जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे? याचा एक रोडमॅप आज या ब्लॉग मधून तुम्हाला अनुभवायला मिळेल. एक गोष्ठ तुम्ही बारकाईने बघीतली तर असे दिसेल की आपल्या बाहेरच्या जगात आज जे रिज़ल्ट दिसत आहेत यावरून हे लक्षात येते की आतले जग कसे आहे, कारण आपल्या बाहेरच्या जगातील सारे रिज़ल्ट आपल्या आतल्या जगाचे प्रतिबिंब / रिफ्लेक्शन आहे.
तुमच्या जीवनात आजपर्यंत जी आव्हाने ज्या समस्या अचानक उभ्या झाल्या असतील त्या आठवून बघा मग ते आव्हान पैशाचे असेल, आरोग्याचे असेल, शिक्षण घेण्याचे असेल, नातेसंबंधाचे असेल, नोकरी किंवा व्यवसायातील मंदीचे असेल, जीवाभावाच्या माणसांचे अचानक सोडून जाणे असेल, सारे छत्रच हरवले असेल, ते सगळं काही आठवून बघा.
आज मी तुम्हाला त्यातील सत्य उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, ज्या सत्याचा उपयोग मला माझ्या जीवनात वारंवार झाला आणि आजही होतोय.
ती सर्व आव्हाने आणि साऱ्या समस्या तुम्हाला संपवण्यासाठी, थांबवण्यासाठी किंवा तुम्हाला त्रास देण्यासाठी आल्या नाहीत तर ती सगळी आव्हानं आणि समस्या फक्त आणि फक्त तुम्हाला मजबूत करण्यासाठी आल्या आहेत.
आज तुमच्याजवळ जे ज्ञान आहे, जी क्षमता आहे, जो अनुभव आहे, जर तुमच्या जीवनात ती सगळी आव्हानं आणि समस्या निर्माण झाल्या नसत्या तर हे ज्ञान, ही क्षमता, हा अनुभव आणि कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याची ताकद निर्माणच झाली नसती.
जर तुमचा जन्म अशा कुटुंबात झाला असेल जिथे खूप सारी आव्हानं, अडचणी आणि पैशाची चणचण आहे, आसपासचे, नात्यातीलच लोक सपोर्ट करीत नसतील किंवा शारीरिक स्तरावर काही आव्हान आहे किंवा आज तुम्हाला वाटत असेल की जीवनच ठप्प झाले आहे, गोठले आहे, काहीच कळत नाही की काय करावे?
तर या सर्वांचे उत्तर म्हणजे…हा निर्माता, परमेश्वर तुम्हाला आणखी मजबूत, सक्षम बनवण्याच्या प्रयत्नात आहे.
कारण हे जीवन जे आहे ना ते युद्धासारखे आहे, जे स्वतःशी चालले आहे. जेंव्हा आपला जन्म झाला, या संसारात जेंव्हा आपण पहिलं पाऊल टाकलं तेंव्हा श्वास घेण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी लढावच लागलं होतं. आणि जीवनाच्या अंतापर्यंत, प्रत्येक वळणावर लढावच लागेल. हे युद्ध चालूच राहील.
आणि आज यांसाठी स्वतःला तयार करा, की आजपर्यंत जी आव्हानं आणि समस्या आल्या होत्या आणि पुढेही ती आव्हानं आणि समस्या तुमच्या जीवनात असतील तर ते तुम्हाला जास्तीत जास्त मजबूत, सक्षम आणि खंबीर बनवण्यासाठीच असतील.
म्हणून तुमच्या जीवनातील तो सारा संघर्ष फक्त आणि फक्त यांसाठी आहे की तो विधाता तुम्हाला आणखी मजबूत बनवू पाहतोय.
तुम्ही जीवनात जे काही करायचं ठरवलं आहे ते पूर्ण ताकदीने करायला सुरवात करा, यश थोड्याच अंतरावर तुमची वाट पाहत आहे.
हे सर्व करताना भविष्यात कोणत्या ना कोणत्या समस्या अचानक उभ्या होतील त्यासाठी आजपासून स्वतःला तयार करून ठेवा.
तुमच्यामधील तो योद्धा, वॉरियर बाहेर काढा कारण तो लढणे जाणतो.
मला माहीत आहे आजपर्यंत तुमच्या जीवनात जी आव्हानं आणि समस्या आल्या त्यातून तुम्ही बाहेर पडून पुन्हा उभे झाला आहात, म्हणूनच आज इथपर्यंत पोचला आहात, यात तिळमात्र शंका नाही.
आतापर्यंतचा प्रवास संघर्षमय होता, पुढेही संघर्ष असेल परंतु तुमच्यातील तो योद्धा, वॉरियर त्याचा सामना नक्की करेल.
या सर्व भावना मनात ठेऊन नव्या उमेदीने जगायला सुरुवात करा.
एकच विनंती, हा सगळा विचार केल्यावर यातून तुम्हाला लढण्याची थोडीजरी हिंमत मिळाली असेल तर, तर चला या माझ्या मिशनमधे सामील व्हा !
तुम्ही ज्या लोकांवर मनापासून प्रेम करता आणि तेही मनाने खंबीर झाले पाहिजेत असं वाटत असेल तर जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे? हा विचार त्यांना नक्की शेअर करा. त्यामुळे माझा हा छोटासा प्रयास सफल झाला असं मला वाटेल.
हे माझे विचार तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏
अति सुंदर विचार आहे सर मनाला अगदी बरोबर वाटते आपले मन व्याकुळ असते कोमल असत आपण ज्या मारल्यावर त्याला चालायला सांगू तुझ्या मार्गावर चालणार आपल्याला आपले मन स्वतः काबूत ठेवावे लागेल आजच्या ब्लॉग मधल्या सांगितलेल्या वाक्यांनी जीवनात आणणार धन्यवाद सर
नमस्कार सर,
Generally जीवनात कुठलीही समस्या आपल्या समोर आली तर आपण थोडं तरी खचतो. थोडासा तनाव निर्माण होतो. पण या ब्लॉग मध्ये अतिशय सुंदर विचार मांडला आहे की समस्या निर्माण होतात त्या आपल्याला त्रास देण्यासाठी नाही तर आपल्याला आणखी मजबूत बनवण्यासाठी निर्माण होतात. कुठल्याही परिस्थितीत आपण खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. आणि परिस्थितीनेच माणूस घडत असतो हे काही चुकीचं नाही. जन्मल्यापासून आपण अनेक समस्यांना तोंड देऊन इथपर्यंत पोचलो आहोत. आणि याही पुढे असेच प्रत्येक समस्येला तोंड देऊन पुढे जायचे आहे. जीवन हे एक युद्धासारखे आहे आणि ते युद्ध स्वतःशीच आहे. आपल्याला survival साठी हे युद्ध एका warrior सारखे लढावे लागेल.
सर नेहमी सांगतात- Life is simple if you make it simple😊
धन्यवाद सर✨…
मला असं वाटतं आपलं आयुष्य म्हणजे एक चित्रपट आहे., आपल्या प्रत्येकाच्या चित्रपटच नाव वेगळं आहे., प्रत्येकाच्या चित्रपटची थिम वेगळी आहे., पण प्रत्येकाच्या चित्रपटात एक seen कॉमन असतो तो म्हणजे संकट., आव्हाणं., अडचणी येणं….!
प्रत्येकाच्या चित्रपटात ha seen येतोच. प्रत्येकाच्या चित्रपटात हा सीन कमी जास्त प्रमाणात असतो. *ज्याला जेवढ झेपल तेवढंच देव त्याच्या पदरात दुःख., अडचणी., संकट देत असतो….!*
*_Hard Role हा नेहमी Best Actor लाच मिळतो….!_*💯
त्यामुळे आपल्या आयुष्यात आलेल्या संकटाणा आपण समोर जाऊ शकतो म्हणूनच te आपल्या आयुष्यात आलेले असतात.
प्रत्येकाच्या आयुष्यात संकट., अडचणी असतातच कोणाला पैशाची असेल., कोणचा शरीर साथ देत नसेल., कोणाची मुले नीट नसतील., कोणाला कर्ज असेल., काहींच्या घरात दिवस रात्र दारू पिऊन धिंगाणा घालणारे असतील…. कोणाला एक वेळच जेवायला मिळत नसेल….. आपण गणना पण नाही करु शकत इतके संकट., इतक्या अडचणी असतात.
जगात असा एकही व्यक्ती नसेल कि त्याला काडीमात्र कसलंही टेन्शन नाही., मग तो सगळ्यात श्रीमंत माणसांपैकी एक असलेला Mukesh Ambani asu देत किंवा मग रस्त्यावर भीक मागणारा भिकारी asu देत टेन्शन दोघाना असणारच फक्त टेन्शन चा प्रकार वेगळा असेल.
आपल्या आयुष्यात कोणत्या अडचणी येतील हे आपल्या हातात नसतं., पण त्या अडचणीना आपल्या आयुष्यात किती काळ स्थान द्यायचं हे नकीच आपल्या
हातात असतं.
म्हणून किती जरी मोठ संकट आल तरी न डगमगता., खचून न जाता., न घाबरता प्रत्येक संकटाला सामोरं जायचं.
*_किती जरी संकट आली तरी आपण कधीच नाही थकायच नाही., एक दिवस असा येईल देवच संकट देऊन देऊन थकेल…..!_*
*_आणि ज्या दिवशी देव संकट देऊन थकेल त्या दिवशी आपण जिंकू….!_*
*_आणि ज्या दिवशी आपण प्रत्येक संकटावर मात मिळवू त्या दिवशी आपण एक योद्धा असू….!_*
या blog मधलं सगळ्यात जास्त आवडलेल वाक्य म्हणजे.,
*संकट तुम्हला आणखी मजबूत बनवतात….!*💯
शेवटी एकच लिहते जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.,
*_जितके जास्त घाव दगडाला सोसावे लागतील तितकीच जास्त सुदंर मूर्ती घडते….!_*❣️
_खूप खूप धन्यवाद सर….!_🙏🏻
_संकटाना हिमतीने सामोर जायच हेच आता पर्यंत सगळ्यांनी सांगितलं पण संकट तुम्हला मजबूत बनवतात हे फक्त तुम्हीच सांगितलं…..!_🙏🏻
अप्रतिम ब्लॉग आहे. जीवन जगत असताना जीवनामध्ये अनेक ठिकाणी आडी अडचणी येतातच आणि त्या आलेल्या अडीअडचणीला आपण कशा प्रकारे तोंड देतो यावर आपल्या जीवनाची क्वालिटी अवलंबून असते. जीवन म्हटल्यानंतर त्यामध्ये सुख दुःख असणारच त्या सुखामध्ये दुःखामध्ये आपण कशा पद्धतीने कार्य करतो आणि आपल्या वाट्याला आलेलं संकट दूर करण्याचा प्रयत्न करतो हीच जीवनाची परीक्षा असते. ही परीक्षा ज्यावेळी आपण पास व्हाल त्यावेळी जगामधले कितीही अवघड परीक्षा आपण अगदी सहज रित्या पास होतो. आलेल्या संकटाला, अपयशाला आपण पण अगदी हिंमतीने , धैर्याने दूर करण्याचा प्रयत्न करून त्यातून वर कसे येता येईल या गोष्टीचा शोध घेणार आपल्या जीवनासाठी अत्यंत उपयुक्त बाब आहे.
दिलेल्या ब्लॉगमध्ये सरांनी अतिशय सहजरीत्या जीवनात आलेले संकट कशा पद्धतीने दूर करावे त्या सिच्युएशन मधून कसं वर यावे हे सांगितलेले आहे. आणि खरच जीवनात जे काही संकट आव्हाने अपयश येतात ते आपल्याला संपवण्यासाठी थांबवण्यासाठी येत नाहीत तर त्या संकटातून त्या अपयशातुन आपल्या या यशाची मुळे पक्की होतात आणि एकदा का मूळ पक्की झाली की पुढे कितीही जरी वादळ आलं तर आपण त्या वादळामध्ये थोडं सुद्धा डगमगणार नाही याची 100% खात्री असते. संकटातूनच माणूस मजबूत बनत जातो आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक संकटावर पाय ठेवून पुढे जाण्याची वृत्ती हिम्मत त्याच्यामध्ये आपोआप येत असते.
म्हणून आपण आलेल्या प्रत्येक संकटाला आव्हानाला अगदी धैर्याने शौर्याने तोंड दिले पाहिजे आणि त्यातून एक चांगली शिकवण घेऊन पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली पाहिजे यातूनच यशाचे शिखर आपल्यासाठी जवळ होत असत. असं अतिशय मोलाचे मार्गदर्शन या ब्लॉगमधून मिळालं त्याबद्दल सर तुमचे मनापासून धन्यवाद.
अतिशय उत्तम ब्लॉग आहे.
सोप्या भाषेत, मला असे वाटते की, “योद्धा मानसिकता” असणे म्हणजे आपण कधीच प्रयत्न सोडणार नाही; त्याऐवजी, लढाई जिंकण्यासाठी किंवा मिशन पूर्ण करण्यासाठी जे काही लागेल ते तुम्ही कराल. याचा अर्थ leader होण्याचा अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आवश्यक तेवढे तास गुंतवण्याची तयारी असणे.कर्तृत्वातून आत्मविश्वास प्राप्त होतो. तुम्ही सर्वोत्तम बनण्याचे ध्येय सेट करा.
योद्धे त्यांच्या भीतीपासून लपत नाहीत; ते त्यांना मिठी मारतात. तुमच्यात आत्मविश्वास नसल्याची वस्तुस्थिती स्वीकारा आणि leadership कशी करायचे हे शिकण्यासाठी वेळ आणि मेहनत गुंतवा. हळूहळू स्वतःला अशा परिस्थितीत ठेवा जिथे तुम्हाला नेतृत्व करायचे आहे.
“Live your life like a warrior who always ready to fight for his battle!”
Excellent blog, Sir
आपल्या बाहेरच्या जगातील सारे रिझल्ट आपल्या आतल्या जगाचे प्रतिबिंब आहे.आपल्या life मध्ये अनेक आव्हाने & समस्या येत असतात तर त्या त्रास देण्यासाठी आलेल्या नसतात ,त्या आपल्याला मजबूत करत असतात कारण ही आव्हाने आली नसती तर आपण कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याची ताकद निर्माण झाली नसती म्हणून आलेल्या समस्येला न घाबरता तिचा सामना करायचा.आपल्यामधील योद्धा बाहेर काढायचा कारण त्याला कस लढायच हे माहीत असत.
आपण जीवनात जे काही करायचं ठरवलं आहे ते आव्हानांना न घाबरता पूर्ण ताकदीने केलं तर आपण नक्कीच यशस्वी होऊ आणि येणाऱ्या संकटाना तोंड देण्यासाठी तयार राहू.
जीवनात येणाऱ्या संकटाना कडे कस बघायचं आणि त्यांना कस सामोरे जाऊन जीवनात यशस्वी होयचे आणि एक योद्धा , वॉरियर् सारखे कसे जगायचे हे या ब्लॉग मधून खूप सोप्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोहचव ल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙂
समजा आपल्या घरी लग्न समारंभाचा इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटमध्ये आपल्या फॅमिली मधले आपण सर्वजण वेगवेगळी कामं वाटून घेत असत वेगवेगळे काम वेगळ्या माणसांना त्याच्या क्षमतेनुसार देत असतो. मग कोणाची क्षमता पाहुण्यांची व्यवस्था करण्याची असेल तर त्यांना व्यवस्थेसाठी त्या कामावर रुजू करत असतो किंवा कोणत्याही पेक्षा थोडसं चांगलं काम करत असेल तर त्याला ते काम आपण देत असतो. एखाद्याकडे काही skill असतात त्याच्या त्या स्कील नुसार त्यांन आपण पण तसे काम देत असतो आणि आणि तसे द्यायलाच पाहिजे कारण एखाद्या माणसाची क्षमता ते काम करण्याचे असेल तर ते काम अधिक शृंगारतेने पुर्ण होत असते. जर एखादा व्यक्ती उत्तम संचालन करत असेल आणि त्या व्यक्तीला आपण जेवणाचा मॅनेजमेंट बघण्यासाठी रुजू करत असाल आणि त्या मॅनेजमेंट साठीच्या व्यक्तीला जर संचालन करायला सांगत असाल तर ती दोन्ही काम अपूर्ण राहतील व त्यामध्ये रसाळपणा येणार नाही हे असं का होतं? तर प्रत्येकाकडे Differentiation आहे आणि त्याच्या कौशल्यानुसार तो त्या क्षेत्रांमध्ये पारंगत असतो. त्यामुळे आपण लग्न समारंभामध्ये कुवतीनुसार त्या त्या व्यक्तीला काम देत असतो
आपल्या जीवनाचा सुद्धा असाच असते की, या जीवनाचा गाडा चालत असताना त्या रस्त्यामध्ये अनेक काटे, खड्डे, काही वेळेस जीव घेणे मोठे मोठे घाट येत असतात ती आपल्या आयुष्यात येण्याची कारण म्हणजे त्या काट्यांना , खड्ड्यांना, घाटांना पार करून जाण्याची क्षमता आपल्या मध्ये आहे आणि त्या क्षमतेला जागं करण्यासाठी अशी आव्हाने आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि चर्चा आयुष्यामध्ये आव्हाने जास्त तर रोज काहीतरी वेगळे आव्हान निर्माण होते दररोज आव्हानांना तोंड द्यावे लागते विविध समस्या निर्माण होतात काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात त्या व्यक्तीचा आयुष्य खरंतर यशस्वी होण्यासाठी अगदी सोपं असतं कारण या आव्हानांना तोंड देण्याची शक्ती त्या व्यक्तीमध्ये असते आणि ती जर शकते त्या व्यक्तीने जागी केली तर यश त्याच्याकडे लोटांगण घालत येतं.
पण हल्ली असं होतं की ही समस्या आपल्यापुढे जर निर्माण झाली तर त्यातून मार्ग काढण्याऐवजी आपण रडण्याला महत्त्व फार देतो आणि ज्या गोष्टीला आपण महत्त्व देतो ती गोष्ट आपल्या आयुष्यात रिझल्ट देत असते त्यामुळे अश्या अडचणीच्या काळात समस्या निर्माण झालेल्या वेळी जर आपण त्या समस्येवर मात करण्याच्या पर्यायावर शोध घेतला तर त्यामधून पुढच्या संकटांना लढण्याची आपल्यामध्ये प्रचंड ताकद निर्माण होते पुढे येणारे संकट, आव्हाने आपण अगदी सहज रित्या मागे पडू शकतो. आणि ज्या व्यक्तीकडे आव्हानांना तोंड देण्याची क्षमता आहे जो व्यक्ती आलेल्या संकटावर अगदी हसतमुख पणाने मात करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात यश मिळवणे खूप छोटी गोष्ट असते आणि तो आयुष्यभर आनंदी सुखी समाधानी , enjoyable life जगत असतो.
आपल्याकडे भरपूर क्षमता असते , आपल्याकडे Potential तुडुंब भरलेला आहे परंतु ते पोटेन्शियल आपण अगदी दहा-पंधरा टक्के आपल्या आयुष्यात वापरत असतो त्यामुळे येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याच्या स्पर्धेमध्ये आपला पराजय होऊन जीवन यशस्वी मार्गाकडे रवाना होते त्यामुळे आपल्याला जीवन जगत आहे या ऐवजी जीवन भोगत आहे असा शब्दप्रयोग करावा लागत आणि आयुष्यामध्ये अंधारच अंधार पसरतो. ही आव्हाने झुगारून टाकण्यासाठी आपल्याला आपल्यावर कितीही मोठं तरी संकट आलं तरी त्या संकटामध्ये पाय रोखून ठेवण्याची क्षमता निर्माण करावी लागेल आणि ती क्षमता अशा लर्निंग मधूनच निर्माण होईल असे मला वाटते. त्यासाठी वेगवेगळ्या लर्निंग च्या माध्यमातून आपल्या मनाच छत्र मजबूत करून घ्यायला पाहिजे आणि ज्यावेळी मनाचा छत्र मजबूत होईल त्यावेळी आपल्या जीवन प्रवासात कितीही काटे आले कितीही खड्डे आले किती घाट आले तर त्या काट्या वरुन चालण्याची क्षमता आपली तयार झालेली असते त्यामुळे काट्यांना ही झुकावे लागेलं.
खरच आपल्या मनातला वॉरियर तो योद्धा जाग करण्याची ची गरज आहे आणि तो जर जागा झाला तर जीवनात येणाऱ्या अडचणी आपल्यापासून खूप लांब असतील आणि यश मिळवण्यासाठी आपल्यासाठी अगदी plain मार्ग तयार होईल यावरून आपल्या जीवनाचा गाडा अगदी कमी एनर्जी मध्ये यशप्राप्ती करेल परंतु आपल्यातला तो योद्धा जागा करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून, लाईट शोध सारख्या कम्युनिटीच्या माध्यमातून लर्निंग करणं खूप महत्त्वाचा आहे अशी यशाला पूरक लर्निंग जर आपल्याला भेट भेटली तर आपल्यातला वॉरियर आपोआप जागा होईल आणि जीवनात येणारे वादळ हे आपल्याला घाबरून दूर निघून जातील आणि यशस्वी होण्यापासून आपल्याला कोणाचाही विरोधक निर्माण होणार नाही कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही कोणतीही आव्हाने सुद्धा निर्माण होणार नाहीत.
या ब्लॉग मधून संकटांना कशी मात करावी आणि आपल्या आयुष्यात संकटे येणे म्हणजेच आपल्या या जीवनाची वाटचाल काहीतरी वेगळं करण्यासाठी चाललेली आहे हे अगदी पुरेपूर समजलं येणारे आव्हानांना लाथ मारण्यासाठी आपल्याकडे आपलं पोटेन्शियल वर काढले पाहिजे आणि त्या पोटेन्शिअल चा वापर करून आव्हानांना झुगारून यशाकडे वाटचाल केली पाहिजे असे भन्नाट विचार या ब्लॉग मधून वाचायला मिळाले त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
Thank u sir ,for this blog,aaj chya ya blog mude jivnakde positive najrene ks baghych he mla samjhl,aplya ayushyat kontehi prasang alee chote kivha mothe tr..aapn avdhe dukhi hoto ki bas zal sarv sample yachyannatr kahi honar ch nahi as..aplyala vatat apan tya vaite prasangatun baher ks padych yach v4 karat nahi,aplyala fakt asch vatat asto ki he sarv mazyach life madhe vhaych hot kaa,mazya sobt ch as…kaa hoto as v4 karat basto but..jaga madhe aplya pekshahi kititari dukhi lok ahet kadhi tyanchyakade baghitl kivha v4 kel na tr..apla dukh khup chota asto..tumchya ya blog mude life madhe yenare prasang He aplyala majbut banvyla yetat naki aplyala tras denyasathi yetat soo life kade kadhi pn positive drushtine baghych he mla ya blog madhun samjhl thank u sir..🙏🙏🙏
सर आज या ब्लॉग मधून हे शिकायला मिळाल आयुष्यात किती जरी अडचणी आल्या, संकट आली तर आपण खचून न जाता त्या समस्यावर, अडचणीवर, संकटवर योध्या सारखे लढून त्यावर मात केली पाहिजे कारण ही लढाई जगाशी नाही तर स्व:तशी आहे.
यशस्वी जीवन जगायचे असेल , स्व:तला आवडणारी लाइफ जगायची असेल तर या संकटावर, समस्यांवर , अडचणीवर आपण विजय मिळवून त्या यशस्वी जीवनपर्यंत आपण पोहचू शकू.
आणि या सगळ्या अडचणी, ही सगळी संकटे, या समस्या आपल्याला आडवण्यासाठी नाही तर आपल्याला मजबूत, सक्षम करण्यासाठी तो परमेश्वर प्रयत्न करत असतो.
आपल्या आयुष्यात आतापर्यंत खुप अडचणी, संकटे, समस्या निर्माण झाल्या आहेत आणि त्यातून आपण सुखरुप पणे बाहेरही पडलो आहोत ही संकटे, समस्या, अडचणी हे सगळ परमेश्वरच करत असतो आपली परिक्षा घेण्यासाठी आणि यातुन तोच आपल्याला बाहेर पडण्याची, त्या संकटवर मात करण्याची ताकत देतो. आणि आपल्याला आजुन मजबूत व सक्षम बनवतो.
जीवनात यशस्वी होयच असेल तर संघर्ष हा करावाच लागेन आणि तो ही एका योध्यासारखाच आणि हा संघर्ष आपला-आपल्याशीच असणार आहे आणि हाच संघर्ष करुन आपण-आपल्या यशा पर्यंत आपल्या ध्येया पर्यंत नक्कीच होचू. 💯😊
धन्यवाद सर🙏🏻
नमस्कार सर
आजचा ब्लॉग हा खरंच खूप प्रेरणादायी आहे.
फार प्रेरणादायी विचार आणि भरलेला आहे.
यातून मला एक गोष्ट शिकायला भेटली ती म्हणजे
संकट येतात पण ती आपल्याला थांबवायला नाही तर आपली उंची वाढवायला येत असतात.
खरं तर हा माझा अनुभव आहे
आपल्या मार्गात काही काट्यासारखे, काही दगडासारखे , काही डोंगरासारखी संकटे येत असतात.
उदाहरणार्थ मला इंग्रजी येत नाही याचा अर्थ माझ्या मार्गात ही एक दगडासारखी अडचण निर्माण झाली आहे समस्या आली पण ती समस्या काय मला थांबवायला आली का?
मग मी मागे परतायला पाहिजे का ?,
तर नाही. मी माझी उंची वाढून घेतो ना!
मी इंग्रजी शिकतो, म्हणजे माझी उंची वाढेल
याचा अर्थ संकट येतात पण थांबवण्यासाठी नाही तर आपली उंची वाढवण्यासाठी येत असतात.
समस्या, संकटे हे जीवनात आली ही पाहिजेत .
आपणच मजबूत बनतो. आपल्या परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता निर्माण होते आणि ही गोष्ट ही शिकायला भेटली की आयुष्यात संकटे हे येणारच आहे
आपल्या जन्मापासून ते मरेपर्यंत संकटे आपली सोबत सोडणार नाहीये याची गाठ मारून घेणे.
आणि संकटावर काहीतरी तोडगा काढणे हाच एक पर्याय आहे . आपण एखाद्या योध्यासारखे संकटांचा, समस्यांचा सामना करणे आणि स्वतःची उंची वाढवून घेणे. स्वतःला अजून जास्त मजबूत करणे आणि जीवन नव्या उमेदीने जगणे हे या ब्लॉग मधून मला शिकण्यास संधी मिळाली.
धन्यवाद!!!
नमस्कार सर,
अप्रतिम ब्लॉग आहे…
आपले जीवन हे युद्धासारखे आहे ते युद्ध स्वतःची चाललेले आहे. हे युद्ध जन्मल्यापासून अगदी जीवनाच्या अंतापर्यंत चालू राहील.
आणि मग जीवनात अनेक वेगवेगळ्या अडचणी ,समस्या येतील त्यांना सामोरे कसे जायचं हे या ब्लॉगमध्ये सांगितले आहे.
जीवनात अडचणी येतात ते आपल्याला मजबूत बनण्यासाठी सक्षम बनण्यासाठी त्यामुळे त्याला आपण न डगमगता एका योद्ध्याप्रमाणे सामोरे जायला पाहिजे. आपल्यासमोर अशी कोणतीही परिस्थिती किंवा समस्या निर्माण झाली नसती तर आपल्या ज्ञानाचा किंवा क्षमतेचा वापर झाला नसता. जीवनात जे काही करायचे आहेत ते पुर्ण ताकदीने केलं पाहिजे म्हणजे आपल्याला ते लगेच मिळेल. आणि भविष्यात आपल्यासमोर कुठलीही परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी आपण स्वतःला तयार करून ठेवलं पाहिजे. आणि समोर येणाऱ्या समस्यांना तोंड देत जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे.
Thank you Sir☺
नमस्कार सर
आयुष्यात येणाऱ्या अडचणी किंवा समस्या आपल्याला मजबूत करतात. ईश्वर ह्या समस्या मार्फत आपली परीक्षा घेत असतो. आपण लवकर हार न मानता एखाद्या योध्दा प्रमाणे त्या आव्हानाला सामोरे जायचे असते.
आपण जन्माला आल्यापासून आपलं युद्ध चालू होते. आपण आयुष्यातील प्रत्येक वळणावर एक लढाई लढत असतो. दिवसेंदिवस आणखी मजबूत होत असतो ह्या समस्या आपल्याला मजबूत करतात. ज्यांच्या आयुष्यात काही समस्या नाहीत ना काही अडचणी नाहीत ते जीवन निश्चितपणे निरर्थक आहे .
आपल्या मनातील तो योध्दा जागा करा त्या प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार ठेवा आणि आपले युद्ध नेहमी जिंकत रहा.
Thank you so much Sir for this amazing blog 😊
मानवी जीवनात प्रत्येकाच्या आयुष्याला छोट्या मोठ्या संकटाने घेरलेले आहे . परंतु ही जिवनात येणारी संकटे हे आपल्या मनाचं छत्र मजबूत करण्यासाठीं येत असतात त्यामुळे आपली हालचाल प्रगतीच्या दिशेने होत असते.
दिलेल्या ब्लॉगमध्ये सरांनी अतिशय सहजरीत्या जीवनात आलेले संकट कशा पद्धतीने दूर करावे त्या सिच्युएशन मधून कसं वर यावे हे सांगितलेले आहे. आणि खरच जीवनात जे काही संकट आव्हाने अपयश येतात ते आपल्याला संपवण्यासाठी थांबवण्यासाठी येत नाहीत तर त्या संकटातून त्या अपयशातुन आपल्या या यशाची मुळे पक्की होतात आणि एकदा का मूळ पक्की झाली की पुढे कितीही जरी वादळ आलं तर आपण त्या वादळामध्ये थोडं सुद्धा डगमगणार नाही याची 100% खात्री असते. संकटातूनच माणूस मजबूत बनत जातो आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक संकटावर पाय ठेवून पुढे जाण्याची वृत्ती हिम्मत त्याच्यामध्ये आपोआप येत असते.
आपल्याकडे भरपूर क्षमता असते , आपल्याकडे Potential तुडुंब भरलेला आहे परंतु ते पोटेन्शियल आपण अगदी दहा-पंधरा टक्के आपल्या आयुष्यात वापरत असतो त्यामुळे येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याच्या स्पर्धेमध्ये आपला पराजय होऊन जीवन यशस्वी मार्गाकडे रवाना होते त्यामुळे आपल्याला जीवन जगत आहे या ऐवजी जीवन भोगत आहे असा शब्दप्रयोग करावा लागत आणि आयुष्यामध्ये अंधारच अंधार पसरतो. ही आव्हाने झुगारून टाकण्यासाठी आपल्याला आपल्यावर कितीही मोठं तरी संकट आलं तरी त्या संकटामध्ये पाय रोखून ठेवण्याची क्षमता निर्माण करावी लागेल आणि ती क्षमता अशा लर्निंग मधूनच निर्माण होईल असे मला वाटते. त्यासाठी वेगवेगळ्या लर्निंग च्या माध्यमातून आपल्या मनाच छत्र मजबूत करून घ्यायला पाहिजे आणि ज्यावेळी मनाचा छत्र मजबूत होईल त्यावेळी आपल्या जीवन प्रवासात कितीही काटे आले कितीही खड्डे आले किती घाट आले तर त्या काट्या वरुन चालण्याची क्षमता आपली तयार झालेली असते त्यामुळे काट्यांना ही झुकावे लागेलं.
हा ब्लॉग आयुष्यात येणाऱ्या कितीही मोठ्या संकटांना अगदी चुटकीसरशी पद्धतीने सोडविण्यास प्रचंड मदत करणार आहे आणि नक्कीच यामधून आपलं जीवन आनंदी आणि हास्याचा खळखळाट असणार असणार आहे यात शंका नाही. असा हा life changing विचार आमच्या पर्यंत पोहोचविल्या बद्दल मनापासून धन्यवाद
Don’t say to much about your aims or whatever you want to do!
just show your results with actions and success..!
आयुष्यात येणाऱ्या अडचणी किंवा समस्या आपल्याला मजबूत करतात. आपण लवकर हार न मानता एखाद्या योध्दा प्रमाणे त्या आव्हानाला सामोरे जायचे असते.
आपण जन्माला आल्यापासून आपलं युद्ध चालू होते. आपण आयुष्यातील प्रत्येक वळणावर एक लढाई लढत असतो. दिवसेंदिवस आणखी मजबूत होत असतो ह्या समस्या आपल्याला मजबूत करतात. ज्यांच्या आयुष्यात काही समस्या नाहीत ना काही अडचणी नाहीत ते जीवन निश्चितपणे निरर्थक आहे.
*If you were born poor, it’s not your fault. But you die poor it is.*
हा ब्लॉग वाचण्यापूर्वी ची जी मनःस्थिती होती ती खरंच जीवनाला निराशाच्यायासमुद्रात डूबवणारी होती आणि तश्या जीवघेण्या परस्थिती मध्ये हा ब्लॉग माझ्यासाठी rescue च काम केलेला आहे . जसे एखादा माणूस विहिरीत पडलाय आणि त्याला पोहता येत नाही आणि तो जीवाच्या अकांतने ओरडतो की कुणी त्याला वाचवू शकेल का ? आणि तेवढ्यातच त्याला त्याच विहिरीचा एक आडोसा भेटतो आणि तो त्याच जीवन त्या अडोष्याच्या साह्याने वाचवतो अगदी तशीच मनःस्थिती असताना मला हा ब्लॉग हाती लागला आणि वाचल्यानंतर असं वाटतय की , आपल्या हाती वाचण्यासाठी किंवा understanding साठी एक विचारधारा हाती लागलेली नव्हती तर तो सगळा खजिना आपल्या हाती लागलेला होता.
मला नेहमी वाटायचं की हे सगळे problem , अडचणी, समस्या आपल्यालाच का येत असतील? मी नेहमी देवाला दोष देत असायचो की देवाने माझे वाईट करण्यासाठी किंवा माझं जीवन अंधारमय करण्यासाठी या सगळ्या अडचणी माझ्या आयुष्यामध्ये देत आहे परंतु हाच सोन्याहून अनमोल ब्लॉग वाचून खरं तर अडचणी समस्या आपल्यासाठी किती महत्त्वाच्या असतात आणि त्या आल्यामुळे आपलं जीवन अगदी कणखर मजबूत कसे बनते या सर्व गोष्टींची जाणीव झालेली आहे.
कोणतीही अडचण जर आपल्या आयुष्यामध्ये येत असतील तर ती आपल्याला मागे उडण्यासाठी येत नसून ती आपल्या जीवनाला काहीतरी मोठं संपन्न करण्यासाठी push करण्यासाठी येत असतात फक्त आपला दृष्टिकोन त्याकडे बघण्याचा वेगळा असतो त्यामुळे आपण त्या आलेल्या समस्यावर खंबीरपणे उभा न राहता त्या समस्येपुढे झुकत असतो आणि एखाद्या गोष्टीच्या पुढे जर आपण झुकलो तर ती आपल्यावर राज्य करते ये म्हणून जर आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम कडे झुकण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तो प्रॉब्लेम आपल्यावर नेहमीच राज्य करेल आणि आपल्याला आपलं जीवन अंधारमय झाल्यासारखे वाटेल.
म्हणून आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी सोबत नेटाने लढले पाहिजे, त्या अडचणीला प्रखरतेने तोंड दिले पाहिजे येणारा अडचणीला किंवा समस्या लाच असं वाटलं पाहिजे की, ईकडे काय आपला निभाव लागत नाही तिकडे जाणं आपण बंद केलं पाहिजे. म्हणून जर आपणास समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर आपल्याला अडचणीतही संधी सापडला लागतील. म्हणून रडण्यापेक्षा लढलेल कधीही चांगलं.
येणाऱ्या अडचणीमुळे आपल्यामध्ये असलेल्या क्षमता आपल्या मध्ये असलेली भन्नाट कौशल्य आपल्यामध्ये असलेल्या अगणित टॅलेंट या सर्वांची ओळख आपल्याला होत असते त्यामुळे आपण आपल्या जीवनाचा पाया पक्का करू शकतो आणि ज्या वेळी पाया पक्का असेल त्यावेळेस अख्खा जीवनाचा प्रवास अगदी मजबूत असेल मग त्यामध्ये कितीही मोठ्या अडचणी आल्या तरीही त्या पाणी पिल्या सारखे वाटायला लागतील.
या जगामध्ये प्रत्येकाकडेच काहीतरी वेगळेपण आहे आणि ते वेगळेपण आपण जाणवलं पाहिजे परंतु आपण दुसऱ्यांच्या गुणाकडे बघत असतो त्यामुळे आपली ओळख आपल्यालाच होत नाही आणि त्यामुळे जीवनात काय साध्य करायचे आहे हेच आपल्याला जाणवत नसल्यामुळे सगळं जीवन तडजोडीचे जगावं लागते .
आयुष्या त मोठी मजल मारण्यासाठी मला तर वाटते आयुष्यात समस्या असल्या पाहिजे कारण त्यामुळेच आपल्याला आपली चांगली ओळख होते आणि आपण कुठे काय करू शकतो याची जाणीव होते आणि त्यामधे आपल्यामधील warrior जागा होईल आणि आपण आपल्या वाटलं तिथे पोहचू शकतो.
हा ब्लॉग देऊन जिवनात येणाऱ्या समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलल्यामुळे मनापासुन धन्यवाद