच आपल वेळ जातो आणि जे करायचं आहे ते लांबच रहात
ही सगळी कारणे बाजूला ठेवा.”उठा कामाला लागा, स्वतःला जागं करा,हिम्मत द्या,जे काही करायचं आहे त्याची सुरुवात आजच करा.”
खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे सर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
नमस्कार सर,
आपण आपल्या आसपासच्या लोकांकडे किंवा जगातील काही लोकांकडे पाहतो जे खूप talented असतात. ज्यांना त्यांच्या जीवनात खूप काही करायचे असते. पण ते पुढे न जाता आहे त्याच स्थितीत राहतात. त्यांच्या कौशल्यांचा किंवा टॅलेंटचा विकास होत नाही. एवढं टॅलेंट असतानाही आपण मागे पडतो असं का होत असेल? अशाच प्रश्नाचे उत्तर या ब्लॉगमध्ये आपल्याला भेटणार आहे.
आपण ज्या गोष्टीवर फोकस करतो ती गोष्ट नेहमी मोठी होत असते त्या गोष्टीचा विकास होत असतो. आपण मात्र आपल्या उपजत कौशल्यावर कधीही फोकस करत नाहीत, त्यावर कुठलीही कृती न करता नेहमी टाळण्याचा प्रयत्न करतो.आज नाही उद्या करूया असे म्हणून सोडून देतो, लोक काय म्हणतील याचा विचार करत बसतो, हे काम आपल्या साठीच आहे का ?, योग्य वेळ येईल तेव्हा करू या,आणि शेवटी तक्रारीचे लेबल्स असे ना ना प्रकारचे प्रश्न आपल्या समोर पडतात आणि मग दिवसांमागून दिवस जातात आणि ती वेळ निघून जाते. आपल्याला जे करायचं होतं ते राहून जातं आणि मग पश्चाताप करण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नसतो.आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचा आहे ना तर मग या सर्व गोष्टी बाजूला टाकाव्या लागतील. पहिली गोष्ट आपल्याला आपल्या स्किल, talent वर focus करावा लागेल. जे काही करायचा आहे त्यावर लगेच कृती करायला पाहिजे. लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा. सरांनी सांगितलेले वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं की, This is your opinion and opinion is not the fact.आणि जे करायचे आहे त्याच्या तयारीला लागायचे. स्वतःवर फोकस केला तर सगळ्या गोष्टी आपोआप विकसित होत असतात.
Thank you Sir😊
हा ब्लॉग वाचला आणि खरंच या मधले विचार मनाला भावणारे आहेत. हा ब्लॉग वाचत असताना फक्त वाचण्यासाठी चे विचार नसून माझं प्रत्यक्षात जीवन आहे असा अनुभव आला. आपल्या प्रत्येकाकडेच भन्नाट आयडिया , जबरदस्त कल्पना असतात आणि त्या कल्पणेसठी तशी कौशल्य सुद्धा आपल्याकडे असतात. प्रत्येकाची इच्छा असते की जीवनामध्ये आपल्या कल्पनेनुसार आपल्या आयडिया नुसार आपल्या कौशल्याचा उपयोग करून आपल्याला भरघोस यश प्राप्त झाला पाहिजे. आणि आपल्या सर्वांकडून इतरांपेक्षा वेगळे कौशल्य असतात इतरांपेक्षा वेगळे करण्या च्या भन्नाट कल्पना असतात म्हणून तर या जगामध्ये आज अनेक गोष्टींचा उपभोग आपण घेत असतो. आपल्या आजूबाजूला जे काही गोष्टी दिसतात त्या कोणा तरी व्यक्तीने तयार केलेल्या आहे त . कोणत्या तरी व्यक्तीची ती कल्पना आहे . अशी प्रचंड विकसित करणारे कल्पना आपल्याकडे असतात परंतु त्या कल्पनेनुसार आयडिया नुसार आपल्या कौशल्यानुसार आपल्याला यश मिळतच नाही या गोष्टीचे कारण काय असेल? आपल्याकडे एखादा पदार्थ बनवण्यासाठी तर पदार्थाला लागणारे सर्व रेसिपी तयार आहेत तो पदार्थ कसा बनवायचा याची माहिती सुद्धा आपल्याला आहे परंतु तरीसुद्धा तो पदार्थ आपल्याकडून बनत नाही , हे असं का होत असेल? अशा सर्व प्रश्नांची अतिशय समाधानकारक आणि अचूक उत्तरे आपल्या या ब्लॉगमधून मिळतात.
आपल्या आसपास असे अनेक लोक सापडतील की, त्यांच्याकडे एखाद्या गोष्टीसाठी प्रचंड प्रमाणात कौशल्य असतात त्या कामांमध्ये ते तरबेज असतात तरीसुद्धा ते एकदम bottam level असतात. आणि त्यांच्यापेक्षा कितीतरी मागे असणारे लोक आज टॉप ला दिसतात. माझ्या गावात असे अनेक लोक आहेत की त्यांच्याकडे अफाट शक्ती आहे परंतु ती शक्ती योग्य वेळेला आणि योग्य रीतीने वापरली नसल्यामुळे ते आज जिथे होते तिथेच आहेत. माझे काका आहे आहे ते अप्रतिम गातात , त्यांच्या आवाजाचा गोडवा खूपच रसाळ आहे असं वाटते की ती गात असताना रात्रंदिवस ऐकत राहावं परंतु आज ते त्याकाळी जिथे होते तिथेच आहेत. या गोष्टीचा खोलवर विचार केल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची मला इच्छा झाली आणि त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या प्रतिक्रिया तुम्ही दिलेल्या तक्रारीची लेबल आहेत त्यात होत्या. माझे वडील support करत नव्हते, माझ्याकडे पैसे नव्हते ,माझी परिस्थिती खूप हलाखीची होती, मला कोणी मार्गदर्शन करणार नव्हतं अशा भाराभर प्रतिक्रिया यांच्याकडून आल्या आणि खरंच या प्रतिक्रियांचा जरा खोलवर विचार केला या सर्व प्रतिक्रिया खोट्या आहेत असंच उत्तर येईल यात काही शंका नाही.
मग हे सर्व लोक मागे पडण्याचं नेमकं कारण काय आहे ? या गोष्टीचा उत्तरांचा विचार करत असताना मला तुमचा हा ब्लॉग तुमचे हे अप्रतीम विचार खूपच उपयुक्त वाटतात. कोणतीही गोष्ट करत असताना या कोणत्याही क्षेत्रामध्ये कुठलेही काम करत असताना आपण त्या कामाचा आधी विचार करत असतो. आणि मगच तू विचार कृतीत उतरून त्यामधून कामाची पूर्तता होत असते. परंतु आपण केलेले विचार कृतीमध्ये आणण्याचं काम अगदी मोजक्या लोकांच्या हातून घडते. 95 टक्के लोक केलेले विचार कृतीमध्ये आणण्यास नापास होतात . आणि जे लोक विचारावर लवकरात लवकर कृती करतात त्यांच्याकडे यश धावत येत. काय जादू असेल या लोकांकडे? कुठलीही शक्ती त्यांच्या मध्ये असेल? तर हे लोक एक तर कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करत नाहीत आणि केलेला विचार इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मनात आलेली कल्पना कुठलाच विलंब न करता कृतीमध्ये उतरवत असतात. मग आपण काय कृती करत नाही? या प्रश्नाचा विचार करत असताना असे लक्षात येते की, आपल्यामध्ये अशा काही समजुती असतात की ते पाषाण यासारखे अगदी कठोर असतात. त्यांनी आपल्या मध्ये उपजत असलेले कौशल्य वरच्या लेव्हलला किंवा पुढच्या लेव्हलला जाऊच देत नाही. असे कोणते अडथळे आहेत की त्यांच्यामुळे आपण bottam level पारच करू शकत नाही.
जर आयुष्य मध्ये सुखी राहायचं असेल, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लोकांबद्दल विचार करणे सोडून देणे . लोकांच्या मनात काय चाललं आहे या गोष्टीचा शोध घेणं थांबवणे. ज्यावेळी आपण लोकांबद्दल विचार करणं सोडून द्याल त्यावेळी खरंच आनंदी जीवनासाठी चे 50% प्रॉब्लेम solve होतील. कुठल्या गोष्टीची सुरुवात करत असताना आपल्या मनात पहिल्यांदा हे अगदी कडू विचारा पुढे येतो की, मी करत असलेल्या कामाबद्दल मला लोक काय म्हणतील. जीवन आपल्याला आपल्यासाठी आपल्याकडून जगायचा आहे यामध्ये आपण लोकांचा काय म्हणून विचार करायचा? मी केलेल्या कामावर लोक हसतील! अशीच दुसरी घाणेरडे विचार आपल्या समोर येत असते. लोक हसतात हे बरोबर आहे आणि हसायला सुद्धा पाहिजे परंतु ते कोणत्या उद्देशा वरून हसतील तो उद्देश आपल्या हातात आहे. त्यामुळे डेफिनेटली लोकांना आपला हसवायचा आहे परंतु हसण्याचा उद्देश आपलं यश पाहिजे.
आपल्या लहानपणापासूनच आपल्यामध्ये एक गोष्ट कोंबलेली असते की आपण गरीब आहोत आपल्याकडे ते करण्यासाठी आमुक नाही तमुक नाही हीच विचारधारा आपल्यामध्ये हळूहळू पसरट होत असते आणि ज्यावेळी आपली कार्य करण्याची वेळ येते त्या या गोष्टीचा खूप मोठा रोधक निर्माण होतो त्यामुळे आयुष्याला खूप गचके खावे लागतात. निसर्गाने या जगातल्या प्रत्येक माणसाला अगदी समान प्रमाणात साधन संपत्ती पुरवलेली आहे परंतु त्या साधनसंपत्तीचा वापर आपण कितपत करतो हे आपल्यावर अवलंबून असते. तसाच आयुष्य हे सगळ्यांसाठी सारखाच आहे त्या आयुष्यामध्ये आपली भरारी किती आहे ही बाब लक्षात घेणे या ठिकाणी योग्य ठरेल. त्यामुळे एखादी गोष्ट तोच माणूस करू शकतो त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे त्याच्या खूप मोठा ओळखी आहेत त्यामुळे तो करू शकतो अशी आपल्यामध्ये जी समज आहे ती समज मुंढ करण्याची नितांत गरज आहे.
ध्येयप्राप्तीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आपण ध्येय निश्चित केलेला आहे ते ध्येय निवडत असताना आपण खूप विचार केलेला असतो आणि केलेल्या विचारावर STARTING. करण्याची मुख्य कृती असते. आपण स्वप्न तर खूप मोठी बघत असतो परंतु ते स्टार्ट करण्यासाठी आपल्याला योग्यवेळी ची गरज आहे असा भास आपल्यात निर्माण होतो. मग त्यासाठी खूप कारणांचा ढीग आपल्याकडे असतो मग त्यामध्ये भौतिक, आर्थिक , शारीरिक बाबींचा समावेश असतो. एखादे काम पूर्ण करण्याचे नियोजन आपण अगदी उत्साहाने आणि 100% रिझल्ट साठी पूरक असे नियोजन करा असतो परंतु त्या नियोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण योग्य वेळेची वाट बघत असतो आणि वेळ आपल्यासाठी कधीच येत नाही आणि अशातच आपल्या स्वप्नांची राखरांगोळी व्हायला सुरुवात होते म्हणून आहे त्या ठिकाणी, आहेत या साधनांमध्ये आहेत या वेळेत कामाची सुरुवात करण्याची खूप आवश्यकता आहे.
सदर ब्लॉग बल्ब on करणार आहे. या अशा स्वरूपाच्या समजुती कापून टाकल्या शिवाय आपल्यामध्ये खरच प्रगती होणं अशक्य आहे त्यामुळे अशा या बिनकामी समजुती मुळातून नष्ट करून टाकून मार्गाकडे पदार्पण होऊ त्यासाठी तुमचं लेखन खूपच Supporting आहे असेच विचारशील ब्लॉग आमच्यासाठी मिळत राहो ही विनंती आणि आपण दिलेल्या लाइफ चेंजिंग ब्लॉग साठी Heartly thanks
जीवनामध्ये अशी एखादी गोष्ट घडते की त्यामुळे आपले जीवन एका वेगळ्या अँगलने वळते , सबंध जीवनाची दिशा त्या प्रसंगातून बदलते असाच जीवन समृद्ध करण्यासाठी हा ब्लॉग अतिशय उपयुक्त आहे यामध्ये नोंदवलेल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की त्यातून तीच गोष्ट आपल्याला प्राप्त करता येऊ शकते. असा हा जहाल ब्लॉग वाचून खूप आनंद वाटला कारण आज पर्यंत जे काही जीवन जगत आलो ते माझ्या मते असलेल्या उपजत कौशल्य वरचा नव्हतंच आतापर्यंत जीवन दुसऱ्यांना कोणीतरी भरवलेल्या कल्पनेवर आधारलेला होतं त्यामुळेच जीवनामध्ये वेळू निराशा येत होती आनंदाची चाहूल खूप दूर गेली होती आणि अशा जीवघेण्या परिस्थितीमध्ये मला हा सोन्यासारखा ब्लॉग हाती लागला आणि विचारांची दिशाच बदलली.
आज या जगामध्ये प्रत्येक जण जे की , त्यांना खूप काही करायचं होतं त्यांच्या मनात भन्नाट कल्पना होत्या त्यांच्याकडे अमर्याद कौशल्याची खान होती परंतु ते त्यांचा उपयोग करून जीवनात त्यांना पाहिजे तेवढे संपादित करू शकले नाही अशा प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे असते की, माझ्याकडे भरपूर टॅलेंट होतं भरपूर कल्पना होत्या , खूप काही करायचं होतं परंतु ते राहूनच गेलं आणि अशा या विचारधारे मुळे जीवन एक निराशावादी बनुन जातं आणि जीवन जगायचं म्हणून जगायचं अशा निश्चयाने अशी माणसे एक दिवस खूप सारा मुश्किलीने का काढत असतात.
आपल्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवू द्यायची नसेल तर आपल्याला एक काम करणे गरजेचे आहे ते म्हणजे , पहिल्यांदा स्वतःला ओळखणे गरजेचे आहे स्वतः टाईम काढून स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची खरी गरज आपल्याला आहे ज्यावेळी आपण आपल्या स्वतःला बिल ओळखतो त्यावेळी आपण काय आहोत हे आपल्याला समजते त्याच बरोबर आपल्या मधील असलेलं भन्नाट टॅलेंट , भन्नाट कल्पना आपल्याला सापडतात जणू काही ते आपल्यासाठी सोन्याचा खजिना असतो णि ज्यावेळी हा खजिना सापडतो त्यावेळी खर्या अर्थाने आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला सापडतो आणि जेव्हा जीवनाचा उद्देश सापडतो तेव्हा जीवन समृद्धीने आनंदानं भरून येतं जीवनामध्ये नेहमीच प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभराट व्हायला लागते आणि जिवंतपणी स्वर्ग अनुभवायचा योग आपल्या मध्ये येत असतो. त्यासाठी आपण आपल्या जीवनाच्या मार्गात ची वाटचाल ठरवत असताना इतरांच्या सगळ्यापेक्षा स्वतःला महत्त्व देणे अत्यंत गरजेचे आहे. हल्ली असं होतं की, आपण आपली ध्येयनिश्चिती करत असताना किंवा आपल्याला कोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्या जीवनाचा उद्देश मिळवायचा आहे हे ठरवत असताना आपल्यापेक्षा इतरांना जास्त किंमत देतो इतरांचे जास्त सल्ले आपण घेत असतो आणि त्यामुळे इतर लोकांना आपल्यापेक्षा आपल्यामध्ये असलेल्या टॅलेंट आपल्या मध्ये असलेले वेगवेगळे कौशल्य याची जाण कमी असते आणि ते लोक त्या विशिष्ट कालखंडामध्ये कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे कोणती गोष्ट आपला आहे कोणता ट्रेन चालू आहे यानुसार आपल्या देहाची निश्चिती करत असतात आणि आपण सुद्धा त्या गोष्टीला त्या काळामध्ये महत्त्व प्राप्त झाल्याने त्यामध्ये रमतो आणि जीवन मनाच्या विरुद्ध निर्णय घेतल्यामुळे ओसाड व्हायला लागते.
या ओसाड जीवनामध्ये हिरवळ प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपली ओळख करून घेऊन आपल्यामध्ये असलेल्या कौशल्यानुसार ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आनंद होतो ज्यामध्ये आपण बेभान होऊन काम करत असतो त्या क्षेत्रामध्ये जर आपण आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केली तर नक्कीच आपल्या जीवनात समृद्धी नांदेल. त्यासाठी आपल्या मधील असलेल्या कौशल्याची मदत घेऊन आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या साधनाचा वापर करून सुरुवात करणं अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याकडे कल्पना आभाळाएवढे असतात परंतु त्याची अंमलबजावणी मात्र शून्य असते आणि त्याच कारणामुळे जीवनाचा सत्यानाश होतो हा सत्यानाश थांबवायचा असेल तर आपल्या मध्ये असलेले टॅलेंट आपल्याला वर आणल्या शिवाय पर्याय नाही आणि हे टॅलेंट वर आणण्यासाठी आपण आपल्या क्षेत्रामध्ये सुरुवात केली पाहिजे.
एखादा destination आपल्याला गाठवायचे आहे, आणि त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आपण विचाराचा यात्रेमध्ये रमून जात असतो आणि डेस्टिनेशन पोहोचल्यानंतर त्यातून काल्पनिक लाभा मध्ये मोहून जाऊन सारखं त्याच गोष्टीच्या विचारात गुंतत असतो खरं तर हे काही चुकीचे नाही परंतु एखादी गोष्ट मिळवल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या लाभाचा विचार करण्यापेक्षा ती गोष्ट कशी मिळवता येईल आणि ते मिळवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल आणि ती मेहनत घेण्याची आपली इच्छा आहे का आपली तयारी आहे का या गोष्टीचा विचार करून जर आपण आपल्या कृतीला सुरुवात केली तर हळूहळू आपण त्या डेस्टिनेशन पर्यंत नक्की पोहोचवून ते काल्पनिक लाभ आपण प्रत्यक्षात आणू शकतो फक्त त्यासाठी कृती ही अत्यंत महत्त्वाची आहे . या कृती बरोबरच योग्य दिशा असणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे परंतु ज्यावेळी आपण कृती कराल त्या वेळेसच समोर आपल्या दिशा दिसेल त्यामुळे आधी सुरुवातीला कृती करणे अत्यंत गरजेचे आहे आणि जर आपलं डेस्टिनेशन आपल्यासाठी क्लिअर असेल आपल्याला फक्त तेच पाहिजे असेल तर त्यासाठी दिशा सुद्धा आपली तशीच असणार आहे म्हणून सुरुवात करणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
Action+ right direction= result
मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण कृती करण्यासाठी विलंब लावतोय , अशा कोणत्या समजुती आपल्यामध्ये दडलेल्या आहेत हेच या समजुतीमुळे आपण एखाद्या गोष्टीची अंमलबजावणी करायला वेळ लावत आहे , आपल्या हातून त्या गोष्टी बाबतची कृती घडत नाही अशा गोष्टीचा विचार केला असता तर तुमचा हा ब्लॉग त्यावर अतिशय उपयुक्त ठरतो कारण या ब्लॉग मधील दिलेल्या या गोष्टीचं निराकरण अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यातला भाग आहे. आपण सर्वजण आपल्यापासून कृती कृती न होण्यासाठी काही गोष्टी जबाबदार असतात आणि या गोष्टी आपल्या मध्ये जाणून-बुजून a लहानपणापासून भरलेले असतात.
एखादी कृती आपण करत असताना सर्वात पहिले एका गोष्टीचा विचार करत असतो ती गोष्ट म्हणजे आपण करत असलेल्या कामावर लोक काय म्हणतील ! या एका विधानामुळे अनेकांच्या जीवनाचा खेळ झालेला आहे . लोक आपल्या बद्दल बोलायला त्यांच्याजवळ आपल्यासाठी वेळच कुठला आहे? आपणास लोकांबद्दल विचार कर विचार करतो आपल्याकडेच त्यांच्यासाठी वेळ आहे. लोकांनी आपल्या बद्दल विचार करायला आपण काय न्यूटन आहात का? लोकांसाठी फक्त आपल्याकडे वेळ आहे आपल्यासाठी लोकांकडे वेळ नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि लोकांचा विचार आपल्या मनात न आणता प्रत्येक कृती आपण केला पाहिजे कारण लोकांचं काय तुम्ही एखादी गोष्ट चांगली केली तर ते कौतुकच करतील आणि जर तुम्ही एखादी वाईट केली किंवा एखादी तुम्ही ठरवली गोष्ट मी करू शकले नाही तर त्यावर ती असतीलच त्यामुळे आपण लोकांचा विचार न करता आपण एखादी गोष्ट आपल्यासाठी करत आहोत ती अशीच समज आपल्या मध्ये धरून कृती केली पाहिजे तरच आपण आपल्याला पाहिजे तशी कामगिरी आपण करू शकतो आणि पाहिजे ते आपल्या पण मिळू शकतो.
आपल्याकडे आपल्यामध्ये असलेल्या उपजत कौशल्याचा वापर न करण्यामागे एक कारण खूप मजबूत असतं ते म्हणजे त्या वेळेला मी करून दाखवून किंवा ती वेळ आल्यानंतर मी माझं कार्य सुरू करेन ! हि खूप वाईट विचार आपल्या मध्ये भिनलेली असते आणि यामुळेच आपण विशिष्ट वेळेमध्ये आपण आपलं कार्य करू या विचारधारेने आपलं जीवन पुढे नेण्याची दोन पाऊल मागे ओढत असतो. एखाद्या कामाची सुरुवातच करत असताना आपण मी उद्यापासून हे करणार आहे मी उद्या पासून अमुक करणार आहे अशी विचारधारा आपली असते आणि तो उद्या आपल्या आयुष्यात कधीच येत नाही आणि सबंध जीवनाचा खोळंबा होत असतो आणि शेवटी एक पश्चाताप पात्र होतो तो म्हणजे जीवनात खूप काही करायचं होतं खूप काही मिळवायचं होतं परंतु म्हणू शकलो नाही हा सगळ्यात मोठा होत असतो तो टाळण्यासाठी आपल्याला योग्य वेळेची वाट बघत आहे त्यावेळी मध्ये सुरुवात करणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेबद्दल सांगायच झालं तर जीवनात येणारा प्रत्येक मिनिट प्रत्यक्ष सेकंद प्रत्येक तास हा योग्यच असतो त्यामुळे आपलं काम सुरू होण्याची हीच योग्य वेळ आहे हीच शुभ वेळ आपल्यासाठी आहे हे समजून आपण आपल्या कामाला अतिशय जोमाने सुरुवात करणं आवश्यक आहे.
चहाच्या लोखंडासारखे अतिशय मजबूत समजुती आपल्यामध्ये लहानपणापासूनच आपल्या आजूबाजूच्या लोकांनी भरलेल्या असतात त्यामुळे आपण आपल्या उपजत कौशल्य आहे आपलं टॅलेंट ते वर आणू शकत नाही त्यामुळे अशा समजुती आपल्याला नष्ट करायला पाहिजे आणि या या समजुती नष्ट करण्यासाठी हा ब्लॉग अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या उपजत कौशल्य अडथळा निर्माण होण्यासाठी अनेक तक्रारी चिले बलसा तक्रार करण्यासाठी आपल्याकडे अनेक कारणे असतात ती कारणे आपण देत असतो जसे की माझी परिस्थितीच नव्हती, माझ्याकडे खूप आर्थिक चणचण होती, मला मार्गदर्शन करणारी व्यक्ती सापडलीच नाही जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेतला नसेल तर ती व्यक्ती सापडणार कशी आणि तोच शोध घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपण कृती करावी लागेल आणि त्यातून अडचणी निर्माण झाल्यावर किंवा त्या मार्गामध्ये समस्या निर्माण झाल्यानंतर आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अशा व्यक्तीचा शोध घेत असतो आणखी व्यक्ती आपल्या आयुष्यात मिळतेच त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या मध्ये असलेल्या कौशल्याचा वापर करून क्षेत्र निवडून की ज्यामध्ये आपल्या जीवनाचा अर्थ दडलेला आहे आहे त्यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा करीत आपल्या क्षेत्रामध्ये उंच उंच भरारी घेऊन आपण जगासमोर आपल्याबद्दल हावरा पणा निर्माण करू शकतो.
त्यासाठी या कठोर समजुती नष्ट करणार गरजेचा आहे आणि या समजुती नष्ट करून आयुष्यात भरभराट काढण्यासाठी आयुष्य हिरवळ करण्यासाठी हा ब्लॉग खूपच महत्वपूर्ण वाटतय. यातून नक्कीच आमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही असा हा अत्यंत प्रभावशील ब्लॉग वाचण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
नमस्कार सर
मित्रांनो आपण नेहमी पाहतो की काही लोक काही ठराविक लोक एक असामान्य जीवन जगताना दिसतात. कारण ते लोक वयाच्या क्षेत्र त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असतात कोणी वक्ता आहे तर कोणी एखादा खेळाडू, कोणी नेता आहे तर कोणी एखादा मोठा व्यावसायिक. पण मग त्यांच्यात आणि आपल्यात बदल तरी काय आहे तर ते काय असे सहज यशस्वी झालेले माणसं नाही त्यांनी त्यांच्या जीवनात काहीतरी मोठे काम केले म्हणून ते आज असं सर्वांपेक्षा सगळ्या जगापेक्षा वेगळी आणि छान जीवन जगतात तर प्रश्न आहे की त्यांनी असं काय केलं तर सर सर त्यांचं उत्तर असं आहे की त्यांनी त्यांच्या गुणावर कौशल्यावर काम केलं
त्यांनी स्वतःचं मनन केले स्वतः काय गुण आहे काय कौशल्य आहे याचा शोध घेतला आणि त्यावर काम केलं त्यांचं जे क्षेत्र आहे त्यासाठी काय काय गुण आवश्यक आहे त्यासाठी कोणते कोणते कौशल्य महत्त्वाचे आहे त्या कौशल्यावर त्यांनी काम केलं म्हणून ते सर्वांपेक्षा वेगळे जीवन जगत आहे कारण त्यांनी जगापेक्षा वेगळ्या कार्य केलं सर्व लोक आपल्या कौशल्यावर काम करत नाही म्हणून सर्व काही करून दाखवू शकत नाही. मनात इच्छा फार असते हे करणार ते करणार ते तसं करणार हे असं करणार डोक्यात कल्पना ही असतात पण फक्त कल्पना असून उपयोग नाही ना तोपर्यंत ती कल्पना आहे तोपर्यंत ते भविष्य आहे
ती गोष्ट काल्पनिक आहे पण जेव्हा त्या कल्पनाला आपण कृतीत उतरवु. वास्तवात उतरवु. तेव्हा ते अस्तित्व अस्तित्व आहे आणि अशे अनेक लोक जन्माला आली आणि गेली पण त्यांच्या कल्पना त्यांचे विचार हे त्यांच्या सोबतच निघून गेले ते कोणाच्या उपयोग काही आले नाही ते स्वतःच्या स्वतःच्या सुद्धा काही कामात आले नाही तर दुसऱ्यांच्या जगाच्या काय कामात येणार आपण जेव्हा काही कल्पना वर काम करतो त्या वास्तव व त्याला वास्तवात उतरवतो तेव्हा त्या इतरांच्या देखील कामात येत असतात आपल्या काही प्रयत्नातून इतरांची देखील मदत होऊ शकते.
आणि होते. आज उदाहरण घेतलं तर सुई पासून इंटरनेट पर्यंत ह्या कोणाच्या कोणाच्या कल्पना होत्या कोणाच्या तरी डोक्यात ह्या कल्पना होत्या ते टॅलेंट होतं. त्यांनी त्या गोष्टीसाठी त्यावर काम केलं त्याला त्या कल्पना सत्यात उतरवलं तर त्यातून रिझल्ट काय भेटला तर ते लोक तर मशहूर, फेमस, लोकप्रिय, प्रसिद्ध तर झालेच परंतु संपूर्ण जगाचे सुद्धा मदत झाली आज इंटरनेटला लोक कोण वापरत नाही. प्रत्येक जण वापरतोय प्रत्येक कानाकोपऱ्यात ला व्यक्ती याचा वापर करतोय तर ही एक कल्पना वास्तवात उतरवत त्यामुळे इतरांची देखील मदत झाली.
आपली कुठे ना कुठे इच्छा असते की मी काहीतरी मोठं करावं लोकांची समाजात मदत करावी मी कोणाच्या तरी काम यावं असं आपल्याला वाटत असतं पण मग आपली गाडी कुठे अडकली. आपले काही गैरसमज असतात काही गोष्टींची भीती असते काही संपूर्ण माहिती नसते म्हणून आपण पुढचे पाऊल उचलत नाही आपल्या मनात असते की आपण हे करु तर लोक काय म्हणतील अशी याला उद्देशून एक मन आहे की “सबसे बडा रोग, क्या काहेंगे लोग”. तर आपल्याला जीवनात काहीतरी करायचे असेल काही कल्पना असतील त्या आपल्याला वास्तवात उतरायच्या असतील
आणि लोक त्या कल्पनांना हसत असतील थट्टा करत असतील तर मित्रांनो एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण काहीही केलं की नाही केलं तरी लोक हे हसणारच आहे ते थट्टाच करणार आहे म्हणून अशा नकारात्मक वातावरणाकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे या अशा विचारांपासून आपला बचाव केला पाहिजे आणि सकारात्मक विचार करून पुढे चालले पाहिजे ठाम निर्णय घेऊन पुढे पाऊले उचलत राहिली पाहिजे आणि लोक काय म्हणतात ना ती लोक लोक म्हणतात ना की लोक पायी चालू देत नाही आणि गाढवावर ही बसू देत नाही
प्रत्येक लोकांचे विचार वेगवेगळे असतात लोकांनी देवालाही नाही सोडले तर आपण तर एक सर्वसामान्य मानव आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मनात, डोक्यात काहीतरी नवीन घडत असतात की ते आपण करू शकत नाही, ते आपल्याला जमणार नाही, ते काम खूप अवघड आहे, ते काम आपलं नाहीये, ते काम विशिष्ट खास लोकांचं लोकच करू शकतात. खरंतर प्रत्येक का देवाने जन्माला घालताना काही ना काही गुण कौशल्य दिलेले आहेत प्रत्येक व्यक्ती विशेष प्रतिकृती विशेष आहे
या मानवरूपी त्यांना भेटला आहे म्हणजे काहीतरी उद्देशाने देवाने आपल्याला जन्म दिला आहे की काहीतरी करण्याची एक प्रकारची संधी उपलब्ध करून दिलेली आहेत आणि विलास समस्यांचे संकटांचे कोणी येऊ घातले आहे प्रत्येकाला संकटांना तोंड देऊन त्यांच्यावर मात करून यश प्राप्ती केली आहे या जीवनातील त्याच्या वाटेला तिसरा तिसरा अडथळा म्हणून येणारी गोष्ट म्हणजे योग्य वेळ मी सांगतो आपण तिथून सुरुवात करू ना तेच व खरी योग्य वेळ असते योग्य-अयोग्य वेळ असं काही नसतं
आपली सुरूवातच आपले योग्य वेळ असते इथे मला एक गोष्ट आठवते की दोन व्यक्ती असतात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या हातात कंदील देतो आणि त्याला सांगतो की हा प्रवास कर तुला जिथे जायचं आहे एवढं बोलून तो त्याच्या घरी निघून जातो आणि सकाळी त्या ठिकाणी घेऊन येतो तर पाहतो तर काय कंदील दिला होता तो व्यक्ती तिथेच होता त्याला विचारले की तू गेला का नाही तेव्हा तो म्हणाला जाऊ कसा कंदिलाचा उजेड फक्त पावलापुरता होता.
तर मला सांगायचे एवढा एवढेच आहे की जसा जसा पाऊल पुढे जातील तो उजेड तसाच पावलाबरोबर पुढे पुढे त्या चालत राहील आज आपल्याला संपूर्ण रस्ता जरी दिसत नसला पण सुरुवात करणे गरजेचे आहे हळूहळू आपण जसं जसं चालू चालत जाऊ तसे तसे आपले समस्याही सुटत जातील एका ठिकाणी वाट बघून काय उपयोग आहे एकाच वेळेस सर्व समस्या राहणार नाहीत सर्व रस्ता मोकळा असेल अशी अपेक्षा तरी का बाळगायची. आपण एका समस्येचे निराकरण केलं की दुसरी उभी राहणारच आहे. त्यामुळे
आपण वाटचाल सुरू ठेवायची.
चौथ्या प्रकारची गोष्ट म्हणजे आपण तक्रारी करत असतो तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की “आपण जसे आहोत 100% सुंदर आहोत” त्यामुळे आपल्यातील कमीपणा गृहीत धरून रडत बसायचं नाही. आपल्यातील खराबी शोधत बसायचे नाही आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा आणि आपले काम प्रामाणिकपणे करीत राहायचे खरं तर जीवन म्हटल्यावर अडचणी चॅलेंजेस तर असणारच ना म्हणून एका नव्या ताकदीने उठा आणि कामाला लागा “स्वामी विवेकानंदांचे वाक्य आहे की उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्यावाचून थांबू नका”.
धन्यवाद.
हा लाईफ changing ब्लॉग वाचून जिवणामधील सगळयात मोठया समस्येचं निराकरण झालेले आहे . कारण आपण प्रत्येक जण काहीतरी वेगळेपणा घेऊन या पृथ्वीतलावर जन्माला आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांकडेच अमाप प्रमाणात पोटेन्शियल आहे परंतु ते पोटेन्शिअल कसे यूज करायचं ही आपली समस्या असते त्यासाठी मला वाटते हा ब्लॉग सगळयात चांगलं औषध आहे. आपल्याकडे एवढ्या भन्नाट कल्पना, जबरदस्त टॅलेंट असून सुद्धा आपण पण एखाद्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त करू शकत नाही या गोष्टीचा थोडासा खोलवर अभ्यास केला यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, आपण आपल्या मध्ये असलेल टॅलेंट, कल्पना फक्त डोक्यातच ठेवलेले आहेत त्या कल्पना कृतीमध्ये उतरलेल्याच नाहीत त्यामुळे आपल्या आयुष्यात रिझल्ट येत नाहीत .
मग कोणत्या गोष्टी आहेत की आपल्याला आपल्यामधील talent नुसार कृती करू देत नाहीत .कोणतीही गोष्ट करत असताना या कोणत्याही क्षेत्रामध्ये कुठलेही काम करत असताना आपण त्या कामाचा आधी विचार करत असतो. आणि मगच तू विचार कृतीत उतरून त्यामधून कामाची पूर्तता होत असते. परंतु आपण केलेले विचार कृतीमध्ये आणण्याचं काम अगदी मोजक्या लोकांच्या हातून घडते. 95 टक्के लोक केलेले विचार कृतीमध्ये आणण्यास नापास होतात . आणि जे लोक विचारावर लवकरात लवकर कृती करतात त्यांच्याकडे यश धावत येत. काय जादू असेल या लोकांकडे? कुठलीही शक्ती त्यांच्या मध्ये असेल? तर हे लोक एक तर कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करत नाहीत आणि केलेला विचार इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मनात आलेली कल्पना कुठलाच विलंब न करता कृतीमध्ये उतरवत असतात. मग आपण काय कृती करत नाही? या प्रश्नाचा विचार करत असताना असे लक्षात येते की, आपल्यामध्ये अशा काही समजुती असतात की ते पाषाण यासारखे अगदी कठोर असतात. त्यांनी आपल्या मध्ये उपजत असलेले कौशल्य वरच्या लेव्हलला किंवा पुढच्या लेव्हलला जाऊच देत नाही. असे कोणते अडथळे आहेत की त्यांच्यामुळे आपण bottam level पारच करू शकत नाही.
जर आयुष्य मध्ये सुखी राहायचं असेल, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लोकांबद्दल विचार करणे सोडून देणे . लोकांच्या मनात काय चाललं आहे या गोष्टीचा शोध घेणं थांबवणे. ज्यावेळी आपण लोकांबद्दल विचार करणं सोडून द्याल त्यावेळी खरंच आनंदी जीवनासाठी चे 50% प्रॉब्लेम solve होतील. कुठल्या गोष्टीची सुरुवात करत असताना आपल्या मनात पहिल्यांदा हे अगदी कडू विचारा पुढे येतो की, मी करत असलेल्या कामाबद्दल मला लोक काय म्हणतील. जीवन आपल्याला आपल्यासाठी आपल्याकडून जगायचा आहे यामध्ये आपण लोकांचा काय म्हणून विचार करायचा? मी केलेल्या कामावर लोक हसतील! अशीच दुसरी घाणेरडे विचार आपल्या समोर येत असते. लोक हसतात हे बरोबर आहे आणि हसायला सुद्धा पाहिजे परंतु ते कोणत्या उद्देशा वरून हसतील तो उद्देश आपल्या हातात आहे. त्यामुळे डेफिनेटली लोकांना आपला हसवायचा आहे परंतु हसण्याचा उद्देश आपलं यश पाहिजे.
आपल्या लहानपणापासूनच आपल्यामध्ये एक गोष्ट कोंबलेली असते की आपण गरीब आहोत आपल्याकडे ते करण्यासाठी आमुक नाही तमुक नाही हीच विचारधारा आपल्यामध्ये हळूहळू पसरट होत असते आणि ज्यावेळी आपली कार्य करण्याची वेळ येते त्या या गोष्टीचा खूप मोठा रोधक निर्माण होतो त्यामुळे आयुष्याला खूप गचके खावे लागतात. निसर्गाने या जगातल्या प्रत्येक माणसाला अगदी समान प्रमाणात साधन संपत्ती पुरवलेली आहे परंतु त्या साधनसंपत्तीचा वापर आपण कितपत करतो हे आपल्यावर अवलंबून असते. तसाच आयुष्य हे सगळ्यांसाठी सारखाच आहे त्या आयुष्यामध्ये आपली भरारी किती आहे ही बाब लक्षात घेणे या ठिकाणी योग्य ठरेल. त्यामुळे एखादी गोष्ट तोच माणूस करू शकतो त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे त्याच्या खूप मोठा ओळखी आहेत त्यामुळे तो करू शकतो अशी आपल्यामध्ये जी समज आहे ती समज मुंढ करण्याची नितांत गरज आहे.
हा ब्लॉग वाचून खरंच आपल्यामध्ये असलेल्या कौशल्यांची जाणिव झालेली आहे आणि ती एवढी भन्नाट कौशल्य आपण आज पर्यंत वर आणलीच नाही त्यांना दाबून ठेवल्याची खंत सुद्धा वाटत आहे तुम्ही ती उपजत असलेली कौशल्य वर आणून दिल्याबद्दल Heartly thanks