योग्य करियरची निवड कशी करावी?

Spread the love

योग्य करिअरची निवड कशी करावी? हा प्रश्न सोडवण्यासाठी हा ब्लॉग तुम्हाला मदत करेल.

ज्यांचा आपल्या करियर निवडीच्या बाबतीत गोंधळ आहे. त्या सर्वांसाठी आजचा ब्लॉग अत्यंत महत्वाचा ठरणारा आहे.

Blog Content:-

१) योग्य करियरची निवड कशी करावी?
२) ध्येय ठरवण्यामध्ये कोणाचा हात जास्त असतो?
३) कोणत्या गोष्ठीकडे आपण आकर्षित होत असतो?
४) स्वतःच्या स्वप्नांचे काय?
५) ८+८+८=२४ तासांचे काय केले जाते?
६) करियर निवडीचे बेस्ट मॉडेल कोणते आहे?

जगात करियरच्या असंख्य संधी उपलब्ध असून त्यातील आपल्यासाठी नेमके कोणते करियर योग्य आहे हे निवडणे आज अत्यंत कठीण काम झाले आहे.

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीचे काम करायला मिळावे असे वाटत असते, परंतु समाजात/मार्केटमध्ये काही खास गोष्टींचा ट्रेंड चालू असतो, त्याकडे आकर्षित झाल्यामुळे आपली आवड बाजूला ठेवावी लागते व त्याच्यामागे पळावे लागते किंवा पळायला भाग पाडले जाते. त्यामुळे जी गोष्ट करायला आवडते ते करता येत नाही व ज्याच्या मागे आपण पळत असतो ती सापडत नाही, शेवटी बेरोजगारी हाती लागते.

१) योग्य करियरची निवड कशी करावी?

आपल्या जीवनात दोन गोष्ठी नियोजन (Arrange) करून दिल्या जातात. एक म्हणजे विवाह (Marriage), दुसरे म्हणजे करियर (Career).

वरील दोन्ही गोष्टींचा विचार केला तर त्या आपल्या व्यक्तिगत जीवनाशी निगडीत असतात. ज्यांच्या सोबत आपले संपूर्ण आयुष्य आपल्याला घालवायचे असते, परंतु १०० पैकी किती लोकांना ती निवड करण्याची संधी मिळते? तर उत्तर मिळेल, खूपच कमी. होय की नाही?

२) विवाह आणि करियर ठरवण्यामध्ये कोणाचा हात जास्त असतो?

वरील दोन्ही गोष्ठी ठरवून देतांना काही लोकं आपल्याला प्रभावित (Influence) करीत असतात तर काही लोकं दबाव (Pressure) टाकत असतात. यांमध्ये आपण सोडून इतरांचाच सहभाग मुख्यत्वेकरून असतो त्यात आपले पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार, शाळा, महाविद्यालय इ. चा समावेश असतो, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

हे ठरवून देताना काही गोष्टींचा संदर्भ त्यांच्याकडे असतो तो म्हणजे समाजात सगळीकडे चालू असलेला विशिष्ठ ट्रेंड होय.

३) कोणत्या गोष्ठीकडे आपण आकर्षित होत असतो? किंवा आपल्याला आकर्षित केले जाते?

प्रत्येक कालखंडात समाजात किंवा मार्केटमध्ये काही विशिष्ट गोष्टींचा ट्रेंड चालू असतो आणि त्याच गोष्टींचे आपल्यामध्ये आकर्षण निर्माण केले जाते. असे काही भासवले जाते की त्याच्या व्यतिरिक्त करियर म्हणून दुसरी गोष्ट जगात अस्तित्वातच नाही.

जसे की, ऐकेकाळी शेती पहिल्या नंबरवर, व्यवसाय दुसऱ्या व नोकरी तिसऱ्या नंबरवर होती. आज हा ट्रेंड बदललेला दिसतो, आज शेती आणि व्यवसाय दुय्यम झालेत आणि केवळ नोकरी हाच एकमेव पर्याय उरलेला आहे, हेच चित्र सर्वदूर बघायला मिळते. यामध्येही नोकरी म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवणे हाच एकमेव पर्याय आज योग्य मानला जातो.

इंग्रज आपल्या देशातून गेलेत परंतु कारकुन बनवणारी मानसिकता आपल्यात एव्हढी रुजवली की इतर करियरचे पर्याय जसे उद्योग, व्यवसाय, आधुनिक शेती यातील नवीन नवीन कौशल्ये (Skills) आत्मसात करण्याची आजच्या युवकांना गरजच वाटेनाशी झाली.

ज्यांना हे कळते ते आपल्या आवडीच्या क्षेत्रातील कौशल्य अवगत करतात, शिकतात, उद्योग सुरू करतात, पडतात, आणि परत नव्या दमाणे उभे राहतात. यांची संख्या मात्र आज अतिशय अल्प आहे.

४) स्वतःच्या स्वप्नांचे काय?

स्वतःची आवड-निवड, स्वतःचे स्वप्न, उपजत टॅलेंट याचा विचार करायला कधी वेळच मिळत नाही. त्यामुळे आयुष्याचा मध्यांतर (Interval) होईपर्यंत हे लक्षातच येत नाही आणि कोणी आणून पण देत नाही. नंतर लक्षात येऊनही फायदा होत नाही, कारण आता फार उशीर झालेला असतो. तेंव्हा अशा परिस्थितीत नवीन काही करण्यासाठी जुने सोडतापण येत नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी काहीशी स्थिती निर्माण झालेली असते.

५) ८+८+८=२४ तासांचे काय केले जाते?

दिवसाचे २४ तास विभागले तर, पहिले ८ तास कुटुंबासाठी, दुसरे ८ तास जॉबसाठी / कामासाठी आणि तिसरे ८ तास झोपेसाठी असतात, असे ग्रुहीत धरून नीट निरीक्षण केले तर २४ तासांचे काय होते याची कल्पना तुम्हाला आली असेल. यातील प्रत्येक ८ तासांची शिफ्ट सारखीच महत्वाची आहे. यातील एक जर चुकले तर सगळीकडे त्याचा परिणाम होऊ लागतो. याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्या आसपासच्या लोकांचे थोडे निरीक्षण करून बघा.

एखाद्या व्यक्तीने चुकीचे काम / जॉब (Career) निवडले असेल तर त्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी सर्वच गोष्ठी चुकीच्या वाटायला लागतात, बॉस चुकीचे वाटतात, सहकारी चुकीचे वाटतात, तेथील वातावरण चुकीचे वाटायला लागते, त्यांची सतत कुरकूर चालू असते, हे नाही, ते नाही, हे खराब, ते खराब अशी ते रि ओढताना दिसतील.

हे प्रकरण इथेच थांबत नाही तर घरापर्यंत येते. बॉस ची तक्रार आपल्या पत्नी किंवा पतीला सांगितली जाते. हीच तक्रार ते इतर ठिकाणी व्हायरल करीत फिरताना दिसतील. यातूनच राग या भस्मासूराचा जन्म होतो. एकाचा राग दुसऱ्यावर, दुसऱ्याच्या तिसऱ्यावर अशी माळ तयार करीत जीवन कसेतरी रडत रडत घालवत असतात. अशा परिस्थीतीत कामावर किती लक्ष लागणार? हे तुम्हीच सांगा? त्यामुळे प्रगती होणार काय? तर याचे उत्तर कदापी नाही, हेच असणार आहे, होय की नाही?

इथे एक गोष्ट म्हणजे करियर चुकीचे निवडले तर संपूर्ण जीवनच चुकीचे / अवघड वाटायला लागते.

तुम्ही म्हणाल की आवडीचे काम निवडले तर, बॉस, सहकारी व जोडीदार हे चांगलेच मिळतील हे कशावरून सांगता येईल? याचे उत्तर म्हणजे, ते चांगले जरी मिळाले नाहीत, तरी तुमचा फोकस त्यांच्यातील सर्व चांगल्या गोष्टींवर व आपल्या कामावर राहील व आपल्या आवडीच्या कामाने तुम्ही त्यांचे लक्ष नक्की वेधून घ्याल. त्याच वातावरणात तुम्ही तुमची प्रगती होताना बघाल, हे मात्र नक्की घडेल.

मग एक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल, की तुमच्या आवडीचे काम / जॉब / करियर निवडण्यासाठी असे कोणते तंत्र आहे? कोणती पद्धती आहे? होय ना?

६) करियर निवडीचे बेस्ट मॉडेल

तेच मॉडेल आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. त्या मॉडेलला इकिगाई (IKIGAI) मॉडेल असेही म्हणतात.

मित्रांनो, २०१९ मध्ये हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलस लिखित इकिगाई नावाचे जगप्रसिद्ध पुस्तक मी वाचले आणि मला हे जगप्रसिद्ध सूत्र सापडले.

या पुस्तकात जपान मधील ओकीनावा बेटावरील लोकांच्या दीर्घायुषी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचे रहस्य सांगितले आहे.

यामध्ये असं म्हटलं आहे कि, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला एक उद्देश (Purpose) असतो आणि तो जीवन जगण्याचा उद्देशच अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचे कारण ठरतो.

खालील पाच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालीत तर योग्य करियर नक्की सापडू शकेल. ते प्रश्न काळजीपूर्वक समजून घेऊया.

१) असे कोणते काम आहे की, ते करायला तुम्हाला मनापासून आवडते?
२) असे कोणते काम आहे की, जे तुम्हाला चांगले येते?
३) असे कोणते काम आहे की, जगाची एखादी गरज तुम्ही भागवू शकता?
४) असे कोणते काम आहे की, त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील?
५) असे कोणते काम आहे की, ते केल्यामुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळते?

सारांश:-

वरील पाच प्रश्नांची उत्तरे जर मिळाली तर आपल्याला आपल्या आयुष्याचा उद्देश सापडेल आणि आपले जीवन आनंद आणि समाधानानी पूर्णपणे भरलेले असेल.

तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद!!

हा ब्लॉग तुमच्या आवडत्या लोकांना / विद्यार्थ्यांना / मित्रांना नक्की शेअर करा, काय सांगता येईल त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात तुमचा हा छोटासा प्रयास महत्वाचा ठरेल .

आणखी वाचा: आपले ध्येय नेमके कसे निश्चित करावे आणि ते कसे प्राप्त करावे?

आणखी वाचा: जगात ५ ℅ लोकंच फक्त यशस्वी होतात याचे रहस्य काय आहे? What’s the secret that only five percent of people in the world succeed?

आणखी वाचा: यशस्वी जीवनसाठी विक्री कौशल्याचे काय महत्व आहे? What is the Importance of Selling Skill for Successful Life?

आणखी वाचा: माणूस आपल्या उपजत कौशल्य आणि कल्पनांवर काम का करत नाही? Why are people not working on our talent and ideas?

आणखी वाचा: आपला शोध आपणच घेतला तर जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. No one can stop you from succeeding in life if you do your own research.

आणखी वाचा: जीवनात जे हवे आहे ते कसे मिळवावे? How to get what you want in life?

आणखी वाचा: जीवनात एक योद्धा किंवा वॉरियर सारखे कसे जगावे? How to live life as a warrior?

जीवन बदलून टाकणारे पुस्तक- इकिगाई मराठी, इकिगाई इंग्रजी


Spread the love

47 thoughts on “योग्य करियरची निवड कशी करावी?”

  1. सर आपले ब्लॉग खूपच छान आहे आपल्या जीवनात योग्य मार्ग निवडण्यासाठी हा ब्लॉग निश्चितच सर्वांची मदत करेल ब्लॉग मध्ये लिहिलेले वाक्य अगदी मनाला घडते मनात प्रश्न निर्माण करते आपण ज्या करिअरच्या मार्गावर आहोत त्या मार्गात त्या कामात आपली आवड आहे का ? असा प्रश्न ब्लॉग वाचल्यावर निर्माण होतो आणि त्यावरून सर आपले एवढे प्रभावशाली लेखन मनात एक छाप सोडून जाते ब्लॉग मध्ये तयार केलेले प्रश्न 8+8+8=24 ची रचना आज पर्यंत माहीतच नव्हती आपण निवडलेले करिअर योग्य आहे का ? आणि योग्य असेल तर त्यामध्ये आणखी काय चांगल्या करू शकतो हे समजते आम्हाला असे मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    Reply
  2. Sir करियर choose करताना आपण व्यक्ति केंद्रित कशा पद्धतीने होते किंवा व्हायला पाहिजे?

    Reply
  3. सदरील लेखामधून धेय कसे निश्चीत करावे हे तर कळलेच पण याच बरोबर आपल्या सप्नांचा , आवडीचा ऱ्हाज्ञ कसा इतर लोकांकडून केले जाते हेसुध्दा समजल . त्याचबरोबर मार्केट मधल्या विशिष्ट गोष्टीचा जो ट्रेंड असतो त्या गोष्टीपासून लांब जाऊन आपल्या स्वप्नाला धेयाला कश्याप्रकारे अग्रेसर बनवायचं हे तुम्ही दिलेल्या पाच प्रश्नांच्या उत्तरातून मिळते. अचूक करिअर निवडण्यासाठी हा तुमचा लेख अतिशय प्रभावशाली असेल यातून एक नवं मंत्र आत्मसायला मिळते ज्यामुळे व्यक्ती आपलं ध्येय नक्कीच योग्य निवडेल. यामधून नक्कीच स्वतच्या टॅलेंट ला आवडीनिवडी ल वाव मिळून तेच एक अपल करिअर होण्यास वावग ठरणार नाही.

    Reply
  4. सर तुमचे लिखाण अप्रतिम आहे🙌. आणि तुम्ही ज्या वेगवेगळ्या संकल्पना मांडतात, जसे इकिगाई मॉडेल , २४ तासांची रचना या गोष्टी विचार करण्यास भाग पाडतात आणि आम्ही खूप काही आत्मसात करतो. नवीन वाचायला मिळते.
    Thank you Sir अशा ब्लॉग्ज साठी. 👌👌👌

    Reply
  5. Excellent blog Sir!!! विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय निश्चित करण्यासाठी किंवा ते त्यांच्या आवडीचे आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी या blog चा उपयोग त्यांना होईलच पण त्यांच्या जीवनाला योग्य दिशा सुद्धा मिळेल म्हणजे ज्या विद्याथ्यांनी आत्तापर्यंत फक्त नातेवाईक व कुटुंबाचे ऐकून त्यांच्या career चे निर्णय घेतलेत ते हा blog वाचून स्वतःच स्वतःला प्रश्न विचारायला लागतील आणि स्वतः साठी योग्य काय आहे हे त्यांना कळेल व ते त्याची निवड करतील आणि जे आता career च्या बाबतीत निर्णय घेणार आहेत ते हा blog वाचून दुसर्‍यांची मतानुसार किंवा समाजात काय trend चालू आहे याचा विचार न करता त्यांना आवडणाऱ्या विषयात career निवडतील..!
    सर तुम्ही blog मधे सांगितल्या प्रमाणे व्यसाय करणारी लोक आज आपल्याला खूप कमी दिसतात आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे समाज कारण लहानपणापासून च शिक्षण घेताना असं शिकवल जातं की तुला खूप शिकून छान gov. Job /नोकरी करायची आहे पण असं कोणच म्हणत नाही की तुला जर दुसर काही करायच असेल तर कर आम्ही बरोबर आहोत उलट त्याला emotional blackmail करतात (For example :-
    एखाद्या ने ठरवल की businessकरायचा किंवा start up चालू करायचा आणि त्याने असा विचार जरी घरचे अथवा नातेवाईक समोर मांडला तर त्याला हे दाखवून दिलं जाते की याच्यात यश मिळेलच याची गॅरंटी नाही, आणि business चललाच नाही तर नंतर काय करणार तू, तो शेजारच्या काकूंचा मुलगा बघ छान पगाराची सरकारी नोकरी करतो त्यांनी कालपरवाच एक नवीन घर घेतलय शहरात आणि तू, नोकरी साठी अभ्यास तयारी करायची सोडून हे काय असलं start up वगैरे, फलाना डिमकाना असे सल्ले आसपासचे लोक देत असतात तुला करायचच असेल business तर तू कर पण तुझ्या जबाबदारी वर, अशा धमक्या ही दिल्या जातात जेणेकरून त्याने तो विचार सोडून नोकरी करण्याचाच विचार करावा आणि त्यामुळे काही लोक घाबरून योग्य decision न घेता तेही नोकरीच्या मागे धावतात, )
    मला वाटत की लोकांचा mindset आणि विचार करण्दूयाची दूरदृष्टी च कुठे तरी हरवून गेलीय आजच्या काळात, समाजातील लोक आणि पालक Materialistic things लाच जास्त महत्त्व देतात आणि त्याकडे आकर्षित होऊन जीवनातील निर्णय घेतात आणि त्यामुळे मग नंतर नोकरी करताना त्यांना असं वाटायला लागते की ८ तास job+८तास कुटूंब, जबाबदार्‍या आणि ८ तास झोप =२४ तास यात दिवस निघून जातो आपण स्वतःला तर वेळच देत नाही आहोत, मग नंतर ती नोकरी ही नकोशी वाटायला लागते आणि त्यामुळे राग, चिडचिड वाढते पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते म्हणून च मला असं वाटतं की उच्च शिक्षण घेऊन ही नोकरी म्हणजे च दुसऱ्या च्या हाताखाली काम करणे कारकून (माझा असा आक्षेप अजिबात नाही की नोकरी करणे वाईट आहे, पण त्यात आपल्याला रूची, आवड असली पाहिजे नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते) म्हणून काम करण्या पेक्षा, समाजातील लोक काय म्हणतात किंवा पालक नातेवाईक काय म्हणतील हे विचार थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून स्वतःला काय आवडतं, कोणते काम केल्यावर आनंद होतो आणि त्यातून पैसे ही मिळतात याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्या आणि स्वतः साठी जगा कारत career साठी जे काही निवडाल, जे काही निर्णय घ्याल नंतर ते तुम्हाला स्वतःलाच करायचे आहे, तिथे नातेवाईक, पालक आणि समाज येणार नाही तुमच्या मदतीला..!
    खूपच सुंदर blog आहे सर, अप्रतिम !!!
    खूप लोक career विषयी निर्णय घेताना गोंधळून जाऊन चुकीचे निर्णय घेतात पण हा blog वाचून ते योग्य च निर्णय घेतील असं मला वाटतं ..!
    सर तुमचे blog वाचून नेहमीच एक स्फूर्ती, प्रेरणा आम्हाला मिळते आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला right direction भेटते…
    Thank you so much Sir
    असेच छान छान blog लिहीत रहा आणि आम्हाला ते वाचून आमच्या जीवनात खूप खूप यशस्वी होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळत राहो…!

    Reply
  6. Dear Sir,
    It is another masterpiece of work from you. Stepwise guidance for someone who needs direction.
    Personally, time management skills are really valuable.

    Congratulations for your efforts.
    Keep writing.
    Best wishes..
    Regards
    Vijay Kasture

    Reply
  7. Excellent ahe blog… 🤞🏻👍👌सर बेस्ट कॅरिअर निवडण्यासाठी नक्की उपयोगी पडेल.. तुम्ही नेहमी नवीन संकल्पना घेऊन येत असता त्याचा खूप फायदा होणार आमच्या भविष्यासाठी… Sir ur great man.. Ur motivational person… याचा मी नक्की उपयोग करून घेणार आहे माझ्या bright future साठी… Thank you so much sir… 👍

    Reply
  8. आपली आवड ज्या गोष्टीत असेल ती गोष्ट आपण आवडीने पुर्नत्वाकडे नेऊ शकतो. आणि आज हा ब्लॉग वाचल्यावर एक गोष्टं शिकायला मिळाली ती म्हणजे ” जीवन हे आपलं आहे ते जगयचही आपल्याला आहे मग आपल्या जीवनाचे निर्णय हे आपणच घेतले पाहिजेत.”. आज काल चे पालक आपल्या मुलांना काय बनवायचे याच नियोजन त्यांच्या जन्माला यायच्या आधी पासून ठरवायला सुरुवात करून देतात . पण हे खरंच योग्य आहे का?
    खरं तर सचिन तेंडुलकर च्या आइ- वडीलांनी जर हट्ट केला असता कि माझ्या मुलाला शास्त्राज्ञ च बनवायचं तर कदाचित सचिन तेंडुलकर सारखा महान खेळाडू या देशाला प्राप्त झालाच नसता. सचिन तेंडुलकर बारावीला नापास झाला पण त्याच बारावीच्या पुस्तकात आज त्याचा धडा शिकवला जातो . जर सचिन तेंडुलकर ने तेव्हा स्वतःत काय गुण आहे , आपली आवड कशात आहे, आपली काय करण्याची क्षमता आहे, हे ओळखुन नसते घेतले तर आज कदाचित आपण त्याचे नाव घेत नसतो . म्हणून आज मि शिकलो ते म्हणजे आपल्या करियर ची निवड हि आपण आपल्या आवडी नुसार करायची दुसऱ्याला बघून नाही .
    आपण बघतो कि एखादया व्यक्तीला त्या फिल्ड मध्ये जास्त प्रसिद्धी मिळते आहे .तर आपण हि तिकडेच त्याच फिल्ड कडे आकर्षित होतो आणि ह्याच गोष्टीमुळे च अपयश हाती येत कारण त्या फिल्ड चा गुण तो आपल्यात नसतोच.
    आपले जे स्वप्न आहे त्यात आपली आवड आहे का? , ते आपण करू शकतो का?, याच गोष्टीवर अवलंबुन असत कि आपण यशस्वी होणार कि नाही आणि हा ब्लॉग वाचताना मला एक अगदीच नवीन दिवसाचे 24 तासाचे नियोजन कसे करता येऊ शकते हे आज शिकायला भेटले. म्हणजे मी या आधी अशी कल्पनाही केलेली नव्हती कि 8+8+8=24.
    या सुत्रा मूळे आपल्या पूर्ण दिवसाचा हिशोब लागतो कि केव्हा आपला वेळ वाया जात आहे, केव्हा कामी येत आहे . आणि या सुत्रातुन आपण लवकर आपले 24 तासा पैकी 24 तास कामी आणू शकतो . तर आजच्या ब्लॉग मुळे मला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला भेटल्या.
    तुमचे खूप खूप आभारी सर कारण महापुरुषांनी म्हंटलेले आहे कि जीवनात जर जास्त प्रगती करायची असेल तर सर्व अनुभव स्वतः घेऊन प्रगती करता येण शक्य नाही त्या साठी दुसऱ्याच्या अनुभवातून तुम्ही शिकत गेलात तर जास्तीत जास्त उंच शिखरावर पोहोचू शकता.
    आणि हे ब्लॉगस् वाचून तो वेळ आपल्याला आपल्या जीवनात लागणार होता तो अनुभव आपण ब्लॉग वाचून मिळवू शकतो.

    खूप खूप आभारी सर, धन्यवाद!

    Reply
  9. लाईफ मध्ये काय निवडावे, , तसेच दिवसाच्या चोवीस तास चे गणित कसे असते हे सांगितले. आणि ब्लॉक मधला इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे, जर आपण आपल्या आवडीची गोष्ट निवडली तर आपण ती गोष्ट आनंदाने स्वीकारून त्या गोष्टीवर फोकस करतो.आणि आपण स्वीकारलेली गोष्ट जर आनंदाची असेल तर त्यातून काय फायदे आणि तोटा होतात हे इतरांनाही शेअर करतो. म्हणजे आपल्या मनाला पटते ते आपण करावे. आणि त्यातून समाधान घेऊन एक चांगलं जीवन जगता येईल. असा संदेश या ब्लॉगमधून मिळत आहे. Thank u so much sir ..🙏🙏🙏🙏

    Reply
  10. Very effective and inspiring writing sir. Really useful for making positive changes in the lives of young people. Thank you very much. Sir, I have completed MA English and I am currently preparing for the competitive exam. Please guide me.

    Reply
  11. Very effective and inspiring writing sir. Really useful for making positive changes in the lives of young people. Thank you very much. Sir, I have completed MA English and I am currently preparing for the competitive exam. Please guide me sir.

    Reply
  12. While I was reading the blog I felt like I am reading something extraordinary about choosing a future carrier .the way sir express their attitude towards carrier choices was really admirable.It inspired me to read IKIGAI book . Ones you read the blog your perspective towards choosing your aim will definitely chage.expecting more such blogs from sir to give perfect direction to students Carrier.confused minds of students will surely normal about their carrier by such valuable information.thank you so much sir for sharing your valuable thoughts with us …

    Reply
  13. सर तुम्ही ब्लॉग मध्ये नमूद केलेला प्रत्येक मुद्दा हा करियर निवडताना मदत करणारा आहे किंवा निवडलेल्या करियर चा विचार करायला लावणारा आहे.आपण निवडलेले करियर हे कोणत्याही trend ला आकषिर्त होऊन किंवा पालक , नातेवाईक यांच्या दबावाखाली येऊन न निवडता. जे काम करण्यात आपल्याला आनंद मिळतो त्याच कामाची निवड केल्यास आपण काम करताना थकत नाही आणि आपले काम अजून चांगले होण्यासाठी प्रयत्न करतो.तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि मी निवडलेले करियर हे माझ्यासाठी योग्य आहे हे कळले.
    Thank you sir for inspiring me

    Reply
  14. खरच सर तुम्ही life changing ब्लॉग लिहितात
    व्हेरी मी जे काही वाचलं त्यातून मला दोन ते तीन गोष्टी नक्कीच समजल्या
    एक आपलं करिअर निवडताना आपण आपल्या स्वप्नांचा विचार करावा पण त्यातून आपल्याला आर्थिक सहाय्य कसं मिळेल याचा पण विचार करायला पाहिजे त्यासोबतच आपण समाजासाठी काय करू शकतो याचा पण विचार आपण केला पाहिजे

    आय आणि समाज संबंधित वेगवेगळे ट्रेण्ड सतत चालू असतात पण आपण आपली कला कौशल्य सोडून त्या ट्रेण्ड च्या मागे लागतो आणि इथेच आपण चुकतो
    आपल्याला जे हवे ते आपण तेच कराव मग उशीर का लागेना पण एक दिवस नक्कीच यशस्वी होईल
    प्नव प्रत्येक ट्रेण्ड आपल्यासाठी परफेक्ट असं नसतं

    Reply
  15. प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं, प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या असतात. प्रत्येकजण आपल्या ध्येय गाठण्यासाठी तडजोड करत असतो. काहींना त्यात यश मिळतं तर काहींना अपयशाला समोर जाव लागतं.
    काहीजण स्वतःच ध्येय, स्वतःच स्वप्न स्वतः ठरवतात आणि ते पूर्ण ही करतात. पण असे क्वचितच असतात.
    काहींची अवस्था रंगमांच्यावर नाचणाऱ्या कठपुतळी प्रमाणे असते, फक्त दुसरे नाचवताय म्हणून ते नाचत असतात. त्यांना कुठे माहिती असतं, कसं नाचायचंय, कोणत्या गाण्यावर नाचायचंय. अगदी असंच काहींच्या स्वप्नाचं असतं. फक्त दुसरे सांगताय म्हणून त्या स्वप्नाच्या मागे धावाधाव करत असतात. असं केव्हा होत जेव्हा आपण आपले स्वतःचे निर्णय स्वतः न घेता इतरांना घेऊ देतो. *मग अर्थातच आपले ध्येय ठरवण्यामागे इतरांचा हात जास्त असतो….!*

    🔶 *आकर्षण…!*
    यासाठी फक्त 3 शब्द 👉🏻👉🏻
    ( *विचार बनाये जिंदगी* )
    *आपके विचार जितने अच्छे होंगे उतनीही आपकी जिंदगी अच्छी होगी….!*💯💯💯
    ज्यागोष्टीचा आपण जास्त विचार करतो ना त्याच गोष्टीबद्दल आपलं आकर्षण वाढत जात. मग जोपर्यंत ती गोष्ट आपल्याला भेटत नाही ना, तोपर्यंत आपण स्वस्थ बसूच शकत नाही.
    तुम्हाला एखादी गोष्ट अगदी मनापासून हवी असेल तर, तुम्हाला ती नक्की मिळेल पण शेवटी त्यासाठी प्रयत्न तर तुम्हाला करावेच लागतील. ते म्हणतात ना……
    *किसी चीज को अगर शिद्दत से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने मे लग जाती है…!*
    त्यामुळे चांगल्याच गोष्टींचा विचार करा..!
    याचा एक छोटासा अनुभव मला आला आहे.,तुमच्यापैकी काहींना असा अनुभव आला असेल, काहींना येईल.

    🔶 *8+8+8=24*
    8 तास कुटूंबासाठी,8 तास जॉब कामासाठी, 8 तास झोपेसाठी.
    माणसाने असंच जीवन जगायला हवं, पण असं फारच क्वचित होताना दिसत. आज कालच्या पिढीलातर घरच्यांसाठी वेळच नसतो. नुसतं कामं, कामं कामं आणि पैसा,पैसा,पैसा……
    कामापुढे आणि पैशापुढे घरच्यांच तर बाजूलाच राहूद्या ओ स्वतःकडे सुद्धा लक्ष देत नाही. वेळेवर खाण -पिणं नाही,झोप नाही. नुसती पैशाच्या मागे धावाधाव.
    काहींना तर कामाचे 8 तास सुद्धा पुरत नाही, over time करतात.
    हा आता आपल्या सर्व गरजा भागवून, घर सांभाळून, bank balance जमा करायचा म्हणलं की पैसा लागतोच आणी पैसा म्हणलं की कामं आलच.
    पण त्या कामाला थोडासा आवर घातला पाहिजे. ज्यांच्यासाठी तुम्ही इतकी मरमर करताय, 8 -8 10-10 तास मानपाठ एक होईपर्यंत कामं करताय, उद्या जर तेच नसतील तर काय करणार इतकं कमवून. म्हणून घरच्यांना आणी स्वतःला वेळ द्या आणि त्यासाठी *8+8+8 हा formula 1000% बरोबर आहे.* 💯💯💯

    🔶 *स्वतःच्या स्वप्ननाच काय….?*
    या प्रश्नाचं माझं उत्तर इतरांपेक्षा नक्की वेगळं असेल. काहींना माझं हे मत पटेल तर, काहींना अजिबात पटणार नाही. पण खरच अगदी प्रामाणिकपणे मला जे वाटत तेच उत्तर मी देतेय.

    अन्न.,वस्त्र.,निवारा., शिक्षण.,आरोग्य या मूलभूत गोष्टी जितक्या महत्वाच्या असतात तितकंच महत्वाचं असतं ते म्हणजे आपलं स्वतःच स्वप्न…!
    प्रत्येकाला वाटत असतं आपलं स्वप्न पूर्ण व्हावं. काहीजण स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात अगदी, घर सोडण्याची वेळ आली तरी मागेपुढे नाही बघत.
    आपल्या माणसांना सोडून जाताना दुःख होतच पण, काय करणार स्वतःच स्वप्न पूर्ण करायचंय ना.
    *कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है…!*
    हे काही खोटं नाही….!
    मग फक्त आपण आणि आपलं स्वप्न…. यातच आपलं सर्व काही आणि हेच आपलं आयुष्य असतं.इतरांचा विचार आपल्याला येतच नाही, स्वतःपुरता विचार करण्याची सवय झालेली असते. कुठेतरी आपण स्वार्थी होतोय की काय अस वाटायला लागतं. हे कितपत बरोबर आहे…? माहिती नसतं. *”जो होगा वो देखा जाएगा”* असं म्हणून आपण विचार करणं सोडून देतो.

    *माँ., बाप., प्यार., दोस्त*
    *इन्हे अपने ड्रीम्स के लिए*
    *Sacrifice कर देना.,*
    *Is Not Worth It .,*
    *Not Worth It At All…!*
    *बहुत बाद मे Realise होता है*
    *हम देश के काम तो आ रहे है*
    *पर गर्व करणे वाला कोई नहीं है…!*

    (👆🏻👆🏻हा डायलॉग *Tvfs Aspirants* web series मधला आहे. Every UPSC Aspirant ने ही web series नक्की बघा. काहींनी पाहिलीही असेल.)

    असं केव्हा होत, जेव्हा आपण आपल्याला सर्व गोष्टी scarifise करून फक्त आपल्या एका स्वप्नासाठी लांब निघून जातो…!
    आपल्या जवळ सगळं असतं पैसा., जॉब., स्टेटस.,रिस्पेक्ट…. खूप काही असतं. पण आपल्या आनंदात सहभागी होणारच कोणी नसतं.

    *स्वतःसाठी सगळेच जगतात, दुसऱ्यासाठी जगता आल पाहिजे.,स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळेच तडजोड करता, तीच तडजोड., तशीच धडपड दुसरायची स्वप्न पूर्ण करण्यासाठी करता आली पाहिजे…!*

    एखाद्याची एक इच्छा.,एखादा स्वप्न जर आपण पूर्ण केल तर किती आनंद होतो त्या व्यक्तीला. मग भलेही आपण त्यांच्या एका स्वप्नासाठी आपली 10 स्वप्न पणाला लावलेली असो.त्याच काहीच नाही वाटत आपल्याला., कारण *समोरच्या व्यक्तीच्या आनंदाच कारण आपण असतो…!*❣️
    हा आनंद जर आपल्यामुळे मिळाला असेल तर आपल्याला सुद्धा किती आनंद होतो. त्यादिवशी नक्की वाटेल आज आपण खऱ्या अर्थाने काहीतरी कमवलं… आपण कोणच्यातरी उपयोगी आलो, समोरच्याला काहीतरी देऊ शकलो तेव्हाचा आनंद.,ते समाधान वेगळंच असतं.
    आपल्या आई वडिलांच, किंवा आपल्या जवळच आणखी कोण असेल तर त्यांची आपल्याबद्दल काहीतरी स्वप्न असतात, आपल्याकडून अपेक्षा असतात.
    आपल्या कुटूंबापैकी एखाद्याच त्यांच स्वतःच स्वप्न जर ते काही कारणास्तव पूर्ण करू शकले नसतील तर त्याना वाटत असतं की आपलं स्वप्न ह्याने / हिने पूर्ण करावं. असं बऱ्याचदा होत.
    त्यांच तरी कुठे चुकत….? आपल्या मुलांकडून, आपल्या माणसांकडून अपेक्षा नाही करणार तर मग कोणाकडून करणार….!
    का ठेवत असतील आपल्याकडून अपेक्षा, का बघत असतील आपल्यासाठी स्वप्न याच एकच कारण ते म्हणजे *डोळ्यांना न दिसणारा,स्पर्शला न जाणवणारा विश्वास…!*
    त्याचा विश्वास असतो आपल्यावर,आपल स्वप्न हा नक्की पूर्ण करेल…!
    काय फरक पडतो ना स्वप्न आपलं असो वा आपल्या घरच्यांचं शेवटी काय *आनंद., समाधान आणी कौतुकाची थाप मिळणं महत्वाचं…!* बरोबर ना….?
    समजा आपल्याकडून एखाद्याच स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाचा आपण बारकाईने विचार केला आणी आपल्याला लक्षात आलं की…
    1) अरे आपल्याला तर या गोष्टीची आवड आहे.
    2) आपण हे करू शकतो
    3) यातून आपण चांगला पैसा ही कमवू शकतो.
    4) आणि जर आपण हे कामं केल तर आपल्या कुटूंबासोबतच समाजाला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो.

    या blog मधलं सरांच *”इकीगाई मॉडेल”* सुद्धा हेच सांगत.जर या 4 प्रश्नांची उत्तर हो मिळतं असतील तर मग, आता सांगा..,काही फरक पडतो का….? *स्वप्न आपलं असो वा आणखी कोणाच…!*

    *जो इतरांच्या उपयोगी तोच खरा योगी…!*💯✨️🙌🏻

    *अपने लिए तो सब जीते है.,*
    *कभी औरो के लिए जिकर देखो…!*
    *अच्छा लगता है…!*
    *अपने खूशियो मे तो सब खूश होते है.,*
    *कभी औरो की ख़ुशी की वजह बनके देखो…!*
    *अच्छा लगता है…!*❣️

    माझं स्वप्नाबद्दलच हे मत वाचून, कितीजनांना हे पटल असेल माहिती नाही, काहींना अजिबातच आवडलं नसेल, तर काहीजण यावर थोडाफार विचार नक्की करतील….!💯
    पण खरच हा blog वाचून हे मत मांडवस वाटलं., म्हणून मांडलं !
    हा blog वाचून अजून एक सांगवस वाटतंय. मला खूप जण विचारतात तुझं स्वप्न काय, तुला काय करायचंय…? Doctor होण्याच स्वप्न होत माझं पण, आता ते शक्य नाही.
    आता माझं हे स्वप्न पूर्ण नाही होऊ शकत. तर यासाठी मी किती दिवस वाईट वाटून घेणार ना…!
    त्यामुळे आता जे माझ्या घरच्यांच स्वप्न तेच माझं स्वप्न…!
    आपलं एक स्वप्न पूर्ण नाही झालं की सगळं संपत का…? तर अजिबात नाही. *आपलं एक स्वप्न तुटलं की दुसरं स्वप्न आपली वाट बघत असतं, आपण कधी त्याच्या पर्यत पोहचू याची ते आतुरतेने वाट पाहत असतं…!*❣️

    *खरच खुप खुप धन्यवाद सर…!*🙏🙏🙏 *हा blog लिहिल्याबद्दल.* *आमची मत मांडण्यासाठी, आमचे विचार लिखाणात उतरवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आणी योग्य व्यासपीठ आहे हे…!*
    *अशेच आमच्या विचारला चालना देणारे blog लिहीत जा…..! आणि तुमच्या या blog मुळे आमच्या ध्येयाकडे जाणार प्रत्येक पाऊल हे योग्य दिशेला आणि योग्य वळणावर पडत आहे.*💯🙌🏻✨️

    Reply
    • अप्रतिम प्रतिक्रिया, यावरून मला असं वाटतं की, हीच यशस्वी होण्याची लक्षणे आहेत. keep it up.

      Reply
  16. Excellent blog Sir !!!…
    या ब्लॉग मधून हे कळाले की, आपण आपले करियर चुकीचे निवडले तर संपूर्ण जीवनच कसे चुकीचे वाटायला लागते आणि त्या एका चुकीचा परिणाम हा आपल्या संपूर्ण आयुष्यावर होत असतो. म्हणून आपण आपल्या स्वप्नाचा,आनंदाचा ,समाधानाचा विचार करून आपल्या आवडीचे करीयर कसे निवडावे, 8+8+8=24 तासांचे नियोजन कसे करावे ,तसेच आपल्या आयुष्यात इकिगाई मॉडेल कशाप्रमाने काम करेल या सर्व गोष्टींचे खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.
    या सर्वांचा उपयोग करून आम्ही आयुष्यात आमचे करीयर योग्य प्रकारे निवडू शकाल.हा ब्लॉग आयुष्यात नवीन बदल करण्यास, नवीन शिकण्यास प्रेरित करत आहे. अशाप्रकारे विविध विषयांवरील ब्लॉग तयार करून आम्हाला असेच मार्गदर्शन लाभावे ही इच्छा….
    तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, सर !!!…🙏🙏🙏

    Reply
  17. Thamk u sir ,for this kind of blog,aajpariyant me school or clg books shivay kahi vachle nahi but,aaj He blog vachun kahitari new shiklyasarkh vatl.mla sva chi janiv zali,tumhi khup chan que…yat mandlee khr tr He sarv amchya dokyat yetat but kadhi ,koni milal nahi,ase que..vicharyla ,mla mazya kahi..que..che ans tumchya blog madhun milale,thank u soo much sir..🙏🙏🙏

    Reply
  18. • करीअर ही खूप महत्त्वाची गोष्ट असते कारण करीअर सोबत आपल्याला आपले पूर्ण आयुष्य
    घालवायचे असते त्यामुळे करिअर चुकीचे निवडले तर संपूर्ण जीवन अवघड व जीवनातील सर्व गोष्टी चुकीच्या वाटायला लागतात
    म्हणून, विशिष्ट ट्रेंड ला आकर्षित न होता/कोणा च्याही दबावाखाली न येता स्वतःची आवड निवड. स्वप्न, टॅलेट यांना महत्त्व देऊन योग्य करीयरची निवड करावी म्हणजे आयुष्यातील काम करण्याचा वेळ पश्चाताप करण्यात निघून जाणार नाही.
    • 8+8+ 8 = २४ असे २४ तासांचे नियोजन केले तर खरच दिवसाचे २४ तास सुनियोजित जातील. आमच्या वयातील ही काम करणारे काही ठरावीक विद्यार्थी वगळून बाकीचे त्या ८-८ तासांच्या shedule मध्ये त्यांच्या आवडीला तसेच अभ्यासाला वेळ देऊन आपल्या वेळेचे नियोजन करतील त्यातून आम्हाला खूप फायदा होईल .
    ● करीअर निवडताना या गोष्टींचा विचार करावा:
    1 .कोणते काम आपल्याला मनापासून आवडते ?
    2 . कोणते काम आपल्याला चांगले येते ?
    3 . कोणत्या कामातून आपण जगाची / देशाची एखादी गरज भागवू शकतो ?
    4.कोणत्या कामातून आपल्याला पैसे मिळतील ?
    5. कोणत्या कामातून आपल्याला आनंद व समाधान मिळेल ?
    या सर्व गोष्टी मला या blog मधून शिकायला मिळाल्या तसेच career निवडताना कसे निवडावे हे आपण दिलेल्या 5 प्रश्नांवरून समजले व नक्की मी आणि माझ्या वयातील अनेक जण career निवडताना या प्रश्नांचा विचार करू आणि निश्चितच अनेक जणांचा career निवडताना जो गोंधळ होतो तसेच अनेक जण वेगळ्याच दिशेला जाऊन पोहोचतात अशी परिस्तिथी हा blog वाचलेल्यांवर येणारं नाही कारण career निवडताना व career चा विचार करताना लक्षात घ्यायची पहिली step आम्हाला या blog मधून खूप चांगल्या पद्धतीने समजली आहे … पुढे ही अनेक गोष्टीत आपले असेच मार्गदर्शन आम्हाला blog स्वरूपात/ इतर कोणत्याही स्वरूपात मिळत रहावे हीच अपेक्षा
    #ThankYouForYourGuidanceSir

    Reply
    • खूप छान अपूर्वा. या ब्लॉग मधून तू अनेक गोष्ठी आत्मसात केल्यात असे दिसते. असेच शिकण्याची आवड वाढवावी.

      Reply
  19. ध्येय ,स्वप्न , आणि नियोजन या तीन गोष्टींची सांगड घालून आपण कशा प्रकारे आपल्या करियर मध्ये ग्रोथ प्राप्त करू शकतो आणि स्व:केंद्रातीत कसे होऊ शकतो हे आपण खूप उत्तम रित्या सांगितले म्हणजे यशाचे मंत्र हे केवळ आपल्या जवळच आहेत अ‍ॅण्ड आपण त्याचे वापर किती उत्तम रित्या करू शकतो आणि त्या माध्यमातून Carrier मध्ये यशस्वी कसे होऊ शकतो हे आपण छान सांगितले आम्हाला!

    Reply
  20. सदर blogs खुपच सुंदर आहेत.अतिशय प्रभावशाली आहेत. आपण आपले करिअर कसे निवडावे यासाठी हे blogs अतिशय प्रभावशाली आहेत. हे खरे आहे की अतिशय कमी लोकांना त्यांचा जोडीदार आणि त्यांचे करिअर यांची निवड करण्याची संधी दिली जाते.आणि बरेच जण आपले जे स्वप्न आहे ते बाजूला ठेवून समाजात जो ट्रेंड चालू आहे त्याकडेच जास्त प्रमाणात आकर्षित होतात. आता सगळेच शेती, व्यवसाय याकडे जास्त प्रभावित न होता स्पर्धा परिक्षा याकडेच जास्त प्रमाणात आकर्षित होत आहेत. कारण ती सरकारी नोकरी आहे म्हणून. कित्येकांचे तर PSI, IPS , IS हे बनणे स्वप्न नसते, तरी पण ते यात उतरतात , कारण ती सरकारी नोकरी आहे म्हणुन आणि त्यानां हे करण्यासाठी सध्याचा ट्रेंड, समाज आणि नातेवाईक भाग पाडत असतात. हे blogs अतिशय प्रभावशाली आहेत. ज्यांची करिअरच्या बाबतीत दिशाभूल झाली आहे. त्यांनी जर हे blogs वाचले तर ते नक्कीच त्यांच्या योग्य वळणावर येतील.

    Thank you so much, sir

    Reply
    • आजच्या युवकांना आपल्या जीवनाची, करियर ची दिशा निवडताना मदत व्हावी हाच एकमेव उद्देश ठेऊन हा छोटासा प्रयत्न आहे. तू हा ब्लॉग खूप मन लाऊन वाचलास असं दिसतं. असंच learn करत रहा. इतरही ब्लॉग वाचा व इतरांना शेअर करा.

      Reply
  21. सदर blogs खुपच सुंदर आहेत. अतिशय प्रभावशाली आहे.आपण आपले करिअर कसे निवडावे यासाठी हे blogs अतिशय प्रभावशाली आहेत. हे खरे आहे की अतिशय कमी लोकांना त्यांचा जोडीदार आणि त्यांचे करिअर यांची निवड करण्याची संधी दिली जाते.आणि बरेच जण आपले जे स्वप्न आहे ते बाजूलाच ठेवून समाजात जो ट्रेंड चालू आहे त्याकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात. आता सगळे शेती, व्यवसाय याकडे जास्त प्रभावित न होता स्पर्धा परीक्षा याकडेच जास्त प्रमाणात आकर्षित होत आहेत. कारण ती सरकारी नोकरी आहे म्हणून, कित्येकांचे तर PSI , IPS ,IS हे बनणे स्वप्न नसते, तरी पण ते या क्षेत्रात उतरतात, कारण ती सरकारी नोकरी आहे म्हणून आणि त्यांना हे करण्यासाठी सध्याचा ट्रेंड, समाज, नातेवाईक भाग पाडत असतात. हे blogs अतिशय प्रभावशाली आहेत. ज्यांची करिअरच्या बाबतीत दिशाभूल झाली आहे त्यांनी जर हे blogs वाचले तर ते नक्कीच त्यांच्या योग्य वळणावर येतील.
    Thank you so much, sir

    Reply
  22. Excellent blog sir!
    प्रत्येक शिकत असलेल्या व उत्तीर्ण जालेल्या मुलांना सर्वात जास्त वेळा विचार करायला लावणारा प्रश्न म्हणजे योग्य करियर कसे निवडावे?खुप सारे मार्ग असतात पण कोणत्या मार्गावर पाऊल ठेवावे हा मोठा प्रश्नचिन्ह असतो.पण हा ब्लॉग वाचल्यावर अशा प्रश्नाच उत्तर नक्कीच मिळेल.
    कही मुलांना घरातल्यांच्या,नतेवाईकांच्या सांगण्यानुसार नावडता मार्ग निवडावा लागतो.तर काही मुलं आपल्या मित्राने तो मार्ग निवडला म्हणुन ते ही तोच मार्ग निवडतात.अश्या बर्याच कारणांमुळे खुप मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.काहींना तर मधेच थांबावे लागते,काहींना जेपत सुद्धा नाही तरीही जबरदस्तीने करावे लागते आणि पुढे जावून हातात फक्त निराशा लागते.
    तुमचे पुढचे जीवन कसे असनार आहे हे तुम्ही कोणता मार्ग निवडता यावर अवलंबून असते.म्हणून एक चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यात खुप महाग पडू शकतो.
    खरे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांला आपली आवड ओळखता आली पाहिजे आणि त्यानुसार त्यांना आपले करियर निवडता आले पाहिजे.कोणताही मार्ग निवडताना आपल्या आनंदाचा,स्व्प्नांचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समाधानाचा विचार करायला हवा.
    आपले करियर निवडताना स्व्तःला हे प्रश्न विचारायला पाहिजे की;आपल्याला ही गोष्ट आवडते का?आपण हे करू शकतो का?याच्यातून आपण चांगले पैसे कमवू शकतो का?यातून आपल्या समाजाची मदत होऊ शकते का?
    आपले करियर असे निवडावे की ते दिवसभर करुनही आपण उत्साही असू.आपल्या आवडीचे काम असल्यास मिळणारे समाधान,आनंद द्विगुणीत होतो.शिक्षण एका क्षेत्रातले व आपल्या आवडीनुसार असलेल्या वेगळ्या क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेऊन यशस्वी झालेली उदाहरणे आपल्याला दिसतात.डॉ.गिरीश ओक,डॉ.निलेश साबळे हे वैद्यकीय डॉक्टर्स पण अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी उत्तम यश संपादनकेले आहे.
    Sir,कोणत्याही विद्यार्थ्यांने तुमचा ब्लॉग वाचला तर तो 100% योग्यच वळणावर जाईल.
    Thank you so much,sir!

    Reply
  23. सर, या ब्लॉग मध्ये खूप महत्त्वाचा topic मांडला तो म्हणजे करिअर आणि त्याचे नियोजन कसे करायचे?
    आजची तरुण पिढी trend च्या मागे धावत असल्याचे दिसून येते. Trend म्हणजे काय तर सध्या स्थितीत जास्त चालणारी गोष्ट किंवा लोकप्रिय होत असलेली गोष्ट. Trend सोबत वाहत जाणे कितपत योग्य आहे? या Trend मागे धावत असताना कुठेतरी आपले सुप्त गुण किंवा आपले स्वप्न बाजूला राहतात. आपण त्याच्यावर काम करत नाही आणि ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्याच मध्ये आपले लक्ष लागत नाही आणि आपण नवीन काही करण्याचा प्रयत्नही करत नाही आणि आपले routine बोरिंग वाटायला लागते. एकंदरीत आपली लाईफ कंटाळवाणी वाटते. हे जीवनात नको असेल तर सरांनी या ब्लॉगमध्ये अतिशय महत्त्वाची संकल्पना मांडली आहे ती म्हणजे इकिगाई मॉडेल. या मध्ये समजले की उद्देशा शिवाय आपले जीवन नाही, उद्देश नसेल तर आपण जीवनात काहीच करू शकत नाही. आणखी एक गोष्ट 24 तासांचे नियोजन कसे करावे हे अगदी सोप्या पद्धतीने सुचवले आहे. 8+8+8=24. योग्य career निवडण्यासाठी इकिगाई मॉडेल आणि सगळ्याच गोष्टींचे नियोजन हे फार महत्वाचे ठरेल…आणि हे मॉडेल्स आम्ही apply करण्याचा प्रयत्न करत आहोत.
    Thank you sir😊

    Reply
  24. नमस्कार सर,
    तुमचा प्रत्येक ब्लॉग हा जीवनाच्या खूप महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाश पाडत असतो .
    आज मी हा ब्लॉग वाचला आणि पुन्हा एकदा प्रकाशाचे किरणे चमकू लागले. आणि ज्या गोष्टींवर आज प्रकाश पडला ते म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश…
    आपल्याला मौल्यवान जीवन मिळाले आहे तर त्याचा नक्कीच काहीतरी उद्देश असला पाहिजे. आपल्या जीवनातली ईकिगाई आपण सापडवली पाहिजे.जर जीवनात काहीतरी उद्देश असेल तर आपले शरीर सुद्धा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असते, ते आजारापासून दूर राहते, काहीतरी उद्देश असेल तर जीवनात आपण अपयशाने खचणार नाही, जीवनात निराशा दाटणार नाही. उद्देश असेल तर कधी आपण हार मानणार नाही.पुन्हा नव्या उत्साहाने उठून कार्याला लावण्याची ताकद या उद्देशामध्ये आहे.
    पण हा उद्देश, हे ध्येय जीवनात प्रत्येकाचं वेगवेगळ असते. ते दुसऱ्या कोणाकडे बघून आपण ठरवू शकत नाही कारण म्हणतात की जीवनात प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते आणि सर्वांनी जर एकाच प्रश्नपत्रिके नुसार उत्तर लिहिले तर आपण सहाजीकच नापास होणार कारण ती आपली प्रश्नपत्रिकाच नव्हती.
    म्हणून आपल्यात काय क्षमता आहे, काय कौशल्य आहे, आपली कोणत्या गोष्टीत आवड आहे,आपण कोणते काम योग्य प्रकारे आणि आवडीने करू शकतो हे आपण ओळखले पाहिजे
    आणि हे वेळेवर जर आपल्याला समजले तर जीवनात आपण आपल्या क्षमता नुसार खूप काही करू शकतो असं मला हा लेख वाचल्यानंतर वाटतंय.
    खरंतर आपण हे ओळखू नाहि शकल्यामुळेच एक सामान्य जीवन जगत राहतो.
    जीवनात काही उद्देश नसल्यामुळे काही प्राप्त करण्याचा आटापिटा राहत नाही जीवनाच काही नियोजन नसल्यामुळे जसा प्रवाह येईल तसंच जीवन हळुहळु जात असतं आणि इथेच कुठेतरी हे रहस्य दडलेलं आहे.
    वर्तमानात जो विषय चर्चेत चालू असतो सर्व त्याच विषयाकडे धावताना दिसतात कारण इथे उद्देश नाही ना ! काही नियोजन नाही, आणि जर एक चांगले मनासारखे जीवन जगायचे असेल तर या गोष्टींपासून आपण बचाव केला पाहिजेत.
    जीवनात आपले स्वतःचे स्वप्न असले पाहिजेत आपल्यात काय क्षमता आहेत याचा आपण एकांतात बसून कधीतरी विचार करायला हवा. खरं तर आपल्याकडे सर्वांसाठी वेळ असतो पण स्वतःसाठी आपण वेळ काढत नाही म्हणून जगातील बर्‍यापैकी लोकांना त्यांच्या क्षमता वेळेवर माहीतच होत नाही आणि काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहून जातं.
    मला अजून एक गोष्ट खूप आवडली आणि एकदम तार्किक गोष्ट वाटली ती म्हणजे 8+8+8= 24 हा फॉर्मुला.
    झोप, कुटुंब आणि काम हे तिन्ही बरोबरीने महत्त्वाचे आहे आणि यातील एकाचे जरी संतुलन बिघडले तरी सर्वांचे संतुलन बिघडेल उदाहरणार्थ जर झोप पूर्ण नाही झाली तर नाही कामावर लक्ष लागणार आणि नाही कुटुंबासोबत खेळू शकणार तर प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे.
    शेवटी सरांनी जे प्रश्न विचारले आहे ना ते सर्व प्रश्नांचे उत्तर जर मिळवले ना तर आपल्याला आपली ईकिगाई मिळाली असं समजायला हरकत नाही.
    धन्यवाद.

    Reply
  25. या ब्लॉग मधुन खूपच चविष्ट विचार मिळालेली आहेत , हा blog प्रत्येकाच्या जीवनाला कलाटणी देणारा आहे. यातील विचारानुसार जर माणूस त्याच्या करिअर ची जडण-घडण करत असेल तर त्याला त्याचा जीवनाचा स्वर्ग इथेच मिळेल. ज्यावेळी आपण या पृथ्वीतलावर येतो तेंव्हा आपल्या जीवनाचा एक उद्देश असतो निसर्ग आपल्याला जेंव्हा या कोट्यवधी लोकं असलेल्या दुनिया मध्ये पाठवतो म्हणजे त्यामागे काहितरी उद्देश असेलच होय की नाही ? मग हा उद्देश ज्या लोकांना ज्या लोकांना कळाला त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने आनंदित आहे. आता हा उद्देश कसा मिळवायचा ? त्यासाठी कोणती ध्येय निश्चित केले पाहिजे आणि ते कसे केले पाहिजे ? निश्चित केलेले ध्येय खरंच आपल्या मनातून निश्चित केलेली असतात का? त्यामधील लोकांचा वाटा किती असतो या सर्व गोष्टीचा उलगडा या लेखांमधून अगदी रसाळ पद्धतीने झालेला आहे.
    सगळ्याच्या आयुष्या मधला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आपण कोणती ध्येय निवडला पाहिजे आणि ते कसे निवडले पाहिजे हा असतो ? खरतर आपल्या ध्येय निश्चिती मध्ये आपल्या मनाचा वाटा हा अत्यंत कमी असतो. आपल्या मनाला आपल्या आजूबाजूचं बिनकामी Preessure खाली दाबून टाकत. आणि आपल्या ध्येयाची owner हे आसपासचे लोक ठरतात मग त्यामधे आई-वडील असतील, नातेवाईक असतील, किंवा समाज असेल ,शाळा असेल, शिक्षक असतील या सर्व व्यक्तींचा समावेश होतो.
    हे सर्व व्यक्ती आपली ध्येयनिश्चिती हे आपल्यामध्ये असलेल्या कौशल्यावर किंवा आपल्याला ज्या गोष्टी करण्यामध्ये आनंद मिळतो त्यानुसार न ठरवता मार्केटमध्ये जो ट्रेंड चालू आहे त्यानुसारच करत असतात. मग तो ट्रेंड आपल्या मनाविरुद्ध चा असला तरीही आपण मान्य करत असतो . आपले स्वप्न यापेक्षा जरी वेगळे असल्या तरी त्या स्वप्नाला त्या ठिकाणी आपण बोथट करून टाकतो आणि मार्केटचा ट्रेंड स्वीकार करून न आवडता क्षेत्रामध्ये प्रवेश करतो आणि आनंद झाला समाधान आला या ठिकाणी मुकतो आणि चिडचिड्या जीवनाला अमात्रित करत असतो.
    सर तुम्ही सांगितलेला ( ८+८+८= २४ ) हा पॅटर्न मला वाटते खूपच महत्त्वाचा आणि गरजेचा आहे कारण वर नमूद केलेल्या तिन्ही गोष्टी ( ८ तास= जॉब, ८ तास = फॅमिली आणि ८ तास= झोप ) आपल्या जीवनाचा गाभा आहेत. यामध्ये एकाही गोष्टीची कमतरता असेल तर खरंच जीवनाला अर्थ उरणार नाही. परंतु तू आपल्या चुकीच्या ध्येयनिश्चिती मुळे या गोष्टीचा मेळ लागतच नाही. त्यासाठी जीवन अर्थपूर्ण आनंददायी समाधानी जगायचा असेल तर योग्य ध्येय निश्चिती खूप खूप खूप खूप आणि खूपच महत्वाचे आहे.
    आता ही योग्य ध्येय निश्चिती करण्यासाठी कुठला फॉर्मुला आहे? योग्यतेचे निश्चिती करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा लागतो? असे प्रश्न प्रत्येकाला पडत असतात तर यावर तुमचे उत्तर मला खूपच सोयीस्कर वाटत. ज्यामध्ये आपला इकिगाई आहे त्यामध्ये ध्येय निश्चिती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जी गोष्ट केल्याने अपल्याला मनापासुन आनंद होतो , ज्या गोष्टीमुळे आपण तहान भूक हरवून काम करतो अश्या गोष्टीमध्ये जर आपण आपलं ध्येय निश्चित केले तर आपल्या जिवनात सगळ्याच गोष्टी आपल्या आपल्या मनासारख्या घडतील आणि त्यातुन आनंद, सुख आपल्या अवतीभोवती नाचायला लागेल.
    खरंच हा ब्लॉग life changing ब्लॉग आहे . सर तुम्हीं जीवनाचा main fact यामधून अगदी सहज आणि सोप्या शैलीत आम्हाला सांगितलत त्याबद्दल Heartly Thanks 😊

    Reply
  26. योग्य करिअरची निवड कशी करावी……. हा प्रश्न खूप वेळा येते पण त्याचे उत्तर मिळत नाही आज या ब्लॉग मधून उत्तर मिळाले असे वाटते…
    जगात करिअरच्या संधी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत परंतु ते मिळणे खूप कठीण झालेले आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीचे काम करायला आवडते परंतु ज्याचे मागणी अधिक असते जो ट्रेड चालू असतो त्यानुसार आपण काम करायला लागतो त्यामुळे हवी तशी ग्रहण होत नाही ते काम आवडीचे नसल्यामुळे त्या मध्ये इंटरेस्ट वाटत नाही
    तुम्ही झोपायला मुद्दा सांगितला हे आपले ध्येय कसे ठरवले जाते हे अगदी खरे आहे विवाह आणि नियोजन हे अरेंज करून केले जातात परंतु खूप ठिकाणी असे होते की ते स्वतः त्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध होते त्याचासुद्धा खूप फरक आपल्या जीवनावर पडत असतो .
    ध्येय ठरवणे मागे कोणा कोणाचा हात असतो ही गोष्ट खरी आहे आपले फॅमिली मेंबर प्रेशर.. आणि प्रभावित लोक यामुळे आपल्यालाही असं वाटते की सर्व सांगत आहेत ते योग्य आहे… म्हणुनच जो ट्रेड चालू आहे
    समाजामध्ये व मार्केटमध्ये अशाप्रकारचा ट्रेड आहे की आपल्याला असे वाटते की या व्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नाही आपण ते काम करायला लागतो
    स्वतःचे स्वप्न आवडनिवड विचार करायला वेळच मिळत नाही आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते इकडे आड तिकडे विहीर झालेला असतो त्यामुळे कळत नाही की काय करावे.8+8+8 चा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हे समजले…… बेस्ट करियर कसे निवडावे आपले ईका गाई काय असावे…. यामध्ये जपानमधील राहणाऱ्या ओकिनावा बेटावरील लोकांच्या जीवनाचे रहस्य जिवणाचे रहास्या सांगितलेले आहे….. त्यामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक व्यक्तीचा जीवनाच्या जगण्या मागे एक उद्देश असतो तर जगणं अर्थपूर्ण करतो…. आम्ही याची पूर्ण करण्याचा प्रयत्न करु आणि आपली ईका गाई कशी चालवायची ते आम्ही ठरवू…..

    Reply
  27. योग्य करियरची निवड कशी करावी?

    प्रत्येकाच्या जीवनाचा काही ना काहीतरी उद्देश असतो आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी प्रत्येकाला कार्य करावे लागते . परंतु हे कार्य करत असताना त्या कामामध्ये आपल्या विचारांचा वाटा किती असतो? आपलं काम आपल्या इच्छेनुसार चालतं का? तरी या प्रश्नांची उत्तरे अगदी थोडक्या लोकांकडे ‘ होय’ म्हणून असतील. कारण 97 टक्के लोकांचे भविष्य हे बाहेरचे व्यक्ती ठरवत असतात मग त्यामध्ये आई वडील, नातेवाईक, समाज, शाळा ,शिक्षक, महाविद्यालय या गोष्टीचा समावेश असेल. या साऱ्यांच्या विचारांच्या दबावामुळे स्वतःच्या विचारांचे स्वातंत्र्य हरवून जातो आणि मनाविरुद्ध ध्येय ठरवून ती प्राप्त करण्याच्या आशेने आपली प्रचंड तळमळ चालू असते परंतु सगळ्या गोष्टी मनाच्या विरुद्ध घडत असल्यामुळे समाधान आनंद बेपत्ता होतो.

    आपण अति लहान असताना आपल्याला प्रचंड स्वातंत्र्य दिलेल असते त्यामध्ये आपण कुठलीही गोष्ट केल्यानंतर आपलं प्रत्येक जण कौतुक करत असत मग ती वाईट ही असेल तर आणि जसे जसे आपण मोठे होत असतो तसे तसे आपल्यावर लोकांच्या सल्ल्यांचा भडिमार होत असतो आणि हेच सल्ले आपल्या मनाच स्वातंत्र्य हिसकावून घेऊन भलत्याच गोष्टीकडे आपल्याला वळवतात आणि शेवटी आपल्या हातात निराशा पडते.

    मग ही निराशा पळवून लावण्यासाठी, आपल्या चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवण्यासाठी समाधानाच्या महासागरात बुडून राहण्यासाठी आपल्याला आपलं करिअर हे ज्या गोष्टींमध्ये हे आपल्याला आनंद मिळतो , जी गोष्ट करत असताना आपण तहानभूक हरपून त्यामध्ये बेभान रमून जातो . अशा गोष्टींमध्ये जर आपण करिअर केलं तर खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक होत असतं आणि त्या ठिकाणी आणि आपल्या जीवनाचा उद्देश सापडतो.

    आपलं करियर ठरवण्यासाठी लोकांचा वाटा सगळ्यात जास्त असतो. बाहेरचे लोक कशावरून आपला कधी ठरवत असतात? तर सध्या आपल्या आसपास कोणत्या गोष्टीला value आहे , कोणत्या गोष्टीला मार्केट आहे हे यावरून आपली धेय्य निश्चित केली जाते. त्यामध्ये आपल्या कौशल्याचा , आपल्या आवडीचा कुठेच विचार केलेला नसतो आणि आणि आपल्याला सुद्धा ते मान्य केल्याशिवाय पर्याय नसतो आणि याच चुकीच्या मार्गदर्शनाच्या आहारी जाऊन आपलं जीवन तडजोडीचे बनत जातं .
    अशा करिअरमध्ये ते जरी आपण यशस्वी झालो तरीही त्या गोष्टीमध्ये आपली आवड नसल्याकारणाने त्या क्षेत्रात आपण व्यवस्थित मन लावून काम करू शकत नाही आणि याचे परिणाम आपलं जीवन चिडचिड होत जातं त्यामुळे आपल्याकडे खूप सारा पैसा आला तरीसुद्धा समाधानाचा दुष्काळ असतो.

    सर तुम्ही सांगितलेल्या 24 तासाचे नियोजन खूपच प्रभावशील आहे कारण या तीन गोष्टी ( Family Job, Sleep ) शिवाय आपला आयुष्य राहू शकत नाही. या मधला एकही भाग जरी वगळला तर एखाद्या अपंग व्यक्ती सारखं आपला आयुष्य असेल त्यामुळे तीन गोष्टीला खूपच महत्त्व आहे आणि या तीन संतुलन राखण्यासाठी आपल्याला योग्य करिअर निवडण्याची नितांत गरज आहे.

    करियर निवडताना इकिगाई चा रोल खूप important आहे . ज्या गोष्टी मध्ये आपला इकिगाई आहे त्यामध्ये जर आपलं करियर असेल तर आपल्याला जीवनाचा purpose सापडलेला असतो. जर जीवनाचा उद्देश सापडला असेल तर आपल्यातील आयुष्याची वाटचाल त्यातून जन्म घेत असते म्हणून इकिगाई शोधन अत्यंत महत्वाचा आहे आणि हा इकिगाई शोधण्यासाठी तुम्ही शेवटी चे पाच प्रश्न सांगितलेत ते खरंच प्रत्येकाला अपला इकिगाई शोधण्याचा सर्वोत्तम स्त्रोत आहेत. या प्रश्नांमधून मला खात्री आहे की आमचा इकिगाई यातून नक्कीच सापडेल आणि आमचं जीवन एक उद्देश ठेऊन वाटचाल करेल. जीवनाचा मेन पॉइंट करिअर असतो ते करिअर कसे निवडायचे याबद्दल सखोल आणि सुव्यवस्थित मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद .

    Reply
  28. Excellent blog sir!
    प्रत्येक शिकत असलेल्या व उत्तीर्ण जालेल्या मुलांना सर्वात जास्त वेळा विचार करायला लावणारा प्रश्न म्हणजे योग्य करियर कसे निवडावे?खुप सारे मार्ग असतात पण कोणत्या मार्गावर पाऊल ठेवावे हा मोठा प्रश्नचिन्ह असतो.पण हा ब्लॉग वाचल्यावर अशा प्रश्नाच उत्तर नक्कीच मिळेल.
    कही मुलांना घरातल्यांच्या,नतेवाईकांच्या सांगण्यानुसार नावडता मार्ग निवडावा लागतो.तर काही मुलं आपल्या मित्राने तो मार्ग निवडला म्हणुन ते ही तोच मार्ग निवडतात.अश्या बर्याच कारणांमुळे खुप मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.काहींना तर मधेच थांबावे लागते,काहींना जेपत सुद्धा नाही तरीही जबरदस्तीने करावे लागते आणि पुढे जावून हातात फक्त निराशा लागते.
    तुमचे पुढचे जीवन कसे असनार आहे हे तुम्ही कोणता मार्ग निवडता यावर अवलंबून असते.म्हणून एक चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यात खुप महाग पडू शकतो.
    खरे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांला आपली आवड ओळखता आली पाहिजे आणि त्यानुसार त्यांना आपले करियर निवडता आले पाहिजे.कोणताही मार्ग निवडताना आपल्या आनंदाचा,स्व्प्नांचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समाधानाचा विचार करायला हवा.आपल्या स्वतः चे आवडी-निवडीचे मॅपिंग करावे. मग त्याचा swot करावा व त्यासाठी असलेल्या संधीचा विचार करून मगच करियर निवडावे.
    खंर म्हणजे करिअर निवड कशी करावी याची एक ओळीत उत्तर द्यायचे झाले तर 3 इडियट मधे सांगितलीय तशी,आणि ते अगदी बरोबर आहे तुम्हाला आवडणा-या क्षेत्रात जर तुम्ही करिअर केले तर तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्यात करिअर निवडा.पण त्या आधी तुम्हाला कोणती गोष्ट खूप मनापासुन आवडते ते शोधा न थकता दोन ते तीन दिवस ते करू शकता अशी कामे कोणती याची उत्तरे शोधा मग करिअर निवडायला सोपे जाईल.
    Sir,कोणत्याही विद्यार्थ्यांने तुमचा ब्लॉग वाचला तर तो 100% योग्यच वळणावर जाईल.
    Thank you so much,sir!

    Reply
  29. Excellent blog sir!
    प्रत्येक शिकत असलेल्या व उत्तीर्ण जालेल्या मुलांना सर्वात जास्त वेळा विचार करायला लावणारा प्रश्न म्हणजे योग्य करियर कसे निवडावे?खुप सारे मार्ग असतात पण कोणत्या मार्गावर पाऊल ठेवावे हा मोठा प्रश्नचिन्ह असतो.पण हा ब्लॉग वाचल्यावर अशा प्रश्नाच उत्तर नक्कीच मिळेल.
    कही मुलांना घरातल्यांच्या,नतेवाईकांच्या सांगण्यानुसार नावडता मार्ग निवडावा लागतो.तर काही मुलं आपल्या मित्राने तो मार्ग निवडला म्हणुन ते ही तोच मार्ग निवडतात.अश्या बर्याच कारणांमुळे खुप मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.काहींना तर मधेच थांबावे लागते,काहींना जेपत सुद्धा नाही तरीही जबरदस्तीने करावे लागते आणि पुढे जावून हातात फक्त निराशा लागते.
    तुमचे पुढचे जीवन कसे असनार आहे हे तुम्ही कोणता मार्ग निवडता यावर अवलंबून असते.म्हणून एक चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यात खुप महाग पडू शकतो.
    खरे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांला आपली आवड ओळखता आली पाहिजे आणि त्यानुसार त्यांना आपले करियर निवडता आले पाहिजे.कोणताही मार्ग निवडताना आपल्या आनंदाचा,स्व्प्नांचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समाधानाचा विचार करायला हवा.
    आपले करियर निवडताना स्व्तःला हे प्रश्न विचारायला पाहिजे की;आपल्याला ही गोष्ट आवडते का?आपण हे करू शकतो का?याच्यातून आपण चांगले पैसे कमवू शकतो का?यातून आपल्या समाजाची मदत होऊ शकते का?
    आपले करियर असे निवडावे की ते दिवसभर करुनही आपण उत्साही असू.आपल्या आवडीचे काम असल्यास मिळणारे समाधान,आनंद द्विगुणीत होतो.शिक्षण एका क्षेत्रातले व आपल्या आवडीनुसार असलेल्या वेगळ्या क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेऊन यशस्वी झालेली उदाहरणे दिसतात.
    Thank you so much,sir!

    Reply
  30. Hello Sir,
    Excellent blog आहे ,
    आपल्या जीवनात योग्य करिअरची निवड करणे हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो. आणि योग्य करिअरची निवड कशी करावी ?यावर हा ब्लॉग सरांनी लिहिलेला आहे. हा ब्लॉग आम्हा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतो कारण बरेचदा आपल्या समोर एक मोठा प्रश्न असतो की पुढे नेमकं काय करायला पाहिजे. घरचे काय म्हणतात त्या प्रमाणे चालायचे की आपल्याला जे आवडतं त्याप्रमाणे चालायचा?
    करियर हे आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात करायला पाहिजे . आवड असलेल्या ठिकाणी आपण जीव ओतून काम करतो आणि ते पूर्णत्वाकडे नेतो. आणि नावडते काम आपण करायचे म्हणून करतो.आणि मग कामाच्या ठिकाणी आपल्या तक्रारी सुद्धा वाढत जातात. हे असे आयुष्य आपल्याला हवे नसेल तर आपण योग्य करिअरची निवड केली पाहिजे.
    या ब्लॉग मध्ये आणखी एक म्हणजे दिवसाचे चोवीस तासांची विभागणी (8+8+8=24 ) हे मांडलेला आहे.आणि एक इकिगाई मॉडेल शेअर केलेला आहे. इकिगाई हे पुस्तक आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की आपल्या जीवनाचा एक (purpose )उद्देश असतो.आणि तो उद्देशच आपल्याला जीवन जगण्यासाठी प्रेरित करत असतो. म्हणून आपल्याही जीवनात जीवनाचा उद्देश असावा.
    या ब्लॉगमध्ये सरांनी आपल्याला आपल्या जीवनात उद्देश मिळण्यासाठी काही प्रश्न विचारले आहेत. त्याचे उत्तर मिळाले म्हणजे आपला उद्देश मिळाला .मग आपले जीवन आपल्याला हवे तसे जगता येईल.
    Thank you Sir☺…

    Reply
  31. आपल्या सबंध जीवनाचा मार्ग दाखवणारा एक भाग असतो की ज्यावर आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं आणि त्यामुळेच आपल्या आयुष्याच्या वाटा ठरू शकतात. तो भाग म्हणजे आपलं करियर. जीवनातील महत्त्वाचा क्षेत्राचा विचार करत असताना त्यामध्ये करियर हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ज्यातून आपल्या जीवनाचा पसारा साध्य होतो . त्यामुळे हा भाग योग्य रीतीने निवडणे हे सर्वांसाठीच आव्हानात्मक बाब आहे. आणि या करोडोच्या लोकसंख्येमध्ये अगदी काहीच लोक त्यांचे योग्य करिअर निवडताना आणि अख्ख्या जीवनाचा उदोउदो करून घेतात. मग ही काहीच लोक त्यांचे योग्य करिअर का निवडू शकतात? आपल्याकडे काय कमतरता आहे की आपण आपण योग्य करिअर घडवू शकत नाही आपलं जीवन आपल्याला हवा तसं जीवन जगू शकत नाही या गोष्टी मागे कोणती कारणे आहेत? अशा प्रश्नांचा विचार करत असताना त्यासाठी हा ब्लॉग खूप मदत करतो.

    आपले करियर किंवा आपले ध्येय निश्चित करत असताना त्यामध्ये आपला वाटा किती असतो? या गोष्टीचा विचार केला तर त्याचा उत्तर असेल की, अगदी काही टक्के आपला वाटा आपल्या करिअर निवडीमध्ये बघायला मिळेल. आपल्यामध्ये काय आहे? आपण काय करू शकतो, हे फक्त आपल्यालाच माहिती असते याबाबत इतरांना आपल्या एवढी कल्पना नसते आणि यामध्ये दुर्भाग्याची अशी गोष्ट आहे की आपण करियर निवडताना आपलं करियर आपल्या मधल्या भागाचा विचार न करता मार्केट मधील जो ट्रेंड चालू आहे त्या ट्रे नुसार आपलं करियर ठरवल्या जाते. आपल्यामध्ये असलेल्या उपजत टॅलेंट आपल्या मध्ये असलेली भन्नाट कौशल्य यांचा विचार करून जर आपण आपलं करिअर निवडलं तर त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये सकारात्मकच होतील आणि आपण ठरवलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला विलंब लागणार नाही आणि अगदी सहजतेने आनंदाने प्रसन्नतेने कुठलीच तक्रार न करता आपण आपल्या ध्येयाची पूर्ती करू शकतो आणि प्राप्त केल्यानंतर सुद्धा आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे पुढील आयुष्य सुद्धा सुखकर जाईल यात शंका नाही.

    आपलं करियर निवडत असताना आपल्या आजूबाजूची लोकं आपली जवळ आपल्यामध्ये असलेले कौशल्य या गोष्टीचा विचार न करता ते फक्त त्या कालखंडामध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व आहे म्हणजेच या विशिष्ट काळामध्ये कोणती गोष्ट top ला आहे याचा विचार करून आपलं करियर ठरवत असतात आणि आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला ते accept करावं लागतं यामुळेच जीवनाचा सत्यानाश होतो हा सत्यानाश थांबवायचा असेल तर आपल्याला ध्येयनिश्चिती करत असताना इतरांच्या सल्या पेक्षा आपल्याला महत्त्व देणे गरजेचा आहे त्यासाठी स्वतःसाठी वेळ काढून स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची नितांत गरज आहे आणि स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची शक्ती वेगवेगळ्या लर्निंग मधूनच मिळू शकते त्यासाठी लाईफ सारखी लर्निंग महत्त्वाची आहे.

    एखाद्या ना आवडीच्या क्षेत्रामध्ये आपण आपलं करिअर ठरवलं आणि त्यामध्ये यश मिळवलं परंतु जर आपल्या जीवनाचा उद्देश वेगळा असेल आपण निवडलेल्या करिअर पेक्षा आपण निवडलेल्या कामापेक्षा आपला उद्देश वेगळा असेल तर आपण निवडलेला काम सुद्धा आपल्याला रडगाणे वाटायला लागतं आणि त्यातूनच आपल्या जीवनातून आनंद सुख समाधान समृद्धी नष्ट होते आणि जीवन अर्थहीन होऊन निरश्याचा महापूर येतो. मग ते काम कितीही उच्च पदावर चा असेल त्यामधून अमाप पैसा मिळत असेल तरीसुद्धा हा आपल्या जीवनात निराशा होऊ शकते कारण पण आपला जीवनाचा उद्देशच वेगळा आहे आणि आपल्या जीवनाच्या उद्देशानुसार यश प्राप्त करण्यासाठी त्या उद्देशानुसार करिअर निवडण्यासाठी हा ब्लॉग खूप महत्त्वाचा आहे.

    आपल्या या प्रभावशील लेखणीतून एक नवा पॅटर्न अनुभवायला मिळाला तो म्हणजे 8+8+8= 24 . आपल्या लाईफ मध्ये दररोज 24 तासाचे विभाजन कशा पद्धतीने केले जाते. खरंतर यामध्ये आठ तास कामासाठी आणि आठ तास फॅमिली साठी आणि आत्ताच झोपेसाठी असायला पाहिजेत आणि ज्यावेळी आपण योग्य करिअर निवडावे आपल्या आवडीचं करिअर निवडाल आणि ते करिअर ते ध्येय पूर्ण पूर्ण झाला असेल तर हा पॅटर्न साध्य होतो परंतु सध्या 90 टक्के लोकांचे आहेत की ते या पॅटर्ननुसार त्यांचे जीवन चालत नाही या गोष्टीच्या कारणांची चौकशी केली असता शेवटी तेच हाती लागते की ते लोक त्यांच्या आवडीच्या क्षेत्रापासून लांब गेले त्यामुळे त्यांना जे करायचं होतं ते करू शकत नाहीत त्यातूनच त्यांच्या चिडचिडेपणा निर्माण होतो आणि त्यामुळे हा सुंदर पॅटर्न ते अनुभवू शकत नाहीत. या तत्त्वानुसार चालण्यासाठी आपल्याला आपल्या कुवतीनुसार आपल्या इच्छेनुसार आपल्या क्षमतेनुसार करिअर निवडणे अत्यंत महत्त्वाचा आहे यामधील दुसर्‍याचा जो वाटा आहे त्या वाट्याला पूर्णविराम दिले पाहिजे त्यांना आता स्थगित केलं पाहिजे आणि आपण आपला विचार करून आपली आवड आवड निवड लक्षात घेऊन योग्य करिअर निवडले पाहिजे. इतरांनी आपल्या करिअरमध्ये निवडी मध्ये जास्तीचा हस्तक्षेप केल्यामुळे आपल्या स्वप्नांचा वाटोळ होऊन जातं. आपण सुद्धा या मार्केटमधल्या trend च्या मोहात पडल्यामुळे आपल्याला सुद्धा त्यातून मिळणाऱ्या लाभांच आकर्षण आपल्या स्वप्ना पासून लांब घेऊन जातं आणि शेवटी ते आपली आवड नसल्याने त्यामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात रस निर्माण होत नाही आणि त्यातून आपण कितीही काम करून आपले रिझल्ट 0 यायला लागतात आणि आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तिथेच असल्यासारखा आपल्याला जाणवते आणि शेवटी वेळ निघून गेल्यामुळे हातामध्ये निराशा येते आणि निराशा ही जीवन संपवण्याचा स्त्रोत असतो. त्यामुळे आपण आपल्या स्वप्नाला सुकू न देता नेहमी प्रफुल्लीत ठेवला पाहिजे आणि त्यानुसारच आपल्या करीयरची आपल्या देही याची निवड केली पाहिजे आणि जीवनात आपल्याला जे पाहिजे ते मिळविण्याची तयारी दर्शवली पाहिजे खरंतर ही तयारी ज्यावेळी आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये कार्य करत असतो त्या क्षेत्रामध्ये जन्म घेत असते आणि त्यातूनच जीवन आनंदमय होत असते.
    योग्य करिअर निवडला पाहिजे, आपल्यामधील असलेल्या क्षमता आपल्यामधील असलेले कौशल्य याची पडताळणी करून आपल्या करीयरची आपण वाटचाल केलं पाहिजे या सर्व बाबी आत्तापर्यंत विविध लोकांकडून ऐकलेल्या होत्या परंतु ती योग्य करिअर निवडण्यासाठी काय केले पाहिजे? त्यासाठी कोणता मंत्र आहे? या गोष्टीची माहिती नव्हती आणि ती माहिती आपल्या या लाइफ चेंजिंग विचारातून मिळाली तुम्ही सांगितलेले इकिगाई मॉडेल खरंच अत्यंत उपयुक्त आहे.

    १) असे कोणते काम आहे की, ते करायला तुम्हाला मनापासून आवडते?
    २) असे कोणते काम आहे की, जे तुम्हाला चांगले येते?
    ३) असे कोणते काम आहे की, जगाची एखादी गरज तुम्ही भागवू शकता?
    ४) असे कोणते काम आहे की, त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील?
    ५) असे कोणते काम आहे की, ते केल्यामुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळते?

    आपण सांगितलेल्या या 👆 पाच प्रश्नांचा वापर करून जर करिअर निवडलं तर नक्कीच जीवनाचा स्वर्ग बनल्याशिवाय राहणार नाही. हे पाच प्रश्न ही फक्त प्रश्नच नाही तर जीवन बदलण्याची सूत्र आहेत. एखादं काम करत असताना त्या कामावरून आपल्याला आनंद मिळतो का ही गोष्ट फार महत्त्वाची असते कारण आपण जीवन फक्त आनंदासाठी सुखा समाधानासाठी जगत असतो आणि जीवनाचा उद्देश सुद्धा तेच असतो की त्यातून आपल्याला आनंद प्राप्त झाला पाहिजे आणि आपण सुखी-समाधानी झाले पाहिजे. समृद्धी आपल्या आजूबाजूला नांदली पाहिजे सर्वांच्या अपेक्षा असते आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण या मधील पहिला प्रश्नाचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपल्यामध्ये त्या गोष्टीचा शोध घेऊन ती गोष्ट focus मध्ये आणली पाहिजे. आता त्या गोष्टी मधून फक्त आनंद मिळून किंवा तीच गोष्ट आपल्याला खूप आवडते महत्त्वाचं तर असतेच परंतु ती गोष्टींमध्ये किंवा ते कार्य आपल्या चांगल्या पद्धतीने जमते का आपण इतरांपेक्षा त्या कार्यामध्ये नैपुण्य मिळू शकतो का? काही गोष्टीचा विचार करणे तेवढेच महत्त्वाचे असते. आणि एखादं काम आपल्याला मनापासून आवडते ते आपण इतरांपेक्षा वेगळे करू शकतोच यामध्ये शंका नाही परंतु त्यासाठी सातत्य आपल्याकडे असल पाहिजे. त्याचबरोबर जीवनामध्ये पैसा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. असे म्हटले जाते की ज्याच्याकडे आहे अर्थ ( पैसा ) त्याच्या जीवनाला प्राप्त होतो अर्थ त्यामुळे आपली आर्थिक बाजू सुद्धा मजबूत असणे गरजेचे आहे आणि आपण करियर निवडत असताना आपल्याला आवडत असलेल्या कार्यामधून आपण पैसे कमवू शकतो का ही बाब सुद्धा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

    एखादं काम करत असताना आपण सारखे घडी कडे बघत असतो प्रत्येक पाच दहा मिनिटांनी आपण घडीचे तोंड बघत असतो तर हे असे का होते? याचे उत्तर असेल की ज्यावेळी आपण आपल्या मनाविरुद्ध काम कराल, आपल्याला आवडत नसलेल्या काम करण्याची वेळ जेव्हा आपल्यावर येते त्यावेळेस आपल्याला एक मिनिट सुद्धा एका दिवसात सारखा वाटायला लागतो याच्या विरोधात जर आपल्याला एखादी काम मनापासून आवडत असेल ते काम करण्याची आपली प्रचंड इच्छा असेल जर ते आपण काम करत असाल तर एक दिवस हा एका मिनिटा सारखा वाटायला लागेल . हे काम करताना आपण तहानभूक हरवून जातो त्यामध्ये मी आपलं करिअर निवडण्यासाठी आपण विशेष लक्ष दिले पाहिजे अशाप्रकारे जर आपण आपल्या करियर निवडीमध्ये या पाच प्रश्नाचा उपयोग केला तर नक्कीच त्या ठिकाणी आपण आपल्या जीवनाचा उद्देश प्राप्त करू शकतो आणि जीवन हे तडजोडीचे न जगता आनंदाचं सुखासमाधानाचे समृद्धी जगू शकतो.
    खरंच हा ब्लॉग लाईफ change करणारा आहे खरंतर आपल्या जीवनाचे टर्निंग पॉईंट जीवनाला वेगळे वळण देण्याचा हा करिअर निवडीचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि तो प्रश्न अगदी सहजरीत्या आणि आपल्या जीवनाचा उद्देश प्राप्त करण्याचा करून देण्यासाठी ज्या पद्धतीने आपण या ब्लॉगच्या माध्यमातून solve केलात ते mind blowing आहे .Heartly thanks Sir

    Reply
  32. योग्य करियरची निवड कशी करावी?

    आपल्या जीवनाच्या जडण घडणी मध्ये आपल्या Carrier चा role खूप महत्वाचा असतो ज्यावरून आपल्या सबंध जीवनाची वाटचाल ठरत असते तो point म्हणजे करिअर हेच carrier निवडण्यासाठी आपल्या मध्ये प्रचंड प्रमाणात कन्फ्युजन असते . ते confussion दूर करुन एक आपल्या कौशल्यानुसार , आपल्यामध्ये असलेल्या कुवतीनुसार करिअर निवडण्यासाठी हा ब्लॉग अत्यंत उपयुक्त आहे .

    आपल्या जीवनाचे दोन भाग खूप महत्वाचे असतात – l) विवाह आणि II) Carrier हे दोन भाग ज्या व्यक्तीला आयुष्यात मेन्टेन करता आले ज्या व्यक्तिने हे दोन भाग त्यांच्या मनानुसर निवडले किंवा ज्यांना ही निवडण्याची संधी मिळाली खऱ्या अर्थाने त्यांच्या जिवनात सफलता आली असे म्हणता येईल. हल्ली चा जर विचार केला तर या दोन बाबी निवड करण्याची संधी खूप कमी जनाला मिळते mostly आपल्या आयुष्यात ह्या दोन गोष्टी ठरवण्यासाठी आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तीचा role महत्वाचा ठरत आहे. त्यामुळे आपल्याला जे काही जगाच्या वेगळं करायचं होत ते रुहूनच चाललेलं आहे . जीवनाचा उद्देश प्राप्त करून ते साध्य करायचा असेल तर carrier व इतर कोणत्याही बाबतीत निर्णय घेण्याची जेंव्हा परस्थिती उद्भवेल तेंव्हा आपण इतरांना तेवढी किंमत न देता स्वतः ला किंमत देऊन आपल्या आत मध्ये डोकावून पाहून आपल्यामध्ये असलेल्या जबरदस्त talent , भन्नाट कल्पनेनुसार जर आपण आपल्या Carrier ची निवड केली तर नक्कीच आपलं जीवन प्रफुल्लित बनाल्याशिवाय राहणार नाही.

    लोकांचा सहभाग आपल्या carrier निवडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणत असतो आणि लोक ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये डोकावतात त्या वेळीच जीवनाचे मार्ग बदलतात . ज्या वेळी आपण आपल्या carrier निवडीमध्ये लोकांना संधी देतो त्यावेळी आपल्या मध्ये असलेल्या talent , कल्पना त्या ठिकाणी आपण त्याचा रहास करायला लागतो . हे लोक आपल्यामध्ये काय आहे याची पडताळणी करत नाहीत तर सद्य स्थितीला कोणत्या बाबीला महत्व आहे त्या कालावधीमध्ये कोणता trend चालू आहे त्यानुसारच आपल्या Carrier ची दिशा लोकांकडून ठरवली जाते. आणि आपल्यामध्ये ते पेलण्याची ताकद असो व नसो ते ओझ आपल्यावर लादल जातं आणि तेच ओझ उचलण्यात आपलं आयुष्य निघून जात शेवटी हाती बेरोजगारी शिवाय काहीच लागतं नाही .

    आणि यामध्ये खंत वाटण्यासारखी अशी गोष्ट आहे की आपण सुध्धा आपल्या मध्ये असलेल्या कौशल्याचा, ज्ञानाचा उपयोग त्या मार्केट मध्ये चालू असलेल्या ट्रेंड कडेच आकर्षित करतो किंबहुना त्या गोष्टीच्या लाभाच्या मोहकडे आपल्याला आकर्षित केले जाते आणि त्यामुळेच आपली त्या ठिकाणी फसगत होते आणि आयुष्याची राख होते. ही राख जर आपल्याला थांबायचं असेल तर त्यासाठी लोकांचे सल्ले कमी करून आपण आपल्याला वेळ दिला पाहिजे आणि आपल्याला आपण ओळखल पाहिजे यामुळे आपली खरी किंमत काय आहे हे समजून येईल आपण कोणत्या गोष्टी आयुष्यात प्राप्त करू शकतो याचा सुगावा लागेल आणि त्यातूनच जीवनाची वाटचाल स्वर्गमय जीवनाकडे होईल.

    आज जगामध्ये Carrier च्या असंख्य संधी उपलब्ध आहेत तरीसुद्धा आपण एखाद्या विशष्ट क्षेत्रातच गर्दी झालेली बघत असतो . एका विशिष्ट कालावधीनुसार एखादी गोष्ट मार्केट मध्ये गाजत असते आणि त्यातच आपलं सुद्धा आकर्षण निर्माण होत आणि आपणही त्याच गोष्टीकडे वळतो. आणि या क्षेत्राकडे गर्दी जास्त असल्यामुळे आपल्याला जे मिळवायचं आहे ते मिळेल की नाही त्याचबरोबर आपली कौशल्य , आपल्यामध्ये असलेलं उपजत ज्ञान या क्षेत्रात उपयोगी पडेलच याचाही आपल्याला भरवसा नसतो त्यामुळेच इथे नशिब शब्दाचा जन्म होतो. आपलं जे माईंड असते ते आपल्या भोवताली आसलेल्या प्रस्थितीनुसर कार्य करत. जसे आपल्या आजूबाजूचे वातावरण वातावरण असेल तसच a0an सुध्दा कृती करत असतो आपलं माईंड त्यानुसार वागत असते म्हणून अस्या वेळी आपल्या आजुबाजूच वातावरणच त्या एका विशिष्ट trend प्रमाणे निर्माण झालेले असते त्यामुळेच आपल्या mind ला त्या वातावरणाचा support भेटतो आणि आपण त्याच गोष्टीकडे वळतो. उदा. सद्य स्थती सांगायची झाल्यास सध्याला service ला खूप महत्व आहे आणि त्यामधे ही स्पर्धा परीक्षा हा ट्रेण्ड मार्केट मध्ये अग्रेसर आहे त्यामुळे सगळी गर्दी त्या ट्रेंड मध्ये आहे कारण सगळं वातावरणच तस तयार झालेलं आहे त्यामुळे वातावरणानुसार आपल्या हरकती होत असतात आणि आपण त्या क्षेत्राकडे वळत असतो त्यावेळी हे सगळं योग्य आहे असं वाटतं परंतु ज्यावेळी आपण स्वतः ला तिथे शोधाल तेंव्हा खऱ्या जीवनाचा अर्थ समजेल.

    या सगळ्या गोंधळा मध्ये आपण बघितलेली पंचतारांकित स्वप्ने हळू हळू लंपास व्हायला लागतात कारण आपण ज्या ट्रेंड च्या प्रवाह मध्ये घुसलेलो असतो तो प्रवहच एवढा जोरदार असतो की त्यातून बाहेर येणं सुचतच नाही आणि जरी सुचलं तरी आपण त्यावेळी काहीही करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते आणि आपल्या स्वप्नाची राख रांगोळी प्रवाहामुळे होत असते म्हणून त्या प्रवाहाच्या लांबच असलेलं बर .

    आपल्याला जो हा मौल्यवान वेळ मिळतो तो वेळ आपण एका दिवसा नुसार कसा घालवत असतो आपल्या ल मिळालेल्या 24 तासाचे विभाजन ८+८+८ अश्या पद्धतीचं असते यामधील ८ तास कामासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी त्यानारचे 8 तास रिलेशन किंवा ज्या गोष्टीसाठी आपण एवढी धडपड करत असतो , ज्या पासून आपल्याला आनंद, माया, प्रेम, आपुलकी मिळते अश्या गोष्टी साठी ( family) आणि उरलेले 8 तास झोप घेण्यासाठी असतात परंतु आपल Carrier jar आपण आपल्या इच्छे विरुद्ध निवडलेल असेल तर आपल माईंड सुध्दा आपल्याला त्या गोष्टीमध्ये सुखाने काम करू देत नाही , त्यामधे आपल्याला प्रत्येक कामात चुका दिसायला लागतील ती सगळी system च आपल्याला चुकीची वाटायला लागेल हे फक्त एका कारणासाठी की आपण Carrier निवडत असताना मार्केट का महत्व दिलेलं आहे त्यासाठी हे 24 तास योग्य रीतीने चालवायचे असतील तर Carrier सगळयात महत्वाची बाब आहे.

    या प्रभवशिल लेखनातून मिळाले ली अतीशय मौल्यवान देणगी म्हणजे IKIGAI model . करिअर निवडण्यासाठी अनेकांचं मार्गदर्शन मिळत असते परंतु ते कोणत Carrier निवडाव यापर्यंतच मर्यादित असते परंतु Carrier कोणत्या सूत्राच्या आधारे निवडाव हे कुठच मिळत नाही ते सोन ये मॉडेल मध्ये आहे आणि तुमच्यामुळे त्याचा आस्वाद आम्हाला चाखायला मिळाला. खरंच जीवनाचा उद्देश प्राप्त करण्यासाठीं आपल्याला या मॉडेल छा उपयोग करून Carrier निवडण्याची नितांत गरज आहे . या medel चे जे पाच सूत्र आहेत ते अख्या जीवनाचा रास्ता बदलणारे आहेत . खरंच जे काम करत असताना आपण तहान भूक सगळं विसरून त्यामधे कार्यरत असतो ज्यातून आपल्याला आनंदाच्या महासागरात तरंगत असल्यासारखं वाटते , त्याच बरोबर ते काम आपल्याला इतरांपेक्षा चांगलं जमते का आणि त्यातून पैसा आपल्याकडे येऊ शकतो का या गोष्टीचा विचार करून जर आपण आपल्या carrier ची निवड केली तर नक्कीच जीवनात आनंदच आनंद असेल यात काही शंका नाही.
    असा हा जीवनाला एक कलाटणी देणारा ब्लॉग आपण अतीशय मेहनतीने आमच्या हितासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

    Reply
  33. जीवनाला एका समृद्धीच्या वाटेवर नेण्यासाठी आपल्या सबंध आयुष्यामध्ये करियर हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो कारण त्याच भागावरुन आपल्या जीवनाची दिशा ठरली जाते . आपले जीवन प्रगतीच्या वाटेवर जात आहे की अधोगतीच्या वाटेवर जात आहे हे कळण्याचे एकमेव सूत्र म्हणजे करियर. आणि जगामध्ये 95 टक्के लोकं याच ठिकाणी चुकतात त्यामुळे त्यांना तडजोडीचे जीवन जगणे भाग पडते. आजा सुपर टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये एवढी संधी उपलब्ध असून सुद्धा आपल्याला अनेक जण बेरोजगार असलेले दिसतात, अजूनही दारिद्र्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात दिसून येते. आजही या विकसित जगामध्ये असे लोक असतात की ते दोन वेळचे अन्न सुद्धा घेऊ शकत नाही एवढी दरिद्री परिस्थिती जगामध्ये बघायला मिळते . हे सर्वांचा थोडासा अभ्यास केल्यानंतर या सर्व गोष्टींचे निराकरण करण्यासाठी हा दिलेला ब्लॉग अत्यंत उपयुक्त ठरतो असे लक्षात येते.

    आपले ध्येय निश्चित करण्यासाठी त्यामध्ये आपला सहभाग कितपत असतो ही बाब लक्षात घेतली त्यामधून अगदी बोटावर मोजण्या एवढी संख्या अशी मिळेल की त्यांना त्यांच्या करिअर निवडीमध्ये स्वतंत्र असलेले दिसते. आता यामध्येही यांना सुद्धा पूर्णपणे स्वतंत्र नसते त्यामध्ये थोडाफार का होईना इतरांचा वाटा असतोच. आपल्या आयुष्याची दिशा ठरवणारा मार्ग इतरांना कसा माहिती असेल ? हा मूळ प्रश्न त्याठिकाणी निर्माण होतो परंतु या प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले जात नाही त्यामुळेच इतरांनी ठरवून दिलेल्या करियर मागे आपण धावत असतो आणि ते आपल्या अंतर्मनाला, किंवा आपल्या मध्ये असलेले जे काही गुण कौशल्य आहेत त्यांना अनुसरून नसल्यामुळे त्यातून आपल्या रिझल्टच भेटत नाही त्यामुळे आपण फक्त त्या मागे धावून बेजार होत असतो. आपल्याला झेपत नसलेल्या गोष्टी मागे आपण इतकं धावत असतो की धावता-धावता आपल्या आयुष्याचा इंटरवल होतो आणि शेवटी आपल्याजवळ काहीच उरत नाही आपण फक्त पश्चातापाचा महा सागरात बुडून राहतो.

    जे लोक आपल्या आयुष्यामध्ये आपल्या करियर निवडी चे काम करत असतात, च लोकांनी आपल्या ध्येय निश्चिती मध्ये वाटा घेतलेला असतो त्या लोकांचा मानस, त्यांचा दृष्टिकोन सुद्धा चांगलाच असतो कारण ती सुद्धा आपलं वाईट व्हावं या हेतूने आपली ध्येयनिश्चिती करत नसतात तर त्यामधून आपलं चांगलं व्हावं आपण उच्चस्थानी पोहोचावं हा त्यांचा हेतू असतो परंतु यामध्ये गोष्ट अशी घडते की, या पृथ्वीतलावर प्रत्येक माणूस इतरांपेक्षा वेगळा आहे प्रत्येकाकडे वेगवेगळी कौशल्य आहे आणि त्यांच्या मध्ये असलेले कौशल्य भरण्यासाठी प्रत्येकाकडेच प्रचंड प्रमाणात पोटेन्शियल आहे. एवढा असून सुद्धा आपल्या हाती बेरोजगारी लागते याच मुख्य कारण म्हणजे, आपण आपल्या मध्ये असलेली कौशल्य, आपल्यामध्ये असे जबरदस्त टॅलेंट याची ओळखच करून घेत नाही . आता ह्या गोष्टीची ओळख कधी होते किंवा कशी करावी? हा त्या मधला महत्वाचा मुद्दा असतो. तर अशा गोष्टींची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला स्वतःसाठी वेळ द्यावा लागतो किंवा तसे एखादे आव्हान आपल्यापुढे निर्माण व्हावे लागते आणि निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण स्वतः लढलं पाहिजे या सर्व प्रक्रियेतून आपल्याला आपली ओळख होते आणि सबंध जीवनाच सोनं बनत.

    मग आपली समस्या हेच असते की ज्यावेळी आपल्या कुठे करिअर निवडीचे आव्हान निर्माण होते त्यावेळी आपण त्यासाठी इतरांकडे हात पसरतो इतरांची मदत घेतो . आपली स्वतःची ओळख आपल्यालाच नसेल तर इतरांना कशी होणार? यामुळे आपल्या करिअर निवडीचा निशाणा चुकून आयुष्याचा बान वेगळ्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. ज्या लोकांची आपण करिअर निवडण्यासाठी मदत घेत असतो ते लोक कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर आपल्यापर्यंत एवढ्यात असतात ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे. खरंतर आपण काय करू शकतो किंवा एखादं काम करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या पात्रता आहेत त्या पात्रतेनुसार आपल्यामध्ये असलेल्या वेगळ्या कौशल्यानुसार जर त्या माणसांनी आपलं करिअर निवडीचे मार्गदर्शन केलं तर ती योग्य मार्गदर्शन असेल. परंतु असे होताना दिसत नाही, ज्या गोष्टीला सध्या किंमत आहे, जी गोष्ट सध्या उच्च स्थानी मानली जात आहे हे अशाच खूप आधी मध्ये आपलं करिअर निवडले जाते. त्यामध्ये आपल्या मध्ये असलेले वेगळे कौशल्य आपल्यामध्ये असलेल्या जबरदस्त टॅलेंट विचार केलेलाच नसतो त्यामुळेच निराशा पत्करावी लागते.

    त्या गोष्टीचा त्या त्या कालावधी मध्ये एवढं महत्त्व वाढले राहतं की प्रत्येकालाच अशी इर्षा निर्माण होते की आपण सुद्धा ते केलं पाहिजे आपल्याला सुद्धा त्यातून ते मिळाले पाहिजे या आशा विचारामुळे आपण त्याकडे आकर्षित होत असतो . आणि या आकर्षणाच्या लोभामुळे आपण आपल्याला विसरून जातो आपल्या मध्ये असलेली वेगळं करण्याची जी वृत्ती असते ती वृत्तीच आपण विसरून जातो . आजच्या स्थितीचा विचार केला आज सेवा क्षेत्राला फार महत्त्व आले आहे आणि त्यामध्ये ही स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न अनेकांचे ठरलेला आहे अनेकांनी त्या क्षेत्रामध्ये करिअर निवडलेला आहे. झरी ते झेपण्याची आपल्यामध्ये ताकद नसली तरीही आपण बळजबरीने ते ओढून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अशाच हरकती आपण करत असल्यामुळे तडजोडीचे जीवन जगणारी संख्या जास्त दिसत आहे .

    ह्या आकर्षणामुळे, आणि मार्केटमध्ये जो ट्रेन चालू आहेत या ट्रेंडमुळे त्या गोष्टीच्या मोहात आपण हरवलेला असतो त्यामुळे आपण जी आभाळाएवढी स्वप्न रेखाटली होती ती तशीच आयुष्यभर कोरी असतात आणि कोऱ्या वस्तूला महत्त्व नसतं . आपल्याकडे नसलेल्या वस्तू च्या शोधात आपण उतरल्यामुळे आपल्याला काहीच मिळत नाही आणि ती वस्तू शोधण्याचा अर्धा आयुष्य निघून जातं यामुळे आपली स्वप्न आपोआप लोप पावतात .

    आपल्या जीवनाची दैनिक विभागणी जी 24( ८+८+८) तासंध्ये केलेली असते . ती खरंच कीती लोकांना लागू होते? किंवा किती लोकांच्या आयुष्यामध्ये असं घडत असते याचा विचार केला तर अगदी बोटावर मोजण्याइतकेच लोक या पॅटर्ननुसार चालत असतात कारण ते लोक त्यांचं करिअर योग्य पद्धतीने निवडलेले असतात त्यामुळे त्यांना आयुष्यातल्या सगळ्या एरियामध्ये यश येत असलेले दिसून येते. त्यांच्या जीवनात नेहमीच तेजस्वीपणा दिसून येतो . त्यामुळे जर आपल्याला सुद्धा या 24 तासाचे विभाजन योग्यरीतीने हाताळायचा असेल तर योग्य आणि आपल्यामध्ये असलेल्या गोष्टीनुसार करिअर निवडणे ही अत्यंत गरजेची बाब आहे.

    हा एवढा शक्तिशाली ब्लॉग वाचून mind shock झाल्यासारखं वाटते परंतू यामधील सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे योग्य करिअर कसे निवडावे? आपण आपल्याला ओळखून करिअरची निवड कशी करावी? ही बाब मूळ आहे आणि निवडण्यासाठी तुम्ही जे सूत्र सांगितलात
    ते खरंच माईंड blowing आहेत. आपण जर इकिगाई मॉडेल ने आपल्या करीयरची निवड केली तर नक्कीच जीवनाचा उद्देश प्राप्त होईल आणि ज्यावेळी आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला मिळेल यावेळी अगदी त्या क्षणापासून आपलं जीवन समृद्ध होईल.

    आपण जर आपल्याला हे 👇 प्रश्न मनातून विचारले तर जीवनाचा उद्देश मिळायला वेळ लागणार नाही.

    १) असे कोणते काम आहे की, ते करायला तुम्हाला मनापासून आवडते?

    २) असे कोणते काम आहे की, जे तुम्हाला चांगले येते?

    ३) असे कोणते काम आहे की, जगाची एखादी गरज तुम्ही भागवू शकता?

    ४) असे कोणते काम आहे की, त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील?

    ५) असे कोणते काम आहे की, ते केल्यामुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळते?

    या सर्व प्रश्नांची उत्तरे जर मनातून प्रामाणिकपणे मिळाली तर आपल्या जीवनाचा प्रवास सामान्य जीवनातून असामान्यतेकडे चालू होईल आणि त्यामुळे सोनरी होण्यास विलंब लागणार नाही. या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये इनव्हेस्टमेंट करावे लागेल, स्वतःला थोडासा वेळ द्यावा लागेल त्यातूनच आपल्याला आपली ओळख होते आणि या प्रश्नांची उत्तरे अगदी सुलभरीत्या प्राप्त होतील.

    हा ब्लॉग प्रत्येकाचे जीवन घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण जीवनाच्या जडणघडणीमध्ये करिअर चा सगळ्यात मोठा वाटा असतो आणि तेच करियर योग्य रित्या निवडण्यासाठी हा ब्लॉग अति महत्त्वाची भूमिका बजावतो. असा हा bulb on करणारा ब्लॉग दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

    Reply
  34. खरच सर तुम्ही अप्रतिम मार्गदर्शन करणारा हा blog लिहिला आहे
    यामधून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा व उत्साह नक्कीच मिळेल. मी जे वाचल त्यातून मला खूप काही नवीन शिकायला मिळाले अणि पुढे मी नक्कीच तुम्हाला follow करेल.तुम्हाला या विद्यार्थिनी कडून मनापासून शुभेच्छा सर.

    Reply

Leave a Comment

Translate »
error: Content is protected !!