जीवनात जे पाहिजे ते कसे मिळवावे? याचं उत्तर आपण शोधत असतो, आज याच विषयावर थोडक्यात या ब्लॉग मध्ये विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
“Life is an Echo. What you send out, comes back. What you sow, you reap. What you give, you get. What you see in others, exists in you.” —Zig Ziglar.
“जीवन एक प्रतिध्वनी आहे. तुम्ही जे पाठवता ते परत येते. तुम्ही जे पेरता तेच कापता. तुम्ही जे देता ते तुम्हाला मिळते. जे तुम्ही इतरांमध्ये पाहता ते तुमच्यामध्ये असते”. – झिग झिगलर
असं म्हटलं जाते की, तुम्हाला जे हवे आहे ते द्यायला सुरूवात करा, कारण निसर्गाचा एक नियम आहे, की तुम्ही जे द्याल तेच परत मिळेल, जसे जमिनीत एक दाणा पेरला तर हजार दाणे परत मिळतात. याचाच अर्थ “कुदरत देती नही, वो लौटाती हैं”.
आपल्या आसपास असणाऱ्या लोकांच्या मुख्य पाच तक्रारी असतात.
१) “माझं कोणी ऐकूणच घेत नाही.”
कोण आहेत त्या व्यक्ती? की ज्या तुमचं एकूण घेत नाहीत? स्वतःची मुलं, सहकारी, पती किंवा पत्नी, विद्यार्थी, शिक्षक, हाताखालची लोकं की बॉस, की आणखी कोण ?
याचा अर्थ असा होतो की डाव जेंव्हा तुमच्या हाती होता तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांचे ऐकूण घेतलेले दिसत नाही.
रुसो या विचारवंताने म्हटले आहे, मनुष्य जन्मतःच पूर्णपणे स्वतंत्र आहे त्याला प्रेम-वात्सल्य-ममता आवडते, बंधने, दहशत आणि गुलामी आवडत नाही.
बरेचदा आपण आपल्याच तोऱ्यात राहत असाल तर हे असेच होणार, हे खरे-खोटे करण्यासाठी असा एक प्रश्न हळूच स्वतःला विचारून बघा? की आपण लोकांचं खरंच एकूण घेतो काय? की माझंच खरं आहे असं लावून धरतो?
लोकांनी आपला ऐकून घ्यावं असं जर वाटत असेल तर त्याला माझ्यामते दोन पर्याय आहेत.
एक म्हणजे- कामासाठी एक सिस्टिम तयार करावे लागेल, यात कोणी कोणते काम करायला पाहिजे हे ठरवले असावे, ते काम जर त्यांच्याकडून झाले नाही तर पनिशमेंट ची व्यवस्था असावी. या प्रकाराला कायदेशीर प्रकार असेही म्हणता येईल. परंतु यात एक भीती अशी असते की, लोकं तुमच्या भीतीपोटी ऐकतीलही परंतु त्यातून पळवाटा जास्त काढतील.
दुसरे- तुमचं लोकांनी ऐकावं असं वाटत असेल तर हा दुसरा प्रकार जास्त फायद्याचा ठरेल यामध्ये कामाची सिस्टिम जी आहे ती तर असेलच परंतु त्याच्याही पूर्वी तुम्हाला एक करावं लागेल आपल्या आसपास असणाऱ्या लोकांशी जिव्हाळ्याचं नात निर्माण करावे लागेल त्यामुळे असं घडेल ही लोकं सिस्टिम साठी काम न करता तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतील.
वरील पैकी कोणता पर्याय निवडायचा हा संपूर्ण निर्णय मात्र तुमचाच असेल.
२) “मला कोणी समजूनच घेत नाही,”
याचा अर्थ काय होत असेल? असा विचार मनात येताच एक प्रश्न स्वतःलाच विचारा-
लोकांनी तुम्हाला समजून घ्यायला तुम्ही काय पायथागोरसचा सिद्धांत आहात? लोकांना तुम्ही समजून घ्यायला सुरवात करा लोकंसुद्धा तुम्हाला समजून घ्यायला सुरवात करतील.😕😕
३) “माझा कोणी मानच राखत नाही,”
याचाही अर्थ तोच आहे की तुम्ही सुद्धा लोकांना तशीच वागणूक दिली असेल, तुम्हाला मिळालेल्या अधिकाराच्या नावाखाली, पदाच्या नावाखाली आसपासच्या लोकांमध्ये दहशत निर्माण केली असेल, तुमचे हे नेहमी तुसडेपणाचे बोलणे त्याला कारणीभूत आहे असे तुम्हाला वाटत नाही?
तुमच्यामुळे लोकं प्रभावित होतात की अपमानित होतात हे तपासून पहा. हे जर नाही केलं तर काय होईल? दोन गोष्ठी घडतील- एक म्हणजे तुमच्या दहशतीमध्ये लोकं आज काम तर करतील परंतु उद्या तुम्हाला कायमचं विसरतील, याचा अनुभव काही लोकांच्या बाबतीत तुम्हालाही आलाच असेल कुठे ना कुठे.
४) मला कोणी सहकार्यच करीत नाहीत:-
ही प्रक्रिया सुद्धा आपण दिल्यानेच मिळणारी आहे, ही एक मानवी मनाची अवस्थाच म्हणावी लागेल. हा एक संस्कार सुद्धा आहे, ही एक मानवी सवय आहे लावून घेतली तर लागणारी.
एक प्रश्न स्वतःलाच विचारून पहा की, लोकांनी तुम्हाला कसं स्मरणात ठेवावं, एक प्रेमळ व्यक्ती म्हणून की चिडखोर आणि सतत अपमान करणारी व्यक्ती म्हणून, काय वाटतं तुम्हाला? हा संपूर्ण निर्णय तुमचाच राहणार आहे.
५) माझ्यावर कोणी प्रेमच करीत नाहीत:-
प्रेम केल्याने होत नाही आणि जबरदस्तीने ते मिळवताही येत नाही. असे असले तरी निस्वार्थ प्रेम करणार्या व्यक्तीला संपूर्ण जग आहे. असं प्रेम करणारी लोकं आज जगात आहेत म्हणूनच प्रेमाचे अस्तित्व अबाधित आहे.
आज आपल्या आसपास सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, कारण सहानुभूतीसाठी पात्रतेचा गरज लागत नाही, प्रेमासाठी पात्रता तपासली जाते, आपली जशी पात्रता असेल तशीच लोकं आपल्या जीवनात येतात किंवा अश्याच लोकांच्या आयुष्यात आपला प्रवेश होत असतो.
वरील सर्व तक्रारी कदाचित तुमच्या नसतीलही, परंतु ज्यांच्या असतील त्यांच्यापर्यंत हे निसर्ग-नियम पोहचवु शकलात तर तुमच्या हातून खूप मोठे कार्य झाले असे समजावे.
हा थोडा विचार केला तर यातून प्रत्येक व्यक्तीला आपले माईंड-शिफ्ट करण्याची संधी प्राप्त होते. म्हणजेच आनंदी जीवन जगण्यासाठी केवळ माइंड-शिफ्ट करण्याची गरज असते, किती सोपं आहे ना? याचा अनुभव जरूर घेऊन बघा.
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏
हा ब्लॉग तुमच्या आवडत्या लोकांना / विद्यार्थ्यांना / मित्रांना नक्की शेअर करा, काय सांगता येईल त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात तुमचा हा छोटासा प्रयास महत्वाचा ठरेल .
आणखी वाचा: आपले ध्येय नेमके कसे निश्चित करावे आणि ते कसे प्राप्त करावे?
आणखी वाचा: जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे? How to live life as a warrior?
आपल्या या खमंग अश्या लेखणीतून खमंग स्वाद घेता आला . एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्या गोष्टीच्या मागे आपला हात कुठ पर्यंत आहे, आपलं कार्य त्या गोष्टीसाठी काय आहे या गोष्टीची जाणीव असंन खूप महत्वाचं असते आणि ती जाणीव आपल्या ह्या चटकदार लिखाणातून झालेली आहे . खरंच Take and give पेक्ष्या give and take he खूप महत्वाचं आहे. माझ्या मनात सुध्दा एक प्रश्न सतत भेडसळत होता की, माझी तब्बेत का होत नाही? या प्रश्नाला धरून माझे खूप रडगाणे व्हायचे आणि आत्ता सुद्धा होतात पण त्या तब्बेतीसाठी माझ्याकडून अपेक्षित असणाऱ्या कार्याची तयारी शून्य असायची . उशिरा उठणे, जेवण वगैरे व्यवस्थीत न करणे , आणि व्यायमाच फक्त नामस्मरण करणे आणि कृती मात्र शून्य मग कास काय धेय्य साध्य व्हायचं? परंतु तुमचा हा लेख वाचून या जखमेच औषध आता सापडलेलं आहे आणि नक्कीच तुमच्या या विचाराच्या मदतीनं ती जखम लवकरात लवकर बरी होणार आहे . खूप खूप धन्यवाद सर आणि अशीच. एक वेगळी शिदोरी आम्हाला मिळो हीच विनंती.
जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवावे? सर या ब्लॉग मध्ये खूप काही शिकण्यासारखे आहे त्याला ओळखलं पाहिजे आपण नेहमी स्वप्न बघतो पण ती स्वप्नं कशी करायची ती मिळवायचं कसं याचे मंत्र आजच्या ब्लॉग मध्ये आहे आपण जे कारण सांगितले आहे सर ते कारण ही नक्कीच आहे आपण नेहमी स्वतःला शिस्त कारण देतो आहे काल मार्क्स यांची व्याख्या ही मनावर एक वेगळाच प्रभाव टाकते यातलाच एक प्रश्न माझ्यावर कोणी प्रेम करत नाही असेही आपण एकदा म्हणतो आपण निवड कारण देतो पण वास्तव जाणून घेत नाही आजच्या ब्लॉगमधून दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद सर
नमस्कार, ब्लॉग मध्ये दिलेले सर्व questions जवळपास 90 टक्के लोकांच्या मनात असतात आणि माझ्या सुद्धा मनात अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाले होते. याच बरोबर अशीच questions आपल्या मनात का निर्माण होतात हाही प्रश्न निर्माण झालेला होता परंतु या प्रश्नाचे उत्तर मला आज पर्यंत हव्या त्या पद्धतीने मिळालेला नव्हते पण आज हा ब्लॉग वाचून त्यातून माझ्या प्रश्नाचं अतिशय समाधानकारक निराकरण झालेला आहे. मित्रांनो, आपण थोडासा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे की आपण लोकांकडून अपेक्षा ठेवत असताना आपण कोणत्या पद्धतीने लोकांना वागणूक देतो हे ही बाब तितकीच महत्त्वाची आहे.
कोणी मला support च करत नाही ,. कोणी माझ्यावर प्रेमच करत नाही. अश्या प्रश्नांचा विचार करत असताना त्याबाबतीत आपण कितपत active आहोत याची दखल घेणं सुध्दा महत्वाचं आहे कारण इथ सुध्दा न्यूटनचा तिसरा नियम ( क्रिया तशी प्रतिक्रिया) लागू पडतो. ज्याप्रमाणे आपण काम करतो त्याच प्रमाणे त्या कामाची प्रतिक्रिया सुद्धा येते हे विज्ञानानं सिद्ध केले आहे.
असे प्रश्न निर्माण करून आपण उगच आपल्या या विचाराला आखूड बनवत आहोत . आता हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि आपल्या विचाराला स्वतंत्रतेच्या वातावरणात ठेवला पाहिजे त्यांना मुक्त संचार करता आला पाहिजे यातून नवनवीन Ego less विचारांचा जन्म होतो आणि असे विचार पुन्हा पुन्हा येत असतील तर त्या विचारांचं कार्यामध्ये रूपांतर होतं आणि त्यातून अशा प्रश्नाची उत्तरे आपोआपच आपल्याभोवती नांदू लागतील. म्हणून वरील सर्व प्रश्नांचा विचार करत असताना इथेसुद्धा न्यूटनचा तिसरा नियम लागू होतो हे पारखण्याची नितांत गरज आहे.
आज पर्यंत जे प्रश्न मनाला टोचत होते त्या प्रश्नाचं अतिशय समाधानकारक , अगदी सोप्या शैलीत, मनाला भावेल असे उत्तर मला या तुमच्या अप्रतिम लेखनातून मिळालं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन प्रबोधन शील विचार आमच्यासाठी यावेत ही विनंती. 🙏
प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्याला जे हव आहे ते मिळाल पाहिजे . मग ते Health असेल, Relationship असेल, Carrier असेल, Finance असेल किंवा spirituality असेल . हे मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते. पण आपण काहीतरी घेत असताना त्याआधी अति थोड्या प्रमाणात तरी दिलं पाहिजे. हे या ब्लॉग मधून प्रखरतेने जाणवलेला आहे.
प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शंका असत वेगवेगळ्या समस्या असतात की, मला कोणी समजूनच घेत नाही, माझं कोणी ऐकतच नाही, मला कोणी किंमत देत नाही, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, रड गाणे आपल्या आजूबाजूला किंवा आपल्यामध्येच आपल्याला ऐकायला भेटतात. मग या गोष्टीचा विचार करत असताना आपण दुसऱ्या व्यक्तीला समजून घेतो का, दुसऱ्यांचा ऐकतो का आपण, आपण कोणाला किंमत देतो का,. आपण कोणावर प्रेम करतो का या बाबी लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचा आहे कारण निसर्गाचा नियमच आहे की तुमची जशी Action असेल तशीच त्यावर ती रreaction मिळेल . एखादा बॉल जेवढ्या गतीने तुम्ही एखाद्या भिंतीवर तीन माराल त्याच गतीने तो परत येत असतो. याचा अर्थ असा की आपण ज्या पद्धतीने कार्य करत असतो तसेच रिझल्ट आपल्याला दिसून येतात.
सर तुम्ही सांगितलेली ही पद्धत जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये अगदी तंतोतंत लागू पडते आणि हा फॉर्मुला वापरून जर जीवन जगल तर जीवनामध्ये जे काही मिळवायचे आहे ते मिळवण्यासाठी चा मार्ग अधिक क्लिअर असेल. त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अडथळा येणार नाही असं मला वाटते. जीवनातली प्रत्येक गोष्ट आपली वाटेल आणि आनंदाचा, समाधानाचा गोंधळ आपल्या आजूबाजूला असेल. एवढं मोलाचे मार्गदर्शन आपण या ब्लॉगच्या माध्यमातून केल्याबद्दल Heartly Thanks Dear sir. आम्हाला गर्व वाटतो की तुमच्यासारखं मौल्यवान व्यक्तिमत्व आम्हाला Mentor म्हणून लाभलेलं आहे once again very very thank you sir.
नमस्कार सर,
जीवनाचे जे हवे आहे ते कसे मिळवायचे? हे या ब्लॉग मध्ये सांगितलेले आहे. एक महत्त्वाचं वाक्य या blog मधून सापडलं ते म्हणजे कुदरत देती नही, वो लौटाती हैं. आपण जसे आहोत तसेच लोक आपल्या जीवनात आपल्याला भेटतील. इतरांचे ऐकून घेतले तर आपलं कोणीतरी ऐकणार. इतरांना मान दिला तर आपल्याला मान मिळेल. प्रेम दिले तर प्रेम मिळेल. वाईट वागणूक दिली तरी आपल्याला वाईट वागणूकच मिळेल. आपल्याला जर आनंदी जीवन जगायचे असेल तर माईंड शिफ्ट केलं पाहिजे. मग सगळं काही आपल्या मनासारखं होईल.
Thank you Sir😊 अशा blogs साठी.
आम्ही खूप काही शिकुन जातो हे असे ब्लॉग्ज वाचुन.
नमस्कार सर,
‘कुदरत देती नही, वो लौटाती है’. खरच खूप खोल विचार आहे हा, मला हा ब्लॉग खूप आवडला आणि त्यातून काही शिकायला भेटलं आपण दुसऱ्याचा आदर केला तर दुसरे आपला आदर करतील आपले जसे कर्म असतील त्याप्रमाणेच आपल्याला फळ भेटणार.
हे या ब्लॉग मधून मला शिकायला भेटले जगाला प्रेम वाटलं तर आपल्याला प्रेम भेटल. आपण दुसऱ्याची मदत करा लोक वेळेला आपली मदत करतील म्हणजे आपण जे पेरू तेच आपल्याला भेटणार . एक इंग्रजीतली म्हणून मला आठवते “As you sow so shall you reap”.
आणि महत्वाचं म्हणजे त्या पेक्षा जास्त आपल्याला भेटणार आहे आपले जीवनात काही गार्हाने असतात. जसं की तुम्ही इथे उदाहरण दिले आहे की ‘माझं कोणी ऐकतच नाही’ यात मला हे शिकायला भेटलं की जर माझं कोणी ऐकत नाहीये याचा अर्थ मीच लोकांचे ऐकले नसेल किंवा ती गोष्ट जास्त महत्त्वाची नसेल तर कोणी कशाला ऐकेल. आपण आपल्या तोऱ्यात नसलो पाहिजे.आपले पाय कायम जमिनीवर ठेवले पाहिजे. त्यामुळे आपण लोकांशी चांगले संबंध बनवले पाहिजे सर्वांशी मिळून मिसळून जगले पाहिजे यातच खरा आनंद आहेत आणि मग काही सल्ला असेल तर ते प्रेमाचे लोकही आपलं ऐकतील आपण लोकांना जवळ करून घेतले पाहिजे त्यांना समजून घेतले पाहिजे तेव्हा कुठे आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न लोक करतील आपण त्यांच्यात रुची दाखवली तरच तेच आपल्यात रुची दाखवतील. आपण त्यांचा मान राखला पाहिजे तेव्हा तिथे आपलाही मान ठेवला जाईल.
आपण जर लोकांचा अपमान करीत असू तर कोण आपला मान ठेवणार आहे तेही आपला अपमानच करणार आहे आपण जेवढी दुसऱ्यांची काळजी घेऊ, मदत करून तेवढे लोक आपली मदत करतील, सहकार्य करतील, काळजी घेतील म्हणजे या सर्व गोष्टी मधून एकच गोष्ट शिकायला भेटली ती म्हणजे “जसे कर्म तसे फळ” म्हणून आपल्याला जी गोष्ट मिळवायची असेल त्या गोष्टीवर आपला ला लक्ष द्यावा लागेल.ती दुसऱ्यांना द्यावा लागेल. तेव्हा ती कुठे आपल्यालाही भेटेल.
धन्यवाद.
Hello Sir!
जग हे तुम्ही पाहता तसे नाही, जगाविषयी तुम्ही जे विचार करता ते जग आहे.
तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते या कारणांमुळे घडत आहे-
* भूतकाळातील सकारात्मक विचार म्हणजेच तुम्ही दिलेली सकारात्मक शैली!
* भूतकाळात केलेले नकारात्मक विचार म्हणजेच तुम्ही दिलेली नकारात्मक शैली!
हे जग आपल्यासाठी एक आरसा आहे.
न्यूटनचा नियम हेच सांगतो की,’every action has an equal and opposite reaction’.
आपण जर एखादयाशी प्रेमाने वागलो तर तो देखील आपल्याशी प्रेमानेच वागेल.मी जर कोणाची मदत केली तर तोदेखील मला गरजेला नक्कीच मदत करेल.आपण जशी वागणूक लोकांना देतो तशीच वागणूक लोक आपल्याला देतात.
Thank you sir ☺
या ब्लॉगमधून खूप काही शिकायला मिळालं!
आपण ज्यावेळी अगदी लहान असतो त्यावेळी आपल्या आई-वडिलांकडे किंवा नातेवाईकाकडे वेगवेगळे हट्ट करत असतो. मला खेळणी पाहिजे, मला नवीन ड्रेस पाहिजे, मला न्यू शूज पाहिजे याव्यतिरिक्त आपण जी नवीन गोष्ट बघितली ती मागत असतो आणि त्या कालावधीमध्ये आपले आई-वडील ती पूर्ण करण्याचा प्रयत्नही करतात कारण त्या वयामध्ये आपण निरागस ( innocent) असतो. ज्यावेळेस माणसाकडे निरागसपणा येतो त्यावेळी सगळे जग त्या माणसाचा होत असत.
बघा निरागसपणा कुठल्या बाजारात भेटतो? कोणत्या कंपनीत तयार होतो? यासाठी लाइफ शोध सारखी लर्निंग, वेगवेगळी उपयुक्त ग्रंथ, उत्तम मार्गदर्शक यांची नितांत आवश्यकता
असतेे. जसजसे आपण मोठे होत जात असतो तसे तसे आपल्यातला निरागसपणा कमी होतो आणि आपले हट्ट हळूहळू दुर्लक्षित होत असतात. हे असे का? या प्रश्नाचे उत्तर मी आतापर्यंत शोधत आलो परंतु आतापर्यंत भेटलेल्या उत्तरामध्ये काही. चवच नव्हती मात्र आज हा ब्लॉग वाचला आणि त्या उत्तरांमध्ये प्रचंड चविष्ट पणा सापडलेला आहे.
आतापर्यंत चे माझे रडगाणी फक्त हेच होते की, कोणतीही गोष्ट माझ्या मनासारखे का नाही होत? मला जे हव आहे ते का मिळत नाही? या खूप दिवसापासून मनात दटावलेल्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या मौलिक वाचनातून मिळाली. खरंच निसर्गाचाच नियम आम्हाला माहिती नव्हता की आपण जेवढं देतो त्यापेक्षा जास्त आपला मिळत असतं परंतु आपण फक्त येण्याची अपेक्षा करतो देण्याचा अंश आपल्यात शुन्य असतो. या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी एखादी लाईफ शोध सारखी प्रोग्रेसिव कमिटी खूप पावरफुल असते हे या वाचनातून कळाले.
खरंच झिग झिगलर यांचे चार ओळी चे विचार ( “जीवन एक प्रतिध्वनी आहे. तुम्ही जे पाठवता ते परत येते. तुम्ही जे पेरता तेच कापता. तुम्ही जे देता ते तुम्हाला मिळते. जे तुम्ही इतरांमध्ये पाहता ते तुमच्यामध्ये असते”. – झिग झिगलर ) आख्ख आयुष्य बदलणारे आहेत. यातून अफाट शक्ती मिळते की ज्या शक्तीमुळे आपल्याला जीवनात कोणतीही गोष्ट आपली करून घेण्यासाठी कोणीही आणू शकत नाही.
आपलं कोणी ऐकून घेण्यासाठी आपण त्यांचे किती ऐकून घेतो हे खरच महत्त्वाचा आहे . जशी क्रिया तशी प्रतिक्रिया हा न्युटनचा लॉ खूपच प्रभावशाली आहे आणि तो फक्त विज्ञानासाठी नव्हे तर आपल्या जीवनावरही तेवढाच महत्त्वाचा आहे. कोणत्याही कामामध्ये दबावा पेक्षा लोक कठोर पना पेक्षा माया, प्रेम , आपुलकी ही खूप उपयुक्त असते. एखाद्या व्यक्तीला दोन शब्द प्रेमाने बोला तो व्यक्ती चार शब्द आपुलकीने बोलेल . त्यामुळे आपण प्रेमाचं ,स्नेहाचं, आपुलकीचं नातं इतरांसोबत कसे निर्माण करता येईल यावर लक्ष देण गरजेचा आहे.
ज्या व्यक्तीकडे देण्याची वृत्ती आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही त्या व्यक्तीला सगळं जग त्याचा वाटतं , आनंदी जीवनासाठी यापेक्षा जास्त काय लागतं!
माझं कोणी ऐकूनच घेत नाही?
मला कोणी समजूनच घेत नाही?
माझा कोणी मानच राखत नाही ?
मला कोणी सहकार्य करत नाही?
माझ्यावर कोणी प्रेम करत नाही?
अशा अनेक प्रश्नाने आमची पिढी ग्रासलेली आहे . हा ग्रासलेपना नष्ट करण्यासाठी अशा भन्नाट लर्निंग ची , अतिउत्तम मार्गदर्शकांची नितांत गरज आहे आणि ती गरज तुम्ही पूर्ण करत आहात त्याबद्दल खूप अभिमान वाटतोय .जग झपाट्याने विकसित होत आहे, प्रचंड ताकदीचं तंत्रज्ञान विकसित होत आहे, माणसांना चैनी करण्यासाठी वेगवेगळे सेवा सुविधा निर्माण होत आहे परंतु आताचा माणूस फक्त बाह्य अंगाने सुखी समाधानी आहे आणि मनात प्रचंड प्रमाणात तान तनाव दुःख चिडचिडेपणा ची गाळ साचलेली आहे. खरंतर ही गाळ काढण्याचे तंत्र विकसित झाले पाहिजे आणि मला वाटते सर तुम्ही ते कार्य करत आहात. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. प्रेमासारखी गोष्ट फक्त स्क्रीनवर अनुभवायला कशी मिळेल? त्यासाठी आपल्याकडेसुद्धा अशा गुणांची आवश्यकता असणे आवश्यक आहे आणि ती आवश्यकता निर्माण करण्यासाठी आम्हाला ही ई लर्निंग खूप फायद्याची ठरणार आहे. असा हा विचारांना वाचा फोडणारा ब्लॉग आमच्यासाठी दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
Great, learning, शिका आणि शेअर करा.
नमस्कार सर..!
खरचं खूप अप्रतिम लेख तुम्ही लिहिलात.या ब्लॉगमध्ये मांडलेल्या बर्यापैकी गोष्टी माझ्याबाबत झाल्या आहेत. त्या गोष्टीमागील कारणे ब्लॉग वाचून तर कळालीच पण त्यात कसा बदल घडवता येईल ते ही कळालं.प्रत्येकाला जीवनात काहीना काही हवंच असत मात्र ते मिळवण्यासाठी एक सिस्टीम असावी लागते आणि ती सिस्टीम कश्याप्रकाराची असावी हे या ब्लॉगमधून कळाल. तुम्हीच्या या ब्लॉगमुळे नक्कीच जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार आहे…!
अश्या ब्लॉगमधुन सकारात्मक आशावाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर….!😊
Keep learning and growing.
नमस्कार सर
आज महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. प्रत्येकाला असे वाटते की आपल्यावर सर्वांनी प्रेम करावे पण ते महत्त्वाचा नियम विसरतात Life is an ECHO. What you send out, comes back. आपल्याला काही पाहिजे असेल तर त्यासाठी काहीतरी द्यावे ही लागते. आपण जी भावना एखाद्या व्यक्तीविषयी बाळगून वागतो समोरचा व्यक्ती ही आपल्याशी तसेच वागतो.
जेव्हा आपण लोकांना समजून घेतो तेव्हाच लोक आपल्याला समजून घेतात . आपण जर समोरच्या चे ऐकून घेतले तर च तो आपले म्हणणे ऐकून घेतो. आपण सगळ्यांनचा मान ठेवला व अदबीने वागलो तर च लोक आपला मान ठेवतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर लोकावर प्रेम केले तरच लोक आपल्यावर प्रेम करतील.
जग Give and take policy वर चालत त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे ते आधी लोकांना १००% द्या ( प्रेम , मान , बोलने ऐकून घेणे ) ती गोष्ट तुला १०००% परत मिळेल.
Thank you sir for this amazing blog 🙂. तुमच्या प्रत्येक विचारांनी नवीन प्रेरणा मिळते . असेच ब्लॉग लिहून आम्हाला inspired करत रहा.
अप्रतिम ब्लॉग सर…..
हा ब्लॉग खरच विचार करायला लावणारा आहे. यामधील विचार तुम्ही खूप सोप्या भाषेत आमच्यापर्यंत फोचवले.
प्रत्येकाला जीवनामध्ये खूप काही पाहिजे असते पण ते त्याला मिळत नाही. कारण तो ते मिळवण्यासाठी कुठं तरी कमी पडतो.जीवन एक प्रतिध्वनी आहे, आपण जे पाठवतो ते परत येत, आपण जे देतो ते आपल्याला मिळत, आपण जे इतरांमध्ये पाहतो ते आपल्यामध्ये असते.हे अगदी बरोबर आहे कारण “कुदरत देती नही ,वो लोटाती है”
आपल्या आसपासची लोक सारखं काहीना काहीतरी तक्रार करत असतात त्यामधे माझं कोणी ऐकतच नाही,मला कोणी समजूनच घेत नाही,माझा कोणी मानच राखत नाही,मला कोणी मदतच करत नाही, माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही इत्यादी.ज्यावेळेस आपण इतरांसाठी काहीतरी करतो त्यावेळेस ते आपल्यासाठी करतात,ज्यावेळेस आपण इतरांच ऐकून घेऊ,त्यांना समजून घेऊ,लोकांवर प्रेम करू,त्यांना मदत करू,त्यांचा मान राखू हे सगळ जेव्हा आपण करू त्यावेळेस ते पण आपल्याला मिळेल.याची सुरुवात आपण आपल्यापासून करायची,लोकांकडून अपेक्षा नाही ठेवायची.त्यावेळेस आपल्याला जीवनात जे हव आहे ते मिळेल……
Thank you sir 🙏🙏
Hello sir,
जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवायचे? यावरील विचार तुम्ही या ब्लॉग मध्ये अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने मांडले आहेत.
जीवन एक प्रतिध्वनी आहे. तुम्ही जे पाठवता ते परत येते. तुम्ही जे पेरता तेच कापता. तुम्ही जे देता ते तुम्हाला मिळते. जे तुम्ही इतरांमध्ये पाहता ते तुमच्यामध्ये असते”. – झिग झिगलर
या विचारातूनच आपल्याला सर्व काही समजून जाते.
आपल्याला लाईफ मध्ये जे पाहिजे आहे ते द्यायला सुरुवात केली की आपल्यालाही तेच मिळत जाते. जे पेराल तेच उगवेल. आपण नेहमी चांगलं पेरण्याचा प्रयत्न करायचा मग चांगलंच उगवेल. आपल्या आसपास असणाऱ्या लोकांच्या काही तक्रारी असतात.
1) माझं कोणी ऐकूणच घेत नाही.
Every good conversation starts with a good listener.आपण जेव्हा दुसऱ्याच ऐकून घेतो तेव्हा आपलं कोणीतरी ऐकून घेत असतं.
2) मला कोणी समजूनच घेत नाही.
तुम्ही लोकांना समजून घ्याल तर लोक सुद्धा तुम्हाला समजून घेतील.
3) माझा कोणी मानच राहत नाही.
इतरांना जशी वागणूक देतो तशी आपल्याला वागणूक मिळत असते.
4) मला कोणी सहकार्यच करत नाही.
हे सुद्धा आपण इतरांना दिले तरच आपल्याला मिळणार आहे.
5) माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही.
प्रेम हे जबरदस्तीने किंवा प्रेम कर असे म्हणण्याने मिळत नसते. आपण जसे आहोत तसेच लोक आपल्या जीवनात येत असतात. आपण इतरांवर निस्वार्थ प्रेम केले तर त्यांच्या मनात आपल्या बद्दल काही भावना निर्माण होतील आणि ते आपल्यावर प्रेम सुद्धा करतील.
अशा तक्रारी बर्याच जणांच्या असतील.
निसर्गाचा नियम आहे आपण जे देत असतो तेच आपल्याला मिळत असते. इथे फक्त माईंड शिफ्ट करण्याचा प्रश्न आहे. आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्याला माईंड शिफ्ट करावंच लागेल.
Thank you Sir😊…
.. आजच्या या ब्लॉक मधील क्वेश्चन मला रोजच पडत असतात, पण ब्लॉग वाचल्यावर कळलं की, आपण तसं करतो म्हणून तसे प्रश्न आपल्याला पडतात, कारण आपण इतरांना प्रेम दिले तर लोक आपल्याला देतील, आपण दहा जणांना समजून घेतलं तर आपल्याला कोणीतरी समजून घेईल, आपण कुणाचं तरी ऐकून घेतले तर, इतर लोक आपलं मत ऐकून घेतील, कदापि आपण आपलंच खरं करतो, आपण आपलीच बाजू खरी आहे, अशी स्पष्ट मत दाखवत असतो, मग का लोक आपल्यावर प्रेम करत नाही, का लोक आपली बाजू मांडून घेत नाही, कारण आपणही चुकतच, आणि आपणच जर इतरांना समजून घेत नाही, आपल्याला कोण समजून घेणार, म्हणजेच अर्थात जे पेराल ते उगवेल, जे द्याल ते द्या, म्हणजे आज मला कळलं की, आपण सुद्धा कुठेतरी चुकत असतो, म्हणूनच आपल्याला मला जे हवं ते मिळत नाही, आपल्या चुकांचा पांघरुन आपण काढले , तर जे हवं ते आपल्याला नक्की मिळेल, हे मला ब्लॉक मधून समजले, तसेच , सरांचा मला एक वाक्य खूप आवडले, की आपण काय पायथागोरसचा सिद्धांत आहोत का, लोकांनी आपण समजून घ्यायला, खर आहे sir.. thanks u so mucha sir .. nice blog
Ha blog maximum lokansathi khup important ahe sir,because atachya jagat generally lok kunachi aikun ch ghet nahi,ekhada topic asla ani tyabaddal charcha suru zali ki,mla kiti mahity ahe me kiti hushar ahee he dakhvynyach prayatn kartat,generally chote mulanna atraction havi aste but ethe tr mothe lok pn kahi kami nahi,dusre kay sangtat he aikun ch ghet nahi.lokanna samjht ch nahi ki,apan jase behave karu tasech samor ch pn behave karel.thank u soo much sir for this blog ya blog mude mla samjhl ki,apan je deu tech aplyala parat midel.aani he blog vachlyanantr mla kahi goshti samjhlya .me sudha mazya svabhav sudharnyach nakki prayatn karel thank u sir.🙏
जीवन जगताना या पाच तक्रारी खूपच कॉमन असतात. त्या समजुन घेतल्या तर जीवन खूप सोपे आणि आनंदी होईल.
या तक्रारी कोणाचीही, कोणा विषयी असू शकते. पालक – मुलं, पती – पत्नी, विद्यार्थी – शिक्षक, सहकारी – मालक, कामगार, सासू – सून…. असे कोणतेही नाते असो आपल्या नेहमीच तक्रारी असतात…
1. “माझं कोणी ऐकूनच घेत नाही”
असे जेव्हा वाटते तेव्हा समजावे, आपण पण कोणाचे ऐकून घेतले नसेल. कदाचित डाव जेव्हा आपल्या हाती होता तेव्हा आपण आपल्याच तोऱ्यात असणार.
आता इथे ऐकून घेण्याचा दोन प्रकार असतात.
First, आपण धाक दाखवून, शिक्षा करून समोरच्या कडून सिस्टीम ची ठरवलेले काम करूनही घेऊ शकतो. पण परिणामी समोरच्या कधी ना कधी न करण्याच्या पळवाटा शोधूनच घेतो.
Second, जेव्हा आपण लोकांमधे जिव्हाळा चे नातं निर्माण करतो तेव्हा लोकं सिस्टम ची ठरलेली काम फक्त आपल्यासाठी करतात.
2. “मला कोणी समजावून घेत नाही ”
अशी तक्रार जेव्हा आपल्या मनाला वाटते, तेव्हा आपण आधी लोकांना समजुन घ्यायला हवे तरच, लोकं पण आपल्याला समजुन घ्यायला लागतील . समोरच्याला समजण्यासाठी आधी good speakers पेक्षा good listener बनावे लागेल.
3. “माझा कोणी मानच राखत नाही”
असे विचार जेव्हा आपल्या मनात येतात तेव्हा समजावे की, आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे. कदाचित आपल्याकडून ही तशीच वागणूक दिली गेली असेल. एखादा आपले तुसडेपणा चे बोलणे कारणीभूत असेल….
आपल्यामुळे लोकं प्रभावित होत आहेत की, अपमानित होत आहेत. याचा feedback घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपले वागणे positive करता येईल.
4. “मला कोणी सहकार्य करत नाही”
अशी तक्रार असताना आपण समजावे की, आपली काबिलियत असताना आपण कोणालाच सहकार्य केलेले नाही.
सहकार्य ही एक मानवी मनाची अवस्था असून एक संस्कार सुद्धा आहे. आणि ती एक सवय आहे. ज्यामुळे लोकं आपल्याला एक प्रेमळ व्यक्ति म्हणून स्मरणात ठेवतील.
5.” माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही”
प्रेम केल्याने होत नाही आणि जबरदस्तीने ते मिळवता येत नाही. असे असले, तरी निस्वार्थ प्रेम करणार्या व्यक्तीला संपूर्ण जग आहे. अश्या लोकांमुळेच जगात प्रेमाचे अस्तित्व अबाधित आहे.
लोकं नेहमी सहानुभूती मिळविण्याच्या मागे असतात,आणि ती सहज मिळते. तेच प्रेमासाठी पात्रता लागत असते.
या ब्लॉग मध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या
*आपली जशी पात्रता असेल, तशीच लोकं आपल्या आयुष्यात एंट्री करतात किंवा तशाच लोकांचा आयुष्यात आपण एंट्री करत असतो.
*कुदरत देती नहीं, लौटाती हैं!
*जीवन एक प्रतिध्वनि आहे. तुम्ही जे पाठवता, तेच परत येते.
तुम्ही जे पेरता, तेच कापता.
* तुम्ही जे इतरांमध्ये पाहता तेच तुमच्या मध्ये असते.
*प्रत्येक मनुष्य जन्मता :च पूर्णपणे स्वतंत्र आहे. त्याला प्रेम, वात्सल्य आवडते. म्हणून ते मिळवण्या आधी द्यायला हवे.
आपल्याला ज़र आपल्याला प्रेम करणारी, समजुन घेणारी, मदत करणारी, मान ठेवणारी व्यक्ति किंवा नाते हवे असेल तर, सुरवात आपल्या पासुन करायला हवे…..
तेव्हाच जीवनात आपल्याला जे हवे ते मिळवता येईल….
Thank you so much, sir या ब्लॉग साठी 🙏🙏😊
जेव्हा आपल्याकडे यशाची दुर्दम्य इच्छा असेल तेंव्हाच आपण यश मिळवू शकतो, त्याखेरीज दुसरे कोणतेही रहस्य नाही.”
जर आपणास आयुष्यात काहीही मिळवायचे असेल तर तीव्र इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा की आपणास जे मिळवायचे आहे त्यासंबंधी आपल्या डोक्यात सदासर्वदा (जळी, स्थळी, काठी, पाषाणी) त्याचाच विचार असला पाहिजे. जर तसे नसेल तर आपणास कदाचित उशीरा यश मिळेल किंवा कदाचित मिळणारही नाही. एक हिन्दी चित्रपटातील हा संवाद यश प्राप्तीसाठी लागू पडतो. “कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.” तसेच त्याच चित्रपटातील आणखीन एक संवाद “इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश कि है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है.”गरीब माणसाला मनापासून श्रीमंत व्हायचे असते. गरीब असलेलला माणूस एकवेळ श्रीमंत होण्याची इच्छा नसेल बाळगत, परंतु आपल्याला निश्चितपणे गरीबीतून मुक्त व्हायचे आहे याची इच्छा असतेच. गरीबीतच राहायचे आहे अशी व्यक्ती आपणास आढळणार नाही. दररोज अन्न मिळविण्यासाठी कोणताही संघर्ष करावा लागू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते.
लॉ ऑफ अट्रॅक्शन – आपल्या आयुष्यात जे काही घडत आहे ते आपणच आपल्या जीवनात इच्छित आहोत. आपण हे सर्व आपले विचार आणि स्मृतीतील प्रतिमाद्वारे आकर्षित करत आहोत. आकर्षणाचा नियम सांगतो की आपण ज्या प्रकारचे विचार आपल्या मनात करतो ते आपल्या जीवनात असेच विचार आकर्षित करतात. जर आपण सकारात्मक विचार केला तर आपण आपल्या जीवनात सकारात्मक विचार आणि सकारात्मक परिस्थिती असलेल्या लोकांना आकर्षित करतो. आपण नेहमी मनात नकारात्मक विचार ठेवल्यास आपण आपल्याकडे नकारात्मक विचार असलेल्या लोकांना आकर्षित करतो.
जेव्हा ध्येय हा शब्द येतो तेव्हा नियोजन तिथे सर्वात प्रथम येते. नियोजन केल्याशिवाय कोणतेही लक्ष्य साध्य होऊ शकत नाही. आपल्या उद्दिष्टांचे कोणतेही नियोजन नसल्यास भविष्यात आपण आपल्या ध्येयापासून विचलित होवू आणि आपले मुख्य लक्ष्य पूर्ण होणार नाही. म्हणूनच, यशासाठी आपण आपल्या ध्येयांची संपूर्ण योजना तयार करणे आणि नंतर आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी मनापासून एकत्रित होणे खूप महत्वाचे आहे. जर आपले ध्येय मोठे असेल तर आपण त्यास बर्याच लहान भागांमध्ये विभागू शकतो. अशाप्रकारे आपणास वेळापत्रक बनविण्याचा फायदा होईल जेणेकरून आपण आपला वेळ आणि शक्ती योग्य प्रकारे वापरण्यास सक्षम असू.
जेव्हा ध्येय हा शब्द येतो तेव्हा नियोजन तिथे सर्वात प्रथम येते. नियोजन केल्याशिवाय कोणतेही लक्ष्य साध्य होऊ शकत नाही. आपल्या उद्दिष्टांचे कोणतेही नियोजन नसल्यास भविष्यात आपण आपल्या ध्येयापासून विचलित होवू आणि आपले मुख्य लक्ष्य पूर्ण होणार नाही. म्हणूनच, यशासाठी आपण आपल्या ध्येयांची संपूर्ण योजना तयार करणे आणि नंतर आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी मनापासून एकत्रित होणे खूप महत्वाचे आहे. जर आपले ध्येय मोठे असेल तर आपण त्यास बर्याच लहान भागांमध्ये विभागू शकतो. अशाप्रकारे आपणास वेळापत्रक बनविण्याचा फायदा होईल जेणेकरून आपण आपला वेळ आणि शक्ती योग्य प्रकारे वापरण्यास सक्षम असू.जर आपणास मोठे यश हवे असेल तर आपण सतत प्रयत्न करत राहणे गरजेचे असते. सतत प्रयत्न करून, आपणास आपले ध्येय आणि उद्दीष्टांच्या छोट्या छोट्या गोष्टी कळतात. त्यामुळे जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करावयाचे असेल तर प्रयत्नातील सातत्य, चिकाटी आणि स्मार्ट वर्क या गोष्टी कामी येतात.
Thank you,Sir!
जीवनाला एक सकारात्मक वळण देण्यासाठी एक टर्निंग पॉइंट असतो ज्यातून आपलं जीवन पूर्णतः एक वेगळ्या दिशेला वळत अगदी त्याच टर्निंग पॉईंट सारखा हा ब्लॉग आहे यातील विचारांचा जोर किंवा यामध्ये मांडलेल्या विचारांची ताकद प्रचंड आहे ज्यातून आपल्या जीवनाचा रस्ताच बदलून जाईल. या ब्लॉग मध्य मांडलेल्या समस्या जवळपास प्रत्येकाच्या असतात प्रत्येक व्यक्ती ही तक्रार घेऊन रडगाणे करत असते. आणि मी पण या तक्रारीने ,या समस्येने ग्रासलेला होतो. अशा या समस्येतून बाहेर पडण्यासाठी हा ब्लॉग अत्यंत उपयुक्त आहे. ज्याप्रमाणे वाळवंटामध्ये एखाद्या थंड पाण्याचा झरा असावा तसा आप लोक समस्येच्या वाळवंटात अगदी गार पाण्याचा झरा म्हणून कार्य करतो.
वर दिलेले सर्व समस्या , तक्रारी दररोज कानावर येत असतात काही वेळेस आपल्या मनातूनही येत असतात या प्रश्नाचा उत्तर प्रत्येकालाच हवा असतं प्रत्येकाच्या आवडीचा हा भाग असतो यातून काहीतरी मार्ग मिळाला पाहिजे म्हणून प्रत्येक जण आपले हे तक्रारीचे लेबल घेऊन आपल्या मित्रांसमोर ,नातेवाईकास समोर, आई वडिलांसमोर, शिक्षकांसमोर अगदी निराशेने मांडत असतो, मी ही अशा समस्या माझ्या आईवडिलांकडे मित्रांकडे आणि समाजासमोर मांडलेल्या होत्या परंतु त्यातून मला समाधानी चे उत्तर मिळालेलं नव्हतं आणि त्याच उत्तराच्या शोधात असताना आपला हा ब्लॉग जणू काही ऑक्सिजन सारखा कामी आला आणि यातून तुम्ही दिलेल्या या प्रश्नांचा निराकरण अगदी माईंड मध्ये व्यवस्थित रित्या रुजलेलं आहे.
आयुष्यात कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी किंवा काहीतरी साध्य करण्यासाठी काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्यासाठी थोडं तरी देणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपली निर्मिती झाली ज्यामुळे आपण सध्या अस्तित्वात आहोत त्या निसर्गाचाच नियम आहे की काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी भेटत नाही म्हणून आपल्याला काही मिळवण्यासाठी “कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है l “. जी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे , ज्या गोष्टीपासून आपल्याला प्रचंड प्राप्त करायचा आहे त्या गोष्टीला आपण आपण मिळवण्याच्या अगदी काही टक्के जरी दिलं तर आपल्याला पाहिजे तेवढा भेटू शकते. जसं की शेतकरी पेरणीच्या वेळी मुठभर फिरतो म्हणजेच जमिनीला मूठभर धान्याची देणगी देतो आणि त्याच मोडवर धान्यातून जमीन काही दिवसातच पोत भर धान्य देते. या निसर्गासारखा जीवनाच सुद्धा असंच आहे की त्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रचंड कामगिरी करायचा आहे त्यातून प्रचंड यश मिळवायचा आहे आहे त्या क्षेत्रामध्ये असामान्य म्हणून नावाला यायचा आहे तर त्या क्षेत्रासाठी आपली मेहनत , आपल्या कष्ट देना गरजेचा आहे. तसंच कुणीतरी आपला ऐकून घेण्यासाठी आपण सुद्धा त्यांच्या विचारांची मान्यता राखणं महत्त्वाचं असतं. ज्यावेळी दुसऱ्याचा ऐकून घेण्याची सवय आपल्याला असेल आणि त्यांच्या म्हणण्याला आपण सन्मान द्याल त्यावेळी तुमचं म्हणणं लोक आपोआप आयकून घेतील आणि नुसता ऐकूनच घेत नाहीत तर त्यावर विश्वास ठेवून तुमच्या विचारांची आदर राखतील त्यासाठी लोकांच्या विचारला सुद्धा किंमत द्यावी लागेल त्यांच्या विचाराला सुद्धा आदर द्यावा लागेल तरच आपले विचार भरभराटीस येऊन लोक आपलं सगळं म्हणणं ऐकून घेतील आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनासारखे होतील यात शंका नाही.
आपल्याला आपण ठरवलेल्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त करत असताना किंवा एखादं क्षेत्र ठरवत असताना , आपल्या ध्येयाची निश्चिती करत असताना आपण फक्त त्या क्षेत्रात यश मिळवल्यानंतर त्यातून मिळणारं सुख त्यातून मिळणारा आनंद त्यातून मिळणारा पैसा याच बाजारात रमून जातो, खरंतर हे चांगलीच गोष्ट आहे परंतु फक्त त्या आनंदाने मोहन न जाता ते क्षेत्र आपल्याकडे येण्यासाठी त्यामध्ये यश प्राप्त करण्यासाठी त्यातला आनंद मिळवण्यासाठी त्यातून प्रचंड पैसा गोळा करण्यासाठी त्या या क्षेत्राला आपला वेळ आपली मेहनत आपले कष्ट आपली चाणक्य बुद्धिमत्ता देणे खूप गरजेचे आहे आणि जर आपण या सगळ्या गोष्टी देलो तरच कुठेतरी त्या बाजारामध्ये आपल्याला प्रवेश मिळेल आणि जीवनाचा उद्धार होईल.
ज्या गोष्टीला आपण समजून घ्यावी ती गोष्ट नक्कीच आपल्याला समजून घेते याच प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आपण आपल्या घरात असलेल्या मुक्या जनावरावर experiment करून बघा खरंच त्या बोलू न शकणाऱ्या जनावरांना सुद्धा किती भावना असतात हे मी अनुभवलेला आहे . सध्याला उन्हाळा असल्यामुळे आपणा सर्वांनाच पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासते आणि माझ्या घरात असलेल्या बैलांना सुद्धा खूप तहान लागलेली होती आणि त्यांचे भावना इतरांना कुणाला समजत नव्हते कारण दररोजच्या वेळेला त्यांना पाणी दाखवलेलं होतं परंतु या उन्हाळ्याच्या कार प्रचंड उन्हामुळे लवकर तहान लागणं सहाजिकच गोष्ट आहे. त्यातील एका बैलाला खूप तहान लागलेली होती अक्षरशहा त्याच्या तोंडातून फेस निघत होता म्हणून मी त्या बैलाच्या भावना ओळखू शकलो आणि त्याला नितांत गरज असलेल्या पाण्याची मी मदत केलो, आणि दुसऱ्याच दिवशी असंच बैलाच्या जवळच मी बसलेलो होतो आणि तिकडून कुत्र्याचा हल्ला माझ्यावर होत होता क्या होत असलेला हल्ल्याला मी मदत केलेल्या बैलांन झुगारून लावलं यातून सांगण्याचा हे एकच उद्देश आहे की आपण लोकांना समजण्यासाठी आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला लोक ओळखण्यासाठी आपलं सुख दुःख लोकांना समजण्यासाठी लोकांचे सुखदुःख आपल्याला समजून घेणे अत्यंत गरजेची बाब आहे.
आपली एक बिना कर्तव्याची अपेक्षा असते की आपल्या लोकांनी मान राखला पाहिजे आपला समाजामध्ये रुबाब असला पाहिजे, लोकांनी आपली वा वा केली पाहिजे, पण प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं पाहिजे असा विचार आपला असतो. परंतु त्यासाठी आपण लोकांचा आदर राखणे त्यांच्या विचारांचा सन्मान ठेवला ही बाब सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. जर आपण लोकांचा आदर राखल, त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं भरभरून कौतुक केलं, तर नक्कीच आपल्याला सुद्धा लोक किंमत देतील आणि आपला सुद्धा मान लोक राखतील आपल्याला आधार देतील यात शंका नाही .
मी एका व्यक्तीला अडचणीच्या वेळी फक्त एक वेळेस मदत केलं आणि तीच व्यक्ती मी अडचणीत असताना मला दहा वेळेस मदत केली त्या गोष्टीचं महत्त्व मला आजच्या ब्लॉक मधून समजून आलं की आपण जी गोष्ट इतरांना देतो मग ते मदत असो, प्रेम असो किंवा दोन गोष्टी सन्मानाच्या असोत. त्याऐवजी आपल्याला भरभरून पुढून येत असते. त्यामुळे जर आपल्याला इतरांनी सहकार्य करावे असं वाटत असेल तर आपण सुद्धा इतरांचा थोडीतरी मदत केली पाहिजे त्यांना अगदी थोडं तरी सहकार्य केलं पाहिजे, तरच आपल्याला प्रचंड पाठिंबा अमाप सहकार्य मिळत असतं ही गोष्ट आपल्या प्रभावी लेखनातून शिकायला मिळाली आणि नक्कीच सहकार्य प्राप्त करण्यासाठी आम्हीसुद्धा इतरांना सहकार्य करण्याचा प्रयत्न आतापासूनच करू.
एखाद्यावर दबाव टाकून किंवा एखाद्यावर सत्ता गाजवून प्रेम नावाची गोष्ट मिळत नसते तर ती मिळण्यासाठी आपल्याकडेसुद्धा तसेच मोकळं मन असावं लागतं ज्यातून प्रेमाची देवाण-घेवाण अवधीत सहजरीत्या झाली पाहिजे, ही तक्रार भरपूर जणांचे असत आहे आणि खरं प्रेम करण्यासाठी किंवा प्रेम मिळवण्यासाठी आपल्यालासुद्धा प्रेम देण्याची गरज आहे. गोष्टी प्रेमाच्या ऐकण्यासाठी किमान एक तरी गोष्ट प्रेमाची ऐकवंन आवश्यक आहे. जेवढे तुम्ही इतरांसोबत नाजूकतेने वागाल , प्रेमाने वागाल , बंधुभावाने आचरण कराल त्यावेळी तसाच replay yet असतो . Every action have reaction त्यामुळे ज्या गोष्टीची आपण पेरणी कराल तीच गोष्ट उगवणार आहे याची जाण असणे गरजेचं आहे.
या ब्लॉग मधील या सर्व समस्यांचे निराकरण करताना तुम्ही मांडलेल्या प्रत्येक शब्द अति महत्त्वाचा आहे त्यातून आपण जेवढे द्याल त्याला व्याज लावून आपल्याला मिळत असते ही शिकवण अगदी प्रभावशील पणाने मिळाली आणि खरंच या ब्लॉग चा अभ्यास केल्यानंतर आता देण्याची वृत्ती जागृत झालेली आहे आणि त्यातून नक्कीच फायदा होणार आहे या गोष्टीची जाणीव सुद्धा झालेली आहे ही जाणीव आमच्यामध्ये करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
मानवी जीवनाचं दर्शन घडवणारा हा ब्लॉग आदर्श जीवन जगण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे . आपणा सर्वांनाच प्रत्येक गोष्ट अगदी मुबलक प्रमाणात हवी असते परंतू ती आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपले आपल्या जीवनात उदासीनता प्रवेश करते आणि आपण नेहमीच चिडचिड करत असतो. मग हा चिडचिडेपणा दूर करण्यासाठी हा ब्लॉग त्यावर अतिशय उत्तम औषध असेल असे मला वाटते.
या जगामध्ये प्रत्येक गोष्ट अगदी मुबलक आहे. प्रत्येक गोष्टीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे.
आता आपल्याकडे पैशाची नेहमी चणचण असते परंतु आज जगाचा विचार केला तर जगामध्ये प्रचंड प्रमाणात पैसा असल्याचा दिसून येतो. आज आपण ऐकतो , किंवा वाचतो की आपल्या आजूबाजूला लाख कोटींचा व्यवहार चालेल असतो.
त्याचबरोबर Relationship
Health
Fun and joy
अश्या गोष्टीची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे असं असूनसुध्दा या गोष्टीचा आपल्याकडे दुष्काळ असतो हे असे का ? तर या का च उत्तर मला या तुमच्या अतिशय नामकिन लिखाणातून मिळाले आहे .
प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शंका असत वेगवेगळ्या समस्या असतात की, मला कोणी समजूनच घेत नाही, माझं कोणी ऐकतच नाही, मला कोणी किंमत देत नाही, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, रड गाणे आपल्या आजूबाजूला किंवा आपल्यामध्येच आपल्याला ऐकायला भेटतात. मग या गोष्टीचा विचार करत असताना आपण दुसऱ्या व्यक्तीला समजून घेतो का, दुसऱ्यांचा ऐकतो का आपण, आपण कोणाला किंमत देतो का,. आपण कोणावर प्रेम करतो का या बाबी लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचा आहे कारण निसर्गाचा नियमच आहे की तुमची जशी Action असेल तशीच त्यावर ती रreaction मिळेल . एखादा बॉल जेवढ्या गतीने तुम्ही एखाद्या भिंतीवर तीन माराल त्याच गतीने तो परत येत असतो. याचा अर्थ असा की आपण ज्या पद्धतीने कार्य करत असतो तसेच रिझल्ट आपल्याला दिसून येतात.
जग झपाट्याने विकसित होत आहे, प्रचंड ताकदीचं तंत्रज्ञान विकसित होत आहे, माणसांना चैनी करण्यासाठी वेगवेगळे सेवा सुविधा निर्माण होत आहे परंतु आताचा माणूस फक्त बाह्य अंगाने सुखी समाधानी आहे आणि मनात प्रचंड प्रमाणात तान तनाव दुःख चिडचिडेपणा ची गाळ साचलेली आहे. खरंतर ही गाळ काढण्याचे तंत्र विकसित झाले पाहिजे आणि मला वाटते सर तुम्ही ते कार्य करत आहात. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. प्रेमासारखी गोष्ट फक्त स्क्रीनवर अनुभवायला कशी मिळेल? त्यासाठी आपल्याकडेसुद्धा अशा गुणांची आवश्यकता असणे आवश्यक आहे आणि ती आवश्यकता निर्माण करण्यासाठी आम्हाला ही ई लर्निंग खूप फायद्याची ठरणार आहे. असा हा विचारांना वाचा फोडणारा ब्लॉग आमच्यासाठी दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.