-
मर्यादीत व ताठर समजुती, जीवन कशा नष्ट करतात? सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल.
आज जगात असंख्य लोकं २४ तासांपैकी कमीत कमी १२ ते १५ तास खूप मेहनत करताना दिसतात, मग ते एक कर्मचारी असोत की, अधिकारी असो, व्यावसायिक असोत की, भविष्यात काही बनण्यासाठी विविध परीक्षांची तयारी करणारी युवा पिढी असो.
इथे एक प्रश्न असा पडतो की, आपण मेहनत तर खूप करतोय, आपली पूर्ण क्षमताही पणाला लावतोय, दिवस-रात्र एक करतोय, रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करतोय, परंतु काही महिने, काही वर्षे संपल्यानंतर मागे वळून पाहिले असता, असे वाटते की, आपण थोडेतरी पुढे जायला पाहिजे होते ना, थोडेतरी जीवनात ग्रो करायला पाहिजे होते ना, परंतु असे फारसे होताना दिसत नाही की, आपण जिथून सुरुवात केली होती, तो दिवस आणि आजचा दिवस यामधील परिस्थितीत काही खूप फरक पडला आहे असे दिसत नाही, आपण आज देखील तिथेच रेंगाळत पडलोय, त्याच परिस्थितीत अडकून पडलोय, तेच करतोय जे आपण काही वर्षांपूर्वी करत होतो. आज असे वाटते की जीवनाचे सर्व एरिया एका ठिकाणी गोठले आहेत.
असे आपले का होत असावे आणि असे होण्याचे मुख्य काय कारण असावे? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात कधी ना कधी निर्माण होत असतो, हो की नाही?
आज जगात असंख्य लोकं २४ तासांपैकी कमीत कमी १२ ते १५ तास खूप मेहनत करताना दिसतात, मग ते एक कर्मचारी असोत की, अधिकारी असो, व्यावसायिक असोत की, भविष्यात काही बनण्यासाठी विविध परीक्षांची तयारी करणारी युवा पिढी असो.
काही वर्षांपूर्वी माझ्याही मनात हाच प्रश्न पडला होता. त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी थोडी शोधाशोध करायला लागलो, तेव्हा दोन रहस्ये हाती लागली, ती रहस्ये जेव्हा माझ्या जीवनात मी लागू करण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा माझे जीवन विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागले. तीच रहस्ये आजच्या ब्लॉगमधून मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे.
हा ब्लॉग जर तुम्ही शेवटपर्यंत वाचला तर, एक गोष्ट नक्की घडेल की, हा ब्लॉग वाचण्यापूर्वीचे तुमचे जीवन आणि वाचल्यानंतरचे तुमचे जीवन पूर्ण परावर्तित होऊ लागेल. ही तुम्हाला मी ग्वाही देतो.
हा रिसर्च करताना एक गोष्ट एकदम आठवली जी गोष्ट NLP गुरु वेद सर यांनी एका सेशन मध्ये सांगितली होती, त्यात ती दोन रहस्ये मला सापडली. त्यामुळे प्रथम ती गोष्ट तुम्हाला सांगत आहे. तुम्ही ती काळजीपूर्वक वाचली तर तुमच्या लक्षात येईल की, जीवनात आपली ग्रोथ अशी अचानक का थांबते? का खुंटते? याचे खरे उत्तर तुम्हाला मिळण्यास मदत होईल.
चला तर मग त्या गोष्ठीच्या दुनियेत….
एक माणूस असतो, त्याला ड्रिंक करण्याची सवय असते. एका संध्याकाळी आपला दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी एक दारूची बाटली विकत घेऊन नदीच्या काठी तो नशा करण्यासाठी विसावतो. नदीकाठी सगळीकडे गारवा पसरलेला असतो. त्या थंड हवेच्या वातावरणात मद्याचा आस्वाद घेऊन त्याला बरीच नशा चढते.
हळूहळू संध्याकाळ गडद होत जाते, आकाशात सर्वत्र चांदणं पसरतं, त्या मंद प्रकाशात आणि थंड हवेच्या लहरीत तो आकाशातील चांदणं मोजत बेधुंद नशेत जीवनाचा आनंद घेत असतो.
त्याच्या मनात अचानक एक विचार येतो. अशा मस्त आणि बेधुंद नशेत या वातावरणात त्याच्या शेजारीच नदीच्या काठावर उभ्या असलेल्या त्या बोटीला जर आपण नदीच्या पाण्यात चालवत नेली तर किती मजा येईल!!
असा विचार करून तो आपली पूर्ण ताकद लावून ती बोट नदीच्या पाण्यापर्यंत ढकलत ढकलत नेतो. शेवटी पूर्ण ताकदीने त्या बोटीला तो पाण्यात ढकलतो.
आसपास चीटपाखरू नसते. आता रात्रही बरीच झालेली असते. त्याला असे वाटत असते की, या जगात सध्या आपण एकटेच आहोत, अशा नशेच्या धुंदीत ती बोट दोन्ही व्हल्याच्या साह्याने, पूर्ण ताकद लावून तो जोरजोरात चालवत असतो. खूप चालवतो, खूप चालवतो.
रात्रभर खूप मेहनत करून ती बोट नदीच्या पाण्यात चालवताना त्याला खूप आनंद वाटतो.
आता हळूहळू रात्र संपून सूर्याची कोवळी किरणे नदीच्या पाण्यावर पडतात. रात्र संपून दिवस उजाडतो. त्याच्या बाटलीमधील मद्यही त्याने आता संपवले होते, त्याची नशा हळूहळू उतरली होती. तो आता शुद्धीत आला होता.
तो विचार करू लागतो की, आपण रात्रभर थंड हवेत व मंद प्रकाशात बोटीवर भरपूर प्रवास केला आहे, या विचाराने त्याला मनोमन आनंद झालेला असतो.
आता सगळीकडे उजाडले होते. तो चोहीकडे बघायला लागतो, रात्रभर बोट चालवत चालवत आपण कुठे पोहचलो आहे? कोणत्या दिशेला आलो आहे? याचा तो शोध घ्यायला लागतो. त्याला असे वाटत होते की, आता आपल्याला परत जायला पाहिजे, कारण आपण खूप पुढे निघून आलो आहे.
त्याच्या आजूबाजूला आणि त्याच्या पुढे पाणीच पाणी पसरले होते. तेव्हढ्यात तो मागे वळून पाहतो आणि स्वतःवर जोरजोरात हसू लागतो, कारण त्याच्या हे लक्षात येते की, रात्रभर त्याने खूप मेहनत केली होती. दोन्ही व्हल्याच्या साहाय्याने ती बोट त्याने खूप चालवली होती. परंतु ज्या चेन ने ती बोट बांधली होती, ती चेन किंवा साखळी त्याने सोडलीच नव्हती. ती चेन वेगळी न करता बोट मात्र रात्रभर चालवत राहिला. त्यामुळे तो कुठेच पोहचला नाही, तर रात्रभर काठावरच राहिला.
आता एक गोष्ट लक्षपूर्वक समजून घेऊया. ही गोष्ट फक्त त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीचीच नाही, तर ही गोष्ट त्या सर्व लोकांची आहे की, जे लोक जीवनात काही करण्यासाठी मेहनत तर खूप करत आहेत, परंतु आपल्या मर्यादीत आणि ताठर समजुतीची / मान्यतेची (Limited and Rigid Belief) जी चेन आहे, त्या मान्यतांना (Limiting Beliefs) खोलले नाही किंवा तोडले नाही. तर ते संपूर्ण जीवनभर कष्ट (efforts) करताना तर दिसतात, परंतु नंतर जेंव्हा त्यांचे डोळे उघडतात, सकाळ होते तेंव्हा त्यांच्या असे लक्षात येते की, आपण आजही तिथेच आहोत जिथून आपण आपला प्रवास सुरु केला होता. इंचभर सुद्धा आपण पुढे सरकलेलो नाही. याचे कारण जर कोणते असेल? तर त्या ताठर मान्यता, मर्यादीत आणि स्वीकारलेल्या समजुती किंवा मान्यता आहेत. त्या मान्यतांना सुरुंग लावणे अत्यंत गरजेचे असते. असे तुम्हाला वाटत नाही?
A Chain, That You Must Break. हे पहिले रहस्य या गोष्टीतून बाहेर आले.
दुसरे रहस्य असे की, त्या बोटीवरील व्यक्तीने मेहनत तर खूप केलेली असते, परंतु जे रिजल्ट पाहिजे होते ते मिळत नाहीत, रात्रभर बोट चालवून देखील तो त्याच जाग्यावर असतो, जिथून प्रवास सुरु केला होता. याचे दुसरे कारण म्हणजे त्या त्याला चढलेली नशा.
ही नशा फक्त त्याच व्यक्तीला चढलेली नाही तर, आपल्या आसपास असलेल्या अनेक लोकांना अनेक गोष्टींची नशा चढलेली तुम्हाला दिसेल.
कोणाला आपल्या पदाची नशा असते, तर कोणाला सत्तेची.,
कोणी व्रत-वैकल्ये, जप-तपाच्या नशेत आहेत, तर कोणी भोंदूगिरीच्या नशेत.
काहींना तर या गोष्टीची नशा आहे की, मलाच खूप काही येतं. मला सगळंच येतं, कोणाला काय विचारायचं? असं वाटत असतं.
कोणी आपल्या सौंदर्याच्या नशेत आहेत, तर कोणी भौतिकतेच्या नशेत.
कोणी इगो च्या नशेत आहेत.
काहींना आपल्या मेहनतीची नशा आहे, नुसते पळत असतात, त्यांना शेवटी कळते, दिशाच चुकीची निवडली होती.
अशा एक नव्हे, तर अनेक गोष्टींची नशा आहे.
बघा मग ह्या मर्यादीत समजुती आणि ही नशा आपल्या जीवनाला परिवर्तनापासून किती दूर लोटतात. त्या किती ताकदवान आहेत, हे तुमच्या लक्षात आलेच असेल, हो की ना?
सारांश :-
आपण जेंव्हा या सर्व दगडी / ताठर मान्यता व मर्यादीत समजुतींच्या (Rigid & Limiting Beliefs) बाहेर येऊ, तेंव्हा कुठे होश (Awareness) येईल आणि मग आपल्या जीवनाची बोट / जहाज आपल्याला पाहिजे तिथे नेता येईल, आणि तेंव्हा जीवनात काहीतरी वेगळे करता येईल. जीवनात जे हवे आहे ते मिळवता येईल.
तुम्हाला एक प्रश्न विचारू का ?
तुम्हाला असे वाटते काय की, ह्या मर्यादीत समजुती आणि मान्यतांचे साखळदंड खाडकन तोडायला पाहिजे?
तसेच ही वेगवेगळ्या गोष्टींची जी नशा चढलेली आहे ती चटकन उतरावी असे वाटते?
तर….
वरील दोन्ही गोष्टींची सविस्तर प्रक्रिया समजून घ्यावी, असे तुम्हाला वाटत असेल तर या ब्लॉग च्या खाली तुमची प्रतिक्रिया जरूर लिहून कळवा. मी नक्की ती प्रक्रिया यानंतरच्या ब्लॉग मध्ये मांडण्याचा जरूर प्रयत्न करेल.
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद!!🙏🙏
हा ब्लॉग तुमच्या आवडत्या लोकांना / विद्यार्थ्यांना / मित्रांना नक्की शेअर करा, काय सांगता येईल त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात तुमचा हा छोटासा प्रयास महत्वाचा ठरेल .
आणखी वाचा: आपले ध्येय नेमके कसे निश्चित करावे आणि ते कसे प्राप्त करावे?
आणखी वाचा: जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवावे? How to get what you want in life?
आणखी वाचा: जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे? How to live life as a warrior?
खुपचं वैचारिक व अर्थपूर्ण विवेचन..खरोखर प्रत्येकाला विचार करायला लावणारी पोस्ट आहे. धन्यवाद🙏🙏
अतिशय सुंदर व साध्या सोप्या सरळ पद्धतीने तुम्ही आम्हाला एका उदाहरणातून हे समजावून सांगितले की आपल्या आयुष्यात ताठर मान्यता व मर्यादित स्वीकारलेल्या गोष्टी ची Chain तोडणे किती महत्त्वाचे आहे, अन्यथा आपलीही त्या Drink करणार्या person सारखी स्थिती व्हायला वेळ लागणार नाही आणि मग आपण कितीही मेहनत केली, कितीही पळत राहिलो तरी त्याचा काही च उपयोग होणार नाही…!
“A Chain, That you must break.”
याद्वारे सर तुम्ही आम्हाला ती Chain कशी Break करायची हेही समजून सांगितले.
आणि “चढलेली नशा”
अशा या दोन रहस्यांद्वारे मला हे उलगडले की फक्त मेहनत करून व स्वतः च्या धुंदीत /नशेत राहून चालत नाही (Ego सोडून देवून सर्वांशी नम्रपणे politely वागता आले पाहिजे, ground to earth, humble राहता आले पाहिजे, हातात सत्ता आली तरीही माज न करता honestly and sincerely ती टिकवता ही आली पाहिजे, खूप मेहनत करण्या अगोदर ती योग्य दिशेने होतेय का ते Check करत राहिले पाहिजे, बाह्य सौंदर्याच्या आहारी न जाता त्या गोष्टी चा माज केला नाही पाहिजे कारण शरीर हे नाशवंत आहे आणि तुमचे व्यक्तिमत्व, कर्तृत्व हे तुमच्या बाह्य सौंदर्यावर कधीच अवलंबून नसते, काही लोकांना over confidenceची नशा असते, त्यांना वाटत फक्त त्यांनाच सगळ येत, तर अशा निरर्थक समजूती आणि नशेतून बाहेर येऊन लवकरात लवकर जागे होणे अत्यंत गरजेचे आहे) त्याच बरोबर आपल्या ला Progressive and positive thinking च्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे ( ताठर मान्यता आणि मर्यादित स्वीकारलेल्या समजूतींना सुरूंग लावून त्यातून बाहेर पडणे अत्यंत गरजेचे आहे) असे जर नाही केले तर त्या Drink करणार्या person ची जशी काय दिशा चुकली होती तशीच आपलीही चुकू शकते आणि यामुळे या गोष्टी आपल्या ला परिवर्तना पासून खूप दूर लोटतात, मग विचार करा आपले किती मोठे नुकसान होऊ शकते..!
Thank you so much sir for opening this Amazing platform for us..!
I have never ever read this type of Inspiring and Fabulous blogs in my life yet , and now I got that golden opportunity! And Now I’m also realising that I’m on the correct track and have beautiful Mentor (Kumare Sir) also!
Sometimes Students have lot of knowledge but they don’t understand exactly correct way to utilize it and achieve the goals step by step.
Due to this beautiful platform all students will definitely know the secrets to achieve success in life ! And one day Our Life Shodh family become very big and I know that every member of life shodh family will be successful person in their life!
आणि आम्हाला त्यासाठी योग्य दिशा दाखवण्याचे काम एक Mentor च करु शकतात जे की तुम्ही करताय आणि त्यामुळे
सर तुम्ही नेहमीच खूपच छान लिहिता . प्रत्येक ब्लॉग वाचल्यावर असं वाटतं की हा तुमचा बेस्ट ब्लॉग आहे पण त्यांच्या नंतर लिहीलेला त्यांच्या पेक्षा बेस्ट असतो . नवीन ऊर्जा आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन देणारा असतो .
आपण बऱ्याचदा स्वतः वर limitations घालून घेतो. अहंकार करतो आपल्या जवळ असलेल्या गोष्टींचा.कधी संपत्ती तर कधी खोट्या प्रतिष्ठेचा. पण कधीतरी शेवटी आपल्या लक्षात येते की आपण आयुष्यात आपल्याकडे निखळ आनंद देणार काहीच नाही आहे.
पण जेव्हा आपण आपल्याला हवं असलेल्या गोष्टी करतो . आपल्या अभ्यासातून वेळ काढून इतर आपल्या आवडीच्या गोष्टीला थोडावेळ देतो तेव्हा फक्त आपल माईंड फ्रेश होत नाहीतर आपल्याला नवीन ऊर्जा मिळते .
Break your chain , that you must break आणि चढलेली नशा (अहंकार ) हे दोन्ही रहस्य उलगडले.
Thank you sir for sharing your mind blowing thought with us.you always inspired us with your maigical thoughts.
सदरील ब्लॉग नुसता ब्लॉग नसून किंवा काहीतरी वाचण्याचा माध्यम नसून ते प्रत्येकाचं जीवन आहे. खरंतर आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखे hand Holder मिळाले . खरंच ही गोष्ट प्रत्येकाच्याच मनाला टोचवणारी असते की आपण काहीतरी करतोय पण ते आपल्या हातून होतच नाहीये जिथून निघालो होतो तिथेच आहोत असं प्रत्येकाच्या मनात किलबिल असतं आणि ते सत्य आहे. कारण तो प्रवास करत असताना आम्ही त्या प्रवासाची दिशा ठरवत नाही आणि प्रवास करण्यासाठी आपल्याकडे ती कौशल्य आहेत का किंवा त्याप्रकारची कौशल्य निर्माण करण्याची आपली तयारी आहे का ? याचा शोध आपण घेत नाही. त्यामुळे प्रवास दिशाहीन होऊन आपल्याला आपल्या मेहनतीचा रिझल्ट शून्य वाटायला लागतो. मग काही तरी करण्याची वृत्ती destroy व्हायला लागते. त्यामुळे जीवनाचा पार्ड होण्याच्या बाजूकडे झुकतं.त्यामुळे जीवनाचा प्रवास करत असताना त्या प्रवासाची दिशा आपल्या ध्येया नुसार आहे का? प्रवास करत असताना रस्त्यात आलेले अडचणीला सामना करण्याची किंवा तोंड देण्याची आपली तयारी आहे का याची परिपूर्ण काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्या बोटी सारखाच आपलं मन कुठेतरी बांधून असेल तर प्रवासाचा गाडा पुढे जाण्यास नक्कीच अडथळा निर्माण होईल. आपल्या मेहनतीचा रिझल्ट शून्यच दिसेल. जर यशस्वी जीवनाच्या सुरुवातीलाच सरांसारख्या व्यक्तीचं मार्गदर्शन असेल तर नक्कीच संकुचित आणि ताठर विचारांचा साखळदंड खाडकन तुटून निघेल आणि यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही.आणि सर तुमच्या या मौल्यवान मार्गदर्शनाने आमच्या जीवनातील संकुचित विचाराचे साखळदंड नक्कीच तुटणार आहेत. मनापासून धन्यवाद आणि अश्याच mind blowing विचारांची आतुरता.🙏
Nice article.. Thank you for Sharing 😊..
Excellent blog, Sir
काहीवेळेस असं होत की आपण खूप मेहनत करतोय पण आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळत नाही म्हणजे आपण यशस्वी होत नाही तिथं पर्यंत पोहचत नाही. प्रयत्न करून ही आपण आहे त्या ठिकाणी थांबलेले दिसतो.हे सगळे आपल्याला थांबवायचे असेल आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल आयुष्यात ग्रोथ करायची असेल तर आपण ज्या विचाराने किंवा साखळीने बांधले गेलो आहोत ती तोडून टाकली पाहिजे आणि दुसरे म्हणजे जी नशा आपल्याला चढलेली आहे त्यातून आपण बाहेर आले पाहिजे. ही 2 रहस्य आपण जीवनात apply केली तर आपल्याला जीवनात जे हवे आहे ते मिळवता येईल……
Sir, तुम्ही ही 2 रहस्य खूप चांगल्या पद्धतीने ऐका गोष्टी मधून आमच्या पर्यंत पहचवली…तुमचा प्रतेक ब्लॉग आम्हाला नवीन विचार करण्याची प्रेरणा देतो…आमच्या मध्ये बदल करण्यास प्रेरित होत….याचा आम्ही जीवनात नक्कीच apply करू.
Thank you so much sir 🙏🙏
Hello sir
आजच्या blog अप्रतिम आहे.
बर्याचदा आपण बघतो की दोन भाऊ असतात , त्यांना प्रॉपर्टी आणि संधी सारख्याच दिल्या जातात. दोघीही खूप मन लाऊन काम करतात. खूप मेहनत घेतात तरीही एक आहे त्याच ठिकाणी असतो आणि दुसरा खूप यशस्वी झालेले दिसतो. तर असे का? मेहनत आणि संधी सारख्याच पण परीणाम अलग असे का? असा प्रश्न जेव्हा मनात येतो तेव्हा बाहेरून हेच उत्तर मिळालेले आहेत की, नशीब, भाग्य, लक लागते. फक्त मेहनत करूनही फायदा नाही. जर नशिबात असेल तर मिळेल…..
आज जे तुम्ही नशेत असलेल्या माणसाचा उदाहरण सांगितले त्याच्यातून बरेच उत्तर मिळालेत, आयुष्यात फक्त मेहनत करून चालत नाही तर त्यासोबत पदाच्या, सौंदर्याच्या, धार्मिकतेचा, शिक्षणाचा असलेली नशा असते, चुकीचा, मर्यादित व ताठर समजुती असतात ज्या आपल्या प्रगतीच्या वाटेत साखळी च्या रुपात आपल्याला बांधुन ठेवतात . जे आपल्याला वेळ निघून गेल्यावर कळते.
आज हे शिकायला मिळाले की मर्यादित, व ताठर समजुती आपले जिवन कसे नष्ट करतात. आपल्याला awareness आणि योग्य समजुती किती महत्वाचे असतात.
आम्हाला आमच्या बेधुंद नशा आणि साखळ्या तोडायचा आहेत. त्या कशा तोडायचा आणि ओळखायचा हे तुम्हीच आम्हाला शिकवणार आहात ज्याने आमचे आयुष्य एकाच ठिकाणी न थांबता पुढे यशाच्या दिशेने जाणार आहे…
Thank you so much sir 🙏 अश्या प्रकारचे meaningful थॉट्स देण्यासाठी. 🙏🙏😊
खूप छान प्रकारे समजावून सांगितल sir तुम्ही!
मर्यादित समजूती म्हणजे विचार ,मते ज्यांना आपण पूर्ण सत्य मानतो.त्या समजूती ज्या आपल्याला पुढे जाण्यापासून व वैयक्तिक स्तरवर वाढण्यापासून थांबवतात.एखाद्याच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पाडतात. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळण्यापासून रोखणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुम्ही स्वत:ला सांगत असलेली कथा.तुम्ही स्वत:ला जे सांगता तोच तुमचा विश्वास असतो.तुम्ही जगाला कसे पाहता आणि तुम्हाला कसे वाटते यावर ह्या गोष्टींचा प्रभाव असतो.
बहुतेक मर्यादित समजूती ह्या आपल्या बालपणात आपल्या मनावर बिंबवल्या जातात.
आपल्या सर्वांचे मर्यादित विश्वास आहेत जे आपल्याला आपली स्वप्ने किंवा आपली रोजची उद्दिष्टे साध्य करण्यापासून रोखतात.त्या समजूती ओळखण्यासाठी आणि बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या self awarness वर काम करणे आवश्यक आहे.
“तुम्ही जगात जो बदल पाहू इच्छिता तो तुम्हीच असला पाहिजे.”
Thank you,sir!
सर, आजचा ब्लॉग जबरदस्त आहे. या ब्लॉगमध्ये तुम्ही सांगितले की जीवनात आपली प्रगती का थांबते किंवा आपली ग्रोथ का होत नाही? रात्रंदिवस कष्ट करूनही आपण उद्या त्याच जागेवर असतो. ज्या ठिकाणी सुरुवात केली आहे त्याच ठिकाणी राहतो. आपल्याला असं वाटतं की आपण ग्रोथ करायला पाहिजे, आपल्या जीवनात परिवर्तन व्हायला पाहिजे.आपल्याला माहित आहे की Change in life is life. आपल्या परिस्थितीत काहीही फरक न होतात त्याच स्थितीत अडकून बसलेलो आहोत. जे काही करत आहोत ते आपण काही वर्षांपूर्वी करायला घेतलं होतं. सगळ्या areas मध्ये आपण stuck झालेलो आहोत. त्या साठी काय करायचं याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ब्लॉगमधून मिळाले आहे. या ब्लॉग मध्ये सरांनी अतिशय महत्त्वाचे दोन रहस्य आपल्याशी शेअर केलेले आहेत.
1) A Chain, That You Must Break.
हे रहस्य आपल्याला एकदम सोप्या शब्दांत उलगडून सांगितला आहे की ड्रिंक करणारा व्यक्ती नशेच्या धुंदीत त्याने रात्रभर बोट पुढे ढकलण्यासाठी इतका प्रयत्न केला ,इतकी धडपड केली ,पूर्ण ताकद लावून ती बोट हलवली पण ती बोट जागीच राहिली. असे का झाले तर ज्या चेन ने ती बोट बांधली होती त्यांनी ती सोडलीच नाही. ती चेन वेगळी न करता तो रात्रभर बोट चालवत राहिला. त्यामुळे तो कुठेही पोहोचला नाही आणि बोट सुद्धा जागेवरच राहिली. असंच आपल्या जीवनात घडते.जीवनात काही करण्यासाठी मेहनत तर खूप करत आहोत, परंतु आपल्या मर्यादीत आणि ताठर समजुतीची / मान्यतेची (Limited and Rigid Belief) जी चेन आहे, त्या मान्यतांना खोलले नाही किंवा तोडले नाही संपूर्ण जीवन आपण कितीही कष्ट केले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही आपण जेथे आहोत तेथे आयुष्यभर राहू. आपल्याला हवे तसे जीवन जगायचे असेल तर ही ताठर मान्यता, मर्यादीत आणि स्वीकारलेल्या समजुतीची चेन break करावीच लागेल.
2) व्यक्तीला चढलेली नशा
त्या व्यक्तीला ड्रिंक ची नशा चढलेली होती. पण अशा वेगवेगळ्या गोष्टींची नशा व्यक्तींना चढलेली असते. मग ती नशा कुणाला दिसण्याची असेल आपल्याला सगळे येते याची असेल, तर कोणाला ego ची नशा असते. याच नशेत राहून चुकीचे मार्ग निवडतो. आणि आपण यशस्वी होण्या पासून खूप दूर जातो, आपल्या जीवनात परिवर्तन सुद्धा काहीच होत नाही. त्यासाठी आपल्या जीवनात येणारे हे drawbacks असतात ते आपण काढून टाकायला पाहिजे. मग आपण जीवनात यशस्वी होतोल आणि आपल्याला हवे तसे जीवन जगता येईल.
Sir, Thank you for this great blog.😊
अहंकारी को उसका अहंकार ही पीछे छोड़ देता है
ही गोष्ट अतिशय सोप्या भाषेत सर तुम्ही आमच्या समोर मांडली
या ब्लॉगमधून शिकायला मिळालेली गोष्ट म्हणजे
मर्यादित व ताठर समजुती आपले जीवन कशे नष्ट करतात
हल्ली नशा ही सर्वांनाच जडलेली आहे
मग ती मध्ये पाण्याचे असो अथवा आणखीन कोणत्या गोष्टीची
आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रयत्न निष्फळ होण्यामागचे सर्वात मोठे कारण हेच आहे मला समजले
दुसरी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो
पण प्रयत्न करताना आपण त्या गोष्टीसाठी किती पात्र आहोत हे लक्षात घेत नाही
प्रत्येक गोष्ट ही आपल्याला करायची असते पण जी गोष्ट आपण करत आहोत त्या मध्ये खरच आपलं मन रमत आहे का
आणि एवढं करूनही आपण एखादी गोष्ट करायला घेतली
तर आपल्या विचाराची जी साखळी आहे ते आपल्याला बांधून ठेवते
व्यक्तीला असलेला अहंकार
आणि विचाराने बांधून ठेवलेली साखळी
या दोन गोष्टी पासून आम्हाला योग्यवेळी तुम्ही सावध केलं आहे सर
सर तुम्ही लिहिलेल्या ब्लॉग मधून खूप काही शिकायला मिळतं
आणि सर आम्ही खूप भाग्यवान आहोत
आम्ही भरकटायच्या आदीच योग्य वेळी तुम्ही आम्हाला सावरून घेता कदाचित हा ब्लॉग आला नसता तर अनेक जण स्वतःच्या वेगळ्या नशेत राहिले असते
Thank you thank you so much sir
🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर आणि साधी सोपी ओघवती भाषा सरांनी मांडून आपल्याला जीवनात आपली ग्रोथ का होत नाही, याची रहस्य सांगितले आहे, त्यासाठी सरांनी दारू पिलेल्या मनुष्याचा छान उदाहरण देऊन समजून सांगितला आहे, म्हणजे या जगात खूप माणस आहे, प्रत्येकालाच वाटत असतं आपली प्रगती व्हावी, म्हणून सगळे जण खूप प्रयत्न करत असतात, विशेषता हे जग स्पर्धा योग बनले आहे, लाखो करोडो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची परीक्षेची तयारी करत आहे, आणि तसेच इतरही लोक ज्या ज्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे आहे, त्या क्षेत्रासाठी प्रयत्न करत आहे, परंतु प्रयत्न करत असताना आपल्याला एक नशा चढते, आपले प्रयत्न चालू असतात पण आपल्याला वाटते, आपण आत्ताच अधिकारी झालो, आणि त्या अधिकाऱ्याच्या रुबाबात आपण वागतो, आणि ती नशा चढून प्रयत्न कमी पडतात, तसेच इतरही काम करणारे लोक आहेत, प्रयत्न करता करता, आपण आपल्या यशाचे शिखर गाठले आहे असं वागून, प्रयत्न करत असतात, त्याच जागी थांबून त्यांना ही नशा चढते, कोणाला सत्तेची नशा चढते, तो माणूस सत्तेची नशा चढून तसा आविर्भाव दाखवायला लागतो , त्यामुळे माणसाने प्रत्येक वेळेस नम्रपणे राहून, इतरांशी नम्रतेने वागून, डाऊन टू अर्थ राहण्याचा प्रयत्न नक्की करावा, कारण चढलेली नशा कधीच पुढे नेत नाही, आहे, त्याला जागे वर ठेवते, असं मला ब्लॉक मधून समजले,
अप्रतिम ब्लॉग …..
आज पर्यंत नेहमी आपण जेव्हा काही गोष्ट करतो किंवा आपल्याला काहीतरी करायचं असतं तेव्हा आपल्याला वाटते की आता आपण खूप मेहनत करूया आपल्याला यश नक्कीच मिळेल पण जेव्हा आपण पुढे गेलो आणि नंतर आपल्याला कळतं की अरे आपण तर त्यात जागे आहोत …आपल्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही आपण जिथे होतो तिथेच आहोत या गोष्टीचा खरं कारण आता कळलं की आपण कितीही मेह
नत केली तरी आपले सर्व एका ठिकाणी गोठले आहेत….
ज्याप्रकारे तुम्ही सांगितलेल्या गोष्टीत … ती व्यक्ती ड्रिंक करते .. जगामध्ये काय चालू आहे त्या व्यक्तीला काही भाण नसते.. तो त्याच्या नशेत असतो.. त्याला भानच नसते तो काय करतोय तो कुठे आहे… खरंतर कधीकधी आपल्याजवळ होतं त्याला वाटतं की आपण आता आपण जे ठरवले ते आपण करतोय आणि आपण नक्की त्यात यशस्वी होऊ… परंतु आपल्या ज्या मर्यादित ताठर समजुती आणि मान्यता आहेत ते आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत तिचे नसते ती आपल्याला नेहमी बांधून ठेवते त्यामुळे आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या ने यश प्राप्त होत नाही…
जेव्हा आपण काहीतरी नवीन गोष्ट करतो काहीतरी आऊट ऑफ बॉक्स करण्याचा प्रयत्न करतो तेव्हाचे आपल्या मान्यता आहेत ते आपल्याला म्हणतात की तू चुकी करत आहेस कारण त्यांनी ते कधी केलेलं नसतं आपल्याला वाटतं की आपण करेक्ट आहोत की नाही….त्यामुळे आता वेळ आली आहे ती आपल्या ताठर मान्यता, मर्यादीत आणि स्वीकारलेल्या समजुती किंवा मान्यता आहेत. त्या मान्यतांना सुरुंग लावण्याची .
दुसरी गोष्ट म्हणजे नशा…. नशा ही फक्त पिणाऱ्या माणसाला चढत नाही तर ती.. खूपच ठिकाणी आपल्याला दिसून येते कोणाला सत्तेची नशा असते, कुणाला सौंदर्याची, कुणाला आपल्या पदाची तर कुणाला आपल्याला सर्व माहिती आहे या गोष्टीची.. एकदा पिणाऱ्या माणसाची नशा आपण उतरवू शकतो पण बाकीच्यांचं काय… आणि त्यांच्या या नशेमुळे ,अहंकारामुळे ते आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत
यामुळे आपल्या जीवनात होणारे परिवर्तन होत नाही…
त्यामुळे मान्य त्यांची साखळी तोडून. पुढे जायचे आहे यशस्वी व्हायचे आहे. आमच्या ज्या मान्यता आहेत किंवा जी नशा आहे जे अवगुण आहे ते सोडून यशस्वी व्हायचे आहे….
या ब्लॉग मुळे भरपूर च्या गोष्टी माहिती झाल्यात… सर असेच मार्गदर्शन आम्हाला मिळत राहिले तर आम्ही नक्कीच यशस्वी होऊ कारण आम्हाला असे गुरू मिळाले आहेत की जे फक्त मार्ग दाखवत नाहीत तर ते आमच्या चुका दुरुस्त करतात यशापर्यंत घेऊन जातात…
Thank you so much for wonderful…blog….
आम्हाला मार्गदर्शन मिळत राहिले तर आम्ही नक्कीच सक्सेसफुल
हा ब्लॉग हा फक्त ब्लॉग नाहीये तर ती वस्तुस्थिति आहे.
आजचा लेख वाचून विचार करायला भाग पाडल कि आपण ज्या रस्त्यावर चाललोय तो रस्ता योग्य तर आहे ना? आपण डोळे झाकून तर नाही ना चालत? जगात मेहनत तर सर्वच करतात, मीही बघितलेले आहे पण सर्व त्याच्या ध्येया पर्यंत नाही पोहोचत तर त्याच कारण आज मला समजल. आणि ह्या लेखामुळे आपण तर अश्या पद्धतीने नाही ना चाललो तर हे समजून घ्यायला मदत झाली आहे.
आपण जर आपल्या धुंदीत असू तर मित्रांनो सावधान…
जर आपण अश्या पद्धतीने चाललो असू तर ब्लॉग मधला व्यक्ति स्वतःवर हसत बसला होता पण आपल्याला रडण्याची वेळ येईल हे खरं.
जीवनात अहंकार हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे. त्यामुळे अहंकारा पासून दोन पाऊल लांब राहिलेलंच बरं कारण अहंकार हा असा रोग आहे कि जो यशस्वी असलेल्या माणसाला पण मातीमेळ करतो. अशे खूप मोठे मोठे उदाहरणं आहे आपल्याकडे.
या दोन गोष्टी आपल्या यशस्वी होण्याच्या अडचणी आहे आणि यांचा सामना आपण केला पाहिजे.
धन्यवाद।
धन्यवाद सर या ब्लॉग मध्येही गोष्ट अतिशय सोप्या भाषेत सर तुम्ही आमच्या समोर मांडली
या ब्लॉगमधून शिकायला मिळालेली गोष्ट म्हणजे
मर्यादित व ताठर समजुती आपले जीवन कशे नष्ट करतात
हल्ली नशा ही सर्वांनाच जडलेली आहे
मग ती मध्ये पाण्याचे असो अथवा आणखीन कोणत्या गोष्टीची
आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रयत्न निष्फळ होण्यामागचे सर्वात मोठे कारण हेच आहे मला समजले
दुसरी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो
पण प्रयत्न करताना आपण त्या गोष्टीसाठी किती पात्र आहोत हे लक्षात घेत नाही
प्रत्येक गोष्ट ही आपल्याला करायची असते पण जी गोष्ट आपण करत आहोत त्या मध्ये खरच आपलं मन रमत आहे का
आणि एवढं करूनही आपण एखादी गोष्ट करायला घेतली
तर आपल्या विचाराची जी साखळी आहे ते आपल्याला बांधून ठेवते
व्यक्तीला असलेला अहंकार
आणि विचाराने बांधून ठेवलेली साखळी
या दोन गोष्टी पासून आम्हाला योग्यवेळी तुम्ही सावध केलं आहे सर
सर तुम्ही लिहिलेल्या ब्लॉग मधून खूप काही शिकायला मिळतं एक नवी कल्पना नवी उमेद आणि खूप काही
माणूस आपल्या नशा मध्ये कसा गुंग असतो हे कळते. आज हे शिकायला मिळाले की मर्यादित, व ताठर समजुती आपले जिवन कसे नष्ट करतात. आपल्याला awareness आणि योग्य समजुती किती महत्वाचे असतात.
आम्हाला आमच्या बेधुंद नशा आणि साखळ्या तोडायचा आहेत. त्या कशा तोडायचा आणि ओळखायचा हे तुम्हीच आम्हाला शिकवणार धन्यवाद सर
आजचा ब्लॉग अत्यंत मुलाचा होता सर त्यामधून खूप काही कळलं जीवनाचे रहस्य ताठर समजुती आणि इतर काही आपण जीवनात पैशाच्या नशेत आहे की सौंदर्याचे नशेत आहो की इतर कोणत्याही गोष्टीच्या नशेत आहोत हे आपल्याला कळते अत्यंत मोलाचे शब्द आणि अत्यंत मनमोहक विचार शब्दरचना अत्यंत सोपी आहे आणि मनाला हवीहवीशी वाटणारी आहे ब्लॉग वाचताना आणखी समोर काय येणार हे जाण्याचे कुतूहल निर्माण होते ब्लॉक वाचतांना आपण स्वतःला थोडावेळ विसरून जातो आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहे ते कसे प्राप्त करायचे याची माहिती या ब्लॉगमध्ये होती आणि दारू पिणाऱ्या ची उदाहरण अत्यंत सुंदर होतं तो दारूच्या तालात नशेत एवढा मदमस्त होऊन जातो आणि त्याला माहीतच पडत नाही की आपण जी बोट किनाऱ्यावरून पाण्यात आली तिची आपण सोडलीच नाही आणि उगाच आपण मेहनत घेत आहे असेच जीवनात बहुतेक लोकशी होते माझ्या सोबतही झालं पण यावर मात करण्याचा मी प्रयत्न करणार धनवाद सर
पुन्हा एकदा एक अप्रतिम ब्लॉग वाचायला मिळाला. खूप छान माहिती मिळाली, सर. असेच लिहीत रहा..धन्यवाद!….
खरंच सर हा ब्लॉग वाचण्याच्या आधी मनस्थिती वेगळी होती आणि वाचल्यानंतर च्या विचारांची दिशा ही काही औरच झालेली आहे . खरंच माणसाच्या मनामध्ये खूप वेगवेगळे समजुती अगदी पष्यानासरखे असतात आणि तेच आपल्या विकासाची, आनंदाची , समाधानाची, काहीतरी भन्नाट करण्याची वाढ खुंटवत असतात . अश्या समजुती आपल्या Development ला मुंढ करत असतात. आणि या लोखंडासारख्या खणखर समजुतीला लाथ मारन्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सदरील ब्लॉग मधून sir तुम्ही अगदी सहजरीत्या आमच्या brain 🧠 पर्यंत पोहचवले आहे .
तुम्ही सांगितलेलं पाहिलं रहस्य तर अगदी मनाला टोचनार आहे . आणि खरंच जी गोष्ट त्या मद्य पेय करणाऱ्या माणसासोबत घडली बरोबर तशीच गोष्ट आपल्या प्रतेकासोबत घडली असेल किंवा घडतं असेल . आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड प्रमाणात मेहनत करतो हो , मग अशी ढोर मेहनत घेउन सुध्दा आपण जिथून आलो अहोत तिथेच असतो .आपली गत सुध्दा त्या बांधलेल्या बोटीसारखी होते . त्या गोष्टीमध्ये main fact काय आहे हे आपण समजूनच घेत नाही हे न समजून घेताच प्रचंड वेगाने आपण पळण्याचा प्रयत्न करतो मग तोंडावर तर पडणारच ना ! जर आपल्याला college येण्यासाठी उशीर झाला असेल आणि घाईघात आपण पूर्व देशेच बस स्टॉप सोडून पश्चिमेकडे खूप जोर जोराने धावत असा ल तर त्याचा रिझल्ट काय येईल? अर्थातच Minus मध्ये येईल त्यामुळे आपल्या कामाची योग्य दिशा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही दिशा मार्गदर्शित करण्यासाठी मला वाटते Life Shodh सारखा मौल्यवान platform दुसरीकडं कुठे भेटणार नाही.
खरंच या ताठर समजुती मग त्या कुणी आपल्यात रुजवले असतील किंवा आपल्यात निर्माण झालेले असतील त्या Delete करण खूप आवश्यक आहे . आणि ज्या वेळी आपण अश्या समजुतीच्या उरावर पाय ठेऊन वर येतो त्या दिवसापासून आपलं जगणं समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही अशी अति महत्वाची शिकवण या ब्लॉग मधून शिकायला मिळाली , सर तुम्ही सांगितलेली दोन रहस्य Mind blow करणारी आहेत . तुमच्या या प्रबोधनशील लेखनाला मनापासुन नमन आणि Heartly thanks
A Chain, That You Must Break , हा ब्लॉग वाचन्याच्या आधी मनस्थिती वेगळी होती आणि वाचल्यानंतर .कारण जेंव्हा आपण आपल्या धेयासाठी मेहनत करतो तेंव्हा आपल्याला कळले पाहिजे आपन कोणत्या दिशेने कष्ट करत आहोत ती बरोबर दिशा आहे का नाही आणि प्रत्येका मधे काही ना काही चांगली गुणवत्ता असते ती माहीती करून घेतली पाहिजे . धन्यवाद सर।
आदरणीय सर.. आपणं अत्यंत प्रभावी भाषेत , परिणामकारक असे ब्लॉग्ज लिहिता. तुमचे ब्लॉग्ज वाचल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बद्दल्याची भावना वाचकांच्या मनात तयार होते. नेहमी चर्चिल्या,बोलल्या न जाणाऱ्या महत्वाच्या आणि थोड्याफार क्लिष्ट पण उत्तम विषयाचे संतुलित विश्लेषण तुम्हीं ब्लॉग्जमधून करता.. lifeshodh च्या माध्यमातून इतरांच्या आयुष्यात सकारात्मक, आशावादी विचार निर्माण करण्याचे अतिशय कौतुकास्पद कार्य तुम्हीं करीत आहात. त्याबद्दल मनापासून आभार.. 🙏
आदरणीय सर.. तुम्ही अत्यंत प्रभावी भाषेत , परिणामकारक असे ब्लॉग्ज लिहिता. तुमचे ब्लॉग्ज वाचल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदल्याची भावना वाचकांच्या मनात तयार होते. नेहमी चर्चिल्या, बोलल्या न जाणाऱ्या महत्वाच्या आणि थोड्याफार क्लिष्ट पण उत्तम विषयांवर तुम्ही अतिशय संतुलित, अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडत असता ; त्यामुळे गोष्टी लवकर कळतात, समजतात आणि चांगल्या तऱ्हेने अंगिकारता येतात. Lifeshodh च्या माध्यमातून इतरांच्या आयुष्यात सकारात्मक, आशावादी विचारधारा निर्माण करण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम तूम्ही करीत आहात. त्याबद्दल मनापासून आभार .🙏
Excellent blog sir!
या ब्लॉगमधून हे शिकायला मिळाले की,मर्यादीत व ताठर समजूती आपले जीवन कसे नष्ट करतात.हा ब्लॉग वाचल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.
मर्यादित समजूती म्हणजे विचार ,मते ज्यांना आपण पूर्ण सत्य मानतो.त्या समजूती ज्या आपल्याला पुढे जाण्यापासून व वैयक्तिक स्तरवर वाढण्यापासून थांबवतात.एखाद्याच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पाडतात. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळण्यापासून रोखणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुम्ही स्वत:ला सांगत असलेली कथा.तुम्ही स्वत:ला जे सांगता तोच तुमचा विश्वास असतो.तुम्ही जगाला कसे पाहता आणि तुम्हाला कसे वाटते यावर ह्या गोष्टींचा प्रभाव असतो.
बहुतेक मर्यादित समजूती ह्या आपल्या बालपणात आपल्या मनावर बिंबवल्या जातात.
आपल्या सर्वांचे मर्यादित विश्वास आहेत जे आपल्याला आपली स्वप्ने किंवा आपली रोजची उद्दिष्टे साध्य करण्यापासून रोखतात.त्या समजूती ओळखण्यासाठी आणि बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या self awarness वर काम करणे आवश्यक आहे.
“तुम्ही जगात जो बदल पाहू इच्छिता तो तुम्हीच असला पाहिजे.”
Thank you,sir!
नमस्कार सर
सर, तुमचे प्रत्येक ब्लॉग्ज उत्तम असतात. कारण लिखाणाची मांडणी, सरळ सोपी भाषा, वाक्यांची रचना आणि एखादे उदाहरण देऊन त्या ब्लॉगचा सार समजावून सांगणे खूप छान वाटतं आणि हेच वाचकांना आकर्षित करते. या ब्लॉग मध्ये तुम्ही एक ड्रिंक करणाऱ्या व्यक्तीचे उदाहरण दिलेले आहे. आणि उदाहरणातून दोन रहस्य समजावून सांगितलेले आहेत.
जीवनात आपण खूप कष्ट करतो, रात्रंदिवस मेहनत करतो तरी आपली पाहिजे तेवढी ग्रोथ होत नाही. आणि आपण आहे त्या जागीच रेंगाळत बसतो. तसेच काही या drink करणाऱ्या व्यक्ती सोबत झाले. नशेच्या धुंदीत त्यानी रात्रभर अगदी पुर्ण ताकत लावून जोरात बोट चालवली. नशा उतरल्यावर त्याला समजते ती बोट काही जागची हाललेली नाही. कारण ज्या chain ने बोट बांधलेली असते ती chain त्यानी सोडलेली नसते, म्हणून तो कोठेही पोहचत नाही. आपल्या लाईफ मध्येही असंच होतं आपण किती कष्ट करतो, मेहनत करतो परंतु आपल्या मर्यादित आणि ताठर समजुतीची चेन आपण तोडत नाही ,आपणही त्याच जागी राहतो The chain, that you must break.हेच पहिलं रहस्य या ब्लॉग मधून आपल्याला मिळते.
दुसरे रहस्य म्हणजे व्यक्तीला चढलेली नशा. मग ती नशा पैशाची असेल, कोणाला सौंदर्याची असेल, कोणाला सगळेच काही येतं याची असेल, अशाचं नशेमुळे व्यक्ती चुकीचा मार्ग निवडतो आणि आणि ती व्यक्ती जीवनात काहीही करू शकत नाही आहे तिथेच राहते. जीवनात काहीतरी करायचे असेल तर आपल्याला ही मर्यादित आणि ताठरत समजुतीची चेन तोडली पाहिजे आणि आणि जी नशा चढलेली आहे ती उतरवली पाहिजे. मग लाईफ मध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ.
Thank you Sir☺
very amazing blog Sir !
आपण नेहमी हा प्रयत्न करत असतो की आपली आजची परिस्थिती उद्या असू नये. पण ज्यावेळी आपण मागच्या आयुष्यात वळून पाहतो तेव्हा दिसते की आपण तीथेच आहोत. खुप अभ्यास करून ही आपण ध्येयाच्या जवळ पोहचल्याची अनुभूती होत नाही. कारण एकच आपण स्वतःला घातलेल्या मर्यादा. कधी त्या इतक्या ताठर असतात की त्या आपल्याला पुढे सरकू देत नाही. ह्या ब्लॉग मध्ये सांगितलेल्या गोष्टीत माणसाला देखील मर्यादा निर्माण झाली आणि तो अथक परिश्रमाने ही पुढे सरकू शकला नाही. आपल्या जर ह्या मर्यादांमुळे न थांबता आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल आणि काही करून दाखवायचे असेल तर एक वाक्य नेहमी लक्षात ठेवावे लागेल ते म्हणजे A Chain, That You Must Break.
हे रहस्य जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात वापराल तेव्हा तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. यशस्वी होणे म्हणजे तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचं होते त्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात तर तुम्ही यशस्वी आहात. आयुष्यात बरेचदा आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी क्षमता असूनही गमावतो कारण आपण स्वतःला मर्यादा घालतो. त्या मर्यादा सोडून द्या आणि पहा तुम्ही किती आनंदी आणि समाधानी व्हाल.
ह्या ब्लॉग मधून समजलेलं दुसरे रहस्य म्हणजे कोणतीही नशा चढून न देणे. ज्यावेळी आपल्याला कोणतीही नशा चढते तेव्हा आपण आपल्या क्षमता गमावतो आणि तो कोणतेही कार्य करू शकत नाही. बोटीतील माणसाला चढलेल्या नशेमुळे हे लक्षात आले नाही की तो चूकीच्या दिक्षेणे प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे तो खूप प्रयत्न करून देखील त्याचं ठिकाणी राहीला. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची नशा चढून न देणे हे रहस्य आपल्या जीवनात लागू करणे गरजेचे आहे.
Thank you so much Sir for sharing your am thought with us 🙂
मर्यादीत व ताठर समजुती, जीवन कशा नष्ट करतात? हा ब्लॉग वाचला आणि mind मध्ये नव्या विचारांचा जन्म झाला. नव्याने तयार झालेले विचार आयुष्याच्या या सुस्तीला जागं करत आहे. आपल्यापैकी सर्वजण प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड मेहनत करत असतात. मग ते क्षेत्र शैक्षणिक असो किंवा कोणी एखादा व्यवसाय करत असेल किंवा कोणी जॉब वर असेल . प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रांमध्ये आपल्या प्रचंड मेहनतीतून यश मिळवण्याच्या या प्रयत्नात बिझी असतात. आता शैक्षणिक क्षेत्राचा विचार केला तर आपले विद्यार्थी मित्र मैत्रिणी मनामध्ये एक मोठं ध्येय ठेवून तिथे प्राप्त करण्याच्या आशेने प्रचंड मेहनत करत असतात रात्रंदिवस अभ्यास करत असतात डोळ्यात तेल घालून पुस्तकाच्या पुस्तक चाळत असतात एव्हढी ढोर मेहनत करून सुध्दा त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे यश आलेले दिसत नाही. आणि एखाद्या गोष्टीची आपण जीव तोडून मेहनत करून सुद्धा आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होत नसेल तर सहाजिकच आहे की आपल्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आणि हा तनाव प्रचंड शक्तिशाली असतो तो एवढा शक्तिशाली असतो की, त्या बहाद्दराने आपली आभाळाएवढी स्वप्ने , आपल्या जीवनाचा उद्देश आपण ठरवलेले ध्येय या सगळ्यावर पाणी ओतत हे सगळं काम हा तणाव करतो आणि यातूनच जीवन यशापासून मुकते.
हे 👆 आपल्या आयुष्यामध्ये का घडते? आपल्याला कठोर मेहनत करून सुद्धा अशा आहे त्या स्थितीला का जावं लागते? अशा अनेक प्रश्नाचा संच मनामध्ये खूप दिवसापासून तयार झालेला होता आणि या प्रश्नाचा निरासरण आपल्या या लाइफ चेंजिंग ब्लॉग मधून झालेला आहे. ज्याप्रमाणे तो व्यक्ती मद्यप्राशन करून त्या मध्याच्या नसे मध्ये बेधुंद झालेला होता अगदी तशीच नशा आपल्यालासुद्धा एखाद्या कामाची ची लागलेली असते आणि त्या नशे मध्ये आपण दिशाहीन प्रचंड वेगाने धावत असतो , कठोर मेहनत करतो परंतु त्या मेहनतीचा प्रवाह यशाच्या विरुद्ध असतो. हा विरुद्ध, दिशाहीन प्रवाहामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपले सर्वच ब्लॉग आणि लाइफ शोध कम्युनिटी हे तो प्रवाह बदलण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि गरजेचे प्लॅटफॉर्म आहे असे मला वाटते.
आपल्याला यशस्वी जीवनापासून रोखण्यासाठी आपल्या प्राप्तीच्या मार्गामध्ये गतीरोधक निर्माण करण्यासाठी अशा काही पाषाना सारखे समजुती आहेत त्यांच्यामुळे आपल्या जीवनाचा प्रवास आहे त्या जाग्यावरच असल्यासारखा वाटत तो मग या अतिशय कठीण समजुती कोणत्या आहेत? या प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपल्या लाईफ प्लॅटफॉर्मवरून आणि तुमच्या मार्गदर्शनातून हळूहळू कळत आहेत. त्याच्या हाताची साखळदंड ज्याप्रमाणे बांधलेले होते आणि तो व्यक्ती ते साखळदंड न सोडता ते जहाज पाण्यामध्ये घेऊन जाऊन रात्रभर त्या निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटत होता हे फक्त त्याला चढलेल्या नशे मुळेच . आपल्या आयुष्यामध्ये अशी जीवघेणी नशाच चढू द्यायची नसेल तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळी लाइफ चेंजिंग लर्निंग करणे अत्यंत गरजेची बाब आहे जे की , आम्हाला या सोन्यासारख्या प्लॅटफॉर्मवरून मिळत आहे.
आपल्यामध्ये असलेल्या आपल्या यशाबद्दल च्या त्या आखूड, Negative, कुजलेल्या विचारांचे साखळदंड खाडकन तोडून जीवनात आकाशाला गवसणी घालणारे यश प्राप्त करण्यासाठी स्वतः मध्ये असलेला गर्विष्ठपणा, आपल्यामध्ये असलेल्या ego बाजूला करून वेगवेगळी शिकण्यात ची शक्ती निर्माण करण्याची गरज आहे. आणि तशी इच्छाशक्ती की आपल्या आसपास असलेल्या वातावरणातून तयार होत असते . Sucess ला support करणारे वातावरण तयार करण्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या असतात.
१) ग्रंथ / पुस्तके- (Books):-
२) प्रसंग- Events / Programs:-
३) सम विचारी लोक आणि समुदाय- (Like-Minded People and Community):-
४)स्थळे / ठिकाणे (Places):-
५)वीडियो, पॉडकास्ट, सिनिमे, नाटके, गाणी आणि वेब सिरीज, – (Videos,
Podcastss, Movies, Dramas, Songs, Web Series, Painting.):-
६) मार्गदर्शक- (Mentors):-
वरील गोष्टीमुळे आपल्या आसपासचं वातावरण आपण ठरवलेल्या ध्येयाला पूरक ठरून यशप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करू शकते. आपल्या मनाचे नकारात्मक साखळदंड तोडण्यासाठी , आपल्या माइंड सेट मध्ये शोधक वृत्ती निर्माण करण्यासाठी, जीवनाचा एक उद्देश प्राप्त करून देण्यासाठी, आपला इकीगाई आपल्याला शोधून देण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक यशस्वी जीवनासाठी जणू काही ऑक्सीजन सारखे असतात.
आपल्याला चढलेली बेधुंद नशा, आपल्याला प्राप्त झालेला दिशाहीन वेग , आणि आणि सध्या आपली चाललेली नुसतीच तारांबळ रोखण्यासाठी आणि तिथून जीवनाला उमेद देणारी प्रेरणा देणारी दिशा आपल्या प्रवासाला प्राप्त करण्यासाठी Mentor चा role अती important असतो आणि यामुळेच आपल्या मध्ये जे काही संकुचित आणि कठोर विचार निर्माण झाले आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला यशस्वी होण्यात खूप मोठी अडचण निर्माण होत आहे त्या संकुचित आणि कठोर विचारांचं साखळदंड मेंटर किंवा मार्गदर्शक स्वतः तोडत असतात आणि आपल्या जीवनाचा जहाज मनसोक्त आनंद घेण्यासाठी, स्वर्गासारखे जीवन जगण्यासाठी push करत असतात. त्यामुळे आपल्याला यशस्वी होण्यापासून दुसरा कोणताच पर्याय नसतो.
सर हा ब्लॉग खरच माईंड blow करणारा आहे यामध्ये मी प्रत्येकाच्या जीवनाचा चित्र रेखाटलेले आहात आणि हे चित्र नक्कीच आम्हाला एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन जाईल यात काही शंका नाही . असा प्रबोधनशील , आमच्या विचारांना जागा करणारा विचार आमच्या पर्यंत पोहोचविलात त्याबद्दल मनापासून आभार 🙏
नमस्कार सर,
आजाचाही ब्लॉग फार बोधदायक आहे.
आज योग्य उदाहरण देऊन तुम्ही लिहिलेल्या ब्लॉग विषयी हे माझे आजचे मत.
असे काही विचार असतात या विचारांची सवयींची गरज खरंच मनुष्याला नसते. त्या गोष्टी किंवा त्यांचे विचार हे मानवाच्या ह्रासाकडे नेणारे असतात.
अशा विचारांना (limited beliefs) ला जर न जुमानता व्यक्ती चालत राहिला तर त्याचा नाष्टा हा अवकाळी कन्फर्म आहे.
अशा विचारांच्या साखळदंडातुन बाहेर पडणे खूप गरजेचे आहे. पण दुसर्या हाताला हे सर्व कठीण ही जाईल
कारण अगोदर चे विचार हे खूप दिवसांपासून मनावर बिंबविले असतात.
पण एका पुढील क्षमतेवर जीवन जगण्यासाठी या गोष्टींना आळ करता आलं पाहिजे.
“कमी काळात मिळालेली भरमसाठ संपत्ती ही त्या घराच्या लोक पावण्याकडे जात असते” प्रत्येक जण एका वेगळ्याच विश्वात असत, प्रत्येक जण आपापल्या नादात राहत.
पण या प्रत्येक गोष्टीला दिशा देणे गरजेचे आहे.
Great way makes you perfect than ever.
Positive way of work / think वापरला पाहिजे.
दिशा देण्यासाठी दिशा दर्शक गरजेचे असतात आम्हाला तुम्ही मिळतात it’s been proud to us.
वरील वरील दर्शवलेले हे दोन रहस्य मी नक्कीच अभ्यासात घेईन एका पुढच्या क्षमतेची जिंदगी जगण्यासाठी च्या तयारीसाठी मी तयार आहे.
आजचा ब्लॉग मला भावला
धन्यवाद…
आपला नम्र
रो. वि. शेळके
खूप छान प्रकारे समजावून सांगितल sir तुम्ही!
मर्यादित समजूती म्हणजे विचार ,मते ज्यांना आपण पूर्ण सत्य मानतो.त्या समजूती ज्या आपल्याला पुढे जाण्यापासून व वैयक्तिक स्तरवर वाढण्यापासून थांबवतात.एखाद्याच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पाडतात. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळण्यापासून रोखणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुम्ही स्वत:ला सांगत असलेली कथा.तुम्ही स्वत:ला जे सांगता तोच तुमचा विश्वास असतो.तुम्ही जगाला कसे पाहता आणि तुम्हाला कसे वाटते यावर ह्या गोष्टींचा प्रभाव असतो.
बहुतेक मर्यादित समजूती ह्या आपल्या बालपणात आपल्या मनावर बिंबवल्या जातात.
आपल्या सर्वांचे मर्यादित विश्वास आहेत जे आपल्याला आपली स्वप्ने किंवा आपली रोजची उद्दिष्टे साध्य करण्यापासून रोखतात.त्या समजूती ओळखण्यासाठी आणि बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या self awarness वर काम करणे आवश्यक आहे.
“तुम्ही जगात जो बदल पाहू इच्छिता तो तुम्हीच असला पाहिजे.”
Thank you,sir!
Excellent blog sir!
या ब्लॉगमधून हे शिकायला मिळाले की,मर्यादीत व ताठर समजूती आपले जीवन कसे नष्ट करतात.हा ब्लॉग वाचल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.
मर्यादित समजूती म्हणजे विचार ,मते ज्यांना आपण पूर्ण सत्य मानतो.त्या समजूती ज्या आपल्याला पुढे जाण्यापासून व वैयक्तिक स्तरवर वाढण्यापासून थांबवतात.एखाद्याच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पाडतात. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळण्यापासून रोखणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुम्ही स्वत:ला सांगत असलेली कथा.तुम्ही स्वत:ला जे सांगता तोच तुमचा विश्वास असतो.तुम्ही जगाला कसे पाहता आणि तुम्हाला कसे वाटते यावर ह्या गोष्टींचा प्रभाव असतो.
बहुतेक मर्यादित समजूती ह्या आपल्या बालपणात आपल्या मनावर बिंबवल्या जातात.
आपल्या सर्वांचे मर्यादित विश्वास आहेत जे आपल्याला आपली स्वप्ने किंवा आपली रोजची उद्दिष्टे साध्य करण्यापासून रोखतात.त्या समजूती ओळखण्यासाठी आणि बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या self awarness वर काम करणे आवश्यक आहे.
आपल्या जर ह्या मर्यादांमुळे न थांबता आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल आणि काही करून दाखवायचे असेल तर एक वाक्य नेहमी लक्षात ठेवावे लागेल ते म्हणजे A Chain, That You Must Break.
Thank you,Sir☺!
हो सर , नक्कीच आम्हाला आमच्या जीवनाच्या उद्देश प्राप्त करण्यासाठी आणि आम्ही ठरवले या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी या लोखंडासारखे अतिशय कठीण असलेले समजु तिचा साखळदंड तोडायचा आहे आणि आतापर्यंत कोंडून असलेलं जीवन मोकळा करायचा आहे त्या जीवनाला स्वतंत्र द्यायचा आहे आणि वाट्टेल ते करण्याच बळ त्यामध्ये निर्माण करायचा आहे त्यासाठी तुम्ही लिहिलेले ब्लॉग खूप मदत करत आहेत. आजच्या या ब्लॉग बद्दल बोलायचं झालं तर खरंच हा ब्लॉग जीवनात काहीतरी मोठा करण्यासाठी, सामान्यातून असामान्य होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे यामध्ये सांगितलेली गोष्ट खूपच प्रभावशील आहे त्या गोष्टी मधला प्रत्येक शब्द शिकण्यासारखा आहे आणि जर आपण हे दोन रहस्य आपल्या जीवनात लागू केली तर नक्कीच आपण आपण ठरवलेली Destination अगदी सहजतेने गाठू शकतो.
आपल्यापैकी प्रत्येक जण अतोनात मेहनत करत असते आणि आणि खरच आपण जेवढी मेहनत करतो त्यापेक्षा अगदी थोडे टक्केही रिझल्ट आपल्याला दिसत नाहीत खरं तर या गोष्टीचं कारण शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले होते कारण माझ्या आयुष्यात सुद्धा हाच सगळा बाजार चालू होता. मी एखादं काम करण्यासाठी अतोनात मेहनत करायचं परंतु या कामांमध्ये मला मला पाहिजे तेवढा रिझल्ट पाहिजे तेवढा आउटपुट दिसत नव्हता या कारणाचा शोध घेण्यासाठी मी आजपर्यंत अनेक व्यक्तींना भेटलो अनेक पुस्तके वाचली परंतु मला या प्रश्नाचा पुरेपूर उत्तर भेटलं नव्हतं आणि ही उत्तर आपल्या लाइफ चेंजिंग ब्लोग मधून आज मला मिळालेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा मनापासून धन्यवाद.
यशस्वी न होण्यामागचं कारण लक्षात घेता सर्वात मोठं कारण ही असावा असं मला वाटते कारण आपण कुठल्याही कामाची सुरुवात करत असताना आपल्या मनात इतरांनी काही समजुती रुजलेल्या असतात आणि या समजुती खूप कठीण पद्धतीने रुजवलेल्या असतात या रुजवण्याचा सर्व काम आपला स्वतःचा नसून इतरांचं असतं. आणि ते फक्त ते समजुती आपल्यामध्ये रुजवत नाहीत तर त्या समजुतीला खतपाणी घालून ते आपल्या मनात पक्या करत असतात आणि नाईलाजाने आपल्यालासुद्धा समजुतीच्या वातावरणामध्ये वावरावं लागतं आणि त्यामुळेच आपण आपल्या मनाच्या स्वातंत्र्याला तडा देतो आणि आख्ख आयुष्य तडजोडीने जगत असतो.
शा तडजोडीच्या जीवनापासून करण्यासाठी आपण दिलेल्या दोन सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहेत जर या सूत्राचा वापर करून आयुष्यात अगणित सोडवलं तर नक्कीच उत्तर हे स्वर्ग प्राप्त करून देणारा असेल. आपली ध्येयनिश्चिती करत असताना आपल्यामध्ये अशा काही समजुती रुजवलेली असतात की, आपला माईंड सेट सुद्धा त्या समजुतीच्या बाजूकडे वळतो जसे की आपल्याला आपलं करिअर निवडण्याची वेळ येते त्यावेळी आपल्याला मार्केट मधला जो trend ahe त्यानुसारच आपलं करियर ठरवल्या जाते आणि त्यामुळे आपल्या आनंदाचा आपल्या इच्छा आपल्या सुखाचा विचारच केला नसतो किंबहुना आपल्या कौशल्यांचा सुद्धा विचार केलेला नसतो आणि त्यामुळे असं लोकांना दिलेल बळजबरी ध्येय आपल्यावर येऊन पडतं आणि त्यातच ती आपल्याला झेपत नसलं तरी आपण जिवाचा आकांत करून त्यामध्ये ढोर मेहनत करत असतो परंतु त्या गोष्टीचा रिजल्ट आपल्याला दिसत नाही कारण जी गोष्ट करण्याची क्षमता आपल्याकडे आहे त्या गोष्टीच्या सर्व विरोधात हा सर्व उठा ठेवा चाललेला असतो.
आपल्याला यशापासून वाढवणारे कोणत्या समजुती असतील? या प्रश्नाचा प्रश्नांचा विचार केला असता तर यामधून मला काही उत्तर गवसली त्या पहिली ज्यावेळी मी माझं ध्येय निश्चित करत होतो त्यावेळी मला अनेक जण त्यांच्या सल्ल्यांचा भडीमार माझ्यावर केला त्यापैकी मी ठरवलेले ध्येय काहीजण नकारात्मक तिने बघून त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिली त्यापैकी तुला हे जमणार आहे का, आपल्या मध्ये अजून असं कोणी केला आहे का? , हे काम फक्त काही विशिष्ट लोकच करू शकतात असा घाणेरडा समाज आपल्यामध्ये उगवलेला असतो त्यामुळे आपला माईंड सेट तसाच तयार होऊन पण प्रचंड प्रमाणात यश मिळवण्यासाठी आपल्या मनात असलेली प्रचंड इच्छाशक्तीला मारतो किंबहुना सर्व जीवनच त्याठिकाणी गठित करतो.
याचेच गैरसमजाचे साखळदंड खाडकन तोडण्याची माझी सुद्धा इच्छा आहे आणि या बेसाल्ट खडकासारख्या कठोर समजुतीतून मुक्त होऊन मनासारखे जीवन जगायचं आहे आणि हे जीवन जगण्यासाठी मला तुमची तुमच्या विचारांची प्रचंड प्रमाणात मदत होत आहे त्याबद्दल खरच मनापासून आभार.
खूप छान प्रकारे समजावून सांगितल sir तुम्ही!
मर्यादित समजूती म्हणजे विचार ,मते ज्यांना आपण पूर्ण सत्य मानतो.त्या समजूती ज्या आपल्याला पुढे जाण्यापासून व वैयक्तिक स्तरवर वाढण्यापासून थांबवतात.एखाद्याच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पाडतात. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळण्यापासून रोखणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुम्ही स्वत:ला सांगत असलेली कथा.तुम्ही स्वत:ला जे सांगता तोच तुमचा विश्वास असतो.तुम्ही जगाला कसे पाहता आणि तुम्हाला कसे वाटते यावर ह्या गोष्टींचा प्रभाव असतो.
बहुतेक मर्यादित समजूती ह्या आपल्या बालपणात आपल्या मनावर बिंबवल्या जातात.
आपल्या सर्वांचे मर्यादित विश्वास आहेत जे आपल्याला आपली स्वप्ने किंवा आपली रोजची उद्दिष्टे साध्य करण्यापासून रोखतात.त्या समजूती ओळखण्यासाठी आणि बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या self awarness वर काम करणे आवश्यक आहे.
Thank you,sir!
नमस्कार सर,
या ब्लॉगमध्ये मर्यादित व ताठर समजुती जीवन कशा नष्ट करतात ? यावर विचार मांडलेले आहेत.
जीवनात आपण आपली क्षमता खूप use करतो पण त्यानुसार आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत. आपण खूप मेहनत , कष्ट करतो पण आपण आहे त्याच जागी राहतो. असे का होत असेल? त्याची दोन रहस्ये आपल्याला मिळतात.
एक म्हणजे आपण ताठर व मर्यादित समजुतींची जी चेन आहे त्यामध्ये अडकलेलो आहोत आणि दुसरं म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची चढलेली नशा. या दोन गोष्टींमुळे आपण आपला विकास करू शकलो नाही. ज्या ठिकाणापासून सुरुवात केली आहे त्याच ठिकाणी रेंगाळत पडलेले आहोत. त्यासाठी आपण दोन गोष्टी करायला पाहिजे.
1) आपल्या मर्यादित व ताठर समजुतीची जी चेन आहे ती तोडली पाहिजे.
2) कुठल्याही गोष्टीची जी चढलेली नशा असते ती उतरवायला पाहिजे.
या दोन्ही गोष्टी जर आपण आपल्या जीवनात apply / follow केल्या तर नक्कीच आपल्या जीवनात परिवर्तन होऊन आपण यशस्वी होऊ. आणि आपण जेवढं potential use करू result देखील तेवढाच मिळेल.
Thank you Sir ☺…
आपल्यापैकी प्रत्येकजन काहितरी नविन उद्देश घेउन या पृथ्वीतलावर जन्माला येतो. आणि तोच जीवनाचा उद्देश प्राप्त करण्यासाठी आपण वेग वेगळ्या ची निश्चिती करत असतो . जिवंत असतानाच स्वर्ग प्राप्त करण्यासाठी आपण वेगवेगळे पंचतारांकित स्वप्न बघत असतो . आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येक जण आपापल्या परीने अतोनात मेहनत करत असतो परंतु त्यातून आपल्याला पाहिजे तेवढी रिझल्ट येत असताना दिसत नाही. त्यामुळे आपल्यामध्ये निराशा नावाच्या गोष्टीचा शिरकाव होते आणि आयुष्याची राखरांगोळी व्हायला सुरुवात होते.
मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे आपण आभाळाएवढा स्वप्न पूर्ण करण्यासाठी असमर्थ बनत आहोत अशा कुठल्या बाबी आहेत की ज्यामुळे आपण एवढ्या प्रचंड प्रमाणात मेहनत करून सुद्धा आपल्यामध्ये प्रगती होत असताना दिसून येत नाही आपण ज्या ठिकानाहून आपल्या आयुष्याचा प्रवास करण्यासाठी निघालेलो होतो त्याच ठिकाणी असल्यासारखा अजून सुद्धा वाटते. का आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत नाही? अशा या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार करत असताना हा ब्लॉग त्यावर अत्यंत उपयुक्त आहे.
एक विद्यार्थी म्हणून कार्यरत असताना त्यातही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एक स्पर्धक म्हणून वावरत असताना मी माझा अनुभव सांगतो की, मी जर एखादे पुस्तक वाचण्यासाठी घेतलो ते पुस्तक वाचण्यासाठी मी खूप मेहनत घेतो अगदी डोळ्यात तेल घालून त्या पुस्तकाच पन् ना पान चाळत असतो परंतु थोडावेळ झाल्यानंतर मला अगदी काहीच भाग लक्षात असतो , एवढी मेहनत करून सुद्धा मला जेवढ अपेक्षित आहे तेवढ येश त्यामध्ये मिळत असताना दिसून येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे जे यश किंवा आपण केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला मिळत नसेल तर त्यातून आपल्याला त्या क्षेत्राबद्दल किंवा आपण करत असलेल्या कामाबद्दल Negativity आपल्या मनात निर्माण होते आणि जर एखाद्या गोष्टीविषयी Negative विचार जर आपल्या मनात तयार झाले तर त्यातून आपली कृती त्या क्षेत्राबद्दल नकारात्मक होऊन त्याचे रिझल्ट सुद्धा नकारात्मकच दिसून येतील यामुळे आयुष्याचा खोळंबा होत असतो.
तुम्ही जि या ब्लॉग मध्ये गोष्ट सांगितलात ती गोष्ट खरंच आपल आयुष्य बदलणारी आहे आपण सर्वजण एका नशे मध्ये बुडालेले आहोत काही न स्पर्धा परीक्षा देऊन त्यामधून अधिकारी होऊन प्रचंड पैसा त्यातून मिळणारा लाभ सत्ता मिळवण्याची नशा चढलेली आहे तर काहींना त्यांच्याकडे असलेल्या थोडाफार ज्ञानाच्या गर्वाची नशा चढलेली आहे आणि हीच नशा आपल्या आयुष्याचा सत्यानास करण्यास कारणीभूत ठरत असते. ज्याप्रमाणे मद्यप्राशन करून नशेत प्रवेश केलेल्या व्यक्तीला त्यावेळी उत्सुकता त्याच्याकडे होती तसेच उत्सुकता आपल्याकडे सुद्धा सुरुवातीला असते आणि आपण सुद्धा त्या गोष्टीचे मूळ किंवा त्या गोष्टी बद्दल थोडाफार सुरुवातीला जाणून घेण्याऐवजी डायरेक्ट कामाला सुरुवात करतो आणि कोणत्याही कामासाठी त्या कामाचा अभ्यास आपल्याला माहिती असणे आवश्यक असते आणि तोच बेस विचारात न घेता आपण त्या नशेतील व्यक्ती सारखं आपल्या आयुष्याची जहाज खूप दूर दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावेळी आपल्यालासुद्धा अधिकारी होऊन त्यातून मिळणार्या लाभाची नशा चढलेली असते त्यामुळे आपण काय करत आहोत याची जाणीव होत नाही आणि ज्यावेळी जाणीव होते त्यावेळी आयुष्याचा इंटरवल झालेला असतो त्यामुळे त्यावेळी काही फायदा होत नाही म्हणून सुरुवातीलाच आपण कोणत्याही क्षेत्रात घुसण्या आधी त्या क्षेत्राचे मूळ लक्षात येणार गरजेची बाब आहे.
आपल्यामध्ये अशा काही दगडासारखा कठोर समजुती असतात , अशा काही ताठर मान्यता असतात की त्यामुळे आपण करत असलेले काम आपण प्रचंड मेहनतीने करून सुद्धा त्यात रिझल्ट आपल्याला दिसत नाहीत. मग अश्या समजुती कोणत्या ? ज्या समजुतीने आपल्याला बांधलेला आहे त्या समजुती आपण जर ओळखलात तर आपल्या आयुष्यात अशी कधीच वेळ येणार नाही की आपण मेहनत करून आपल्या रिझल्ट दिसणार नाहीत. ह्या समजुती कोणते असतील? याचा विचार करत असताना खालील बाबी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
ज्यावेळी आपण आपलं करिअर निश्चित करत असतो त्यावेळी करियर निश्चितीच्या वाट्यांमध्ये आपल्या पेक्षा इतरांचा सहभाग मुख्यत्वेकरून जास्त असतो , आणि इतरांच्या मदतीने आपले करिअर निश्चित झाल्यामुळे जी इतर लोक आहेत ती लोक फक्त मार्केटमधल्या trend महत्त्व देत असतात आणि तो trend आपल्याला झेपो या ना जेपो आपल्यावर ती बळजबरीने लादल्या जाते आणि ती पुर्ण करण्याची कौशल्ये तिची क्षमता आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला त्यामध्ये आणि आल्यानंतर आपल्या आजूबाजूची लोकच आपल्यामध्ये अश्या काही समजूती निर्माण असतात की , ज्यामुळे आपल्या मध्ये असलेली काम करण्याची क्षमता आपोआप कमी व्हायला लागते आणि त्यामुळेच आपल्याला रिझल्ट दिसून येत नाहीत. यामध्ये अशा समजुती असतील- एखाद्या क्षेत्रामध्ये थोडास अपयश आल्यानंतर आपल्याला चहुबाजूने एकच वाक्य ऐकायला येतं की तू आयुष्यात काहीच करू शकणार नाहीस , तुझ्याकडे ती करण्याची क्षमता नाही या अशा समजुतीमुळे आपण जे काम करतो त्या कामावर हा पूर्णपणे फोकस राहत नाही त्यामुळे तिथे रिझल्ट कमी येतात.
आपल्याकडे दुसरी समजूत असते की एखादा काम विशिष्ट लोकांनीच करायचा असतं , ते काम आपल्यासाठी नाही ते काम करण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा लागतो आणि तो पैसा आपल्याकडे नाही आशा समजुतीमुळे आपण आपल्याला जे साध्य करायचा आहे त्या कामाच्या सुरुवातिच्या आधीच खचलेलो असतो आणि अशा समजुती डोक्यात घेऊन जर आपण कार्य करत असावे त्यामध्ये आपलं माईंड याच समजुती वर वर आणत असतं त्यामुळे आपण मेहनत करून सुद्धा आपल्याला फळ मिळत नाही म्हणून यासाठी एक उपाय आहे की, ह्या जे आपल्या काही ताठर समजुती आहेत त्या समजुती पहिल्यांदा आपण नष्ट केल्या पाहिजेत आणि पुढील कार्याला प्रारंभ केला पाहिजे या अतिशय ताठर असलेल्या मान्यतेचा साखळदंड खाडकन तोडून टाकला पाहिजे तरच आपल्या आयुष्याचं जहाज सुद्धा पुढे जाऊन जीवनातल्या सुंदर आशा चंद्र तारे चांदण्या या सर्वांचा आनंद घेईल म्हणून या समजुती तात्काळ आपल्या मधून डिलीट करणे आवश्यक बाब आहे.
आपल्या या प्रभावशील ब्लॉक मधून अतिशय महत्वाची बाब शिकायला मिळाली यातून नक्कीच जीवनाला एक वेगळा मार्ग मिळालेला आहे आणि ज्या मार्गाचा उपयोग यशापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे खरंच आपण जर आपल्या आपल्यामध्ये असलेल्या नकारात्मक आणि अतिशय कठीण समजुती मान्यता नष्ट केलं तर आपण करत असलेल्या कामाबद्दल आपल्याला एक नवी ऊर्जा मिळून आपण यश्याची उत्तुंग शिखरे गाठऊ शकतो असे हे माईंड blow करणारे विचार आमच्या पर्यंत पोहोचल्या बद्दल मनापासून धन्यवाद