आपले ध्येय नेमके कसे प्राप्त करावे?

Spread the love

आपले ध्येय नेमके कसे प्राप्त करावे? याचे उत्तर तुम्ही शोधत असाल तर आज इथे नक्की मिळेल.

‘सामान्य माणसाची उपयोगात न आलेली क्षमता ही एका शोध न लावलेल्या नवीन खंडा सारखी आहे, ज्याचा शोध अजूनही घेतला गेला नाही, की, जो खंड अजून खूप काही चांगलं करण्यासाठी उपयोगात यायची वाट बघत आहे’. 

-ब्रायन ट्रेसी

पुढे ते आपल्या Goals या ग्रंथात म्हणतात की, ‘यश म्हणजे ध्येय, बाकी सगळी नुसती वायफळ बडबड’. यशस्वी झालेले ते सर्व लोक तीव्रपणे ध्येयकेंद्रित असतात. त्यांना जीवनात नेमके काय हवे आहे हे माहीत असते आणि ते मिळवण्यावर एकाग्रपणे लक्ष केंद्रित करतात.

ही किती महत्त्वाची वाक्य आहेत, होय की नाही? 

एका अभ्यासावरून हे सिद्ध झाले आहे की भूतकाळात ज्या लोकांनी आपल्या जीवनात यशाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत आणि भविष्यात जी लोकं यशाची शिखरे गाठतील त्यांच्या यशाचे रहस्य म्हणजे काही नियम किंवा सिद्धांत यांचे पालन करणे होय.

 

हे यशाचे सिद्धांत किंवा नियम कधी कोणाचा भेदभाव करीत नाहीत.  

तुम्ही आज कोण आहात?

तुमची आजची परिस्थिती कशी आहे?

तुम्ही कोणत्या जाती-धर्मात जन्माला आलेला आहात? 

तुमचे आजचे वास्तव्य कोणत्या देशात आहे?

तुमचे शिक्षण किती झाले आहे?

तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात? की आणखी कोणीही?

तुमचे वय जास्त आहे, की कमी आहे?

तुम्ही शाळा-महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण करीत आहात की, पूर्ण केले आहे किंवा अपूर्ण आहे?

तुम्ही शिक्षित आहात की, अशिक्षित?

असा कोणताही भेदभाव हे नियम आणि सिद्धांत कधीच करीत नाहीत.

त्या सिद्धांताची अट केवळ एवढीच आहे की, जी लोकं त्या नियमांचे आणि सिद्धांतांचे पालन करतात त्यांना ते 1000 टक्क्याने यशस्वी करण्यासाठी मदत करतात.

या सिद्धांतातील पहिला नियम मी आज तुमच्याशी शेअर करीत आहे.

त्या आधी एका शिबिरात मी एक गोष्ट ऐकली ती तुम्हाला प्रथम सांगतो.

एक शिव भक्त रोज मंदिरात जातो असतो व शिवजींना प्रार्थना करीत असतो की, हे शिवजी मला लॉटरी लागू दे! हे शिवजी मला लॉटरी लागू दे! गेल्या कित्येक वर्षांपासून ही आराधना तो शिवभक्त करीत होता.

एके दिवशी शिवजींच्या धर्मपत्नी पार्वती यांच्या कानावर ही प्रार्थना पडते, तेंव्हा त्या लगेच शिवजींना म्हणतात की, अहो, तुमचा हा भक्त एव्हढा तळमळीने तुमची प्रार्थना करतोय, की हे शिवजी मला लॉटरी लागू दे! देऊन टाका ना त्याला एक लॉटरी.

तेंव्हा शिवजी म्हणाले अगं, मी तर देण्यासाठीच बसलोय, परंतु त्याला कोणती आणि किती किमतीची लॉटरी हवी आहे? ती तर त्याने आधी बाजारातून विकत तर घ्यायला पाहिजे ना !!

मित्रांनो, आपल्यापैकी बर्‍याच लोकांची त्या शिवभक्तासारखीच परिस्थिती आहे, आम्हाला पाहिजे तर खूप काही, परंतु नेमके काय पाहिजे हेच माहीत नाही.

आपल्याला आपल्या जीवनात नेमके काय पाहिजे आहे हे नेमके निश्चित केले नसेल तर काय मिळणार? तर काहीच नाही.

जसे की,

पत्ता (Address) न लिहिलेले पत्र (Letter) कुठेच पोहोचत नाही.

कॅप्टन नसलेले जहाज समुद्राच्या लाटांमुळे एकतर बुडते किंवा एखाद्या हिमनगावर आदळून नष्ट होते. असेच काहीसे ध्येयहीन व्यक्तीचे होत असते.

माझे NLP (Neuro-Linguistic Programming) गुरु राम वर्मा सर नेहमी सांगतात की, तुम्हाला जीवनात काय हवे आहे ते जर नेमके माहीत असेल आणि ते जर खरंच मिळविण्याची तीव्र इच्छा असेल तर त्याचा कच्चा माल (Raw Material) या पृथ्वीवर अगोदरच उपलब्ध आहे. हा किती महत्त्वाचा संदेश आहे.

जसे की भाजी बनवायची असेल तर भाजीपाला उपलब्ध आहे.

या सृष्टीत हे सगळे उपलब्ध असूनही थोड्याच लोकांना त्याचा लाभ घेता येतोय, याचे खरे कारण जर कोणते असेल तर ते आहे ध्येयनिश्चिती किंवा आपल्या जीवनाकडून आपण केलेली नेमकी मागणी हे होय.

मग तुम्हीच सांगा? आपल्या जीवनातील विविध क्षेत्रात आज आपण जसे जीवन जगतोय ते पुरेसे आहे काय?

जसे की आपले…आरोग्य (Health), शिक्षण (Education), अर्थ (Finance), व्यवसाय / नोकरी (Business / Job), कुटुंब व नाते (Family and Relationship), सामाज (Social), अध्यात्म (Spirituality), इ.

या जीवनाच्या वरील सर्व क्षेत्रात आणखी चांगले आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर त्या क्षेत्रांमध्ये आपले ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्याची  प्रक्रिया आपल्याला माहित असणे महत्वाचे आहे की नाही? 

 

आज ध्येय निश्चित कसे करावे? यासंबंधी अनेक व्हिडिओ आणि पुस्तके इंटरनेटवर आणि बाजारात उपलब्ध आहेत. परंतु त्यांचा परिणाम आपल्यावर खूपकाळ टिकून राहत नाही, हे तुमच्या लक्ष्यात आलेच असेल, ते विडिओ बघून आणि ऐकूण तेव्हढ्यापुरते बरे वाटते परंतु काही काळानंतर आपण back to normal होत असतो. हे खरे आहे की नाही?

आज मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये आपले नेमके ध्येय कसे निश्चित करावे आणि ते कसे प्राप्त करावे? यातील पहिला नियम आणि प्रक्रिया तुमच्यासोबत शेअर करीत आहे. जी प्रक्रिया माझ्या गुरुंनी मला शिकवली आहे.

ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्याच्या प्रक्रियेचा फायदा मला माझ्या जीवनात वारंवार झाला आहे.

आजचा हा ब्लॉग विद्यार्थी, शिक्षक, पालक, नोकरी करणारे, व्यावसायिक, प्रशासक, ॲक्टर-एक्ट्रेस, खेळाडू, कलाकार, गृहिणी अशा सर्व लोकांसाठी नक्कीच उपयोगाचा ठरणार याची मला खात्री आहे.

ही ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्याची प्रक्रिया जर तुम्ही तुमच्या जीवनात लागू केली तर, तुम्हाला ज्या प्रकारचे जीवन जगावेसे वाटते तसे जीवन तुम्ही निर्माण करू शकाल, त्यामुळे हा ब्लॉग वाचत असताना तुम्ही एक खूप महत्त्वाचे काम करीत आहात असे आपल्या मनाला सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम सकारात्मकच होईल.

आपले ध्येय नेमके कसे निश्चित करून प्राप्त करावे? Would you like to learn that process and Steps?💡💡🔑🔑

१)  शेवटासह प्रारंभ (Start With The End):

 

यालाच, परिणामावर आधारित उद्दिष्ट असेही म्हणतात. (Result Based Goals)

आपल्या आसपास असलेले लोक नोकरी, व्यवसाय करताना ते आपल्या वाट्याला येईल ते काम फक्त करीत असतात, त्या कामातून आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे किंवा त्यातून कोणते उद्दिष्ट गाठायचे आहे याचा कधी ते विचारचही करीत नाहीत. आयुष्यभर हे असेच चालले तर मित्रांनो चांगले जीवन आपल्या वाट्याला कसे येणार?

हा पहिला नियम सांगतो की कोणत्याही कामाची सुरुवात करण्याआधी त्या कामातून अंतिम उद्दिष्ट कोणते साध्य करायचे आहे हे निश्चित करणे अत्यंत गरजेचे असते, त्यानंतर कामाला सुरुवात केली तर त्या कार्यात सफलता मिळते.

 

याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास, सुदृढ आरोग्यासाठी आपले वजन किती कमी किंवा किती जास्त वाढवायचे हे उद्दिष्ट ठेवून व्यायामाची सुरुवात केली तर ते उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल.

एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेत किती टक्के गुण किंवा ग्रेड मिळायला पाहिजेत हे निश्चित करून जर अभ्यासाला सुरुवात केली तर त्याच्या परीक्षेतील टक्केवारीचे उद्दिष्ट निश्चित साध्य होण्यास मदत होईल.

कोणतेही शिक्षण घेताना आपल्याला नेमके काय बनायचे आहे हे उद्दिष्ट निश्चित केले तर आपल्या करिअरचे उद्दिष्ट यातून साध्य  होईल.

एखादा व्यवसाय करताना त्या व्यवसायातून एका महिन्यात  किती उत्पन्न मिळायला पाहिजे हे निश्चित करून कामाला सुरुवात केली तर आपल्या आर्थिक उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल.

एखादी नोकरी करताना त्या कंपनीत, संस्था किंवा संघटनेत कोणत्या स्थानापर्यंत किंवा पदापर्यंत पोहचायचे ते अंतिम उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काम केले तर तिथे नक्की पोहचता येईल, जिथे जाण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

या सिद्धांताचा उपयोग मला माझ्या जीवनात खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे.

माझे ११ वी १२ वी चे शिक्षण झाल्यानंतर कला शाखेतील पुढील पदवीचे शिक्षण घेताना प्राध्यापक होण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यासाची सुरुवात केली. त्यामुळे आज पुण्यातील १७५ वर्षाचा इतिहास असलेली नामवंत संस्था, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे प्राध्यापक म्हणून काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. हे केवळ आणि केवळ साध्य झाले ते ध्येय निश्चिती आणि ध्येय प्राप्तीच्या सिद्धांताचे पालन केल्यामुळेच.

ध्येयप्राप्तीचा हा पहिला सिद्धांत किंवा नियम आपल्या जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही लागू करण्याचा प्रयत्न केला तरी तो तंतोतंत लागू पडेल, एवढा हा अचूक सिद्धांत आहे.

ध्येय निश्चिती आणि ध्येय प्राप्तीचा दुसरा सिद्धांत पुढील ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. तर चला मग पुढील ब्लॉग मध्ये भेटुया !!

आजच्या या ब्लॉग मध्ये तुम्हाला कोणत्या दोन गोष्ठी खास वाटल्या त्या नक्की कळवा, जेणेकरून मला आणखी लिहिण्यास प्रेरणा मिळेल.

तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏

 

 आणखी वाचा: जगात ५ ℅ लोकंच फक्त यशस्वी होतात याचे रहस्य काय आहे? What’s the secret that only five percent of people in the world succeed?

आणखी वाचा: यशस्वी जीवनसाठी विक्री कौशल्याचे काय महत्व आहे? What is the Importance of Selling Skill for Successful Life?

आणखी वाचा: माणूस आपल्या उपजत कौशल्य आणि कल्पनांवर काम का करत नाही? Why are people not working on our talent and ideas?

आणखी वाचा: आपला शोध आपणच घेतला तर जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. No one can stop you from succeeding in life if you do your own research.

आणखी वाचा: जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवावे? How to get what you want in life?

आणखी वाचा: जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे? How to live life as a warrior?

 

 

This is for your Personal Growth, Please visit My Website https://www.lifeshodh.com

Spread the love

19 thoughts on “आपले ध्येय नेमके कसे प्राप्त करावे?”

 1. सर तुमचे विचार positive आहेत top चे आहेत यात काही वाद नाही 🙌. उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन कार्य करणे हे तुम्ही तुमच्या गुरूंकडून शिकलात आणि आता आम्ही तुमच्याकडून शिकत आहोत😊जीवनात काय हवे आहे ते जर नेमके माहीत असेल आणि ते जर खरंच मिळविण्याची तीव्र इच्छा असेल तर त्याचा कच्चा माल (Raw Material) या पृथ्वीवर अगोदरच उपलब्ध आहे. हा किती महत्त्वाचा संदेश आहे. हे आज आमच्या लक्षात आले आहे. Success आपल्याला फक्त ध्येय निश्चिती आणि ध्येय प्राप्तीच्या सिद्धांताचे पालन केल्यामुळेच मिळते .आणि आम्हीही या सिद्धांताचे पालन करू . मुळात ही ब्लॉग ची संकल्पना खूप छान आहे . खूप खूप धन्यवाद सर आमच्या ज्ञानात , विचारात भर टाकण्यासाठी😊🙏

  Reply
 2. ह्या ब्लॉग मधील ‘ Result based goals ‘ ही consept खूपच unique आहे.कारण बरंच दा आपण फक्त ध्येय ठरवतो पण ते प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेले कठोर परिश्रम घायला तयार नसतो.पण ज्या वेळी आपण ध्येय प्राप्ती साठी निश्चित वेळ आणि उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून प्रयत्न करतो तेव्हा ते ध्येय नक्कीच पूर्ण होते.
  Thank you sir , तुमच्या लेखानातून आम्हाला असेच motivate करत रहा.😊

  Reply
 3. सर नमस्कार
  वरील ध्येय निश्चिती आणि ध्येय प्राप्ती हा ब्लॉग मी काळजीपूर्वक वाचला
  मी या ब्लॉग मधून दोन गोष्टी शिकलो
  मला आधी वाटायचं मला यशस्वी व्हायचे
  पण हा ब्लॉग वाचल्यानंतर मला समजला आहे फक्त यशस्वी होण्याचा उपयोग नाही
  आपल्याला कशा मधून यशस्वी व्हायचं आहे हे आधी आपल्या लक्षात आलं पाहिजे
  जसे की वरील गोष्टीमध्ये त्या बघता सोबत घडलं त्याला लॉटरी तर हवीये पण किती हजाराची किमान किती लाखाची लॉटरी हवी त्याला माहीत नाही
  आणि दुसरी गोष्ट म्हणजे

  आपल्या नॉर्मल विचारापेक्षा कधी कधी आपण out of the way जाऊन विचार करायला हवा कारण नॉर्मल विचार हे सगळेच करत असतात पण नॉर्मल पेक्षाही वेगळा विचार आपण करावयास हवा

  Reply
 4. Thank u sir for this blog,really atachya ya fast chalnarya jagat,lok fakt dikhava kartat,ki te kiti mothi job kartat,tyanchi income khup changli ahe,but te aatun sukhi nastat,tyanna nemak mahit ch nast ki tyana karych kay hot,aani kahi jhan fakt mothi swapn baghtat ti purn kashi karychi yach te v4 kart nahi,va kadhi plane pn karit nahi,nuste mothi swapn baghun kahi hot nahi tr..tyanna reality madhe kase anyla pahije he,me aaj ya blog madhun shikle.🙏🙏

  Reply
 5. *आम्हाला पाहिजे तर खूप काही ‌, परंतु नेमकं काय पाहिजे हेच माहित नाही *
  हेच आमचं चुकत .. ध्येय निश्चित करण्याचा नियम सांगतो … शेवटासह प्रारंभ… म्हणजे अंतिम उद्दिष्ट साध्य करायचे निश्चित करुन कामाला सुरुवात करणे…पण … ध्येय निश्चित करुन प्राप्त.. करण्याची प्रक्रिया आम्हाला नेमकी माहीत नसते… तुम्ही या ब्लॉग मध्ये सांगितल्या प्रमाणे .. यापुढे… आम्ही या नियमाचे पालन करू… यामुळे आम्हालाही ठरविता येईल कि आम्हाला काय करायचे आणि कश्या पद्धतीने करायचे…

  Reply
 6. ध्येय*
  मला मोठेपणी अमुक-अमुक बनायचे आहे. मला हे बनून हे-हे काम करायचे आहे…. बास् ! झालं. एवढं बोलून आपण आपले विशिष्ट प्रकारचे ध्येय , उद्दीष्ट ठरवतो. पण खरंच ;जीवनात आपण काहीतरी बनून दाखवले म्हणजे आपली जबाबदारी संपली काय? मला मोठेपणी न्यायाधीश व्हायचे आहे, आणि मी झालो. माझे ध्येय तर साध्य झाले. मग आता पुढे काय? बस् मला न्यायाधीश बनायचे होते आणि ते मी बनलो, मग….मग आता काय नुसते बसून रहायचे का? समाजहित साधणे, अन्यायाच्या विरोधात निकाल देणे हे माझे काम नाही का? वरील उदाहरणावरुन तुमच्या लक्षात आले असेल की ध्येयपूर्ती म्हणजे, आपण अमुक-अमुक बनायचे ठरविले ; ते बनलो. असे तेवढ्यापुरताच मर्यादित नसून, ते बनल्यानंतरचा आपला पुढचा प्रवास हा खरा आपल्या ध्येयपूर्तीकडे घेऊन जाणारा असतो.

  मला एक प्रश्न नेहमीच पडतो , ध्येय म्हटले की काहीतरी बनून दाखवणे, भरपूर यश संपादन करणे, पैसे मिळवणे ह्याच दृष्टीकोनातून आपण विचार का करतो? डोळ्यासमोर भाजी विक्रेता आणा. आता मला सांगा भाजी विक्रेत्याचे ध्येय काय असू शकेल? अगदी बरोबर ओळखंलत. त्या भाजी विक्रेत्याचे ध्येय हे त्याने विकायला आणलेली भाजी त्या दिवसात संपूर्ण विकली जावी हेच असणार दुसरे काय असू शकेल? जर त्या भाजी विक्रेत्याची भाजी संपूर्ण विकली नाही गेली, तर आपण त्याला अपयशी म्हणू शकू का? तर, मुळीच नाही. पण जर, तो भाजी संपूर्ण विकण्यात यशस्वी झाला तर, असे आपल्याला नक्कीच म्हणता येईल की तो भाजी विक्रेता त्याचे ध्येय गाठण्यात यशस्वी झाला.

  एखादा फलंदाज फलंदाजी करण्यास मैदावर उतरल्यावर त्याचे ध्येय हे; माझ्या पुढच्या संपूर्ण कारकीर्दीत मी शतकांचे शतक कसे करेल हे नसून मी “आज” कसा चांगला खेळू म्हणजे शतक होईल हे असते(किंबहूना हेच असायला हवे) सांगायचे एवढेच आहे की तुम्हांला समाधानी-आनंदी रहायचे असेल तर, अगदी तुमचा दिवस सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत रोज एकाच दिवसाचं वेगवेगळं ध्येय ठरवा.(दुसर्‍या दिवशी दुसरं असायला हवं.) अगदी माझं स्वतःचं कालचंच उदाहरण देतो. काल रात्री मला माझ्या मैत्रिणीने एका सुंदर, सुमधुर असं गाणं पाठवलं होतं. मी ते गाणं ऐकलं. मला अतिशय भावलं, मग मी ते पुन्हा लगेच ऐकायचं ठरवलं. पण दुर्दैवाने माझा त्या दिवसाचा भ्रमणध्वनी डाटा जवळजवळ संपलाच होता. माझी बेचैनी वाढली, पुन्हा एकदा ते गाणं ऐकल्या शिवाय मला झोपच लागणार नव्हती. मग मी माझ्या आईच्या भ्रमणध्वनीवर ते गाणं ऐकलं…..आणि काय सांगू मित्रहो, मी एवढा समाधानी झालो, आनंदित झालो. आता यावरुन आपल्याला असं नक्कीच म्हणता येईल की मी माझं ध्येय गाठण्यात यशस्वी झालो. तुम्हीही हा प्रयोग करुन बघा(एक दिवस-एक ध्येय) आणि ते जर तुम्ही साध्य करण्यात यशस्वी झालात तर समजायचं तुम्ही प्रत्यक्ष ठरवलेल्या ध्येयाकडे तुमची वाटचाल योग्य रितीने व योग्य गतीने करत आहात.
  लावो त्झु ने म्हटलंच आहे ना — “हजारो मैलांचा प्रवास हा, एका छोट्या पावलाने सुरु होतो.”

  यासाठी तुम्हांला एक उपाय सांगतो, रोज रात्री झोपण्याच्या आधी एका कागदावर उद्याला करायची कामं एकाखाली एक लिहून घ्या. त्या प्रत्येक कामाचा प्राधान्य क्रम ठरवा आणि त्यानुसार दुसर्‍या दिवशी ती ठरवलेली प्रत्येक कामं एखादं ध्येय समजूनच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.(सगळीच पूर्ण होणार नाहीत.) आणि तो दिवस संपला की पुढच्या दिवशीचे ध्येयं लिहिण्याआधी, आजच्या दिवसातले ठरविलेले किती ध्येय साध्य करु शकलो? हे बघा. सुरुवाती सुरुवातीला असे लक्षात येईल ,अरेरे! आपण दहा ध्येय ठरविले होते पण त्यातले फक्त दोनच व्यवस्थित पूर्ण करु शकलो. मग आता ठरवतानाच तुम्ही दोनच ध्येये ठरवा. आता दुसर्‍या दिवशी लक्षात येईल की अरे व्वा! आपले दोन्ही ध्येये आज पूर्णपणे व्यवस्थितरित्या आपण पार पडले. आता स्वतःला एक शाबासकी द्या. असं काही दिवस करा, मग काही दिवसानंतर दोनाचे चार, चाराचे आठ…. असं करत करत एका दिवसाचं, मग एका आठवड्याचं, मग एका महिन्याचं, एका वर्षाचं…..असं ध्येय ठरवत ठरवतच पुढे जात रहा…. वर्षाच्या शेवटी तुम्हांला असं लक्षात येईल की तुम्ही ध्येयवादी बनले आहात. कारण, तुम्ही आतापर्यंत ठरवत आलेली छोटी-छोटी ध्येये पूर्ण झालेली आहेत. हा प्रयोग केल्यामुळे आता तुम्ही आत्मविश्वासू झालेले आहात, आनंदी-समाधानी झालेले आहात. तसेच तुमच्या मनात आता मोठी मोठी ध्येय बघण्याची व ती पूर्ण करण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.

  धन्यवाद!!!🙏🙏

  Reply
 7. आपल्या आयुष्यात आपले ध्येय ठरवणे खूप महत्त्वाचे आहे.
  आपल्या लहानपणीची ती एक गोष्ट आताही सर्वांच्या लक्षात नक्किच असेल.ती म्हणजे ससा आणि कासवची गोष्ट!ज्यामध्ये ससा आणि कासवाची शर्यत लागते.आणि ससा त्याच्या गतीने दूर जावून पोहचतो.मागे वळून बघतो तर त्याला कासव दिसत देखील नाही.तो तिथ असलेल्या झाडाच्या सावलीत विश्रांती करायचं ठरवतो.मग काय त्याच्या मुळे तो ती शर्यत हरतो.आता इथे प्रश्न असा पडतो की ससा का हरला?त्याच्याकडे कासवाच्या तुलनेत सर्व काही जास्तच होतो.पण ध्येय प्राप्तीची तीव्र इच्छा नव्हती.
  आजकालची मुलं अशीच आहेत.म्हणजे आपल्याकडे सातत्य आहे,वेग आहे पण ध्येयाची कमतरता.खूपदा तर दुसर्याच्या नजरेतून आपले ध्येय ठरले जाते.
  आयुष्यात नेमकं काय करायचं आहे?ते लक्ष्य आणि लक्ष्य कसे साधायचे?म्हणजे ध्येय!शिखर जरुर आहे पण ते गाठायचे आहे,हे ध्येय उराशी बाळगायला हवे.एखाद्या शिखराला गाठायचे म्हणजे त्या पर्वताचा शिखर हे आपलं लक्ष्य असलं पाहिजे.ह्या गोष्टीवर लक्ष्य केंद्रित करण्याचा प्रयत्न केल्यास आपला subconscios mind आपल्याला विविध कल्पना सुचवू लागतो.त्या शिखरावर तळ ठोकण्यचे पूर्ण नियोजन करू लागतो.
  मन झोपेत अथवा स्वप्नात देखील त्या कल्पनांनी भरुन जाते.
  कधी कधी ध्येयाची वाट डिवचणारया लोकांनी भरलेली असते.मग नकारात्मक विचार मनात सुरु होतात आणि स्वत:च्या क्षमतेवर आपण शंका घेऊ लागतो.
  ह्यावर उपाय म्हणजे त्या वाटेत चालण्यावर लक्ष दया.ते म्हटलेले आहे ना,Stand tall in narrow minded people .पुस्तकं वाचण्यास सुरुवात करा.त्यामुळे हुशार लोकांसोबत संभाषणावेळी शब्द सुचतात.हेच हुशार लोक मार्गदर्शन करण्यास तत्पर असतात.learn from the mistakes of others and yours.
  मार्ग सोयीस्कर करण्याचे हेच ते उपाय.जेव्हा आपण आपले ध्येय पूर्ण करू तेव्हा मागे वळून पाहताना आपल्या मार्गात आलेले अडथळे आपल्याला दिसतील.त्यात आपण कसे उभे राहिलो ते दिसेल.
  Sir,ध्येय प्राफ्तीचा हा पहिला सिद्दांत तुम्ही खूप छान समजवून सांगितला आहे.
  Thank you sir!

  Reply
 8. जीवन जगत असताना त्यामध्ये काहीतरी अर्थपूर्ण असायला पाहिजे तरच त्या जीवनाला अर्थ आणि अर्थ ही जीवन हे एखाद्या फळ नसलेल्या झाडासारखा असतं. त्या झाडाला कोणीही किंमत देत नाही उलट दोन चार टोमणे मारत असतात. जीवनाला जर अर्थ आणायचा असेल जीवन अर्थपूर्ण बनवायचा असेल तर ध्येयनिश्चिती हे अत्यंत गरजेचे आहे. ध्येयाविना जीवन हे वांज असतं. मग हे ध्येय ठरवायचं कसं हा प्रश्न पडलेला असतो . या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना मला हा ब्लॉग खूपच सोयीस्कर वाटतो. ठरवत असताना ते नेमकं कसं ठरवायचं आणि त्यातून काय साध्य होईल हे या ब्लॉग मधून कळलेले आहे. एखादे ध्येय निश्चित करत असताना त्यामधून आपल्याला नेमकं काय मिळवायचा आहे हे माहिती असणार खूप गरजेचे आहे. समजा आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि ते ठिकाणच आपल्याला माहिती नाहीये मग त्या ठिकाणाला जाण्यास अर्थ आहे का? अगदी त्याच पद्धतीने ध्येय ठरवत असताना त्या ध्येयातून आपल्याला काय मिळणार आहे किंवा आपण काय मिळू शकणार आहे त्यातून या गोष्टीचा विचार करून ध्येयनिश्चिती केल्या ते ध्येय साध्य होण्यास विलंब लागणार नाही. मग ते ध्येय आरोग्य (Health), शिक्षण (Education), अर्थ (Finance), व्यवसाय / नोकरी (Business / Job), कुटुंब व नाते (Family and Relationship), सामाज (Social), अध्यात्म (Spirituality), इ. यापैकी की कुठल्याही क्षेत्रातला असू द्या. सरांनी सदरील ब्लॉग मधून जो सिद्धांत सांगितला त्या सिद्धांतानुसार जर ध्येयनिश्चिती चा मार्ग ठरवला तर ते ध्येय गाठण्याचा अंतर आपल्यासाठी खूप कमी होईल त्याच बरोबर त्या मार्गामध्ये असणारे अडथळे दूर होऊन तो मार्ग आपल्यासाठी पूर्णपणे मोकळा होईल. सर Heartily thanks तुम्ही हा अतिमहत्त्वाचा नियम आमच्यासोबत शेअर केला त्या सिद्धांताचा फायदा आम्हाला प्रचंड प्रमाणात होणार आहे त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.

  Reply
 9. नमस्कार सर,
  या ब्लॉग मध्ये आपले नेमके ध्येय कसे निश्चित करावे ?आणि ते प्राप्त कसे करावे ? याबद्दल विचार मांडलेले आहेत.
  जीवन जगत असताना काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जगणे म्हणजे जीवन होय, आणि असेच जीवन जगायला मजा येते. तर हे उद्दिष्ट आपण कसे साध्य करायचे त्यासाठी सरांनी आपल्याला एक सिद्धांत सांगितला आहे तो ध्येय प्राप्तीचा पहिला सिद्धांत…
  1) शेवटचासह प्रारंभ (Start with the end). म्हणजे कोणतेही कार्य करण्याच्या आधी त्या कामातून आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे? त्याचे उद्दिष्ट काय असेल? यावर विचार करायला पाहिजे. म्हणजेच आपला outcome क्लियर असायला पाहिजे. जीवनात आपल्याला काय करायचे आहे हे clear माहीत असेल तर आपलं mind आणि आपल्या आसपासचं वातावरण आपल्या favor मध्ये काम करायला लागते. ध्येयप्राप्तीचा हा सिद्धांत यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.यश म्हणजे ध्येय, बाकी सगळी नुसती वायफळ बडबड’.जीवनात ध्येय निश्चित नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. त्यासाठी जीवनात ध्येय निश्चित करायला पाहिजे. आणि ध्येयप्राप्तीचे जे सिद्धांत आहेत ते follow करायला पाहिजेत.
  Thank you Sir😊

  Reply
 10. Thank u soo much sir for this blog ya blog mude goal set karun te purn ks karych he mla samjhl apan v4 tr karto ki ,as karych ts karych but te sadhya karysathi apan action mode madhe yet nahi,aani apan je pn kam karto te kam karnyach apla intention kay he aplyala mahit sudha nast.ani aplyala kontahi kam kartanna kivha aim purn karnyasathi reasion chi garaj aste ek da aplyala reasion midal ki,apla aim purn karylaa madat midte,aani te nakki hote nust karych mhanun kel tr te kadhich purn hot nahi,thank u sir🙏

  Reply
 11. ह्या ब्लॉग मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. आयुष्यात कोणतेही ध्येय नसलेला व्यक्ती हा समाजासाठी आणि स्वतः साठी देखील निरुपयोगी आहे. आणि जो व्यक्ती फक्त ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करत नसेल त्यांची अवस्था त्या भक्ता सारखी आहे . ज्याला हे माहीत आहे की आपल्याला लॉटरी लागली पाहिजे पण त्यासाठी ना त्यांने लॉटरीचे तिकीट विकत घेतले ना किती रुपयांची लॉटरी लागली पाहिजे हे निश्चित केले.
  जर आपल्या आयुष्यात कोणतेही ध्येय नसेल तर आपण नको त्या दिशेने वाटचाल करतो आणि आपल्या कडे असलेल्या क्षमता वाया घालवतो.
  A man without ambition like a bird flying without directions.
  1. शेवटासह प्रारंभ (Start With The End):
  आपण ध्येय निश्चित केल्यानंतर ध्येयपूर्तीच्या शेवटी आपल्याला कोणता टप्पा गाठायचा हे ठरवले पाहिजे. जर आपण कोणतेही कार्य करत असू त्यावेळी त्यांच्या outcome वर आपला focus असणे गरजेचे असते. आणि जर हे ठरले नसेल तर आपण पूर्ण क्षमतेने कार्य करण्यासाठी मेहनत करणार नाही.
  धन्यवाद सर यशस्वी होण्यासाठीचा शेवटासह प्रारंभ (Start With The End) हा नियम share केल्याबद्दल.

  Reply
 12. सर मी आज या ब्लॉग मधून हे शिकले की आपले ध्येय नेमके कसे निश्चित करावे आणि ते प्राप्त कसे करावे तुम्ही सांगितलेला पहिला नियम सांगतो की कोणत्याही कामाची सुरुवात करण्याआधी त्या कामातून अंतीम उद्दिष्ट कोणते साध्य करायचे आहे हे निश्चित करने अत्यंत महत्वाचे आहे त्यानंतर कामाला सुरुवात केली तर त्या कार्यात सफलता मिळते
  तुम्ही सांगितलेल्या त्या शिवभक्ताची गोष्ट त्याला लॉटरी पाहिजे होती पण नेमकी किती लाखाची, किती करोडची हेच माहीत नव्हत
  तसच आज माझही आहे मला यशस्वी होयच आहे ध्येय पूर्ण करायचे आहे पण त्याची अंतीम उद्दिष्ट काय असेल हेच मला माहिती नसेल तर मी त्या ध्येया पर्यंत पोहचणारच नाही ना म्हणून मी माज्या ध्येयाची अंतीम उद्दिष्ट काय असेल हे मी जाणून घेईल आणि त्यानंतरच त्या कामाला मी सुरुवात करेल त्यामुळे मला माज्या कार्यात सफलता मिळेल आणि मी माझी ध्येय प्राप्त करु शकेल
  Thank you sir

  Reply
 13. वरील blog मध्ये सरांनी आपले ध्येय कसे निश्चित करावे?
  आणि ते कसे प्राप्त करावे?
  याबद्दल अतिशय सुंदर पद्धतीने विचार मांडले आहेत!
  ध्येयाविना आयुष्य म्हणजे?
  एखाद्या अशा प्रवासी सारखे आयुष्य ज्याला माहितीच नाही कि ज्या bus /train /plane मध्ये तो बसला आहे ते exactly कुठे चालले आहे ?आणि तरीही तो बसलाय !
  जर आपल्याला आपली स्थिती अशी होऊ नये वाटत असेल तर आपल्या आयुष्यात सुद्धा आपले काही उद्दिष्टे /ध्येय असणे आवश्यक आहे तरच ते आयुष्य जगण्यात खरी मजा आहे !
  आणि फक्त मोठ मोठे ध्येय /स्वप्ने बघून चालत नाही तर ती
  सत्यात उतरवण्यासाठी सुद्धा न थकता, न हार मानता प्रयत्न करणेही तेवढेच आवश्यक आहे!
  (Reminder : Action results from commitment. Your dream will become a reality as soon as you take action.)
  I think there’s only one difference between Dream and Aim :
  Dream requires effortless sleep
  And
  AIM requires sleepless efforts.
  आणि ज्या लोकांच्या स्वप्नांमध्ये/ध्येयांमध्ये बळ नसते ते लोक नेहमी excuse’s देत असतात आणि फक्त बोलत राहतात मी हे करेन ते करेन पण त्यांच्या च्याने काहीच होत नाही आणि असे people समाजा साठी सुद्धा खूपच हानीकारक असतात कारण ते स्वतः सुद्धा प्रयन्त करत नाहीत आणि दुसऱ्यांना सुद्धा demotivate करत राहतात, तुझ्या च्याने हे होणे शक्य च नाही, तू हे सोडून दे, negative thinking पसरवत राहतात
  पण आपण आपले निश्चित केलेले ध्येय कधीच विसरायचे नाही कोणी काही ही बोलले तरीही कारण या जगात अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी आपण करूच शकत नाही
  यावरुन मला माझ्या लहानपणी चा किस्सा आठवतो ,
  मी First standard मध्ये असताना आम्हाला आमच्या Teacher’s नी संपूर्ण बाराखडी मुळाक्षरे पाठ करून यायला सांगितले होते, आणि नंतर ते शाळेत आल्या नंतर सर्वांची उजळणी घेणार होते Inshort त्यावर oral होती सर्वांसमोर म्हणून दाखवायचे होते,
  माझे जवळ जवळ सर्वच पाठ झाले होते परंतु माझी गाडी फक्त आणि फक्त ज्ञ ,क्ष यावर अडकली होती कारण मला हे correctly उच्चारताच येत नव्हते, मी याचे pronounciation काहीतरी वेगळच करत होते आणि म्हणून मी खूपच अस्वस्थ होते, मला काय करु तेच सुचत नव्हते आणि मी रडायलाच लागले आणि रडत रडत Mummy ला सांगू लागले की मी उद्या अजिबात शाळेत जाणार नाही, माझ्या च्याने क्ष, ज्ञ सुद्धा नीट म्हणवत नाहीय, मी oral मध्ये नापास होईन, (गुंड सर जे आमचे classteacher होते ते खूपच strict होते) सर मला punish करतील वगैरे वगैरे, जवळ जवळ मी Mummy ला full convience करतच होते तेव्हा मला माझ्या Mummy ने एकच गोष्ट सांगितली होती ती अजूनही माझ्या लक्षात आहे आणि मी ती follow सुद्धा करते ती म्हणजे,:
  “बेटा life मध्ये पुढे जाऊन तू जे काही करशील पण जर ती गोष्ट करताना जर तू फक्त तुझे ध्येय पूर्ण करण्याच्या last step वर असशील आणि नंतर success by default तुझेच असेल पण तेव्हा जर तू असचं give up करुन रडत बसलीस तर ते मला अजिबात आवडणार नाही कारण त्यामुळे त्या last step पर्यंत पोहोचण्या अगोदरच्या किती तरी steps ज्या तू मेहनत करुन वर चढलीयस त्या वाया व्यर्थ जातील आणि तू स्वतः चा आत्मविश्वास सुद्धा गमावून बसशील त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अभ्यास काय तुझ्या अगोदर जन्माला आलेला नाहीय (म्हणजे तीला असं म्हणायच होत कि जेव्हा मानवाची उत्क्रांती झाली त्यानंतरच म्हणजे तो मानवानेच निर्माण केलेला आहे) त्यामुळे तू न घाबरता , without any fear, panic न होता तू ती last step complete कर, तू ते करु शकतेस, आणि मी नंतर त्याला सतत revise, pronounciate केल्यानंतर ते मला जमलं
  खर तर आपण एखादी गोष्ट ठरवली आणि त्या दिशेने कृती केली तर आपण त्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होतो
  फक्त आपण कधी कधी स्वतः ला underestimate करतो, highper होतो, negative बोलणार्‍या लोकांचा जास्त विचार करतो आणि त्यामुळे आपण give up करायचा निर्णय घेतो
  Some people will also discourage you &
  say you know what are you sure you want to do this? Are you sure you want to wait? You can’t do it !
  You know why don’t you try something else? Or do something else?
  At that time just remember one thing
  “when everything seems to be going against you, remember the airplane takes off against the wind, not with it! ” – by Henry Ford
  So don’t give up
  पण आपण तसे काही ही न करता मी एवढच म्हणेन की,
  Dream big, don’t give a break
  Keep working hard,
  It’s okay if someone is laughing at you ,
  It’s okay if someone is pulling your leg, pulling you back down, it’s okay!
  You just keep going, you just keep looking up at the sky & reach your goals …
  No matter what anyone else says.
  And
  STOP complaining you have NO TIME
  168 hrs per Week
  40 hrs at Work
  7 hrs at the GYM, for Relaxing /Entertainment
  56 hrs for Sleeping
  65 hrs Left,
  So don’t give excuse’s
  Act Today
  Use your time WISELY ..!!!
  In upcoming Months
  You’ll have upcoming Months of EXCUSES,
  OR
  Upcoming Months of PROGRESS !
  The Choice is YOURS.

  If it’s Still in your MIND
  It’s WORTH taking the RISK..!
  💯👍☺

  I think after reading this above blog everyone will know How to set your goal and achieve it?
  Keep writing this type of blogs and keep motivating students Sir ☺

  Reply
 14. Vision without action is daydream. Action without vision is nightmare!..
  प्रत्येकाची स्वप्ने असतात. मग ते मोठे असोत की लहान, आपल्या आयुष्यात त्यांचे खूप महत्त्व आहे. या ध्येयांची उपलब्धता थेट आपल्या आनंद आणि कल्याणाशी संबंधित आहे आणि आत्मविश्वास वाढवण्याचा हा एक मार्ग आहे.
  आपल्याला काय हवे आहे ते ठरवा. पहिली पायरी म्हणजे आपण काय साध्य करू इच्छिता हे निर्धारित करणे. हा एक मोठा बदल किंवा एखादी छोटी गोष्ट असू शकते, परंतु आपण काय मिळवण्याची आशा करतो यावर विचार करण्यात वेळ घालवणे ही यशाची महत्त्वाची पहिली पायरी आहे.
  उदाहरणार्थ, सुखी व्यक्ती होण्यासाठी आपले ध्येय आहे काय? वाद्य वाजवणे जाणून घ्या? एखाद्या विशिष्ट खेळामध्ये चांगले व्हायचे? निरोगी राहा? ही सर्व उद्दिष्टे वैध आहेत, आपल्याला काय पाहिजे हे ठरविणे आपल्यावर अवलंबून आहे.
  वॉल्ट डिस्नेनं आयुष्यभर डिस्नेलॅंडचं स्वप्न आपल्या उराशी जपलं होतं, तेव्हा त्याचा ड्रिमप्रोजेक्ट ‘डिस्नेवर्ल्ड’ पुर्ण होत आला होता, तो डोळे भरुन बघण्यासाठी, दुर्दैवाने वॉल्ट डिस्ने हजर नव्हता, १९६६ मध्ये वॉल्ट डिस्नेचं निधन झालं,
  त्याच्या स्मरणार्थ पहिल्यावाहिल्या भव्य डिस्नेलॅंडच्या उदघाटनाच्या दिवशी स्टेजवर फक्त एक रिकामी खुर्ची ठेवण्यात आली होती.
  मग त्याचा उत्तराधिकारी मायकेल आईसनर स्टेजवर येऊन म्हणाला की, जाता जाता वॉल्ट डिस्नेने लोकांचं मनोरंजन करण्यासाठी, ही अनोखी भेट जगाला दिली आहे आणि तो अनंताच्या प्रवासाला गेला आहे.
  ही होती फक्त एका माणसाच्या स्वप्नांची शक्ती, आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर त्याने सर्व जगाला आकर्षित करणारी कंपनी उभी केली.
  आपल्या प्रत्येकाच्या मेंदुमध्ये अठरा महापद्म पेशींची एक आदर्श कार्यक्षम यंत्रणा सुसज्ज असते.
  आपल्या मनाचा वापर करण्यासाठी आपल्याला कुठे जायचे आहे, काय साधायचे आहे, हे फक्त त्या यंत्रणेला सांगावे लागते.
  आतापर्यंत तुम्हाला जे जे काही मिळाले आहे, ते तुमच्या बुद्धीने तुम्हाला प्राप्त करुन दिले आहे.
  मनाचे दोन भाग असतात, सुप्त मन आणि जागृत मन!
  चेतन मन ठरवते, ‘काय हवे’? आणि अचेतन मन ठरवते ‘ते कसे मिळवावे’? “उत्तम विचार उत्तम परिणामांना आकर्षित करतात. सामान्य विचार सामान्य परिणामांना आकर्षित करतात.” तुम्ही ज्याची अपेक्षा करता, ते तुम्हाला मिळते. फक्त प्रश्ण एवढाच आहे की, ‘तुम्हाला काय हवे?’ आणि ‘तुम्ही स्वतःकडून काय अपेक्षा करता?’
  आपल्याला नेमके काय हवे आहे, ते नेहमी आपल्या जागृत मनाला सतत सांगत राहा. सुप्त मन आपल्या ध्येयाचे आपल्याला विस्मरण घडवु शकते.
  म्हणुन निश्चित केलेले ध्येय, स्पष्ट शब्दांत लिहुन सतत डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक असते. सुप्त मनाला सतत संदेश दिला जातो.
  ध्येय लिहुन काढल्याने संपुर्ण मन ध्येयाप्रति वचनबद्ध होते.
  “एखादे ध्येय लवकर पुर्ण होईल, एखादे ध्येय उशीरा! पण हवे ते मिळेलच!”
  कोंबडीच्या अंड्यातुन पिल्लु बाहेर यायला एकवीस दिवस लागतात, मानवी गर्भाला नऊ महिने आणि हत्तीच्या पिल्लाला जन्म घ्यायला तब्बल दोन वर्ष लागतात.
  उद्दिष्ट्ये अशीच असतात, काही लवकर साध्य होतात, काही उशीरा!
  आयुष्यातलं सर्वात मोठ्ठं दुःख, म्हणजे आपल्या वडीलांच्या निधनाचा धक्का, हे दुःख पचवुनही, लगेच दुसर्‍या दिवशी, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या पीचवर जबरद्स्त परफॉर्म करु शकले, कारण त्यांचे ध्येय त्यांना उर्जा देत होते! नाहीतर साधारण माणुस कधीच कोलमडला, कोसळला असता.
  ध्येयामध्ये असाधारण ताकत असते, आपल्याकडुन अशक्य गोष्टी पुर्ण करवुन घेण्याची सुद्धा!
  जीवनाचे उद्दीष्ट्य माहित झाल्याने तुमचे जीवन जास्त अर्थपुर्ण होईल.
  ज्याच्याकडे सुस्पष्ट उद्दिष्ट असते, त्याच्याकडे नकारात्मकतेसाठी वेळ नसतो.
  Thank you,Sir!

  Reply
 15. ध्येय कसे निश्चित करावे आणि ते कसे प्राप्त करावे हे एकदम कमी शब्दात खूप चांगल्या पद्धतीने आमच्या पर्यंत पोचवले.
  जीवनात यशस्वी होण्यासाठी आदी आपल्याला काय हवं आहे ते ठरवलं पाहिजे आणि ते मिळवण्यावर लक्ष केंद्रित करावे.जर आपल्याला जीवनात काय पाहिजे आहे तेच जर माहीत नसेल तर आपण जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.ध्येय नसेल तर जीवनाला काहीच अर्थ रहाणार नाही.जर ध्येय असेल तर आपण योग्य मार्गाने तिथपर्यंत जाऊ शकतो.
  जीवनामध्ये नेमक काय हवं आहे आणि ते मिळवण्याची तीव्र इच्छा असेल तर त्याचा कच्चा माल या पृथ्वीवर उबलब्ध आहे.आपल येकदा ध्येय ठरलं की तिथपर्यंत फोचण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होतात आणि आपण प्रामाणिक पने प्रयत्न केले की आपण जीवनात यशस्वी होतो.life च्या प्रतेक area मध्ये (आरोग्य,शिक्षण) devlopment करण्यासाठी आपण ध्येय निश्चित केलं पाहिजे.
  ध्येय प्राप्तीचा पहिला सिद्धांत पुढीलप्रमाणे-
  1. start with the end-
  कामाची सुरुवात करण्याआधी त्या कामातून अंतिम उद्दिष्ट कोणते साध्य करायचे आहे हे निश्चित करणे अत्यंत गरजेचे असते, त्यानंतर कामाला सुरुवात केली तर त्या कार्यात सफलता मिळते.
  म्हणजे कोणतेही कार्य करण्याच्या आधी त्या कामातून आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे? त्याचे उद्दिष्ट काय असेल? यावर विचार करायला पाहिजे. म्हणजेच आपला outcome क्लियर असायला पाहिजे. जीवनात आपल्याला काय करायचे आहे हे clear माहीत असेल तर आपलं mind आणि आपल्या आसपासचं वातावरण आपल्या favor मध्ये काम करायला लागते. ध्येयप्राप्तीचा हा सिद्धांत यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
  Thank you sir 🙏🙏

  Reply
 16. आपल्या आयुष्यात आपले ध्येय ठरवणे खूप महत्त्वाचे आहे.
  आपल्या लहानपणीची ती एक गोष्ट आताही सर्वांच्या लक्षात नक्किच असेल.ती म्हणजे ससा आणि कासवची गोष्ट!ज्यामध्ये ससा आणि कासवाची शर्यत लागते.आणि ससा त्याच्या गतीने दूर जावून पोहचतो.मागे वळून बघतो तर त्याला कासव दिसत देखील नाही.तो तिथ असलेल्या झाडाच्या सावलीत विश्रांती करायचं ठरवतो.मग काय त्याच्या मुळे तो ती शर्यत हरतो.आता इथे प्रश्न असा पडतो की ससा का हरला?त्याच्याकडे कासवाच्या तुलनेत सर्व काही जास्तच होतो.पण ध्येय प्राप्तीची तीव्र इच्छा नव्हती.
  आजकालची मुलं अशीच आहेत.म्हणजे आपल्याकडे सातत्य आहे,वेग आहे पण ध्येयाची कमतरता.खूपदा तर दुसर्याच्या नजरेतून आपले ध्येय ठरले जाते.
  आयुष्यात नेमकं काय करायचं आहे?ते लक्ष्य आणि लक्ष्य कसे साधायचे?म्हणजे ध्येय!शिखर जरुर आहे पण ते गाठायचे आहे,हे ध्येय उराशी बाळगायला हवे.एखाद्या शिखराला गाठायचे म्हणजे त्या पर्वताचा शिखर हे आपलं लक्ष्य असलं पाहिजे.ह्या गोष्टीवर लक्ष्य केंद्रित करण्याचा प्रयत्न केल्यास आपला subconscios mind आपल्याला विविध कल्पना सुचवू लागतो.त्या शिखरावर तळ ठोकण्यचे पूर्ण नियोजन करू लागतो.
  मन झोपेत अथवा स्वप्नात देखील त्या कल्पनांनी भरुन जाते.
  कधी कधी ध्येयाची वाट डिवचणारया लोकांनी भरलेली असते.मग नकारात्मक विचार मनात सुरु होतात आणि स्वत:च्या क्षमतेवर आपण शंका घेऊ लागतो.
  ह्यावर उपाय म्हणजे त्या वाटेत चालण्यावर लक्ष दया.ते म्हटलेले आहे ना,Stand tall in narrow minded people .पुस्तकं वाचण्यास सुरुवात करा.त्यामुळे हुशार लोकांसोबत संभाषणावेळी शब्द सुचतात.हेच हुशार लोक मार्गदर्शन करण्यास तत्पर असतात.learn from the mistakes of others and yours.
  Thank you sir!

  Reply
 17. नमस्कार सर
  आज हा ब्लॉग वाचल्यानंतर मला असं वाटतंय की मी हा ब्लॉग खूप पहिलेच वाचायला पाहिजे होता पण आपल्याला जेव्हा जाणीव झाली तिथूनच लगेच सुरुवात करायला पाहिजे हीच वेळ योग्य असते तर आता खूप वेळ झाली झाली असा विचार करून जमणार नाही यात मला आज काय काय शिकायला भेटलं, मला यातलं काय आवडलं काय वाटलं, हा ब्लॉग वाचल्यानंतर मला आत्ता काय वाटते हे सर्व मी आत्ता मांडण्याचा प्रयत्न करत आहे. दिशाहीन जीवन कुठे पोहोचेल जसे दिशाहीन जहाज असते ते समुद्रात भरकटुन जाते त्याला जर दिशा देण्याचे काम नाही केले तसे वारे आले तसे दिशा बदलत राहिले तर ते जहाज कुठेच पोहोचणार नाही किंबहुना ते फिरून फिरून एक दिवस निघून जाईल.
  त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचे आहे आपल्याही जीवनात ध्येय निश्चित नसेल तर जीवनाला आपल्या आयुष्याला दिशा मिळणार नाही ते परिस्थितीनुसार “कभी खुशी कभी गम” सारखे चालत राहील आणि एक दिवस असा साधारणपणे अंत होईल मराठीत म्हटले जाते की “आई पोटी आला आणि भुई पोटी गेला” म्हणजे जीवनात त्याने काहीच केले नाही अशा जीवनात देखील काय अर्थ आहे आपण एक दिवस मरून जाऊ तर शेजरच्यालाही माहीत होणार नाही अशी आयुष्य तरी काय कामाचे आणि आपण आयुष्य असेच दिशाहीन तरी का जगावे आपण ध्येय निश्चित करून उत्तम जगण्याचा प्रयत्न करू.
  आपण जेव्हा या जगातून जाऊ तर कोणीतरी आपल्याला ओळखलं पाहिजे असं काहीतरी काम करून जाऊ आणि आज एक प्रेरणा मिळाली की यशाचे सिद्धांत हे आपली परिस्थिती पहात नाही, हे आपलं कार्य पहातात. आपली आर्थिक परिस्थिती पाहत नाही, आपला धर्म पहात नाही , हे आपला पोशाख पहात नाही, आपली संस्कृती पाहत नाही, की आपली भाषा पाहत नाही, आपण स्त्री आहोत की पुरुष पहात नाहीत , आपण कोणत्या प्रदेशात न होता पहात नाही, यश हे आपले वय पाहत नाही तर मग यश हे फक्त जर आपले कर्म पहात तर आपण या सर्व फालतू गोष्टींचा विचार का करायचा.
  आपले ध्येय सोडून बाकी सर्व या जगात नुसती वायफळ बडबड मात्र आहे. आपण आपल्या जीवनाला दिशा देऊ जीवनात कुठे पोहोचायचं हे निश्चित करून आणि ते प्राप्त करण्यासाठी कायम प्रयत्नशील असून तेव्हा आपले देय एक व्यस्त आणि अर्थपूर्ण जीवन आपण जगत आहोत असं म्हणायला हरकत नाहीत. इथे जी तुम्ही शिवाजींची गोष्ट सांगून एक सोप्या पद्धतीने उदाहरण देऊन हा ध्येय निश्चितीचा आणि ध्येयप्राप्तीचा सिद्धांत अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे तर मला सांगायचे एवढेच आहे फक्त देवाकडे मागून जमणार नाही तर ते किती प्रमाणात पाहिजे हे निश्चित करणे गरजेचे आहे.
  जर आपले ध्येयं अस्पष्ट असेल तेव्हा त्या पर्यंत पोहोचणे कठीण आहे म्हणून ते अगदी स्पष्ट असणे आवश्यक आहे आणि ते प्राप्त करण्याची तीव्र इच्छा आपल्यात असणे गरजेचे आहे. त्यासाठी चा कच्चामाल हा पृथ्वीवर उपलब्ध आहे फक्त आपली तयारी आपली ध्येयनिश्चिती आपली तीव्र इच्छा असणे आवश्यक आहे निश्‍चिती म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम आहे आणि जेव्हा दिशा मिळते ना तेव्हा कुठे न कुठे पोहोचल्याशिवाय आपण राहणार नाहीत आपण अशा परिस्थितीत भरकटणार नाही हे सत्य आहे.
  या ब्लॉग मधून जे शिकायला भेटलं तो सिद्धांत म्हणजे आपल्याला जे काही करायचे आहे ते त्यातून ते केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे. आपल्याला हे का करायचा आहे याची जाणीव असणे गरजेचे आहे आणि हे मला माहीत करून घेतल्यानंतर आपल्याला त्या कामात यश मिळणे अजून जास्त शक्यता दाट होते आपल्याला त्यातून काय प्राप्त करायचे आहे हे निश्चित केले तर यशस्वी होण्याची शक्यता दाट होते. मला आज यात काही लिहायचे राहून गेले एवढं जास्त शिकवण आज यातून मला भेटली.
  धन्यवाद.

  Reply
 18. आपल्या आयुष्यात आपले ध्येय ठरवणे खूप महत्त्वाचे आहे.
  आपल्या लहानपणीची ती एक गोष्ट आताही सर्वांच्या लक्षात नक्किच असेल.ती म्हणजे ससा आणि कासवची गोष्ट!ज्यामध्ये ससा आणि कासवाची शर्यत लागते.आणि ससा त्याच्या गतीने दूर जावून पोहचतो.मागे वळून बघतो तर त्याला कासव दिसत देखील नाही.तो तिथ असलेल्या झाडाच्या सावलीत विश्रांती करायचं ठरवतो.मग काय त्याच्या मुळे तो ती शर्यत हरतो.आता इथे प्रश्न असा पडतो की ससा का हरला?त्याच्याकडे कासवाच्या तुलनेत सर्व काही जास्तच होतो.पण ध्येय प्राप्तीची तीव्र इच्छा नव्हती.
  आजकालची मुलं अशीच आहेत.म्हणजे आपल्याकडे सातत्य आहे,वेग आहे पण ध्येयाची कमतरता.खूपदा तर दुसर्याच्या नजरेतून आपले ध्येय ठरले जाते.
  आयुष्यात नेमकं काय करायचं आहे?ते लक्ष्य आणि लक्ष्य कसे साधायचे?म्हणजे ध्येय!शिखर जरुर आहे पण ते गाठायचे आहे,हे ध्येय उराशी बाळगायला हवे.एखाद्या शिखराला गाठायचे म्हणजे त्या पर्वताचा शिखर हे आपलं लक्ष्य असलं पाहिजे.ह्या गोष्टीवर लक्ष्य केंद्रित करण्याचा प्रयत्न केल्यास आपला subconscios mind आपल्याला विविध कल्पना सुचवू लागतो.त्या शिखरावर तळ ठोकण्यचे पूर्ण नियोजन करू लागतो.
  मन झोपेत अथवा स्वप्नात देखील त्या कल्पनांनी भरुन जाते.
  कधी कधी ध्येयाची वाट डिवचणारया लोकांनी भरलेली असते.मग नकारात्मक विचार मनात सुरु होतात आणि स्वत:च्या क्षमतेवर आपण शंका घेऊ लागतो.
  ह्यावर उपाय म्हणजे त्या वाटेत चालण्यावर लक्ष दया.ते म्हटलेले आहे ना,Stand tall in narrow minded people .पुस्तकं वाचण्यास सुरुवात करा.त्यामुळे हुशार लोकांसोबत संभाषणावेळी शब्द सुचतात.हेच हुशार लोक मार्गदर्शन करण्यास तत्पर असतात.learn from the mistakes of others and yours.
  मार्ग सोयीस्कर करण्याचे हेच ते उपाय.जेव्हा आपण आपले ध्येय पूर्ण करू तेव्हा मागे वळून पाहताना आपल्या मार्गात आलेले अडथळे आपल्याला दिसतील.त्यात आपण कसे उभे राहिलो ते दिसेल.
  ज्याच्याकडे सुस्पष्ट उद्दिष्ट असते, त्याच्याकडे नकारात्मकतेसाठी वेळ नसतो.
  Thank you,Sir!

  Reply

Leave a Comment

Translate »
error: Content is protected !!